#आजचे ऐतिहासिक दिनविशेष#३ऑगस्ट१६७७

 



 

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:

🚩

#आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३ऑगस्ट१६७७

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला.

वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर,

गदग हा भागही जिंकून घेतला.

महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली.

त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता.

व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला.

अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३ऑगस्ट१९००

स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ

कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म.

महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत.

महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात.

त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला.

नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६).

यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली

पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले.

अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.

🙏क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

 

एकच राजे छत्रपती माझे:

छत्रपतींची सातारा व करवीर गादी : इतिहास व परस्पर संबंध

 

छत्रपती शिवरायांनी माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजेंच्या प्रेरणेने स्वराज्य निर्माण केले व या स्वराज्यास सार्वभौमत्व मिळवून देण्यासाठी सन १६७४ साली रयतेसाठी स्वतंत्र व सार्वभौम छत्रपतिगादी स्थापन केली. या गादीचे प्रथम छत्रपति, स्वराज्य निर्माते शिवछत्रपति महाराजांच्या निर्वाणानंतर युवराज संभाजीराजे छत्रपतिझाले. संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या कार्यकालात किती संकटांना तोंड देत रयतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवले इथपर्यंतचा इतिहास आपल्याला ज्ञात आहेच मात्र संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे रक्षण केले ते शिवरायांचे सुपुत्र, स्वराज्याचे तिसरे छत्रपति राजाराम महाराज व शिवस्नुषा महाराणी ताराबाई यांनी.

 

१६८९ साली शंभूराजेंच्या बलिदानानंतर महाराणी येसूबाईंनी आपले धाकटे दीर युवराज राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचा निर्णय घेतला. महाराणी येसूबाई व युवराज राजाराम महाराज रायगडावर होते व रायगडास मुघल फौजेने वेढा घातला होता. राजाराम महाराजांना गादीवर आणण्यासाठी प्रथम महाराजांना सुरक्षित ठिकाणी पाठविणे गरजेचे होते. त्यामुळे येसूबाई राणीसरकारांच्या आदेशाने काही मोजक्या मावळ्यांसह राजाराम महाराज रायगडचा वेढा भेदून प्रथम प्रतापगड- पन्हाळा व तेथून दक्षिणेस जिंजी किल्यावर आले.

 

महाराज रायगडाहून बाहेर पडल्यानंतर लवकरच मुघलांनी रायगड ताब्यात घेऊन महाराणी येसूबाई व शंभूपुत्र युवराज शाहूंना कैद केले. छत्रपति राजाराम महाराजांनी महाराष्ट्रापासून हजारो कोस दूर असणाऱ्या जिंजीमधून युद्धाची सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. महाराजांनी अत्यंत पराकाष्ठेने औरंगजेबाच्या सेनासागराशी लढत देत स्वराज्याचे अस्तित्व टिकवून ठेवले मात्र दुष्ट काळाने महाराजांवर घाला घातला. छत्रपति राजाराम महाराजांचे अगदी तरुण वयात आकस्मिक निधन झाले. स्वराज्याचे युवराज शंभूपुत्र शाहू मुघलांच्या कैदेत होते. राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजीराजे व संभाजीराजे अगदी लहान होते. स्वराज्याला छत्रपति अथवा प्रबळ नेतृत्व उरले नव्हते. औरंगजेब हर्षाने उन्मत्त झाला. मराठ्यांचे राज्य आता आपल्या ताब्यात येणार याचा त्याला आत्मविश्वास वाटू लागला. मात्र राजाराम महाराजांच्या पत्नी शिवस्नुषा महाराणी ताराबाई यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेत औरंगजेबाच्या सेनासागरावर त्वेषाने हल्ले चढवले. स्वतः युद्धांचे नेतृत्व करीत मुघल फौजेस पळून जाण्यासही जागा सोडली नाही. महाराष्ट्र गिळायल्या आलेल्या औरंगजेबाचे थडगे महाराष्ट्राच्या महाराणीने याच महाराष्ट्रात बांधले ! मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध महाराणी ताराबाईंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी जिंकले.

 

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझमशाह याने मराठ्यांमध्ये छत्रपतींच्या गादीसाठी दुफळी माजावी या दुष्ट हेतूने शंभूपुत्र शाहू महाराजांना कैदेतून मुक्त केले. शाहू महाराजांनी छत्रपतींच्या गादीवर आपला हक्क सांगितला मात्र त्यांनी मुघलांच्या सनदा आणल्याचे सांगत ताराराणींनी तो अमान्य केला. शाहू संभाजीराजेंचे पुत्र ; त्यामुळे गादीवर प्रथम अधिकार त्यांचा ! या भावनेने कित्येक बडे सरदार शाहूंना सामील झाले मात्र एक स्त्री असूनही रणांगणावर उतरुन स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या महाराणी ताराबाईंचा शब्द प्रमाण मानून काही सरदार ताराराणींच्या बाजूने उभे राहिले. यामुळे मराठ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली व शाहू महाराज व ताराराणींमध्ये गादीसाठी युद्ध झाले. त्यावेळी मराठा साम्राज्याची राजधानी साताऱ्यास होती मात्र युद्धामध्ये पराजित झाल्यामुळे ताराराणींनी पन्हाळगडावर आश्रय घेतला. नियतीचे खेळ पहा, ज्या ताराराणींनी अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या औरंगजेबाच्या पाच लाख सेनेशी मूठभर सैन्यानीशी सात वर्षे यशस्वी झुंज दिली त्याच ताराराणींना मुलाप्रमाणे असणाऱ्या आपल्या पुतण्याकडून हार पत्करावी लागली.

