!! 30 जुलै दिनविशेष ॥स्मृतिदिन.

 

 

!! 30 जुलै  दिनविशेष ॥

 

             🔥 शुक्रवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 2000 - कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

👉 2001 - जलतज्ज्ञ राजेन्द्र सिंह यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार जाहीर

👉 1997 - गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार जाहीर

 

         🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

जन्म

 

👉 1973 - पार्श्र्वगायक सोनु निगम

👉 1951 - भारतीय इंग्रजी चिञकार आणि मुर्तीकार गॅरी यहूदा

 

 🎇 मृत्यू

 

👉 2013 - भारतीय इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बैजामिन वाॅकर यांचे निधन

👉 2011 - संगीत समीक्षक डाॅ अशोक रानडे

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

३० जुलै - दिनविशेष

 

३० जुलै रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

७६२: खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.

 

१६२९: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.

 

१८९८: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.

 

१९३०: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.

 

१९६२: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

 

१९७१: अपोलो १५ चंद्रावर उतरले.

 

१९९७: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.

 

२०००: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.

 

२०००: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.

 

२००१: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

 

२०१२: दिल्लीतील पावर ग्रिड  खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.

 

२०१४: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.

 

३० जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१८१८: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)

 

१८५५: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)

 

१८६३: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)

 

१९४७: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.

 

१९५१: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.

 

१९६२: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)

 

१९७३: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.

 

१९८०: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.

 

३० जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१६२२: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.

 

१७१८: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.

 

१८९८: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)

 

१९३०: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)

 

१९४७: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.

 

१९६०: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)

 

१९८३: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)

 

१९९४: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)

 

१९९५: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२०)

 

१९९७: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.

 

२००७: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.

 

२००७: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.

 

२०११: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)

 

२०१३: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)

🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬

 

      🤔 कुतूहल 🤔

 

🎯 गणिती अर्थशास्त्रज्ञ जॉन नॅश

 

जॉन नॅश म्हटले की, स्मरण होते त्यांच्या गणिती-अर्थशास्त्रातील उत्तुंग कर्तृत्वाला मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचे, तसेच त्यांचे जीवनचरित्र अ ब्यूटिफुल माइण्डव त्यावरील २००१ सालच्या ऑस्कर विजेत्या सिनेमाचे! अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील ब्ल्यू फील्ड येथे १३ जून १९२८ रोजी नॅश जन्मले. गणितातील विलक्षण प्रतिभेमुळे १९४८ साली कार्नेगी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने त्यांना बी.एस.बरोबरच एम.एस.पदवीही दिली. पुढील केवळ दोन वर्षांत त्यांनी द्यूत सिद्धान्त (गेम थिअरी) अर्थशास्त्राच्या अंगाने अभ्यासला. १९५० मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीला सादर केलेल्या २७ पानी नॉन-कोऑपरेटिव्ह गेम्सया गणिती-अर्थशास्त्रीय प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. पदवी मिळाली. १९५१ मध्ये नॅश मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) गणित विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी अंशत: विकलक (पॅराबोलिक पार्शिअल डिफरेन्शिअल) समीकरणे आणि विकलक भूमितीतील (डिफरेन्शिअल जॉमेट्री) दीर्घकाल न सुटलेल्या समस्या सोडवल्या. तसेच संकेतन सिद्धान्तात (कोडिंग थिअरी) काळाच्या पुढे असे कार्य केले. मात्र, गंभीर स्किझोफ्रेनियामुळे १९५९ साली त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. १९९० मध्ये ते स्किझोफ्रेनियातून पूर्ण बरे झाले होते.

नॅश यांनी आपल्या प्रबंधात सहकारी आणि असहकारी खेळांतील प्रतिस्पर्धी जिंकण्यासाठी आपले डावपेच कसे वापरू शकतात, त्यासंबंधीचा गणिती सिद्धान्त मांडला होता. सहकारी खेळात सहभागींतील अलिखित करारानुसार खेळ होत असल्यामुळे, सर्वानाच लाभ होऊ शकतो. असहकारी खेळांत (उदा. बुद्धिबळ, लिलाव) सहभागींमध्ये कोणताही करार नसल्याने, एकाचा सर्वनाशही उद्भवतो. सहभागींचे हित ध्यानात घेऊन संभाव्यतेच्या गणिताने तोडगा निघू शकतो, हे नॅश यांनी दाखवले. नॅश यांची नॅश समतोल (नॅश इक्विलिब्रियम)ही संकल्पना, सहभागींकडून स्पर्धात्मक परिस्थितीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल एक उपयुक्त निरीक्षण सांगते. त्यानुसार, एखाद्या परिस्थितीत सहभागींना जरी अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी सर्वाच्या इष्टतम फायद्याच्या निर्णयापासून फारकत घेऊन कोणी स्वत:च्या लाभासाठी स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय त्याच्यासाठी घातक ठरू शकतो. या संकल्पनेवरील नॅश यांचा अवघ्या ३१७ शब्दांचा शोधनिबंध एका प्रतिष्ठित शोधपत्रिकेमध्ये १९५० साली प्रकाशित झाला. नंतरच्या काळात अर्थशास्त्रच नव्हे तर संगणक, कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), जैव-उत्क्रांती, भ्रष्टाचार, युद्ध आदी वैविध्यपूर्ण क्षेत्रांत नॅश समतोलउपयुक्त ठरला. यासाठी १९७८ मध्ये त्यांना जॉन फॉन न्यूमन थिअरी प्राइझमिळाले.

 

नॅश यांच्या द्यूत सिद्धान्तातील महत्त्वपूर्ण योगदानाची उपयुक्तता जगातील अर्थशास्त्रज्ञांच्या प्रकर्षांने लक्षात आल्यावर, १९९४ मध्ये इतर दोन अर्थशास्त्रज्ञांसह नॅश यांना अर्थशास्त्राचे नोबेलपारितोषिक दिले गेले. भूमिती आणि अरेषीय अंशत: विकलक समीकरणांवरील कामासाठी २०१५ साली त्यांना गणितातला अतिशय मानाचा आबेल पुरस्कारमिळाला. २३ मे २०१५ रोजी तो पुरस्कार घेऊन घरी परतताना त्यांचे अपघाती निधन झाले.

 

डॉ. विद्या ना. वाडदेकर

 

office@mavipamumbai.org

➖➖➖➖➖➖➖

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !

 📡 जय विज्ञान🔬

संकलक - दिपक तरवडे

 

दै_लोकसत्ता

दिनांक- २८ जुलै २०२१

➖➖➖➖➖➖➖

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर Request टाइप करुन (फक्त whatsapp किंवा Telegram वरच) पाठवा.

डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते

 

भूशास्त्रज्ञ

 

 जन्मदिन - ३० जुलै १९१९

 

प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र भालचंद्र गुप्ते यांचा जन्म ऐतिहासिक सरदार घराण्यात झाला. तैल व चिकित्सक बुद्धी, त्याबरोबरच भूशास्त्रीय प्रश्‍नांची उकल करण्याची हातोटी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, यामुळे त्यांनी भूशास्त्रीय क्षेत्रात आदराचे स्थान मिळविले होते. डॉ. गुप्ते खऱ्या अर्थी निरीश्वरवादी होते. त्यांनी अनेक दु:खाचे प्रसंग धीराने पचविले. महाविद्यालयात शिकणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे आकस्मिक दु:खद निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला मंत्रालयात झालेल्या कोयना टेमर्स कमिटीच्या बैठकीतील चर्चेत त्यांनी अविचल मनाने भाग घेतला होता.

पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. पदवी मिळवली. त्यांना त्या परीक्षेत दक्षिणा फेलोशिपमिळाली होती. संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केल्यावर काही महिने त्यांनी भारतीय भूशास्त्र संस्था (जी.एस.आय.) मध्ये काम केले. त्यानंतर १९६६ सालापर्यंत त्यांनी अहमदाबाद, नागपूर व पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत अधिव्याख्याता म्हणून काम केले. मार्च १९६६ पासून जुलै १९७७ मध्ये निवृत्त होईपर्यंत ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व भूशास्त्रीय विभागप्रमुख म्हणून होते.

१९५० सालापासून आयुष्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्राचा ८५ टक्के भूभाग व्यापणाऱ्या डेक्कन टॅपखडकांविषयी त्यांनी मूलभूत संशोधन केले. त्यात खडकांचे विविध प्रकार, त्यांच्या क्षेत्रीय संरचना, त्यांचे विविध गुणधर्म याविषयी त्यांनी सखोल निरीक्षण व अभ्यास केला. त्यांच्या संशोधनामुळे या खडकांच्या बऱ्याच अज्ञात वैशिष्ट्यांविषयी नव्याने माहिती मिळाली. तसेच बऱ्याच जुन्या कल्पना चुकीच्या असल्याचे त्यांनी दाखवून दिले. संशोधनातील अप्रामाणिकपणा ते कधीच खपवून घेत नसत.

भूशास्त्र या विषयाचा अभ्यास प्रयोगशाळेपुरता मर्यादित न ठेवता, त्या संशोधनाचा उपयोग स्थापत्य अभियांत्रिकी कामात केला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. खडकांच्या विविध गुणधर्मांविषयी त्यांनी जी अचूक माहिती मिळविली होती, त्या माहितीचा अभियांत्रिकी भूशास्त्र समजण्यास फार उपयोग झाला.

गेरू, ज्वालामुखी, ब्रेशिया, डाइक, भरितकुहरी, बेसॉल्ट या खडकांबद्दल अभियंत्यांच्या मनात चुकीच्या कल्पना असल्यामुळे धरणांचा पाया घेताना त्यांच्या मनांत काहीशी भीती असे. त्यामुळे प्रकल्पावर निष्कारण बराच खर्च केला जाई. डॉ. गुप्ते यांच्या संशोधनामुळे कोट्यवधी रुपये वाचू शकले. त्यामुळेच स्थापत्य अभियंते त्यांचा सल्ला शिरसावंद्य मानत.

