आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष 📜 ११ सप्टेंबर इ.स.१६५७




 

🌻छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा 🌻:

जय शंभुराजे परिवार

      महाराष्ट्र राज्य

 ------------------------------------

आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष

************

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

📜 ११ सप्टेंबर ..१६५७

बादशहा औरंगजेबाला एकूण चार बायका होत्या.त्यातील प्रमुख राणी होती दिलरसबानू बेगम.ही शहानवाजखानाची मुलगी होती.औरंगजेब आणि दिलरसबानूचा  विवाह आग्रा येथे मे १६३७ रोजी झाला होता.दिलरसबानूला 5 मुले झाली होती. यातील शेवटचा मुलगा शहजादा अकबर याच्या जन्मानंतर आजारपणात ती ऑक्टोबर १६५७ ला औरंगाबाद येथे मरण पावली. पुढे शहजादा अकबराने आपल्या बापाशी बंड करून संभाजीराजेचा आश्रय घेतला.दक्षिणेत आलेल्या औरंगजेबा पासून बचाव करण्यासाठी राजापूरच्या फ्रेंच व्यापाऱ्याच्या सहकार्याने अकबर इराणला गेला.नंतरच्या काळात नोव्हेंबर १७०४ मध्ये पर्शिया येथे तो मरण पावला.संभाजीराजे आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या तहात त्याने मध्यस्ती केली होती.बादशहा औरंगजेब आणि त्याची पत्नी दिलरसबानू यांचा पुत्र शहजादा अकबर याचा जन्म औरंगाबाद येथे झाला होता ती तारीख होती ११ सप्टेंबर १६५७.

 

शहजादा महंमद अकबराचा भाद्रपद शुद्ध चतुर्दशी, शके १५७९, राक्षस संवत्सर, शुक्रवार म्हणजेच ११, सप्टेंबर १६५७, रोजी जन्मदिवस! शहजादा महंमद हा संभाजी महाराजांपेक्षा फक्त , चार महिने लहान पण जन्मवर्ष आणि इतर बाबतीत बरेचसे साम्य! कदाचित हा अनपेक्षित दैवयोग असावा. पादशहाजादा महंमद अकबर हा छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा अवघा , चारच महिन्यांनी लहान होता. अकबराच्या मातेचे नाव दिलरसबानू.

ती राजपूत राजकन्या होती.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

📜 ११ सप्टेंबर ..१६२७

११ सप्टेंबर १६२७ रोजी इब्राहीम आदिलशाह मरण पावला आणि त्याचा तिसरा मुलगा मुहम्मद गादीवर आला. याचवेळी निजामशाहीतील वजीर मलिक अंबरही १६२६-२७ दरम्यान मृत्यू पावला. या दोन्हीही घटना पाहता आणि इतिहासाची इतर साधने पाहता मुहम्मद आदिलशाहने कदाचित शहाजीराजांना आधीच्या 'सरलष्कर' पदवीइतका मान दिला नाही आणि त्याच वेळी निजामशाहीत पोकळी निर्माण झाली. परिणामतः शहाजीराजे विजापूर सोडून पुन्हा निजामशाहीत रुजू झाले. यावेळी तिकडे दिल्लीतही सत्तापालट झाले आणि जहांगीरचा मृत्यू होऊन शाहजहान गादीवर आला. परिणामतः लखुजी जाधवरावही मोगलाई सोडून निजामशाहीत परत आले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

https://instagram.com/jay_shambhuraje_parivar?igshid=1kag5cvqelxq9

📜 ११ स्पटेंबर ..१६७९

मायनाक भंडारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खांदेरी येथे तटबंदीचे काम सुरू केले.ही बातमी टोपीकर इंग्रजांना समजल्यावर ते अस्तवस्थ झाले.भविष्यत इथे किल्ला बांधल्यास आपल्या संपूर्ण आरमाराला नव्हे तर,साम्राज्याला धोका निर्माण होईल असे त्यांना वाटले.त्यावेळी तिथला इंग्रजी अधिकारी सर ह्युजेस आपल्या गलबता सह खांदेरी बेटावर चालून आला.त्या अधिकाऱ्याने इथे बांधकाम करू नका असे आव्हान दिले परंतु मायनाक भंडारी त्या आव्हानाला जुमानले नाही. ह्युजेस ह्या इंग्रज अधिकाऱ्याने  आपल्या सहकाऱ्यांना तटबंदी वर हल्ला करण्यास सांगितले. मागून दौलतखान येत असल्याचे दिसताच त्याने पोबारा केला. परत फिरला पुढे इंग्रजांनी सिद्दीशी हाता मिळवणि केली.ह्युजेस ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने ह्या लढाईची जीमेदरी रिचर्ड केग्विन ह्या इंग्रजी अधिकाऱ्याला दिली. सिद्दी आणि इंग्रज  आता खांदेरीवर चालून येत आहे हे समजताच दौलतखान तयारीला लागले.आरमाराची अर्धवर्तुळं अशी रचना केली.केग्विन चे आरमार आले आणि त्याने खांदेरीवर मारा चालू केला.दौलतखानने  देखील त्याला तितकेच प्रतिउत्तर दिलेले.परंतु सिद्दी आणि इंग्रज एकत्र झाल्याने दौलतखानावर भारी पडू लागले,माणसे हक्कनाक मारू लागली.तशी दौलतखानने आपले आरमार नागावच्या दिशेने नेऊन खांदेरीच्या पाठीमागच्या बाजूला नेहून मायनाक भांडरीला रसद पुरवली.यामुळे मायनाक भंडारी तटबंदी लढवू लागले.याचवेळी दौलखाने एक वेगळी खेळी खेळी.दौलतखाने दंड-राजपूर जवळील इंग्रजांच्या वाखारीवर हल्ला करायचे.तिथे बंदोबस्त अपुरा होता.इथे अचानक जर हल्ला केला तर ह्युजेस यांचे लक्ष विचलित होईल,आणि या हल्ल्या मुळे तो खांदेरी येथील आपले सैन्य माघारी बोलावून घेईल.आणि झालेही तसेच.दौलतखान आपले आरमार घेऊन राजपुरीच्या समुद्रात उभे राहिले तर तिकडे जमिनीवरून मोरोपंत वाखारीवर हल्ला करण्यासाठी सज्ज झालेले.काय समाजाच्या आत इंग्रजांच्या वखारी आणि वसाहती उध्वस्त झाल्या.सर ह्युजेस हवालदील होऊन चक्क शस्त्र खाली टाकून पांढरे निशाण फडकवू लागले.एवढेच काय खांदेरी बेटावरचा हल्ला ताबडतोब थांबवण्याचे मान्य केले.सर ह्युजेस यांनी मोरोपंतांशी तहानामा केला.आणि ह्या समुद्र लढाईत मराठ्यांचा विजय झाला.

 

दौलतखान आणि मायनाक भांडरीच्या या भीम पराक्रमाचा चपकार सिद्दी आणि इंग्रजांना चांगलाच मिळाला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

📜 ११ सप्टेंबर . १६८६

विजापूर किल्ला जिंकण्यासाठी आलेला बादशाह औरंगजेबाने आपली छावणी रसूलपूर येथे टाकली होती.तिथून तो मोहिमेची सूत्रे चालवत होता. जुलैला त्याने तोफांच्या माऱ्याने किल्ल्याचे बुरुज उध्वस्त करण्यास तटाखाली सुरुंग उडवण्याचा हुकूम दिला. सप्टेंबर ला तो स्वतः लढाईच्या मोर्चावर पाहणी करण्यासाठी गेला.मोगल फौजांच्या आक्रमक हल्ल्याने घाबरून विजापूरचा सुलतान सिकंदर आदिलशहा घाबरला.आदिलशाहीचा कारभार सय्यद मसूद,अब्दुल रौफ सर्जाखान या तीन सरदाराकडे होता.१० सप्टेंबरला अबुल रौफचा मुन्शी सय्यदखान जाऊन मुघल सरदार गाझिउद्दीन खानाला भेटला त्याने  तहासंबंधी प्राथमिक बोलणी केली.दुसऱ्या दिवशी अबुल रौफ हा आदिलशाहीचा मुख्य सरदार गाझिउद्दीन खानाला जाऊन भेटला.तहाची बोलणी करारमदार करून तो परत किल्ल्यात गेला.आदिलशाही सरदार अबुल रौफ ने गाझिउद्दीन खानाची भेट घेतली ती तारीख होती ११ सप्टेंबर १६८६

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

📜 ११ सप्टेंबर ..१७५१

सिंहगड किल्ल्याच्या दारूगोळ्याच्या कोठारावर ११ सप्टेंबर १७५१ रोजी वीज पडून गडावर मोठा स्फोट झाला होता. ज्यामुळे गडावरील अनेक इमारतींना हानी पोहोचली होती. ज्याच्या दुरुस्तीसाठी ८७०० रुपये खर्च पडल्याचीही नोंद आहे. पुढे याच इमारतीत ब्रिटिशांनी काही काळ चर्चही थाटले होते.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

