आजचे दिनविशेष २४ ऑक्टोबर - दिनविशेष/जन्मदिन/स्मृतिदिन

 

************

२४ ऑक्टोबर

डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना

************

 

स्थापना - २४ ऑक्टोबर १८८४

 

पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापनेचा आज दिवस !

 

टिळक, आगरकर वगैरे प्रभृतींनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी विद्यार्थ्यांना एतद्देशीय पध्दतीने शिक्षण देता यावे म्हणून पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

 

कोल्हापूरचे महाराज डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिध्द अध्यक्ष होते. तर सोसायटीच्या कौन्सिलमध्ये लोकमान्य टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, वामन शिवराम आपटेंसारखी दिग्गज मंडळी होती. जहाल-मवाळ किंवा सनातन-सुधारक वगैरे आपापसातले वैचारीक मतभेद दूर ठेऊन हे सगळे ह्या राष्ट्रकार्यासाठी एकत्र आलेले होते.

सोसायटीच्या आश्रयदात्यांमध्येही सर्वात वरचे नाव होते कोल्हापूरच्या महाराजांचे. मिरजकर, सांगलीकर, मुधोळकर, रामदुर्गकर, इचलकरंजीकर, जामखिंडीकर, विशाळगडकर वगैरे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या संस्थानिकांनी (अगदी जंजिऱ्याचा सिद्दी धरून) डेक्कन एज्युकेशन सोसायटीला देणग्या दिलेल्या होत्या.

 

ह्या सोसायटीचा पहिला आश्रयदाता (patron) होता मुंबईचा गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन. प्रत्यक्ष गव्हर्नराच्याच नावाने कॉलेज काढल्यास सरकारी ससेमिराही थोड्या प्रमाणावर का होईना पण कमी होणार होता, हा सूज्ञ विचार करून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चालकांनी कॉलेजचे नावफर्ग्युसन कॉलेज ठेवायचे ठरवले आणि सर जेम्स फर्ग्युसनलाच ह्या इमारतीच्या कोनशिला समारंभासाठी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण देण्याचे ठरवण्यात आले.

 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काही शैक्षणिक संस्था :

 

* फर्ग्युसन कॉलेज, पुणे १८८५

* विलिंग्डन कॉलेज, सांगली १९१९

* बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे १९४३

* कीर्ती एम. डूंगरसी कॉलेज, मुंबई १९५४

* चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली १९६०

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२४ ऑक्टोबर

शास्त्रज्ञ एंटोनी वॉन ल्यूवेन्हॉक जन्मदिन

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १६३२

स्मृती - २६ ऑगस्ट १७२३

 

ल्यूवेन्हॉक (Leeuwenhoek) जीवाणु की खोज, शुक्राणु की खोज, सूक्ष्म सेल संरचनाओं (पौधे और पशु), नए नए साँचे के सभी तरह के विवरण और अधिक जानकरी के लिए जाने जाते है।

 

ल्यूवेन्हॉक एक डच जीव वैज्ञानिक थे। वे सूक्ष्म-जीव विज्ञान के जनक माने जाते हैं। उनके सूक्ष्मदर्शी यंत्र ने जीव-विज्ञान की दुनिया में क्रांति ला दी थी।

 

ल्यूवेन्हॉक ने पहली बार व्यावहारिक सूक्ष्मदर्शी का आविष्कार किया और उन्हें इस्तेमाल भी किया। उन्होंने बैक्टीरिया का वर्णन किया और अन्य सूक्ष्म खोजों का वर्णन करने वाले पहले व्यक्ति बन गये।

 

ल्यूवेन्हॉक हॉलैंड में 24 अक्टूबर 1632 में पैदा हुआ था, और एक किशोरी के रूप में वह एक लिनन ड्रेपर की दुकान पर एक प्रशिक्षु बन गया। हालांकि यह विज्ञान की एक जीवन है, यहाँ से ल्यूवेन्हॉक उसकी माइक्रोस्कोप की खोज करने के लिए स्थापित किया गया था। दुकान पर, आवर्धक चश्मा धागे गिनती और कपड़े की गुणवत्ता का निरीक्षण करने के लिए इस्तेमाल किया गया। वह प्रेरित और खुद को पीस और महान वक्रता के छोटे लेंस, जो आवर्धन 275x के लिए माना जाता है।

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२४ ऑक्टोबर

मराठा आरमार दिन

************

 

स्थापना - २४ ऑक्टोबर १६५७

 

२४ ऑक्टोबर १६५७ याच दिवशी शिवरायांनी कल्याण, भिवंडी काबीज केली आणि कल्याण, भिवंडी पेण येथे मराठ्यांच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या जहाजाची निर्मिती झाली.

 

मराठ्यांनी कल्याण भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडी शेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले.

 

दीड शतकाहून जास्त काळ आपले सागरी स्वातंत्र्य हरपून बसलेल्या भारतात, स्वतःचे आरमार उभारणारे सागरावर पाश्चात्यांशी दोन हात करू पाहणारे फक्त मराठेच.

 

म्हणून आजचा दिवस हा "मराठा आरमार दिन" म्हणून साजरा केला जातो.

 

🚩🚩🚩

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

************

२४ ऑक्टोबर

मोगल शासक बहादूरशहा जफर जन्मदिन

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १७७५ (दिल्ली)

स्मृती - नोव्हेंबर १८६२ (बर्मा)

 

भारतातील शेवटचे मुगल शासक म्हणून बहादूर शहा जफर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात येतो. सन १८३७ ते १८५७ साला पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्य संग्रामाच्या पहिल्या उठावा पर्यंत ते शासक पदी होते. बहादूरशहा जफर यांचा शासन काळ फारच संकटमय राहिला आहे. ज्यावेळेला ते मुगल साम्राज्याचे शासक बनले त्यावेळी मुगलांची शक्ती फारच दुर्बल झाली होती.

