आज ९ सप्टेंबर स्मृतिदिन. DIN VISHASH

 

आज ९ सप्टेंबर

आज आकाशवाणीची सिग्नेचर बनवणारे  ट्यून #वॉल्टर‌_कॉफमन यांचा स्मृतिदिन.

जन्म.१ एप्रिल १९०१

आकाशवाणी, दूरदर्शनचे प्रक्षेपण सुरू होताना किंवा त्यांचे विविध कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जी विशिष्ट संगीत धून वाजविली जाते त्याला ‘सिग्नेचर टय़ून असे म्हटले जाते. आकाशवाणीची ही सिग्नेचर ट्यून वॉल्टर कॉफमन यांनी तयार केली होती. १९३०च्या सुमारास कॉफमॅन हे मुंबई आकाशवाणी केंद्राच्या पाश्चिमात्य संगीत विभागात संगीतकार म्हणून काम करत होते. त्या वेळी त्यांनी ही सिग्नेचर ट्यून तयार केली असल्याची माहिती आहे. तंबोरा आणि व्हायोलिन या वाद्यांचा वापर यात करण्यात आलेला आहे. वॉल्टर कॉफमन यांचे निधन ९ सप्टेंबर १९८४ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा हे गाणे लिहिणारे #श्यामलाल_गुप्ता यांचा जन्मदिन.

जन्म.९ सप्टेंबर १८९६ कानपुर जवळील नरवल गावी.

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा... हे जेव्हा जेव्हा हे शब्द कानात पडतात तेव्हा देशभक्तीचा उत्साह डोलू लागतो. देशभक्ती जागृत करून देणारी ही अमर रचना श्यामलाल गुप्ता यांनी रचली होती. त्यावेळी हे गाणे स्वातंत्र्यप्रेमींसाठी प्रेरणास्त्रोत होते. श्यामलाल गुप्ता हे स्वातंत्र सैनिक होते. स्वराज्य स्थापनेसाठी १९२९ मध्ये त्यांनी अनवाणी राहण्याची प्रतिज्ञा घेतली. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान ते आठ वेळा तुरुंगात गेले. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा हे गाणे प्रथम पं. जवाहरलाल नेहरू यांनी एप्रिल १९२४ मध्ये फुलबाग, कानपूर येथे जालियनवाला बाग दिनी गायले होते. १९३४ च्या हरिपूर काँग्रेस अधिवेशनात, गांधी आणि नेहरू सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ते देशाचे ध्वज गीत म्हणून स्वीकारले. १९८३ मध्ये श्यामलाल गुप्ता यांना भारत सरकारने मरणोत्तर पदमश्री देऊन गौरव केला होता. १९९७  मध्ये  त्यांच्या नावाने डाक तिकीट जारी करण्यात आले होते. श्यामलाल गुप्ता यांचे १० ऑगस्ट १९७७ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज आजची आघाडीची गायिका ‘मितवा फेम #जान्हवीप्रभूअरोरा यांचा वाढदिवस.

जन्म.९ सप्टेंबर १९७८ मुलुंड मुंबई येथे.

जान्हवी प्रभू अरोरा संगीत क्षेत्रात १५ हून अधिक वर्षे काम करत आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या नावांसह काम केले आहे. जान्हवीने तिच्या मधुर आवाजाने अनेकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले आहे.जान्हवी यांचे शालेय शिक्षण तारापूर विद्या मंदिर या विद्यालयातून तर पुढील शिक्षण चेतना महाविद्यालय, वांद्रे येथे झाले. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड असल्याने वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी एका संगीत स्पर्धेत भाग घेतला होता. जान्हवी यांच्यातील गायनाचं टॅलेण्ट पाहून वडिलांनी त्यांना या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी कष्ट घेतले.जान्हवी यांनी कुमुदिनी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या ६ व्या वर्षी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली.‘मेरी आवाज सुनो, 'सारेगमप-हिंदी', 'सारेगमप-मराठी' आदी रिअॅलिटी शोमध्ये जान्हवी यांनी भाग घेतला. या शोमध्ये जान्हवी यांनी उपांत्य फेरी गाठली होती. शोमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवी यांनी स्वतःचा अल्बम 'AN JAANVEE' रिलीज केला होता. सागरिकाने हा अल्बम प्रसिद्ध झाला. सागरिका बाम यांनी तिचे काही अल्बम प्रकाशित केले. त्यानंतर गेले दशकभर जान्हवी यांनी अनेक मराठी चित्रपट, स्टेज शोजसाठी गायन केले आहे. जान्हवी यांनी 'उंच माझा झोका', 'राधा ही बावरी', 'माझा पती सौभाग्यवती', 'दुहेरी' या मराठी मालिकेची शीर्षकगीते गायली आहेत. याशिवाय जान्हवी यांनी 'संस्कार धरोहर अपना की' या हिंदी टीव्ही मालिकेचा टायटल ट्रॅकही गायला आहे. जान्हवी प्रभू अरोरा यांनी संगीत उद्योगातील मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आहे. शंकर एहसान लॉय, अवधूत गुप्ते, अशोक पत्की, सुरेश वाडकर, नीलेश मोहरीर, अमितराज, नरेंद्र भिडे, सोनू निगम, शान, महेंद्र कपूर, बाली ब्रह्मभट्ट, स्वप्नील बांदोडकर यांच्यासोबत काम केले आहे.

