# दैवत छत्रपती.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:


 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:

जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा सर्वस्व बलिदान करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे म्हणजेच छत्रपती शिवाजीमहाराज 🚩

# दैवत छत्रपती...🚩

 

#शिवविचार_प्रतिष्ठान

#शिवरायांचेअपरिचितमावळे_

#मावळेस्वराज्याचेवैभवमहाराष्ट्राचे👑🧡

चला इतिहास वाचूया

सरदार मानसिंगराव खलाटे जन्म = अज्ञात

मृत्यु = अज्ञात

१७ व्या शतकाच्या मध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मुघलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्र्रावर आक्रमण केले.  छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी राजे हे महाराष्ट्र्राचे राजे झाले. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना छत्रपती संभाजी राजांनी मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. छत्रपती संभाजी राजे एकही किल्ला किंवा प्रदेश हरले नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर छत्रपती संभाजी राजांची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व छत्रपती संभाजी राजांचे धाकटे भाऊ छत्रपती राजाराम राजे यांनी केले. सातारा मराठ्यांची नवी राजधानी झाली. अगदी छत्रपती शिवाजी राजांपासून सातारा भागातील लढवय्या घराण्यांनी भोसले घराण्याची एकनिष्ठेने सेवा केली आहे . त्या मध्ये निकम , बरगे, , खलाटे, फडतरे, काळे, जाधव, चव्हाण , बोधे , साबळे, महाडिक,फाळके, भोईटे,पवार, कदम, माने , शिंदे , वाघमोडे , सावंत, पिसाळ, पांढरे, धायगुडे, गायकवाड,.गाढवे, घाडगे ,काटे या सरदारांनी खूप पराक्रम केला आहे. परंतु त्यांचे बाबतीत फार काही लिखाण झाले नाही. परंतु तत्कालीन कागद पत्रामधून, लढायचे वर्णानातून त्यांची माहिती मिळते .

त्यामध्ये खलाटे घराण्याचा उल्लेख करावा लागतो. बरगे, साबळे, खलाटे, कंक हे मुळचे निकम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मातब्बर सरदार येसाजी, कृष्णाजी कंक हे हि मुळचे निकम घराण्यातील आहेत. निकम हेही निकुंभ या राजस्थानातील राजपूत घराण्याचे वंशज आहेत. परंतु मुस्लिम आक्रमकमुळे ते दक्षिणेत आले. तेथे विजयनगर या हिंदू राज्यात पराक्रम गाजविला .परंतु तेही राज्य संपले नंतर विजयपूर (विजापूर ) येथे आदिलशाहची चाकरी केली. आपल्या क्षत्रिय व लढाऊ बान्यामुळे तेथे हि पराक्रम गाजविला. विशेष म्हणजे निकम हे छत्रपती शहाजी राजे यांच्या सेनेत पराक्रमी फौज म्हणून प्रसिद्ध होते . नंतर च्या काळात हे निकम पश्चिम महाराष्ट्र भागात स्वराज्यात सामील झाले . आपल्या अतुलनीय पराक्रमाने शौर्य दाखविले .याच निकम चे काही कारणास्तव पडनाव खलाटे झाले .छत्रपती शिवाजी महाराजांन नंतर छत्रपती शाहू महाराज , पेशवा काळात बहुतेक सर्व लढ्यात खलाटे सरदारचा उल्लेख आहे. युद्धाच्या अगोदर छत्रपती शाहू महाराज सातारा भागातील मराठा सरदार यांना फर्माने काढीत . त्या मध्ये सातारा भागातील मराठा सरदार यांना तयार राहण्याचा आदेश दिला जायचा .त्या मध्ये खलाटे चा उल्लेख दिसतो . पानिपत, खर्ड्या ची लढाई मध्ये बराच पराक्रम गाजवला आहे.

 

 

इतिहासात या घराण्यातील दहा सरदारांचा उल्लेख आढळतो. त्यातील पराक्रमी सरदार म्हणून मानसिंग खलाटे यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल .

 

सरदार मानसिंगराव खलाटे

हे छत्रपती शाहू महाराज यांच्या समकालीन होते .यांचा सातारा दरबारात बराच दबदबा होता , परंतु काही कारणास्तव त्यांना रायगड येथे १७८३ मध्ये कैदेत राहावे लागले. ही व्यक्ती बडी असामी होती म्हणून त्यांच्या तैनातीला एक माणूस सरकारातून पगार देऊन ठेवावा लागला, अशी पेशवे दफ्तरात नोंद आहे . नंतर त्यांची सुटका केली गेली. युद्धात सातारा महाराजान तर्फे सैन्य भाग घायचे . खरड्याची लढाई हि इतिहासातील प्रसिद्ध लढाई आहे. हैदराबाद चा निजाम व मराठ्यांमध्ये १७९५ साली हि लढाई झाली होती. त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता.याच मातब्बर सरदाराने खर्ड्या च्या लढाईत सातारा महाराजांन तर्फे इतर सरदारांच्या बरोबर भाग घेतला आणि मोठा पराक्रम गाजविला . खर्ड्याच्या पोवाड्या मध्ये याचा उल्लेख आहे. खलाटेंना कुंठे (फलटण) , लाठे , शिरीस्णे (बारामती) येथे पाटीलकी मिळाली. तसेच सातारा महाराजांन तर्फे बऱ्याच जमिनी इनामात मिळाल्या.