 

शिवाय, भारतात इंग्रजांच्याईस्ट इंडिया कंपनीने आपला पाया रोवला होता. इंग्रजानी भारतात स्थापण केलेल्या ईस्ट इंडिया कंपनीमुळे त्यांचा भारतात सत्ता स्थापण करण्याचा पाया मजबूत झाला होता. या कंपनीच्या अधिकाराखाली इंग्रजांनी सर्व भारतावर राज्य करण्यास सरुवात केली.

 

व्यापाराच्या उद्देशाने इंग्रज भारतात आले होते, परंतु त्यांनी भारतातील सत्तेचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपले साम्राज्य पसरविण्यास सुरवात केली. इंग्रजांनी वारसाहक्क आणि शासक पदाचा खालसा केला होता. त्यामुळे शासक पदावर असलेल्या मुगल बहादूर शहा जफर हे केवळ नाममात्र शासक बनले.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

२४ ऑक्टोबर

संशोधक विल्हेल्म एडुआर्ड वेबर जन्मदिन

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १८०४

स्मृती - २३ जून १८९१

 

 

विल्हेल्म एडुआर्ड वेबर (Wilhelm Eduard Weber) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता. कार्ल फ्रीदरिश गाउस याच्या बरोबर त्याने पहिल्या विद्युत चुंबकीय टेलिग्राफाचा आविष्कार घडवला.

 

 

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

२४ ऑक्टोबर

अभिनेत्री लीलाबाई पेंढारकर जन्मदिन

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १९१०

 

लीलाबाई पेंढारकर या माहेरच्या लीला चंद्रगिरी. या मराठी चित्रपट अभिनेत्री होत्या. भालजी पेंढारकर हे त्यांचे पती होते.

 

लीलाबाईंचे बालपण बेळगावात आपल्या आई मावशी सोबत अतिशय कष्टाचे आणि हलाखीच्या परिस्थितीत गेले; एकदा आंघोळीनंतर केस वाळवत असताना अचानक बाबुराव पेंटरांनी त्यांना पाहिले. लीलाबाईंचा चेहरा त्यांना इतका आवडला की त्यांनी मूकपटात काम करण्यासाठी लीलाबाईंना निमंत्रण दिले.

 

महिलांनी नाटक तसेच चित्रपटांमध्ये काम करण्याचा तो काळ नव्हता, पण अगदी अनपेक्षितरीत्या परिस्थितीमुळे लीलाबाईंना ते धाडस करायला लावले आणि त्यांनी ते केले. अश्या प्रकारे लीला चंद्रगिरींचे रुपेरी पडद्यावर पदार्पण झाले.

 

१९३० सालच्या प्रभात फिल्म कंपनीच्या 'उदयकाल' मूकपटातून लीलाबाई पेंढारकरांनी भुमिका साकारली त्यानंतर सुरू झालेल्या बोलपट युगातही लीला चंद्रगिरींनी प्रभातच्या अग्निकंकण, सिंहगड, माया मच्छिंद्र मधून भूमिका साकारल्या. बोलपटांच्या सुरुवातीच्या काळात काही गाणी देखील लीला चंद्रगिरी यांनी गायली होती.

 

१९३३ च्या भारतीय चित्रपटसृष्टीतील 'सैरंध्री' या पहिल्या रंगीत चित्रपटाच्या नायिका होण्याचा बहुमान देखील लीलाबाई पेंढारकर यांना मिळाला. त्यानंतर लीलाबाई भालजींच्या चित्रपटांकडे वळल्या.

 

भालजींच्या 'महारथी कर्ण' 'वाल्मिकी' या सिनेमातून भूमिका साकारत असतानाच त्यांचे प्रेम जुळले आणि त्याचे रूपांतर विवाहात झाले लीला चंद्रगिरीच्या त्या लीला पेंढारकर झाल्या.

 

'छत्रपती शिवाजी' मधून राजामाता जिजाबाईंची भूमिका अजरामर करणार्या अभिनेत्री लीला पेढारकरांच्या नावाला कलेच्या विश्वात अनोखे वलय प्राप्त झाले. त्यासोबतच सावित्री चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली. गरोदर असतानाही चित्रपटासाठी त्यांनी घेतलेल्या मेहनतीला तोड नाही; या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्या पोटाला, कमरेला बांधलेल्या दोरीचा परिणाम, पोटातल्या बाळावर झाला. आणि लीलाबाईंच्या मुलगा व्यंग घेऊन जन्माला आला.

 

'गनिमी कावा' हा लीलाबाई पेंढारकर यांच्या रुपेरी कारकीर्दीतला शेवटचा चित्रपट होता.

 

पुरस्कार :

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचाचित्रभूषण पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, जिजाऊ पुरस्कार, मुंबईच्या भारतीय विद्याभवन संस्थेचा कला केंद्र पुरस्कार

 

चित्रपट :

अग्निकंकण, उदयकाल, कान्होपात्रा, कालियामर्दन, गनिमी कावा, गोरखनाथ, छत्रपती शिवाजी, परशुराम (१९३५), परशुराम (१९४७), भक्त दामाजी, महारथी कर्ण, माया मच्छिंद्र, राजा गोपीचंद्र, वाल्मिकी, सावित्री, सिंहगड, सुवर्णभूमी, सैरंध्री.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

२४ ऑक्टोबर

संशोधक विष्णु माधव घाटगे जन्मदिन

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १९०८ (कोल्हापूर)

स्मृती - डिसेंबर १९९१ (बंगलोर)

 

भारतीय विमान विषयक संशोधक. कोल्हापूर जिल्ह्यातील हसूर या गावी जन्म. त्यांनी १९३२ साली मुंबई विद्यापीठाची एम्.एस्सी. पदवी संपादन केली. त्यांनी विशिष्ट वायुगतिकीय (वायूंच्या गतीसंबंधीच्या शास्त्रानुसार असणाऱ्या) परिस्थितीमधील द्रायूच्या (वायू वा द्रव यांच्या) गतीसंबंधी संशोधन केले.