१९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, मध्य रेल्वे, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टाटा इलेक्ट्रिसिटी कंपनीज, एम.आय.डी.सी., बृहन्मुंबई महानगरपालिका, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन, इलेक्ट्रिसिटी टू लाओस यांसारख्या अभियांत्रिकी संघटनांसाठी अनेक धरणे, कालवे, बोगदे, रस्ते, लोहमार्ग, भूमिगत विद्युतगृहे व पूल यांसारख्या अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी भूशास्त्रीय अभ्यास करून त्यांचे आराखडे व बांधकाम यांविषयी डॉ. गुप्ते यांनी मोलाचा सल्ला दिला. या प्रकल्पांव्यतिरिक्त बृहन्मुंबई पाणीपुरवठ्यासाठी भातसा, मध्य वैतरणा धरण, समुद्राखालील वसई खाडी बोगदा (क्रीक टनेल), केळशी बोगदा (अंडरक्रीक टनेल), सहार ते रेसकोर्स हा प्रमुख बोगदा व ५० कि.मी. लांबीचे पाण्यासाठीचे मुंबई शहरातील इतर बोगदे, वैतरणा जलविद्युत प्रकल्प, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा तिसरा व चौथा टप्पा, पुण्याजवळील पानशेत, वरसगाव, टेमघर, भाभा आसखेड, चासकमान इत्यादी धरणांवर, तसेच मध्य रेल्वेच्या थळ आणि बोरघाटातील तिसरे रेल्वे मार्ग, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या तिसऱ्या व चौथ्या अणुभट्टीच्या जागा, लाओसमधील सेसेल, सेलाबाम इत्यादी जलविद्युत प्रकल्पांवर त्यांनी तज्ज्ञ म्हणून काम केलेले आहे.

नर्मदा पाणी तंट्याविषयी लवादाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे भूशास्त्रीय सल्लागार म्हणून नवागाव व जलसिंधी येथील धरणांच्या जागेचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी महाराष्ट्र सरकारला लवादांशी संबंधित बाबींविषयी मोलाचा भूशास्त्रीय सल्ला दिला.

महाराष्ट्र सरकारच्या कोयना ट्रेमर्स कमिटीएक्स्पर्ट कमिटी ऑन सिस्मॉलॉजीचे एक तज्ज्ञ सदस्य म्हणून त्यांनी काम केले. कोयना भूकंप कोयना धरणामुळे झाला नाही हे भूशास्त्राच्या आधारे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सखोल संशोधन केले. हा भूकंप धरणामुळे झाला असणे कसे शक्य नाही हे त्यांनी शोधनिबंध लिहून व विविध चर्चासत्रांत भाग घेऊन दाखवून दिले.

महाराष्ट्र सरकारच्या सिंचन व जल आयोगाचे सहयोगी तज्ज्ञ म्हणून त्यांनी आयोगाच्या अनेक कार्यशाळांत झालेल्या चर्चेत भाग घेतला व आयोगाला भूजलाच्या भूशास्त्रीय पैलूंविषयी टिप्पण्या तयार करण्यास सहकार्य केले.

भाषा संचालनालयाने मराठी भाषेत भूशास्त्रीय परिभाषा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले होते. परिभाषा तयार करण्याच्या चर्चांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

डेक्कन टॅप खडकांच्या मूलभूत स्वरूपाविषयी व त्यांच्या अभियांत्रिकी भूशास्त्रीय गुणधर्मांविषयी त्यांचे पंचवीसहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. पी.डब्ल्यू.डी. हँड बुक प्रकरण क्र. ६’, तसेच ए टेक्स्ट बुक ऑफ इंजिनिअरिंग जिऑलॉजीएजी सिरीज ऑफ जिऑलॉजिकल मॅप्सही त्यांची पुस्तके भूशास्त्रातील आधारभूत ग्रंथ मानले जातात.

भूशास्त्रातील ज्ञानकोश असलेले डॉ. गुप्ते कालवश झाल्याने डेक्कन टॅप बेसॉल्ट खडकांच्या एका अभ्यासपर्वाचा अंत झाला, असेच म्हणावे लागेल.

~ डॉ. बा. मो. करमरकर ~

 

संकलक - दिपक तरवडे

 

https://m.facebook.com/vidnyandinvishesh

 

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

 

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर Request टाइप करुन (फक्त whatsapp किंवा Telegram वरच) पाठवा.

🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬

 

      🤔 कुतूहल 🤔

 

🎯 बहुपैलू पास्कल

 

फ्रान्सची गणिती परंपरा मोठय़ा उंचीवर नेणारे गणितज्ञ ब्लेझ पास्कल (सन १६२३-१६६२) बहुपैलू म्हणून ओळखले जातात. गणितात पास्कल त्रिकोणाचा शोध, भौतिकशास्त्रातील पास्कलचा नियमकिंवा तत्त्वज्ञानावर आधारित पोंसे’ (ढील्ल२क्वी२) हे पुस्तक; यांसारख्या अनेक विषयांत त्यांची पारंगतता प्रत्ययाला येते. पास्कल यांचा गणिताकडचा कल बघून वडिलांनी त्यांना सातव्या वर्षीच युक्लिडचे एलिमेंट्सहे पुस्तक भेट म्हणून दिले. असा समज आहे की, त्यातली बरीचशी प्रमेये त्यांनी पुस्तक वाचण्याआधीच पडताळून पाहिली होती. या पुस्तकाने प्रभावित झालेल्या पास्कल यांनी वयाच्या १५-१६व्या वर्षी शांकवांचा (कोनिक सेक्शन्स) अभ्यास सुरू केला आणि एक सुंदर प्रमेय प्रस्थापित केले. हे कमी परिचित पास्कल प्रमेयजाणून घेऊ.

 

एका शांकवावर, उदा. एका विवृत्तावर (एलिप्स) सहा बिंदू चिन्हांकित करा. या बिंदूंना आपण अ, , , , , फ असे संबोधू. बाजू अबडइ’, बाजू बकइफआणि बाजू कडअफएकमेकांना विरुद्ध होतील अशा प्रकारे हे सहा बिंदू जोडा. अशा विरुद्ध बाजू वाढवल्यावर त्यांपैकी प्रत्येकी दोन बाजू एका बिंदूत छेदल्या जातील आणि तीन छेदनबिंदू मिळतील (आकृती पाहा). नियमित षटकोनाच्या बाजू वाढवून मिळणाऱ्या या ताराकृतीला हेक्साग्रॅमम्हणतात. पास्कल यांनी प्रस्थापित केले की, या पद्धतीने मिळणारे तीन बिंदू हे एका सरळ रेषेवरच आढळतील. या प्रमेयाची खासियत म्हणजे, हे प्रमेय फक्त विवृत्ताकरताच नव्हे तर कोणत्याही शांकवाकरिता (जसे की वर्तुळ) खरे ठरते. पास्कल प्रमेयात आढळणाऱ्या हेक्साग्रॅमला ते गूढ हेक्साग्रॅम’ (मिस्टीक हेक्साग्रॅम) असे म्हणत.

 

पास्कल यांचा आणखी एक पैलू म्हणजे वयाच्या १९व्या वर्षी, त्यांनी पास्कलाइनया जगातल्या पहिल्या गणनयंत्राचा शोध लावला. त्याचप्रमाणे हायड्रॉलिक प्रेस, सिरिंज हे त्यांचे काही प्रसिद्ध शोध. संभाव्यताशास्त्रातही त्यांचे योगदान आहे. संभाव्यताशास्त्रातील मूलभूत तत्त्वे पास्कल व फर्मा यांनी मांडली. संभाव्यताशास्त्रात उद्भवणारे बरेचसे प्रश्न, चयनशास्त्राच्या (कॉम्बिनेटोरिक्स) पद्धतीने सोडवण्याची प्रक्रिया पास्कल यांनी फर्मा यांच्या मदतीने उत्कृष्ट पद्धतीने सादर केली. पास्कल त्रिकोणाचा वापर करून त्यांनी त्यात अनेक प्रमेये मांडली.

वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी प्रकृती ढासळल्यामुळे १९ ऑगस्ट १६६२ रोजी त्यांचे निधन झाले. १९६० साली निक्लाऊस वर्थ यांनी त्यांच्या सन्मानार्थ विकसित केलेली पास्कलनावाची प्रोग्रामिंग भाषा आजही बऱ्याच प्रमाणात वापरली जाते. पास्कल यांच्या अल्पकालीन जीवनातल्या बहुपैलू कारकीर्दीमुळेच, आजही त्यांचे नाव गणित-विज्ञानात मानाचे समजले जाते.

 

प्रा. सई जोशी

 

office@mavipamumbai.org

➖➖➖➖➖➖➖

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !

 📡 जय विज्ञान🔬

संकलक - दिपक तरवडे

 

दै_लोकसत्ता

दिनांक- ३० जुलै २०२१

➖➖➖➖➖➖➖

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर Request टाइप करुन (फक्त whatsapp किंवा Telegram वरच) पाठवा.

📙 आम्लपित्त म्हणजे काय ? 📙

*************

 

आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होणे. साधारणतः पचनसंस्थेत आम्लाची, अल्कलीची निर्मिती होत असते. आम्लाची निर्मिती झाल्यावर त्याच्या उदासिनीकरणासाठी त्याविरुद्ध अल्कलीचे प्रमाण वाढते. अल्कली निर्माण होण्यास गॅस्ट्रीन हे संप्रेरक कारणीभूत असते. अल्कलीचे प्रमाण वाढले की, व्हॅगस नावाच्या चेतातंतूद्वारे उद्दीपन होऊन आम्लाची निर्मिती होते व अल्कली उदासीन होतात. परंतु बऱ्याचवेळा उदासिनीकरणानंतरही आम्लाची निर्मिती होत राहते व जादा आम्ल तयार होण्याने तक्रारी सुरू होतात. यालाच आम्लपित्त होणे असे म्हणतात. या जास्तीच्या अाम्लामुळे पोटात / छातीत जळजळ, तोंडाला आंबट पाणी येणे व कधी कधी उलटी होणे, अशा तक्रारी सुरू होतात.

आम्लपित्ताच्या तक्रारी पुढे अन्नमार्गात होणाऱ्या अल्सरमध्ये म्हणजे व्रणात रूपांतर होऊ शकते.

आम्लपित्त या आजाराचे प्रमाण खेडय़ांपेक्षा शहरी लोकांत जास्त आहे. कारण Hurry-Worry-Curry या गोष्टी शहरात राहणाऱ्या व्यक्तींच्या दैनंदिनीचा एक भाग झालेला असतो.

Hurry म्हणजे घाई. धावपळ, बस, लोकलच्या वेळा सांभाळणे, त्यासाठी घाईघाईने जेवणे, सर्व गोष्टी वेळांमध्ये बसवण्याची कसरत करत राहणे, जेवणाच्या वेळातील अनियमितता. Worry म्हणजे व्यवसायानुरूप येणाऱ्या, सामाजिक कारणांमुळे निर्माण होणाऱ्या चिंता; तसेच Curry म्हणजे मसालेदार पदार्थ ! खूप तिखट, तेलकट, आंबट पदार्थ वारंवार खाण्यामुळे; तसेच दारू, सिगारेट यांचे अतिसेवन यांमुळे जठरातील आम्लनिर्मिती प्रमाणापेक्षा अधिक होऊन आम्लपित्ताच्या तक्रारी सुरू होतात. आम्लपित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर वरील सर्व गोष्टी टाळणे; दिनचर्या नियमित करणे; अनाठायी चिंता, बिडी, सिगारेट, दारू, तंबाखू यांचा अतिरेक न करणे; तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ कमी खाणे हे उपाय करायला हवेत.

