🎇🎇 १३ ऑगस्ट – घटना 🎇🎇 #DinVishesh 🌍 दिनविशेष 🌍 स्मृतिदिन

 

************

१३ ऑगस्ट

जागतिक अवयव दान दिवस

************

 

आज अवयव दान दिवस (World Organ Donation Day) ! १३ ऑगस्ट हा दिवस जगभरामध्ये जागतिक अवयव दान दिवस म्हणून ओळखला जातो.

 

अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं जातं. त्यामुळे एखाद्या माणसाला जीवनदान मिळतं. पण या दानाबाबत समाजात अनेक समज आणि गैरसमज  पसरलेले आहेत. अवयवदानाने एखाद्याला नवीन आयुष्य मिळू शकतं, थांबलेलं जगणं सुरू होऊ शकतं. मात्र उपलब्ध आकडेवारीनुसार, अवयवदानाचं प्रमाण दर दहा लाख लोकांमागे स्पेन मध्ये ३५, इंग्लंड मध्ये २७ तर भारतात फक्त ०.१६ इतकं कमी आहे. त्यातही भारतात आत्तापर्यंत सर्वात जास्त अवयवदानाच्या घटना चेन्नई येथे नोंदवण्यात आल्या आहेत.

 

मेंदुमृत (ब्रेनडेड) व्यक्तीच्या अवयवदानात राज्यात पहिल्या क्रमांकावर मुंबई, दुसऱ्यावर पुणे नागपूर तिसऱ्या क्रमांकावर तर चौथ्यावर औरंगाबाद आहे. अवयवदाना संबंधीचा कायदा १९९४ सालीच झाला असला तरी एवढ्या वर्षांनंतरही त्यातील तरतुदी विषयी फारशी माहिती जनमानसात दिसत नाही. त्यामुळेच आपल्याकडे अवयवदानाचं प्रमाणही कमी आहे.

 

अवयवदानाविषयीचा कायदा आपल्याकडे करण्यात आल्यानंतर हे काम करण्याकरिता झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर, मोहन फाउंडेशन, शतायू यांसारख्या काही अशासकीय संस्थांची स्थापना करण्यात आली. या संस्थांच्या मुंबई शाखांमध्ये, मुंबईतील साधारण ३२ मोठ्या रुग्णालयांची नोंद आहे. या रुग्णालयांच्या मदतीने उपरोक्त संस्थांकडे अवयवांची गरज असणाऱ्या नोंदवण्यात आलेल्या गरजूंची प्रतीक्षा यादी व अवयवदाता यात समन्वय साधला जातो. इच्छुक अवयवदाता या संस्थांच्या संकेत स्थळांवर जाऊन अवयवदानाचा अर्ज भरून ठेवू शकतो. परंतु अवयवदात्याची इच्छा असली तरी त्याच्या मृत्यूनंतर ती पूर्ण करणं मुख्यत निकटच्या नातेवाईकांच्या हाती असतं. या नातेवाईकाने वा कुटुंब सदस्याने संस्थेला कळवल्याशिवाय अवयवदान अशक्यप्राय होतं. म्हणूनच अवयवदानाच्या अर्जावर त्याच्या निकटच्या नातेवाईकासह एका साक्षीदाराची सही आवश्यक असते.

 

अवयवदानाचा अर्ज भरल्यावर अवयवदात्याला संस्थेकडून अवयवदाता असल्याचं एक कार्ड मिळतं, जे त्याने वाहनचालक परवान्याप्रमाणे सतत जवळ बाळगणं अपेक्षित असतं. समजा एखाद्या व्यक्तीचा फॉर्म भरण्यापूर्वीच मृत्यू झाला व मृत व्यक्तीची अवयवदानाची इच्छा होती की नाही याविषयीही जवळच्या नातेवाईकांनाही काहीही माहिती नसेल तरीही मृताचे अवयव दान करण्यायोग्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तर त्या मृत व्यक्तीच्या जवळच्या एका नातेवाईकाच्या लेखी संमतीनेही अवयवदान करता येतं.

 

अवयवदानाबाबत अनेक गैरसमजही पसरलेले आहेत. ज्यातला सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था अवयवांचा काळाबाजार किंवा मनमानी कारभार करत असणार. म्हणून अनेकदा मृताचे नातेवाईक आपल्या प्रियजनांचे अवयव दान करण्याचे टाळून त्या मृत व्यक्तीची इच्छा नजरेआड करताना दिसतात. परंतु येथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था अवयवदाना संबंधीच्या कायद्यांतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसारच काम करतात.

 

अवयवदानातली दुसरी अडचण म्हणजे हृदय, स्वादुपिंड व यकृत निकामी झाल्याने अकाली मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. परंतु कोणताही जिवंत माणूस दुसऱ्या कोणाला हृदय देऊ  शकत नाही. जिवंत माणसाच्या स्वादुपिंड व यकृत यांचा काही भाग गरजूंच्या शरीरात रोपण करता येतो, परंतु त्यात धोका असू शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीचे हे अवयव उपलब्ध झाल्यास ते केव्हाही अधिक फायदेशीर ठरू शकतं.

 

दुसऱ्या पद्धतीने, रुग्णालयात व्हेंटिलेटर आणि इतर लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलेल्या व ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीचेच हे अवयव उपयोगात आणता येतात. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत दुरुस्त होऊ न शकणारा दोष निर्माण झाल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा बंद झाल्यास परंतु हृदय काम करीत असल्यास त्या व्यक्तीस ब्रेन डेडघोषित केले जाते. अशा वेळेस त्या व्यक्तीचे वरील अवयव व्यवस्थित काम करत असतात व दानासाठी ते उपयुक्त ठरू शकतात. तसेच मृत्यू रुग्णालयात झालेला असल्याने डॉक्टरांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना वेळीच जाणीव करून दिल्यास अवयवदानाच्या संख्येत खारीचा तरी वाटा उचलणं शक्य होईल.

 

कारण एका अवयवदात्यामुळे साधारण दहा गरजू व्यक्तींना संजीवनी मिळू शकते. आणि ही संजीवनी प्रत्यक्षात गरजूंपर्यंत पोहोचवणारा मुख्य दुवा असतो मृत व्यक्तीचा नातेवाईक. याशिवाय इतर कोणत्याही कारणाने मृत्य झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान व त्वचादानही करता येते. तसेच देहदानही करता येते.

अर्थात मृताच्या नातेवाईकांच्या गळी ही गोष्ट त्या क्षणी उतरवणं डॉक्टरांना कठीण जात असणार हे नाकारता येणार नाही.

 

मृतदेहाची खूप विटंबना होते, काढलेल्या अवयवांचा काळाबाजार करतात, लोक काय म्हणतील, पुढचे सोपस्कार करायला पैसे खर्च करायला नकोत असा लोकप्रवाद इत्यादी कारणांमुळे हे होत असणार. एखाद्याला त्वचारोग असेल तर त्याची त्वचा वापरता येत नाही, असाही एक गैरसमज आहे. परंतु कोणताही अवयव वापरण्यापूर्वी तो व्यवस्थित जंतुविरहीत (स्टरलाइज) करूनच वापरला जातो.

 

याविषयीची माहिती गोळा करताना असे लक्षात आले की, देहदान व अवयवदान या दोन भिन्न प्रक्रिया आहेत. हृदय, फुप्फुस, हाडांच्या पेशी, शिरा, लहान आतडे, स्वादुपिंड, यकृत, मूत्रपिंड, डोळे, त्वचा हे सर्व अवयव दान करता येतात. वर म्हटल्या प्रमाणे स्वादुपिंड, यकृत यांचा काही भाग व एक मूत्रपिंड जिवंतपणीही दान करता येते; परंतु मृत्यूनंतर हे अवयव दान करायचे असल्यास त्वचा व डोळे सोडून इतर अवयव दान करता येत नाहीत, तर फक्त ब्रेन डेड झाल्यासच देता येतात व रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टीम बंद करण्यापूर्वी ही प्रक्रिया करावी लागते. याकरिता डॉक्टरांचे प्रोव्हिजनल डेथ सर्टिफिकेट व नातेवाईकांचं संमतिपत्र अवयव स्वीकारणाऱ्या संस्थेला ताबडतोब मिळणं आवश्यक असतं. या संस्थेमार्फत अवयव जमा करून घेतल्यावर नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत या पद्धतीने मृतदेह नातेवाईकांकडे पुढील अंत्यसंस्कारा करिता लगेचच सोपवला जातो आणि त्याकरिता नातेवाईकांना कोणताही अतिरिक्त भार सोसावा लागत नाही.

 

नेत्रदान वा त्वचादान करण्याची इच्छा असल्यास व नातेवाईकांनी संमतिपत्र दिल्यास नेत्र व त्वचा जमा करून घेतल्यावर नातेवाईकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा प्रकारे व्यवस्थित मृतदेह नातेवाईकांकडे दिला जातो. त्वचादाना विषयीही एक गैरसमज आहे की, आपल्याला नंतर मृतदेह बघणं शक्य होणार नाही. परंतु त्वचादान म्हणजे संपूर्ण मृतदेहाची त्वचा न काढता फक्त पोट व मांडी येथीलच त्वचा जमा केली जाते.