 

वायुगतिकी आणि विमाने बांधण्याचे तंत्र या विषयांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून १९३६ साली त्यांनी गटिंगेन विद्यापीठाची डी.फिल्. ही बहुमानाची पदवी मिळविली. १९३६-४१ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात भौतिकीचे गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.

 

१९४१ साली त्यांची बंगलोरच्या हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि. या संस्थेत अभिकल्पक म्हणून नियुक्ती झाली. १९४२-४७ पर्यंत बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ते वैमानिकी अभियांत्रिकी या वैमानिकी अभियांत्रिकी या विषयाचे प्राध्यापक होते. १९४७ पासून हिंदुस्थान एअरक्राफ्ट लि., बंगलोर या संस्थेचे ते प्रमुख अभिकल्पक उपमुख्य व्यवस्थापक आहेत. त्यानंतर १९७० पर्यंत ते बंगलोरच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लि. या संस्थेचे प्रमुख व्यवस्थापक होते. त्यानंतर बंगलोरच्याच प्रॉडक्ट डिझायनर्स प्रा.लि. या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया रॉयल एरॉनॉटिकल सोसायटी, लंडन इन्स्टिट्यूट ऑफ एरॉनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स, अमेरिका . विविध ख्यातनाम संस्थांचे ते सदस्य आहेत.

 

सैनिकांची ने-आण करणाऱ्या ग्लायडरचा अभिकल्प सुधारणा चाचणी घेणे (१९४२), एच्.टी- या शिकाऊ विमानाचा आराखडा सुधारणा (१९५३), विमान उड्डाण संस्थांना आणि वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारेपुष्पक हे दोन माणसे नेणारे अत्यंत हलके विमान, शेतीतील विविध कामांस उपयुक्त असे कृषक विमान, जेट इंजिनाने चालणाऱ्या शिक्षणास उपयुक्त असणारेकिरण हे विमान, ११४० कि.ग्रॅ. चा रेटा देणारे जेट एंजिन अशा विविध विमानांच्या अभिकल्पाचे विकासाचे बहुमोल कार्य त्यांनी केले.

 

भारत सरकारने त्यांच्या या संशोधनकार्याचा १९६५ सालीपद्मश्रीहा बहुमानाचा किताब देऊन गौरव केला.

 

https://m.facebook.com/vidnyandinvishesh

 

************

************

२४ ऑक्टोबर

अभिनेता जीवन जन्मदिन

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १९१५ (श्रीनगर)

स्मृती - १० जून १९८७ (मुंबई)

 

बॉलीवुडचे नारद मुनी अशी ओळख असलेले अभिनेता जीवन यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१५ रोजी झाला.

 

जीवन यांचे खरे नाव ओंकार नाथ धर, ते काश्मिरी पंडित. जीवन हे नाव त्यांना विजय भट यांनी दिले. त्यांना एकूण २४ भाऊ बहिणी होत्या असे म्हटले जाते. अभिनय करण्यासाठी ते घरातून २६ रुपये घेऊन वयाच्या १८ व्या वर्षी मुंबईत आले.  पहिले काम डायरेक्टर मोहनलाल सिन्हा यांच्या स्टूडियो मध्ये काम मिळाले.

 

मोहनलाल यांनी जीवन यांना आपला चित्रपट 'फैशनेबल इंडिया' मध्ये काम दिले. जीवन यांनी जवळपास ६० चित्रपटात नारद मुनीचा अभिनय केला आहे. आपल्या नारद मुनी रोल बद्दल एकदा जीवन म्हणाले होते, स्वर्गातून नारद मुनी स्वत: आले तर आणि मला बघितले तर ते स्वत:ला डुप्लिकेट मानतील.

 

आपल्या करियरच्या सुरवातीला जीवन यांनी खूप स्ट्रगल केला. जीवन यांना १९३५ साली आलेल्या 'रोमांटिक इंडिया' या चित्रपटातून मिळाली. त्यांनी; सुहाग, नसीब, 'चाचा भतीजा, अफसाना, स्टेशन मास्टर, अमर अकबर एंथनी, नागिन, शबनम, हीर रांझा, जॉनी मेरा नाम, धरमवीर अशा चित्रपटात कामे केली.

 

जीवन यांनी ६० ते ८० च्या दशकात अनेक चित्रपटात चरित्र अभिनेत्याची कामे केली. जरी त्यांनी व्हिलन ची कामे केली, त्यात त्यांनी विनोदी भाव आण्याचे प्रयत्न केले. जेष्ठ अभिनेते किरण कुमार हे जीवन यांचे चिरंजीव. किरण कुमार यांनीही अनेक चित्रपटात काम केले आहे. जसे की- लव इन शिमला, आजाद मोहब्बत, पंडित और पठान, कालिया, औजार, प्यार किया तो डरना क्या, बेनाम, बॉबी जासूस, ब्रदर्स.

 

जीवन यांचे १० जून १९८७ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२४ ऑक्टोबर

संशोधक लाडिस्लाओ जोस बिरो स्मृतिदिन

************

 

जन्म - २९ सप्टेंबर १८९९ (हंगेरी)

स्मृती - २४ आक्टोबर १९८५

 

बॉलपेनचा निर्माता लाडिस्लाओ जोस बिरो यांचा जन्म २९ सप्टेंबर १८९९ रोजी हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झाला.