आम्लपित्तावर अँटासिडच्या गोळ्या वापरतात. घरगुती उपायांमध्ये सोडा, लिंबू घेऊन हा त्रास कमी करता येतो. जेवणाच्या वेळा नियमित ठेवणे, जागरण टाळणे; आहारात ज्वारीची भाकरी, मुगाचे वरण, हिरव्या पालेभाज्या, ताक यांचा समावेश करणे; व्यसने टाळणे या उपायांनी आम्लपित्तावर नक्कीच मात करता येईल. आयुर्वेदात यासाठी खूप चांगले उपचार उपलब्ध आहेत. अर्थात औषधांपेक्षा जीवनशैलीतील बदल उपचारात महत्त्वाची भूमिका बजावतात, हे विसरता कामा नये. आम्लपित्ताला व त्यामुळे होणाऱ्या व्रणांना हेलिकोबॅक्टर पायलोरी हे जीवाणू जबाबदार असतात असे संशोधन करणाऱ्या डाॅ. मार्शल व डाॅ. वॉरेन या ऑस्ट्रेलियन संशोधकांना २००५ च्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे आता या आजाराच्या उपचारात पुष्कळ बदल होणार आहेत !

डॉ. जगन्नाथ दीक्षित

डाॅ. अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

मनोविकास प्रकाशन

 

संकलक - दिपक तरवडे

 

https://m.facebook.com/vidnyandinvishesh

 

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

 

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर Request टाइप करुन (फक्त whatsapp किंवा Telegram वरच) पाठवा.

आज ३० जुलै

आज ज्येष्ठ ऑर्गन वादक #राजीव_परांजपे यांचा वाढदिवस.

जन्म. ३० जुलै १९५५

राजीवजी परांजपे म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व.

जुन्या गाड्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा चंग त्यांनी अनेक वर्षे जोपासला. विंटेज कार रॅली मध्ये अनेक पारितोषिके जिंकली आणि पुढे परीक्षक म्हणूनही काम घेतला.अथक प्रयास, प्रयत्न आणि प्रयोगांचे घाट चढून राजीवजीची ही विंटेज कार कीर्दकर्तुत्वाच्या शिखरावर पोहोचली असतानाच त्यांना एका वळणावर एका नव्या क्षितीजाने साद घातली हे क्षितीज होते नादमधुर संगीताच्या सुरांचे, लय तालांचे! संगीताच्या औपचारीक शिक्षणाचे कोणतेही गंडेदोरे बांधून न घेता राजीवजी जणू मुक्त स्वाध्याय पिठाचे आधुनिक एकलव्य बनले, फरक एवढाच की महाभारतातील एकलव्याने शरसंधान केले होते तर राजीवजींनी स्वर संधान!

राजीवजींची संवादिनी एका बाजूने तल्लीन गायकाशी तर दुसऱ्या बाजूने मंत्रमुग्ध शोधायची सुरेल संधान साधते. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, स्वराज छोटा गंधर्व, रामदास कामत, आशा खाडिलकर, विजय कोपरकर, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे अशा अनेक पिढ्यांतील गायकांना राजीवजींनी समर्थपणे साथ केलेली आहे. पुरातनाचे जतन करण्याची आपली आवड राजीवजींनी वाहनाच्या प्रमाणेच वादनाला लागू केली आहे. राजीवजींनी हजारो तासाच्या संगीताच्या दुर्मिळ ध्वनिमुद्रणाच्या जतन केले आहे. जुन्या संवादिनी आणि ऑर्गनची दुरुस्ती करून त्यांना वाजते केले आहे. संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ पासून संगीत मत्स्यगंधा, संगीत कट्यार काळजात घुसली पर्यंतच्या जुन्या संगीत नाटकांच्या शेकडो प्रयोगांचे संगीत मार्गदर्शक आणि संगीत नियोजन म्हणून राजीवजींनी अभिजात संगीत रंगभूमीच्या जतनास हातभार लावला आहे. जुने जपण्याबरोबरच नवे घडविण्याचा अविष्कार राजीवजींनी केला आहे तो एक स्वतंत्र नाट्य संगीत दिग्दर्शक म्हणून १९७९ सालच्या बेगम बर्वेपासून संगीत दिग्दर्शक सुरू झालेली राजीवजींची वाटचाल १९८३ साली आलेल्या अश्मपुष्पते निशब्द माजघरातपर्यंत राज्य नाट्य स्पर्धांमध्ये अनेक परदेशी जिंकणारी ठरली. सवाई गंधर्व महोत्सवा पासून ते न्यू जर्सी येथे झालेल्या जागतिक मराठी नाट्य संमेलन असो देश-विदेशातील अनेक नामवंत मंच राजीवजींच्या वादनाने झंकार आले आहेत.वाहन आणि वादन यांची श्रीमंती तर राजीवजीं पाशी आहेच पण त्यापेक्षा मोठी आहे ती त्यांच्यातील माणुसकीची श्रीमंती. त्यामुळे अजिबात गवगवा न करता अनेक शिष्यांना एक रुपया शुल्क न घेता अनमोल मार्गदर्शन केले आहे. राजीवजी परांजपे यांना बालगंधर्व, छोटा गंधर्व, जयराम शिलेदार, वसंत देसाई या दिग्गजांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार, कला गौरव पुरस्कार कलारत्न पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच त्यांना आप्पासाहेब जळगावकर स्मृती संवादिनी पुरस्कार मिळालेला आहे.

डॉक्टर मंदार परांजपे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज ज्येष्ठ अभिनेत्री #नीलकांती_पाटेकर यांचा वाढदिवस.

जन्म. ३० जुलै

नीलकांती पाटेकर यांनी १९८९ मध्ये सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आत्मविश्वास' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट अॅक्ट्रेसचा अवॉर्ड देखील मिळाला होता. त्यांनी यापूर्वी काही मालिकांमध्ये काम केले होते. २८ वर्षांनी २०१६ मध्ये त्यांनी सुभाष भेंडे यांच्या 'जोगीण' या पुस्तकावर आधारित नीलिमा लोणारी यांच्या 'बर्नी' या चित्रपटात भूमिका केली होती.

नाना पाटेकर यांच्या पत्नी असलेल्या नीलकांती नानांच्या पासून विभक्त राहतात. त्यांच्या अद्यापही घटस्फोट झालेला नाही. त्यांना एक मुलगा असून मल्हार पाटेकर हे त्याचे नाव आहे. एका मुलाखतीमध्ये नानांनी म्हटले होते, की आम्ही रोज भेटतो आणि एकमेकांची काळजी घेतो.

त्यांनी थिएटर आर्टिस्ट नीलू उर्फ नीलकांती यांच्याशी विवाह करताना फक्त ७५० रुपये खर्च केले होते. आपल्या लग्नाची गोष्ट त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितली होती.

नानांनी सांगितल्याप्रमाणे, "मी ठरवलेच होते, की विवाह करणार नाही. त्यामुळे नाट्यगृह जॉइन केले. पैसे कमवण्यास सुरुवात केली की एखादी मुलगी लग्नास होकार देईल आणि तेव्हा पाहू असे मला वाटत होते. यानंतर मी नीलूशी विवाह केला. आमची पहिली भेट थिएटरमध्येच झाली होती. ती खूप चांगली अॅक्ट्रेस होती आणि अतिशय सुंदर स्क्रिप्ट लिहिते. नीलू एका बँकेत अधिकारी होती आणि महिन्याला २५०० रुपये कमवत होती. त्यावेळी मला एका शोसाठी फक्त ५० रुपये मिळत होते. महिन्यातून १५ शो केल्यास ७५० रुपये इतकी कमाई व्हायची. अर्थात नीलू आणि माझी कमाई मिळून घरात ३२५० रुपये महिन्याला येत होते. ही रक्कम गरजेपेक्षा खूप अधिक होती. अभिनया सोबतच त्या एक सिरेमीक शिल्पकार असून त्यांनी डिसेंबर २०१२ मध्ये हे काम करणे सुरू केले आणि आजपर्यंत त्या यात कार्यरत आहेत. याची त्यांची वेबसाईट http://www.artneelkanti.com आहे.

नीलकांती पाटेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ :- इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज अभिनेत्री #उमा_पेंढारकर यांचा वाढदिवस.

जन्म.३० जुलै

कलर्स मराठी वाहिनीवरील स्वामिनीया मालिकेत पार्वतीबाईही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे उमा पेंढारकर.उमा पेंढारकर माहेरची उमा पळसुले देसाई. उमा ही मूळची रायपाटणची असून तिचं शिक्षण मुंबईत झालं आहे. तिचे वडील प्रसिद्ध चित्रकार आणि आई शिक्षिका. लहानपणापासून घरात अर्थातच अभ्यासाला महत्व देणारे वातावरण होते. एस एन डी टी महाविद्यालयातून तिने समुपदेशन या विषयात एम ए देखील केले आहे. उमाने शुभदा दादरकर यांच्याकडे नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला आणि त्यात तिने सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. ती कत्थक विशारद देखील आहे. कत्थकचे प्रशिक्षण तिने ज्योती शिधये यांच्याकडून घेतले आहे. तसेच पंडित मधुकर जोशी यांच्याकडून तिने गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे. सुप्रसिद्ध गायक अभिनेते ज्ञानेश पेंढारकर यांची ती सून. म्हणजेच ललितकलादर्शचे संस्थापक असणारे ज्येष्ठ गायक अभिनेते भालचंद्र पेंढारकर हे तिचे आजे सासरे. उमाने ऋषिकेश पेंढारकर यांच्या बरोबर लग्न केले आहे. ते आर्किटेक्ट आहेत.