जान्हवी यांनी २००८ मध्ये सुभाष घई आणि श्रेयस तळपदे निर्मित 'सनई चौघडे' यांनी चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्यांनी महेश मांजरेकरांसाठी 'लालबाग परळ', अवधूत गुप्तेसाठी 'मोरया', स्वप्ना वाघमारे जोशीसाठी 'मितवा', 'फुगे', 'सविता दामोदर परांजपे' आणि 'माधुरी', संजय जाधवसाठी 'येरे येरे पैसा' या चित्रपटासाठी गायन केले. विक्रम फडणीस यांच्या साठी 'हृदयांतर', सचिन पिळगावकर यांच्या 'अशी ही आशिकी' या चित्रपटासाठी गायन केले आहे. जान्हवी यांनी या चित्रपटात सोनू निगमसोबत दोन गाणी गायली आहेत. त्याचप्रमाणे जान्हवी यांनी  स्वप्नील जोशीच्या 'मितवा' चित्रपटातील शंकर महादेवनसोबत 'तू ही रे माझा मितवा' हे हिट गाणे गायले आहे. तसेच जान्हवी यांनी 'क्षणभर विश्रांती','तुला कळणार नाही','हृदयांतर','फुगे','जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' आदी चित्रपटांसाठी तिनं पार्श्वगायन केलं आहे.जान्हवी यांनी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, लंडन, दक्षिण अमेरिका, हॉलंड, सिंगापूर, दोहा आणि इस्रायल सारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये मैफिली सादर केल्या आहेत. जान्हवी यांना अनेक मोठ्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले आहे. 'मितवा' या चित्रपटातील 'सावर रे मन' या गाण्यासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याबरोबरच त्यांना या गाण्यासाठी संस्कृती कलादर्पण आणि रेडिओ मिर्ची पुरस्कारही मिळाला आहे. जान्हवी यांनी बॉलीवुड स्थित रायटर असलेले समीर अरोरा यांच्या सोबत लग्न केले आहे.

 #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ मंदार जोशी

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज पंडित #मनोहरवासुदेवचिमोटे यांचा स्मृतिदिन.

जन्म. २७ मार्च १९२९ नागपूर येथे.

हार्मोनियम या फ्रान्स मध्ये जन्मलेल्या वाद्याला भारतात पेटी किंवा बाजा असे नाव मिळाले. मात्र, या वाद्याला ‘संवादिनी असे अन्वर्थक नाव देऊन तिच्यात तसे संवादी सूर भरणारे ज्येष्ठ संगीतकार पंडित मनोहर चिमोटे यांचे रसिकांना कधी विस्मरण होणार नाही. पंडित मनोहर चिमोटे यांनी भारतामध्ये एकल पेटीवादनाची सुरुवात त्यांनी केली.

मनोहर चिमोटे यांचा जन्म एका खाणमालकाच्या घरात झाला. घरात सुखसोयींची आणि ऐषारामाची इतकी रेलचेल होती की चिमोटे यांचे बालपण राजेशाही वातावरणात गेले. त्यांची हवेली राजवाडावजा होती, आणि इकडेतिकडे हिंडण्यासाठी घरची बग्गी होती. असे असले तरी वडील थोड्याफार धार्मिक मनोवृत्तीचे असल्याने घरात भजने आणि कीर्तने होत. भजन-कीर्तनाला भाविक तर येतच पण संगीतकारही येत. मनोहर चिमोटे यांनी श्रीमंती वातावरणात खुशालचेंडूसारखे जगण्यापेक्षा संगीताचे ज्ञान मिळवण्याकडे लक्ष दिले. चिमोटे रात्रंदिवस हार्नोनियमवर रियाज करण्यात घालवू लागले.

नागपूरला आलेल्या पंडित भीष्मदेव वेदींच्या पेटीवादनाने चिमोटे यांना गुरु भेटल्याचे जाणवले. पुढील ४-५ महिने मनोहर चिमोटे यांनी वेदीकडून पेटीचे अनेक बारकावे शिकून घेतले. हे ज्ञान त्याना हार्मोनियमचे एकल वादन करण्यासाठी उपयोगी पडले.

