१० ऑगस्ट - दिनविशेष= स्मृतिदिन

 

१० ऑगस्ट

फर्डिनांड मेजेलन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला

************

 

१० ऑगस्ट १५१९

 

फर्डिनांड मेजेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला.

 

फर्डिनांड मेजेलन (१४८० ते २७ एप्रिल १५२१) हा एक पोर्तुगीज खलाशी होता. १५१९ ते १५२२ दरम्यान पृथ्वीची जलयात्रा सर्वप्रथम पूर्ण करण्याचे श्रेय मेजेलनला दिले जाते.

 

वास्तविकपणे मेजेलन स्वतः ही जगयात्रा पूर्ण करू शकला नाही, कारण २७ एप्रिल १५२१ रोजी फिलिपाईन्स मधील सेबू ह्या प्रांतात घडलेल्या एका चकमकीत तो ठार झाला.

 

मेजेलनची सामुद्रधुनी हे नाव मेजेलनवरूनच देण्यात आले आहे.

 

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532

 

************

************

१० ऑगस्ट

जागतिक जैव इंधन दिवस

************

 

आज आंतरराष्ट्रीय जैव इंधन (बायो डीझेल) दिवस !

 

जैविक इंधन दिवस हरित जनावरांच्या जैविक इंधन (हरित ईंधन) बद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. जागतिक जैवइंधन दिन दरवर्षी १० ऑगस्ट रोजी विलक्षण यश प्रदर्शित करण्यासाठी साजरा केला जातो.

 

१० ऑगस्ट १८९३ रोजी सर रुडॉल्फ डिझेल ने (डिझेल इंजिनचा शोधक) यशस्वीपणे यांत्रिक इंजिनसह मॅन ऑफ ऑईल लाँच केले. संशोधनाचा वापर केल्यानंतर त्यांनी अंदाज केला की पुढच्या शतकात, विविध यांत्रिक इंजिन भाजीपालांच्या जागी जीवाश्म इंधन वापरले जाऊ शकते.

 

बायो डीझेल म्हणजे अपारंपारिकरित्या मिळवलेले इंधन. कुठल्याही वनस्पतीजन्य तेलाचे ट्रांसईस्टरिफिकेशन या रासायनिक प्रक्रियेद्वारे मोनो अल्कली मध्ये रुपांतर केले तर मिळणारा पदार्थ म्हणजे बायो डिझेल.

 

बायो डिझेलचे इंधन गुणधर्म हे पेट्रोलियम डीझेल सारखे असतात. मात्र यात गंधकाचे प्रमाण नगण्य असते. म्हणून सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. यासाठी लागणारे तेल हे वनस्पतीजन्य (तेल बिया) असल्याने हा नैसर्गिक व अपारंपारिक असा उर्जास्त्रोत आहे.

 

अमेरिकेत मका तसेच सोयाबीनचे तेल यासाठी वापरले जाते. तर पाम तेलाचा वापर युरोप खंडातील देश आणि भरपूर उपलब्धी मुळे मलेशिया मध्ये करतात. भारतात खाद्यतेल बिया बायो डिझेल साठी वापरल्या जात नाहीत त्या ऐवजी करंजी नामक झाडापासून मिळणाऱ्या बियांचा वापर केला जातो.

 

मर्सिडीज ह्या प्रतिष्ठीत मोटारींच्या उत्पादकांकडून प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या बायो डिझेलच्या प्रोजेक्ट यशस्वी झाला आहे. बायो डिझेलच्या निर्मिती साठी वापरल्या जाणाऱ्या करंजीच्या लागवडी संदर्भात शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन व्हावे, म्हणून ही कंपनी एनजीओच्या माध्यमातून उपक्रम राबवते आहे. सुरुवातीला महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये हा उपक्रम राबविला जाईल.

 

पडीक जमिनी मध्ये करंजीची लागवड करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना त्यातून उत्पन्न मिळवता येईल. डेम्लर क्रायस्लर इंडिया या कंपनीने आतापर्यंत काही बायोडिझेलचे प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवले आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१० ऑगस्ट

डेंग्यू प्रतिबंध दिवस

************

 

पावसाळा सुरू झाला की विविध किटकजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डासांपासून प्रसारीत होणारे आजार अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात.