 

भाजलेल्या व्यक्तीला त्वचा मिळाल्यास त्याच्या जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अशी व्यक्ती बरी झाल्यावरही भाजल्याच्या व्रणांमुळे येणाऱ्या विद्रूपतेपासून वाचू शकते. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात असे अवयव, नेत्र, त्वचा आणि संपूर्ण देह यांची खरं तर खूप मोठी गरज आहे; परंतु अनेक गैरसमज, रुग्णालयांची उदासीनता यामुळे ही गरज काही टक्केही पूर्ण होऊ शकत नाही.

 

मृत व्यक्तीविषयी नातेवाईकांच्या मनात आदर असतो. तो आदर आपण अशा प्रकारे द्विगुणित करू शकतो अशी नातेवाईकांची मानसिकता व्हायला हवी. प्रसंगी डॉक्टरांनी नातेवाईकांना पटवून देणं हे आपलं काम मानलं पाहिजे. त्यामुळे मागणी व पुरवठ्यामधील हे मोठे अंतर सहज कमी करता येईल. अनेकांचं आयुष्य नव्याने सुरू करता येईल. आणि तेच सर्वात मोठं समाधान ठरू शकेल.

 

गेल्यावर्षी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रायलातर्फे अवयवदानामध्ये महाराष्ट्र राज्याला उत्कृष्ट राज्यपुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१९ साली सुमारे १५० मेंदूमृत अवयवदान पार पडले होते. त्यामुळे ४४५ पेक्षा अधिक रुग्णांना नवीन जीवन मिळाले होते. जो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा होता. राज्याचे देशपातळीवर कौतुक करण्यात आले होते. यावर्षी म्हणजे २०२० मध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता जास्त असतानाच नेमका यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव अख्या देशात झाला आणि या सामाजिक मोहिमेला एक प्रकारची खीळ बसली.

 

मेंदूमृत अवयवदानामुळे अनेकांना नवीन आयुष्य मिळण्यास मदत होत असते. मार्च ते जुलै या महिन्यात केवळ २२ अवयदान राज्यात पार पडले होते, गेल्या वर्षीच्या तुलनेनं हा आकडा खूपच कमी आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

बालकवी ठोंबरे जन्मदिन

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १८९०

मृत्यू - ५ मे १९१८

 

बालकवी ठोंबरे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला.

 

बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे.

 

बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.

 

बालकवींच्या निसर्ग कविता पाठ नाहीत, असे पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्रात क्वचितच घर होते. त्या काळात सेव्हनव्हतं. जे काही होतं ते पाठांतर. त्यामुळेच श्रावण संपत आला की, बालकवी आठवतात. त्यांचा इंद्रधनू आठवतो. त्यांची 'आनंदी आनंद गडे' घडाघडा पाठ म्हटली जाते.

 

जीवनाचा आनंद बालकवींना सर्वत्र दिसला. वाहणाऱ्या वाऱ्यावर, दशदिशांत आणि जगात सुद्धा आणि एवढा सगळा आनंद जीवनात अनुभवल्यानंतर तो शिल्लकही राहिला. द्वेष संपला, मत्सर गेला आणि जिकडे तिकडे आनंद उरला. बालकवींचे जीवन किती सुंदर होते, याची ही कविता म्हणजे साक्ष आहे.

 

बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैत्यनाचा प्रत्यय येतो. नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय सांगितले जाते. बालकवींना निसर्गा विषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना निसर्गकवी' म्हटले जाते.

 

फ़ुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात,

 

हिरवे हिरवे गार गालिचे

हरित तृणांच्या मखमालीचे ,

त्या सुंदर मखमालीवरती

फ़ुलराणी ही खेळ्त होती !

 

बालकवी ठोंबरे यांचे निधन ५ मे १९१८ रोजी झाले.

 

बालकवी ठोंबरे यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

डावखुरा दिन

************

 

आज डावखुऱ्यांचा दिवस !

 

जगभर १३ ऑगस्ट हा दिवस डावखुरे दिवस म्हणून साजरा केला जातो. याची सुरवात १९७६ मध्ये अमेरिकेच्या कन्सास राज्यातील टोपेका सिटी या शहरात झाली.

 

जगाच्या लोकसंख्येतील ७ ते १० टक्के लोकसंख्या ही डावखुऱ्यांची आहे अनेक प्रसिद्ध व उच्चपदस्थ व्यक्ती डावखुऱ्या होत्या व आहेत. जगज्जेता सिकंदर, नेपोलियन, लिओनार्दो दा विन्ची, मायकेल अँजेलो, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश (प्रथम), बिल क्लिंटन, सध्याचे बराक ओबामा ही काही नावं. क्रीडा क्षेत्रात तर अगणित डावखुरे आहेत.

 

राणी दुसरी एलिझाबेथ, प्रिन्स चार्लस्‌ आणि प्रिन्स विल्यम हे तिघेही डावखुरे, म्हणजे डावरेपण आनुवंशिकही असावा. ॲलन एम टुरिंग डावरा होता, गणिती होता म्हणजे अमूर्त विचारप्रवण होता. डाव्या हाताने फलंदाजी केल्यास संघ निवडीत फायदा होतो, म्हणून गांगुली सारखा एखादाच मुद्दामहून डावखुरा फलंदाज बनतो.

 

अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, मार्टिना नवरातिलोवा, ॲलन बोर्डर, गॅरी सोबर्स, टॉम क्रूझ, निकोल किडमन, ज्युलिया रॉबर्टस, चार्ली चाप्लिन, महात्मा गांधी, फिडेल कॅस्ट्रो, आइन्स्टाईन, ज्युलियस सीझर, रोनाल्ड रिगन ही मंडळी डावखुरी होती. डावखुऱ्यांची ताकद क्रीडाक्षेत्रातही म्हणूनच पाहायला मिळते.

 

जॉन मॅकेन्रो, मार्टिना नवरातिलोव्हा, अ‍ॅलन बोर्डर, सौरव गांगुली या आणि अशा अनेक डावखुऱ्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. पाकिस्तानचा वासिम अक्रम, आताचा वहाब रियाझ, श्रीलंकेचा चामिंडा वास, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क, मिचेल जॉन्सन, न्यूझीलंडचा बोल्ट या गोलंदाजांनीही आपली छाप सोडली आहे. आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भलेही उजव्या हाताने फलंदाजी करतो पण सही करताना तो डाव्या हाताने करतो. भारताकडे झहीर खान नंतर कुणीही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही.

 

डावखुरी माणसं अधिक भावनाप्रधान, कलासक्त, सर्जनशील, संगीत, विविध कला, क्रीडा इत्यादी प्रांतांत रमणारी आढळतात. बौद्धिकदृष्ट्या डावखुऱ्या लोकांचं लॉजिक फार चांगलं असतं. त्यांचा गणित हा विषय चांगला असतो. बुद्धिबळासारख्या खेळात हे लोक प्रवीण असतात. या माणसांना हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण कमी असतं; कारण त्यांच्या डाव्या हाताची हालचाल जास्त असल्यामुळं हृदयाचं पंपिंगही चांगल्या प्रकारे होतं.

 

तीव्र बुद्धिमत्ता, उच्च बुद्‌ध्यांक, उच्च भावनांक, महत्त्वाकांक्षा, कल्पक थापेबाजी हे गुण त्यांच्यात आढळतात. एस्किमो लोका मध्ये असा समज आहे, की डावरा माणूस हा चेटूक करणारा असतो. लग्नानंतर बायको डावरी असल्याचं जपानी माणसाला समजलं तर तो तिला घटस्फोट देत असे.

 

लंडन मध्ये खास डावखुऱ्या लोकांसाठी एनिथिंग लेफ्ट हॅंडेडनावाचं दुकान आहे. तिथं काम करणारे कर्मचारी सुद्धा डावखुरेच असल्यामुळं त्यांचा ग्राहकांशी जवळीकयुक्त संवाद होतो. कात्री, दरवाजाचे हॅंडसेट्‌स, लिहिण्याचं साहित्य आदी डाव्या माणसांना वापरता येईल असं सामान तिथं मिळतं.

 

डावखुऱ्या लोकांना समाजात वावरताना अथवा दैनंदिन जीवनात खरोखर काही वेगळ्या समस्यांना समोरं जावं लागतं. डावखुरा माणूस डावीकडून उजवीकडं शाईच्या पेनानं जर लिहीत असेल, तर त्याच्या बोटांना शाई लागते आणि लिहिलेलं पुसलं जाण्याची शक्यशता असते. शेकहॅंड करायला यांचा चटकन डावा हात पुढं होतो, तर समोरच्याचा उजवा हात पुढे आलेला असतो.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

अभिनेता चंद्रकांत मांडरे जन्मदिन

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १९१३

स्मृती - १७ फेब्रुवारी २००१

 

चित्रकार नि अभिनेता चंद्रकांत मांडरे यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला. त्यांचं मूळ नाव गोपाळ मांडरे.

 

चित्रकला आणि अभिनय त्याच्या रक्तातच होता. वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसाया व्यतिरिक्त चंद्रकांत यांचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते.

 

बाबूराव पेंटर यांच्या 'गजगौरी' मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. १९३१ मध्ये सांगलीत 'बलवंत चित्रपट कंपनी' सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम चंद्रकांत यांना मिळालं. पगार होता दरमहा पंधरा रुपये. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे चंद्रकांत यांची नोकरी गेली. परंतु, इथं एक विलक्षण गोष्ट घडली होती. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या मा.दीनानाथांनी चंद्रकांत यांचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं. ते पुढं काही वर्षांनी खरं ठरलं.

