📚परीपाठ🌹❂ दिनांक:~ 03 ऑगस्ट 2021 ❂

 

 

📚परीपाठ🌹

श्री. देशमुख. एस. बी,

🌻सचिव🌻

नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ

📱-7972808064📱

*रंगनाथ माने,🌹सचिव🌹 अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ पश्चिम महाराष्ट्र 9226932146*

 

दिनांक:~ 03 ऑगस्ट 2021

       🎴 वार ~ मंगळवार 🎴

 

          🏮 आजचे पंचाग 🏮

    ━═•●◆❃★❂★❃◆●•

 

आषाढ. मंगळ ३

     तिथी : कृ. दशमी,

         नक्षत्र : रोहिणी,

       योग :- ध्रुव,

    करण : बव,

सूर्योदय : 06:12, सूर्यास्त : 19:18, ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           🖋 सुविचार 🖋

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

 

🕉️"सर्वात सुक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर ते म्हणजे 'विचार' कारण उध्वस्त आणि परिवर्तन करण्याची  शक्ती विचारात आहे." ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           म्हणी व अर्थ

 

🐦कावळ्याच्या शापाने गाय🐄 मरत नाही.

 

📚अर्थ:-

क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

             📆 दिनविशेष 📆   

 

 

🌞या वर्षातील🌞 २१५ वा (लीप वर्षातील २१६ वा) दिवस आहे.

 

 

    🌹 महत्त्वाच्या घटना 🌹

 

👉१९००: द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी ची स्थापना झाली.

👉१९१४: बव्हेरियाचे राजे लुडविक यांच्याकडे आपणांस सैन्यात दाखल करून घ्यावे असा हिटलरने अर्ज केला आणि त्याची सैन्यात नियुक्तीझाली.

👉१९४८: भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.

 

    🌹जन्मदिवस / जयंती🌹

 

👉१८८६: हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर १९६४)

👉१८९८: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६६)

👉१९००: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७६)

 

      🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹

 

👉१९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)

👉१९५७: पत्रकार, हिन्दुस्तान टाइम्स चे संपादक, महात्मा गांधींचे चिरंजीव देवदास गांधी यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०० दरबान, दक्षिण अफ्रिका)

👉२००७: लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३३) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

          🥇सामान्य ज्ञान 🥇

     ┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉पाठ्यपुस्तकांची निर्मिती कोणती संस्था करते?

🥇बालभारती

 

👉भारतातुन कोणता आजार हा समुळ नष्ट झाला आहे?

🥇पोलिओ

 

👉भारत देशातील संसदगृहाचे नाव काय आहे?

🥇संसद

 

👉पणजी या शहराचे जुने नाव काय होते?

🥇पंजीम

 

👉लोकमान्य टिळकांनी कोणत्या ग्रंथाचे लेखन कार्य केले?

🥇गितारहस्य ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

           🕸 बोधकथा 🕸

    

💎हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची👥👥

 

एक राजा होता. त्‍याचे सुखी व संपन्न राज्‍य होते. दुर्दैवाने एकदा त्‍याच्‍या राज्‍यात पाऊसच पडला नाही. त्‍यामुळे दुष्‍काळाचे संकट उभे ठाकले. गरिबांचे हाल होऊ लागले. बादशहाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. एकेदिवशी तो खजिनाही संपला. आता पुढे काय हा प्रश्‍न राजासमोर उभा ठाकला. प्रजाजनांचे पोषण कसे करता येईल ही एकच चिंता राजाला सतत सतावित होती. त्‍याने त्‍याच्‍या बोटातली हि-याची अंगठी नोकरांना दिली व सांगितले,'' ही अंगठी घेऊन शेजारच्‍या देशात जा, तेथील राजाला आपली सर्व परि‍स्थिती सांगा. तो राजा आपली अवस्‍था जाणेल व हा हिरा फार दुर्मिळ आहे. या हि-याच्‍या बदल्‍यात त्‍याच्‍याकडून धान्‍य मागून आणा व जनतेत वाटप करा. '' मंत्र्यांनी राजाला विचारले,''राजन, इतका महागडा, दुर्मिळ हिरा तुम्‍ही का विकत आहात, दुसरी काहीतरी सोय करता येईल.'' राजा म्‍हणाला,''माझे राज्‍य ही माझी संपत्ती आहे. प्रजा उपाशी मरत असताना मी महागडा हिरा का सांभाळत बसू. प्रजा आहे तर मी आहे. असे हिरे पुन्‍हा प्राप्‍त करता येतील पण प्रजा एकदा जर नाराज झाली तर पुन्‍हा अशी प्रजा मला मिळणार नाही.''

 

🔔तात्‍पर्य :-

आपल्‍या हाती जर सत्‍ता असेल तर त्‍याचा योग्‍य विनियोग कसा करता येईल हे पाहणे इष्‍ट ठरते. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

         🌐 आजच्या बातम्या 🌐

 

टोकियो ऑलिम्पिक :  भारतीय महिला हॉकी संघानं रचला इतिहास, दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीत प्रवेश...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी सलामीवीर मयांक अगरवाल सरावादरम्यान दुखापतग्रस्त. सरावादरम्यान मयांकच्या हॅल्मेटला जोरात चेंडू लागल्याने पहिल्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय.

आयटी अँक्टमधील कलम 66A च्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाची राज्यांना नोटीस, सहा वर्षांपूर्वीच कलम 66A रद्द करुनही गुन्हे दाखल करणं सुरुच म्हणून ताशेरे..

देशात तिसऱ्या लाटेचा धोका? सलग सहा दिवस 40 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, केरळात वाढता प्रादुर्भाव.. राज्यात रविवारी 6,479 रुग्णांची नोंद, तर 4110 रुग्णांना डिस्चार्ज, पाच जिल्ह्यांत शून्य रुग्ण..

पती राज कुंद्राच्या अटकेवर शिल्पाची सविस्तर प्रतिक्रिया.. मुंबई पोलिसांच्या तपासावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याची इन्स्टा पोस्ट. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🙏🌹अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ पश्चिम महाराष्ट्र .🌹🙏

🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

No comments:

Post a Comment