 

ज्यांच्या शोधांमुळे जग बदलले अशा निर्मात्यांच्या तुलनेत लाडिस्लाओ बिरो जगाला फारसे परिचित नाही. मात्र, बिरो यांनी लावलेला बॉलपेनचा शोध मानवी इतिहासात खूपच फायदेशीर ठरला.

 

बॉलपेनचा शोध लावणारे बिरो पत्रकार, चित्रकार आणि संशोधक होते. बॉल पॉइंट पेन नसताना लोक फाउंटन पेन वापरत. पण त्याची सतत निघणारी शाई, तिचे पडणारे डाग बिरोंना बिल्कुल आवडत नसत. ते या पेनाला पर्याय शोधतच होते. एका वृत्तपत्राच्या छापखान्यात ते एकदा गेले असता तत्काळ सुकणारी शाई आणि रोलर बघून त्यांना बॉल पॉइंट पेनाची कल्पना सुचली.

 

पत्रकार म्हणून काम करत असताना सुरूवातीला बिरो यांनी हीच शाई फाऊंटन पेनमध्ये वापरून पाहिली. मात्र, ही शाई घट्ट असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग अयशस्वी ठरला. त्यानंतर बिरो यांनी त्यांचे बंधू जॉर्जी यांच्याबरोबर काम करण्यास सुरूवात केली. जॉर्जी यांच्यासोबत काम करत असताना बिरो यांनी पेनामध्ये खोबणीद्वारे नियंत्रित होणाऱ्या बॉलचे तंत्र विकसित केले. हाच जगातील पहिला बॉलपेन ठरला.

 

१९३१ मध्ये बुडापेस्ट येथील आंतरराष्ट्रीय मेळाव्यात त्यांनी हा बॉलपेन पहिल्यांदा जगासमोर आणला. १५ जुलै १९३८ ला त्यांना या शोधाचे पेटंट मिळाले. ब्रिटन, आयर्लंड आणि इटलीत आजही या पेनाला बिरो म्हणतात.

 

लाडिस्लाओ बिरो हे ज्यू होते. १९४० मध्ये जर्मनीनं हंगेरीवर आक्रमण केलं तेव्हा बिरो यांना आपला देश सोडावा लागला. ते अर्जेंटिनात आले आणि पेनाचा कारखाना सुरू केला. दुसऱ्या जागतिक महायुद्धात बॉल पॉइंट पेनचा वापर झाला होता. ब्रिटीश रॉयल फोर्सने ३० हजार पेन बनवण्याची ऑर्डर दिली होती.

 

लाडिस्लाओ जोस बिरो यांचे २४ आक्टोबर १९८५ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२४ ऑक्टोबर

स्वातंत्र्यसेनानी लक्ष्मी सेहगल जन्मदिन

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १९१४ (चेन्नई)

स्मृती - २३ जुलै २०१२

 

आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचा जन्म २४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला.

 

लक्ष्मी सेहगल यांचा जन्म एका परंपरावादी तामीळ परिवारात झाला. लक्ष्मी सेहगल यांचे वडील डॉ.एस. स्वामीनाथन हे प्रख्यात वकील होते, तर आई अमू स्वामीनाथन या सामाजिक कार्यकर्त्या होत्या.

 

लहानपणापासूनच राष्ट्रीय आंदोलनांनी त्या प्रभावित होत असत. महात्मा गांधी यांनी विदेशी वस्तूंच्या बहिष्कार करणारे आंदोलन केले तेव्हा लक्ष्मी सेहगल त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या. देशसेवेची आवड असणार्या सेहगल यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये त्यांनी मेडिकल विषयात शिक्षण घेऊन त्या डॉक्टर झाल्या. डॉक्टरकीचे उच्च शिक्षण घेण्यासाठी १९४० मध्ये त्या सिंगापूरला गेल्या. तेथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेच्या संपर्कात त्या आल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी महिलांसाठीराणी झाशी रेजिमेंट ची स्थापना केली. लक्ष्मी सेहगल यांची कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. सेहगल यांनी कर्नल पदापर्यंत बढती मिळविली पण त्यांचीकॅप्टन ही ओळख अखेरपर्यंत कायम राहिली. स्वातंत्र्यसमरात आणि नंतर समाजकारणात मोठे योगदान देणार्या या कर्तृत्वशाली वीरांगनेने जगासमोर स्वत: चा आदर्श निर्माण केला.

 

दुसर्या महायुद्धाच्या वेळी जपानी सेनानी सिंगापूर मध्ये ब्रिटिश सैन्यावर हल्ला केला तेव्हा लक्ष्मी सेहगल सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये सहभागी झाल्या. १९४३ साली आझाद हिंद सरकारच्या कॅबिनेट मध्ये पहिली महिला सदस्या होण्याचा मान त्यांनी पटकाविला. आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट मध्ये लक्ष्मी सेहगल या नेहमीच सक्रिय राहिल्या. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना कर्नल हे पद देण्यात आले.

 

१९४५ साली आजाद हिंदच्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत इंफाळ सीमेकडून माघार घेताना त्यांना इंग्रजांनी कैद केले हिंदुस्थानात आणले. १९४६ च्या सुप्रसिद्ध 'सेहगल, धिल्लाँ, शाहनवाज म्हणजेच आजाद हिंद विरुद्ध ईंग्रज सरकार या लाल किल्ला अभियोगात त्या मुक्त झाल्या. स्वातंत्रोत्तर काळानंतर त्यांनी भारतीय कम्युनिष्ट पक्षात प्रवेश करून आपले कार्य राज्यसभेत चालूच ठेवले.