१९५०मध्ये भीष्मदेव पंडित मुंबईत सुरसिंगार उत्सवाची व्यवस्था पाहण्यासाठी गेले असे समजल्यावर मनोहर चिमोटे मुंबईला गेले. तेथे वेदींनी त्यांना कुंवरश्याम घराण्याचे शास्त्रीय संगीत गायक लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडे पाठवले. तेथे राहून मनोहर चिमोटे यांना संगीताचे आणि गायकाला हार्मोनियमची संगत कशी करावी यांचे सखोल ज्ञान झाले. त्यानंतर चिमोट्यांना गायकांना पेटीची साथ करण्याची निमंत्रणे येऊ लागली.पुढे पंडित मनोहर चिमोटे मुंबईच्या चित्रनगरीत रमले. त्यांनी गायक, संगीतकार, वादकांशी संवादसाधला. हार्मोनियमची नवी रचना सतारीच्या अंगाने केली. त्याचे ट्युनिंग बदलले. नवे ट्युनिंग इतर वाद्यां प्रमाणेच ‘गंधार स्वराच्या आधारावरकेले. चिमोटे यांनी सिद्ध केलेली संवादिनी गायकांनातर साथ देऊ लागलीच. पण तिचे एकलवादन ही खिळवून ठेवू लागले. चिमोटे यांनी सतार किंवा इतरही वाद्यांशी केलेली संवादिनीची जुगलबंदी गाजली. आता तर अशी जुगलबंदी भारतीय संगीतात रुजलीच आहे. मुंबईत पंडितजींना संगीतकार नौशाद यांच्यापासून उस्ताद आमिर खाँ यांच्या पर्यंत अनेकांचा सहवास मिळाला. त्यांच्या सहवासात पंडितजींनी अनेक प्रयोग केले. व्हायोलीन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. १९७० मध्ये त्यांनी तयार केलेल्या वाद्याला आधी सूर-मनोहर असे नाव मिळाले. पण यात आपला उल्लेख कशाला, या प्रश्नाने चिमोटे अस्वस्थ होत. अखेर, एका रेल्वे प्रवासात त्यांना ‘संवादिनी हे सार्थ नाव सुचले. ते आता सर्वमान्य झाले आहे. चिमोटे तेव्हा जवळपास खेडेगाव असलेल्या विरार मध्ये स्थायिक झाले. प्रसिद्धी किंवा पैसा यांच्या मागे न लागता एकाग्र साधना करत त्यांनी काही काळ अज्ञातवास ही पत्करला. या काळात त्यांनी वृंदावनी मल्हार, मधुगंधार, पद्मकल्याण, लक्ष्मीकल्याण आदी रागांना जन्म दिला. जितके मानसन्मान किंवा श्रेय मिळायला हवे होते; तितके त्यांना मिळाले नाही.

चिमोटे हे उत्तम गायकही होते. त्यांनी अनेक रागांत ख्याल, ठुमरी आणि भजने गाण्यासाठी चिजा बांधल्या. त्यांच्याजवळ ख्यातनाम गायकांच्या चिजांचा फार मोठा संग्रह होता.

पंडित चिमोटे हे मुंबईतील गोरेगावमध्ये 'संवादिनी संगीतालय' नावाची संस्था चालवीत असत. तेथे ते कंठसंगीत आणि पेटीवादन दोन्ही शिकवत. पंडित मनोहर वासुदेव चिमोटे ९ सप्टेंबर २०१२ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज शास्त्रीय व भजन गायक #पुरुषोत्तमदास_जलोटा यांचा जन्मदिन.

जन्म. ९ सप्टेंबर १९२५

पुरुषोत्तम दास जलोटा  हे शास्त्रीय आणि भजन गायक होते. पंजाबच्या फगवारा येथे जन्मलेल्या त्यांनी शाम चौरासिया घराण्याच्या मास्टर रतन यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. वयाच्या चोविसाव्या वर्षी ते लखनौला गेले आणि व्यावसायिकरित्या गाण्यास सुरुवात केली.

त्यांनी हळू हळू भजने गायला सुरुवात केली आणि राघडी संगीतावर आधारित स्वत: अनेक भजने रचली. २००४ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ते भजन सम्राट अनूप जलोटा यांचे वडील होते. पुरुषोत्तम दास जलोटा यांचे १८ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज जेष्ठ अभिनेते #रंजीत_चौधरी यांचा जन्मदिन.

जन्म. ९ सप्टेंबर १९५५

रंजीत चौधरी हे जेष्ठ चरित्र अभिनेत्री पर्ल पदमसी यांचे चिरंजीव होत. पर्ल यांच्या पहिल्या लग्नानंतर रणजीत यांचा जन्म झाला. पर्ल यांनी नंतर एडमॅन ‘एलेक पदमसी यांच्यासोबत लग्न केले होते. रॅल पदमसी या रंजीत चौधरी यांची सावत्र बहिण होत. बासु चॅटर्जी यांच्या 'खट्टा मीठा' सिनेमात त्यांनी डेब्यू केला होता. रंजीत चौधरी यांनी खट्टा मिठ्ठा, बातो बातो में, खुबसुरत, चक्र, कालिया, कांटे, बॅन्डीक्ट क्वीन, फायर, मिसीपीसी मसाला, कामसूत्र अ टेल ऑफ लव्ह  इत्यादी हिंदी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. रंजीत चौधरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेऊन ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि तेथेही त्यांनी काही विदेशी चित्रपट तसेच टीव्ही शोमध्ये भूमिका साकारली होती. त्यात लास्ट हाॅलीडे, लोन्ली इन अमेरिका, kettle of fish, Hope and a little sugar,breakaway इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी स्टीव कैरेल व जैना फिशर यांच्या सोबत काम केले होते. दीपा मेहता दिग्दर्शित 'साम अॅण्ड मी ' या चित्रपटाची पटकथा त्याने लिहिली होती. द ऑफिस हा त्यांचा टीव्ही शो लोकप्रिय झाला. छोट्या व्यक्तिरेखा साकारताना ‘खट्टा मिठ्ठा, 'बातो बातो में ' हे त्यांचे चित्रपट गाजले होते. रंजीत चौधरी यांचे १५ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री #लीला_चिटणीस यांचा जन्मदिन.