 

बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे 'सावकारी पाश' या चित्रपटा मधील चंद्रकांत यांचा अभिनय. गोपाळाचं 'चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता.

 

'राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळ ऐवजी 'चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. 'सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. 'सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.

 

'थोरांताची कमळा' या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकले. व्ही.शांताराम यांनी 'शेजारी' चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्टिस कित्येक दिवस चंद्रकांतना करायला लावली. 'छत्रपती शिवाजी' चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांतना विविध शिवचरित्रं वाचायला दिली. पन्हाळ्यावरून कडेकपारी वरून घोडदौड करायला लावली.

 

व्ही.शांताराम यांच्या 'शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "'प्रभात' मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.

 

युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. 'खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला. 'रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला.

 

'स्वयंवर झाले सीतेचे' मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा 'ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच 'रामराज्य' या चित्रपटाला डोक्यारवर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म.गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट.

 

अमोल पालेकरांचा 'बनगरवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट. चंद्रकांत हे नुसते अभिनय करीत नसत. ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे. 'भरतभेट' चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे. चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता.

 

मांडरे यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटांतून कामे केली. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही. निसर्ग हाच श्वास मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते.

 

जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली. स्वतः चित्रीत केलेली ३५० ते ४०० चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी १९८४ मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केला. त्यावेळी या चित्रांची किंमत ३० लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच. या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे 'चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालया'ची उभारणी झाली. या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केर्ली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे. ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो.

 

चित्रकलेच्या वर्गांमध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्ग चित्रणे तसेच पावडरशेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवीत असत. चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्रं पाहिली की आदर्श निसर्ग चित्र कसं असावं याची जाणीव होते. त्यांच्या कुंचल्यानं काश्मीररपासून ते कन्याकुमारी पर्यंतचा निसर्ग कॅनव्हासवर रेखाटला.

 

कोल्हापुरातल्या मातीत ते रमले होते. याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहोराचे झाड आणि गुऱ्हाळाच्या चित्रावरून येतं. आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी 'राम-लक्ष्मण' नावानं ओळखली जायची.

 

चंद्रकांत मांडरे यांचे चित्रपट : युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी.

 

चंद्रकांत मांडरे यांचे निधन १७ फेब्रुवारी २००१ रोजी झाले.

 

चंद्रकांत मांडरे यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

दिग्दर्शक विश्राम बेडेकर जन्मदिन

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १९०६

स्मृती - ३० ऑक्टोबर १९९८

 

मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचा जन्म १३ ऑगस्ट १९०६ रोजी झाला.

 

नाटककार, कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही ज्यांचे नांव आदराने, सन्मानाने घेतले जाते. विश्राम बेडेकरांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी लेखनास प्रारंभ केला आणि नव्वदाव्या वर्षापर्यंत ते लिहीत राहिले असले तरी त्यांचे लेखन मोजकेच आहे. चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु करताना देखील अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी दिग्दर्शित केलेले सगळेच चित्रपट यशस्वी झाले आहेत.

 

चित्रपट तंत्राच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि आल्याआल्याच त्यांच्या हातून 'रणांगण' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीची निर्मिती झाली. रणांगण नंतर त्यांनी केलेली अनेक नाटय रुपांतरे रंगभूमीवर आली. मात्र 'वाजे पाऊल आपुले' आणि 'टिळक आणि आगरकर' या रंगभूमीवर गाजलेल्या त्यांच्या अजोड कलाकृती. चरितार्थासाठी नाटक आणि चित्रपट हे क्षेत्र निवडले अणि तेथेही ते पटकथा लेखक तर कधी दिग्दर्शक म्हणून यशस्वी ठरले. माझं बाळ, वासुदेव बळवंत, चूल आणि मूल या श्रेष्ठ पटकथा त्यांनी दिल्या. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ही त्यांची एक सर्वोत्तम कथा.

 

अर्थगर्भ आणि अजोड कलाकृती देऊन विश्राम बेडेकरांनी एक आदर्श उभा केला आहे. मराठी रंगभूमीवरील विख्यात नट चिंतामणराव कोल्हटकर व श्रेष्ठ गायक नट मास्टर दीनानाथ यांनी सुरू केलेल्या बलवंत पिक्चर्सह्या संस्थेच्या कृष्णार्जुन युद्ध ह्या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणून बेडेकर प्रथम चित्रपट व्यवसायात आले. तत्पूर्वी मास्टर दीनानाथांच्या बलवत संगीत नाटक मंडळीसाठी ब्रह्मकुमारी  हे नाटक त्यांनी लिहिले. ह्या नाटकातील मी लोपले मधुमीलनात याहे पद अत्यंत लोकप्रिय ठरले.

 

बलवंत पिक्चर्स ही संस्था बंद झाल्यानंतर, १९३५ साली बेडेकरांनी कृष्णार्जुन युध्दाचे आणखी एक सहदिग्दर्शक वा.ना. भट ह्यांच्या सहकार्याने भट-बेडेकर प्रॉडक्शन्सही चित्रसंस्था स्थापन केली.  राम गणेश गडकरी आणि चि.वि. जोशी ह्यांच्या अनुक्रमे ठकीचे लग्न'आणि सत्याचे प्रयोगह्या विनोदी कथांवर त्यांनी बोलपट तयार केले. मराठी चित्रसृष्टीतील हे पहिले विनोदी बोलपट होत. त्यानंतर लक्ष्मीचे खेळ हा आणखी एक विनोदी बोलपट त्यांनी निर्माण केला. प्रभातच्या शेजारी ह्या गाजलेल्या चित्रपटाची पटकथा व संवाद त्यांनीच लिहिले होते. तसेच रामशास्त्री बोलपटाचे निम्म्यापेक्षा अधिक भागाचे दिग्दर्शन व लेखनही त्यांनी केले. 

 

१९४२ साली न्यू हसं पिक्चर्सचा पहिला पाळणा हा तुफान विनोदी बोलपट त्यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटाच्या कथा संवादांचेही लेखन केले. राजकमलच्या अमर भूपाळीची (१९५१) कथाही त्यांचीच. फिल्म डिव्हिजनसाठी लोकमान्य टिळक व विनोबा भावे ह्यांच्यावरील अनुबोधपटही त्यांनी तयार केले. चित्रपटमाध्यमाची अत्यंत मार्मिक जाण त्यांनी लिहिलेल्या नेमक्या, नीटस संवादातून जाणवते.

 

१९५१ नंतर बेडेकर चित्रपटव्यवसायात फारसे वावरले नाहीत. १९५१ ते १९८१ ह्या तीन दशकांत त्यांनी फक्त दिग्दर्शन केले आणि तेही अवघ्या सहा चित्रपटांचे. त्यात वासुदेव बळवंत आणि रुस्तुम सोहराब यांचा समावेश होतो. याच काळात त्यांनी प्रसिद्ध क्रांतिकारक भगतसिंग ह्यांच्यावरील चित्रपटाचे व प्रभातसाठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावरील चित्रपटाचे बरेचसे काम केले पण ते प्रयत्न अपूर्ण राहिले. ह्या काळात ते पुन्हा नाट्यलेखनाकडे वळले. त्यांनी नरो वा कुंजरो वा (१९६१), वाजे पाऊले आपुले (१९६७), टिळक आणि आगरकर (१९८०) ही नाटके लिहिली. तथापि रणांगण (१९३९) ह्या कांदबरीमुळे बेडेकरांची वाङ्मयीन कीर्ती अनेक अर्थानी मराठीत अपूर्व ठरली.

 

१९३८ साली बेडेकरांना सिनेमॅटोग्राफीच्या अभ्यासार्थ इंग्लंडला जाण्यासाठी एक निमसरकारी शिष्यवृत्ती मिळाली. तिथे त्यांनी फावल्या वेळात हस्ताक्षरतज्ञ म्हणून डिप्लोमा मिळवला. भारतात परत येताना बोटीवर काही निर्वासित जर्मन-ज्यू मंडळींचे जीवन त्यांना फार जवळून बघायला मिळाले. त्या अनुभवातून रणांगण या कादंबरीचा जन्म झाला.

 

चक्रधर नावाचा एक मराठी तरुण आणि ज्यूद्वेष्ट्या नाझी हुकुमशाहीखाली जिचे जीवन अंतर्बाह्य उद्ध्वस्त झाले अशी एक जर्मन ज्यू तरुणी हॅर्टा ह्यांच्या असफल प्रेमाची ही कहाणी आहे. जेनोआहून निघालेल्या एका इटालियन बोटीवर त्या दोघांची भेट होते आणि दहा दिवसांच्या सागरी प्रवासात ती दोघे उत्कटपणे परस्परंच्या जवळ येतात. चक्रधर आधी एका प्रेमप्रकरणात फसलेला असतो, तर हॅर्टा आपला पराक्रम सोडून परागंदा होण्यापूर्वीच आपल्या जर्मन ख्रिश्चन प्रियकराला मुकलेली असते. चक्रधराला पाहून तिला अपल्या प्रियकराची आठवण येते आणि चक्रधरही तिच्या प्रेमाने भारावून जाऊन तिच्याशी विवाह करावयास तयार होतो. तथापि हॅर्टापाशी जर्मन पासपोर्ट असल्यामुळे तिला चक्रधरा बरोबर मुंबईस उतरता येत नाही. बोट चक्रधराला सोडून निघून जाते आणि विफल प्रेमाचा दुसरा आघात असह्य झालेली हॅर्टा हाँगकाँग पर्यंत गेल्यावर समुद्रात उडी मारून आत्महत्या करते. ह्या कांदबरीचा विषय, तीत असलेली विरोधवादाची पार्श्वभूमी, तिच्यातील सूक्ष्म, अभिजात कलात्मकता, तीतून व्यक्त झालेला संवेदनस्वभाव, तिची अनेक संदर्भ सूचकता हे सारेच मराठी कांदबरीत अपूर्व होते. मराठीतील मोजक्या, उत्कृष्ट कादंबऱ्यात बेडेकरांच्या रणांगणाची गणना केली जाते.

 

१९८६ साली विश्राम बेडेकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होते. मराठी लेखिका मालती बेडेकर (माहेरच्या बाळूताई खरे) या त्यांच्या पत्नी होत.

 

विश्राम बेडेकर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९९८ रोजी झाले.

 

विश्राम बेडेकर यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

जन्म – 13 ऑगस्ट १९८८ (स्कॉटलंड)

 

दूरचित्रवाणीचा जनक जॉन लोगी बेअर्ड जन्मदिन

************

 

जन्म - 1३ ऑगस्ट १९८८ (स्कॉटलंड)

स्मृती - १४ जून १९४६

 

आपले आयुष्य व्यापणाऱ्या दूरचित्रवाणीचा जनक जॉन लोगी बेअर्ड यांचा जन्म स्कॉटलंड येथे झाला. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी लार्चफिल्ड ॲकॅडेमी, ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेज व ग्लासगो विद्यापीठ येथे तांत्रिक शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धामुळे त्यांच्या पदवी मिळविण्यामध्ये व्यत्यय आला.

 

आज घरबसल्या आपण पाच हजार मैलांवर चाललेली वेस्ट इंडीजविरुद्धची भारताची क्रिकेट मॅच त्याचक्षणी पाहू शकतो. काही वर्षांपूर्वी अतिरेकी हल्ल्यात न्यूयॉर्क शहरातील जुळे टॉवर्स कोसळताना जगभरातील लोकांनी छोटय़ा पडद्यावर पाहिले. जगातल्या विशेष घटना बातम्यांच्या स्वरूपात आपण घरच्या दिवाणखान्यात बसून पाहतो. ही किमया होते कशी? ती केली कोणी? तो होता, जॉन लोगी बेअर्ड. टी.व्ही. ऊर्फ दूरचित्रवाणीचा जन्मदाता. या अवलिया शास्त्रज्ञाने प्रचंड कष्टाने व लोकांकडून अवहेलना सहन करूनही शोधून काढलेल्या टी.व्ही.च्या जादुई शोधासाठी त्याचे स्मरण करणे उचित ठरावे.

 

१३ ऑगस्ट १८८८ रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लोगी बेअर्ड स्काटलंड मधील ग्लॅसगो जवळच्या खेडय़ात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला. त्याची आई श्रीमंत घराण्यातली होती. धार्मिक प्रवृत्तीची असल्याने धर्मोपदेशकाची कर्तबगार गृहिणी म्हणून ती ओळखली जाई. सतत नवीन काहीतरी करण्याची तिची धडपड जॉन मध्ये उतरली नसती तरच नवल.

 

मूळच्या गुटगुटीत असलेल्या जॉनला वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच थंडीच्या आजाराने बेजार केले होते. पण शाप ठरण्याऐवजी हा आजार त्याला वरदानच ठरला. त्यामुळे सैन्यामध्ये भरती होण्यास नालायकअसा शिक्का त्याच्यावर बसला. जॉन ज्या शाळेत शिकला त्या कर्मठ शाळेत इंग्रजी आणि लॅटिन भाषांचे महत्त्व होते. पण विज्ञानाशी मात्र वाकडे होते. अशा घुसमटलेल्या वातावरणात काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारांशिवाय लांबवर चित्र पाठविण्याच्या शोधाला पायाभूत ठरले.

 

फोटोग्राफी सोसायटीचा अध्यक्ष झाल्यानंतर जॉनच्या व्यासंगाला वेगळीच कलाटणी मिळाली. बी.एस्सी. झाला तरी चाकोरी सोडून त्याने एका कारखान्यात मेकॅनिकची नोकरी धरली. उद्देश इतकाच, की आपल्या संशोधनाला लागणारी अवजारे हाताळायला मिळतील. पाठीवर सॅक टाकून त्याने दुकाना दुकानांतून त्यांची विक्री केली, ती केवळ त्या अवजारांची उपयुक्तता आजमावण्यासाठीच. यात धनसंचय होत नाही असे लक्षात आल्यावर त्याने एका मित्राच्या सल्ल्याने वेस्ट इंडीज बेटे गाठली आणि तेथे मुबलक पिकणाऱ्या फळांचा जॅम आणि लोणची बनवण्याचा उद्योग सुरू केला.

 

वैज्ञानिक वृत्तीचा जॉन असल्या उद्योगात थोडाच रमणार? तो इंग्लंडला परतला आणि त्याने वीज उत्पादक कंपनीत साहाय्यक इंजिनीअर म्हणून नोकरी धरली. तेथे त्याने समोरच्या टेकडीचे रमणीय दृश्य पाहिले आणि त्याच्या डोक्यात किडा वळवळला, हे दृश्य ऑफिसमध्ये का आणता येऊ नये? १९२३ साली त्यादृष्टीने प्रयोग सुरू झाले आणि काही अवधीतच एका क्रॉसचे चित्र त्याच्या केबिनमधून शेजारच्या खोलीत दाखविण्यात तो यशस्वी झाला.

 

कोणतेही चित्र ठिपक्या-ठिपक्यांचे बनलेले असते आणि ते विजेच्या वाहकावरून आपण पाठवू शकलो तर दुसऱ्या जागी साकारलेल्या त्या ठिपक्यांतून त्या चित्राचा आकृतिबंध तयार होईल, या कल्पनेवर त्याने जोरदार संशोधन सुरू केले. एका चकतीला शेकडो छिद्रे पाडून त्यामागे प्रखर प्रकाशझोत ठेवला आणि सेलेनियम सेलद्वारे ती प्रकाशित छिद्रे समोरच्या पडद्यावर एकत्रितपणे दाखविण्यात तो यशस्वी झाला. या ठिपक्यांतून अलगद एक चित्र दिसू लागले. अशा प्रकारे आपण मानवी आकृतीही प्रसारित करू शकू असा विश्वास  वाटला आणि रस्त्यावरून एक भटक्या माणसाला पकडून आणून त्याला आपल्या यंत्रासमोर बसवून  पडद्यावर दाखविण्यात जॉन यशस्वी झाला. पण भुताटकीच्या भीतीने घाबरून तो भटक्या एकदा पळूनसुद्धा गेला.

 

पडद्यावर माणसाची प्रतिमा दिसू लागली तरी त्याकरता मॉडेलला स्थिर बसावे लागे. हा दोष टाळण्यासाठी जॉनने शेकडो बॅटरीज् एकत्र केल्या आणि निर्माण झालेल्या दोन हजार व्होल्टस्च्या विजेच्या साहाय्याने हा दोष दूर करण्यात तो यशस्वी झाला. पण या प्रयत्नांत त्याला विजेचा शॉक बसून तो लांबवर फेकला गेला व जबर जायबंदी झाला. एकदा प्रयोगाच्या खोलीत मोठा स्फोटही झाला. जागेच्या मालकाने त्याला हे नस्ते धंदे बंद करून आपली जागा सोडून जाण्यास सांगितले. तथापि पुढे ३० वर्षांनी हेस्टिंगच्या पालिकेने त्या जागेवर टेलिव्हिजनचा जन्मदाता जॉन लोगी बेअर्डची प्रयोगशाळाअसा फलक लावला तेव्हा हाच मालक मोहोरला होता.

 

विजेच्या धक्क्य़ाने जॉन काहीसा अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला संशोधनात साहाय्य केले. जॉनने यंत्रांची जुळणी सांगायची आणि पत्नीने ती साकारायची, अशी जिद्दीची वाटचाल सुरू झाली. या साठी फिलिप्सया आंतरराष्ट्रीय कंपनीने त्याला आवश्यक त्या बॅटऱ्या विनामूल्य दिल्या.

 

जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्याने बेअर्ड टेलिव्हिजननावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनीही स्थापन केली. नभोवाणी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या बी.बी.सी.ने मात्र त्याला जवळजवळ झिडकारलेच. जॉन हा आपला व्यावसायिक स्पर्धक बनेल अशी त्यांना भीती वाटत असावी. नभोवाणी क्षेत्राचा जनक मार्कोनी याच्या वाटय़ालाही सुरुवातीला अशीच अवहेलना आली होती.