 

समाधी स्थळ= अज्ञात

 

 

 

माहिती स्रोत।      :- *#Team_शिवविचार_प्रतिष्ठान

माहिती संकलन :- ओमकार पवार

 

धन्यवाद बंधू अशोक कदम आपण आपल्या मित्रांना ग्रूप मध्ये सहभागी करून घेतले तसेच आपला इतिहास प्रसारित करण्यात मदत केली जय शिवराय️🚩

 

पेटविली रणांगने देह

झिजविला मातिसाठी...!!!

मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक

जातीसाठी..शिवशंभूंची मरूनहि हे स्वराज्य राखण्याची साद आहे...म्हणूनच लाखो करोडो मावळा येथे

महाराजांवर हसतहसत कुर्बान आहे

 

सरसेनापती हंबीरराव मोहिते

 

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे स्वराज्याचे कर्तबगार , महापराक्रमी सरसेनापती हंबीरराव मोहिते !

 

स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींच्या प्रती निष्ठावान असलेल्या हंबीररावांनी मोठा पराक्रम गाजवून इतिहास इतिहासात आपलं नाव अजरामर केलं. शिवरायांच्या दुसऱ्या पत्नी राणी सोयराबाई यांचे भाऊ आणि भद्रकाली ताराराणी यांचे वडील असलेल्या हंबीररावांचे छत्रपती घराण्याशी जवळचे संबंध होते.

हंबीरराव यांचा जन्म साताऱ्यातील कराड मधील तळबीड या गावी झाला.

स्वराज्य स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. पुढे ते कर्नाटकात गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई ह्यांचा विवाह शिवरायांशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळं छत्रपती घराण्याशी त्यांचे घराणे जवळचे झाले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब दिला होता. तेव्हापासून त्यांना हंबीरराव म्हणून ओळखले जाते. सरसेनापती प्रतापराव गुजर यांना बहलोल खानाशी लढताना २४ फेब्रुवारी १६७४ रोजी निधन पावल्याने हे हंबीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली. ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हंबीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर वेगाने हल्ला केला. त्यावेळी सैन्याला विजापुरापर्यंत पिटाळून लावण्याचे मोठे काम हंबीररावांनी केले होते. नेहमी सत्याची बाजू घेणे आणि सत्यासाठी झुंजने हा त्याचा मोठा गुण.प्रत्येक वेळी स्वतः मोठी उडी घेऊन स्वराज्य आबादीत राखण्याचे काम हंबीरराव नेहमी करत असत. शंभुराजे हे तसे त्यांचे सावत्र भाच्चे पण त्यांना कधी सावत्र पणा जाणवू दिला नाही. नेहमी त्यांच्या पाठशी खंबीरपणे राहिले. शिवरायांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर मुघल सुभेदार दिलेरखान बहादूर खान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हंबीररावांना दिला. ही स्वारी त्यांनी यशस्वी पणे पेलली. त्यानंतर खानदेशातील मुघलांच्या खानदेश , बागलाण , गुजरात , बऱ्हाणपूर , वऱ्हाड , माहुड पर्यंत प्रदेशात खूप धुमाकूळ घातला. इसवी सन १६७६ हंबीररावांनी कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार मियान हुसेनखान यांचा येलबुर्गा येथे मोठ्या प्रमाणात पाडाव करून तिथल्या रयतेची जुलूमातून मुक्तता केली.

प्रतापगडावर भवानी मंदिरात एक तलवार आहे जिच्यावर सहा चिरे आहेत ती तलवार असा समज जनमानसात आहे की ती तलवार हंबीरराव किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते यांची तलवार तलवार आहे ती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत ते बऱ्याच मोहिमेत होते त्यातली महत्वाची मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय या मोहिमेत प्रत्यक्ष छत्रपतींच्या साथीने त्यांनी हा विजय मिळवला होता. त्याचबरोबर ज्यावेळी शंभुराजे उत्तर विजयाचे धैय बाळगून दिलेरखानाकडे गेले होते तेव्हा त्यांना तिकडून परत स्वराज्यात किल्ले पन्हाळ्यावर सहीसलामत आणण्यात देखील महत्वाचा वाटा हा हंबीरराव यांचाच आहे. त्यानंतरचे काही दिवस ते पन्हाळ्यावरच होते शिवशंभु भेट हा अनुभव देखील त्यांनी त्यांच्या डोळ्या देखत घेतला.

