══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार
मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक ,आज
कोरोना कहर
असल्याने सर्वच
आपण घरी
आहोत वर्ग
,शाळा बंद
आहेत पण
शिक्षण सुरू
आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर
मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे
त्याचे वाचन
करावे ही
विनंती .
________.
🌄 परिपाठ 🌄.
_________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके
संजय सर. 📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. |
आज दिनांक: ०६/०९/२०२१. वार: सोमवार ,
महिना :भाद्रपद,कृष्ण पक्ष.चतृर्दशी/अमावस्या.
नक्षत्र :मघा.
योग:शिव, |
करण:चतुष्पाद.
सूर्योदय:०६.१५,सूर्यास्त:०६.४९. ■■■■■■■■■■■■■■. |
सुविचार: जो
गुरुला वंदन
करतो; त्याला आभाळाची उंची
लाभते. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
|
प्रतिज्ञा |
📜 भारताचे संविधान 📚. 🙏 प्रार्थना 🙏.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना🙏
"सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या
अभिवादना |
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना |
सुमनात तू,
गगनात तू |
तार्यांमध्ये फुलतोस तू |
सद्धर्म जे
जगतामध्ये |
त्यांच्या मध्ये
वसतोस तू |
चोहीकडे रूपें
तुझी जाणीव
ही माझ्या मना |
श्रमतोस तू
शेतांमध्ये |
तू राबसी
श्रमिकांसवे |
जे रंजले
अन् गांजले |
पुसतोस त्यांची आसवें |
स्वार्थाविना सेवा
जिथे, तेथे
तुझे पद
पावना |
न्यायार्थ जे
लढती रणीं |
तलवार तू
त्यांच्या करीं |
ध्येयार्थ जे
तमीं चालती |
तू दीप
त्यांच्या अंतरी |
ज्ञानार्थ जे
तपती मुनी,
होतोस त्या
तू साधना |
करुणाकरा, करुणा
तुझी |
असता मला
भय कोठले
? |
मार्गावरी पुढती
सदा |
पाहीन मी
तव पाउलें |
सृजनत्व या
हृदयामध्ये नित
जागवी भीतीविना" ◆=========◆========. |
आजची बोधकथा
👩💻 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको
👨💻.
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एकदा एक
राजहंस एका
बगळय़ाला म्हणाला, 'काय रे,
तू आधाशी!
पाण्यातला कोणताही प्राणी खायला
तू मागे-पुढे पाहात
नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा
फरकसुद्धा तुझ्या खादाड जिभेला समजत नाही.
माझे पाहा,
मी फक्त
पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू
तेवढे खाईन,
दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार
नाही.' त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा असणे बरे
नव्हे. ज्यावेळी जे मिळेल
ते खावे
अन् सुखी
राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला
की, तो
खावा हेच
शहाणपणाचे.' असे
म्हणून बगळा
उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे
कडेला एक
मासा दिसला.
तेव्हा विचार
न करता
त्याने तो
एकदम गिळला,
पण आत
असलेला गळ
घशाला लागून
तो जिवास
मुकला. राजहंस आपले आवडते
खाणे खाण्यासाठी दुसर्या
कमळे असलेल्या तळय़ात गेला,
पण तेथे
हंस धरण्यासाठी जाळे लावले
होते. त्यात
तो सापडला. |
तात्पर्य : - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼
💫 आव्हान द्यावया आम्हा
कुणाची छाती. आव्हान द्यावया आम्हा कुणाची छाती |
दश दिशांत अमुच्या सामर्थ्याची ख्याती॥धृ॥ |
कैलासी अजुनी
जागा तांडव
राग |
सागरी धगधगे
वडवाग्नीची आग |
मंत्रात शांतिच्या इथे जागते
क्रांती॥१॥ |
नगराज हिमालय उन्नत अमुचा
माथा |
इतिहास गातसे
पुरुषार्थाची गाथा |
प्रसवते वीरता
कण कण
इथली माती॥२॥ |
आसेतु हिमचल
एक आमुचा
देश |
ही एक
संस्कृती एकच
दे संदेश |
भारतीय रुधिरें जडली अमुची
नाती॥३॥ |
सुकोमल आणि
कठिण वज्रही आम्ही |
खलसंहारस्तव होऊ
रुद्रहि आम्ही |
खड् गापरि
कणखर इथे
तृणांची पाती॥४॥ |
ही असे
अनादी अनंत
अमुची माता |
हो धन्य
वेदही हिचीच
महती गाता |
जगजननीची या
किर्ति देवही
गाती॥५॥
_________. |
🎰 दिनविशेष🎰.