 

सतत पाठपुरावा करीत राहिल्यानंतर अखेर बेअर्ड हॅचिन्सन या दोघांनी निर्मिलेल्या कंपनीच्या प्रयत्नांना यश आले आणि दूरचित्रवाणीचे दर्शकांसाठीचे पहिले प्रक्षेपण ३० सप्टेंबर १९२९ रोजी दुपारी ११ वाजता करण्यात जॉन यशस्वी झाला. त्यावेळी तो आनंदाने नाचला असला तरी हे प्रक्षेपण किती लोकांनी पाहिले असेल? फक्त १९ जणांनी! कारण त्यापेक्षा जास्त रिसिव्हरच तयार झाले नव्हते.

 

टी.व्ही.चे प्रक्षेपण सुधारण्यासाठी जॉनने संशोधन चालूच ठेवले. अमेरिकन व्यापारी कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या जाहिराती चित्रांद्वारे घरोघरी पोहोचविण्यास टी.व्ही. प्रचंड उपयुक्त ठरेल, हा दूरदर्शी विचार करून जॉनला आवश्यक ते अर्थसाहाय्य दिले. जाहिरात कंपन्यांना एक प्रकारे ही सोन्याची खाणच सापडली.

 

दूरचित्रवाणी प्रसारणात भविष्यात अनेक सुधारणा झाल्या. जॉन इंग्लंडहून अमेरिकेपर्यंत ट्रान्स अ‍ॅटलांटिक चित्रे दाखविण्यात यशस्वी झाला. चतुर अमेरिकन व्यापाऱ्यांनी मग बेअर्ड-हॅचिसन कंपनीचे शेअर घेण्याचा धडाका लावला. तरीही त्या संपत्तीच्या बिछायतीवर लोळत न बसता जॉनच्या संशोधनाने जोरदार धडक मारली. वायूवेगाने धावणाऱ्या डर्बी या घोडय़ांच्या शर्यतीचे प्रसारण झाले आणि जॉन हा कोणी वेडा नसून मानवाला नव्या जगात नेणारा एक बुद्धिमान शास्त्रज्ञ आहे हे लोकांना पटले.

 

प्रचंड मेहनत, अवहेलना, शारीरिक अपंगत्व अशा खडतर वाटेवरून चाललेल्या जॉनचे फेब्रुवारी १९४६ मध्ये निधन झाले.

 

 

संकलन - मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

अभिनेत्री श्रीदेवी जन्मदिन

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १९६३

स्मृती - २४ फेब्रुवारी २०१८ (दुबई)

 

'हवा-हवाई गर्ल' बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला.

 

श्रीदेवी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

 

बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कंदन करुनई या तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली त्यांचा त्या मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.

 

१९७८ साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूड मधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटां मध्ये सुद्धा काम केले. त्याचबरोबर, श्रीदेवी यांना  हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकां साठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा मॉम हा श्रीदेवीचा चित्रपट शेवटचा ठरला.

 

श्रीदेवी यांचे चित्रपट : जुली, सोलावा सावन, सदमा, हिम्मतवाला, जाग उठा इन्सान, अक्लमंद, इंकलाब, तोहफा, सरफ़रोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, नया कदम, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नज़राना, कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर क़ानूनी, चालबाज, खुदा गवाह, लम्हे, हीर राँझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चाँद का टुकड़ा, गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश.

 

अभिनेत्री श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारी २०१८ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले.

 

श्रीदेवी यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे जन्मदिन

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १८९८

स्मृती - १३ जून १९६९

 

मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला.

 

१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स' साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या.

 

१९३८ साली 'हंस' साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स' मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हे देखील भागीदार झाल्यावर या कंपनीने नवयुग पिक्चर्सअसे नाव बदलून घेतले.

 

१९४० साली नवयुग पिक्चर्स तर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले.

 

अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

 

१९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ मध्ये 'रत्नाकर', १९२९ साली 'मनोरमा' आणि पुढे १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली त्यांनी 'नवयुग' साप्ताहिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी 'मराठा' हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयाती नंतरही काही काळ प्रकाशित होत होते.

 

समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. आचार्य अत्रे हे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.

 

आचार्य अत्रे यांचे १३ जून १९६९ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

साम्यवादी फिडेल कॅस्ट्रो जन्मदिन

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १९२६

स्मृती - २६ नोव्हेंबर २०१६

 

जगातील सर्वोच्च साम्यवादी नेत्यांच्या प्रभावळीत स्थान निर्माण करणारे फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म १३ ऑगस्ट १९२६ रोजी झाला.

 

कॅस्ट्रो यांच्या हयातीतच त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी आजही लोकांना आश्चर्यानं तोंडात बोटं घालायला लावतात. क्युबावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे फिडेल कॅस्ट्रो हे जगातील तीन मोठ्या नेत्यांपैकी होते. १९५९ मध्ये चे गव्हेरा यांच्या साथीने कॅस्ट्रो यांनी क्युबातील बॅतिस्ता यांची अमेरिका धार्जिणी राजवट उलथून टाकली. त्यानंतर ते क्युबाचे राष्ट्राध्यक्ष बनले. सत्ता हाती आल्यानंतर त्यांनी क्युबातील सर्व अमेरिकी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून अमेरिकेचा राग ओढवून घेतला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल आयसेन हॉवर यांनी संतापून त्या वेळी क्युबावर आर्थिक निर्बंध घातले आणि राजनैतिक संबंधही तोडून टाकले. २००८ साली स्वत:हून त्यांनी ही जबाबदारी त्यांचे बंधू राउल कॅस्ट्रो यांच्यावर सोपवली.

 

कॅस्ट्रो यांच्या नावावर सर्वात मोठ्या भाषण केल्याचा विश्वविक्रम आहे. गिनीज बुकात तशी नोंद आहे. २९ सप्टेंबर १९६० रोजी कॅस्ट्रो यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत ४ तास २९ मिनिटांचं भाषण केलं होतं. तर, १९८६ साली क्युबामध्ये ७ तास १० मिनिटांचं भाषण केलं होतं. कॅस्ट्रो यांची हत्या घडवून आणण्याचे ६३८ प्रयत्न झाले. अमेरिकी गुप्तचर संस्था व कॅस्ट्रोच्या विरोधकांचा यात हात होता. विषारी गोळ्या, विषारी सिगारेट, विषारी कपडे घालून त्यांना मारण्याचे कट रचले गेले. मात्र, या सगळ्यातून कॅस्ट्रो सुखरूप निसटले.

 

कॅस्ट्रो यांच्या नेतृत्वाखाली क्युबानं तब्बल ४५ वर्षे अमेरिकेनं लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा सामना केला. आयसेनहोवर ते बिल क्लिंटन पर्यंत ११ राष्ट्राध्यक्षांशी त्यांचा संघर्ष झाला. बुश यांच्या कारकिर्दीत त्यांना सर्वाधिक विरोध सहन करावा लागला. पण ते बधले नाही.

 

फिडेल कॅस्ट्रो यांनी १९८०च्या दशकात दूध उत्पादनाचा एक प्रकल्प राबवला होता. त्या अंतर्गत पाळण्यात आलेल्या गायी एका दिवसात ११० लीटर दूध द्यायच्या. हा जागतिक विक्रमच होता.

 

शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाला क्युबाच्या भूमीवर अमेरिकेविरोधी क्षेपणास्त्र तैनात करण्याची परवानगी देऊन कॅस्ट्रो यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या भूमिके मुळं जगाला अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं होतं.

 

फिडेल कॅस्ट्रो यांचे २६ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९३२२४०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

  १३ ऑगस्ट

फ्लॉरेन्स नाइटिंगेल स्मृतिदिन

************

 

जन्म - १२ मे १८२०

मृत्यू - १३ ऑगस्ट १९१०

 

रुग्णसेवा क्षेत्राची आणि परिचारिकेच्या आधुनिक वृत्तीची शास्त्रशुद्ध पायाभरणी करणारी जगातली पहिली स्री म्हणजे फ्लॉरेन्स नाइटिंगेल. त्यांचा जन्म १२ मे १८२० रोजी झाला. त्या फक्त एक थोर रुग्णसेविका नव्हे तर गणितज्ञ, संख्याशास्त्रज्ञ आणि लेखिकाही होत्या.

 

१८ व्या शतकाला अज्ञात अशी परिसर स्वच्छता, सेवाभावी वृत्ती, आजारांची नोंदणी, त्यांचं सांख्यिकी विश्लेषण, रुग्णसेवेबाबतची यंत्रणा हे सर्व विकसित अन्‌ नियमबद्ध करणारी कर्तुत्ववान व्यवस्थापक. हे करताना त्या काळाच्या पुरुषी सत्तेशी कधी संघर्ष करीत, कधी नमतं घेत, तर कधी आपल्या अविरत कष्टांनी त्यांना अचंबित करीत, रुग्णांचं प्रेम मिळवीत वाटचाल करणारी धीरोदात्त समाजसेविका.

 

तिच्या रुग्णसेवाव्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा दिवस ! त्यांच्या कार्यास विनम्र अभिवाद !

 

 

संकलन : मिलिंद पंडित , कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

************

१३ ऑगस्ट

क्रांतिकारक भिकाजी रुस्तुम कामा स्मृतिदिन

************

 

जन्म - २४ सप्टेंबर १८६१

स्मृती - १३ ऑगस्ट १९३६

 

मादाम भिकाजी रुस्तम कामा या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या. त्या फ्रेंच नागरिक होत्या.