जन्म. ९ सप्टेंबर १९०९

लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्चशिक्षित, प्रार्थना समाजाचे पुरस्कर्ते होते. त्यांचा प्रेम विवाह डॉ. चिटणीस ह्यांच्यांशी झाला होता. स्त्रियांनी चित्रपटात काम करणे हीन समजल्या जाणाऱ्या १९३०-१९४० च्या दशकांत उच्च विद्याविभूषित असलेल्या लीला चिटणीसांनी समाजाचा रोष पत्करून अभिनयाचा मार्ग निवडला होता. लीला चिटणीस यांची रुपेरी पडद्यावरची कारकीर्द जशी प्रदीर्घ , तशीच ती धाडसीही म्हणावी लागेल. नाटकांत किंवा चित्रपटांत कामे करणे म्हणजे अतिशय लाजिरवाणे व निषिद्ध मानले जायचे, त्या काळात लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक भूमिका केल्या. काहीशा बुजऱ्या व बावळट अशोककुमारचा आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. आपण नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी ' शहीद' मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. त्यांच्या डोळ्यांतील कारुण्य, चेहऱ्यावरील भावुकता, कृश शरीरयष्टीतील सहज दिसणारी लवचीकता व संवादफेकीतील स्पष्टता यामुळे लीला चिटणीस कोणत्याही शॉटमध्ये भाव खाऊन जात. त्या कधीच सुलोचना, कामिनी कौशल किंवा अचला सचदेवप्रमाणे रडक्या आई झाल्या नाहीत, किंवा ललिता पवारसारख्या खाष्ट आईही झाल्या नाहीत. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील. त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नाचायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून वेडावून जायचे. ' झूला ' मधल्या ' हिंडोले कैसे झूलू.' व ' झूलो के संग.' या दोन गाण्यांवर त्या अगदी धमाल नाचल्या होत्या. त्यांच्या नृत्यावर अनेक जण अगदी जीव ओवाळून टाकायला तयार असायचे. लीला चिटणीस यांनी त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. लीला चिटणीस यांचे १४ जुलै २००३ रोजी निधन झाले. लीला चिटणीस यांना आदरांजली.

सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=HlNocwYFZgc

आज ९ सप्टेंबर 

आज प्रतिभावान संगीतकार व गायक #श्रीधर_फडके यांचा वाढदिवस.

जन्म. ९ सप्टेंबर १९५० 

मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके.

गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी गाण्याशी त्यांचा संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून फिजिक्स व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेतच. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व 'देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी....' या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर तो अभंग गायला. 'तो आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण' असं श्रीधर फडके म्हणतात.

लक्ष्मीची पाऊले  या चित्रपटातील “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं. सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधी तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे. ‘मन मनास उमगत नाही ’ ही ग्रेस यांची कविता. त्यांनी पहिल्या चार ओळींना चाल लावली. पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढ दामटलं नाही तर त्यांच्या आवडत्या कवीपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि 'तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा' असं सुचवलं. सुधीर मोघे सिध्दहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या.

स्वप्नातील पदर धुक्याचा

हातास कसा लागावा

आधार कसा शोधावा

मन मनास उमगत नाही.

श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला.  कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडके यांना फार भावल्या त्या अशा...

कुठे जातात भेटून

कशा होतात ओळखी

आणि आपली माणसे

कशी होतात पारखी

या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार मोघें यांनी पुढील ओळी रचल्या....

कुण्या देशाचे पाखरू

माझ्या अंगणात आले

त्याचे पंख परदेशी

परी ओळखीचे डोळे

मातोश्री ललिता फडके यांच्या समवेत...श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी),ऋतू हिरवा(चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे(मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी(पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस).

एखादं गाणं आवडलं की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात.‘ मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद ’ या एकनाथांच्या अभंगाला चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, दिवसभरात काही सुचलं नाही. पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये , सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत राहिले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “ अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफण आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोटया तुकड्या तुकड्यांत गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”  श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन के

आज ९ सप्टेंबर

आज शायर #जिगर_मुरादाबादी यांचा स्मृतिदिन.