 

बांगलादेश फाळणी अन भोपाळ गॅस दुर्घटने वेळी स्वतः वैद्यकीय सेवा केली. मार्च १९४७ मध्ये त्या कॅप्टन प्रेम सेहगल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. स्वातंत्र्यानंतरच्या काळात त्यांनी समाजसेवेला वाहुन घेतले. लक्ष्मी सेहगल यांना १९९८ मध्ये पद्मविभूषण या सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले होते.

 

लक्ष्मी सेहगल यांचे २३ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२४ ऑक्टोबर

अवकाशशास्त्रज्ञ टायको ब्राहे स्मृतिदिन

************

 

जन्म - १४ डिसेंबर १५४६

स्मृती - २४ ऑक्टोबर १६०१

 

क्रांती म्हटले की आपल्याला आठवते ती हिंसा. तुंबळ युद्ध; पण क्रांती केवळ हिंसेने घडते, साधनाने घडते असे नाही. ती विचारानेही घडते. त्या विचारांमागे तपश्चर्या असेल तर परिवर्तन घडू शकते. विचाराला आणि साधनाला नवा अभ्यास प्राप्त झाला की शास्त्रीय जगात विकासाचा पुढचा टप्पा गाठला जातो. कोपर्निकस अणि केप्लर यांच्या कामातील दुवा म्हणता येईल असा खगोल अभ्यासक म्हणून टायको ब्राहेचे नाव घेता येईल.

 

आकाशातील सर्व घडामोडींचा पत्ता आपल्याला फक्त दुर्बीण (telescope) या साधनानेच लागतो असा एक गैरसमज सार्वत्रिक आहे, त्यामुळे पूर्वीच्या काळात दुर्बिणी नव्हत्या तरी अभ्यासकांनी एवढी प्रगती कशी केली असेल असा प्रश्न नेहमी विचारला जातो. असं असतं तर खगोलशास्त्राचा जन्मच १६१० मध्ये झाला असता कारण गॅलिलिओने या सुमारास दुर्बिणीचा वापर आकाश निरीक्षणासाठी केला. केप्लरपूर्वी टायको ब्राहे, कोपर्निकस, टॉलेमी . खगोलवेत्ते होऊन गेले. विचार, तर्क, निरीक्षण यांच्या जोरावर त्यांनी सैद्धांतिक खगोलशास्त्राचा पाया घातला.

 

टायको ब्राहेचा जन्म तसा उमराव घराण्यातला. पुत्रप्रेमापोटी त्याच्या निपुत्रिक काकाने त्याचा सांभाळ केला. टायकोचे आयुष्य फक्त ५५ वर्षांचे होते (१५४६-१६०७) पण त्याने खगोलशास्त्राचे जग हलवून सोडले. कोपनहेगन आणि लिपझिग येथे तत्त्वज्ञान आणि कायदा याचे शिक्षण घेत असताना वयाच्या १४व्या वर्षी त्याने सूर्यग्रहण बघितले आणि तेव्हापासून या माणसाने खगोलाचाही अभ्यास सुरू केला. या माणसाने खगोलशास्त्रात योगदान द्यावे अशीच जणू नियतीची इच्छा होती.

 

१५६३ मध्ये गुरू अणि शनी यांची युती झाली. अगोदर केलेल्या गणितानुसार ही युती झाली नाही. तिची वेळ एक महिना अगोदर आली. या प्रकाराने अस्वस्थ होऊन त्याने स्वत: निरीक्षणे सुरू केली. हेतू हा होता की युती, प्रतियुतीसारख्या घटना आणि त्यांचा अगोदर वर्तविलेला मुहूर्त यांची फारकत होऊ नये. १५६६ मध्ये टायकोने पदवी संपादन केली. काही काळानंतर टायकोला स्वगृही परतावे लागले. या प्रवासात ११ नोव्हेंबर १५७२ हा दिवस फार भाग्याचा ठरला.

 

शर्मिला तारकापुंजात काफ नावाचा एक तारा आहे. त्याच्या किंचित उत्तरेला या दिवशी पूर्वी कधीही दिसलेला एक तारा दिसू लागला. त्याचे तेज पहिल्यांदा गुरू एवढे होते. नंतर तो शुक्रासारखा तेजस्वी दिसू लागला. सुमारे दोन महिने हा तारा दिवसाढवळ्याही सहज दिसत होता. नंतर तो फक्त रात्रीच दर्शन देऊ लागला आणि मार्च १५७४ पासून दिसेनासा झाला. १४ महिने पर्यंत दर्शन देणारा हा तारा म्हणजे गेल्या ५०० वर्षांतील सर्वात तेजस्वी असा अति नवतारा होता. या सगळ्या गोष्टींचा टायकोने खूप अभ्यास केला. टिपणे केली. त्यावर एक पुस्तकही प्रसिद्ध केले. हा तारा पुढेटायकोचा तारा म्हणून प्रसिद्ध झाला. या ताऱ्याचे तेज ३० कोटी सूर्यांच्या तेजाएवढे होते ही घटना घडली ती आपल्याच आकाशगंगेत सुमारे १० हजार प्रकाशवर्ष अंतरावर. खगोलशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे तर या ताऱ्याची निरपेक्ष प्रत - १६. इतकी होती. या ताऱ्याच्या स्फोटानंतर त्यातील वायु आणि अन्य गोष्टी अतिवेगाने म्हणजे सेकंदाला सुमारे ते हजार किमी वेगाने पसरू लागल्या. आजमितीस हे द्रव्य २० प्रकाशवर्षे अंतराच्या परिघात पसरले आहे. या सर्व गोष्टींचा टायकोला फायदा झाला.

