══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
आदर्श परिपाठ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण ,काही
प्रमाणात शिक्षण सुरू आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ
पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही विनंती .
________
🌄 परिपाठ
🌄. _________ 👨💻 संकल्पना/संकलन ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■ |
आज दिनांक: २/०८/२०२१. वार: सोमवार . महिना :आषाढ
कृष्णपक्ष नवमी.
नक्षत्र : कृत्तिका.
योग:
वृद्धी, |
करण:वणिज.
सूर्योदय:०६.१६,सूर्यास्त:०७.१८. ■■■■■■■■■■■■■ |
सुविचार:मित्र परिसासारखे असावेत म्हणजे
आयुष्याचं सोनं होतं. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮. |
प्रतिज्ञा |
📜 भारताचे
संविधान 📚. 🙏 प्रार्थना 🙏.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना🙏 |
"सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना |
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या
ने जीवना |
सुमनात तू, गगनात
तू |
तार्यांमध्ये फुलतोस तू |
सद्धर्म जे जगतामध्ये |
त्यांच्या मध्ये वसतोस तू |
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना |
श्रमतोस तू शेतांमध्ये |
तू राबसी श्रमिकांसवे |
जे रंजले अन् गांजले |
पुसतोस त्यांची आसवें_ |
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे
तुझे पद पावना |
न्यायार्थ जे लढती रणीं |
तलवार तू त्यांच्या करीं |
ध्येयार्थ जे तमीं चालती |
तू दीप त्यांच्या अंतरी |
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस
त्या तू साधना |
करुणाकरा, करुणा
तुझी |
असता मला भय कोठले ?_ |
मार्गावरी पुढती सदा |
पाहीन मी तव पाउलें |
सृजनत्व या हृदयामध्ये नित |
जागवी भीतीविना" ◆=========◆======= आजची बोधकथा 👩💻कष्टाशिवाय
फळ नाही👨💻.
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका
गावात एक गरीब पंडित राहत होता. सर्व काही नशिबानेच मिळते असा त्याचा समज होता.
जेंव्हा त्याचा मुलगा त्याला गरीबीबद्दल विचारायचा तेंव्हा तो त्याला सांगायचा
कि, "बाबारे ! हा सर्व नशिबाचा खेळ आहे." एके
दिवशी हाच प्रश्न त्याच्या मुलाने गावाच्या मंदिरातील पुजाऱ्याला विचारला.
पुजाऱ्याने त्याला दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांसोबत येण्यास सांगितले. जेंव्हा
दोघेही पुजाऱ्याकडे गेले तेंव्हा पुजाऱ्याने मुलाच्या हातावरील रेषा पाहून
म्हंटले, "पंडितजी! आपला पुत्र फारच भाग्यशाली आहे.
परंतु याच्यावर एका ग्रहाचा कोप आहे. एक अनुष्ठान करण्याने तो कुप्रभाव नष्ट
होईल." यावर पंडितजींनी विचारले,''आम्हाला काय करावे लागेल.?" पुजारी म्हणाला,"तुम्ही
दोघांनी मिळून आश्रमाच्या अंगणात एक विहीर खोदा म्हणजे ग्रहाचा वाईट प्रभाव कमी
होईल." पिता-पुत्र विहीर खोदण्याच्या कामाला लागले. अनेक दिवसांच्या
परिश्रमानंतर त्यांना त्या खड्ड्यात एक घागर दिसू लागली. त्यांनी ती घागर
पुजाऱ्याकडे नेली. पुजाऱ्याने घागरीवर बांधलेला कपडा काढला. तेंव्हा त्यात
सोन्याच्या मुद्रा दिसू लागल्या आणि त्यात एक चिठीही दिसू लागली. ती चिट्ठी
हातात घेवून त्या मुद्रा पंडितजींना देत पुजारी म्हणाला,"हे
आपल्या भाग्यात नाही." हे ऐकून पुत्राने पंडितजींना विचारले,"भाग्य
काय असते? हे आपण सांगितले नाही." पुजाऱ्याने ती
चिट्ठी त्याला दिली, त्यात लिहिले होते,"भाग्याचेच
दुसरे नाव कर्म आहे. आता पंडितजींच्या लक्षात आले कि, आपोआप
काही घडत नाही तर कर्म केल्याने भाग्य साथ देते. |
तात्पर्य - अकर्मण्यता दुर्भाग्याला आमंत्रण
देत असते आणि कर्मातुनच भाग्य खुलते. (थोडक्यात काय कष्टाशिवाय फळ मिळत नाही हेच
खरे!!) |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼
💫 आव्हान
द्यावया आम्हा कुणाची छाती. आव्हान द्यावया आम्हा कुणाची छाती |
दश दिशांत अमुच्या सामर्थ्याची ख्याती॥धृ॥ |
कैलासी अजुनी जागा तांडव राग |
सागरी धगधगे वडवाग्नीची आग |
मंत्रात शांतिच्या इथे जागते क्रांती॥१॥ |
नगराज हिमालय उन्नत अमुचा माथा |
इतिहास गातसे पुरुषार्थाची गाथा |
प्रसवते वीरता कण कण इथली माती॥२॥ |
आसेतु हिमचल एक आमुचा देश |
ही एक संस्कृती एकच दे संदेश |
भारतीय रुधिरें जडली अमुची नाती॥३॥ |
सुकोमल आणि कठिण वज्रही आम्ही |
खलसंहारस्तव होऊ रुद्रहि आम्ही |
खड् गापरि कणखर इथे तृणांची पाती॥४॥ |
ही असे अनादी अनंत अमुची माता |
हो धन्य वेदही हिचीच महती गाता |
जगजननीची या किर्ति देवही गाती॥५॥
________ 🎰 दिनविशेष🎰. |
◆=========◆======= |
|
महत्त्वाच्या घटना: |
●१६७७:
शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच
प्रतिनिधींशी बोलणी केली. |
●१९५४:
दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला. |
●१९७९:
नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्नीला मॅगसेसे पुरस्कार
जाहीर केला. |
●१९९६:
अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या
शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून
ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
●१८६१:
भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी
चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. |
●१८७६:
भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म. |
●●१९१०:
कादंबरीकार, नाटककार, कवी
आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८) |
●१९१८:
आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू
वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म. |
●१९४१:
नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन यांचा जन्म. |
●१९४५:
भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म. |
●१९५८:
भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब यांचा जन्म |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
●१५८९:
फ्रान्सचा राजा हेन्री (तिसरा) यांचे निधन. |
●१७८१:
पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे
सखारामबापू बोकील यांचे निधन. |
●१९२२:
टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन. |
●१९३४:
जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचे निधन. |
●१९७८:
मोनॅको ग्रांप्री चे स्थापक अॅन्टोनी नोगेस यांचे निधन |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा ~~~★~~~.
१)सजीव स्वतः चे अन्न स्वतः तयार करू
शकत नाहीत त्यांना काय म्हणतात?
२)मराठीत विभक्ती चे किती प्रकार
आहेत? ३) पंतप्रधान रोजगार निर्माण कार्यक्रम(PMEGP)केंव्हा
सुरू करण्यात आला? |
उत्तरे:(१.प्राथमिक भक्षक,२.आठ,३.ऑगस्ट२००८मध्ये.)
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
🎯 ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬ |
■ शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तारीख पे तारीख;सहाव्यांदा
ही टांगती तलवार |
■ नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारतीय
दृष्टिकोनातून विद्यार्थी घडतील |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७. ======★■◆●====== |
No comments:
Post a Comment