 

युद्धात विजयी झाल्यानंतर शाहू महाराजांनी साताऱ्यास स्वतःस राज्याभिषेक करवून घेतला व १७०७ साली ताराराणींनी पन्हाळगडावर करवीर गादीची स्वतंत्र स्थापना केली. रयतेच्या स्वराज्याची दोन शकले झाली व सातारा व करवीर अशा छत्रपतींच्या दोन गाद्या अस्तित्वात आल्या. सुरुवातीस ताराराणी व शाहू महाराजांमध्ये गादीसाठी युद्ध झाले मात्र करवीर गादीच्या स्वतंत्र स्थापनेनंतरही महाराणी ताराराणी छत्रपती शाहू महाराजांकडे साताऱ्यासच असायच्या. शाहू महाराजांच्या मनात ताराराणींबद्दल प्रचंड आदर होता. आपल्या पत्रांत महाराज ताराराणींचा उल्लेख मातोश्रीअसा करायचे.

 

पुढे शाहू महाराजांस पुत्र नसल्याने त्यांनी करवीर गादीहून ताराराणींचे नातू व आपले पुतणे युवराज रामराजे यांना दत्तक घेतले. शाहू महाराजांनंतर युवराज रामराजे सातारच्या गादीवर छत्रपति झाले. ज्या शाहू महाराजांनी शिवाजीराजांस छत्रपति होण्यास विरोध केला त्याच शाहूंना शिवाजीराजांच्याच मुलाला दत्तक घेऊन छत्रपति करावे लागले. दरम्यान, सातारा व करवीर छत्रपति महाराजांमध्ये सन १७३१ साली वारणेचा तहहोऊन दोन्ही राज्ये स्थिरस्थावर झाली होती व परस्परांच्या गाद्यांस दोन्ही छत्रपतिंनी मान्यता दिली होती.

 

करवीर छत्रपति व सातारकर छत्रपति यांच्यातील वाद हा वारणेचा तह म्हणजेच सन १७३१ पर्यंतच मर्यादित राहिला. वारणेच्या तहानंतर दोन्ही छत्रपतींमध्ये अत्यंत सलोख्याचे संबंध होते. कोल्हापूरचे संभाजीराजे अनेकदा सातारला येऊन शाहू महाराजांकडे राहत असत. वारणेच्या तहानंतर पुन्हा कधीही सातारा व करवीर छत्रपतींमध्ये वितुष्ट आले नाही, उलट वेगवेगळ्या प्रसंगी सातारचे छत्रपतिही कोल्हापूरास छत्रपतिंकडे राहण्यास येत असत. छत्रपति प्रतापसिंह महाराज कोल्हापूरास आले असताना कोल्हापूरास छत्रपति महाराजांनी त्यांचे केलेले भव्य स्वागत व त्यांचा पाहुणचार यावर अत्यंत वाचनीय असा समकालीन लेख उपलब्ध आहे. ( याच प्रतापसिंह महाराजांचे चरित्र लिहावे, हि कोल्हापूरचे छत्रपति शाहू महाराजांनी मृत्यूशय्येवर असताना व्यक्त केलेली महाराजांची शेवटची इच्छा होती. )

 

जेव्हा सातारच्या पेशव्यांनी व त्यांच्या सरदारांनी सातारकर छत्रपतींना कैद करुन राज्यकारभार स्वतःच्या हाती घेतला, तेव्हा करवीरचे छत्रपति फौजफाटा घेऊन सातारकर छत्रपतींच्या मदतीस धावले होते, मात्र दुर्दैवाने छत्रपतींना त्यामध्ये यश आले नाही. याच कारणांनी करवीर छत्रपतींचा पेशव्यांशी वारंवार संघर्ष होत राहिला. वारणेच्या तहानंतर पेशव्यांनी अथवा पेशव्यांच्या आदेशाने ज्या सरदारांनी करवीर राज्यावर हल्ले केले होते, त्यातील एकासही सातारकर छत्रपति महाराजांची परवानगी अथवा पाठिंबा नव्हता. पेशव्यांच्या राज्यलोभामुळेच पेशवे कोल्हापूर राज्यावर हल्ले करायचे. मात्र यामुळे दोन्ही छत्रपतींचे परस्परांशी असलेल्या अत्यंत प्रेमाच्या व सलोख्याच्या संबंधांस गालबोट लागले नाही.