 

डेन्मार्कच्या फ्रेडरिक राजाने त्याला हीव्ह येथे वेधशाळेसाठी जागा देऊ केली आणि त्याच्या निर्वाहाचीही सोय केली. सूर्यमालिकेतील मंगळ या ग्रहाची निरीक्षणे येथूनच टायकोने केली. मंगळाचे तारका संदर्भातले स्थान पाहून ते नोंदवून ठेवण्याची कामगिरी १५७६ ते १५९६ या २० वर्षांच्या काळात केली गेली. ग्रहांची स्थिती अचूक सांगता येणे हा या निरीक्षणांचा एक हेतू होता. निकोलस कोपर्निकसने १५४२ च्या सुमारास सूर्यकेंद्री सिद्धान्त मांडला होता. सर्व ग्रह सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने भ्रमण करतात हा सर्वस्वी नवीन सिद्धान्त त्याने मांडला. चर्चच्या प्रभावामुळे त्याला तो दबक्या आवाजात मांडावा लागला. तो सुद्धा गृहितक या स्वरूपात. या संबंधीचे पुस्तक त्याने आपल्या आयुष्याच्या शेवटी शेवटीच प्रसिद्ध केले. टॉलेमीचा पृथ्वीकेंद्री सिद्धान्त यामुळे बाद होणार होता.

 

टायकोचे मन म्हणजे या दोघांच्या सिद्धान्ताचा मेळ होता. टायकोच्या मते सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असले तरी सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि तेच सिद्ध करण्यासाठी २० वर्ष त्याने मंगळ निरीक्षणांचा पाठपुरावा केला. धूमकेतू हे आपल्या वातावरणात तयार होतात या प्रचलित विचारांनाही टायकोने धक्का दिला. हीव्ह मधील गाशा टायकोला अखेर गुंडाळावा लागला.

 

१५९९ मध्ये रुडाल्फ राजाच्या नियंत्रणावरून तो प्रागला गेला. त्याच्या मृत्यूच्या एक वर्ष अगोदर त्याला योहान्स केप्लरसारखा सहायक मिळाला. टायकोच्याच निरीक्षणांवरून अखेर केप्लरने आजचा सुधारित सूर्यकेंद्री सिद्धांत मांडला. त्यासंबंधी त्याचे तीन नियम प्रसिद्ध आहेत.

 

टायकोचे निधन २४ ऑक्टोबर १६०१ रोजी झाले. असले तरी आजही टायकोचा तारा आणि केप्लरचा गुरू म्हणून तो अजरामर आहे

 

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

२४ ऑक्टोबर

लेखक अरविंद गोखले स्मृतिदिन

************

 

जन्म - १९ फेब्रुवारी १९१९ (सांगली)

स्मृती - २४ ऑक्टोबर १९९२

 

मराठी लघुकथा लेखक अरविंद गोखले यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९१९ रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे झाला.

 

अरविंद गोखले यांचे शिक्षण पुणे मुंबई येथे बी.एस्सी. पर्यंत झाले. १९४१ मध्येदक्षिणा फेलो होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्याइंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला.

 

अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी त्यांनी मिळविली. १९४३ पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३ नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते.

 

हेअर कटिंग सलून ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात १९३५ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी ३५०हून अधिक कथा लिहिल्या. त्यांच्या बर्याच कथा, नजराणा ते दागिना पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

 

कातरखेळ, मंजुळा, रिक्ता, कॅक्टस, विघ्नहर्ती ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत. अरविंद गोखले यांच्या अनेक कथांचे यूरोपीय भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत. स्वतंत्र कथालेखना खेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केले आहेत; तसेच ना.सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. त्यांनी मराठीतील १९५९ ते १९६३ मधील निवडक कथांची वार्षिके प्रसिद्ध केली आहेत.

 

अमेरिकेस पहावे जाऊन हे अरविंद गोखले यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. अरविंद गोखले यांच्या लघुकथांचेअरविंद गोखले यांची कथा या नावाने संकलन करून ते भालचंद्र फडके यांनी संपादित करून प्रकाशित केले आहे.

 

अरविंद गोखले यांचे २४ ऑक्टोबर १९९२ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 २४ ऑक्टोबर 🌹

अभिनेत्री मल्लिका शेरावत चा वाढदिवस

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १९७६ (हरियाणा)

 

अभिनेत्री मल्लिका शेरावतचा आज वाढदिवस !

 

मल्लिका शेरावत ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. हिचे खरे नाव रीमा लांबा आहे.

 

मल्लिका ही हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये बोल्ड भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिचा पहिला प्रमुख चित्रपट 'ख्वाइश'. या चित्रपटात विक्रमी चुंबन दृश्ये दिल्यामुळे ती चर्चेत आली तेव्हा पासून सतत चर्चेत राहिली. ती एकेकाळी बॉलिवूडची अनभिषिक्त सेक्स सिंबॉल झाली होती.

 

रीमा लांबा हिने भारतीय तत्त्वज्ञान या विषयातील दिल्ली विद्यापीठाची पदवी मिळवली आहे. तिचे एकदा लग्न घटस्फोट झाला आहे.

 

चित्रपटातील भूमिका - जीना सिर्फ मेरे लिये, ख्वाइश, किस किस की किस्मत, मर्डर, बचके रहेना रे बाबा, माईथ, प्यार के साईड इफ्केट्स, शादी से पहले, रना जरुरी है, गुरू, प्रिती एके भूमी मेलिडे, आप का सुरूर - रियल लव्ह स्टोरी, फौज मे मौज, वेलकम, अनव्हेल्ड, दशावतारम, अग्ली और पगली, मान गये मुघले आझम, थॅंक यू.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

🌹 २४ ऑक्टोबर 🌹

गायिका कौशिकी चक्रवर्ती चा वाढदिवस

************

 

जन्म - २४ ऑक्टोबर १९८०

 

अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकाचा विषय ठरलेली शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती चा आज वाढदिवस.