जन्म. ६ एप्रिल १८९० मुरादाबाद येथे

जिगर मुरादाबादी यांना उर्दू शायरी चे या विसाव्या शतकातील महान शायर म्हणून मानले जाते. जिगर मुरादाबादी यांचे खरे नाव अली सिकन्दर. लखनौला जिगर मुरादाबादी कसेबसे मॅट्रिक उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण पूर्णही करू न शकणारे जिगर मुरादाबादी यांना अलिगढ विद्यापीठाने पुढे डी.लिट. पदवी दिली. जी पूर्वी फक्त सर इक्बाल आणि सरोजिनी नायडू यांनाच मिळाली होती. मुशायर्याणत मद्यपान करून येणारे, आल्यावर गझल म्हणणार्याण कवीला ढकलून स्वत: गझल गाणारे जिगर चांगले कवी म्हणून लोकांनी सहन केले होते. मद्यपान सोडल्यावर ते अधिक प्रिय झाले. १९५८ मध्ये भारत सरकारनेही त्यांच्या ‘आतिशे-गुल या काव्यसंग्रहाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार देऊन राजमान्यताही दिली होती. आपल्या चित्रपटसृष्टीला मजरुह सुलतानपुरी आणि शकील बदायूँनी हे हिरे देण्याचे काम  जिगर मुरादाबादी यांनी केले. अशा अनेक कवींना त्यांनी पुढे आणले. जिगर मुरादाबादी यांच्या गाजलेल्या पुस्तकामध्ये में दाग़-ए-जिगर, शोला-ए-तुर आतिश-ए-गुल, दीवान-ए-जिगर रहीं समावेश आहे. जिगर मुरादाबादी  यांचे निधन ९ सप्टेंबर १९६० रोजी झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट / समीर गायकवाड

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=x1kv3Ex4oic

https://www.youtube.com/watch?v=XW6UzmUgtQE

https://www.youtube.com/watch?v=RUHrH_XnGHg

 

जिगर मुरादाबादी यांची शायरी.

यूही दराज़ खोला एक पुरानी मॅगज़ीन हाथ लग गयी,जिस में

जिगर मुरादाबादी जी पर मिलन जी का बड़ा ही दिलकश लेख था |

.वह लिखती है के जिगर जी की शायरी जैसे शहद में घुले हुए अल्फ़ाज़ ,

जिस में ओस के बूँदों  की मुलायमता है,अपनी महबूबा से मिलने का वादा,

उनके देखे ख्वाब,आकांक्षा,कल्पना,उनकी प्रतीक्षा,हसीना का शबाब,

उनकी मुस्कुराहट,उनसे वियोग के लम्हे,मिलन की बेला,उनका हुस्न,जवानी,

मदहोशी ,ज़िंदगी ,ये सब कुछ बयान करती मखमली शायरी है |

आज ९ सप्टेंबर

आज गायक, अभिनेता व संगीतकार गुलाम मुस्तफा दुराणी उर्फ #जीएमदुराणी यांचा स्मृतिदिन.

जन्म. १९१९

जी.एम. दुराणी हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध गायक, अभिनेता व संगीतकार होते. सुधीर फडके यांचा पहिला चित्रपट हा हिंदीच होता आणि त्याचे नाव होते गोकुल. ज्याची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली होती. या चित्रपटातील जी. एम. दुराणी यांनी गायलेले ‘कहां हमारे श्याम चले’ हे अतिशय सुंदर गीत होते. मोहम्मद रफी, यांनी आपली गायन शैली जी.एम.दुराणी यांच्या कडून प्रेरणा घेऊन केली असे बोलले जाते. जी.एम. दुराणी यांचे ९ सप्टेबर १९८८ रोजी निधन झाले. जी.एम. दुराणी यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=5LKSVmzbFdY https://www.youtube.com/watch?v=OTDNeEoWkJ4

रेडीओ सिलोनने जी.एम.…

आज ९ सप्टेंबर

आज खतरों के खिलाडी #अक्षय_कुमार चा वाढदिवस.