 

मादाम कामा यांचा जन्म २४ सप्टेंबर १८६१ रोजी मुंबईतल्या एका पारशी कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव भिकाई सोराब पटेल असे होते. भिकाईजींचे वडील प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाल्याने, इंग्रजीवर त्यांचे चांगले प्रभुत्व होते. रूस्तम के.आर. कामा यांच्याशी त्यांनी विवाह केला. रुस्तम कामा हे सामाजिक कार्यकर्ते व वकील होते.

 

दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले. त्या युवकांना ब्रिटिश सरकारच्या बातम्या वेळोवेळी देत असत. मादाम कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले. त्या विशेषेकरून देशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करीत. 

 

सावरकरांचे '१८५७ चा स्वांतत्र्य लढा' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम कामांनी त्यांना मदत केली. त्या स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणार्‍या क्रांतिकारकांना आर्थिक मदतीसह अन्य प्रकारची मदत करत. २२ ऑगस्ट १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन या परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली.

 

जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर टाकण्यात आली होती. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.

 

त्यात हिरवापिवळा  लाल रंगांचे पट्टे होते. लाल रंग हा शक्तीचे प्रतिनिधित्व करतो पिवळा विजयाचे, तर हिरवा रंग धीटपणा व उत्साहीपणाचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. झेंड्यावरील ८ कमळाची फुले तत्कालीन भारताच्या ८ राज्यांची प्रतीके होती. 'वन्दे मातरम्' हे देवनागरी अक्षरांमध्ये झेंडयाच्या मध्यात लिहिलेले होते. झेंड्यावर काढलेले सूर्य आणि चंद्र हे हिंदू-मुस्लिम विश्वास दर्शवणारे चिन्ह होते.

 

मादाम कामांनी श्टुटगार्ट येथे झेंडा फडकवल्यानंतर दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली आणि मादाम कामा यांना फ्रान्समध्ये स्थानबद्ध करण्यात आले. साधारण १९३५ सालापर्यंत त्या तिथेच होत्या. त्यानंतर त्यांना भारतात परतण्याची परवानगी मिळाली आणि वयाच्या ७४ व्या वर्षी त्या परत मायदेशी आल्या. 

 

१३ ऑगस्ट १९३६ या दिवशी एका पारशी धर्मादाय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

 

मुंबईतील ओव्हल मैदानाजवळच्या एका हमरस्त्याला मादाम कामायांचे नाव दिले आहे.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

१३ ऑगस्ट

राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतिदिन

************

 

जन्म - ३१ मे १७२५ (चौंडी, नगर जिल्हा)

मृत्यू - १३ ऑगस्ट १७९५ (इंदूर)

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी झाला.

 

मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्यादेवींचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्यादेवींना पुण्यश्लोकअसेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे.

 

राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान व्यवस्थांत केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा कि कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. यच्चयावत जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही.

 

होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो, "सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले त्याला जगात तोड सापडनार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी अवतार मानते. याचे कारण म्हनजे अहिल्यादेवींची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!"

 

प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे कि एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.

 

मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली. त्यांच्या उत्तम संस्काराकडे बघून त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.

 

अहिल्यादेवींची राजकीय कारकीर्द तेंव्हापासुनच सुरु झाली. खंडेरावाची जागा अहिल्यादेवींनी घेतली. मल्हारराव देशभर मोहिमांत व्यस्त असत. सासरा-सुनेतील पत्रव्यवहार हा अहिल्यादेवींच्या राजकीय विचारीकतेचा उत्कृष्ठ नमुना होय. अहिल्यादेवींना मल्हारराव तोफा-दारुगोळ्याची मागणी ते ज्या मार्गाने ते मोहिम चालवणार आहेत त्याच्या रक्षणाच्या सुचना अहिल्यादेवींना जसे देतांना दिसतात तसेच अहिल्यादेवी आपल्या सासऱ्याला सल्ले देतांनाही दिसतात. सासरा सुनेचे ऐकेल हा तो काळ नव्हता, आताही फारसा नाही. परंतू मल्हाररावांसारखा मुत्सद्दी अहिल्यादेवींचे सल्ले अंमलात आणत होता यावरुनच अहिल्यादेवींची योग्यता लक्षात येते.

 

१७६६ साली मल्हाररावांचा वृद्धापकाळाने मृत्यु झाला. दरम्यानच्या काळात अहिल्यादेवींनी स्त्रीयांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालय सुरू केले होते. घोडेस्वारी ते शस्त्रास्त्र प्रशिक्षण या विद्यालयात दिले जात असे. तत्कालीन स्थितीत ही एक जागतीक क्रांतिकारी घटना होती. घराबाहेर पडायला जेथे बंदी तेथे महिला शस्त्रचालक बनणार ही कल्पनाही त्या काळात कोणी करु शकत नव्हते. स्वत: अहिल्यादेवी उत्कृष्ठ योद्धा होत्या. महिला अबला नाहीत हे त्यांनी स्वकर्तुत्वातून सिद्ध केले असले तरी सर्व महिला शक्तीवर त्यांचा विश्वास होता. त्यांची स्वत:ची ५०० महिला सैन्याची पलटन उभी होती. अहिल्यादेवींचे प्रशासन हे ब्रिटिशांनाही आदर्शभुत ठरले.

 

सर्व देशात जेंव्हा दांडगाईचे राज्य होते, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता त्या काळात अत्यंत सुरळीत चालणारे एकमेव राज्य म्हणजे माळवा होते. सर जदुनाथ सरकार म्हणतात, "सर्व मुळ कागदपत्रे व पत्रव्यवहार पाहिल्यानंतर माझी अशी खात्री बनली आहे कि अहिल्यादेवींखेरीज महादजी शिंदे उत्तरेत कसलेही स्थान निर्माण करु शकले नसते, एवढ्या

************

१३ ऑगस्ट

दिग्दर्शक गजानन जागीरदार स्मृतिदिन

************

 

जन्म - २ एप्रिल १९०७ (अमरावती)

स्मृती - १३ ऑगस्ट १९८८ (मुंबई)

 

गजानन जागीरदार यांचा जन्म २ एप्रिल १९०७ रोजी अमरावती येथे झाला. त्यांचे वडील जनार्दन जागीरदार हे शिक्षक असल्यामुळे गजानन जागीरदार यांनाही शिक्षणाची आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती, कानपुर, बनारस येथील शाळांमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन महावादियालयात प्रवेश घेतला. शिकत असतानाच गजानन जागीरदार लेखन, नाटकात काम करीत असत.

 

बी.ए. पदवी मिळाल्यानंतर १९३० मध्ये त्यांनी कोल्हापूर येथे शिक्षकी पेशा स्वीकारला. नोकरी करत असतानाच त्यांनी मूकचित्रपटांना शीर्षके लिहिण्याचे काम प्रभात कंपनीमध्ये करू लागले. हे काम त्यांना बाबुराव पेंढारकर यांनी दिले, आणि अशा तऱ्हेने गजानन जागीरदार यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्याचवेळी भालजी पेंढारकर बाबूराव पेंढारकर यांच्या कंपनीमध्ये 'राणी रूपमती' दिग्दर्शित करत होते. त्यावेळी गजानन जागीरदार यांना पेंढारकरांचे सहाय्यक दिग्दर्शक केले.

 

त्यानंतर पुढे इंग्रजीतून पत्रव्यवहार करणे, वृत्तपत्रांना पाठवण्यासाठी वार्तापत्र आणि शांतारामबापूंना दिग्दर्शनात मदत करणे यासाठी प्रभात फिल्म कंपनी मध्ये गजानन जागीरदार याना चाळीस रुपये पगारावर नोकरीस ठेवण्यात आले. त्यांनी तेथे 'अग्निकंकण' या मराठी चित्रपटात आणि 'जलती निशानी' या हिंदी चित्रपटात भूमिका केल्या.

 

१९३४-३५ मध्ये कोल्हापूर येथे शाम मुव्हीटोन नावाची चित्रपटसंस्था झाली. तेथे 'पार्थकुमार' या नावाचा हिंदी आणि मराठी चित्रपट भालजी पेंढारकर यांच्या दिगदर्शनाखाली होत होते, काही कारणाने भालजी पेंढारकर यांनी तो चित्रपट सोडला. त्यामुळे श्याम सिनेटोनच्या निर्मात्यांनी हे चित्रपट गजानन जागीरदार यांना दिग्दर्शिन करण्यास सांगितले. अशा तऱ्हेने गजानन जागीरदार दिग्दर्शन करू लागले.

 

त्यानंतर त्यांनी १९३४ साली 'सिहासन' आणि १९३६ साली 'होनहार' हे दोन चित्रपट केले आणि त्यात कामही केले. ह्या दोन चित्रपटांमुळे गजानन जागीरदार यांचे नाव खूप झाले. मिनर्व्हा मुव्हिटोनच्या सोहराब मोदी यांनी त्यांना त्यांच्याकडे बोलावूं घेतले. त्या कंपनीत ते तीन वर्ष होते. तेथे त्यांनी 'मै हारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन तर केलेच आणि अभिनयही केला. 