उमाच्या जीवनातील पहिला टर्निंग पॉईंट आला तो जेव्हा तिला सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी संगीत संशयकल्लोळनाटकातील रेवतीच्या भूमिकेसाठी विचारले तेव्हा! उमाने विचारले की अश्विनशेट ची भूमिका कोण करणार आहे? तेव्हा तिला आणखी एक सुखद धक्का बसला. सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे अश्विनशेठ साकारणार होते. अभिनय आणि गायन अशा तिच्या दोन्ही कलांना या नाटकातून उत्तम संधी मिळाली. संगीत संशयकल्लोळ या नाटकाला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले होते. लंडन येथील बी एम एम साठी सुद्धा हे नाटक सादर झाले.या नाटकाकरिता उमाला २०१६ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. स्वामिनीच्या मालिकेतील पार्वतीबाई या भूमिकेबद्दल बोलताना ती म्हणते, मी पार्वतीबाई या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती, या ऑडिशनचे मला दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्याकडून कळले. मग लूक टेस्ट झाली. जेव्हा मला कळले की माझी या भूमिकेसाठी निवड झाली आहे, तेव्हा आनंद तर झालाच, पण टेन्शनही आलंच. दिग्दर्शक विरेंद्र प्रधान यांच्या मनात जसा पार्वतीबाईया भूमिकेचा आलेख होता ,तो मी समजून घेतला. मी शिकस्तही कादंबरी वाचली. या भूमिकेसाठी विरेंद्र प्रधान ,कल्पेश कुंभार यांचे मला कायम मार्गदर्शन लाभते. तसेच कलर्स वाहिनी आणि निर्माते विरेंद्र प्रधान, आरव जिंदाल यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. ही भूमिका साकारताना मी आधी पेशव्यांची वंशावळ लिहून काढली. म्हणजे त्यातील नेमकी नाती लक्षात आली. शिवाय वाचनाची आवड असल्याने या गोष्टी सोप्या झाल्या. पण कॅमेरा माध्यमाला मी प्रथमच सामोरी जात होते. ते तंत्र शिकून घेणे गरजेचे होते.आणखी एक गोष्ट ही भूमिका करताना उमा साठी महत्वाची होती, की आपण पेशव्यांच्या घराण्यातील सुनेचे काम करत आहोत, म्हणजे सेटवर बोलताना सुद्धा इंग्लिश शब्द येऊ द्यायचे नाहीत, हे लक्षात ठेवायचे होते. शिवाय नऊवारी नेसून पूर्ण वेळ वावरणे, दागिने परिधान करून वावरणे आणि खोपा घातलेला असल्याने पूर्ण वेळ अशा गेटअप मध्ये वावरणे हे सुद्धा आव्हान होतेच. ही सर्व आव्हाने पेलत उमाने साकारलेल्या पार्वतीबाईंच्या भूमिकेला उत्तम प्रतिसाद लाभला होता.

एप्रिल २०२१ मध्ये अग्गंबाई सूनबाईया मालिकेतून नव्याने भेटीला आलेली नवीन शुभ्रा म्हणजे 'उमा पेंढारकर'. तेजश्री प्रधान च्या जागी आता उमा पेंढारकर दिसली आहे.

उमा पेंढारकरला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ :- इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज धृपद-धमार गायकीतील डागर घराण्याचे उस्ताद #सईदुद्दीन_डागर यांचा स्मृतिदिन.

जन्म.२० एप्रिल १९३९

हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणा-या धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणा-यांमध्ये उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफलीचे राजाच असतात. डागर घराण्याच्या मागील १९ पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन डागर यांच्याकडे आलेला होता. आता तो त्यांचे दोन्ही सुपुत्र उस्ताद नफिसुद्दीन डागर आणि उस्ताद अनिसुद्दीन डागर तसेच शिष्य पुढे नेत आहेत. सईदुद्दीन डागर साहेबांचे देश-विदेशात अनेक कार्यक्रम संपन्न झाले असून धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे त्यांच कौशल्य थक्क करणारे होते. संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना मिळालेल्या पुरस्कारांची मालिकाही मोठी आहे. देशविदेशात त्यांचा शिष्यसंप्रदाय आहे. या शिवाय त्यांनी अनेक शिष्यांनाही या कठीण गायकीच्या क्षेत्रात तयार केले आहे. उस्ताद सईदुद्दीन डागर यांना बालगंधर्व पुरस्कार मिळला होता.  संगीतातील विद्वता प्रत्यक्ष मैफिलीमध्ये अभिव्यक्त करणा-या काही मोजक्या कलावंतांमध्ये त्यांचे स्थान उच्च स्तरावर आहे. सईदुद्दीन डागर यांचे ३० जुलै २०१७ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे गायन

https://www.youtube.com/watch?v=ot4kcsFW8Y8

https://www.youtube.com/watch?v=Lwzhj_bf7LI

https://www.youtube.com/watch?v=48Bi7NqzMHo

आज ३० जुलै

आज धिंड’,‘नाटक’,‘मिटिंगयासारख्या ग्रामीण कथांच्या रसिकांपर्यंत पोहोचलेल्या #शंकरबाबाजीपाटील यांचा स्मृतिदिन.

जन्म. ८ ऑगस्ट १९२६ कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथे.

त्यांचे शिक्षण तारदाळ (ता. हातकणंगले) व गडहिंग्लज येथे व कोल्हापूर येथे बी. ए. बी. टी. पर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या शाळांतून अध्यापन केले. त्यानंतर आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर त्यांची नियुक्तीं झाली. सुरुवातीस आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर कार्यक्रम सहाय्यक अधिकारी काम केत असताना शंकर  पाटील यांनी १९५९ मध्ये एशिया फौंडेशनच्या शिष्यवृत्तीतून ग्रामीण जीवनाचा अभ्यास केला व टारफुला ही कादंबरी लिहिली.टारफुलाया कादंबरीत कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचे चित्र उभे करणारी तीन पिढ्यांची कहाणी लिहिली.कथा अकलेच्या कांद्याचीहे वगनाट्य इतके लोकप्रिय झाले की त्याचे दोन हजार प्रयोग झाले. त्याशिवाय गल्ली ते दिल्ली, लवंगी मिरची कोल्हापूरची इ.त्यांची वगनाट्ये लोकप्रिय ठरली. ग्रामीण तमाशा त्यांनी शहरी लोकांपुढे वगनाट्यातून आणला व त्याला प्रतिष्ठाही मिळाली. प्रामुख्याने ग्रामीण कथाकार व चित्रपट कथाकार म्हणून लौकिक मिळवलेल्या शंकर पाटील यांचा १९६० ते ७० हा कथालेखनाचा बहाराचा काळ होता. ग. प्र. प्रधानांसह आठवी ते दहावीसाठी साहित्य सरिता या वाचनमालेचे संपादन करणारे शंकर पाटील महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळावर मराठी विषयाचे विशेष अधिकारी होते. वळीवहा त्यांचा पहिला कथासंग्रह. भेटीगाठी’,‘धिंड’,‘बावरी शेंग’,‘खुळय़ाची चावडी’,‘फक्कड गोष्टी’,‘खेळखंडोबा’,‘आभाळअसे सरस कथासंग्रह देणा-या पाटील यांना अनेक कथासंग्रहांना व चित्रपट कथांना राज्य शासनाचे पुरस्कार लाभले.वावटळही पटकथा लिहून त्यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. युगे युगे मी वाट पाहिली, गणगौळण, भोळीभाबडी, चोरीचा मामला इ चित्रपटांच्या उत्कृष्ट पटकथा-संवाद लेखनाबद्दल त्यांना शासकीय पुरस्कार लाभले. याशिवाय पिंजरा,केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, पाहुणी, लक्ष्मी इ. चित्रपटांच्या कथा, पटकथा आणि संवाद त्यांनी लिहिले.शंकर पाटील यांनी ५९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. शंकर पाटील यांचे ३० जुलै १९९४ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

शंकर पाटील यांचे कथा कथन.

https://www.youtube.com/watch?v=Gk6EzPcknko

https://www.youtube.com/watch?v=588U6yjkPhw

https://www.youtube.com/watch?v=RY9GzHOR_SE

आज ३० जुलै

आज 'कुटं कुटं जायाचं हनिमूनला', 'धरला पंढरीचा चोर' अशा गाण्यांना सुमधुर संगीत देणारे ज्येष्ठ संगीतकार #बाळ_पळसुले यांचा स्मृतिदिन.

जन्म. २८ डिसेंबर १९३४

बाळ पळसुले मूळचे सांगलीचे. त्यांच्या घरची गरिबी होती. त्यांच्या वडिलांचा बुरुड व्यवसाय होता. बाळ यांचे इ. चौथीपर्यंत शिक्षण झाले होते. लहानपणी त्यांना मेळ्यातून गीत-संगीत ऐकायला मिळे. तेव्हा आपणही मेळ्यात काम करावे, गाणे म्हणावे, वाजवावे असे बाळ यांना वाटे. त्यातून त्यांना बाजाची पेटी वाजवायची आवड निर्माण झाली आणि त्यांनी ऐकून ऐकून, अंदाजाने येईल तसे वाजवायला सुरुवात केली. त्याबरोबरच, गीतांना चाली लावायचाही त्यांचा सराव होत गेला. पुढे त्यांना मेळ्यात काम मिळाले आणि तिथेच स्वत:च चाल लावलेली गाणी गाऊन, तर कधी दुसर्यात कुणाचे गीत घेऊन त्याला चाल लावण्याचा छंद त्यांना जडला. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची रंगत वाढू लागली. गीतकार म्हणून पुढे प्रसिद्ध झालेले जगदिश खेबुडकर याच मेळ्यात बासरी वाजवत. लोकप्रिय हिंदी गाण्याच्या चालावर मराठी गाणी गातानाही त्यांना आनंद वाटत असे. संगीत देता देता वाद्यांचा वापर कसा करावा याची समज त्यांना आली. कळत नकळत संगीताचा अभ्यास होऊ लागला. पळसुले यांनी काही काळ वसंत पेंटर यांच्या चित्रसंस्थेत शिपायाची नोकरी केली. मात्र संगीत दिग्दर्शक व्हायचे, हाच त्यांचा उद्देश होता. लवकरच, म्हणजे १९६५ साली त्यांना संगीत दिग्दर्शनासाठी सुधारलेल्या बायकाहा चित्रपट मिळाला. त्यातली लाडकीचे लाड राया पुरवाल का?’ ही लावणी लोकप्रिय झाली. प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती करण्याच्या दृष्टीने परिणामकारक संगीत देण्याकडे बाळ पळसुले लक्ष देऊ लागले. पळसुले यांनी मराठीत कव्वाली ढंगाच्या चालीचा प्रथमच प्रयोग केला. थापाड्याया त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाची गाणी फारच गाजली. तेव्हापासून मराठी रसिक बाळ पळसुळे यांना ओळखू लागले.  बाळ पळसुले यांनी सुमारे साठ चित्रपटांना संगीत दिले आहे. अथांगअनोळखीया दूरदर्शन मालिकांनाही त्यांनी संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेल्या पंढरीची वारीया चित्रपटाला शास्त्रीय संगीताचे सूरसिंगारपारितोषिक मिळाले आहे. त्यांनी एकूण १५० मराठी चित्रपटांना संगीत दिले. तसेच हिंदी, गुजराती, भोजपुरी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेली कुठं कुठं जायाचं हनिमुनला...’, ‘धरिला पंढरीचा चोर’, ‘अवती भवती डोंगरझाडीही गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. त्यांच्याकडे आशा भोसले, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, सुलोचना चव्हाण, सुमन कल्याणपूर, कृष्णा कल्ले, अनुराधा पौडवाल, अनुप जलोटा हे गायक गायले. बाळ पळसुळे यांना त्यांच्या सांगीतिक जीवनाच्या वाटचालीसाठी दादासाहेब फाळके अकादमीचा पुरस्कार, मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार (२००६) मिळाले आहेत. तर १९७५ मध्ये कोल्हापूर नगर परिषदेने, १९९० मध्ये सांगली नगर परिषदेने त्यांचा सन्मान केला. बाळ पळसुले यांचे ३० जुलै २०१२ रोजी निधन झाले.

https://www.youtube.com/watch?v=rNAFw5eH2UY

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ मधू पोतदार

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज हॉलिवूड मधील अॅक्शन हिरो #अरनॉल्ड_श्वार्झनेगर चा वाढदिवस.

जन्म.३० जुलै १९४७ रोजी ऑस्ट्रियामधील थाल येथे.

हॉलिवूडचा प्रसिद्ध नायक अर्नोल्ड श्वार्झनेगरला ओळखत नाही, असा एकही हॉलिवूडचा चाहता नाही. ९०च्या दशकापासून आपल्या पिळदार शरीरयष्टीच्या जोरावर अॅक्शन चित्रपट करणारा अर्नोल्ड अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला होता.  अरनॉल्ड त्याच्या निकटवर्तीयात 'अर्नी' या टोपणनावाने प्रसिद्ध आहे. अरनॉल्डचा जन्म एका कॅथोलिक कुटुंबात झाला. अरनॉल्ड श्वार्झनेगर अद्भुत बॉडीबिल्डर आहे. अरनॉल्ड बॉडी बिल्डिंगचे करिअर करावयाचे होते. १९६५ मध्ये त्याने ज्युनिअर मिस्टर युरोपचे टायटल पटकावले होते. १९६६ मध्ये मिस्टर युरोप, १९६६, १९६७, १९६८, १९६९ अशी चार वर्षे सलग त्याने हौशी आणि व्यावसायिक मिस्टर युनिव्हर्सचा किताब जिंकला. १९६९ ते १९७५ अशी सलग सहा वर्षे तो मिस्टर ऑलिम्पिया किताबाचा जेता झाला. अरनॉल्डच्या अंगात स्पोर्ट्समनशिप भिनण्यात त्याच्या वडिलांचा वाटा होता, ते खूप ताकदवान आणि चैतन्यशील खेळाडू होते. बालवयात शिक्षणाकडे कल असलेल्या अरनॉल्डने १९६० मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी पहिल्यांदा डंबेल्स हाती घेतले. खरे तर शाळेत असताना त्याला खेळांची प्रचंड आवड होती पण वडील नेमके कसे व्यक्त होतील याचा अंदाज नसल्याने त्याचे मन धजावत नव्हते. शाळेतील क्रीडाशिक्षकांनी गळ घातल्यानंतर मात्र तो फुटबॉलच्या टीममध्ये सामील झाला आणि आपण चांगला फुटबॉलपटू होऊ शकतो हे त्याने सिद्ध करुन दाखवले. मात्र त्याच्या शारीरिक ठेवणीचा आणि क्षमतेचा अंदाज आलेल्या प्रशिक्षकांनी त्याला सॉकरऐवजी शरीरसौष्ठवाकडे लक्ष देण्यास सांगितले आणि येथून अरनॉल्डचे आयुष्य बदलले. पुढे जाऊन त्याला व्यायामाची इतकी आवड निर्माण झाली की एक दिवस जरी व्यायाम चुकला तरी त्यांस कसेसेच वाटे, इतकेच नव्हे तर व्यायाम बुडवल्या दिवशी तो आरशात पाहणे टाळायचा. पुढे हॉलिवूडमध्ये जाऊन अॅक्शन फिल्म्सचा हिरो म्हणून तो तुफान यशस्वी झाला. त्याची अद्भुत शरीरयष्टी पाहून त्याला हॉलिवूडमध्ये प्रचंड मारामारी आणि स्टंट्स असणारे सिनेमे मिळत गेले, ते एकापाठोपाठ एक हिट होत गेले आणि तो हुकुमी नायक बनला. हर्क्युलस इन न्यूयॉर्क, कॉनन दी बार्बेरियन, कमांडो, प्रिडेटर, रेड हीट, टोटल रिकॉल, किंडरगार्टन कॉप, टर्मिनेटर सीरिज, ट्रू लाइज, इरेझर, एंड ऑफ डेज, कोलॅटरल डॅमेज, दी एक्स्पान्डेबल्स सीरिज - असे त्याचे अनेक सिनेमे प्रसिद्ध आहेत.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

पु ल देशपांडे यांचे वसंतरावांच्या विषयीचे प्रेम, कौतुक,  त्यांच्या गायकीला दिलेल्या सुरेख उपमानी तेजाळले आहे. वाचनीय व संग्रही ठेवावा असा सर्वांग सुंदर लेख आहे.

असे #वसंतराव_देशपांडे.

लेखक:-पु. ल. देशपांडे

पूर्वग्रहांचे चष्मे लावून पाहणाऱ्यांना जसे दीनानाथराव पटले नाहीत तसाच त्यांना हा एकलव्यही पटणार नाही. एकदा माझ्या घरी वसंता गात होता आणि आमचे नाना जोग एकदम ओरडले -

अरे वसंता सहन होत नाही! इतके जडजवाहीर असे दण-दण दण-दण काय उधळतोस. जरा एक एक दागिना पाहायला तर आम्हाला उसत देशील!”_

वसंताच्या स्वभावातच ही सबुराई नाही. स्वरांचे इतके बंधन त्याच्यापुढे नाचायला लागतात की ऐकणाऱ्याला धाप लागते. त्याच्या गायकीतली ती मस्ती हा त्याचा गुण असेल किंवा दोष असेल पण हा त्याचा 'मिजाज' आहे.

निखारे असोत वा फुले असोत. त्यांची वादळी वृष्टीच होणार! म्हणूनच की काय कोण जाने शतजन्म शोधितांना’, ‘असे जीत पहायासारख्या किंवा रवी मी भाळी चंद्र असे धारियाह्या खडिलकरांच्या गाण्यासारख्या तेजस्वी गाण्यात वसंतराव अतिशय रमतात! त्यांचे गाणे गुंगी आणीत नाही. हेलिकॉप्टरसारखे वर उचलून नेते. हा दोषच असेल तर ग्रीक ट्रॅजेडीतल्या नायकाच्या दोषासारखा उदात्त दोष आहे. ह्या दीनानाथांच्या तुफानी स्वरसृष्टीशी बालवयात त्याचा जीव जडला त्या सृष्टीचा हा दोष आहे.

पण कलावंताला म्युनिसिपालिटीच्या आखीव बागेतली रोपटी दाखवतच हिंडा असे कोणी सांगावे? त्याला घनदाड जंगल, खोल दऱ्या, भीषण चढणीची ओढ जडली तर तो दोष त्याचा नाही! सारे काही सांभाळून करण्यात रमणाऱ्या भीरू मनाचा आहे वसंता!

 

वसंताच्या पिंडातच ही खांसाहेबी आहे. कट्यार काळजात घुसलीमध्ये दाढ्यामिश्या लावून ती खांसाहेबी अधिक ढोबळ केली गेली एवढेच! उर्दू उच्चारातली त्याची सफाई काही नाटकांच्या तालमीत घोटलेली नाही. त्याची तबियतच ऊर्दू वळणाची आहे!

पण ऊर्दू इतकेच वसंताचे संस्कृतवर प्रेम. तेही धुंवट नाही. एखाद दिवशी गंधाचे पट्टे ओढून ओला पंचा नेसून वसंतराव वेदशास्त्रासंपन्न ब्राम्हणासारखे मंत्रपठण करण्याचाही षौक करतात. तिथे मग पॅण्ट बुशशर्ट घालून सिद्धीविनायकाच्या रांगेत अर्धवट मॉर्डन आणि अर्धवट सनातनी होणे नाही.

नागर आणि ग्रामीण हिंदीचे ढंग त्याला अवगत आहेत. मराठीचे तर गोमंतकीय कोकणीपासून ते अस्सल वऱ्हाडीपर्यंत सर्व प्रकार तो पेलू शकतो. कुठल्या दिवशी वसंतरावांचा काय अवतार असेल हे सांगणे बिकट!

कुंडल्या तपासताना वसंतराव संपूर्ण होरा भूषण! रागांची नावे ठाऊक नसतील इतकी त्याला देशी आणि विदेशी औषधांची नावे पाठ! जुनी शिल्पकला, अध्यात्म, अंगाला तांबडी माती न लावता कुस्ती- त्याच्या अनुभवांच्या पोतडीत काय काय आहे ह्याचा मला तीस वर्षात मला नीटसा अंदाज आलेला नाही.

आफ्रिकेत हिराबाईंबरोबर गेला तिथे पगडीबिगडी घालून तीन तास किर्तन केले. उद्या तमाशात सोंगाड्या म्हणून उभा राहिला तर त्याच्या ग्रामीण बोलीत नगर उच्चारांचा मागमूस लागणार नाही. आणि ह्या सर्वांच्यावर ताण म्हणजे 'कारकुनी' ह्या विषयातली पारंगतता! कॅज्युअल लिव्ह मिळवण्याची बाराशे सुलभ कारणे ह्यासारखा कारकुनाचा मार्गदर्शक ग्रंथ त्याने आवश्यक लिहावा.

पाकशास्त्र हा एक वसंताचा आवडता विषय. कोंबडीपासून ते भेंडीपर्यंत हजार सामिष आणि निरामिष पाकक्रिया त्याला येत असाव्यात. गाण्याप्रमाणे खाण्याचा आणि पिण्याचा कोणाच्या मुर्वतीखातर त्याने विधीनिषेध मानला नाही.

मात्र गाण्याआड ह्यापैकी कशाला त्याने येऊ दिली नाही. कमरेला पंचा लावून वसंतराव जिलब्या तळत राहिले आहेत हे दृष्य मी डोळ्यांनी पाहिले आहे. भूमिकेशी इतका तद्रूप की त्या आचार्य अवतारात ह्याने गांजाची चिलीम चढवली आहे की काय अशी शंका यावी!

पुण्यातला गेल्या तीस वर्षातल्या व्याखानमाला पाठ असाव्यात त्याला! 'जिनमध्ये लाइम कॉर्डियलचे प्रमाण काय', इथपासून ते 'अवकहडा चक्र' म्हणजे काय इथपर्यंत त्याला सगळ्यात गम्य!

 

वसंताचे स्नेही ही त्याची फार मोठी कमाई आहे. पहिल्या भेटीत उखडेल वाटणारा वसंता मनाचा मवाळ आहे. चंपूताईच्या घरच्या बैठकीत जाजम घालील. कुमारविषयींच्या उत्कट प्रेमामुळे त्याला तबलजी म्हणून जाईल. नवख्या गायक-गायिकांचे तंबोरे जुळवून देईल. कारकूनांच्या सार्वजनिक सेवेत अनाथाच्या अंत्यविधीत सहाय्य करणे हा एक महत्वाचा भाग असतो. त्यात माणुसकिचा ओलावा आवश्यक असतो. वसंतरावांना रात्री-बेरात्री हाका घालणारा त्यांचा एक जुन्या दोस्तांचा गट आहे.