 

करवीर व सातारा गादीच्या छत्रपतींचे सलोख्याचे संबंध आजपर्यंत टिकून आहेत. आई भवानीच्या कृपेने व माँसाहेब जिजाऊंच्या शिकवणीने हे संबंध असेच दृढ राहतील….

 

करवीरराज्य साताराराज्य

अशाच ऐतिहासिक घटना जाणुन घेण्यासाठी जॉईन करा @Chatrapatishivajimaharaj96

🚩

#आजचेऐतिहासिकदिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३ऑगस्ट१६७७

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला.

वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर,

गदग हा भागही जिंकून घेतला.

महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली.

त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता.

व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला.

अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३ऑगस्ट१९००

स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ

कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म.

महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत.

महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात.

त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला.

नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६).

यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली

पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले.

अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.

🙏क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

 

📜 ३ ऑगस्ट इ.स.१३४७

दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलख याच्या कारकिर्दीत दक्षिणेत जाफरखान उर्फ अल्लाउद्दीन हसन याने बंड करून गुलबर्गा इथे ३ ऑगस्ट १३४७ ला बहामनी राज्याची स्थापना केली. या बहामनी राज्यात १३४७ ते १५३८ या काळात एकूण १८ सुलतान होऊन गेले. बहामनी राज्यातील १४ वा सुलतान शिहाबुद्दीन महमूद याच्या कारकिर्दीच्या दरम्यान बहामनी सत्तेचा कर्तबगार वजीर महंमद गवान याची हत्या झाल्यानंतर बहामनी सत्तेचे  वेगवेगळे सुभेदार जसे युसुफ आदिलखान (आदिलशाही), फतहुल्लाह इमाद (इमादशाही), कुत्ब उल्मुख (कुतुबशाही), अमीर कासीम बरीद (बरीदशाही) व मलिक अहमद बहिरी (निजामशाही) यांनी बहामनी सत्तेतून बाहेर पडत आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्या आदिलशाहीचा.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 ३ आगस्ट इ.स.१६६४

(श्रावण वद्य षष्ठी, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार बुधवार)

 

महाराजांच्या आरमाराने पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १० गलबतांचा ताफा रवाना !

           छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमाराने हेरांनी आणलेल्या माहितीवरून पोर्तुगीज व मोगली आरमाराचा समाचार घेण्यासाठी १०, दहा गलबतांचा ताफा रवाना केला.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 ३ ऑगस्ट इ.स‌१६७७

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले.

इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला. वृद्धाचलम, कावेरीपट्टम, चिदंबरम तसेच शहाजीराजे यांच्या जुन्या जहागिरीचा प्रदेश बाळापुर, बंगरूळ, शिरें, होसकोट जिंकून घेतला. अरणीला वेढा घालून अरणी जिंकली, त्यासोबतच चिकबाळापूर, दोडडबाळापूर, देवरायानदुर्ग, तुमकुर, चित्रदुर्ग, कल्याणदुर्ग, रायदुर्ग, हंपी, कनकगिरी, कोप्पळ, लक्ष्मेश्वर, गदग हा भागही जिंकून घेतला. महाराजांना वेल्लोरशिवाय जास्त विरोध कुठेच झाला नाही व हे सर्व करत करत महाराज पन्हाळ्यावर परतले मार्च १६७८ साली. त्यानंतर लगेच वेल्लोर किल्ला मराठ्यांनी जिंकला ज्याचा वेढा तब्बल एक वर्ष सुरु होता. व्यंकोजी राजांनी महाराजांनी बळकावलेल्या प्रदेशावर हल्ला करून तो मिळवण्याचा प्रयत्न देखील केला पण त्यात त्यांचा पराभव झाला. अश्याप्रकारे तब्बल दीड वर्ष चाललेल्या कर्नाटक मोहिमेची यशस्वी सांगता झाली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 ३ ऑगस्ट इ.स.१९००

स्वातंत्र्यपूर्व काळात पत्री सरकार म्हनजेच प्रतिसरकार स्थापन करून इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे "क्रांतिसिंह नाना पाटील" होत. महाराष्ट्रातील एक देशभक्त, झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जात. त्यांचा जन्म ३ आॅगस्ट १९०० रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात झाला. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते. नानांचे प्राथमिक शिक्षण गावी झाले आणि ते मुलकीपरीक्षा उत्तीर्ण झाले (१९१६) यानंतर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली पुढे सत्यशोधक चळवळीकडे ते आकृष्ट झाले. त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून तत्कालीन अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध लोकमत जागृत केले. अनेक अनिष्ट चालीरीतीविरुद्ध त्यांनी बंड पुकारले.

🙏क्रांतीसूर्य नाना पाटील यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 🙏

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

 

No comments:

Post a Comment