 

पं.अजय चक्रवर्ती यांच्या कन्या कौशिकी चक्रवर्ती. पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ऱ्या वर्षापासून तिने आपल्या वडिलांकडे संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या रेनकोट, चोखेर बाली अश्या चित्रपटाचे प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने केलेल्या प्रमुख नायिकेची ऑफर दिली होती, पण त्याला नकार देउन कौशिकी चक्रवर्ती ने शास्त्रीय संगीत शिकण्यास प्राधान्य दिले.

 

कौशिकी २००६ मधील त्यांच्या पहिल्या मैफलीच्या आठवणी सांगताना म्हणते, एक दिवस मी घरी असताना दूरध्वनी वाजला. मी तो घेतला. ‘मैं भीमसेन जोशी बोल रहा हूँ. इस साल हमारे यहाँ पूना आना पडेगा असा पलीकडून आवाज आला. पंडितजी मला दिसत नसले तरी मी जागेवरच उभी राहिले होते.  कौशिकी सारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी खुद्द पं.भीमसेन जोशी यांनी दिलेली पावती हे कौशिकीचे यश आहे. आज तिचे नाव या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्ही मुळे देशविदेशात गाजत आहे.

 

तिचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यांनीही कौशिकी प्रमाणेच आपले सासरे पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे.

 

कौशिकीने देशात परदेशात अनेक मैफीली गाजवल्या आहेत. गाणारं सौंदर्यच हे. जे तिचे कार्यक्रम बघतात ते तिचे फॅन होतात.

 

कौशिकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

************

************

२४ ऑक्टोबर

गायक मन्ना डे स्मृतिदिन

************

 

जन्म - मे १९१९

मृत्यू - २४ ऑक्टोबर २०१३

 

मन्ना डे यांचा आज स्मृतिदिन !

 

मन्ना डे यांचे खर नाव प्रबोधचंद्र डे असे होते. मन्ना डे, यांना खरे तर पैलवानकी करायची होती. त्यासाठी ते कोलकात्यात तालमीत पैलवानांकडे सरावही करायचे. पण चष्म्यामुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता आलं नाही. कुस्ती खेळताना चष्मा आडवा येऊ लागला. अखेर पैलवानकीचा नाद सोडून महाविद्यालयीन जीवनात ते संगीताकडे वळले.

 

कोलकाता येथील विद्यासागर कॉलेज मध्ये त्यांनी संगीतसाधना सुरू केली. त्या वेळीही त्यांच्या मनात शास्त्रीय संगीत की फिल्म संगीत असा संभ्रम होता. मन्ना डे यांचे वडील पुमाचंद्र डे हे चार्टर्ड अकाउंटंट होते, मुलाने बॅरिस्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु मन्ना डे यांना तोपर्यंत आपल्या काका सारखे म्हणजेच के.सी. डे यांच्या सारखे अभिनेते, गायक होण्याच्या ध्यासाने पछाडले होते. के.सी. डे हे न्यू थिएटर्स मध्ये काम करीत असत. त्यांनी मन्ना डे यांना आपला शिष्य केले आणि तिथूनच मन्ना डे यांच्या संगीत प्रवासाला सुरुवात झाली. मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. मन्ना डे हे नावही के.सी. डे यांनीच ठेवले होते. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते अनेक हिंदी बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते.

 

पार्श्वगायनाची सुरवात मन्ना डे यांनी १९४२ मधीलतमन्ना या चित्रपटापासून केला.’तमन्ना चे संगीत दिग्दर्शक के.सी. डे हेच होते. मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर 'जागो आयी उषा' हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या 'बसंत बहार' मधील 'सुर ना सजे' मुळे; तसेच 'श्री चार सौबीस' मधील 'प्यार हुआ'; सीमा मधील 'तू प्यारका सागर है'; दो आंखे बारह हाथ मधील ' मालिक तेरे बंदे हम' किंवा 'लागा चुनरीमे दाग' अश्या निवडक गीतातूनच झाली.

 

राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला तो योग्यही वाटला. शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली. विशेषत: रफी यांच्या बरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील 'मामा मामा' किंवा 'चलती का नाम गाडी' मधील 'बाबू समझो इशारे'; 'पडोसन' मधील किशोर कुमार बरोबर गायलेले 'एक चतुर नार' ही गीते त्याची साक्ष देतात.

 

मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत. मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्या गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे.

 

त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ' आई मका' (एक धागा सुखाचा), 'धुंद आज डोळे' (दाम करी काम).

 

त्याच बरोबर "घन घन माला नभी (वरदक्षिणा) ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते. 'घरकुल' चित्रपटातील 'हाउस ऑफ बॅम्बू' हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.

 

मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.

 

मन्ना डे यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

🎯 यशवंत - एक प्रेरणास्रोत

🎯 भाग - 29

🎯 श्री.संदीप पाटील,दुधगाव.

 

🏵️साहित्य उत्सव ची प्रेरणादायी प्रस्तुती.

