आदर्श
परिपाठ |
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा कांही प्रमाणात बंद आहेत पण शिक्षण सुरू
आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन
करावे ही विनंती .
________
🌄 आदर्श परिपाठ 🌄. ________ 📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■. |
आज दिनांक: २९/०७/२०२१. वार: गुरूवार , महिना :आषाढ,कृष्णपक्ष, षेष्ठी.
नक्षत्र :उ.भा.
योग:सुकर्मा,करण:गरज.
सूर्योदय:०६.१४,सूर्यास्त:०७.१६. ■■■■■■■■■■■■■. सुविचार:हिऱ्याहूनही 'ज्ञान' अधिक
मौल्यवान असते. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮. |
प्रतिज्ञा |
📜 भारताचे
संविधान📚. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆======. |
🙏 ब्रम्हा
,विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले🙏. ●●●●●●●●●◆◆◆◆◆◆. |
ब्रह्मा, विष्णू
आणि महेश्वर सामोरी बसले |
मला हे दत्तगुरू दिसले |
माय उभी ही गाय होउनी, पुढे
वासरू पाहे वळुनी |
कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले |
चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर
बनले उभ्या घराचे |
घुमटामधुनी हृदयपाखरू स्वानंदे फिरले |
तुम्हीच केली सारी किमया, कृतार्थ
झाली माझी काया |
तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले
________
👩💻 बोधकथा 👨💻.
_________ 🛑 लोभी
माणूस.🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून
ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे
समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला
की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा
तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन
त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे
तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू
लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी
माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे
मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं
समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.' |
तात्पर्य- लोभी माणसे पैसे असून दरिद्री व
अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला
पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ ? |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
🎼 समूहगीत🎼 |
|
💫 हम
होंगे कामयाब एक दिन.
_________ |
" होंगे कामयाब,. |
हम होंगे कामयाब एक दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
हम होंगे कामयाब एक दिन। |
हम चलेंगे साथ-साथ |
डाल हाथों में हाथ |
हम चलेंगे साथ-साथ, एक
दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
हम चलेंगे साथ-साथ एक दिन। |
|
होगी शांति चारों ओर, एक
दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
होगी शांति चारों ओर एक दिन। |
|
नहीं डर किसी का आज एक दिन |
मन में है विश्वास, पूरा
है विश्वास |
नहीं डर किसी का आज एक दिन। |
|
- गिरिजा
कुमार माथुर "
_________ |
🎰 दिनविशेष🎰.
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
|
आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन |
महत्त्वाच्या घटना: |
●१९९७ : कलकत्त्याच्या
वंगीय साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्या साहित्यिक हरनाम घोष
स्मृतीचिन्हासाठी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची निवड. अखिल भारतीय स्तरावरील हा
पुरस्कार मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला. |
●१९८७ : भारताचे
पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी
भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या केल्या. |
●१९८५ : मल्याळम
लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार |
●१९५७ : ’इंटरनॅशनल
अॅटॉमिक एनर्जी एजन्सी (IAEA)’ची स्थापना झाली. |
●१९४६ : टाटा
एअरलाइन्सचे ’एअर इंडिया’ असे
नामकरण करण्यात आले. |
●१९२० : जगातील
पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सानफ्रान्सिस्को या शहरांमधे सुरू
झाली. |
●१८५२ : पुणे
महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबागवाड्यात स्त्रीशिक्षणाचे
भारतीय उद्गाते म्हणून जोतीबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
■१९८१ : फर्नांडो अलोन्सो – स्पॅनिश
रेस कार ड्रायव्हर |
■१९५९ : संजय दत्त – अभिनेता
|
■१९५३ : अनुप जलोटा – भजनगायक |
■१९२५ : शि. द. फडणीस – व्यंगचित्रकार |
■१९२२ : ब. मो. पुरंदरे – इतिहासकार
आणि लेखक, शिवशाहीर |
■१९०४ : जहांगीर रतनजी दादाभॉय तथा ’जे.
आर. डी. टाटा’ – भारतरत्न, उद्योगपती
व वैमानिक, भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक. |
■१८८३ : बेनिटो मुसोलिनी – इटलीचा
हुकूमशहा. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
◆२००९ : महाराणी गायत्रीदेवी – जयपूरच्या
राजमाता. |
◆२००६ : डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान. |
◆२००३ : बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी
वॉकर’ – विनोदी अभिनेता. |
◆२००२ : सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक
व संगीतकार . |
◆१९९६ : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी.
९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.
लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय
सद्भावना पुरस्कार, भारतरत्न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी
त्यांना गौरविण्यात आले. |
◆१८९१ : इश्वरचन्द्र विद्यासागर – बंगाली
समाजसुधारक, तत्त्वज्ञ, लेखक, शिक्षणतज्ञ
व उद्योजक. यांच्या प्रयत्नांमुळेच १८५६ मधे विधवा विवाहाचा कायदा आला. |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~. १)देशातील एकमेव सागरी सेतू कोणत्या दोन
शहरांना जोडतो ?
२)सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी
केली?
३)संत ज्ञानेश्वरांची समाधी कोणत्या गावी आहे?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 *ठळक
घडामोडी*ठळक घडामोडी*_ |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ खाजगी शाळांच्या शिक्षण शुल्कात १५% कपात,राज्य
मंत्रिमंडळाचा निर्णय |
■ झेडपीच्या शाळेत समाजशास्त्राचे शिक्षक
शिकवतात विज्ञान,गणित |
■ सीईटीसाठी सामायिक प्रश्नपत्रिका तयार करा;उच्च
न्यायालयाची राज्य सरकारला सूचना |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक
विचार मंच पुणे🎯
======★■◆●========= |
No comments:
Post a Comment