जन्म. ९ सप्टेंबर १९६७

अक्षय कुमार ह्याचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षयमध्ये एक कलाकार दिसू लागला होता. मुंबईत आपलं नशीब आजमावण्यासाठी येण्याआधी अक्षय दिल्लीतील चाँदनी चौक भागात राहत होता. मुंबईत आल्यानंतर कोळीवाडा भागात राहत असे. त्यानं डॉन बॉस्को विद्यालयात शिक्षण घेतलं आणि त्यानंतर कालसा कॉलेजमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केलं. अक्षयचा बॉलीवूडमध्ये इथपर्यंत झालेला हा प्रवास त्याच्या निरंतर संघर्षाचे आणि मेहनतीचे फळ आहे. अन्यथा कोणतेही ग्लॅमरस आडनाव न लाभलेला अक्षय बॉलीवूडमध्ये यशस्वी ठरलाच नसता.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला एक्शनपट करणारा अक्षय आता एक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे. खिलाडी सिरीज, यह दिल्लगी, मोहरा, मै खिलाडी तू अनाडी, दिल तो पागल है, हेरा फेरी, खाकी, मुझसे शादी करोगी, नमस्ते लंडन, हे बेबी, भुल भुलय्या, सिंग इज किंग असे यशस्वी चित्रपट त्याच्या नावावर आहेत. लहान असताना अक्षय अतिशय मस्तिखोर मुलगा म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात प्राविण्य होते. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. तर, थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले.तेथे त्याने आचारी आणि वेटरचे कामदेखील केले. अक्षय कुमार हा कराटेचा ब्लॅकबेल्ट चँपियन आहे आणि विशेष म्हणजे एक जगप्रसिद्ध आचारी आहे. जो जिता वही सिकंदर चित्रपटातील दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी अक्षय कुमारने ऑडिशन दिल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. परंतु या भूमिकेसाठी त्याला नाकारण्यात आले होते. अक्षय डब्ल्यूडब्ल्यूईचा फार मोठा चाहता आहे. २०१० साली डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार केनला अक्षयने आपल्या घरी आमंत्रित केले होते. त्वायकांडोमध्ये त्याने ब्लॅकबेल्ट मिळवला आहे.‘स्पेशल २६ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करेल याबाबतची अनुपम खेरबरोबरची पैज हरल्यावर अक्षयला टेबलावर नृत्य करावे लागले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील अक्षयच्या योगदानासाठी २००८ साली ‘युनिर्व्हसिटी ऑफ विण्डसरने त्याला कायद्यातील मानद पदवी देऊन सन्मानित केले. ९ हा आकडा आपल्यासाठी भाग्यवान असल्याचा अक्षय कुमारचा विश्वास आहे. आयुष्यातील अनेक चांगल्या गोष्टीचा संबंध ९ संख्येशी असल्याचे त्याचे मानणे आहे. त्याच्या मुलांचा जन्म नवव्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यातील आहे. नियमित व्यायाम करणारा अक्षय दररोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जातो. भारताबाहेर चित्रिकरण करत असताना तो नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. केवळ अभिनय क्षेत्रातच अक्षय कुमार प्रसिद्ध नाही. मॉडेलिंग, मार्शल आर्ट्स यांसारख्या क्षेत्रातही अक्षयचं नाव आदराने घेतलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवण्यात अक्षय कुमार यशस्वी झाला आहे. नुकताच स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण झालेला ‘बेलबॉटम हा चित्रपट प्रदर्शित झाला. अक्षयच्या नावावर एक असा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे, जो फारच कमी कलाकार बनवू शकतात. हा विक्रम बॅक टू बॅक हिट चित्रपट देण्याचा आहे. अक्षयने तीन वर्षांच्या कालावधीत सलग १२ हिट चित्रपट केले आहेत.हिट चित्रपट देण्याची मालिका २०१६ च्या ‘एयरलिफ्ट या चित्रपटाने सुरु झाली होती, ज्याने बॉक्स ऑफिसवर १२९ कोटींचे कलेक्शन करून सुपरहिट रेटिंग मिळवले. त्याच वर्षी आलेल्या ‘हाऊसफुल ३ ने जवळपास १०८ कोटी कलेक्शन केले आणि यशस्वी झाला. १२७ कोटींपेक्षा जास्त कलेक्शन करणारा ‘रुस्तम सुपरहिट ठरला. २०१७ मध्ये ‘जॉली एलएलबी २ (११७ कोटी) आणि ‘टॉयलेट एक प्रेम कथा (१३३.६० कोटी) हिट ठरले. २०१८ मध्ये पॅडमॅन (७९ कोटी), गोल्ड (१०८ कोटी) आणि २.० (१८८ कोटी) हिट घोषित करण्यात आले.अक्षयसाठी २०१९ हे वर्ष खूप उत्तम आणि संधी देणारे होते. त्याचे ४ चित्रपट आले आणि चारही हिट ठरले. त्यापैकी काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर द्विशतक केले. त्यात ‘केसरी (१५३ कोटी), ‘मिशन मंगल (११४ कोटी), ‘हाऊसफुल ४ (२०६ कोटी) आणि ‘गुड न्यूज (२०१ कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे. अक्षय कुमारच्या आईचे, अरुणा भाटिया कालच (८ सप्टेंबर)  रोजी निधन झाले. अक्षयकुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

https://www.youtube.com/watch?v=evEzKb9uo80

https://www.youtube.com/watch?v=zFIz7nq6LaA

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज लावणी सम्राज्ञी #सत्यभामाबाई_पंढरपूरकर यांचा स्मृतिदिन.

जन्म.?  सांगली जिल्ह्यात.

लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले. लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा

आज ९ सप्टेंबर

आजच्या दिवशी १९३९ साली #माणूस हा चित्रपट प्रदर्शित झाला.

आज चित्रपटसृष्टीमध्ये सुवर्णयुग घडविणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीचा ‘माणूस हा मराठी चित्रपट ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहे. सोज्वळतेतून वेश्येच्या जीवनाची व्यथा मांडणाऱ्या ‘माणूसने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. तर हिंदीमध्ये ‘आदमी नावाने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे देशभर स्वागत झाले.

द पोलीस कॉन्स्टेबल ही कथा वाचनात आल्यानंतर व्ही. शांताराम यांना या चित्रपटाची संकल्पना सुचली. नायक पोलीस शिपाई, तर नायिका वेश्या. भाबडा, सरळमार्गी पोलीस आणि चाणाक्ष, संसाराची स्वप्ने पाहणारी नायिका. पोलीस तिला सन्मार्गावर आणू इच्छितो अशी कथा घेऊन चित्रपटनिर्मिती हा धाडसी विचार १९३८ मध्ये प्रत्यक्षात आला. ९ सप्टेंबर १९३९ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमामध्ये माणूस प्रदर्शित झाला या घटनेला आज ८० वर्षे पूर्ण होत आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन होते व्ही. शांताराम यांचे, कथा होती ए. भास्करराव यांची,  संवाद व गीते अनंत काणेकर यांची संगीत  कृष्णराव यांचे.