 

 

बालपण म्हणजे एक सुवर्णकाळ. प्रत्येक व्यक्तीची बालपणीची एखादी विशेष अशी आठवण असतेच. माझ्या ही अनेक आहेत. त्यांपैकीच एक आजच्या भागाचे लेखन करत असताना मला आठवली एकदा मी यात्रेत फिरायला गेलो होतो. फिरता फिरता मी एका पोस्टर च्या स्टॉलवर आलो. वेगवेगळी पोस्टर पाहताना माझी नजर एका पोस्टरवर पडली. मला ते पोस्टर खूप खूप आवडलं. मी ते खरेदी केलं आणि घराच्या भिंतीवर लावलं ते पोस्टर होतं एका बॉडीबिल्डरचं. त्याचं ते पिळदार शरीर पाहून,त्याच्यासारखी बॉडी बनवायचं स्वप्नं मी रंगवू लागलो. रोज व्यायामाला जाऊ लागलो. पण, काही दिवसात मी व्यायामाचा नाद सोडला. पण, आजच्या यशवंतानं मात्र माझ्यासारखा नाद सोडला नाही. त्याच्या मेहनतीच्या जोरावर आज तो एक यशवंत आहे. तो यशवंत कोण? हे जाणून घेऊ आजच्या भागात.. चला तर मग..

 

ऑस्ट्रियासारख्या छोट्याशा देशात त्याचा जन्म झाला. वडील कडक शिस्तीचे पोलिस पण, काही दिवसांतच त्यांना नोकरी गमवावी लागली. नुकतंच दुसरं महायुद्ध संपलं होतं आणि भयानक वाईट अवस्था निर्माण झाली होती.

 

त्याला फुटबॉल आणि चित्रपट खुप आवडायचे. 'रेज पार्क' नावाचा प्रसिद्ध बॉडीबिल्डर, अभिनेता त्याला खुप आवडायचा त्याच्या सारखा अभिनेता बनण्याचं त्यानं स्वप्नं पाहिलं होतं. एक दिवस त्याच्या फुटबॉल प्रशिक्षकांनी सर्वांना जिम दाखवायला नेलं. जिम आणि  जिममध्ये व्यायाम करणारे तरुण, त्यांची शरीरयष्टी पाहून तो भारावून गेला. त्याने आपल्या प्रशिक्षकांना सांगितले कि मला जिममध्ये व्यायाम करून बॉडीबिल्डर बनायचं आहे. प्रशिक्षकांनी फुटबॉल आणि जिम यांपैकी एक निवडायला सांगितलं त्यानं जिम निवडलं. त्यावेळी त्याचं वय होतं 14 वर्षं.

 

पण, खरी अडचण होती वडिलांची. मुलानं सैन्यात भरती व्हावं ही वडिलांची इच्छा शिवाय, बॉडीबिल्डिंग ला त्याकाळी विशेष महत्त्व नव्हते. हा,ना करता करता वडिलांनी परवानगी दिली. तो व्यायाम करू लागला. सुट्टीच्या दिवशीही तो जबरदस्तीने जिम सुरू करायला लावायचा.

 

वयाच्या अठराव्या वर्षी देशाच्या नियमानुसार त्याला सैन्यात भरती व्हावं लागलं. एका शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो ट्रेनिंग सेंटर मधून पळून गेला आणि त्यानं त्या स्पर्धेत पहिला नंबर मिळविला.

 

तेथून त्यानं मागे वळून पहिलंच नाही तो  मि.युनिव्हर्स  झाला. वयाच्या 23 व्या वर्षी तो सर्वात तरुण मि.ऑलंपिया बनला सलग पाचवेळा जिंकला खुप प्रसिद्ध झाला. त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्याचं स्वप्नं पूर्णत्वास आलं. कठोर मेहनतीच्या बळावर तो मोठा अभिनेता बनला त्याला टर्मिनेटर म्हणून ओळखलं जाऊ लागले. तो टर्मिनेटर म्हणजेच अर्नोल्ड श्वार्ज़नेगर होय.

 

काही माणसांची ओळख ते करत असलेल्या कामाने, व्यवसायाने किंवा त्यांना मिळालेल्या पदाने होत असते. पण अर्नोल्ड हे एकमेव व्यक्ती असे आहेत कि, त्यांच्यामुळे बॉडी बिल्डिंग ला ओळख प्राप्त झाली. म्हणूनच अर्नोल्ड श्वार्ज़नेगर एक यशवंत आहेत.

 

आपण पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, जर आपण कठीण परिश्रम घेतले तर आणि तरच आपली स्वप्नं पूर्ण होऊ शकतात. याचा प्रत्यय अर्नोल्ड श्वार्ज़नेगर यांच्या प्रवासातून येतो.

 

उद्या पुन्हा भेटू एका नव्या यशवंतसह. तो पर्यंत नमस्कार.

 

🛑 कृपया लेख नावासहच फॉरवर्ड करा...

 

धन्यवाद!!!!!

 

🎯 यापूर्वीचे सर्व लेखन वाचण्यासाठी फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. ब्लॉगला फॉलो करा...

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२४ ऑक्टोबर - दिनविशेष

 

२४ ऑक्टोबर रोजी

 झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१६०५: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.

 

१८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल अरीयेल चंद्राचा शोध लावला.

 

१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.

 

१९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.

 

१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.

 

१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

 

१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.

 

१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

 

१९६४: उत्तर र्होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.

 

१९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.

 

१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

 

१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

 

२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

 

२००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.

 

२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.

 

२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.

 

२४ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१६३२: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

 

१७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: नोव्हेंबर १८६२)

 

१८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)

 

१८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)

 

१९१०: मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.

 

१९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २०१२)

 

१९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)

 

१९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ऑक्टोबर २०१२)

 

१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.

 

१९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.

 

१९७२: अभिनेत्री मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म.

 

२४ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१६०१: डच खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)

 

१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)

 

१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)

 

१९७९: अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८)

 

१९९१: स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९२१)

 

१९९१: ऊर्दू कथा पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)

 

१९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)

 

१९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.

 

२०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन. (जन्म: सप्टेंबर १९२७)

 

२०१३: पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन. (जन्म: मे १९१९)

 

२०१४: भारतीय अभिनेते, दि

No comments:

Post a Comment