🌴🌹आजचे दिन विशेष🌹१७ ऑगस्ट ❀🌴स्मृतिदिन जन्म / जयंती / वाढदिवस

***********

१७ ऑगस्ट

दिग्दर्शक निशिकांत कामत स्मृतिदिन

************

जन्म - १७ जून १९७० (मुंबई)

स्मृती - १७ ऑगस्ट २०२० (हैदराबाद)

निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा 'दृश्यम', इफान खानचा 'मदारी', जॉन अब्राहमचा 'फोर्स' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांचा समावेश आहे.

बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. 'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपलं नशिब आजमावलं होतं. भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने हैदराबाद मधील इस्पितळात निधन झालं. ते ५० वर्षांचे होते.

निशिकांत कामत यांना आदरांजली !

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट

************

************

१७ ऑगस्ट

गायक पंडित जसराज स्मृतिदिन

************

जन्म - २८ जानेवारी १९३० (हिसार)

स्मृती - १७ ऑगस्ट २०२० (US)

मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला.

स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदीया अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ईश्वरानुभूतीदेणारे तपस्वी गायक, तसंच देश विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीत संपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे गानगुरूम्हणजे पंडित जसराज.

जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं.मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. येथील गौलीगुडा चमन आणि नामपल्ली असे मोहल्ले आहेत ज्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. त्यांना शाळेच्या रस्त्यावरच्या त्या हॉटेलची आठवण आहे जेथे थांबून ते बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना देऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोर मध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे  गायन ऐकून तुम तो सुन्नी शागीर्द होअशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.

पंडित जसराज म्हणतात की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. पंडित जसराज मानतात की, संघर्षांतून यश मिळते, मात्र त्याच बरोबर ते मानतात की, त्याकडे मीच्या नजरेतून पहाता कामा नये. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात.

पंडीतजी मानतात की या दीर्घ जीवनात जर काही प्रेरणा घेतली जाऊ शकते तर ती हीच की सातत्याने काम करत राहिले पाहिजे. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडतं ते "जय हो".

पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्सही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील आहेत. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल कि जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही.शांताराम यांची कन्या.

भारतीय सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले आहे. पं.संजीव अभ्यंकर हे पं.जसराज यांचे शिष्य.

जसराज यांना आदरांजली !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेत्री रेखा कामत यांचा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९३३ (मुंबई)

ज्येष्ठ अभिनेत्री कुमुद सुखटणकर उर्फ रेखा कामत यांचा आज वाढदिवस.

चित्रा आणि रेखा सुखटणकर या अभिनेत्री बहिणीं पैकी रेखा यांचे आधीचे नाव कुमुद सुखटणकर. कुमुद सुखटणकर यांचे वडील मुंबईत आर्मी व नेव्ही स्टोअरमध्ये लिपिकम्हणून नोकरी करत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास मुलींच्या शाळेतून त्यांनी १९४९ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. चार बहिणी अणि दोन भाऊ-आईवडील अशा परिवारातील कुमुद या सर्वात थोरल्या. जात्याच हुशार असलेल्या कुमुद यांनी पुढे एस.एन.डी.टी. महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए.ला प्रवेश घेतला. परंतु घरातील आर्थिक ओढगस्तीमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. घरात उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते ते वडिलांची कारकुनीची नोकरी. एरवी कुमुद यांना बालकलाकार म्हणून छोटी-मोठी कामे मराठी, हिंदी चित्रपटांतून मिळत आणि दिवसाकाठी ५ रु. मोबदला त्यातून मिळे. कोकणातून आलेल्या या कुटुंबाने मुंबईतील सांस्कृतिक वातावरणाशी चांगलेच मिळते-जुळते घेतले होते. सुखटणकर कुटुंबातील या चुणचुणीत मुलीने तोवर सचिनशंकर, गौरीशंकर यांच्या बॅले ग्रूपमध्ये नृत्य शिकून भारतभर दौरे केले. गुरू पार्वतीकुमारांकडूनही त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. कथ्थक, मणीपुरी, या प्रादेशिक नृत्यप्रकारांबरोबर त्यांनी लोकनृत्यांतही कौशल्य मिळवले. गांधर्व महाविद्यालयात त्यांनी घोडके यांच्याकडून गायनाचे धडेही गिरवले होते व ताल, ठेक्याचे ज्ञान मिळवले. या सार्याक शिक्षणाचा फायदा त्यांना विविध ठिकाणी कला सादर करताना झाला.

सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून लाखाची गोष्टया चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. लाखाची गोष्टची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती. पुढे १९५३ साली ग.रा. कामतांबरोबर रेखा यांचा विवाह झाला. लग्नानंतरही कामतांकडून चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी दिली गेली. सासरकडूनही कोणताही विरोध झाला नाही.  या चित्रपटाच्या यशानंतर रेखा यांना चित्रपट मिळत गेले. कुबेराचं धनहा प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट त्यांनी लागलीच केला. त्यानंतर कोणं कुणाचं’,‘गंगेत घोडं न्हालं’,‘दिसतं तसं नसतं’, ‘बायको माहेरी जाते’, ‘गृहदेवता’, ‘धाकटी सून’, ‘बाळ माझा नवसाचाअसे तीसहून अधिक चित्रपट केले. गृहदेवताया चित्रपटात त्यांची दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट रशियन फिल्म फेस्टिवलमध्ये गाजला होता. रेखा यांनी विवेक, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत या अभिनेत्यांसह नायिकेच्या भूमिका निभावल्या आहेत. हर हर महादेवहा त्यांचा शेवटचा चित्रपट.  एकीकडे चित्रपटक्षेत्र गाजवत असतानाच रेखा कामत यांनी नाटकांमधूनही आपल्या अभिनयाची प्रासादिकता रसिकांपुढे पेश केली आहे. बेबंदशाही’, ‘आग्य्राहून सुटका’, ‘देवमाणूस’, ‘एखाद्याचं नशीब’,‘विषवृक्षाची छाया’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत पुण्यप्रभाव’, ‘संगीत एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘गंध निशिगंधाचा’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘मला काही सांगायचंयअशा २० हून अधिक नाटकांतून भूमिका निभावल्या आहेत. सहज अभिनय आणि रंगमंचावरील त्यांचा वावर वैशिष्ट्यपूर्ण असे. त्यांना मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा पुरेपुर वापर करून न्याय दिला. संगीत सौभद्र’, ‘पुण्यप्रभावसारख्या संगीत नाटकात त्या गायल्यादेखील आहेत. त्यांची सराहना (कौतुक) हिराबाई बडोदेकर, मा. दत्ताराम आदींनी केली आहे. मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा या नाट्यसंस्थेतून त्यांनी बहुतांश नाटके केली आहेत. संगीत नाटकातील त्यांच्या रुक्मिणी, किंकिणी या भूमिका विशेष गाजल्या आहेत. प्रभाकर पणशीकर, यशवंत दत्त, मा.दत्ताराम, प्रसाद सावकार, रामदास कामत, रघुवीर नेवरेकर आदी अभिनेत्यांबरोबर त्यांनी भूमिका रंगवल्या आहेत. १९४४ साली त्यांनी नाटकातील भूमिका करणे थांबवले, परंतु त्यांना दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासाठी मागणी येतच होती. १९७८ मध्ये त्यांनी प्रपंचही पहिली दूरदर्शन मालिका केली. त्यानंतर सांजसावल्या’, ‘साता जन्माच्या गाठीअशा लोकप्रिय मालिकांबरोबर एका लग्नाची दुसरी गोष्टही मालिका वयाच्या ८० व्या वर्षी केली आणि त्या महाराष्ट्राच्या घराघरात आज्जी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जाहिरातीमधील आजी व वयस्कर स्त्री रेखा यांनी चपखलपणे वठवली आहे. त्यामुळे त्यांनी जाहिरात क्षेत्रदेखील तितक्याच ताकदीने गाजवले आहे. सतीश राजवाडे यांच्याबरोबर त्यांनी केलेले जाहिरातपट लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात आहेत. त्यांची जाहिरातीतील मदर तेरेसा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रौढत्वी निज शैशवास जपणेया वृत्तीनुसार त्या आजही आपल्या आयुष्यातील गतकाळाला स्वत:पासून अलिप्त न ठेवता त्यांना समरसून आठवून आनंद मिळवत असतात. रेखा कामत यांना आजवर चित्रपट, नाटक, मालिकांसाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यामध्ये पी. सावळाराम पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार, दूरदर्शनवरील क्षणया टेलिफिल्मसाठी त्यांना विशेष पुरस्कार मिळाला. त्यांच्या भूमिकांसाठी रसिकांनी दिलेली दाद हाच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरस्कार आहे.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/संदीप राऊत