 

पावसाळ्याच्या हंगामात बहुतेकदा डास आणि कीटक वाढतात. याचा परिणाम लोकांना डेंग्यू सारखा धोकादायक आजार होतो. यामुळेच दरवर्षी १० ऑगस्टला 'डेंग्यू प्रतिबंधक दिवस' साजरा केला जातो.

 

डेंग्यू हा आजार व्हायरसमुळे होतो, यालाच "डेन व्हायरस" देखील म्हंटले जाते. डेंग्यू हा आजार 'एडिस' नावाच्या डासापासून होतो. या डासाच्याही दोन प्रजाती आहेत, एडीस  इजिप्ताय आणि एडीस एल्बोपेक्टस.

 

पावसाळ्यात ज्या ठिकाणी नेहमी पाणी साचते त्या ठिकाणी 'एडीस' सारख्या डासांचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात होतो, म्हणून आपण ज्या परिसरात राहतो तेथे या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला डेंग्यू पासून काही धोका निर्माण होणार नाही.

 

लक्षणे :

 

सर्दी, खोकला, सांधेदुखी, तीव्र ताप येणे. मळमळणं आणि उलट्या, पोट दुखणे, त्वचेवर व्रण उठणं.

 

बचाव करण्यासाठी टिप्स :

 

* साचलेलं पाणी बदलावं - कुलर, बादली आणि इतर भांड्यांमधील साचलेलं पाणी आठवड्यातून एकदा बदलावं. डेंग्यूचे डास साचलेल्या चांगल्या पाण्यामध्येही वाढतात. जर आपल्या घरात असं साचलेलं पाणी असेल तर डेंग्यूच्या डासांपासून वाचण्यासाठी पाणी बदलण्यासोबत, पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवणं आवश्यक आहे.

 

* आपले हात-पाय झाकून ठेवावेत - डेंग्यूच्या प्रसरणाचा सर्वात मोठा ऋतू म्हणजे पावसाळा. सर्वांनी असेच कपडे घालावेत ज्यानं आपले हात-पाय झाकले जातील आणि डासांना चावण्यासाठी जागा मिळणार नाही. तसंच डासांपासून बचाव करण्यासाठीचं क्रीमही आपल्या त्वचेवर लावणं उत्तम.

 

* रात्री मच्छरदाणीचा वापर करावा - रात्रीच्या वेळी डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. घरात डासांना पळवणाऱ्या स्प्रेचा सुद्धा वापर आपण करू शकतो. मात्र, ज्यांना असा स्प्रे वापरल्यास श्वास घेण्यास त्रास होतो, त्यांनी मच्छरदाणीचा वापर करणं जास्त चांगलं आहे.

 

* ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा - घरात नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा. मात्र, पावसाळ्यात हे करणं अगदी आवश्यक आहे. कारण पावसाळ्यात डेंग्यू पासून रक्षण करण्यासाठी डासांची ओल्या कचऱ्यामध्ये होणारी वाढ आपल्याला रोखता येईल.

 

* रुग्णांना सुरक्षित आणि मोकळं ठेवावं - डेंग्यू पासून बचाव करणं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच महत्त्वाचं डेंग्यू झालेल्या रुग्णाची काळजी घेणं होय. जर घरात डेंग्यूचा रुग्ण असेल तर त्याला चावलेला डास इतर कुणालाही चावू शकतो आणि त्यामुळं डेंग्यू पसरू शकतो, म्हणून रुग्णाची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

सौजन्य : LetsUp

 

************

************

१० ऑगस्ट

अभिनेता प्रेम अदिब जन्मदिन

************

 

जन्म - १० ऑगस्ट १९१७ (सुलतानपूर)

स्मृती - ५ डिसेंबर १९५९ (मुंबई)

 

शिवप्रसाद अदिब उर्फ प्रेम नारायण उर्फ प्रेम अदिब हे चाळीसच्या दशकातल्या हिंदी चित्रपट सृष्टीतले एक महत्त्वाचे अभिनेते होते.

 

रामराज्य, भरत मिलाप, रामबाण, रामविवाह, राम नवमी, राम हनुमान युद्ध, राम लक्ष्मण, आणि रामभक्त बिभीषण यांसारख्या तब्बल आठ सिनेमांत त्यांनी साकारलेली प्रभू रामाची भूमिका प्रचंड गाजली आणि लोकप्रिय झाली होती.

 

प्रेम अदिब व शोभना समर्थ यांची राम व सीता म्हणून त्या काळात जोडी गाजली होती. त्यांची रामराज्यही फिल्म त्या काळी १०८ आठवडे चालली होती. त्या काळच्या पौराणिक फोटो असलेल्या कॅलेंडर्सवरही त्यांचे रामाच्या भूमिकेतले फोटोज असत.

 

प्रतिमा, निराला हिंदुस्तान, घूंघटवाली, भोलेभाले, साधना, सौभाग्य, देहाती, कसम, दर्शन, चूडियाँ, स्टेशनमास्तर, पोलीस, अंगुलीमाल; असे त्यांचे सिनेमे त्या काळी गाजले होते.

 

प्रेम अदिब यांचे ५ डिसेंबर १९५९ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१० ऑगस्ट

माजी राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी जन्मदिन

************

 

जन्म - १० ऑगस्ट १८९४ (ब्रह्मपूर,ओरिसा)

स्मृती - २३ जून १९८० (चेन्नई)

 

भारताचे माजी राष्ट्रपती वराहगिरी वेंकट गिरी यांचा जन्म १० ऑगस्ट १८९४ रोजी ब्रह्मपूर ओरिसा येथे झाला.

 

व्ही. व्ही. गिरी यांचा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. प्राथमिक शिक्षण बेऱ्हमपूर येथे झाल्यावर डब्लिन विद्यापीठात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. बार अ‍ॅट लॉ झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. पुढे ते काँग्रेसचे सभासद झाले आणि होमरूल चळवळीत सहभागी झाले. कामगार संघटनेचे सचिव व ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते अध्यक्ष होते.

 

जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेत भारताच्या कामगारांचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते. १९३१ मध्ये त्यांनी गोलमेज परिषदेत भाग घेतला. १९३४ ते १९३७ या दरम्यान मध्यवर्ती विधिमंडळात त्यांनी कामगारांचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी ते कामगार, उद्योगधंदे, सहकार व वाणिज्य यांचे मद्रास इलाख्यात मंत्री होते.

 

हंगामी हिंदुस्थान सरकारचे परराष्ट्र वकील म्हणून त्यांनी श्रीलंकेत दोन वर्षे काम केले आणि त्यानंतर ते कामगारमंत्री झाले. १९५७ ते १९६७ च्या दरम्यान त्यांनी राज्यपाल म्हणून उत्तर प्रदेश, केरळ व कर्नाटक या राज्यांत काम केले आणि त्यानंतर ते १९६७ ते १९६९ या काळात भारताचे उपराष्ट्रपती आणि पुढे १९६९ ते १९७४ राष्ट्रपती राहिले.

 

त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम केले होते. एक निस्पृह कामगार नेता म्हणून त्यांची आज जगभर प्रसिद्धी होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सामोपचाराने आणि सुलभतेने हाताळले, एवढेच नव्हे तर तत्संबंधीचे विचार त्यांनी इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री, जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले. या सर्व कार्याबद्दल बनारस, आंध्र वगैरे विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिली.

 

१९७५ साली भारत सरकारने त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन केला.

 

व्ही. व्ही. गिरी यांचे  २३ जून १९८० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१० ऑगस्ट

अभिनेता निर्मल पांडे जन्मदिन

************

 

जन्म - १० ऑगस्ट १९६२

स्मृती - १८ फेब्रुवारी २०१०

 

बॅन्डेट क्वीनया चित्रपटामुळे प्रसिद्धीचे शिखर गाठणारे अभिनेता निर्मल पांडे यांचा जन्म १० ऑगस्ट १९६२ रोजी झाला.

 

निर्मल पांडे यांचे शालेय शिक्षण उत्तराखंड येथील नैनिताल येथे झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर निर्मल पांडे यांनी लंडनला जाऊन एक थिएटर ग्रुप जॉइन्ट केला. त्यांनी हिर रांझा, अ‍ॅटिगोन अशा १२५ नाटकांमध्ये काम केले.

 

सुरुवातील दोन छोट्या भूमिका केल्यानंतर शेखर कपूरच्या १९९६ मध्ये आलेल्या बॅन्डेड क्वीनया चित्रपटात फुलनदेवीचा प्रियकर विक्रम मल्लाह यांची भूमिका केली होती. 'बॅन्डेट क्वीनया चित्रपटामुळे प्रसिद्धीचे शिखर गाठणाऱ्या निर्मल पांडे त्यांनी नंतरच्या कारकीर्दीत सशक्त खलनायक वढवला. त्यानंतर त्यांनी अमोल पालेकरांचा दायरा’, ‘ट्रेन टू पाकिस्तान’, ‘इस रात की सुबह नहीआणि हम तुम पें मरते है या चित्रपटात भूमिका केल्या होत्या.

 

त्यानंतर त्यांनी लैला या चित्रपटात भूमिका केली. तसेच अनेक टीव्ही मालिका केल्या, यात 'हातिम आणि प्रिन्सेस डॉली और उसका मॅजिक बॉक्स' या मालिकांचा समावेश आहे.

 

उत्कृष्ठ अभिनेत्याबरोबर ते चांगला गायकही होते. त्यांनी जझ्बा नावाचा अल्बमही काढला होता. निर्मल पांडे यांनी २००२ मध्ये अधंयुग नावाने एक हिंदी नाटकही दिग्दर्शित केले होते.

 

निर्मल पांडे यांचे चित्रपट - बॅन्डेट क्वीन, लाहोर, देशद्रोही, राजकुमार आर्यन, आज नच ले, प्रिन्सेस डॉली और उसका मॅजिक बॉक्स (टीव्ही मालिका), लैला, पाथ, हातिम (टीव्ही मालिका), आन्च, वनटू का फोर, शिकारी, हद करदी आपने, हम तुम पे मरते है, गॉडमदर, जहाँ तूम ले चलो, प्यार किया तो डरना क्या, ट्रेन टू पाकिस्तान, औझार, दायरा, इस रात की सुबह नही.

 

निर्मल पांडे यांचे  १८ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१० ऑगस्ट

अभिनेता अजित वाच्छानी जन्मदिन

************

 

जन्म - १० ऑगस्ट १९५१

स्मृती - २५ ऑगस्ट २००३ (मुंबई)

 

रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत विविधरंगी चरित्र भूमिका साकारणारे अभिनेता अजित वाच्छानी यांचा जन्म १० ऑगस्ट १९५१ रोजी झाला.

 

अजित वाच्छानी यांनी मि. इंडीया, १०० डेज, मैने प्यार किया, कयामत से कयामत तक, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं अशा चित्रपटात कामे केली. नंतर अजीत वाच्छानी यांनी 'एक मेहल हो सपनोंका' ही मालीका ही केली. ती खुप गाजली. या हिंदी मालिके सोबतच त्यांनी 'एका पेक्षा एक' हा मराठी चित्रपट देखील साकारला होता.

 

अजित वाच्छानी हे शाहीर साबळे यांचे जावई. अभिनेत्री चारुशीला साबळे यांचे पती. चारुशीला आणि अजित यांना दोन मुली आहेत, मोठी योहाना अजीत वाच्छानी यांच्या सारखीच गुजराती रंगभुमी गाजवतेय आणि धाकटी त्रीशाला एअरहोस्टेस आहे.

