|
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
|
आदर्श परिपाठ |
|
शिक्षक विचार मंच पुणे |
|
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने बरेज विद्यार्थी घरी
आहोत वर्ग ,शाळा
कांही प्रमाणात बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर
मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही विनंती.
|
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🌄 आदर्श परिपाठ 🌄. 📚 संकल्पना/संकलन📚.
श्री .घोडके संजय सर.
|
|
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■ |
|
आज दिनांक: ३०/०७/२०२१. वार:शुक्रवार महिना :आषाढ-
कृष्णपक्ष सप्तमी.
नक्षत्र :रेवती. योग:र्धूती,करण:विष्टी.
सूर्योदय:०६.१५,सूर्यास्त:०७.१५. ■■■■■■■■■■■■■ |
|
सुविचार:आपले प्रत्येक कृत्य हे आयुष्यातील
शेवटचे कृत्य आहे असे समजून वागत जा! |
|
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
|
|
प्रतिज्ञा |
|
📜 भारताचे
संविधान |
|
📚. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆======= 🙏 जय
शारदे वागीश्वरी🙏
|
|
जय
शारदे वागीश्वरी |
|
विधिकन्यके विद्याधरी |
|
ज्योत्स्नेपरी कांती तुझी,
मुख रम्य शारद चंद्रमा |
|
उजळे तुझ्या हास्यांतुनी चारी युगांची
पौर्णिमा |
|
तुझिया कृपेचे चांदणे नित् वर्षु दे अमुच्या
शिरी |
|
वीणेवरी फिरता तुझी चतुरा कलामय अंगुली |
|
संगीत जन्मा ये नवे, जडता
मतिची भंगली |
|
उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी।
|
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ 👩💻 बोधकथा 👨💻. _________ 🛑 सिहांची
गुणवत्ता 🛑
|
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून
खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो
त्यास म्हणतो, "अरे सिंहा, "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे
ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा, "तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी
पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या
तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही
तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा
एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास
टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारुन
म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ
नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या
सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे
ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग
करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला. |
|
तात्पर्य
:लोचटपणा करून उठवणाऱ्या माणसाचा लोकांस कंटाळा येतो.पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत,त्यांचा
परामर्श लोक आपणहून घेतात. |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
🎼 समूहगीत🎼 |
|
|
|
💫 आई
तुझ्याच पायी मजला सुखे मरू दे.
_________ |
|
आई तुझ्याच पायी मजला सुखे मरु दे |
|
यश माप हे भरु दे॥धृ॥ |
|
कसली विलोभने ही |
|
दिसतील ठायि ठायी |
|
उडवीन ठोकरीने |
|
तव साउली असु दे ॥१॥ |
|
तव पुत्र कोटि कोटी |
|
परि भाग्य ना ललाटी |
|
जाणीव जाळिते ही |
|
रजनी तरी जळू दे॥२॥ |
|
निज संपदा घराला |
|
येता फिरुन तिजला |
|
पद दोन टाकण्याते |
|
मम देह हा असु दे॥३॥ |
|
उधळीन प्राण माझे |
|
चरणास रक्त ताजे |
|
हसरा मुखेंदु आई |
|
मम लोचनी असू दे॥४॥ |
|
समरी ध्वजा चढावी |
|
गगनी उषा हसावी |
|
जयनाद होउनीया |
|
श्रवणी तुझ्या पडू दे॥५॥
_______ 🎰 दिनविशेष🎰. |
|
|
|
महत्त्वाच्या घटना: |
|
◆१९९७ : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना ’राजीव
गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार’
जाहीर |
|
◆१९६२ : ’ट्रान्स कॅनडा हायवे’ हा
सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय
महामार्ग सुरू झाला. |
|
◆१९३० : पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला. |
|
◆१८९८ : विल्यम केलॉग याने ’कॉर्नफ्लेक्स’ विकसित
केले. |
|
◆१६२९ : इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात
सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले. |
|
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
|
●१९७३ : सोनू
निगम – पार्श्वगायक |
|
◆१९४७ : अर्नोल्ड श्वार्झनेगर – जन्माने
ऑस्ट्रियन असलेले अमेरिकन शरीरसौष्ठवपटू, अभिनेते आणि
कॅलिफोर्नियाचे ३८ वे राज्यपाल |
|
●१८६३ : हेन्री
फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक |
|
●१८५५ : जॉर्ज
विलहेम फॉन सिमेन्स – जर्मन उद्योगपती |
|
●१८१८ : एमिली
ब्राँट – इंग्लिश लेखिका |
|
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
|
■२०११ : डॉ. अशोक रानडे – संगीत
समीक्षक |
|
■१९९५ : डॉ. विनायक महादेव तथा ’वि.
म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन
स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी
इन इंडिया’ हे पुस्तक गाजले. |
|
■१९९४ : शंकर पाटील – साहित्यिक, चित्रपट
कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय
चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे
संपादक. त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे
पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे
कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट
रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या
कादंबर्या हे गाजलेले साहित्य आहे. |
|
■१९८३ : वसंतराव देशपांडे – शास्त्रीय
व नाट्यसंगीत गायक. |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण
मंत्री कोण आहेत? २)'नाचत येईना
अंगण वाकडे' ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?
३) फळे पिकवण्यासाठी कोणत्या वायूचा
वापर केला जातो?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक
घडामोडी |
|
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
|
■ परीक्षा केंद्र निवडताना विद्यार्थ्यांचा
होतोय घोळ;मार्गदर्शक सूचना नसल्याने शिक्षक
हतबल-अकरावी सीईटी |
|
■ टीईटी परीक्षेसाठी करा ३ ऑगस्ट पासून अर्ज |
|
■ शाळांची १५% पेक्षा अधिक शुल्क कपात करणे
आवश्यक-संघटनांची मागणी |
|
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच
पुणे. ======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment