शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* १४ ऑगस्ट इ.स.१६४९=फत्तेखानाचा पराभव

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

***********

१४ ऑगस्ट इ.स.१६४९

पुरंदरावर छत्रपती शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....

शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे महाबली शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात छत्रपती शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१४ आॅगस्ट इ.स.१६५७

"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.

या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१४ ऑगस्ट इ.स.१६६६

छत्रपती शिवाजीराजांची मिठाई'

तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'

औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते.

ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.

याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच,छत्रपती शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते.

औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व युवराज शंभुराजे एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.

महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, छत्रपती शिवाजीराजे, युवराज शंभुराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

  जय जगदंब जय जिजाऊ

  जय शिवराय जय शंभूराजे

           जय गडकोट

       !! हर हर महादेव !!

🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:

#शिवविचार_प्रतिष्ठान

१४ ऑगस्ट १६५७

 मराठ्यांनी कोकणातील दंडाराजपुरीजिंकली पण किल्ले जंजिरावर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला.या मोहीमेत शामराव रांझेकरआणि बाजी घोलपया मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी संग्रामदुर्गाचे तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली.

पण शेवटी मराठ्यांची हार झाली किल्ला हातातून गेला तरी पराक्रमावर खुश होऊन शिवरायांनी फिरंगोजी नरसाळा यांना भूपाळगडाची किल्लेदारी एक भरजरी दुशेला आणि एल मानाची तलावार भेट दिली.

शिंदे घराण्याचं वैभवशाली प्रतिक नाग आणि नाण्यांवर असणारं नागशिल्प.

९६ कुळातील शिंदे हे क्षत्रिय मराठा घराणे आहे,

सेंद्रक या नावापासून शिंदे हे नाव प्राप्त झाले. सेंद्रक हे अगदी पूरातन काळापासून व सर्वश्रुत असे घराणे आहे.

शिंद्यांच्या देवकात समुद्रवेल आहे, त्यावरुन सिंधूमधून समुद्रमार्गे ते कोंकणात आले असावेत.

शिंदे हे सूर्यवंशी शेष शाखेतील, तसेच हे शिंदे हे नागवंशी आहेत, नाग या शब्दा बद्दल इतिहासकारांची अनेक मते आहेत. नागवंशी आहेत म्हणजे त्यांचा जन्म नागयोनीतून झाला असे नाही.

शिंदेंच्या राजचिन्हात देखील नागशिल्प आहे,

 त्याचबरोबर ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसच्या मुख्य द्वारावर देखील द्वारशिल्प म्हणून नाग विराजित आहे.

तसंच एक पोस्टकार्ड देखील आहे ज्याच्या वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात Gwalior हे नाव छापलेलं असून त्याखाली शिंदे हे सुर्यवंशी क्षत्रिय कुळातील असल्याने सूर्याचं चित्र आणि बाजूला दोन नाग विराजित आहे

तसेच शिंद्यांची जी नाणी आहेत त्यात सुद्धा त्यांनी नागाला पुज्यस्थानी मानून त्या नागदेवतेला नाण्यांवर स्थान दिलं आहे.

यातील हे पहिलं नाणे असून हे अलिजाबहाद्दर श्रीमंत जयाजीराव शिंदे यांच्या काळातील असून १८४३ - १८८६ याकाळातील आहे. याच्या उजव्या बाजूला भाला असून डाव्या बाजूस त्रिशूळ आहे व त्या दोन्हींच्या मध्यात नाग असून त्यावर जी हे अक्षर आहे. नाण्याचं वजन ५.९४ ग्रॅम आहे.

यातील हे दुसरं तांब्याचं नाण आहे ते माधवराव शिंदेंच्या कार्यकाळातील असून इ. स. १८८६ - १९२५ या काळातील आहे. त्याचं मूल्य अर्धा पैसा आहे आणि बिंदूमय गोलाकार वर्तुळात मध्यभागी नागराज विराजित असून त्याच्या विळख्यात एक बाजूला भाला व दुसऱ्या बाजूस त्रिशूळ आहे. बाह्य भागी कडांना बिंदूमय गोलाकार वर्तुळ असून त्यात श्री. माधवराव मा. शिंदे * अ. बहाद्दर म्हणजेच अलिजाबहाद्दर. अशी अक्षरं आहेत. या नाण्याचं वजन ३.९० ग्रॅम असून त्याची जाडी २०.३० मिमी आहे.

आज ही शिंद्यांच्या देव्हार्यात नागाची पूजा अर्चना मोठ्या मनोभावे केली जाते.!