 

अजित वाच्छानी यांचे २५ ऑगस्ट २००३ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१० ऑगस्ट

'बँडिट क्वीन' फूलन देवी जन्मदिन

************

 

जन्म - १० ऑगस्ट १९६३ (उत्तर प्रदेश)

स्मृती - २५ जुलै २००१ (दिल्ली)

 

एकेकाळची डाकू व नंतर खासदार झालेल्या व  भारतात 'बँडिट क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फूलन देवी यांचा जन्म १० ऑगस्ट १९६३ रोजी झाला.

 

एका भारतीय महिला दरोडेखोर ते खासदार होण्यापर्यंतचा फूलन देवी यांचा प्रवास विलक्षण आहे.

फूलन देवी यांच्या कुटुंबाची जमीन ही त्यांच्या काकाने हडपली होती. फूलन यांनी जमीन मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. यासाठी त्यांनी त्यांच्या काकाच्या मुलाबरोबर भांडणे सुद्धा केली. फूलनचा असा राग पाहून त्यांच्या घरच्यांनी त्यांचा विवाह ११ वर्षांच्या वयात, त्यांच्यापेक्षा तिप्पट पटीने मोठ्या असणाऱ्या माणसाबरोबर करून दिला. फार कमी वयात त्यांना खूप काही सहन करावं लागलं होतं. लग्नानंतर त्यांच्या पतीने सतत जबरदस्ती केली, फूलन यांच्यासाठी तो बलात्कारच होता. फूलनच्या सासरकडच्या लोकांनीही त्यांची फार छळवणूक केली.

 

सासरी असा अत्याचार झाल्यानं फूलन माहेरी परत आली. घरी परत आल्यावर त्यांच्या काकाच्या मुलाने त्यांच्यावर चोरीचा आरोप लावला. त्यासाठी फूलन यांना ३ दिवसासाठी तुरूंगात जावं लागलं होतं .फूलन यांच्या घरची परिस्थिती फार बिकट होती. या सर्व गोष्टीला फूलन कंटाळून गेल्या होत्या, त्यांची मैत्र काही वाईट लोकांबरोबर झाली.

 

फूलन यांचे हे मित्र दरोडेखोर होते. या दरोडेखोरांना फूलन या फार आवडत होत्या. या दरोडेखोरांमध्ये फूलनसाठी भांडणे लागली. त्यानंतर दरोडेखोरांचा सरदार असणारा बाबू गुज्जरला विक्रम मल्लाह याने मारलं.

 

बाबू गुज्जरला मारल्यानंतर श्रीराम ठाकूर आणि लाल ठाकूर यांना राग आला होता. या हत्येचा सूड ठाकुरांना घ्यायचा होता. त्यानंतर फूलन, विक्रम मल्लाह आणि त्यांच्या साथीदारावर ठाकूरांनी हल्ला केला. यात विक्रम मल्लाह मारला गेला. विक्रम मल्लाह मेल्यानं फूलन यांना कैद करण्यात आलं. त्यानंतर फूलन यांच्यावर फार अत्याचार झाला. त्यांच्या बरोबर रोज ३ आठवड्यांपर्यत सामूहिक बलात्कार होत गेला.

 

त्यावेळी त्यांचे वय फक्त १८ वर्ष होते. फूलन यांनी हार मानली नाही. त्यांना या गोष्टीचा सुड घ्यायचा असं ठरविलं. फूलन या १९८१ मध्ये परत त्यांच्या गावात पोहचल्या. ज्या गावात त्यांच्यावर असा अत्याचार झाला होता. या गावातील २२ ठाकुरांची गोळी मारून फूलनने त्यांची हत्या केली. या घटनेने पूर्ण उत्तप्रदेश हादरून गेलं होतं. यानंतर फूलन यांना 'बँडिट क्वीन' म्हणून प्रसिद्ध मिळाली.

 

फूलन देवी याचं नाव ऐकल्यावर अनेकजण घाबरून जातं असत. अशा घटनेमुळे उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत असणारे व्ही.पी. सिंग यांनी त्यांच्या पदावरून  राजानामा दिला. अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी फूलनला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आले नाही.

 

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८३ मध्ये एक घोषणा केली की, फूलन यांची फाशी माफ करण्यात येईल. जर त्यांनी आत्मसमर्पण केलं तर. त्यानंतर फूलन यांनी आत्मसमर्पण केलं. २२ हत्या, ३० दरोडे, १८ अपहरण केल्यानंतर त्यांना कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली झाली.

 

फूलन देवी या ११ वर्ष तुरूंगात कैद होत्या. यानंतर त्यांच्या आयुष्याने एक वेगळं वळण घेतलं. १९९४ रोजी त्यांची सुटका झाली. उत्तर प्रदेशमधील अनेक गरीब नागरिक त्यांच्या बाजूने असत. त्यामुळे त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.

 

उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर मधून १९९६ साली निवडणुकीत उतरल्यानंतर, फूलन या निवडणुकीत प्रचंड मताने निवडून आल्या. फूलन व खासदार सुद्धा झाल्या.

 

फूलनदेवी यांच्या जीवनावर बैंडिट क्वीनहा शेखर कपूर यांनी चित्रपट बनवला होता. लहान, अल्लड, निरागस फूलन डाकूची राणी बनण्यापर्यंतचा तिच्या आयुष्याचा प्रवास त्यात दाखवलेला होता. फूलन यांच्यावर एक ऑटो बायोग्राफी लिहिण्यात आली आहे. ज्यात त्यांनी त्यांचे वाईट अनुभव सांगितले आहेत. या ऑटो बायोग्राफीचं नाव 'किस्मत की मर्जी' आहे.

 

२५ जुलै २००१ रोजी फूलन यांच्या दिल्ली मधील निवासस्थानी एक शेर सिंग राणा नावाचा एक व्यक्ती आला, त्याने बंगल्याच्या गेटजवळच फूलन यांना गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१० ऑगस्ट

संगीतकार खेमचंद प्रकाश स्मृतिदिन

************

 

जन्म - १२ डिसेंबर १९०७

स्मृती - १० ऑगस्ट १९५०

 

संगीतकार खेमचंद प्रकाश यांचा जन्म १२ डिसेंबर १९०७ रोजी झाला.

 

खेमचंद प्रकाश हे बिकानेर च्या राजमहलात गायक म्हणून होते. नंतर ते नेपाल च्या राजघराण्यात गायक म्हणून होते. १९३९ साली ते मुंबईला आले. अवघ्या १०-१२ वर्षात त्यांनी ४७ चित्रपटांना संगीत दिले. त्यांचे पहिले दोन चित्रपट म्हणजे 'सुप्रीम पिक्चर्स'चे गाजी सलाऊद्दीन आणि मेरी आँखे. त्या सुमारास रणजित मूव्हीटोनच्या चंदुलाल शाह यांनी त्या कंपनीच्या संगीताची धुरा ज्ञान दत्त आणि खेमचन्द प्रकाश यांच्याकदे सोपवली, आणि नंतरच्या पाच वर्षात या दोघांनी सिनेसंगीताच्या इतिहासात कायम मानाची नोन्द होईल असे संगीत दिले.

 

खेमचन्दजीची काही गाणी त्यांच्या मृत्यु नंतर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांत ऐकायला मिळतात. 'स्ट्रीट सिंगर' हा सिनेमा त्यातल्या 'बाबुल मोरा' गाण्यासाठी प्रसिद्‌ध आहे. पण त्यात 'लो खा लो मॅडम खाना' हे विनोदी गाणे खेमचन्दजींच्या आवाज़ात आहे. ते त्यांच्यावरच चित्रित केले होते, आणि ते यू-ट्यूबवर पाहता येते.

 

सैगल, खुर्शीद या ज़म बसलेल्या गायकांकडून तर त्यांनी बहारदार गाणी केलीच, पण पुढे लता मंगेशकर आणि किशोर कुमार हे कलाकार आपला ज़म बसवू पाहत असताना त्यांनाही चिरस्मरणीय गाणी दिलीत. त्यांची गाणी गायलेल्यांची यादी मोठी होईल.

 

कमल दासगुप्ता हे थोर संगीतकार खेमचन्दजींचे समकालीन होते. कमल-दा खेमचन्दजींना सर्वश्रेष्ठ संगीतकार मानत. काही सिनेमांना त्यांनी 'खेमराज' नावाने संगीत दिले होते.

 

संगीतकार खेमचन्द यांचे निधन १० ऑगस्ट १९५० रोजी झाले.

 

खेमचंद प्रकाश यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९३२२४०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१० ऑगस्ट

जनरल अरुणकुमार वैद्य स्मृतिदिन

************

 

जन्म - २७ जानेवारी १९२६ (अलिबाग)

स्मृती - १० ऑगस्ट १९८६ (पुणे)

 

जनरल अरुणकुमार वैद्य यांचा जन्म २७ जानेवारी १९२६ रोजी झाला.

 

जनरल अरुणकुमार वैद्य यांचे वडील अलिबागचे कलेक्टर म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे, व कॉलेज शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. त्याचप्रमाणे ४ वर्षे पुण्यात रमणबागेतही शिक्षण झाले. शिक्षण चालू असताना मिलिटरीत जाण्याची त्यांना विलक्षण ओढ होती.

 

१९४४ साली त्यांनी इमरजन्सी कमिशन मिळवले व ३० जानेवारी १९४५ ला त्यांना कायम कमिशन मिळाले. त्यांना रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले. जनरल वैद्य ही एक अशी असामी होती ज्यांनी १९६५ व  १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवुन सन्मान मिळवले होते. ते भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्रपुरस्कार मिळाला. नंतर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले.

 

१९६५ चा खेमकरणचा पाकिस्तान बरोबरचा लढा मोठा अविस्मरणीय झाला. पाकिस्तानची पहिली सशस्त्र पलटण आत घुसली होती. त्या सैन्याला घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून ३६ तास रणकंदन करून पाकिस्तानचे एम् ४७ व एस् ४८ हे प्रचंड पॅटन रणगाडे त्या काळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या वैद्यांनी खिळखिळे करुन टाकले. ते सुद्धा डेक्कन हॉर्स जवळील जुन्या शेरमनरणगाड्याच्या सहाय्याने, खेमकरण विभागात पाकिस्तानचे ३६ रणगाडे उडवले.

 

६ सप्टेंबर १९६५ रोजी अतुल शौर्याबद्दल त्यांना महावीरचक (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) मिळाले. त्यांची बदली ईस्टर्न कमांडमध्ये त्रिपुरा, आसाममध्ये नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याकरता झाली. तिथे योजना चातुर्य दाखवून त्यांनी नागांचा तथाकथित जनरल मोबू अंगामी व इतर सशस्त्र नागांना पकडले. १९७१ साली, सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे सैन्याशी घनघोर लढाई झाली आणी पाकिस्तानच्या सैन्याला धुळ चारली.

 

१ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे जनरल म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली. जनरलम्हणून त्यांची एक विशिष्ट कामगिरी वाखाणण्या सारखी होती. २०,००० फूटांवर अतिशित, जिथे तापमान उणे ४०° असते अशा सियाचीनप्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदुस्थानी सेना तळ ठोकुन बसली होती. रशियन बनावटीच्या टी-७२ बरोबरीचा अर्जुन रणगाडा तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. त्याचे सूत्र त्यांनी आखून दिले.

 

अरुणकुमार वैद्य यांना संगीताची आवड होती. त्यांना पोस्टाची तिकिटे जमवण्याचा त्यांना छंद होता. सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह त्यांचेपाशी होता. भारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या. वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचे घटनास्थळीच निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

[9:31 pm, 10/08/2021] R. M. Doifode Airtel 01: ************

0 ऑगस्ट

गायक अल्लादिया खाँ जन्मदिन

************

 

जन्म - १० ऑगस्ट १८५५

स्मृती - १६ मार्च १९४६ (मुंबई)

 

कोल्हापूर दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक अल्लादिया खाँ यांचा जन्म १० ऑगस्ट १८५५ रोजी झाला.

 

हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जयपूर-अत्रौली या घराण्याचे स्थान केवळ अद्वितीय आहे. या घराण्याचे अध्वर्यू अल्लादिया खाँ यांची कामगिरी फार मोठी आहे. खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्ली जवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले. त्यांच्या मातापित्यांच्या अनेक अपत्यांतील हे अपत्य वाचले, म्हणून त्यांना अल्लादियाखाँ ’ (अल्लाने जगविलेले मूल) म्हणू लागले.

 

खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले. अल्लादियाखाँनी प्रथम चार पाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे पराकाष्ठेच्या निष्ठेने शिक्षण घेतले. यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. प्रदेशांत व थेट नेपाळ पर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला. पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी त्यांनी निर्माण केली.

 

१८९१च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापुरास शाहूमहाराजांच्या आश्रयाला स्थायिक झाले, ते १९२२ मध्ये महाराजांचा अंतकाल होई पर्यंत. १९२२ पासून १९४६ पर्यंतची चोवीस वर्षे त्यांनी मुख्यत: शिकविण्यात मुंबईस काढली.

 

खाँसाहेबांना दहा बारा हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक कोठीवालेगायक होते. खाँसाहेबांच्या शिष्यशाखेत त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला, मोहनराव पालेकर इ. सुविख्यात कलावंत मंडळी आहेत.

 

अल्लादिया खाँ यांचे १६ मार्च १९४६ रोजी निधन झाले.

 

अल्लादिया खाँ यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

[9:31 pm, 10/08/2021] R. M. Doifode Airtel 01: K'Sagar Publications:

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

१० ऑगस्ट - दिनविशेष

 

१० ऑगस्ट रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.

 

१८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.

 

१८२१: मिसुरी हे अमेरिकेचे २४ वे राज्य बनले.

 

१९८८: दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या किंवा हद्दपार केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी प्रत्येकी २०,००० डॉलर भरपाई देण्याचे कबूल केले.

 

१९९०: मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले.

 

१९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.

 

१९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.

 

१० ऑगस्ट रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१७५५: ५ वा पेशवा नारायणराव पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३)

 

१८१०: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८६१)

 

१८१४: नेस्ले कंपनी चे संस्थापक हेनरी नेस्ले यांचा जन्म. (मृत्यू: ७ जुलै १८९०)

 

१८५५: जयपूर अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च १९४६)

 

१८६०: संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६)

 

१८७४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर १९६४)

 

१८८९: मोनोपोली खेळाचे निर्माते चार्ल्स डॅरो यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट १९६८)

 

१८९४: भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री व्ही. व्ही. गिरी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १९८०)

 

१९०२: कॅनेडियन अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून १९८३)

 

१९१३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे २००३)

 

१९३३: कोसवर्थ कंपनी चे संस्थापक किथ डकवर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर २००५)

 

१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेट पारू शफकत राणा यांचा जन्म.

 

१९५६: भारताती-इंग्रजी उद्योगपती पेरीन वॉर्सी यांचा जन्म.

 

१९६०: भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २००१)

 

१९६३: भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २००१)

 

१० ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१९५०: संगीतकार खेमचंद प्रकाश यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०७)

 

१९८०: पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष जनरल ह्याह्याखान यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९१७)

 

१९८२: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १९२७)

 

१९८६: महावीरचक्र प्राप्त जनरल अरुणकुमार वैद्य यांची अतिरेक्यांनी पुणे येथे हत्या केली. (जन्म: २७ जानेवारी १९२६)

 

१९९२: कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. (जन्म: १२ ऑगस्ट१९०६)

 

१९९७: कवी व नाट्यसमीक्षक नारायण पेडणेकर यांचे निधन.

 

१९९९: भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक आचार्य बलदेव उपाध्याय यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८९९)

 

२०१२: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक सुरेश दलाल यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३२)

No comments:

Post a Comment