कारकुनी करुनही कुरकुर न करता जीवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घेत वसंता जगत आला आहे. त्याच्या जिवलगांच्या जगात भीमसेनेचे स्थान मोठे आहे. त्यांचे परस्परांविषयींचे प्रेम हा एक मजेदार मामला आहे.

भीमसेन जीवनात साहस आणि गाण्यात अभिजाततला आवश्यक असणारे सारे संयम सांभाळणारा, तर वसंता जीवनात सारे षौक संयमाने करुन गाण्यात अफाट साहसी. पण दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी.

परवाचीची गोष्ट... 'कट्यार' मध्ये तबल्याची साथ करणारा नाना मुळे. भीमसेनचे मंगळुरात गाणे संपल्यावर मुळ्याला आपल्या गाडीत घातला आणि स्वत: ड्राईव्ह करीत सोलापुरात वसंताच्या साथीला आणून हजर केला. वश्याबुवा, हा तुझा तबलजी!

जमलेली साथ नसली तरी वश्याबुवाचे गाणे बिघडेल म्हणून रात्रभर बैठक करुन थकलेला हा भारतीय किर्तीचा गायक मंगळूर ते सोलापूर गाडी हाकीत तबलजी आणून हजर करतो! ही प्रेमाची कोडी उलगडायला माणसाला जीवनात भान हरपायची स्थाने गवसावी लागतात.

एवढ्याने काय झाले आहे... हातात गायीच्या दुधाच्या दह्याचे एक मडके, तिळकुटाच्या चटणीचा डबा आणि कर्नाटकी बाजरीच्या भाकरी घेऊन ए बुवा, येता येता ह्या जिनसा तयार ठेवायला सांगितल्या होत्या. तुझ्या आवडिच्या - हा घ्या तुमचा तबलजी. तुमची गाणी ठणकवा. रात्री हे चेपा पोटात आणि बोंबला.अशा प्रेमसंवादानंतर भीमसेनबुवा पुण्याला रवाना.

तीन वर्षापूर्वी प्रथम ऐकलेल्या वसंताच्या गळ्यातल्या सुलतान षरके यारया गाण्यापासून अगदी परवा ऐकलेल्या बाला जोशीच्या घरच्या जनसंमोहिनी असंख्य मैफलींची आज डोक्यात गर्दी आहे.

आज आमच्या दोघांचीही वयाने पन्नाशी गाठली. पण हा वसंता पहिल्या भेटीतच रविंद्राच्या शब्दात सांगायचे म्हणजे माझ्या प्राणांना सुरांची आग लावून गेला.त्यानंतरच्या त्याच्या सुरांप्रमाणे त्याच्या स्नेहाने ही मशाल पेटती ठेवली. वाटेल त्यावेळी घातलेल्या हाकेला ओ देणारा मित्र लाभायला भाग्य लागते हे भाग्य माझे.

वसंता आज माझ्या कुटुंबियातलाच एक आहे. माझ्या आणि त्याच्या पत्नीच्या कौतुकाइतकीच तो दमदाटीही ऐकून घेतो. विशेषत: दमदाटीचा कार्यक्रम आमचे कुटुंब करते. नव्या पिढीतली जवान मंडळी वसंताच्या गाण्याला गर्दी करताना पाहून धन्यता वाटते.

वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपणाने मिरवीत जाणारी नाही. दर्यामखोर्यारतुन बेफाम दौडत जाणार्याे जवान घोडेस्वारासरखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.

वसंताचे गाणे ऐकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधता येते. सूरांचा हा झणझणीत कोल्हापूरी मटनाचा रस्सा आहे. नाजूक प्रकृतीच्या चाकोरीतून सारेच काही सांभाळीत जाणार्यांमना सोसणारा हा खुराक नाही. त्यांना घराण्याच्या रुळलेल्या निर्धास्त चाकोर्या  बर्याय !

वसंताने कारकून म्हणून चाकोरी सांभाळली. आणि कलावंत म्हणून मात्र झुगारली. दोन्ही भुमिकांविषयी तो तद्रुप होता. कारकुनाला चाकोरी हाच आधार तर चाकोरी मोडण्यातूनच कलावंत उभा राहतो.

#पुलदेशपांडे. 

संकलन.#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज मराठी चित्रपट अभीनेत्री #प्रिया_बेर्डे यांचा वाढदिवस.

जन्म.३० जुलै  कोल्हापूर येथे.

ग्रामीण बाजाच्या भूमिका करताना लागणारा रांगडेपणा, तरीही चेहऱ्यावर दिसणारा गोडवा, गालावर पडणारी खळी आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर थोड्याच कालावधीत प्रेक्षक प्रिय झालेल्या अभिनेत्री म्हणजे प्रिया अरुण कर्नाटकी. प्रिया अरुण या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रिया बेर्डे या त्या काळचे प्रसिद्ध छायालेखक वासुदेव कर्नाटकी यांची नात व मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक अरुण कर्नाटकी यांच्या कन्या होत.प्रिया बेर्डे यांच्या आई लता अरुण या उत्तम अभिनेत्री होत्या. लता अरुण आणि प्रिया बेर्डे या दोघीनी एक गाडी बाकी अनाडीचित्रपटात एकत्रित काम केले होते. त्यामुळे अभिनयाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. बालपणापासूनच त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती. त्यांनी खूपच लहान वयात माया जाधव यांच्याकडे नृत्य शिकायला सुरुवात केली. वयाच्या १२ व्या वर्षीपासून त्यांनी नृत्याचे कार्यक्रम केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी लहान वयातच विविध देशांना भेटी दिल्या. त्यांचे शिक्षण हे मुंबईतच झाले. मुंबईतील राजा शिवाजी विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांची नृत्याची आवड त्या जोपासत होत्या. त्यांच्या नृत्याचे सगळीकडेच कौतुक होत होते. त्याच दरम्यान त्यांना व्ही. शांताराम यांनी तेरा पन्ने या हिंदी मालिकेत काम करण्याची ऑफर दिली आणि अशाप्रकारे त्यांचा अभिनयक्षेत्रात प्रवेश झाला. यानंतर त्यांना अशी ही बनवाबनवी या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण या चित्रपटाच्या वेळी त्यावेळी प्रिया बेर्डे यांची वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेली नसल्यामुळे या चित्रपटाच्या करारनाम्यावर त्यांचे वडील अरुण कर्नाटकी यांनी सही केली होती. या चित्रपटातील ग्रामीण कमळीत्यांनी नेटकेपणाने रंगवली. या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी खूपच कमी वेळात यशाचे शिखर गाठले. विनोदी चित्रपटांच्या त्या जमान्यात लोकप्रिय विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत त्यांची अशी जोडी जमली कि प्रत्यक्ष जीवनातदेखील ते एकमेकांचे जोडीदार झाले, दोघांचे एकत्र असे अनेक विनोदी सिनेमे गाजले. प्रिया अरुण यांनी हम आपके है कौन, बेटा, जान, अनाडी यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.  एक धागा, आम्ही तिघी या दूरदर्शन मालिकांच्या मध्ये त्यांनी काम केले. त्यांना अभिनय व स्वानंदी अशी दोन मुले आहेत, अभिनय याने सतीश राजवाडे यांच्या ती सध्या काय करतेया चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले आहे. प्रिया बेर्डे यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. 

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

*आज ३० जुलै *

आज ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संगीतकार डॉ. #अशोक_रानडे यांचा स्मृतिदिन.

जन्म. २५ नोव्हेंबर १९३७

डॉ.रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं.गजाननराव जोशी, पं.लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले. संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌ या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. त्यांचे "संगीताचे सौंदर्यशास्त्र', "लोकसंगीतशास्त्र' हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज ज्येष्ठ अभिनेत्री #सुलोचना_दीदींचा वाढदिवस

जन्म. ३० जुलै १९२८ कोल्हापूर जवळील खडकलाट गावी.

हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचे पूर्ण नाव सुलोचना लाटकर. भालजी पेंढारकरांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. सन १९४३ ला त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेत्री/ घरंदाज आई म्हणून काम केले. भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनाच्या तालमीत तयार झालेल्या सुलोचनाबाईंची प्रतिमा लाखो चित्रपट रसिकांच्या मनात चित्रपटातील आई अशीच आहे. भालजी पेंढारकर यांने त्यांचे भावपूर्ण डोळे पाहून त्यांचे नामकरण सुलोचनाअसे केले. हेच नाव पुढे चित्रपटसृष्टीत रुढ झाले. अडीचशेहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या सुलोचना यांना चित्रपटसृष्टीत अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांच्या आई-वडिलांचे अकाली निधन झाल्याने बनूबाई लाटकर यांनी त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून अभिनयाची आवड असलेल्या सुलोचना यांनी १९४३ मध्ये मास्टर विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्सच्या चिमुकला संसारया चित्रपटातून वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. चित्रीकरणाव्यतिरिक्त उरलेल्या फुरसतीच्या वेळात भरपूर वाचन करून, संस्कृत श्लोक पठण करून त्यांनी शुद्ध मराठी नागरी भाषा आत्मसात केली. मराठा तितुका मेळवावाया चित्रपटात त्यांनी साकारलेली जिजाबाईंची भूमिका आजही मैलाचा दगड मानली जाते. २५० हून अधिक मराठी तसेच हिंदी चित्रपटांत त्यांनी आपल्या अभियानाची छाप पाडली. वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, धाकटी जाऊ हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. १९४३ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या सुलोचना यांनी कपूर घराण्याच्या तिन्ही पिढ्यांसोबत काम केले आहे. महाराष्ट्रभूषण’, ‘व्ही. शांताराम पुरस्कारयांसह अनेक मानसन्मान मिळालेल्या सुलोचना यांना भारत सरकारने १९९९मध्ये पद्मश्रीकिताबानेही गौरविले. त्यांच्या प्रदीर्घ अभिनय कारकीर्दीविषयी लेखक-पत्रकार इसाक मुजावर यांनी चित्रमाऊलीहे पुस्तक लिहिले आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते  डॉ. #वसंतराव_देशपांडे यांचा स्मृतिदिन.

जन्म.२ मे १९२० अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या गावी.