_________ |
बैल पोळा |
भारत हा
शेतीप्रधान देश
आहे. पारंपारिक पध्दतीने शेतीसाठी बैलाची अनमोल
मदत घेतली
जाते. बैल
वर्षभर शेतात
राबत असतो.
त्याच्या कष्टामुळे धनधान्य मिळते.
त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व त्याने केलेल्या कष्टाचे स्मरण व्हावे म्हणून वर्षातून एक दिवस
बैलपोळा साजरा
केला जातो.
सर्वसाधारणपणे हा
सण शेतकरी साजरा करतात.
या दिवशी
शेतकरी बैलांना अंघोळ घालून
सजवतात. शिंगाना बेगड लावतात. पाठीवर झूल
घालून सजवतात. बैलांना वाजत
गाजत मारूतीच्या दर्शनाला नेतात.
त्या दिवशी
बैलांना पूर्ण
विश्रांती देतात.
संध्याकाळी बैल
वाजत गाजत
आले की
त्यांची पूजा
करतात व त्यांना पुरणपोळी खायला देतात. |
ज्यांचा शेती
हा व्यवसाय नाही ते
लोक या
दिवशी मातीच्या बैलाच्या मूर्ती विकत आणून
पाटावर गहू
पसरून त्यावर बैल मांडून त्यांची पूजा
करतात. जेवणात पुरणपोळी हे
प्रमुख पक्वान्न केले जाते. |
◆=========◆========. |
महत्त्वाच्या घटना: |
◆१५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे
जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज
स्पेनला पोहोचले. |
◆१९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली. |
◆१९६८: स्वाझीलँड हा देश
स्वतंत्र झाला. |
◆१९९३: ज्येष्ठ कवी विंदा
करंदीकर यांची
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड. |
जन्मदिवस / जयंती
/ वाढदिवस: |
●१८८९:
स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे
वडील बंधू
बॅ. शरदचंद्र बोस यांचा
जन्म. |
●१८९२:
नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर
एडवर्ड ऍपलटन
यांचा जन्म. |
●१९०१:
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत
तथा कमलाबाई रघुनाथ गोखले
यांचा जन्म.
|
●१९२१:
बार-कोड
चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ
व्हाउडलँड यांचा
जन्म. |
●१९२३:
युगोस्लाव्हियाचे राजा
पीटर (दुसरा)
यांचा जन्म. |
●१९२९:
हिंदी चित्रपट निर्माते यश
जोहर यांचा
जन्म. |
●१९७१:
भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा
जन्म. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
■१९३८: नोबेल
पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक
सली प्रुडहॉम यांचे निधन. |
■१९६३: कन्नड
कवी व श्रेष्ठ भाषा
संशोधक मंजेश्वर गोविंद पै
यांचे निधन.
|
■१९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ
यांचे निधन. |
■१९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर
लिओनार्ड तथा
लेन हटन
यांचे निधन. |
■२००७: इटालियन ऑपेरा गायक
लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके
यांना कोणत्या कारागृहात ठेवले
होते ?
२)स्वामी विवेकानंदाणी "रामकृष्ण मिशनची" स्थापना कुठे केली
होती?
३)भारतातील सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू आणि गुटखा
यांच्या सेवणावर बंदी करणारे पहिले राज्य
कोणते? |
उत्तरे:(१.एडन,२.कोलकाता,३.महाराष्ट्र.)
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
▪️ राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त देशातील 44 शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते
राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव.
शिक्षकांनी मारले
नसते, तर
मी कधीच
भाषण द्यायला शिकलो नसतो,
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितली शाळेतील आठवण. |
■ शिक्षक ही
नोकरी नसून
सेवा आहे
- आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते बालाजी जाधव यांचे
प्रतिपादन. |
■ विविध सामाजिक शैक्षणिक संघटनेने केला गुणवंत शिक्षक गौरव
समारंभ साजरा |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन
:.
घोडके संजय
सर. मो.९७३७१११२७७.
======★■◆●====== |
No comments:
Post a Comment