संदर्भ- क्षत्रिय घराण्याचा इतिहास, के बी देशमुख

नाण्यांचे फोटो:- Nagesh Sawant

- रोहित पेरे पाटील

©इतिहासअभ्यासकमंडळ

#शिंदे

#इतिहासअभ्यासकमंडळ

#नाणी

#नागपंचमी

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*******

१४ ऑगस्ट इ.स.१६४९

पुरंदरावर छत्रपती शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली....

शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे महाबली शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात छत्रपती शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला....

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१४ आॅगस्ट इ.स.१६५७

"किल्ले जंजिरा" वर मराठ्यांचा पहिला हल्ला, पण हा प्रयत्न अयशस्वी झाला.

या मोहीमेत "शामराव रांझेकर" आणि "बाजी घोलप" या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१४ ऑगस्ट इ.स.१६६६

छत्रपती शिवाजीराजांची मिठाई'

तिथीने त्या दिवशी श्रावण वद्य नवमी होती. श्रीकृष्णजन्मोत्सव चालुच होता. त्यानिमित्ताने शिवाजीराजांनी ते जिथे कैद होते तिथुनच मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. आग्र्यामधील प्रतिष्ठित लोकांना ही मिठाई जाऊ लागली. एवढेच काय तर बादशाही वजीरांनाही ही मिठाई जाऊ लागली. मात्र त्याआधी अर्थातच बादशहा औरंगजेबाची परवानगी मिळवावी लागली. बादशहाने पहार्यावरच्या दरोग्याला विचारले 'सीवा मिठाई कशाबद्दल वाटणार आहे?' त्यावर उत्तर मिळाले की,'सीवाचे पुर्वीपासुनच व्रत चालु आहे. अटकेत असला तरी तो ते व्रत पाळतो. बादशहांनी परवानगी दिली तर ठीक नाहीतर तो ते व्रत नाही पाळणार'

औरंगजेबाला काय वाटले कोण जाणे पण, त्याने ही परवानगी लगेच दिली. 'शुभश्च: शिघ्रम' लगेच पेटारे बाहेर जायला सुरूवात झाली. एक माणुस आत सहज बसु शकेल इतके ते पेटारे मोठे होते आणि ते उचलायला दोन माणसे असायची. पहिल्या दिवशी पेटारे बाहेर जाताना पहार्यावरच्या लोकांनी एक दोन पेटारे उघडुन पाहिले. त्यात खरच मिठाई होती म्हणून ते पुढे जाऊ दिले. १७ तारखेपर्यंत असे किती वेळा मिठाईचे पेटारे तिथुन बाहेर गेले हे नेमक समजत नाही पण, पहारेकरी फक्त पहिले एक दोनच पेटारे उघडून पहायचे. थोडक्यात पेटार्यांकडे मुघलांचे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शिवाजीराजांचे मात्र या पेटार्यांकडे बारीक 'लक्ष' होते. ९ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगसोबत रोज दरबारात जातच होते.

ही खाल्लेली मिठाई मुघलांना आत्ता जरी गोड लागत असली तरी, लवकरच ती त्यांना 'बाधणार' होती. काहींना तर ती न खाताच बाधणार होती.

याच सुमारास महाराजांनी त्यांच्याजवळ असलेले जडजवाहीर व मौल्यवान वस्तू आग्र्यामधीलच मूलचंद सावकाराच्या लोकांसोबत इकडे राजगडावर रवाना केले. त्याकाळी असे व्यवहार देशभर होयचे. तसेच,छत्रपती शिवाजीराजांनी कवींन्द्र परमानंद यांच्याबरोबर काही हत्ती, घोडे, पालख्या पाठवुन दिल्या. याच परमानंदांनी पुढे 'शिवभारत' हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातुन आपल्याला शिवचरित्राची महत्वाची माहिती मिळते.

औरंगजेब हे सगळ होऊ देत होता कारण जितके महाराज व युवराज शंभुराजे एकटे पडतील तितके त्याच काम सोप होणार होत.

महाराजांची आता तयारी चालु झाली होती. 'मुहुर्तघटिका' जवळ आली होती. आता फक्त नियोजन कस करणार यावरच, छत्रपती शिवाजीराजे, युवराज शंभुराजे व स्वराज्याचे भवितव्य अवलंबून होत.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

  जय जगदंब जय जिजाऊ

  जय शिवराय जय शंभूराजे

           जय गडकोट

       !! हर हर महादेव !!

🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻

#उर्जामंत्र🙏🚩

स्वत:ला मोठ व्हायच असेल तर इतरांच्या मोठेपणाचा पण स्वीकार करा.

फक्त स्वतः चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कधीच थांबत नाही.

#उर्जा छत्रपती शिवाजी महाराज️🚩

#शिवविचार_प्रतिष्ठान

#मराठेशाहीतील अनोखे पैलू सरसेनापती संताजी घोरपडेंंसारख्या महत्वाच्या मराठा अधिकाऱ्याचा दग्याने खून होणं ही मराठा इतिहासातील एक दुर्दैवी बाब आहे. १६९३ मध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे दोघेही जिंजीच्या रक्षणार्थ दक्षिणेत उतरले तेव्हा झुल्फीकारखान जिंजीच्या वेढ्यात होता आणि संताजी व धनाजी आल्यावर कचाट्यात सापडला होता. त्याने राजाराम महाराजांकडे तहाची बोलणी लावली. यावेळी संताजींचं मत मोंगलांना जाऊ देऊ नये, कापून काढावं असं होतं पण छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून मोंगलांना वेढा उठवून जायला सांगितलं. या छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्णयामुळे संताजी त्यांच्यावर नाराज होते.

संताजी आणि धनाजी यांमध्येही भांडण सुरू झाली होती. संताजी हे शिस्तीचे कडक होते तर धनाजी हे वेळप्रसंगी पाहून माणसं आपल्या बाजूला घेण्याच्या दृष्टीचे होते. अनेक कनिष्ठ सरदार हे संताजींच्या शिस्तीला कंटाळून धनाजींची बाजू घेत यामुळे या भांडणात आणखी ठिणग्या पडल्या. यामध्येच संताजींनी अमृतराव निंबाळकर या सरदाराला हत्तीच्या पायी दिले होते. हा अमृतराव निंबाळकर छत्रपती राजाराम महाराजांच्या जावयाचा चुलत भाऊ होता आणि याची सखी बहीण नागोजी माने ची बायको होती. आणि १६९५ मध्ये मोगली फौजांनी संताजी आणि धनाजी यांच्या फौजांचा स्वतंत्ररित्या पराभव केला होता. यानंतर संताजी आणि धनाजीची या दोघांनीही राजाराम महाराजांच्या समोर एकमेकांविषयीचे चुकांचे पाढे वाचले.

छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींना सेनापती पदावरून दूर केले होते. यानंतर संताजींनी छत्रपतींशी बंड न पुकारता निघून गेले

जे सरदार पूर्वी मोगलांकडून स्वराज्यात आले होते ते संताजींना सेनापती पदावरून काढल्यामुळे पुन्हा मोगलाईत गेले. या सरदारांमध्ये नागोजी माने होते. हे तेच नागोजी ज्यांची बायको म्हणजे संताजींनी ज्याला हत्तीच्या पायी दिलं त्या अमृतराव निंबाळकरांची सख्खी बहीण होय. मार्च १६९७ च्या सुमारास धनाजी जाधवांची मोठी फौज संताजींच्या मागे धावू लागली, अखेर संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात आले. आणि याचदरम्यान म्हसवड च्या आसपास संताजींचा मुक्काम असताना नागोजी माने याने संताजींना दग्याने मारले.

नागोजीने संताजींचं मस्तक कापून ते ब्रह्मपुरीला नेऊन बादशहाला नजर केलं, यावरून संताजी आणि धनाजी यांच्यातला भांडणाचा फायदा औरंगजेबाने अप्रत्यक्ष वा प्रत्यक्ष घेतला असं नक्कीच म्हणता येईल. पूर्वी आपण बादशहाला सोडून गेलो आणि आता पुन्हा रुजू झालो याची खात्री पटवण्यासाठी नागोजीने या गोष्टीचा दुहेरी फायदा घेतल्याचं दिसतं कारण बादशहाचा सरदार लुत्फुल्लाखानाचं नागोजीला जुलै १६९७ मध्ये एक पत्रं लिहिलं त्यात तो म्हणतो, "संताजीला तुम्ही पळून जाऊ दिलं नाही. येणेंकरून सरकारची नोकरी तुम्ही एकनिष्ठतेने बजावत आहेत हे समजून तुमचे अपराध (पूर्वी सोडून गेल्याचे) क्षमा होऊन बादशहाची मेहेरनजर होईल".

याच सर्व कारणांमुळे संताजी घोरपडेंसारख्या मातब्बर मराठा सरदाराचा दुर्दैवी मृत्यू(खून) जाहला.

No comments:

Post a Comment