ध्वनीलेखन होते शंकरराव दामले यांचे, छायालेखन होते व्ही. अवधूत यांचे, कला दिग्दर्शन होते साहेबमामा फत्तेलाल.

यातील कलाकार होते, शाहू मोडक, शांता हुबळीकर, राम मराठे, मंजू,  छोटू, बुवासाहेब, गौरी, बाई सुंद्राबाई, मानाजीराव.

या चित्रपटातील ‘आता कशाला उद्याची बात या गीताने बहार उडवून दिली. या गीतातील बंगाली कडवे उत्तम व्हावे यासाठी त्यांनी संगीतकार अनिल विश्वास यांना बोलावून घेतले होते.

संकलन. #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज अभिनेत्री #ऋतुजा_बागवे चा वाढदिवस.

जन्म.९ सप्टेंबर १९८८ मुंबई येथे.

सध्या मराठी मनोरंजनविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री ऋतुजाचे शालेय शिक्षण मुंबई येथेच पुर्ण झाले. तिला शाळेत असताना अभिनयात रुची निर्माण झाली होती. म्हणून तिने मोठी झाल्यानंतर अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला. एम डी कॉलेजमध्ये आल्यानंतर ऋतुजाने एकांकिकांमध्ये भाग घेतला. एकांकिकांमूळे ऋतुजाला अनेक ऑफर आल्या. तिचा अभिनय अतिशय उत्तम होता. ऋतुजाला तिच्या उत्तम अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ऋतुजाने ऑडीशन द्यायला सुरुवात केली. 'नांदा सौख्य भरे' या मालिकेतून ऋतुजा अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या गोजिरवाण्या घरात आणि ‘स्वामिनी या दोन मालिकांमध्ये ऋतुजा दिसली होती. त्यानंतर आलेल्या ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट,‘तू माझा सांगाती', ‘मंगळसूत्र या मालिकांमध्ये देखील तिने सहायक कलाकाराची भूमिका निभावली होती. ‘नांदा सौख्य भरे या मालिकेत स्वानंदीला लीड कॅरेक्टर यामध्ये प्ले करण्याची संधी तिला मिळाली होती. आणि तिने या संधीचे सोनेच केले.

'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेच्या माध्यमातून ऋतुजाला विशेष लोकप्रियता मिळाली.'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेत तिने अभिनेता सुबोध भावेसह स्क्रीन शेअर केली होती.‘अनन्या या नाटकात एका सामान्य मुलीची असामान्य व्यक्तिरेखा साकारुन ऋतुजाने सर्वांचीच मनं जिंकली. तिला 'अनन्या' नाटकातील या भूमिकेसाठी तिला पुरस्कार मिळाला आहे. या नाटकाने अनेक नवे विक्रम रचले आहेत.

मन माझे या अल्बममध्ये देखील तिला खुप पसंत केले गेले. तिचा हा अल्बम खुप हिट झाला होता. २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद भाई कोतवाल या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर आलेल्या ‘रिस्पेक्ट या सिनेमामध्ये देखील ती दिसली होती. तू माझा सांगाती, मंगळ सूत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, पुढचे पाऊल, स्वामींनी, अस्मिता, अशा मालिकेतही तिने अभिनय केला आहेत.

ऋतुजा बागवे सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नुकताच तिने एक बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या आहेत.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ९ सप्टेंबर

आज जेष्ठ दिग्दर्शक म्हणून #मेहबूब_खान यांचा जन्मदिन.

जन्म. ९ सप्टेंबर १९०७ साली गुजरातमधील बिलिमोरा येथे.