वसंतराव देशपांडे यांचे शिक्षण नागपूर शहरात झाले. त्यांची आई एक शिक्षिका होत्या. व त्या  जवळपासच्या देवळांमध्ये भक्तिसंगीतम्हणत असत. त्यामुळे संगीताचा वारसा आईच्या उदरातूनच मिळाला होता. शिवाय वयाच्या केवळ सातव्याच वर्षी त्यांना ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयप्रवेश मिळून खर्यात अर्थाने त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक प्रवासालासुरुवात झाली. अर्थात त्याला कारणही खूप सुंदर, अकल्पित व प्रेरणादायी होते

साल १९२७, नागपुरातल्या तेल्लीपूर परिसरात एक ७ वर्षांचा मुलगा आपल्या घराकडे परतत असताना अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने एका इमारतीच्या जिन्याखाली त्याने आडोसा घेतला. त्याच्या सहज गुणगुणण्याने मोहित होऊन त्या इमारतीतील एक वयस्कर सद्गृहस्थ खाली येऊन त्याला आपल्या घरात घेऊन गेले आणि तेच गाणे गायला सांगितले. आता तर त्याच्या आवाजावर ते बेहद खुश झाले. पाऊस ओसरल्यावर त्याला सोबत घेऊन त्याच्या घरी पोहोचले. या मुलाच्या गळ्यात गाणे आहे व मी याला शास्त्रीय संगीतशिकवण्यास तयार आहे. तुम्ही याला माझ्याकडे सोपवा, अशी गळ त्यांनी त्या मुलाच्या आईला घातली! आमची आर्थिक कुवत नाही व त्याच्या शिकवणीचे पैसे मी देऊ शकणार नाही, या कारणास्तव त्याच्या आईच्या नकारावर, ‘मी कोणतीही फी घेणार नसून शाळा संपल्यानंतर त्याच्या सोयीने संध्याकाळी शिकवणार आहे,’ असे आश्वा सन त्यांनी दिल्याने आईने होकार देत समाधान व कृतज्ञता व्यक्त केली. त्या पावसाळी दिवसाने  वसंतराव देशपांडे यांच्या आयुष्याला ऐतिहासिक कलाटणी मिळाली. वयाच्या केवळ सातव्याच वर्षात ग्वालियर घराण्याचे शंकरराव सप्रे यांच्या श्रीराम संगीत विद्यालयमध्ये प्रवेश मिळवून शास्त्रीय संगीतहा त्यांचा ऐतिहासिक प्रवासखऱ्या अर्थाने सुरू झाला.

 वसंतराव देशपांडे यांनी हिंदी चित्रपट संगीतफारसं गायलंच नाही. किंबहुना नन्हे मुन्ने (१९५२), चाचा चौधरी (१९५३) व रंगबिरंगी (१९८३) या तीनच चित्रपटांत त्यांनी गायल्याची नोंद आहे. त्यांची गायकी ही ठुमरी, दादरा, ख्याल, टप्पा व भजन याच प्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे. वयाच्या केवळ ८ व्याच वर्षी, त्यांची गायनकलाजाणून भालजी पेंढारकरयांनी कालियामर्दनया त्यांच्या चित्रपटात कृष्णाच्या भूमिकेत पदार्पणकरण्याची संधी दिली होती. मग एक उत्तम गायक, अभिनेता, ‘मराठी नाटक व चित्रपट संगीतकारम्हणून ते गाजले. बेगम अख्तर त्यांना आदराने गुरुजीसंबोधित करत, यातच त्यांची यशस्वी कारकीर्ददिसून येते. वयाच्या पन्नाशीपर्यंत गझल व ठुमरीया संगीत प्रकारातील एक प्रस्थापित गायकही ओळख मिळवूनही रसिकांसमोर ख्याल गायकीची संधीत्यांना मिळाली नव्हती, हे विशेष!

ग्वालियर घराण्याचेअधिकृत शिक्षण घेत असतानाच किराणा व भेंडीबजारया घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण चीजा  वसंतराव देशपांडे यांनी आत्मसात केल्या होत्या. पु.ल. देशपांडे यांचा वसंतरावांवर खास लोभ होता, पु.ल. देशपांडे यांनीच अनेक उस्तादअसणार्या. या शागीर्दला एकलव्यही उपमा/पदवी बहाल केली होती. मग अर्थातच, ‘परिपूर्ण गायकहा दर्जा प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या सगळ्या उस्तादांच्या कृपेनेत्या प्रत्येकाच्या घराण्याच्या गायकीतील सत्वआपल्या गळ्यात उतरवून स्वत:च्या खास अशा गायकीलाजन्म दिला. पंडित दीनानाथ मंगेशकरयांच्या संगीत नाटकांचातो काळ होता. त्यांची स्टाईलवसंतरावांना इतकी भावली की, ‘कळतनकळतत्यांनी आपल्या गायकीमध्ये दीनानाथांची स्टाईल बहखुबीने आत्मसात केली’, जी प्रकर्षाने व हुबेहूब जाणवत असे, ज्याचा वसंतरावांना सार्थ अभिमानहोता, हेही विशेषच!

 वसंतराव देशपांडे १९३८ साली मॅट्रिक झाले. लाहोरमध्ये रेल्वे खात्यात नोकरीस असणार्याा त्यांच्या मामांनी आपली संगीताची विशेष आवड व भाच्याचा गाता गळाया संयुक्त विचारांनी प्रेरित होऊन वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला घेऊन आले. आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली. तेथील दोन वर्षांच्या वास्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधनायावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. त्याच अंतर्गत उस्ताद बडे गुलाम अली खॉं व उस्ताद बरकत अली खॉंया बंधूद्वयींची मैफल कधीही चुकवली नाही. ठुमरी व गझलया गायनकलेचा सूक्ष्मात जाऊन अभ्यास केल

आज ३० जुलै

आज बॉलीवूड अभिनेता #सोनू_सूद चा वाढदिवस.

जन्म.३० जुलै १९७३ मोगा, पंजाब येथे.

भारतात कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात एक नाव सतत चर्चेत आहे, ते म्हणजे अभिनेता सोनू सूद याचे. भुकेल्या, खचलेल्या आणि आपल्या गावी जाण्यास अगतिक असलेल्या हजारो मजूरांना त्याने मदतीचा हात दिला. शेकडो किमीची पायपीट करत घरी निघालेल्या स्थलांतरीत मजूरांसाठी सोनूने बसेसची व्यवस्था केली. मदत मागणा-या प्रत्येकासाठी सोनू रात्रंदिवस खपत आहे. प्रत्येक मजुराला त्याच्या घरी सुरक्षित पोहोचण्यासाठी धडपडतो आहे. पडद्यावर भलेही सोनू सूदने खलनायकाच्या भूमिका रंगवल्या असतील पण या कामामुळे तूर्तास तरी सोनू सूद हा सगळ्यांचा हिरो झाला आहे. सोशल मीडियावर लोक काळात त्याला लॉकडाऊन हिरोम्हणून संबोधत होते.

सोनू सूद हा मुळचा पंजाबच्या मोगाचा आहे. मोगा येथे सोनूच्या वडिलांचे कपड्यांचे दुकान होते. ज्याचे नाव होते. सोनू आई मात्र प्रोफेसर होती. आपल्या मुलाने चांगले काही करून नाव कमवावे, अशी तिची इच्छा होती. त्यामुळे सोनूला इंजिनिअर बनवण्यासाठी तिने त्याला नागपुरात पाठवले. पण सोनूला त्याच्यातील अभिनयाचा किडा स्वस्थ बसू देईना. सोनू इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर झाला खरा पण अभिनेता बनण्याचे स्वप्न त्याला सारखे खुणावत होते. अखेर त्याने निश्चय केलाच. मला फक्त दीड वर्ष दे. या दीड वर्षात काहीही जमले नाही तर मी पापाच्या दुकानात बसेल, असे आईला वचन देऊन सोनू मुंबईत आला आणि स्ट्रगल सुरु झाला. एका फ्लॅटमध्ये  मित्रांसोबत सोनू राहत होता. ऑडिशनवर ऑडिशन देण्याचे सिलसिला अखंड सुरु होता. पण प्रत्येकठिकाणी त्याला नकार मिळत होता. एकाठिकाणी सोनूने स्वत:चे फोटो पाठवले आणि त्याची लॉटरी लागलीच. साऊथच्या एका सिनेमासाठी तू सिलेक्ट झाला आहे, असा कॉल सोनूला आला. खरे तर सोनूला बनायचे होते हिंदी सिनेमाचा हिरो. मात्र हाताला काम नव्हते, जवळचे पैसे संपले होते. अशात बिचारा काय करणार. हिंदी नाही तर साऊथचा सिनेमाच करू, म्हणून सोनू ऑडिशनसाठी पोहोचला. ऑडिशन सुरु झाले आणि शर्ट काढ, असे सोनूला सांगण्यात आले. यावर भाई, शर्ट क्यों उतरवा रहे हो, असा प्रश्न सोनूने केला. पण रोल हवा तर शर्ट काढ, असे त्याला सुनावण्यात आले. बिच्चारा सोनू यासाठीही तयार झाला आणि त्याने शर्ट काढले. मात्र शर्ट काढताच जणू चमत्कार झाला. सोनू भैय्याची बॉडी पाहून प्रोड्यूसर, दिग्दर्शक सगळेच त्याची तारीफ करायला लागले. बॉडीच्या जोरावर सोनू सिलेक्ट झाला.

सोनूने तामिळ सिनेमा केला. यानंतर तेलगू सिनेमा केला. पण हिंदी सिनेमा काही मिळेना.  साऊथ इंडस्ट्रीत दोन वर्षे काम केल्यानंतरही हिंदी सिनेमात झळकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशी चिन्हे दिसेनात. मात्र म्हणतात ना, सब्र का फल मिठा होता है.

२००२ मध्ये त्याचे नशीब फळफळले. शहीद ए आजमहा सिनेमा त्याला मिळाला. या हिंदी सिनेमात सोनूने शहीद भगत सिंगची भूमिका साकारली. मग काय मोगाचा हा पोरगा असा काही चमकला की, यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्याने  कहां हो तुम, युवा, शीशा, आशिक बनाया आपने, जोधा अकबर, एक विवाह ऐसा भी, दबंग, बुड्ढा होगा तेरा बाप,   आर...राजकुमार आणि  हॅप्पी न्यू ईअर यासारख्या अनेक सिनेमांत त्याने काम केले. यापैकी दबंगमध्ये त्याने साकारलेली छेदी सिंहची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज बॉलिवूडमधील वादग्रस्त अभिनेत्री #मंदाकिनी चा वाढदिवस.

जन्म.३० जुलै १९६९ मेरठ येथे.

१९८५  मध्ये आलेला राज कपूर यांचा चित्रपट, राम तेरी गंगा मैली मधून एका रात्रीत प्रसिद्ध झालेल्या मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन जोसेफ. तिची आई मुस्लीम आणि वडील ख्रिश्चन होते. मंदाकिनीला लहानपणापासून अभिनयात रस होता, वयाच्या १६ व्या वर्षी तिला पहिला ब्रेक मिळाला.

राम तेरी गंगा मैलीया चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. मंदाकिनी हे नाव एका रात्रीत देशभरात प्रसिद्ध झाले होते. मंदाकिनीला या चित्रपटाने त्या सर्व गोष्टी दिल्या, ज्याची इतर अभिनेत्रींना आयुष्यभर आस असते. या चित्रपटानंतर मंदाकिनीकडे चित्रपटांच्या ऑफरची रांग लागली होती.

मंदाकिनीने १९८५ ते १९९० या पाच वर्षात मिथुन चक्रवर्तीसोबत डांस डांस’, गोविंदासोबत प्यार करके देखोआणि अनिल कपूरसोबतच्या हिट चित्रपटांत काम केले. मंदाकिनी बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. मंदाकिनीने ४५ चित्रपटात अभिनय केला. पण अचानक ती या सिनेसृष्टीतून गायब झाली आणि चर्चा रंगू लागल्या १९९४ मधील दाऊदसोबत मंदाकिनीचं नाव जोडलं जाऊ लागल्यानंतर ती अचानक गायब झाली.१९९६ मध्ये शेवटचा चित्रपट जोरदाररिलीज झाला पण त्यानंतर मंदाकिनी कुठे गेली हे कोणालाच कळालं नाही. मंदाकिनीने दाऊदसोबतचे संबंध नाकारले होते पण शारजा क्रिकेट स्टेडिअममध्ये मंदाकिनी दाऊद सोबत सामना पाहतांना दिसली होती. १९९५ मध्ये तिने बौद्ध संत कागीर रिनपोचे सोबत लग्न केले आणि सध्या ती मुंबईत तिबेटी हर्बल सेंटर चालवत आहे. तसेच मंदाकिनी लोकांना तिबेटी योगा शिकवते. मंदाकिनीने आता बौद्ध धर्म स्वीकारला आहे. मंदाकिनीने स्वत:ला चमकदार जगापासून वेगळे केले आहे. मंदाकिनीची दोन मुले होती. पुत्र रब्बील आणि मुलगी राब्जे. २००० मध्ये मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला होता.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज अभिनेत्री #आकांक्षा_सिंह चा वाढदिवस.

जन्म. ३० जुलै १९९० जयपुर येथे.

आकांक्षा मूळची जयपूरची आहे. तिने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात 'ना बोले तुम ना मैने कुछ कह' या मालिकेतून केली, ज्यात तिने विडो मेघाची भूमिका साकारली होती, त्यानंतर ती गुलमोहर ग्रँडमध्ये दिसली. या शोमध्ये आकांक्षाने २१ वर्षाच्या मुलीची भूमिका केली होती. 'मे-डे' या चित्रपटा मध्ये अजय देवगणच्या पत्नीची भूमिकेत आकांक्षा सिंग दिसणार आहे. आकांक्षाचा हा दुसरा हिंदी चित्रपट आहे. वरुण धवन आणि आलिया भटच्या 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटांमधून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये आकांक्षाने 'मल्ली राव' सिनेमाव्दारे तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर तिने देवदासमध्ये भूमिका साकारली. २०१९ मध्ये आकांक्षाने पहलवान कन्नड चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज अभिनेता #मिमोह_चक्रवर्ती चा वाढदिवस.

जन्म. ३० जुलै १९८४ मुंबई येथे

मिमोह चक्रवर्ती चे खरे नाव महाक्षय चक्रवर्ती आहे, मिमोह हा बॉलिवूड सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा आहे.  झाला होता. मिमोहने २००८ मध्ये 'जिमी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ज्यासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट बेस्ट् मेल डेब्यूत म्हणून नॉमिनेशन केले गेले होते.

या नंतर त्याने द मर्डर, हॉन्टेड 3D,लूट, रॉकी, तुक्का फिट, इश्कदरियाँ या चित्रपटात अभिनय केला आहे.मिमोहने २०१८ मध्ये अभिनेत्री मदालसा शर्मा बरोबर लग्न झाले आहे. टीव्ही वरील सीरियल 'अनुपमा' मध्ये काव्या हे पात्र मदालसा शर्माने निभावले होते.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ३० जुलै

आज प्रसिद्ध पार्श्वगायक #सोनू_निगम चा वाढदिवस.

जन्म.३० जुलै १९७३ फरीदाबाद, हरियाणा येथे.

सोनू निगमने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या चौथ्या वर्षापासून केली. एका स्टेज शोवेळी सोनूने त्याचे वडील अगम कुमार निगम यांच्यासह मोहम्मद रफी यांचे 'क्या हुआ तेरा वादा' हे प्रसिद्ध गाणे गायले होते. त्यानंतर वडिलांसह तो अनेक लग्न आणि पार्ट्यांमध्ये गाताना दिसला होता. वयाच्या १९ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये सिंगिंग करिअर सुरु करण्याच्या उद्देशाने सोनू मुंबईत आला. सुरुवातीच्या काळात सोनूने मोहम्मद रफी यांची गाणी गायली. त्यामुळे त्याला 'रफी क्लोन' या नावाने ओळखले जाऊ लागले होते. १९९० मध्ये 'जानम' या चित्रपटासाठी सोनूने पहिल्यांदा पार्श्वगायन केले होते, मात्र ते गाणे रिलीज होऊ शकले नाही. १९९५ मध्ये त्याने 'सारेगामा' हा सांगितिक रिअॅलिटी शो होस्ट केला. याचवर्षी त्याने 'बेवफा सनम' या सिनेमातील 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का' हे गाणे गायले. त्याकाळी हे गाणे बरेच गाजले होते. त्यानंतर १९९७ मध्ये 'बॉर्डर' सिनेमातील 'संदेसे आते है' या गाण्याने सोनूला बरीच प्रसिद्ध मिळवून दिली. हे गाणे अनू मलिक यांनी कंपोज केले होते. सोनून त्याच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत अनेक गाणी गायली. याशिवाय 'दीवाना', 'याद', 'जान' आणि 'चंदा की डोली' हे अल्बमसुद्धा तयार केले. सोनू निगमचे मराठी चित्रपटसृष्टीशी असलेले नाते नवीन नाही. हिरवा निसर्गहे नवरा माझा नवसाचाचित्रपटाचे गाणे व टिक टिक वाजतेहे दुनियादारीचे गाणे, ही दोन्ही अतिशय लोकप्रिय गीते सोनू निगमने गायले आहे. सोनू निगमला दोन बहिणी आहेत. निकिता आणि तीशा ही त्यांची नावे आहेत. सोनूच्या दोन्ही बहिणी पार्श्वगायिका म्हणून करिअर करत आहेत. सोनूच्या पत्नीचे नाव मधुरिमा आहे सोनू निगमचा मुलगा नवीनने २०११ मध्ये धनुषने गायलेले 'व्हाय धीस कोलावरी डी' या गाण्याच्या चाइल्ड व्हर्जन गायले होते.

सोनू निगमला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज संगीतकार व संगीत आयोजक #पराग_माटेगावकर यांचा वाढदिवस.

जन्म.२९ जुलै

पराग माटेगावकर हे मुळचे नागपूरचे. त्यांचे संगीताचे शिक्षण गांधर्व महाविद्यालयात झाले.

पराग यांनी सुरुवातीचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण केशवराव राजहंस यांच्या कडे घेतले.या सोबतच त्यांनी सिंथेसायझर चे शिक्षण भोला घोष यांच्याकडे घेतले. सिंथेसायझर सोबतच ते उत्तम हार्मोनियम वादक असून १९९६ मध्ये संगीतात करीयर करण्यासाठी पराग पुण्यात आले.

गेली २५ वर्षे ते संगीत क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, शंकर महादेवन, अरुण दाते, सुरेश वाडकर, रविंद्र साठे, उत्तरा केळकर, श्रीधर फडके, महालक्ष्मी अय्यर, साधना सरगम अशा अनेक नामवंत कलाकारांच्या बरोबर पराग यांनी सिंथेसायझर व हार्मोनियम वादक म्हणून काम केले आहे. पराग अनेक मोठ्या मोठ्या संगीताच्या लाईव्ह कार्यक्रमाचे नियोजन त्यांच्या 'स्वरश्री' या संस्थे मार्फत केले असून केले. कोविडच्या आधी नागपूरला नितीन गडकरी यांच्या साठी त्यांनी खासदार मोहोत्सव (मै लता) सारख्या चार मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले मै लता, एलपी, एराडी(ए आर रेहमान व आरडी), ट्रिब्यूट टु लिजंड, या सारखे अनेक अनप्लग थीम बेस लाईव्ह कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आहे.

तसेच पराग यांनी त्यांचे मित्र गिरीष अत्रे यांच्या सोबत तीन तीन दिवसाच्या तीन तीन दिवसाच्या सुगम संगीत संमेलनाचे आयोजन पुणे,नागपूर,सोलापूर या ठिकाणी केले यात देवकी पंडित,शोनक अभिषेकी,संजीव अभ्यंकर यांच्या सारख्या अनेक दिग्गजांनी सहभाग केला होता. २०१८ मध्ये पुणे फेस्टिव्हलच्या अंतर्गत ज्येष्ठ कवी ग.दि. माडगूळकर, ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक अभिनेते पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारीत प्रतिभा संगमया  कार्यक्रमा पराग माटेगावकर यांनी संगीत संयोजन केले होते. त्यांच्या 'स्वरश्री' या संस्थेला या वर्षीच २५ वर्ष पूर्ण झाली. पराग यांच्या 'स्वरश्री' या संस्थेने अनेक नवीन कलाकारांना व्यासपिठ उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. आता त्यांनी 'स्वरश्री' अॅकाडमी सुरु केली असून त्या अंतर्गत हार्मोनियम,सतार, सिंथेसायझर,बासरी,गिटार, शास्त्रीय संगीत,सुगम संगीत याचे सध्या कोविड मुळे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे, याला देशविदेशातून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा 'स्वरश्री' या नावाचा युट्यूब चॅनेल असून त्या वरील 'ध्येयवेडे कलाकार' या सिरीज मध्ये आपल्याला ४० कलाकारांच्या मुलाखती एकावयास मिळतात. अधिक पराग यांनी या वर्षी आपल्या युट्यूब चॅनेल वर एप्रिल २०२१ मध्ये  "रामार्पण " ही सिरीज १३ एप्रिल २०२१ (गुडीपाडवा ) ते २१ एप्रिल २०२१ (रामनवमी ) या काळात केली होती या काळात रोज  एक गाणं आपल्याला ऐकता आले.

तीन वर्षा पूर्वी पराग माटेगावकर यांना पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानच्या कडून उत्तम वादकासाठीचा विजयाबाई गदगकर पुरस्कारमिळाला आहे.

पराग माटेगावकर हे सुप्रसिद्ध गायिका सुवर्णा माटेगावकर यांचे पती होत व मराठी अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरचे वडील होत. पराग माटेगावकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संपर्क.9822309183

पराग माटेगावकर यांचे 'स्वरश्री' युट्यूब चॅनेल.

https://www.youtube.com/channel/UCwnXoCfdxImsyBEECyPEVjA

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

ओके

No comments:

Post a Comment