📜 ११ सप्टेंबर ..१७९०

गुलाम कादरचा निकाल लावल्यावर महादजींनी रजपूत इस्माईल बेग यांचा पाडाव करण्याचे ठरविले. महादजी तुकोजी होळकर यामधील वैमनस्याचा फायदा घेण्याचे ठरवून होळकरास आपल्या बाजूस वळविले. होळकराने राजपूत संस्थानिकांची एकजूट बांधण्याचा व्यूह रचला. त्यास इस्माईल बेगही सामील झाला. त्यांचा पराजय करण्यासाठी पाटीलबावांनी मराठी फौज रवाना केली. त्यांनी दिनांक २० जून १७९० रोजी शत्रूचे फौजेवर मारगिरी केली. तेव्हा इस्माईल बेग, जयपूरवाले राठोड यांचा मराठी फौजेने पाठलाग केला. शत्रूकडील लोकांची कत्तल करून शत्रूचा तोफखाना हस्तगत करून उधळून लावला  त्यानंतर रजपुतांचा कायमचा निकाल लावण्यासाठी महादजीची स्वारी दिनांक २८ ऑगस्ट १७९० रोजी डेरेदाखल झाली. जयपूर मारवाड या दोन संस्थानावर जाण्याच्या रोखे निघाली. तारीख ११ सप्टेंबर १७९० रोजी राठोडांशी मातबर लढाई झाली. लढाईचे समयी मराठे फौज राठोडवर चालून गेली. राठोडानी फार प्रतिकार केला. पण मराठ्यांच्या चढाईपुढे त्यांचा टिकाव लागता राठोडाचे फौजेचा बीमोड होऊन राठोड पळून गेले. मराठ्यास यश प्राप्ती झाली. त्यानंतर अजमीरपावेतो जाण्याचा विचार करून महादजींची स्वारी मारवाडात दाखल झाली. इतक्यात जोधपूरचा राणा बिजेसिंग याने आपला वकील महादजीकडे सलुखाचे बोलणे करण्यास आला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

 जय जगदंब जय जिजाऊ

  जय शिवराय जय शंभूराजे

           जय गडकोट

       !! हर हर महादेव !!

──────────────────────

  !! वारसा मराठा साम्राज्याचा !!

          !! वसा गडकोट संवर्धनाचा !!

──────────────────────*

संघटनेची सर्व कामे पाहण्यासाठी संघटनेसोबत जोडुन राहण्यासाठी खालील लिंक वापरा.

 आपल्या परिवाराचे फेसबुक पेज👇🏻

 

https://www.facebook.com/annasaheblatepatil123/

 

आपल्या परिवाराचे यूट्यूब चॅनल

https://youtube.com/channel/UC3DVdErmuULsnN7-Ki9YInQ

 

आपल्या परिवाराचे टेलिग्राम चॅनल

https://t.me/pqpjsxig

 

आपल्या परिवाराचे फेसबुक पेज👇🏻

 

https://www.facebook.com/annasaheblatepatil123/

 

आपल्या परिवाराचा फेसबुक ग्रुप👇🏻

https://www.facebook.com/groups/448674915945253/

 

परिवाराच्या व्हाट्सअप्प च्या ग्रुप ला ऍड होण्यासाठी.

 WhatsApp click now :-👇

#अष्टविनायक_

 

🔱सिध्दटेकचा सिध्दिविनायक 🌺

 

     🌞॥वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी समप्रभ॥

            ॥निर्विघ्नं कुरुम देवे सर्व कार्येशु सर्वदा॥🌞

 

अष्टविनायकामधील दुसरा गणपती सिध्दटेकचा सिध्दिविनायक.

 

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

 

श्री क्षेत्र सिद्धेश्वराची / सिद्धिविनायक कथा : :

 

आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्यानेकाराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला. आणि गणपतीने ब्रम्हदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेंव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होता तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो, विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही.

 

विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही. तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला गणेशाय नमःया मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले.

 

दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पुजू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. १५ फूट उंचीचे १० फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. फूट उंच . फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे.  या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे किलोमीटर फिरावे लागते. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या.  त्यांतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते.  या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

 

 

श्री सिद्धेश्वर/सिद्धिविनायक मंदिर आणि परिसर : :

 

सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे की त्याची सोंड उजव्या बाजूस आहे.  ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.

 

श्री सिद्धेश्वर/सिद्धिविनायक पूजा आणि उत्सव : :

 

सिद्धिविनायक मंदिराचे द्वार सकाळी वाजता उघडले जाते. .३० ते श्रींचे पूजन होते. सकाळी १० वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. ११ वाजता पंचामृती पूजा होते. दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य दाखविला जातो. सूर्यास्तानंतर तिसरी पूजा केली जाते. रात्री .३० ते .१५ यावेळात आरती केली जाते. त्यानंतर मंदिर भक्तांसाठी बंद होते.

 

या मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. या सणांना सलग तीन दिवस गणपतीची पालखी निघते. सोमवती अमावस्यासुद्धा साजरी केली जाते. विजयादशमीला येथे जत्रा भरते.

 

पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.

 

जाण्याचा मार्ग :

 

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक येथे हे मंदिर आहे. पुण्यापासून अंदाजे ९९ किलोमीटरवर देऊळ आहे.

 

जवळची इतर दर्शनीय स्थळे:

 

पेडगांव येथील भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ला. अंतर अंदाजे किमी

 

राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिरअंतर अंदाजे २१ किमी

 

रेहेकुरी येथील अभयारण्य. अंतर अंदाजे ३१ किमी

 

भिगवण येथील पक्षी अभयारण्य. अंतर अंदाजे २७ किमी

 

दौंड येथील भैरवनाथ आणि श्री विठ्ठल मंदिर. अंतर अंदाजे २६ किमी.

 

           🌺||गणपती बाप्पा मोरया||🌺                

 

All Rights Reserved

© लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

संग्रहित दिनांक : २० सप्टेंबर २०१५

 

🌀🔱 नम: शिवाय, नमो नारायण ॥॥🐚🚩

No comments:

Post a Comment