 

१९४० साली प्रभात कंपनीने त्यांना परत बोलवले आणि त्यांना 'शेजारी' मराठी मध्ये घेतले, तर तोच चित्रपट हिंदी मध्ये 'पडोसी' ह्यात भूमिका दिल्या. या दोन्ही चित्रपटात गजानन जागीरदार यांनी 'मिर्झा' या मुस्लिम शेजाऱ्याची भूमिका केली आणि ती इतके जबरदस्त झाली की त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. ह्या भूमिकेसाठी त्यांना 'बेंगॉल फिल्म्स जर्नलिस्ट असोशिएशन' तर्फे १९४१ मध्ये पारितोषिक दिले गेले.

 

त्यानंतर त्यांनी 'अत्रे पिक्चर्स' सती पायाची दासी आणि वसंतसेना हे दोन चित्रपट केले आणि ते परत प्रभात फिल्म कंपनीमध्ये आले. 'प्रभात' फिल्म्स कंपनीम ध्ये त्यांनी 'रामशास्त्री' हा चित्रपट केला आणि त्यात 'रामशास्त्री' यांची प्रमुख भूमिका केली आणि तो चित्रपट खूप गाजला. ह्या चित्रपटासाठी पुन्हा ''बेंगॉल फिल्म्स जर्नलिस्ट असोशिएशन' तर्फे पुन्हा सर्वोत्तम दिग्दर्शक म्ह्णून गौरवले.

 

गजानन जागीरदार यांनी बेहराम खां आणि उमाजी नाईक ह्याप्रमाणे अनेक हिंदी मराठी चित्रपट केले आणि त्यात कामेही केली. १९६० मध्ये पुण्यात फिल्म्स इन्स्टिटयूट स्थापन झाली तेव्हा त्या संस्थेत पाहिले प्राचार्य म्ह्णून त्यांची नेमणूक झाली. काही वर्षे त्यांनी प्राचार्यपद सांभाळले आणि परत चित्रपटक्षेत्रात आले.

 

१९३८ मध्ये त्यांनी 'वैजयंता' हा मराठी चित्रपट केला होता. त्यात त्यांनी दिग्दर्शन, निर्मिती आणि भूमिका ह्या तिन्ही भूमिका सांभाळल्या. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले होते. त्यानंतर त्याना 'शाहीर परशुराम' या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळाले होते.

 

त्यांचा ''छोटा जवान' हा चित्रपट खूप गाजला, त्यावेळी तो चित्रपटगृहात दाखवला गेलाच परंतु शाळा शाळांतून दाखवला जात असे. त्या चित्रपटासाठी त्यांना 'मी विशेष अभिनेता' म्ह्णून त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा बहुमान मिळाला.

 

त्यांनी काजल, सुरज, आ गले लग जा, आम्रपाली, उमराव जान, कर्मयोगी, देस परदेस आणि १९७५ साली त्यांचे दोन चित्रपट आले, दफा ३०२ आणि मुठ्ठी भर चावल अशा सुमारे ५३ चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.

 

१९८१ मध्ये भारतीय बोलपटांच्या सुवर्णजयंती महोत्सवात त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

 

त्यांनी संध्याकाळ, पाऊलखुणा ही दोन आत्मचरित्रे लिहिली. त्याचप्रमाणे अभिनय कसा करावा आणि द मॅजिक सर्कल अशी ऐकून चार पुस्तके लिहिली. त्यांनी नऊ चित्रपट दिग्दर्शित केले.

 

१३ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांचे मुबंईत निधन झाले.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : लोकमत/सतीश चाफेकर

 

************

************

१३ ऑगस्ट

पॉप गायिका नाझिया हसन स्मृतिदिन

************

 

जन्म - ३ एप्रिल १९६५ (पाकिस्तान)

स्मृती - १३ ऑगस्ट २००० (लंडन)

 

पॉप गायिका नाझिया हसन यांचा जन्म ३ एप्रिल १९६५ रोजी झाला.

 

नाझिया हसन यांनी वयाच्या १५व्या वर्षीचं आप जैसा कोईहे गाणं, १६ व्या वर्षीचा डिस्को दिवाने’, १८ व्या वर्षीचं बुम बुम’, २० व्या वर्षीचं यंग तरंग’, २२ व्या वर्षीचं हॉटलाइनआणि शेवटी कॅमेरा कॅमेराआणि टूनाइट’. पाच अल्बम मधून त्यांनी क्रांती निर्माण केली. संपूर्ण दक्षिण आशिया तिच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या डिस्को दिवान्यांत ब्राझीलसारखे लॅटिन देशही सामील झाले.

 

त्यांनी निर्माण केलेल्या पॉप वातावरणानंतर भारत आणि पाकिस्तान कायमचे बदलून गेले. नाझिया हसन यांनी स्वरांचं नवं दालन उघडून दिलं. १९८०च्या सुमारास, ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी मे आए, तो बात बन जाएहे गाणं सतत वाजू लागलं होतं. ते गाणं होतं फिरोज खानच्या कुर्बानीचित्रपटातील होते आणि गाणारी नाझिया हसन ही पाकिस्तानी मुलगी. संगीत बिड्डू याचं आहे. हेही समजलं की ते गाणं वेगळं वाटण्याचं कारण होते त्याला बिड्डूचं संगीत आणि लंडनमध्ये झालेलं गाण्याचं रेकॉर्डिंग. ते २४ ट्रॅकवर रेकॉर्ड केलेलं पहिलं भारतीय गाणं होतं. नाझिया यांचा आवाज दोनदा रेकॉर्ड करून त्यात एको म्हणजे प्रतिध्वनीचा परिणाम साधला होता. याच वर्षी डिस्को दिवानेनावाचा एक म्युझिक अल्बम आला. त्यातील सगळी गाणी नाझिया हसन यांची होती. आणि एक दिवस व्हिडीओ अल्बमवर नाझिया हसन कोण हेही दिसलं. उजव्या हातात मायक्रोफोन आणि डाव्या हातात त्याची वायर धरलेली, खांद्यावर ओघळेलेले तिचे लांब केस, तिचं गाणं जसं जगावर पसरलं तसे.

 

नाझिया हसन यांच्या डिस्को दिवानेया पहिल्या अल्बमच्या जगभर सहा कोटी प्रती खपल्या. या अल्बमच्या माध्यमातून ती चिरंतन झाली पण तिचा शेवट खूप क्लेशकारक झाला. हे एवढंच नव्हतं. तिच्या असण्याचे काही ऐतिहासिक आणि अर्थातच सांस्कृतिक पैलू होते. तिने केवळ संगीत क्षेत्रात वादळ निर्माण केलं नव्हतं, तर एक सांस्कृतिक क्रांती घडवून आणली होती. नाझिया हसन आणि त्यांचा भाऊ झोहेब हसन यांनी एकत्रितपणे अनेक गाणी गायली.

 

नाझिया हसन जगभरात इतकी लोकप्रिय होत होत्या की, असे म्हणतात तिला तिच्या देशात गाणं म्हणताना टीव्हीवर बघता येऊ नये, अशी व्यवस्था करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिचा व्हिडीओ, कमरेपासून वरचाच भाग शूट करून तयार करण्यात आला. कारण इतकंच की, तिचे नाचणारे पाय दिसू नयेत.

 

वायटल साइन्स’, ‘स्ट्रिंग्स’, ‘जुनूनहे नंतर भारतात लोकिप्रय बनलेले बँड सुरू झाले होते. त्यांच्यासाठी नाझियाच्या संगीताने त्यांच्या संगीताला रुजण्यासाठीची जमीन तयार केलेली होती.

 

नाझिया यांना कर्करोग झाला होता त्यावर त्वरित उपचार सुरू झाले. त्या त्यातून बरी झाल्या आणि नाझिया यांचे लग्न झालं. दोन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मात्र लाखो हृदयांत आपलं स्थान निर्माण करणाऱ्या या पॉप क्वीनचा फुप्फुसाचा कर्करोग पुन्हा उफाळून आल्याचं उघडकीस आलं.

 

नाझिया हसन यांनी अनेकदा आपल्या मुलाखतींतून सांगितलं होतं की, गाणं हे तिच्यासाठी कायम छंद होता आणि आहे. त्यांनी स्वत:साठी वेगळं करिअर उभं केलं होतं.

 

नाझिया हसन यांनी लंडनच्या विद्यापीठातून बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली होती. संयुक्त राष्ट्रांच्या महिला विभागातील आंतरराष्ट्रीय नेतृत्व कार्यक्रमात सहभागी होती. त्या वेळी तरुणांची पिढी नष्ट करणाऱ्या अमली पदार्थाच्या विरोधात काम करण्यासाठी तिने संस्था काढली होती. कराचीतील ल्यारी या सर्वाधिक गरीब वस्तीत तिने त्यासाठी मोबाइल क्लिनिक सेवा सुरू केली होती.

 

नाझिया हसन यांचे निधन १३ ऑगस्ट २००० रोजी झाले.

 

नाझिया हसन यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९३२२४०१७३३

संदर्भ : इंटरनेट/इब्राहिम अफगाण

 

************

************

१३ ऑगस्ट

अभिनेत्री अनिता राज चा वाढदिवस

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १९६२ (मुंबई)

 

बॉलीवूड अभिनेत्री अनिता राजचा आज वाढदिवस.

 

अनिता राजचे वडील जगदीश राज खुराना सिनेसृष्टीत एक नावाजलेले अभिनेते होते. तिचे वडील जगदीश राज म्हणजे आपल्या हिंदी चित्रसृष्टीतील नावाजलेले पोलीस इन्स्पेक्टर. त्यांनी सर्व चित्रपटांतून त्याच भूमिका केल्या.

