#आजचे ऐतिहासिक दिनविशेष🚩८ सप्टेंबर इ.स.१६७३

 

#आजचे ऐतिहासिक दिनविशेष🚩

सप्टेंबर ..१६७३

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय धोरणांवर प्रकाश टाकणारे अस्सल पत्र.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#८सप्टेंबर१६८१

१६८० मध्ये शिवरायांच्या मृत्यूनंतर आजच्या दिवशी मुघल बादशहा औरंगजेब ते लाख मुघल सैन्य घेऊन दख्खनवर चालून यायला निघाला. याचदरम्यान छत्रपती संभाजीराजे जंजिऱ्याच्या मोहिमेवर तळ ठोकून होते.

दिनांक एप्रिल सन १६८० रोजी स्वराज्याचा शिवसूर्य रायगडावर कायमस्वरूपी मावळला. हिंदूधर्मरक्षक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर आता अखंड हिंदुस्थान इस्लाममय करण्यासाठी आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही अशी पालवी औरंगजेबाच्या मनात नव्याने फुटली असावी.

याच कारणामुळे दिनांक सप्टेंबर सन १६८१ रोजी औरंगजेब सर्वशक्तीनिशी दक्षिणेकडे रवाना होण्यासाठी अजमेरहून बुर्हाणपुराकडे निघाला.

शिवसूर्याचा अस्त होऊन अवघे वर्ष पूर्ण होते तोच चांदतारा चमचमण्याची संधी शोधू लागला.

१३ नोव्हेंबर सन १६८१ रोजी औरंगजेब बुर्हाणपूरात दाखल झाला.

इतक्या मोठ्या सैन्यासह खुद्द औरंगजेब येतोय म्हंटल्यावर दक्षिणेकडील अनेकांना धडकी भरली. अपवाद होता शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांचा.

"भय" स्वतःच शंभूराज्यांजवळ येण्यासाठी "भयभीत" होत असावे..

बादशहा अजमेरहून दक्षिणेकडे निघाला याच्या खबरा येताच शंभूराजांनी औरंगजेबाच्या स्वागत वेगळ्याच पध्दतीने सुरू केले.

एरवी शाही फर्मान आले की कोसभर दूर अनवाणी येऊन राजा-महाराजांचे कुर्निसात स्विकारणार्या बादशहाला बातम्या समजू लागल्या की शंभूराजांनी दस्तुरखुद्द मोगली मुलखात चारी दिशांना छापेमारी सुरू केली आहे.

बादशहा बुर्हाणपूरी पोहोचण्याआधी अवघ्या काही दिवस आधी मराठ्यांनी बुर्हाणपूरा जवळील गावे लुटून बादशहास "आगळावेगळा नजराणा" दिला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#८सप्टेंबर१८५७

१८५७ चे बंड म्हणजे भारतीय स्वातंत्र लढ्यातील एक महत्वाचे पर्व आणि सप्टेंबर हा दिवस खरतर सातारावासीयांसाठी क्रांती दिन कारण याच दिवशी १८५७ च्या बंडात सहभागी आसणार्या १७ क्रांतीवीरांना जूलमी ब्रिटिश सरकारने मृत्यूदंड दिला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

होळकर, यशवंतराव पवार पिलाजी जाधव याजकडून बादशहाने तारीख २१ एप्रिल १७४३ रोजी कबुलायत लिहून घेतली. मराठ्यांना हे फर्मान मिळाल्यावर माळवा, बुंदेलखंड यातील लहान मोठ्या सत्ताधिशांचे पूर्वीचे बादशहाशी असलेले संबंध तुटून त्याची पुनर्घटना पुण्यास होऊ लागली. खुद्द जयपूरवाले मराठ्यांच्या छायेत आले. उत्तर हिंदुस्तानात मराठ्यांची सत्ता स्थिरावण्यास माळव्याचा ताबा मराठ्यास मिळणे आवश्यक होते. ते मराठ्यांनी साधल्यामुळे इथून मराठ्यांना उत्तरेत हातपाय पसरणे सोपे गेले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 सप्टेंबर ..१७९१

उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू : फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

No comments:

Post a Comment