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेता सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९५७

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस.

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणारं नाव म्हणजे सचिन पिळगावकर. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत.

१९६२ सालच्या 'हा माझा मार्ग एकला' या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित 'गीत गाता चल' या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.

त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले. आपल्या कारकिर्दीत सचिननं हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. सचिन उर्दू भाषा आणि उच्चार शिकला थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. अक्षरश एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर "बैरागच्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. संजीवकुमार यांच्याबरोबरचा त्याचा स्नेह घट्ट होता अमिताभ बच्चन यांच्याबोरबर त्यानं दोन-तीन चित्रपटात काम केलं.

सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट "अष्टविनायकया चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं. वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत.

त्यांनी ''हाच माझा मार्ग'' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. सचिन यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे.

सचिन पिळगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेता डॉ. गिरीश ओक यांचा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९६० (नागपूर)

सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. गिरीश ओक यांचा आज वाढदिवस.

गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसुभरही संबंध नाही. ते स्वत:ही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले की, हे आपले काम नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. यामुळे ते अभिनय करायला मुंबईत गेले. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला.

प्रभाकर पणशीकरांनी 'तो मी नव्हेच' हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवले होते. डॉ. गिरीश ओक या नाटकाबद्दल  म्हणतात, "तो मी नव्हेच, हे नाटक अजरामर करण्यात स्व. प्रभाकर पणशीकरांचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हा लखोबा लोखंडेची भूमिका करताना माझ्यावर बराच ताण आला होता. लखोबा लोखंडेच्या भूमिकेला न्याय देणे मला शक्य होईल का, याबाबतही थोडी धास्ती होती.

सुरवातीच्या प्रयोगानंतर माझ्या भूमिकेची तुलना पणशीकरांच्या भूमिकेशी करायचे. परंतु कालांतराने तुलना करण्याचे प्रमाण कमी झाले. 'तो मी नव्हेच' या नाटकाचे 'शिवधनुष्य' मला पेलवेल का, अशीही विचारणा झाली. परंतु केवळ 'शिवधनुष्य' उचलले नाही तर 'शिवधनुष्या'चे 'इंद्रधनुष्य' केले, अशा प्रतिक्रिया रसिकांनी माझ्याकडे व्यक्त' केलेल्या आहेत. याव्यतिरिक्त' आणखी काय हवे. 

हे नाटक गिरीश ओक यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले आहे. तसेच 'ती फुलराणी' मधील त्यांचे संस्मरणीय आहे. गिरिजा ओक या डॉ. गिरीश ओक यांच्या कन्या आहेत.

डॉ. गिरीश ओक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेता सचिन नि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचा वाढदिवस

************

प्रसिद्ध अभिनेते सचिन व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या दोाघांची जोडी 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्या दोघांचाही वाढदिवस १७ ऑगस्ट या एकाच दिवशी असतो.

१७ ऑगस्ट १९५७ साली जन्मलेेले सचिन पिळगवाकर गेल्या ५ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'गीत गाता चल' या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकों से आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.

आपल्या कारकिर्दीत सचिननं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. सचिन उर्दू भाषा आणि उच्चार शिकला थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. अक्षरश एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर "बैरागच्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

संजीवकुमार यांच्या बरोबरचा त्याचा स्नेह घट्ट होता अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यानी दोन तीन चित्रपटात काम केलं. सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट 'अष्टविनायकया चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं. वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत. त्यांनी ''हाच माझा मार्ग' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. सचिन यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत 'नच बलिये' पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

१७ ऑगस्ट १९६७ साली जन्मलेल्या सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली.

सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नवऱ्याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटा दरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नवऱ्याला मिळाली. १९८५ साली सचिन सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.

माझा पती करोडपती, कुंकू, अशी ही बनवाबनवी; अश्या बऱ्याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या 'तू तू मै मै' टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. 'नवरा माझा नवसाचा' ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली. सचिन सुप्रिया ह्यांचे काम करतांना चित्रपटाच्या सेटवर संबंध अत्यंत व्यवसायिक आहे. बायको म्हणून सचिन सुप्रियाला गृहित धरत नाही. तसेच तिच्या सूचनांना प्राधान्य देतात. त्याउलट सुप्रियाला सचिन दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात तेव्हा निश्चिंत वाटते.

काही वर्षापूर्वी सुप्रियाने संजय छेलचा 'खुबसुरत' केला. त्याचबरोबर अमिताभ बच्चन बरोबर 'ऐतबार' मधे त्यांच्या पत्नीची भूमिका केली. 'ऐतबार' चित्रपट कसा मिळाला हे सांगतांना सुप्रिया सांगते की, तिचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट पहाण्यासाठी अमिताभ बच्चन आले होते. त्यांनीच सुप्रियाचे नाव 'ऐतबार' साठी सुचविले. चित्रपटांच्या बरोबरीने तू तू मै मै, क्षितीज ये नही, शादी नंबर वन, कभी बिबी कभी जासूस; ह्या टि.व्ही. मालिकाही केल्या.

मराठी चित्रपटसृष्टीत गाजविणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या सध्या हिंदीतील; दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स, एक नणंद की खुशियो की चाबी.. मेरी भाभी, ससुराल गेंदा फूल, कुछ रंग प्यार के एसे भी; यांसारख्या मालिका मध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली आहे. सुप्रियाची स्टार प्लस वाहिनी वरील 'तू तू - मैं मैं' या कार्यक्रमा मध्ये सुनेच्या भूमिकेसाठी चाहत्यांची विशेष दाद मिळाली. सुप्रियाने सचिनच्या साथीत 'नच बलिये' पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

सचिन पिळगावकर आणि ह्यांची जोडी 'रील लाईफ' मधून 'रियल लाईफ' मध्ये एकमेकांची साथीदार झाली.

सुप्रिया व सचिन पिळगवाकर या दांपत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेत्री क्रांती रेडकर चा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९८२ (मुंबई)

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची आणि नृत्याची विशेष छाप पाडणारी अभिनेत्री क्रांती रेडकरचा आज वाढदिवस.