आर्थिक विषमता आणि त्यातून निर्माण झालेले सर्वसामान्यांचे अस्तित्वाचे प्रश्न हिंदी चित्रपटांमधून प्रभावीपणे मांडणारे पहिले दिग्गज दिग्दर्शक म्हणून मेहबूब खान यांचं नाव आजही घेतलं जातं. तसंच भारतातील पूर्ण लांबीचा, पहिला रंगीत चित्रपट ‘आन निर्माण करण्याचं श्रेयही त्यांना दिलं जातं. मेहबूब खान यांचे पूर्ण नाव मेहबूब खान रमझान खान. अफगाणिस्तानातून आलेल्या पठाण पूर्वजांच्या घराण्यात त्यांचा झाला. वडिलांची आर्थिक परिस्थिती यथातथाच. जुजबी शिक्षण झाले आणि त्या काळात त्यांना चित्रपटांचे आकर्षण होते. त्यांच्या गावचे म्हणजे बिलिमोराचे नूर मोहम्मद अली मोहम्मद शिप्रा यांचा मुंबईत एक मोठा घोडय़ांचा तबेला होता. या तबेल्यातले घोडे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी भाडय़ाने देण्याचा व्यवसाय हा नूर मोहम्मद करीत असे. मेहबूब खानचा आणि नूर मोहम्मदचा चांगला परिचय होता. या गरीब घरच्या मुलाला काही कामधंद्याला लावावे म्हणून तो तरुण मेहबूब खानला मुंबईला घेऊन गेला आणि आपल्या तबेल्यात घोडय़ांना नाल लावण्याच्या कामासाठी त्याला नोकरीस ठेवले. मेहबूब खान अनेक वेळा सिनेमा शूटिंगच्या ठिकाणी घोडे घेऊन जाई आणि स्टुडिओच्या लोकांशी गप्पा मारताना शूटिंगसंबंधात काही सूचना बोलून दाखवत असे. चंद्रशेखर या दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शकाला या तरुण मुलाच्या कल्पनाशक्तीबद्दल, हरहुन्नरी स्वभावाबद्दल मोठे अप्रूप होते. चंद्रशेखरने नूर मोहम्मद, ज्याच्याकडे मेहबूब नोकरीला होता त्यांना सुचवलं की, हा मुलगा गुणी आहे. याला माझ्याकडे शूटिंगसाठी नोकरीस पाठवलं तर हा मोठी प्रगती करेल. नूर मोहम्मदने मान्यता दिल्यावर मेहबूब खान चंद्रशेखरांकडे स्टुडिओतल्या किरकोळ कामांसाठी नोकरीस लागला. त्याच्या अंगच्या गुणांनी प्रगतीचे एक एक टप्पे गाठत मेहबूब खान लवकरच चंद्रशेखरांचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. मेहबूब खान चंद्रशेखरांचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना अर्देशीर इराणींच्या इंपीरियल फिल्म कंपनीत एक्स्ट्रा म्हणूनही काम करीत असे. ते दिवस मूक चित्रपटांचे होते. मेहबूब खान पुढे मुंबईला येऊन हिंदी चित्रपटसृष्टीत स्थिरावले, एक नामांकित चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून विख्यात झाले. मेहबूब खान यांना ‘जजमेंट ऑफ अल्लाह (१९३५) या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाची पहिली संधी प्राप्त झाली. पुढे डेक्कन क्वीन (१९३६), एक ही रास्ता (१९३९), औरत (१९४०) हे चित्रपट त्यांनी सागर मूव्हीटोन आणि नॅशनल स्टुडिओसाठी दिग्दíशत केले. १९४० साली त्यांनी दिग्दíशत केलेला ‘औरत प्रचंड गाजला. याच ‘औरतची रंगीत पुनर्निर्मिती त्यांनी ‘मदर इंडियाद्वारे १९५६ मध्ये केली. मदर इंडिया हिंदी चित्रपट क्षेत्रात गुणवत्तेचा मापदंड मानला गेला!

१९४५ साली मेहबूब खाननी ‘मेहबूब प्रॉडक्शन्स ही स्वत:ची निर्मिती संस्था आणि स्टुडिओ स्थापन केला. डाव्या विचारसरणीकडे कल असलेल्या मेहबूब खान यांच्या संस्थेचे ‘विळा कोयता हे बोधचिन्ह प्रसिद्ध होते. त्यांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी अनमोल घडी, मदर इंडिया, आन, अमर, अंदाज वगरे सात चित्रपटांची निर्मिती केली तर चोवीस चित्रपटांचे दिग्दर्शन केले, चार चित्रपटांत छोटीशी भूमिका केली आणि दोन चित्रपटांचे पटकथा लेखनही केले! मेहबूब खानांच्या मार्गदर्शनाखाली आपली अभिनयाची कारकीर्द सुरुवात करणारे अनेक अभिनेते, अभिनेत्री पुढे मोठे दिग्गज कलावंत म्हणून उदयाला आले. त्यात सुरेंद्र, दिलीपकुमार, सुनील दत्त, राजकुमार, राजेंद्रकुमार, राज कपूर, नर्गिस, निम्मी, नादिरा यांचा समावेश आहे. त्यांनी निर्मिती केलेला, १९६२ साली प्रदर्शित ‘सन ऑफ इंडिया हा अखेरचा चित्रपट. अर्थपूर्ण चित्रचौकटी, लोकसंगीताचा सुयोग्य वापर, सामान्य प्रेक्षकाला सहज पचनी पडेल असे सादरीकरण ही त्यांची वैशिष्टय़े. ‘मदर इंडिया या त्यांच्या चित्रपटाला १९५८ सालचा उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. २००७ साली त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त टपाल खात्याने त्यांचे तिकीट प्रसिद्ध केले. मेहबूब खान यांचे २८ मे १९६४ रोजी निधन झाले. आदल्याच दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, या धक्क्याने मेहबूब खानांचे प्राणोत्क्रमण झाले असे म्हटले जाते.

सं|जी|व वे|ल|ण|क|र पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट / सुनीत पोतनीस

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=5cYeOmAIZQ8

मदर इंडिया चित्रपट

https://www.youtube.com/watch?v=efR7T

No comments:

Post a Comment