त्यानंतर काही दिवसातच छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुःखद निधन झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा ती खबर त्यांना कळली तेव्हा त्यांना खूप हळहळ वाटली कारण स्वराज्याप्रतिची निष्ठा कमालीची होती त्यांची. खरंतर नात्याने बघायला गेलं तर महाराज मोहिते घराण्याचे जावई आणि आपल्या बहिणीच विनाकुंकुवाच कपाळ त्यांना बघायला मिळन खरंच किती वाईट गोष्ट आहे.

त्यावेळी युवराज शंभुराजेंना छत्रपती पदावर न बसविता काही मंत्रांनी राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले. त्यानंतर त्यांनी शंभुराजेंविरुद्ध कारवाया सुरू केल्या होत्या. त्यावेळी हंबीररावांना सोयरा मातोश्रींच्या निरोपाने पत्र पाठविण्यात आले की अनाजीपंत आणि काही मात्तबर सरदार शंभुराजें स्वराज्यद्रोही आहेत आणि त्यामुळे त्यांना कैद करण्यासाठी येते आहेत त्यांना तुम्ही मदत करा स्वराज्य निष्ठा दाखवा. त्याचबरोबर अनाजीपंत तिथे जाऊन त्यांना तुमचा भाच्चा राजगादीवर बसेल तुमची बहीण राजमाता आहे असे आमिष दाखवून त्यांना शंभुराजेंविरुद्ध भडकविण्याचे काम केले.

इकडे पन्हाळ्यावर शंभुराजेंना ही खबर मिळाली तेव्हा त्यांनी सर्व किल्लेदार व अधिकाऱ्यांना आज्ञापत्र पाठविले. हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांना मिळाले होते. हंबीररावांनी युवराज शंभुराजेंचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला कारण त्यांना शंभुराजेंचे सामर्थ्य माहीत होते. तेव्हा त्यांनी शंभुराजेंप्रति निष्ठा दाखवली आणि सर्वांना शंभूराजे छत्रपती होणं त्यावेळी किती गरजेचं आहे हे पटवून दिले.

 

युवराज शंभुराजेंच्या राज्याभिषेकावेळी महाराज्यांनी त्यांना पुन्हा सरनोबत पद दिले. त्यानंतर शंभुराजेंच्या आदेशावरून त्यांनी विविध आघाड्यांवर आपला पराक्रम गाजवला. राज्याभिषेकानंतर ज्या पद्धतीने बऱ्याच मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांचा महत्वाचा सहभाग होता त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजेंच्या बरोबर सुद्धा हंबीररावांचा मोठा व महत्वाचा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वडिलांसमान शंभूराजे कोणाला मानत असतील तर ते होते हंबीरमामा. मामा ची ऊब वडिलांची साथ आणि मावळ्यांची जिगर या सर्व गोष्टी हंबीररावांमध्ये उत्तम प्रकारे होत्या त्यामुळेच ते इतक्या वेगवेगळ्या भूमिका चोख पणे लीलया पार पाडत होते.

त्यामधील सर्वात महत्वाची घटना म्हणजे बऱ्हाणपूरच्या विजयात मिळवलेली लूट होय. या विजयामुळे मुघली सैन्याची खूप नाचक्की झाली.

त्यानंतर शंभुराजेंच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून कुलीचखान याला पिटाळून लावण्यात त्यांनी मोठी शर्थ केली त्याचबरोबर पन्हाळा परिसरातून शहजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी यशस्वी प्रयत्न केला हा प्रयत्न खूप महत्त्वाचा ठरला. यानंतर शहाबुद्दीन खान / गाजी उद्दीखान बहादूर हा मुघल सरदार याच्यावर हंबीररावांनी केलेली केलेली स्वारी खूप महत्त्वाची होती.रामशेज किल्ल्याला जेव्हा वेढा दिला तेव्हा हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला यावेळी ते थोडेसे जखमी झाले. इसवीसन १६८७ मध्ये रायगडजवळ हंबीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर झालेल्या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

हंबीर मामाच्या आयुष्यातील सर्वात शेवटची पण महत्वाची लढाई ठरली ती म्हणजे वाईजवळ झालेली लढाई. या लढाईत हंबीररावांनी सर्जाखानाचा पराभव केला पण याच चकमकीत त्यांना तोफेचा गोळा लागला आणि त्यातच त्यांचं दिनांक १६ डिसेंबर १६८७ रोजी दुर्दैवी निधन झाले.

अश्या स्वराज्यासाठी कायम लढायला तत्पर असणाऱ्या , निधड्या छातीने संकटांवर मात करून कठीण प्रसंगांना सामोरे जाणारे , छत्रपतींच्या गादीशी शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठावंत असणारे हंबीरराव यांची समाधी त्यांच्या जन्मगावी म्हणजेच तळबीड कऱ्हाड सातारा येथे आहे.

ज्याची तलवार खंबीर त्यो हा हंबीर

स्वराज्याची समशेर असलेले महान मावळे हंबीररावांना ३३३ व्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा !!

 

रायगडाच्या कुशीत

शिवरायांच्या मुशीत घासुन लखलखलेले पात म्हणजे हंबीरमामा

 

        सुचेता जयश्री विज

No comments:

Post a Comment