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री क्रांती रेडकरनं केवळ मराठीतच नाही तर हिंदी सिनेमांतही तिनं अभिनयाचा ठसा उमठवला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील 'जत्रा' सिनेमातील 'कोंबडी पळाली' हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. तेव्हाच नाही तर हे गाणं आताही कुठे वाजलं की पाय थिरकायला लागतात. या धमाकेदार गाण्याची जादू आजही कायम आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात अभिनेता भरत जाधव आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केलेल्या डान्स स्टेप्स या प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या.

क्रांती रेडकरने २००० मध्ये सून असावी अशीया चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश चौधरी या चित्रपटाचा नायक होता. फक्त लढ म्हणा, शहाणपण देगा देवा, ऑन ड्युटी २४ तास, पिपाणी, खो खो, मर्डर मेस्त्री, कुणी घर देता का घर, करार; हे तिचे उल्लेखनीय चित्रपट.

कांकणया चित्रपटाचे तिने दिग्दर्शनही केले होते. प्रकाश झा यांच्या गंगाजलचित्रपटा मध्ये तिने छोटी व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच चित्तोड की महारानीआणि सिम्प्ली सपनेया मालिका मध्येही ती झळकली होती.

काकणया हद्यस्पर्शी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळून तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. डान्स आणि अभिनया व्यतिरिक्त क्रांती प्रथमच झी युवावरील 'मैफिल' या सांगितिक कार्यक्रमात सुत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसली आहे.

२०१७ मध्ये क्रांती रेडकरने समीर वानखडे या कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकाऱ्या सोबत लग्न केले आहे. त्यानंतर २०१८ मध्ये तिनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. झिया आणि झायदा ही क्रांतीच्या जुळ्या मुलींची नावं आहेत. या दोघींच्या नावावरून तिनं कपड्याचा ब्रॅंड देखील लॉन्च केला आहे.

लॉकडाऊन च्या काळात क्रांती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. गप्पा-गोष्टी आणि संगीताचा समावेश असलेल्या अनोख्या मैफिलया टीव्ही रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन केलं आहे.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

!! 17 ऑगस्ट  दिनविशेष ॥

             🔥 मंगळवार 🔥

🌎🌎 घडामोडी🌎🌎

👉 2008 - एकाच ऑलिम्पिक स्पर्धत आठ सुवर्णपदक जिकंणारे मायकेल फेलप्स हे पहिले खेळाडू ठरले

👉 1997 - उस्ताद अली अकबर खाॅ यांना अमेरिकेचा नॅशनल हॅरिटेज पुरस्कार जाहीर

👉 1982 - पहिली सी.डी. (COMPACT DISK) जर्मनीमध्ये विकण्यात आली

            🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जन्म

👉 1949 - इतिहास संशोधक निनाद बेडेकर

👉 1916 - डाॅ. विनायक विश्र्वनाथ तथा अप्पासाहेब पेडंसे  - शिक्षणतज्ञ देशभक्त, तत्वज्ञ ,कुशलसंघटक, लेखक, पञकार आणि ज्ञानप्रबोधनी संस्थापक

मृत्यू

👉 1909 - क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी न्यायालयात स्वतः हुन फाशीची शिक्षा मागीतली असून त्यांचे निधन

👉 1905 - शंकर गणेश दाते- ग्रंथसुचीकार

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

🙏🌴🌹आजचे दिन विशेष🌹🌴🙏

१७ आॅगस्ट

घटना / घडामोडी

१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

१८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

१९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

१९५३: नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.

१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.

१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.

१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.

१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.

२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले. 

 जन्म / जयंती / वाढदिवस

१७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४)

१८४४: इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.

१८६६: हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)

१८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.

१८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)

१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)

१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)

१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.

१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.

१९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.

१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.

१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.

१९७२: बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म

मृत्यु / पुण्यतिथी / स्मृतिदिन

१३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.

१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)

१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४)

************

१७ ऑगस्ट

'वेनेरा-७' परग्रहावर सर्वप्रथम यशस्वीपणे संदेश प्रसारित करणारा उपग्रहाचे प्रक्षेपण

************

प्रक्षेपण - १७ ऑगस्ट १९७०

वेनेरा ७ आणि इतर वेनेरा उपग्रहांपासून शुक्र या ग्रहाबद्दल मिळालेली माहिती :

सूर्यमालेमध्ये शुक्र हा सूर्यापासून बुधानंतर आणि पृथ्वीअगोदर येणारा क्रमाने दुसरा ग्रह आहे. जरी सर्व ग्रहांच्या भ्रमणकक्षा लंबगोलाकार असल्यातरी शुक्राची भ्रमणकक्षा जवळजवळ वर्तुळाकार आहे. याचा व्यास १२१०४ कि.मी. एवढा आहे. शुक्र देखील अंतर्वर्ती ग्रह आहे. यामुळेच शुक्रदेखील आपल्याला आकाशात फक्त सकाळी किंवा संध्याकाळीच दिसतो. या ग्रहावर वातावरण अतिशय दाट असल्यामुळे सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तित होतो. म्हणून शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो.

शुक्र पृथ्वीहून जास्त सूर्याजवळ असल्यामुळे आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. त्यामुळेच तो पहाटे किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसू शकतो. जर तो जास्त प्रखर बनला तर दिवसाही दिसू शकतो. शुक्र हा सूर्य व चंद्रापाठोपाठ पृथ्वीवरून तेजस्वी दिसणाऱ्या चांदण्यांत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची तेजस्विता -४,६ आहे. तो अंत्यर्वर्ती ग्रह असल्याने तो सूर्यापासून कधीच दूर दिसत नाही. तो जास्तीत जास्त तो ४७.८ अंशापर्यंत दूर जाऊ शकतो. त्याची तेजस्विता ही सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी सर्वांत जास्त असते त्यामुळेच त्याला पहाटेचा तारा किंवा सायंतारा असेही म्हणतात.

शुक्र हा ग्रह घन पृष्ठभाग असणारा ग्रह आहे. म्हणजे त्याचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. आकार व वस्तुमानाच्या बाबतीत तो पृथ्वीशी कमालीचा मिळताजुळता आहे इतका की कित्येकदा त्याला पृथ्वीचा जुळा ग्रह असेही म्हणतात. शुक्राचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा फ़क्त ६६० कि.मी.ने कमी आहे तर त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या ८१.५% इतके आहे. मात्र त्याचे वातावरण मात्र अत्यंत दाट कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे पृथ्वीपेक्षा अत्यंत वेगळे आहे.

शुक्राला स्वत:भोवती फिरण्यास २४३ दिवस लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २२५ दिवस लागतात. त्यामुळे शुक्रावरील एक दिवस हा त्याच्या वर्षापेक्षाही मोठा आहे. शुक्राचे सूर्यापासूनचे अंतर १०८,२०८,९३० कि.मी. एवढे आहे. सूर्यमालेतील इतर सर्व ग्रह पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे फिरतात. फक्त शुक्र हा एकच ग्रह पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो. त्यामुळे शुक्रावर सूर्य पश्चिम दिशेला उगवतो व पूर्व दिशेला मावळतो. शुक्र हा देखील अंतर्वर्ती ग्रह असल्यामुळे याचेसुद्धा सूर्यावरील अधिक्रमण आपणास पहावयास मिळते.

शुक्राला एकही चंद्र नाही. शुक्र सूर्यापासून १०६ दशलक्ष कि.मी. आहे. बाकीच्या ग्रहांची कक्षा जरी लंबवर्तुळाकार असली तरी शुक्राची कक्षा मात्र जवळपास वर्तुळाकार आहे. त्याचा पृष्ठभाग ताशी ६.५ कि.मी. वेगाने फिरतो, तर पृथ्वीच्या विषुववृत्ताजवळचा पृष्ठभाग हा ताशी १६०० कि.मी या वेगाने फिरतो.

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

************

************

१७ ऑगस्ट

शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका

************

घटना - १७ ऑगस्ट १६६६

हीच ती तारीख १७ ऑगस्ट ची ! ही ३५४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.

मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाचे शाहजहानलाही ते जमले नव्हते. पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले. आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला. आणि ती तारीख होती १७ ऑगस्ट १६६६ ची.

पण या घटनेस प्रारंभ होतो तो १२ जून १६६५ रोजी. त्या दिवशी मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. पुढे मिर्झा राजांनी महाराजांना आग्र्यास पाठविले. ते गोळकोंड्याच्या कुतुबशहाला जाऊन मिळतील असे भय मिर्झा राजांना वाटत होते. महाराजांची औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण मिर्झा राजांनी आग्रह धरला. त्यांना जावे लागले.

जयपूरच्या दफ्तरखान्यातील राजस्थानी हिंदीच्या डिंगल या बोलीभाषेत लिहिलेल्या पत्रसंग्रहानुसार, राजे ११ मे १६६६ रोजी आग्र्या जवळील मलूकचंद सराई येथे पोचले. १२ मे रोजी ते आग्र्यात आले. त्याच दिवशी त्यांची आणि औरंगजेबाची पहिली आणि अखेरची भेट झाली.

यानंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता. १४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले.

महाराजांना त्यांच्या तळावरच कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले. त्यानंतर बादशहाने महाराजांना निरोप पाठविला की, तुम्ही आपल्याजवळील किल्ले मला देऊन टाका. मी तुमची मनसब बहाल करतो.

महाराजांनी त्याला नकार दिला. तशातच रामसिंगाचे राजपूत सैनिक त्याच्या राज्यातून आग्र्यास येत असल्याची खबर बादशहाला लागली. त्याला यात कटाचा संशय आला आणि त्याने शिद्दी फौलाद आणि तोफखान्याला हुकूम दिला, सेवा को जाई पकडी मारो. शिवाजीला धरून मारा.

पण रामसिंगाने सैन्याबद्दल खुलासा केला. शिवाय बेगम जहानआरा हिने महाराजांना ठार मारू नका असे निक्षून सांगितले. मिर्झा राजे जयसिंग यांचा कौल घेऊन शिवाजी येथे आला आहे. त्याला मारलेत तर आपल्या वचनावर कोण विश्वास ठेवील, असा तिचा सवाल होता.

नंतर हळूहळू महाराजांनी आपल्या सोबत आणलेल्या लोकांना स्वराज्यात पाठविण्यास सुरूवात केली. रामसिंगलाही आपली जामिनकी मागे घेण्यास सांगितले.

१४ ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांच्या भोवती चौकी पहारे कडक केले. त्याना विठ्ठलदासांच्या हवेलीत नेऊन ठेवण्याचा हुकूम केला. ते याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी रामसिंगच्या तळावर गेले, तर रामसिंगने त्यांना भेट नाकारली. थोडा वेळ वाट पाहून महाराज परत गेले.

तब सेवौ जाणौ अब बुरा हौ, तब भाग्यो.

तेव्हाच त्यांनी ओळखले, की आता अनर्थ होणार. त्यांनी आग्र्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि १७ ऑगस्टला त्यांनी पिंजरा फोडला.

मुंगीलाही प्रवेश करणे कठीण जावे अशा या चौकी पहाऱ्यातून महाराज निसटले. पण कसे?

सर्वसामान्य मान्यता अशी की, ते मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले. या पेटाऱ्यांच्या कहाणीचा पहिला उल्लेख येतो तो राजस्थानी पत्रांत. हे पत्र परकालदासचे आहे आणि ते ३ सप्टेंबर १६६६ चे आहे. तो लिहितो,

"दिवस चार घटका वर आला असता बातमी आली की, शिवाजी पळाला. चौक्या पहाऱ्यांवर एक हजार माणसे होती. तो नक्की कोणत्या क्षणी पळाला आणि कोणत्या चौकीतून पार झाला. त्यावेळी कुणाचा पहारा होता, हे कोणीही सांगू शकले नाही."

तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यरां कीं आमगरफ्त भी सो पट्यारा मे बैठ निकल्यो.

मग शेवटी विचार विनिमय करून असा निष्कर्ष निघाला की, पेटाऱ्यांची ये-जा होती. त्यामुळे तो पेटाऱ्यांत बसून निघाला असावा.

मोगल अकबार या उल्लेखास दुजोरा देत नाही. सेतुमाधवराव सांगतात की, तेथे निष्कर्ष आहे वेशांतराचा.

पेटाऱ्यांची ये-जा होती. ते पाहणाऱ्यांच्या गर्दीत महाराज वेशांतर करून मिसळले आणि निसटले. संभाजीराजांना पेटाऱ्यात बसविले असणे शक्य आहे. पण महाराज स्वतःला अगतिक आणि कुचंबलेल्या अवस्थेत पेटारईसत कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावावरून आणि सावधगिरीवरून शक्य वाटत नाही, असे सेतुमाधवराव म्हणतात.

मग ही पेटाऱ्यात बसल्याची कथा कशी आली?

सेतुमाधवराव म्हणातात,

पेटाऱ्यात लपून गेले त्यामुळे आम्हांला दिसले नाहीत, असे सांगून आपली सुटका करून घेण्याची ही मोगल अधिकाऱ्यांची युक्ती नसेल कशावरून?

खुद्द औरंगजेबाचा या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता. वेष बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटाऱ्या बरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले की वारा बनून गेले? काय चमत्कार करून गेले याचा पहारेकऱ्यांना पत्ताही लागला नाही.

त्याचा शंभर टक्के खात्रीलायक पत्ता तसा अजूनही लागलेला नाही.

अर्थात महाराज कसे याहून सुटले याला मोल आहे !

सचिन पानसरे, घाटघर (जुन्नर)

संदर्भ : श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ

सेतुमाधवराव पगडी, परचुरे प्रकाशन मन्दिर

१ मे २०११, पृ. १४ ते ३५

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक

************

************

१७ ऑगस्ट

शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर जन्मदिन

************

जन्म - १७ ऑगस्ट १९४९ (पुणे)

स्मृती - १० मे २०१५

शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी झाला.

छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला.

शिवचरित्राची गोडी लागल्याने बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या. शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. 

लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगणआणि झंझावातही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले. गेल्याच महिन्यात त्यांचे अजरामर उद्गारहे अखेरचे पुस्तक प्रकाशित झाले होते.

इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासकसंस्थेचे अध्यक्ष होते.

निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. शनिवारवाडा येथील ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते.

गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.

निनाद बेडेकर यांचे १० मे २०१५ रोजी निधन झाले.

निनाद बेडेकर यांना यांना आदरांजली !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

१७ ऑगस्ट

दिग्दर्शक निशिकांत कामत स्मृतिदिन

************

जन्म - १७ जून १९७० (मुंबई)

स्मृती - १७ ऑगस्ट २०२० (हैदराबाद)

निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा 'दृश्यम', इफान खानचा 'मदारी', जॉन अब्राहमचा 'फोर्स' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांचा समावेश आहे.

बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. 'डोंबिवली फास्ट' या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपलं नशिब आजमावलं होतं. भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने हैदराबाद मधील इस्पितळात निधन झालं. ते ५० वर्षांचे होते.

निशिकांत कामत यांना आदरांजली !

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : इंटरनेट

************

************

१७ ऑगस्ट

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा स्मृतिदिन

************

जन्म - १८ फेब्रुवारी १८८३

स्मृति - १७ ऑगस्ट १९०९

"माझ्या एका रक्ताशिवाय आपल्या मातेला अर्पण करण्यासाठी माझ्याजवळ दुसरे काहीही नाही. जोपर्यंत भारतमाता स्वतंत्र होत नाही; तोपर्यंत वारंवार भारतात माझा जन्म व्हावा. मी वारंवार भारतासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करू इच्छितो!"

पंजाबमधील आद्य क्रांतिकार म्हणून मदनलाल धिंग्रा यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.स्वातंत्र्यवीर सावरकर, शामाजी कृष्णवर्मा इ. च्या सहवासात आल्यावर त्यांच्या विचारांच्या प्रभावाने प्रेरित होऊन मदनलाल यांच्यातील क्षात्रतेज व देशप्रेम जागृत झाले. त्यांनी कर्झन वायली या दुष्ट जुलमी व भारतद्वेषी अधिकार्‍याला संपविण्याचा निश्चय केला. लंडन येथील नॅशनल इंडियन असोसिएशनच्या सभेला व समारंभाला कर्झन येणार आहे . ही खात्रीलायक बातमी मदनलाल यांना समजली होती. समारंभात मदनलाल यांनी चार गोळया झाडल्या. कर्झन हे तत्काळ जागेवर ठार झाले. मदनलाल यांना तेथेच पकडण्यात आले.

लंडन येथील पेन्टेनव्हिली या करागृहात १७ ऑगस्ट १९०९ रोजी सकाळी ९ वाजता या क्रांतिवीराला फाशी देण्यात आली. मदनलाल यांचे विचार अत्यंत स्पष्ट होते व ते तितक्याच स्पष्टपणे व्यक्त करीत असत की, "परकीय शस्त्रात्रांच्या सहाय्याने दास्यात जखडून पडलेले राष्ट्र हे निरंतरच युध्दमान राष्ट्र होय. नि:शस्त्रांना उघडपणे रणांगणात उतरुन सामना देणे अशक्य असल्यामूळे मी दबा धरुन हल्ला चढविला. बंदुका तोफा वापरायची मला परवानगी नाही म्हणून मी पिस्तूल वापरले. भारतीयांजवळ मातृभूमीसाठी देता येईल, तर ते स्वत:चे रक्तच होय."

त्यांच्यात देशभक्ती निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी देशभक्तांनी अनेक मार्ग शोधले. इंग्रजांना जरब बसावी यासाठी देशभक्तांनी क्रांतीकारक मार्गाने लढा दिला . तसेच राष्ट्ररक्षण व ब्रिटिशांपासून सुटका यासाठी अनेक क्रांतीकारक संघटना उदयास आल्या. मदनलाल धिंग्रा हे 'अभिनव भारत' या क्रांतीकारकी संघटनेचे सदस्य बनले. धिंग्रा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या क्रांतीकारकाच्या रक्तातून महान स्वातंत्र्याची बिजे रूजली हे जास्त महत्वाचे आहे. एवढा भीषण खून करूनही विजयाचे समाधान त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. भारताच्या स्वातंत्र्याचा एक विरोधक त्याने संपवला होता. पोलिसांनी मदनलालला पकडले. त्याच्यावर खटला भरण्यात आला. तेंव्हा न्यायालयात मदनलाल म्हणाला, "आमच्या मातृभूमीवर आपले अमंगल पाय ठेवणार्‍यांची हत्या करणे हेच योग्य आहे. मला अवश्य फाशी द्या. कारण त्यामुळे माझ्या देशवासीयांच्या अंतःकरणात सूडाची भावना भडकू शकेल."

१७ ऑगस्ट १९०९ रोजी मदनलालला फासावर लटकवण्यात आले. देशप्रेमाने भरलेला तो देशभक्त हसत हसत फाशी गेला. अनंत अनंत दंडवत !

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

************

************

१७ ऑगस्ट

गायक पंडित जसराज स्मृतिदिन

************

जन्म - २८ जानेवारी १९३० (हिसार)

स्मृती - १७ ऑगस्ट २०२० (US)

मेवाती घराण्याचे संगीत मार्तंड पंडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला.

स्वरांच्या साडेतीन सप्तकांमध्ये फिरणारे, सुमधुर आवाजाची देणगी लाभलेले, ‘जसरंगी जुगलबंदीया अनोख्या गायन प्रकाराचं भारतीय संगीतसृष्टीला योगदान देणारे आणि आपल्या गायनाद्वारे रसिकांना ईश्वरानुभूतीदेणारे तपस्वी गायक, तसंच देश विदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षण देऊन संगीत संपन्न वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे गानगुरूम्हणजे पंडित जसराज.

जसराज यांचे वडील मोतीराम हे सुद्धा मेवाती घराण्याचे गायक होते. त्यांना वयाच्या चौथ्या वर्षी वडील पं.मोतीराम यांच्याकडून तालीम मिळाली. पंडीत जसराज यांच्या बालपणाचे काही दिवस हैद्राबादच्या गल्ली-मोहल्यात गेले. येथील गौलीगुडा चमन आणि नामपल्ली असे मोहल्ले आहेत ज्यात त्यांच्या बालपणीच्या आठवणी आहेत. त्यांना शाळेच्या रस्त्यावरच्या त्या हॉटेलची आठवण आहे जेथे थांबून ते बेगम अख्तर यांच्या गजला, ‘दिवाना बना है तो दिवाना बना दे, वरना तकदीर कही तमाशा न बना देऐकत असत. या गजलनेच त्यांना शाळा सोडायला लावली आणि मग ते तबला वाजवू लागले. तबलजी हे गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे कळल्यामुळे ते अतिशय व्यथित झाले, आणि मग त्यांनी तबला वाजवायचे सोडून गायक बनायचे ठरवले. अनेक वर्षांनी त्यांना लाहोर मध्ये गायक कलाकाराच्या रूपात मंचावर मुख्य आकर्षण म्हणून यावे हे सुचले, आणि मग गायक होण्यासाठीचा दीर्घ संघर्ष सुरु झाला. एका मैफलीमध्ये त्यांचे  गायन ऐकून तुम तो सुन्नी शागीर्द होअशा शब्दांत तबलानवाज उस्ताद आमीर हुसेन खाँ यांनी गौरव केला होता. उस्ताद अमीर खाँ साहेब, गुलाम अली खाँ आणि ओंकारनाथ ठाकूर यांचे गाणे त्यांना खूप आवडायचे.

पंडित जसराज म्हणतात की संघर्ष, मेहनत, रियाज सर्व गोष्टी जीवनात आवश्यक आहेत. त्याच संघर्षात कामी येतात. आपल्या जीवनात पंडीतजींनी अनेकांना जमिनीवरून आकाशात जाण्याचा मार्ग दाखवला आहे. पंडित जसराज मानतात की, संघर्षांतून यश मिळते, मात्र त्याच बरोबर ते मानतात की, त्याकडे मीच्या नजरेतून पहाता कामा नये. माणसाला जेंव्हा स्वत:चा गर्व होतो तेंव्हा तो संपतो. त्याच्या संघर्षांच्या कक्षा संपतात.

पंडीतजी मानतात की या दीर्घ जीवनात जर काही प्रेरणा घेतली जाऊ शकते तर ती हीच की सातत्याने काम करत राहिले पाहिजे. गायचे असेल तर शिकत रहा, रियाज करत राहा आणि परमेश्वराच्या कृपेची वाट पहा. पंडित जसराज कोणालाही भेटले की त्यांच्या तोंडून बाहेर पडतं ते "जय हो".

पं.जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांच्या संकल्पनेतून पंडितजीचा जीवनपट उलगडणारी गोल्डन व्हॉइस गोल्डन इयर्सही चित्रफीत साकारली आहे. कला जिवंत राहावी, ती पुढच्या पिढीमध्ये रुजावी यासाठी जसराजजी प्रयत्नशील आहेत. आपल्या पैकी खूप जणानां माहित नसेल कि जसराज हे व्ही.शांताराम यांचे जावई. पत्नी मधुरा ही चित्रपती व्ही.शांताराम यांची कन्या.

भारतीय सरकारने संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन जसराज यांना गौरवले आहे. पं.संजीव अभ्यंकर हे पं.जसराज यांचे शिष्य.

जसराज यांना आदरांजली !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेता सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९५७

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर यांचा आज वाढदिवस.

मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणारं नाव म्हणजे सचिन पिळगावकर. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत.

१९६२ सालच्या 'हा माझा मार्ग एकला' या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित 'गीत गाता चल' या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.

त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले. आपल्या कारकिर्दीत सचिननं हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. सचिन उर्दू भाषा आणि उच्चार शिकला थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. अक्षरश एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर "बैरागच्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. संजीवकुमार यांच्याबरोबरचा त्याचा स्नेह घट्ट होता अमिताभ बच्चन यांच्याबोरबर त्यानं दोन-तीन चित्रपटात काम केलं.

सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट "अष्टविनायकया चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं. वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत.

त्यांनी ''हाच माझा मार्ग'' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. सचिन यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत नच बलिये पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे.

सचिन पिळगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेत्री रेखा कामत यांचा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९३३ (मुंबई)

ज्येष्ठ अभिनेत्री कुमुद सुखटणकर उर्फ रेखा कामत यांचा आज वाढदिवस.

चित्रा आणि रेखा सुखटणकर या अभिनेत्री बहिणीं पैकी रेखा यांचे आधीचे नाव कुमुद सुखटणकर. कुमुद सुखटणकर यांचे वडील मुंबईत आर्मी व नेव्ही स्टोअरमध्ये लिपिकम्हणून नोकरी करत असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूटच्या छबिलदास मुलींच्या शाळेतून त्यांनी १९४९ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. चार बहिणी अणि दोन भाऊ-आईवडील अशा परिवारातील कुमुद या सर्वात थोरल्या. जात्याच हुशार असलेल्या कुमुद यांनी पुढे एस.एन.डी.टी. महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए.ला प्रवेश घेतला. परंतु घरातील आर्थिक ओढगस्तीमुळे त्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. घरात उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते ते वडिलांची कारकुनीची नोकरी. एरवी कुमुद यांना बालकलाकार म्हणून छोटी-मोठी कामे मराठी, हिंदी चित्रपटांतून मिळत आणि दिवसाकाठी ५ रु. मोबदला त्यातून मिळे. कोकणातून आलेल्या या कुटुंबाने मुंबईतील सांस्कृतिक वातावरणाशी चांगलेच मिळते-जुळते घेतले होते. सुखटणकर कुटुंबातील या चुणचुणीत मुलीने तोवर सचिनशंकर, गौरीशंकर यांच्या बॅले ग्रूपमध्ये नृत्य शिकून भारतभर दौरे केले. गुरू पार्वतीकुमारांकडूनही त्यांनी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. कथ्थक, मणीपुरी, या प्रादेशिक नृत्यप्रकारांबरोबर त्यांनी लोकनृत्यांतही कौशल्य मिळवले. गांधर्व महाविद्यालयात त्यांनी घोडके यांच्याकडून गायनाचे धडेही गिरवले होते व ताल, ठेक्याचे ज्ञान मिळवले. या सार्याक शिक्षणाचा फायदा त्यांना विविध ठिकाणी कला सादर करताना झाला.

सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून लाखाची गोष्टया चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. लाखाची गोष्टची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती. पुढे १९५३ साली ग.रा. कामतांबरोबर रेखा यांचा विवाह झाला. लग्नानंतरही कामतांकडून चित्रपटात काम करण्यासाठी परवानगी दिली गेली. सासरकडूनही कोणताही विरोध झाला नाही.  या चित्रपटाच्या यशानंतर रेखा यांना चित्रपट मिळत गेले. कुबेराचं धनहा प्रभात फिल्म कंपनीचा चित्रपट त्यांनी लागलीच केला. त्यानंतर कोणं कुणाचं’,‘गंगेत घोडं न्हालं’,‘दिसतं तसं नसतं’, ‘बायको माहेरी जाते’, ‘गृहदेवता’, ‘धाकटी सून’, ‘बाळ माझा नवसाचाअसे तीसहून अधिक चित्रपट केले. गृहदेवताया चित्रपटात त्यांची दुहेरी भूमिका होती. हा चित्रपट रशियन फिल्म फेस्टिवलमध्ये गाजला होता. रेखा यांनी विवेक, चित्तरंजन कोल्हटकर, चंद्रकांत या अभिनेत्यांसह नायिकेच्या भूमिका निभावल्या आहेत. हर हर महादेवहा त्यांचा शेवटचा चित्रपट.  एकीकडे चित्रपटक्षेत्र गाजवत असतानाच रेखा कामत यांनी नाटकांमधूनही आपल्या अभिनयाची प्रासादिकता रसिकांपुढे पेश केली आहे. बेबंदशाही’, ‘आग्य्राहून सुटका’, ‘देवमाणूस’, ‘एखाद्याचं नशीब’,‘विषवृक्षाची छाया’, ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत पुण्यप्रभाव’, ‘संगीत एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘गंध निशिगंधाचा’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘मला काही सांगायचंयअशा २० हून अधिक नाटकांतून भूमिका निभावल्या आहेत. सहज अभिनय आणि रंगमंचावरील त्यांचा वावर वैशिष्ट्यपूर्ण असे. त्यांना मिळालेल्या प्रत्येक भूमिकेला त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वातील पैलूंचा पुरेपुर वापर करून न्याय दिला. संगीत सौभद्र’, ‘पुण्यप्रभावसारख्या संगीत नाटकात त्या गायल्यादेखील आहेत. त्यांची सराहना (कौतुक) हिराबाई बडोदेकर, मा. दत्ताराम आदींनी केली आहे. मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा या नाट्यसंस्थेतून त्यांनी बहुतांश नाटके केली आहेत. संगीत नाटकातील त्यांच्या रुक्मिणी, किंकिणी या भूमिका विशेष गाजल्या आहेत. प्रभाकर पणशीकर, यशवंत दत्त, मा.दत्ताराम, प्रसाद सावकार, रामदास कामत, रघुवीर नेवरेकर आदी अभिनेत्यांबरोबर त्यांनी भूमिका रंगवल्या आहेत. १९४४ साली त्यांनी नाटकातील भूमिका करणे थांबवले, परंतु त्यांना दूरदर्शनच्या छोट्या पडद्यासाठी मागणी येतच होती. १९७८ मध्ये त्यांनी प्रपंचही पहिली दूरदर्शन मालिका केली. त्यानंतर सांजसावल्या’, ‘साता जन्माच्या गाठीअशा लोकप्रिय मालिकांबरोबर एका लग्नाची दुसरी गोष्टही मालिका वयाच्या ८० व्या वर्षी केली आणि त्या महाराष्ट्राच्या घराघरात आज्जी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. जाहिरातीमधील आजी व वयस्कर स्त्री रेखा यांनी चपखलपणे वठवली आहे. त्यामुळे त्यांनी जाहिरात क्षेत्रदेखील तितक्याच ताकदीने गाजवले आहे. सतीश राजवाडे यांच्याबरोबर त्यांनी केलेले जाहिरातपट लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात आहेत. त्यांची जाहिरातीतील मदर तेरेसा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रौढत्वी निज शैशवास जपणेया वृत्तीनुसार त्या आजही आपल्या आयुष्यातील गतकाळाला स्वत:पासून अलिप्त न ठेवता त्यांना समरसून आठवून आनंद मिळवत असतात. रेखा कामत यांना आजवर चित्रपट, नाटक, मालिकांसाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यामध्ये पी. सावळाराम पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार, दूरदर्शनवरील क्षणया टेलिफिल्मसाठी त्यांना विशेष पुरस्कार मिळाला. त्यांच्या भूमिकांसाठी रसिकांनी दिलेली दाद हाच त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा पुरस्कार आहे.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/संदीप राऊत

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९६७

मराठी, हिंदी भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचा आज वाढदिवस.

सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली.

सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नवऱ्याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नवऱ्याला मिळाली. १९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.

'माझा पती करोडपती', 'कुंकू', 'अशी ही बनवाबनवी' अश्या बऱ्याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या 'तू तू मै मै' टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. 'नवरा माझा नवसाचा' ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली. सचिन-सुप्रिया ह्यांचे काम करतांना चित्रपटाच्या सेटवर संबंध अत्यंत व्यवसायिक आहे. बायको म्हणून सचिन सुप्रियाला गृहित धरत नाही. तसेच तिच्या सूचनांना प्राधान्य देतात. त्याउलट सुप्रियाला सचिन दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात तेव्हा निश्चिंत वाटते.

काही वर्षापूर्वी सुप्रियाने संजय छेलचा 'खुबसुरत' केला. त्याचबरोबर अमिताभ बच्चन बरोबर 'ऐतबार' मधे त्यांच्या पत्नीची भूमिका केली. 'ऐतबार' चित्रपट कसा मिळाला हे सांगतांना सुप्रिया सांगते की, तिचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट पहाण्यासाठी अमिताभ बच्चन आले होते. त्यांनीच सुप्रियाचे नाव 'ऐतबार' साठी सुचविले.

चित्रपटांच्या बरोबरीने 'तू तू मै मै', क्षितीज ये नही, शादी नंबर वन, कभी बिबी कभी जासूस; ह्या टि.व्ही. मालिकाही केल्या. मराठी चित्रपटसृष्टीत गाजविणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या सध्या हिंदीतील दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स’, एक नणंद की खुशियो की चाबी.. मेरी भाभी, ससुराल गेंदा फूल, कुछ रंग प्यार के एसे भी; यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली आहे.

सुप्रियाची स्टार प्लस वाहिनी वरील 'तू तू - मैं मैं' या कार्यक्रमामधे सुनेच्या भूमिकेसाठी चाहत्यांची विशेष दाद मिळाली. सुप्रियाने सचिनच्या साथीत 'नच बलिये' पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

सचिन पिळगावकर आणि ह्यांची जोडी 'रील लाईफ' मधून 'रियल लाईफ' मध्ये एकमेकांची साथीदार झाली.

सुप्रिया पिळगावकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेता डॉ. गिरीश ओक यांचा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९६० (नागपूर)

सुप्रसिद्ध अभिनेता डॉ. गिरीश ओक यांचा आज वाढदिवस.

गिरीश ओक व्यवसायाने खरे डॉक्टर आहेत. त्यांच्या कुटुंबाचा नाटकाशी तसुभरही संबंध नाही. ते स्वत:ही वयाच्या १७ वर्षांपर्यंत नाटकाच्या संपर्कात आले नव्हते. वैद्यकीय पदवी मिळविल्यानंतर त्यांनी नागपुरात रुग्णालय सुरू केले होते. यानंतर त्यांना वाटायला लागले की, हे आपले काम नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे. यामुळे ते अभिनय करायला मुंबईत गेले. अथक परिश्रम घेऊन उत्कृष्ट नाट्य व चित्रपट अभिनेते म्हणून लौकिक प्राप्त केला.

प्रभाकर पणशीकरांनी 'तो मी नव्हेच' हे नाटक एका उंचीवर नेऊन ठेवले होते. डॉ. गिरीश ओक या नाटकाबद्दल  म्हणतात, "तो मी नव्हेच, हे नाटक अजरामर करण्यात स्व. प्रभाकर पणशीकरांचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हा लखोबा लोखंडेची भूमिका करताना माझ्यावर बराच ताण आला होता. लखोबा लोखंडेच्या भूमिकेला न्याय देणे मला शक्य होईल का, याबाबतही थोडी धास्ती होती.

सुरवातीच्या प्रयोगानंतर माझ्या भूमिकेची तुलना पणशीकरांच्या भूमिकेशी करायचे. परंतु कालांतराने तुलना करण्याचे प्रमाण कमी झाले. 'तो मी नव्हेच' या नाटकाचे 'शिवधनुष्य' मला पेलवेल का, अशीही विचारणा झाली. परंतु केवळ 'शिवधनुष्य' उचलले नाही तर 'शिवधनुष्या'चे 'इंद्रधनुष्य' केले, अशा प्रतिक्रिया रसिकांनी माझ्याकडे व्यक्त' केलेल्या आहेत. याव्यतिरिक्त' आणखी काय हवे. 

हे नाटक गिरीश ओक यांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरले आहे. तसेच 'ती फुलराणी' मधील त्यांचे संस्मरणीय आहे. गिरिजा ओक या डॉ. गिरीश ओक यांच्या कन्या आहेत.

डॉ. गिरीश ओक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेता सचिन नि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचा वाढदिवस

************

प्रसिद्ध अभिनेते सचिन व अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर या दोाघांची जोडी 'क्युट कपल' म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्या दोघांचाही वाढदिवस १७ ऑगस्ट या एकाच दिवशी असतो.

१७ ऑगस्ट १९५७ साली जन्मलेेले सचिन पिळगवाकर गेल्या ५ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अश्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या आहेत. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या.

त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'गीत गाता चल' या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकों से आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.

आपल्या कारकिर्दीत सचिननं हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज मंडळींबरोबर काम केलं आहे. सचिन उर्दू भाषा आणि उच्चार शिकला थेट मीनाकुमारी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीकडून. अक्षरश एखाद्या मुलाची शिकवणी घ्यावी तशी मीनाकुमारी यांनी सचिनची शिकवणी घेतली. हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंद आणि विजय आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडून सचिनला खूप काही शिकायला मिळालं; तर "बैरागच्या निमित्तानं दिलीपकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

संजीवकुमार यांच्या बरोबरचा त्याचा स्नेह घट्ट होता अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यानी दोन तीन चित्रपटात काम केलं. सचिन यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट 'अष्टविनायकया चित्रपटात सचिनची भूमिका नास्तिक माणसाची आणि नायिका वंदना पंडित यांची भूमिका आस्तिक अशी होती. प्रत्यक्ष जीवनात बरोबर उलटं होतं. वंदना अगदी नास्तिक आणि सचिन आस्तिक आहेत. त्यांनी ''हाच माझा मार्ग' नावाने आपली आत्मकथा लिहिली आहे. सचिन यांनी आपली पत्नी सुप्रियाच्या साथीत 'नच बलिये' पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

१७ ऑगस्ट १९६७ साली जन्मलेल्या सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली.

सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नवऱ्याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटा दरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नवऱ्याला मिळाली. १९८५ साली सचिन सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.

माझा पती करोडपती, कुंकू, अशी ही बनवाबनवी; अश्या बऱ्याच चित्रपटात तसेच अत्यंत गाजलेल्या 'तू तू मै मै' टि.व्ही. मालिकेत सुप्रिया होती. 'नवरा माझा नवसाचा' ह्या चित्रपटानेही प्रेक्षकांची वहावा मिळवली. सचिन सुप्रिया ह्यांचे काम करतांना चित्रपटाच्या सेटवर संबंध अत्यंत व्यवसायिक आहे. बायको म्हणून सचिन सुप्रियाला गृहित धरत नाही. तसेच तिच्या सूचनांना प्राधान्य देतात. त्याउलट सुप्रियाला सचिन दिग्दर्शकाच्या भूमिकेत असतात तेव्हा निश्चिंत वाटते.

काही वर्षापूर्वी सुप्रियाने संजय छेलचा 'खुबसुरत' केला. त्याचबरोबर अमिताभ बच्चन बरोबर 'ऐतबार' मधे त्यांच्या पत्नीची भूमिका केली. 'ऐतबार' चित्रपट कसा मिळाला हे सांगतांना सुप्रिया सांगते की, तिचा 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट पहाण्यासाठी अमिताभ बच्चन आले होते. त्यांनीच सुप्रियाचे नाव 'ऐतबार' साठी सुचविले. चित्रपटांच्या बरोबरीने तू तू मै मै, क्षितीज ये नही, शादी नंबर वन, कभी बिबी कभी जासूस; ह्या टि.व्ही. मालिकाही केल्या.

मराठी चित्रपटसृष्टीत गाजविणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या सध्या हिंदीतील; दिल्ली वाली ठाकूर गर्ल्स, एक नणंद की खुशियो की चाबी.. मेरी भाभी, ससुराल गेंदा फूल, कुछ रंग प्यार के एसे भी; यांसारख्या मालिका मध्ये त्यांनी आईची भूमिका साकारली आहे. सुप्रियाची स्टार प्लस वाहिनी वरील 'तू तू - मैं मैं' या कार्यक्रमा मध्ये सुनेच्या भूमिकेसाठी चाहत्यांची विशेष दाद मिळाली. सुप्रियाने सचिनच्या साथीत 'नच बलिये' पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले.

सचिन पिळगावकर आणि ह्यांची जोडी 'रील लाईफ' मधून 'रियल लाईफ' मध्ये एकमेकांची साथीदार झाली.

सुप्रिया व सचिन पिळगवाकर या दांपत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

🌹 १७ ऑगस्ट 🌹

अभिनेत्री क्रांती रेडकर चा वाढदिवस

************

जन्म - १७ ऑगस्ट १९८२ (मुंबई)

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची आणि नृत्याची विशेष छाप पाडणारी अभिनेत्री क्रांती रेडकरचा आज वाढदिवस.

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री क्रांती रेडकरनं केवळ मराठीतच नाही तर हिंदी सिनेमांतही तिनं अभिनयाचा ठसा उमठवला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील 'जत्रा' सिनेमातील 'कोंबडी पळाली' हे गाणं प्रचंड हिट झालं होतं. तेव्हाच नाही तर हे गाणं आताही कुठे वाजलं की पाय थिरकायला लागतात. या धमाकेदार गाण्याची जादू आजही कायम आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात अभिनेता भरत जाधव आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केलेल्या डान्स स्टेप्स या प्रचंड प्रसिद्ध झाल्या होत्या.

क्रांती रेडकरने २००० मध्ये सून असावी अशीया चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश चौधरी या चित्रपटाचा नायक होता. फक्त लढ म्हणा, शहाणपण देगा देवा, ऑन ड्युटी २४ तास, पिपाणी, खो खो, मर्डर मेस्त्री, कुणी घर देता का घर, करार; हे तिचे उल्लेखनीय चित्रपट.

कांकणया चित्रपटाचे तिने दिग्दर्शनही केले होते. प्रकाश झा यांच्या गंगाजलचित्रपटा मध्ये तिने छोटी व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच चित्तोड की महारानीआणि सिम्प्ली सपनेया मालिका मध्येही ती झळकली होती.

काकणया हद्यस्पर्शी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळून तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. डान्स आणि अभिनया व्यतिरिक्त क्रांती प्रथमच झी युवावरील 'मैफिल' या सांगितिक कार्यक्रमात सुत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसली आहे.

२०१७ मध्ये क्रांती रेडकरने समीर वानखडे या कर्तव्यनिष्ठ आयपीएस अधिकाऱ्या सोबत लग्न केले आहे. त्यानंतर २०१८ मध्ये तिनं दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. झिया आणि झायदा ही क्रांतीच्या जुळ्या मुलींची नावं आहेत. या दोघींच्या नावावरून तिनं कपड्याचा ब्रॅंड देखील लॉन्च केला आहे.

लॉकडाऊन च्या काळात क्रांती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. गप्पा-गोष्टी आणि संगीताचा समावेश असलेल्या अनोख्या मैफिलया टीव्ही रिअ‍ॅलिटी शोचं सूत्रसंचालन केलं आहे.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

१७ ऑगस्ट (१९०९): क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

घटना

१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले.

१८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली.

१९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.

१९५३: नार्कोटिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली.

१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली.

१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान अपघातात ठार झाले.

१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान.

१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४ रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.

२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले.

जन्म

१७६१: अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पं. विल्यम केरी यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १८३४)

१८४४: इथियोपियाचा सम्राट मेनेलेक (दुसरा) यांचा जन्म.

१८६६: हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खान यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९११)

१८८८: श्री शिवाजी मराठा हायस्कूल पुणे चे संस्थापक बाबूराव जगताप यांचा जन्म.

१८९३: हॉलीवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका मे वेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९८०)

१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४)

१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५)

१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म.

१९३२: नोबेल पारितोषिक विजेते त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म.

१९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी एलिसन यांचा जन्म.

१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्म.

१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर यांचा जन्म.

१९७२: बांगला देशचा क्रिकेटपटू हबीब उल बशर यांचा जन्म.

मृत्यू

१३०४: जपानी सम्राट गोफुकाकुसा यांचे निधन.

१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८)

१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली (जन्म: १८ फेब्रुवारी १८८३)

१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम केन्डॉल यांचे निधन.

१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद झिया उल हक यांचे

No comments:

Post a Comment