#आजचे ऐतिहासिक दिनविशेष=#२८जुलै









" छञपती श्री शिवाजी महाराज ":

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

 

📜 २८ जुलै इ.स.१६०६

राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांच्या पत्रांत सरगुऱ्हों" असा उल्लेख!

         धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषांस भाग्योदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे मालोजीराजे यावेळी तरुण होते. स्वाभाविकपणेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भाग्योदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांत या दोघा महापराक्रमी बंधूंना "सर" असे म्हटले आहे. सरगुन्हो हे सरगिरोह चे मराठी रुप आहे. गिरोह म्हणजे जमाव. त्यांचा प्रमुख म्हणजे सरगिरोह. उपरोक्त पत्रांमध्ये राजे "मालोजीराजे व राजे विठोजीराजे सरगुन्हो यासी गुन्होथलयास मुकासा दिधले असे असा उल्लेख करून काही गावे दिली आहेत. याचा अर्थ स्वतःचा जमाव किंवा सैन्य तुकडी घेऊन सरकार चाकरी करायची, व त्या मोबदल्यात सरकारकडून काही स्थळे खर्चासाठी मागून घ्यायची अशी पद्धत त्याकाळी रुढ होती. त्यानुसार राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांनी आपले स्वतंत्र जमाव उभे करून निजामशाहीत चाकरी केली हे स्पष्ट होते.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 २८ जुलै इ.स.१६८२

(श्रावण शुद्ध ५, पंचमी,शके १६०४, दुदुंभी संवत्सर, वार शुक्रवार)

 

छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली!

        छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली. मुजोर पोर्तुगिजांना धाकात ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ही जहाजे पकडली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 २८ जुलै इ.स.१६८२

मराठ्यांच्या वकीलामार्फत छत्रपती शंभूराजाला पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा, त्याने छत्रपती शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला.

 

छत्रपती संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून छत्रपती संभाजी महाराज कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 २८ जुलै इ.स.१६८४

फितुरांचा ओघ !

          छत्रपती संभाजी महाराजांचा सेवक खंडोजी हा २५ स्वारांसह मोगली कैदेत असताना फितूर झाली. त्याला शहजादा आज्जमकडून १५०० जात व १०० स्वारांची मनसब  मिळाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या खासगी सेवेतील परशा" नावाचा सेवक फितूर झाला. त्याला पण तशीच मनसब मिळाली. "भद्रोजी" नावाचा सेवक हा काजी हैदरमार्फत फितूर झाला. गाजीउद्दीन हा किल्ले रायगडजवळील निजामपुर लुटून गेला. त्याचा परिणाम असा झाला की, त्याच्याकडे ५ हजार मराठे स्वार चाकरीसाठी गेले. ते फितूर झाले. सुप्याजवळ असाजी वगैरे ३  लोक सुप्याचा ठाणेदार फखरुद्दीन यांच्याकडे फितूर झाले. पदाजी, एकोजी, मल्हार, सुभानचंद हे त्याच वेळी फितूर झाले. औरंगजेब बादशहाचा मुक्काम अहमदनगरला आल्यापासून फितुरिची साथ जोरात फैलावली. इ.स.१६८२ मध्येच या साथीला सुरूवात झाली होती. औरंगजेब बादशहाच्या दरबारच्या अखबारांचा अभ्यास केला तर रोज कोणीना कोणी फितूर झाल्याच्या नोंदी आढळतात.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 २८ जुलै इ.स.१७८७

लालसोटची लढाई

२८ जुलै ते ३० जुलै १७८७.

महादजी शिंद्यांना इ.स.१७८४ मध्ये मोगल बादशाहने आपला वकील-इ-मुतालिक नेमले  व बादशाहीचे अतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण करण्याची जबाबदारी पण मराठ्यांवर आली. तसेच बादशहाचे वसुलीचे अधिकार पण मराठ्यांना मिळाले. राजपूत संस्थानिक मोगल बादशहाचे मांडलिक असल्याने ते त्याला खंडणी देत. त्याशिवाय मराठ्यांना चौथ व सरदेशमुखी पण ध्यावी लागायची. दिल्लीच्या बादशहाची स्थिती-खमक्या वा ढिला, सुस्त बघून राजपूत खंडणी देत किंवा थकवित असत. ज्या वेळी महाद्जीनची मुतालिक म्हणून नेमणूक झाली त्या वेळी स्वतः बादशाह व महादजी ह्या दोघांची आर्थिक स्थिती फारच गंभीर होती. एकादशीच्या घरी द्वादशी अशी दोघांची परिस्थिती होती. मग महाद्जीने आपला मोर्चा जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी राजपुतांकडे वळविला.जयपूर संस्थांन चा राजा पृथ्वीसिंग १७७८ मध्ये मेला व त्याचा भाऊ प्रतापसिंग जो अत्यंत बेजबाबदार होता, राज्यपदी आला.

 

पण त्यावेळी जयपूर दरबारचा मांडलिक असलेला राव राजा प्रतापसिंग जयपूरच्या राजकारणात महत्वपूर्ण स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. त्यासाठी त्याने पृथ्विसिग चा मुलगा मानसिंग ला जयपूरच्या गादीवर बसविण्यासाठी महाद्जींची मदत मागितली. त्यानुसार मराठी फौजा जयपूर राज्यात शिरून एकेक भाग काबीज करून मुलकी राज्यकारभार सुरु केला. तेव्हा प्रतापसिंग ने महाद्जींशी बोलणी सुरु केली. महादजींनी ३ कोटी ४० लाखाची मागणी केली, रावराजा प्रतापसिंग च्या मध्यस्थीने शेवटी ६३ लाखावर बोलणी संपली. त्यातील पहिला ११ लाखांचा हप्ता प्रतापसिंग ने कसाबसा दिला .पावसाला जवळ आल्याने महादजींनी आपल्या रायाजी पाटील ह्या सरदारास बाकी वसुलीसाठी  जयपूरला ठेवून दिल्लीकडे प्रस्थान केले.( जून १७८६) महादजी गेल्यानंतर जयपूर दरबारने जोधपुरच्या विजयसिंग व अन्य लहान मोठ्या राजपूत, जाट, शीख, रोहिले अशा सर्वाना एकत्र आणून मराठ्यांना उत्तरेतून घालवून देण्याचा घाट घातला. ह्याची खबर रायाजी पाटलाने महाद्जींस दिली व महादजी दिल्लीहून जयपूरकडे निघाले. ते मे १७८७ मध्ये लालसोट ( सध्या राजस्थानातील दौसा  ह्या गावाजवळ आहे.) पोहचले. महाद्जींच्या सैन्यात महाराष्ट्रातील सैनिकांपेक्षा उत्तरेकडील सैनिक मोठ्या प्रमाणावर होते. त्यांना मराठा  दौलातीविषयी काही ममत्व नव्हते. तसेच आधी म्हटल्या प्रमाणे महाद्जींची आर्थिक स्थिती ठीक नव्हती, त्यामुळे बराच काळ सैनिकांचे पगार झाले नव्हते. मोगल सरदार व आग्र्याच्या किल्ल्याचा किल्लेदार महाद्जींचा बाजूला होता, तो पण  ८० तोफा व बरीच मोठी फौज घेऊन ऐन वेळी राजपुताना जाऊन मिळाला. महाद्जीच्या सैन्यात मोठ्या प्रमाणावर फितुरी होऊन मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली. राजपूत पण विजयोन्मदात पुन्हा आपल्या जागी परतले. मराठ्यांनी पण सगळीकडून कोंडी होत असल्याचे बघून परत फिरण्याचा निर्णय घेतला. काही जणांचे असे म्हणणे आहे कि जर राजपूत माघारी फिरले नसते व त्यांनी लढाई चालूच ठेवली असती तर कदाचित मराठा सैन्याची १७६१ मध्ये पानिपत संग्रामाच्या वेळी झाली तशी अतोनात हानी झाली असती, पण राजपूत व मराठे दोघांनी जास्त लावून धरले नाही म्हणून ती नामुष्की टळली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇��🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩




#आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#२८जुलै१६६९

 छत्रपती शिवाजीराजांनी वाईच्या देशमुखास कौलनामा दिला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#२८जुलै१६८२

फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून संभाजीराजे कदाचित

गोवा हस्तगत करून आपला उठाव करतील या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता.

आजच्या दिवशी संभाजी राजांना पत्र पाठवून नुकत्याच झालेल्या पुत्राच्या ( शाहू ) गोष्टीचे अभिनंदन केले.

मराठ्यांच्या वकीलामार्फत शंभूराजाना पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा त्याने शंभूराजांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩

#२८जुलै१६८२

संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, 'डिचोली व कुडाळ यांच्या

परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे

तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये.

यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून

महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩

#२८जुलै१६८५

छत्रपती संभाजीराजांचा खासगी नोकर "परशा" मुघलांना फीतूर.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

No comments:

Post a Comment