 

अनिता राजने १९८१ साली आलेल्या 'प्रेमगीत' या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. तो चित्रपट जबरदस्त गाजला, त्या नंतर तिच्या मागे चित्रपटांची  रांग लागली. तिची अनिल कपूर बरोबर छान जोडी  जमली पण खरी गाजली तिची आणि धर्मेंद्रची जोडी.

 

धर्मेंद्र बरोबर तिने २१ चित्रपट केले आणि सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात यश मिळालं. त्या  वेळी धर्मेंद्र तिच्या दुप्पट वयाचे होते तरीही चित्रपटात आणि चित्रपटाबाहेरही ही जोडी जबरदस्त गाजली.

 

लैला, जान की बाजी, मेरा हक, प्यार किया है प्यार करेंगे, हवालात, क्लर्क, नफरत की आंधी, विद्रोही, अधर्म; यासह अनेक चित्रपटा मध्ये काम केले. १९९४ मध्ये तिचा पुत्र शिवम ह्याचा जन्म झाला व तिने चित्रपटात काम करणं थांबवलं, चित्रपटातून बाहेर पडल्या नंतरही तिने आपला मोहरा छोट्या पडद्याकडे वळवला. तुम्हारी पाखी, एक था राजा एक थी रानी, इना मीना डिका अशा काही हिंदी मालिकांतून तिने काम केलं. अनिता राज सध्या 'छोटी सरदारनी' या मालिकेत काम करत आहे.

 

सुनील हिंगोरानी यांच्याशी तिने १९८६ मध्ये  लग्न  केले. शिवम हिंगोरानी हा अनिता आणि सुनील हिंगोरानी यांचा मुलगा आहे. अग्निपथआणि ये जवानी है दिवानीसारख्या चित्रपटा.साठी त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

अभिनेत्री योगिता बाली यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १९५२ (मुंबई)

 

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री योगिता बाली यांचा आज वाढदिवस.

 

बॉलिवूडची एकेकाळची देखणी अभिनेत्री म्हणजे योगिता बाली. १९७१ साली परवानाया चित्रपटातून योगिता बालींनी बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नवीन निश्चल मुख्य भूमिकेत होते. चित्रपटात अमिताभ यांनी नकारात्मक भूमिका केली होती. त्यांनी सहकलाकार म्हणून जास्त भूमिका केल्या.

 

पुढच्या काळात विनोद खन्ना, देव आनंद, संजीव कुमार, राजेश खन्ना, रणधीर कपूर, सुनील दत्त अशा त्याकाळच्या बड्या हिरो सोबत योगिता बालींनी काम केले. योगिता यांनी अनेक चित्रपटात काम केले पण त्यांना म्हणावे तसे यश मिळवता आला नाही. चित्रपटा पेक्षा त्या आपल्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिल्या.

 

२४ व्या वर्षी योगिता बाली यांनी १९७६ मध्ये किशोर कुमार यांच्या सोबत लग्न केले. किशोर कुमार यांच्या सोबत लग्न होऊ नये अशी योगिता यांच्या आईची इच्छा होती. पण आईच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही. दोनच वर्षांत किशोर कुमार यांच्याशी घटस्फोट घेऊन योगिता बाली यांनी मिथुन चक्रवर्ती यांचे सोबत लग्न केले असून त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे.

 

योगिता बाली यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले, पण मागील ३० वर्षापासून योगिता चित्रपटसृष्टी पासून दूर आहेत. त्यांचा शेवटचा चित्रपट 'आखिरी बदला' १९८९ मध्ये रिलीज झाला होता.

 

योगिता बाली यांचे चित्रपट- जमीन आसमान, नफरत, एक मुठ्ठी आसमान, चौकीदार, अपराध, अजनबी, जिंदगी और तूफान, नागिन, महबूबा, धूप छांव, चाचा भतीजा, कर्मयोगी, सलाम मैमसाहब, जानी दुश्मन, आखिरी कसम, उन्नीस बीस, ओह बेवफा, जमाने को दिखाना है, कराटे, वक्त की पुकार, राज तिलक, लैला, ये इश्क नहीं आसान, मेरा कर्म मेरा धर्म, आखिरी बदला.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१३ ऑगस्ट

अभिनेत्री वैजयंती माला यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १३ ऑगस्ट १९३६ (चेन्नई)

 

वैजयंती माला यांनी वयाच्या १३ व्या वर्षी तामिळ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. १९५१ मध्ये आलेल्या 'बहार' या सिनेमाद्वारे त्या हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९५४ मध्ये रिलीज झालेला नागिन हा सिनेमा त्यांच्या करिअरमधील पहिला सुपरहिट सिनेमा ठरला.

 

'देवदास' हा सिनेमा वैजयंती माला यांच्या करिअरमधील महत्त्वपूर्ण सिनेमा ठरला. विमल राय दिग्दर्शित या सिनेमात वैजयंती माला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९५८ मध्ये पडद्यावर झळकलेल्या 'साधना' या सिनेमातील भूमिकेसाठी वैजयंती माला यांना त्यांच्या करिअरमधील पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

 

देवदास, नया दौर, मधुमती, गंगा जमुना, लीडर, आम्रपाली, गंवार, लीडर, सुरज, संगम, पैगाम यांसारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी त्यांना ओळखले जाते. त्या गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगणा आहेत.

 

एकामागून एक हिट सिनेमे देणाऱ्या वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये आपल्या काळातील जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसह काम केले आहे. दिलीप कुमार, राजकपूर, देवानंद, राजेंद्र कुमार, सुनील दत्त या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रिन त्यांची जोडी चांगली जमली होती.

 

संगमचे चित्रीकरण चालू असतांना एकदा वैजयंतीमालाचा वाढदिवस आला. राजने एक मोठा केक आणून त्यावर एकच मोठी मेणबत्ती लावली. सर्वांच्या प्रश्नार्थक नजरांना राजने हा वैजयंतीमालाचा RK मधील पहिलाच वाढदिवस आहे; तिचे येथे आणखी भरपूर वाढदिवस होवोत, मग मेणबत्यांची संख्या वाढत जाईल, असे सांगितले.

 

१९६८ मध्ये वैजयंती माला यांनी डॉ. चमनलाल बाली यांच्यासह लग्न केले. लग्नानंतर त्यांनी सिनेमात काम करणे बंद केले. १९६९ मध्ये रिलीज झालेला 'प्रिन्स' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता.

 

वैजयंती माला यांनी आपल्या करिअरमध्ये हिंदीसह तेलगू, तामिळ आणि बांग्ला या भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला.

 

सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. सिनेमांना रामराम ठोकल्यानंतर त्या सामाजिक कार्य आणि राजकारणात रमल्या. त्या लोकसभेच्या सदस्य सुद्धा राहिल्या आहेत.

 

वैजयंती माला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : दिव्य मराठी

🌎🌍 दिनविशेष 🌍🌎

 

🎇🎇 १३ ऑगस्ट घटना 🎇🎇 #DinVishesh

 

🗓 १६४२: क्रिस्टियन हायगेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.

 

🗓 १८९८: कार्ल गुस्ताव्ह विट याने 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.

 

🗓 १९१८: बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.

 

🗓 १९५४: रेडिओ पाकिस्तान वरुन कौमी तराना हे पाकिस्तानचे राष्ट्रगीत प्रथमच प्रक्षेपित करण्यात आले.

 

🗓 १९६१: आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पूर्व जर्मनीने आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनची भिंत बांधण्यास सुरूवात झाली.

 

🗓 १९९१: कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

 

🗓 २००४: ग्रीसमधील अथेन्स येथे २८ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. सुमारे ३०० दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन अंदाजे ४ अब्ज लोकांनी हा उद्‍घाटन सोहळा पाहिला.

 

🎇🎇 १३ ऑगस्टजन्म 🎇🎇

 

🗓 १८८८: स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक जॉन लोगे बेअर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून १९४६)

 

🗓 १८९०: त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे  १९१८)

 

🗓 १८९८: लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १९६९)

 

🗓 १८९९: चित्रपट दिग्दर्शक सर अल्फ्रेड हिचकॉक यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)

 

🗓 १९०६: लेखक व दिग्दर्शक विनायक चिंतामण तथा विश्राम बेडेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९८)

 

🗓 १९२६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१६)

 

🗓 १९३६: चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला बाली ऊर्फ वैजयंतीमाला यांचा जन्म.

 

🗓 १९४५: भारतीय-इंग्लिश क्रिकेटर रॉबिन जॅकमन यांचा जन्म.

 

🗓 १९८३: भारताचा ९ वा ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म.

 

🎇🎇 १३ ऑगस्ट मृत्यू 🎇🎇

 

🗓 १७९५: देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा त्यांनी जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे निधन. (जन्म: ३१ मे १७२५)

 

🗓 १८२६: स्टेथोस्कोप चे शोधक रेने लायेनेस्क यांचे निधन. (जन्म: १७ फेब्रुवारी १७८१)

 

🗓 १९१०: आधुनिक शुश्रूषा शास्त्राचा (नर्सिंग) पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म. (जन्म: १२ मे १८२०)

 

🗓 १९१७: आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८६०)

 

🗓 १९३६: मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर  १८६१).

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment