❀ ५ सप्टेंबर ❀/दिनविशेष-स्मृतिदिन

 

************

सप्टेंबर

व्हॉयेजर- या यानाचं उड्डाण

************

 

व्हॉयेजर- अंतरीक्षयान आहे. याचे वजन ७२२ किलो ग्राम (१५९० lb) आहे. ही पृथ्वीपासून सर्वात दूर गेलेली माणसाने निर्माण केलेली वस्तू आहे.

 

दिनांक सप्टेंबर १९७७ रोजी व्हॉयेजर- या यानानं पृथ्वीवरून उड्डाण केले. सौरमालेचा अभ्यास करण्यासाठी हे यान सोडले गेले आहे.

 

गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. त्यानंतर ही यानं आपल्या सौरमालेपलीकडे जातील अशी व्यवस्था करण्यात आली होती.

 

युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांना भेट देणारी हे पहिले यान आहे.

 

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

सप्टेंबर

जागतिक धर्मादाय दिन

************

 

आज जागतिक धर्मादाय दिन !

 

जागतिक धर्मादाय दिन दरवर्षी सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हे संयुक्त राष्ट्र महासभेने २०१२ मध्ये जाहीर केले होते.

 

जागतिक धर्मादाय दिनाचा मुख्य हेतू म्हणजे स्थानिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:च्या हेतूसाठी व्यक्ती, धर्मादाय, परोपकारी आणि स्वयंसेवक संघटनांसाठी जागरूकता वाढवणे आणि जगभरातील दान संबंधित कामांसाठी एक सामान्य व्यासपीठ उपलब्ध करणे.

 

धर्मादाय म्हणजे काय ?

 

धार्मिक किंवा नैतिक उद्देशाने दान करण्याकरिता निर्माण झालेला निधी किंवा आर्थिक उपयुक्त साधन म्हणजे धर्मादाय. त्याचप्रमाणे निधी किंवा आर्थिक मूल्य असलेले साधन यातून केलेले दान किंवा आर्थिक साधनांचा गरजूंस करून दिलेला उपयोग म्हणजेही धर्मादायच होय. उदा. धर्मादायमधून निर्माण केलेला विश्वस्त निधी, रुग्णालय आणि औषधालय, पाणपोई, धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृह, अनाथालय, अपंगसेवा केंद्र . गोष्टी धर्मादाय म्हटल्या जातात त्याद्वारे दिलेले अनुदान किंवा त्यांचा करू दिलेला उपयोग हाही धर्मादायच होय.

 

धर्मादाय हा दानाचाच एक प्रकार आहे. अन्नदान, विद्यादान, द्रव्यदान, प्राणदान, कन्यादान, भूमिदान, वस्त्रदान . स्वरूपात व्यक्तीने किंवा समूहाने धार्मिक किंवा नैतिक बुद्धिने केलेला परोपकार म्हणजे दान होय. दान हे पुण्यकारक कर्म आहे. भिक्षेकऱ्यास घातलेली भिक्षा किंवा धार्मिक कार्यासाठी महसुलातून प्रत्येक वर्षी काढून ठेवलेली रक्कम किंवा धर्मशील व्यक्ती किंवा धार्मिक कार्य यांच्या खर्चासाठी नेमून दिलेली रक्कम हेही धर्मादायात मोडते. सारांश मानवजाती संबंधी सद्भावना प्रेम या भावना धर्मादाय संकल्पनेशी निगडीत आहेत. ‘धर्मादाययातीलधर्महे पहिले पद त्यामुळेच आले आहे.

 

आजपर्यंत पुण्यप्राप्ती हाच प्रामुख्याने धर्मादायाचा उद्देश राहिलेला असला, तरी बदलत्या काळाची पाऊले पाहून आज मानवतावादी भूतदयावादी दृष्टीकोनातूनच धर्मादायाची प्रस्थापना व्यवस्थापन करणे समाजाच्या दृष्टीने अधिक हिताचे ठरणार आहे. माणसा माणसांच्या मध्ये असणारा सामाजिक, सांस्कृतिक अर्थिक असमतोल नष्ट करण्याचे एक प्रभावी साधन म्हणून धर्मादायाकडे पाहण्यास आता हरकत नाही.

 

वि.भा. पटवर्धन ; पु.. भांडारकर

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

शिक्षक दिन

************

 

आज शिक्षक दिन !

 

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

 

आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडे शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात.

 

राजकारणात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली असली तरी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली.

 

शिक्षणक्षेत्रात योगदान दिलेल्या शिक्षकांच्या आदरार्थ जगभरात हा दिवस साजरा करण्यात येतो. व्यक्ती आणि समाजाच्या विकासात शिक्षणाचा वाटा मोलाचा आहे. जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे, म्हणूनच शिक्षणातून व्यक्तीची जडणघडण करणाऱ्या शिक्षकाचा आदर करण्याचा हा दिवस असतो.

 

साधरण विसाव्या शतकापासून शिक्षक दिन साजरा करण्याची परंपरा जगभरात सुरू झाली. भारतामध्ये सर्वात आधी १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

 

ऑक्टोबरला जगातील अनेक देशात शिक्षक दिन साजरा करतात. पण इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात; ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चिली, जर्मनी यासारख्या देशात ऑक्टोबर मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात येतो.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १८८८

मृत्यू - १७ एप्रिल १९७५

 

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर 'शिक्षक दिवस' म्हणून साजरा करतात. डॉ. राधाकृष्णन यांनी १९०९  ते १९४८ वर्षं पर्यंत शिक्षक म्हणून काम केले.

 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा सर्वात आवडता विषय होता तो लेखन. शालेय जीवनापासूनच त्यांनी हा लेखनाचा छंद जोपासला होता. आपली मते, विचार ते निर्भीडपणे मांडीत आणि लिहीत. आपल्या लेखनातून सतत ते सत्याचाच पाठपुरावा करीत. त्यांच्या लेखनाला एक वेगळीच धार होती. तेज होते. त्यांचे लेखन मोजकेच होते. पण विचार करायाला लावणारे होते.

 

तत्वज्ञान हा तर त्यांचा सर्वात आवडता विषय. या विषयावर त्यांनी अनेक कसदार लेख विविध नियतकालिकांतून लिहिले. निरनिराळ्या विषयांवरील त्यांच्या ग्रंथाना सखोल तत्वज्ञानाची जोड मिळाली होती. साहजिकच या ग्रंथानी आम दुनियेत वाहवा मिळविली. त्यांचे ग्रंथ म्हणजे भारत देशाचा अमोल ठेवाच आहे. ते एक मैल्यवान लेणे होते.

 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी मोजकेच ग्रंथ लिहिले. पण त्या ग्रंथांनी त्यांना प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. या ग्रंथांची नावे जरी नजरेखालून घातली तरी त्यातील विषयांची विविधता उमगेल. त्यांची पुस्तके भारतीय तत्त्वज्ञानाची, धर्माची आणि संस्कृतिची ओळख करून देतात. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, धर्म संस्कृती यांची ध्वजा दाही दिशांना सतत उंचच उंच फडकवित ठेवली. ही भारतीय साहित्याचे थोर सेवाच ठरली आहे.

 

भारताबाहेरील अनेक टीकाकार भारतीयांना प्राणापलीकडे प्रिय असणाऱ्या हिंदू धर्मावर, त्याच्या तत्त्वज्ञानावर, आचार-विचार, संस्कृतीवर, रीतिरिवाजावर सडकून टीका करायचे. या टीकेत जहालपण असायचे. विरोधक आणि टीकाकारांना आपल्या धार धार लेखणीने त्यांनी गप्प केले होते.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर

 

मुक्ता साळवे या लहुजी वस्ताद साळवे यांची नात असून मांग समाजातली मुलगी होती. १८४८ साली जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील ती पहिली विद्यार्थिनी होती. सावित्रीबाई फुले या तिच्या पहिल्या शिक्षिका.

 

मुक्ताचा 'ज्ञानोदय' या मासिका मध्ये मार्च १८५५ ला 'मांग-महारांच्या दुःखा विषयी निबंध' प्रकाशित झाला होता. मुक्ता साळवेने लिहिलेल्या निबंधातील मुद्दे भाषा आजही विचार करायला लावणारी आहे.

 

ब्राम्हणांच्या धार्मिकपणा बद्दल बोलताना ती म्हणते, "ब्राम्हण लोक म्हणतात की, इतर जातींनी वेद वाचू नयेत. याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का? तर हे भगवान, आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग?"

 

शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञातिबांधवांना शिक्षण घेण्याचे आवाहन या निबंधात केले आहे. ती म्हणते, "अहो दारिद्ऱ्याने पिडलेले मांगमहार लोकहो, तुम्ही रोगी आहात, तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरां प्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा."

 

दलित जातींवरील गुन्हेगारीच्या शिक्क्याविषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते. तिने मांगमहार स्त्रियांच्या दुःखाबद्दलही लिहिले आहे.

 

मांग-महार स्त्रिंयाच्या वाट्याला येणारे दुःख किती भयंकर असते याच्या विदारक वास्तवाचे वर्णन करताना, "त्या स्त्रियांना कसे उघड्यावर बाळंत व्हावे लागते, त्यावेळी त्यांना किती यातना सहन कराव्या लागतात" याचे वर्णन तिने केले आहे.

 

प्रा. हरी नरके यांनी मुक्ता साळवेंला आद्य दलित लेखिका म्हटले आहे. 'सत्यशोधक' या अतुल पेठे दिग्दर्शित गो.पु. देशपांडे लिखित नाटकात मुक्ता साळवेंची भूमिका रेखाटली गेली आहे.

 

'मी मुक्ता साळवे बोलतेय' हे श्रुती तोरडमल यांचे एकपात्री नाटक आहे.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

सप्टेंबर

नृत्यांगना दमयंती जोशी जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९२८ (मुंबई)

स्मृती - १९ सप्टेंबर २००४ (मुंबई)

 

नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म सप्टेंबर १९२८ रोजी झाला.

 

ज्या काळात पार्वतीकुमार, गोपीकृष्ण, रोशनकुमारी यांच्यासारखी नर्तक मंडळी सिनेमाकडे वळली त्या काळात दमयंती जोशी यांनी कथक नृत्यसाधनेची विशुद्ध कास धरली आणि त्यामध्ये नवनवीन प्रयोग सिद्ध केले. दमयंती जोशी यांनी कथक नृत्यप्रकारास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली, तर भरतनाट्यम हा नृत्यप्रकार दक्षिणेतून मुंबईत येऊन रुजण्यास त्या कारणीभूत झाल्या.

 

बालपणापासून नृत्याचीच ओढ असलेल्या दमयंती जोशी यांचा जन्म मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरवातीचे नृत्य शिक्षण सीताराम प्रसाद यांच्याकडे घेतले. दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. हे सगळे १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे.

 

मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅले मधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनका जोशी यांनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंती जोशींनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान महत्वाचे होते.

 

भारतीय नृत्य विदेशात पोहचवण्याचे श्रेय दमयंती जोशी यांना जाते. त्यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.

 

दमयंती जोशी यांचे निधन १९ सप्टेंबर २००४ रोजी झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

साहित्यिका लीलावती भागवत जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९२०

स्मृती - २५ नोव्हेंबर २०१३

 

बालकुमार साहित्यिक लीलावती भागवत यांचा जन्म सप्टेंबर १९२० रोजी झाला.

 

लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या.

 

लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी मे १९४० रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले. भा.रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१ मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले.

 

नामवंत लेखकांचे लेखन .. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले.

 

अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला. साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदी नंतर सुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले.

 

लीलावती भागवत यांचे २५ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.

 

लीलावती भागवत यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

कवयित्री कविता महाजन जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९६७ (नांदेड)

स्मृती - २७ सप्टेंबर २०१८ (पुणे)

 

मराठी लेखिका, कवयित्री कविता महाजन यांचा जन्म सप्टेंबर १९६७ नांदेड येथे झाला.

 

गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांचे निकटचे स्नेही 'प्रतिभानिकेतन'चे सेवानिवृत्त प्राचार्य .दि. महाजन यांच्या त्या कन्या. कविता महाजन यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय मध्ये झाले. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. मराठी साहित्य या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली होती.

 

कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले. आपल्या लेखनातून या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. आदिवासी भागातल्या अनुभवांचा इतिवृत्तांत तसेच स्वयंसेवी संस्थांसह स्त्री-पुरुष संबंधातले राजकारण टोकदारपणे आणि तेवढेच हळूवारपणे त्यांनी आपल्याब्रया कादंबरीत मांडले.

 

कादंबरीच्या नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या लेखनाने त्यांनाव्यवस्थेच्या विरोधात लढणारी लेखिकाअशी ओळख मिळाली आणिब्रकादंबरी एकदम चर्चेत आली. ‘बायकांचे पाय भूतासारखे उलटे असतात, कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळत असतात' हे या कादंबरीतील एक प्रसिद्ध वाक्य.

 

कमीत कमी शब्दांत जगण्याचं तत्त्वज्ञान मांडण्याची या लेखिकेची ताकद आपल्या लक्षात येते. ‘ब्रनंतरभिन्नही कादंबरीही सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून त्यांनी जगासमोर आणली. या लेखना निमित्ताने साहित्यास समाजाचे अधिष्ठानही लाभले.

 

चित्र, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, ॅनिमेशन, संगीत यांसारखी विविध माध्यमे वापरून त्यांनी लिहिलेलीकुहूही कादंबरीही वैशिष्टय़ पूर्ण ठरली. तसेच तुटलेले पंख, आग अजून बाकी आहे, आगीशी खेळताना, आबा गोविंद महाजन, बालसाहित्य आकलन आणि समीक्षा, कुमारी माता, तत्त्वपुरुष, धुळीचा आवाज, वारली (लोकगीत), जागर (आदिवासी कार्यकर्त्यांनी रचलेली चळवळीची गाणी); अशी विपुल साहित्यसंपदा, अनुवादित संकलित साहित्य, बालसाहित्य, कविता लेखन यांसारखी वैविध्यपूर्ण साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. या सर्व लेखनाचे बीज त्यांच्या काव्यलेखनात दडले होते.

 

इस्मत चुग्ताई यांच्यारजईया लघुकथांच्या अनुवादास साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार लाभला. ‘ब्रकादंबरी साठी त्यांना मानाच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

 

कविता महाजन यांचे निधन २७ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

अभिनेत्री स्मिता तळवलकर जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९५५

स्मृती - ऑगस्ट २०१४ (मुंबई)

 

मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री वृत्तनिवेदिका, निर्मात्या, दिग्दर्शक स्मिता तळवलकर यांचा जन्म सप्टेंबर १९५५ रोजी झाला.

 

स्मिता तळवलकर या माहेरच्या स्मिता गोविलकर. स्मिता यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या हुजुरपागा शाळेत झाले. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र हे विषय घेऊन बी.. झाल्यावर स्मिता यांनी मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमही केले होते. त्यांनी १९७२ साली मुंबई दूरदर्शनवरून वृत्तनिवेदिका म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तब्बल सतरा वर्षे त्यांनी वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते.

 

१९८३ साली त्यांनी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवले. तेव्हापासून त्यांनी आपल्या सुरेख अभिनयाने मराठी रसिकांवर मोहिनी घातली होती. अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना परिचित होत्या. त्यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवला होता. निव्वळ अभिनयातच नव्हे तर चित्रपट आणि टीव्हीच्या अनेक मराठी मालिकांच्या निर्मात्या दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

 

१९८६ मध्ये त्यांनी 'गडबड घोटाळा' 'तू सौभाग्यवती हो' या चित्रपटांद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाय रोवले. त्यांनी 'अस्मिता चित्र' या निर्मिती संस्थेची स्थापना करून अनेक चित्रपट मालिकांची निर्मिती दिग्दर्शन केले. 'कळत नकळत' 'तू तिथे मी' या चित्रपटा मधील अभिनयाने त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले.

 

'अस्मिता चित्र' चा 'चौकट राजा' या चित्रपटामुळे १९९१ चे वर्ष स्मिता तळवलकर यांच्यासाठी खास ठरले. हा चित्रपट गतिमंद मुलाच्या आयुष्यावर बेतलेला होता. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत होते. त्यामध्ये स्मित यांनी 'मीनल' म्हणजे या मुलाच्या बालपणापासूनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. संजय सूरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाच्या यशानंतर सूरकर-तळवलकर जोडीने 'तू तिथे मी, सातच्या आत घरात, आनंदाचे झाड' असे यशस्वी चित्रपट दिले.

 

'सवत माझी लाडकी' हा स्मिता तळवलकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट होता. 'अस्मिता चित्र' या बॅनरखाली त्यांनी सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. पेशवाई, अवंतिका, सुवासिनी, उंच माझा झोका' अशा त्यांच्या काही गाजलेल्या मालिका आहेत.

 

स्मिता तळवलकर यांनी चित्रपट शिक्षणासाठी 'अस्मिता चित्र अकादमी' स्थापन केली होती. या अकादमीच्या पुणे, मुंबई आणि ठाणे येथे शाखा असून या अकादमीतून अनेक कलावंत घडले आहेत. कर्करोगाशी लढा देत असतानाही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही.

 

'स्मिताची गोष्ट 'हे पुस्तक त्यांचे अनेक वर्षांचे मित्र योगेश्वर गंधे यांनी लिहिले आहे. पहिल्या २६ पानात चरित्र आठवणी आहेत तर पुढील ४५ पानांत त्यांच्या कथा आणि लेख आहेत.

 

स्मिता तळवलकर यांचे चित्रपट - तू सौभाग्यवती हो, गडबड घोटाळा, कळत नकळत, चौकट राजा, सवत माझी लाडकी, शिवरायाची सून ताराराणी, तू तिथे मी, सातच्या आत घरात, आनंदाचे झाड, चेकमेट, टोपी घाला रे, अडगुळं मडगुळं, एक होती वाडी, जन्म, श्यामचे वडील, या गोल गोल डब्यातला, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.

 

मालिका - घरकुल, पेशवाई, अवंतिका, ऊनपाऊस, कथा एक आनंदीची, अर्धांगिनी, सुवासिनी, उंच माझा झोका.

 

नाटके - कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, दुर्गाबाई जरा जपून.

 

पुरस्कार - कळत नकळत (राष्ट्रीय पुरस्कार), तू तिथे मी (राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा पुरस्कार), सवत माझी लाडकी (महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार), महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार.

 

स्मिता तळवलकर यांचे निधन ऑगस्ट २०१४ रोजी झाले.

 

स्मिता तळवलकर यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

शिवपत्नी महाराणी सईबाई स्मृतिदिन

************

 

जन्म - २९ ऑक्टोबर १६३३ (फलटण)

स्मृती - सप्टेंबर १६५९ (रायगड किल्ला)

 

शिवपत्नी महाराणी सईबाई यांचा जन्म २९ ऑक्टोबर १६३३ रोजी फलटण येथे झाला.

 

'राव वणंगपाळ बारा वजीराचा काळ'अशी म्हण ज्यांच्या शौर्यामुळे पडली, त्या शूर वणंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पोटी सईबाईं राणीसाहेबांचा जन्म झाला होता.

 

फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक घराणे. त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने, राजकीय सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्वाचे मानले गेले.

 

एका हिंदवी सम्राटाची पत्नी एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची काढेल त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणी कडे मार्गदर्शनाकडे जाते, तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते.

 

सईबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव प्रिया होत्या. सईबाईनी छत्रपती शिवाजीराजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांचे बरोबर झाले होते. लग्नात राजे १० वर्षाचे तर सईबाई राणीसाहेब वर्षाच्या  होत्या.

 

स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या, प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्याशिवाय लढता येणे शक्य नव्हते. सईबाई या अत्यंत शांत, सोशिक सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात जिजाऊसाहेबांचे   राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या.

 

आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राजकीय, सामाजिक कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने स्वराज्य विषयीच्या कर्तुत्वाने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर सईबाईनी तितक्याच समर्थपणे पार पाडले होते.

 

हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच सईबाई आपले  सुख मानत होत्या. राणीसाहेबांच्या आठवणीसाठी शिवरायांना एखादे भव्यदिव्य स्वप्न कधीच पहावे लागत नव्हते. चैत्रातील पालवलेली चिंच जरी पाहिली किंवा भर उन्हाळ्यात आकाशातून कापुस पिंजत जाणारा मेघ जरी एकाकी पाहिला तरी शिवाजीराजांना सईबाई राणीसाहेबांची आठवण येत होती आठवणीने राजांचा जीव व्याकुळ होत होता.

 

राजे मोहिमेवर असताना ज्या ज्या ठिकाणी ते सुंदर काही पाहायचे तिथे तिथे राजांना उत्कटतेने सईबाई राणीसाहेब यांची आठवण येत होती. राजांच्या या प्रेमामुळेच राणीसाहेबांचे जीवन अनेकविध रंगांनी शोभणाऱ्या इंद्रधनुष्यासारख्या किंवा नवरसयुक्त काव्यासारखे भासत होते. राजे जेव्हा जेव्हा मोहीम फत्ते करून परतत असत त्यावेळी एखाद्या सामान्य माणसासारखेच राजांनासुद्धा आपल्या घरची ओढ लागत होती .कारण सईबाईना आपल्या विजयाची गाथा ऐकवून त्यांना चकित करण्यासाठी राजे उत्सुक असत. गेल्या सतरा अठरा वर्षाचा राजांचा हा अनुभव होता. स्वभावाने गोड आणि लाखात एक या राणीसाहेब होत्या. प्रथमदर्शनीच राजांना त्या खूप आवडल्या होत्या त्याचे कारण म्हणजे राणीसाहेबांचा मधुर नि प्रेमळ स्वभाव.

 

शिलेदारीचे व्रत पत्करलेले राजे स्वराज्य संस्थापक म्हणून मानाने मिरवत होते. दौलतीच्या विस्तारासाठी  मुलूखगिरी करून, मोहिमा राबवत होते. मोहिमा जिंकून, यश मिळवत असताना सारे बंध, सारे पाश तोडून टाकल्यासारखे राजे फक्त आणि फक्त स्वराज्यासाठीच झटत होते, तळहातावर प्राण घेऊन तुटून पडत होते .राजकारणातील चढ-उतार गुंते सोडवताना कधीकधी स्वतःलाही विसरत होते .स्वराज्यासाठी आपल्या मुलखापासून दूर दूर जात होते; पण तरीसुद्धा राणीसाहेबांना ते कधीच विसरू शकत नव्हते.

 

राणीसाहेब म्हणजे राजांची स्फूर्ती होत्या, स्वामिनी होत्या. सईबाईसाहेबांचे प्रेमळ वागणे, लोभस सुंदर रूप यांच्या आठवणीने राजे नव्या त्वेषाने, नव्या जोमाने दुष्मनावर तुटून पडत होते. राजांना वाटे की, सईबाईं यांच्या पावलां मुळेच तर आम्हाला कायम यश मिळत आले आहे. यशश्री आमच्या गळ्यात कायमच हार घालत आहे. भविष्यात हिंदवी स्वराज्याला भरभक्कम आधार देण्यासाठी माझी खंबीर साथ म्हणजे सईबाईसाहेबच होत्या. म्हणूनच राजांचे आणि दौलतीचे, स्वराज्याचे सारे लक्ष या राणीसाहेबांकडेच होते.

 

सईबाई जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षाचे शंभुराजे आईविना पोरके झाले. छत्रपतींच्या संसाराची कथा जीवाला चटका लावणारी ठरली. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षाचे शंभूराजे पोरके झाले. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी सईबाई हे जग सोडून निघून गेल्या. पण जातांना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला. या छाव्याने पुढे रूद्रावतार धारण करून ओरंगजेबाला नाकी नऊ आणले.

 

सप्टेंबर १६५९ साली आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजीमहाराजांना सर्व रयतेला सोडून राणीसाहेब निजधामाला गेल्या.

 

सईबाई राणीसाहेब म्हणजे एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दिप उजळले. एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले.

 

फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक, छत्रपती शिवरायांचया पत्नी, शंभूमहाराजांच्या माता स्वराज्यातील सर्व शिलेदार मावळे, जिजाऊंच्या लेकी महाराष्ट्रातील तमाम रयतेकडून स्मृतिदिनानिमित्त सईबाई राणीसाहेबांना...

 

विनम्र अभिवादन नि आमचा मानाचा मुजरा !

 

डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : शिवपत्नी महाराणी सईबाई

 

************

************

सप्टेंबर

वीरांगना नीरजा भानोत स्मृतिदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९६३ (चंदिगढ)

स्मृती - सप्टेंबर १९८६ (कराची,पाकिस्तान)

 

भारताची धीरोदात्त वीरांगना नीरजा भानोत यांचा जन्म सप्टेंबर १९६३ रोजी चंदिगढ येथे झाला.

 

'हिंदुस्थान टाइम्स' चे तेव्हाचे मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार हरीश भानोत यांची ती कन्या, हीच काय ती तिची ओळख. पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील नीरजा भानोत ही हवाई सुंदरी होती. सप्टेंबर १९८६ साली झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणा दरम्यान प्रवाशांना वाचविताना त्यांचे निधन झाले.

 

सप्टेंबर १९८६ रोजी कराची विमानतळावर तिच्या विमानात अतिरेकी चढले. त्यांनी पायलटना काॅकपिट मधून बाहेर काढले. प्रवाशांपैकी जे अमेरिकन असतील, त्यांचे पासपोर्ट जमा करण्याची मागणी त्यांनी नीरजा यांच्या कडे केली. तिने ठामपणे नकार दिला. ही हुज्जत तब्बल १५ तास चालली. अखेर अतिरेक्यांनी बाॅम्बस्फोट करून विमान उडवून देण्याची धमकी दिली.

 

नीरजाने मोठ्या शिताफीने विमानाचा दरवाजा उघडला प्रवाशांना बाहेर काढायला सुरूवात केली. खरे तर त्या स्वत: आधीच उतरू शकल्या असत्या पण नीरजा यांनी आधी लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.

 

त्या एका वर्षांच्या मुलाला बाहेर काढत असताना संतापलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. तिच्या शरीराची चाळण झाली, पण त्यांनी मुलाला वाचवले आणि ते करताना वयाच्या २३व्या वर्षी शहीद झाली.

 

हा अमेरिकन मुलगा पुढे पायलट झाला. त्याने लिहिले, माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट नीरजाच्या बलिदानाचे आहे. नीरजा भानोत यांनी जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचविले, म्हणून भारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या. नीरजा भानोत यांना अशोक चक्र मिळालेली ती सर्वात तरुण व्यक्ती होती. नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर 'नीरजा' नावाचा हिंदी चित्रपट निघाला.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

"नीरजा" चित्रपट : 👇

 https://www.youtube.com/watch?v=PS_T77gdMAU

 

************

************

सप्टेंबर

नाटककार रघुनाथ किणीकर स्मृतिदिन

************

 

जन्म - १९०८

स्मृती - सप्टेंबर १९७८

 

कवी, नाटककार, पत्रकार रघुनाथ रामचंद्र किणीकर तथा रॉय किणीकर यांचा जन्म १९०८ साली झाला.

 

रॉय किणीकर यांचे वडील वकील होते. रॉय किणीकरांनी आयुष्यातील बहुतांश काल कर्नाटकातील गुलबर्गा येथे घालवला. पुढचा काही काळ त्यांनी पुण्यात आणि औरंगाबादेत व्यतीत केला.

 

रॉय किणीकर हे औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्या  दैनिक अजिंठाच्या रविवारच्या आवृत्तीचे संपादक होते. रविवार पुरवणीत ते काही ना काही ललित लेखन करीत असत. रॉय किणीकर यांनी काही नाटकांत भूमिका केल्या होत्या. औरंगाबाद येथील सरस्वती भुवन शाळेच्या मदतीसाठी झालेल्या आचार्य अत्रे यांच्याघराबाहेरनाटकात त्यांनी काम केले होते. त्यांनी औरंगाबाद नभोवाणीसाठी काही श्रुतिकाही लिहिल्या होत्या. त्यांच्या नाटकांचे रं

************

सप्टेंबर

हिंदी लेखक शरद जोशी स्मृतिदिन

************

 

जन्म - २१ मे १९३१ (उज्जैन)

स्मृती - सप्टेंबर १९९१ (मुंबई)

 

हिंदी लेखक नि पटकथाकार शरद जोशी यांचा जन्म २१ मे १९३१ रोजी झाला.

 

शरद जोशी यांनी 'क्षितिज', 'छोटी सी बात', 'सांच को आंच नहीं' 'उत्सव' या चित्रपटाच्या पटकथा  लिहिल्या होत्या. तसेच त्यांनी ये जो है जिन्दगी, विक्रम बेताल, सिंहासन बत्तीसी, वाह जनाब, देवी जी, प्याले में तूफान, दाने अनार के, ये दुनिया गजब की या मालिकांचे लेखन केले होते.

 

शरद जोशी यांचीअतिथि! तुम कब जाओगेही व्यंग्यकथा खूप गाजली होती. शरद जोशी यांचे इतर साहित्य. परिक्रमा, किसी बहाने, रहा किनारे बैठ, दूसरी सतह, मेरी श्रेष्ठ व्यंग्य रचनाएँ, यथासम्भव, यत्र-तत्र-सर्वत्र, यथासमय, हम भ्रष्टन के भ्रष्ट हमारे, प्रतिदिन 3 भागों में, नावक के तीर, मुद्रिका रहस्य, झरता नीम शाश्वत थीम, मैं, मैं और केवल मैं, शरद जोशी एक यात्रा, और शरद जोशी, जादू की सरकार, पिछले दिनों, दो व्यंग्य नाटक, राग भोपाली, नदी में खड़ा कवि, घाव करे गम्भीर; तसेच त्यांनी अन्धों का हाथी   एक था गधा उर्फ अलादाद खाँ; ही दोन व्यंग्य नाटके लिहिली.

 

भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते,तसेच त्यांना चकल्लस पुरस्कार, काका हाथरसी पुरस्कारही मिळाले होते.

 

सप्टेंबर १९९१ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा स्मृतिदिन

************

 

जन्म - २० जानेवारी १८७१ (मुंबई)

स्मृती - सप्टेंबर १९१८ (युनायटेड किंगडम)

 

सर रतनजी जमसेटजी टाटा हे भारतीय उद्योगपती आणि दानशूर होते.

 

हे जमसेटजी टाटा यांचे पुत्र असून त्यांच्या मृत्यूनंतर रतनजी आणि दोराबजी या भावांनी जमसेटजींचे उद्योग सांभाळले.

 

यांनी अनेक ऐतिहासिक वस्तू एकत्र केल्या होत्या. १९२३ मध्ये या वस्तू टाटांच्या कुटुंबियांनी प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाला दान केल्या.

 

टाटांच्या मृत्यूनंतर १९१९ साली सर रतन टाटा ट्रस्ट ही समाजकारणी संस्था ८० लाख रुपयांसह (आताचे ७५ कोटी रुपये) स्थापन झाली.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

सप्टेंबर

संगीतकार सलील चौधरी स्मृतिदिन

************

 

जन्म - १९ नोव्हेंबर १९२३

मृत्यू - सप्टेंबर १९५५ (मुंबई)

 

संगीतकार सलील चौधरी ह्यांनी असंख्य सिनेमांना अजरामर संगीत देऊन त्यांनी आपल्याला रिझवले.

 

बालपण, आसाम आणि बंगाल इथे गेल्याने, या दोन्ही प्रदेशातील लोकसंगीताचा त्यांच्यावर परिणाम झाला, असे त्यांच्या पुढे निर्माण केलेल्या रचनांवरून सहज अनुमान काढता येते. त्यातून, लहानपणी 'कम्युनिस्ट' विचारसरणीशी संबंध आल्याने, ज्या कलांचा लोकांशी थेट संबंध असतो, ज्या कलांना लोकांच्या कला म्हणता येते, त्याच कला महत्वाच्या असतात.

 

'दो बिघा जमीन' या चित्रपटातून, त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण झाले. 'धरती कहे पुकार के' ही गाणे, लोकसंगीताशी फार जवळचे नाते सांगणारे आहे. या गाण्याच्या सुरवातीला 'भाई रे' अशी पुकार आहे आणि ती पुकार, या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

 

त्यांनी स्वत:च्या अनेक बंगाली रचना, हिंदीत आणल्या. जारे, जारे उड जारे पंछी, सजना बरखा बहार आई किंवा ना जिया लागे ना ही गाणी, त्यांच्याच मुळातल्या बंगाली गाण्यांची हिंदी नक्कल आहे. असे असले तरी ती मुळातली गाणी ऐकताना, त्यांच्या प्रतिभेची साक्ष मिळते, हे मात्र नक्की.

 

बंगाली गीताचा आधुनिक अवतार सिद्ध करण्यातली त्यांची आस्था, तसेच रवींद्र संगीत आणी त्यांचे वातावरण, याविषयी विरोधविकासवादी भूमिका, यामुळे, त्यांना आपल्या खास ठशाचे बंगाली गीत रचणे भाग पडले, हे सहज ध्यानात येण्यासारखे आहे. यातूनच, त्यांनी पुढे आपली अनेक बंगाली गीते, हिंदीत आणली.

 

'मी गाण्यात वेगळे प्रयोग केले' असा दावा करणारे भरपूर भेटतात परंतु यामुळेच बहुदा 'प्रयोग' हा शब्द थोडा हास्यास्पद झाला आहे. अशा परिस्थितीत, ज्या संगीतकारांना खऱ्या अर्थी 'प्रयोगशील' संगीतकार म्हणावे, अशा फार थोड्या संगीतकारा मध्ये सलिल चौधरी यांचा समावेश होतो.

 

पण सलीलदा पाश्चात्य कलासंगीताचे अभ्यासक झाले. बीथोवन, मोझार्ट इत्यादी 'क्लासिकल' रचनाकार त्यांच्या खास पसंतीचे होते, हे सहज समजून घेता येते. याच संगीताच्या प्रभावामुळे, त्यांना वाद्यवृंद रचनेत प्रयोग करण्याची स्फूर्ती मिळाली असणार, हे उघड आहे.

 

भारतीय वैदिक संगीत, आदिवासी संगीत, इतकेच नव्हे तर तंबोरा या वाद्यातही, स्वरसंवाद (हार्मनी) हे तत्व आहे, असे त्यांचे ठाम मत होते. 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे सरळ, सरळ मोझार्टच्या सिम्फनीवर बेतलेले आहे.

 

पाश्चात्य संगीताचा अभ्यास असल्याने 'जिंदगी ख्वाब है' या गाण्यात, Violin, Accordion, Trumpet इत्यादी वाद्यांचा वापर खास ऐकण्यासारखा आहे.

 

त्यांची एक रचना ' सजना बरखा बहार आई' वास्तविक चाल ही त्यांच्या मूळ बंगाली गाण्याची आहे तरीही स्वर पट्ट्या मध्ये मुक्त फिरणारी, संगीत कल्पनांनी भरलेली, उत्साही, द्रुत अशी मधुर चाल आहे. कोमल निषाद स्वरावर येउन थांबणारा मुखडा, हा या रचनेचा मनोज्ञ विशेष. नायिकेच्या मनोवस्थेचे नेमके चित्रण स्वरांच्या सहायाने अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने घडते.

 

सलिलदांच्या सांगीतिक कारकिर्दीचे शिखर म्हणजे 'मधुमती'. या चित्रपटात, सलिलदांच्या सांगीत सर्जनक्षमतेचा विस्तीर्ण पट जवळपास उलगडलेला दिसतो. 'आजा रे' सारखे पछाडून टाकणारे गीत, 'दैय्या रे दैय्या' सारखे लोकसंगीतावर आधारित गाणे, 'जंगल मे मोर नाचा' सारखे हलके फुलके गीत तर 'टुटे हुवे ख्वाबो ने' सारखे अप्रतिम विरह गीत, त्यातील प्रत्येक गाण्याला सलिलदांनी स्वत:चे खास वैशिष्ट्य प्रदान केले आहे.

 

'आनंद' चित्रपटा मधील गाणी देखील एकाहून एक भारी आहेत, त्यातील सुमिता संन्यालवर चित्रित झालेले गाणे 'ना जिया लगे ना' मस्तच आहे. आनंदला शेवट जवळ आला आहे याची जाणीव झाली आहे त्या वेळी 'कही दूर जब दिन ढल जाये' या गाण्यातले संगीत आपल्याला हुरहूर लावते.

 

अगदी रजनीगंधा, छोटी सी बात या चित्रपटातील गाणी ऐकावीत. चाली तशा सरळ, साध्य आहेत परंतु प्रत्येक अंतरा आणि तिथला वाद्यमेळ, यात काही ना काहीतरी वेगळेपण दिसून येते. त्या दृष्टीने, त्यांच्या आधी सी. रामचंद्रांनी जी पाश्चात्य संगीताची जाणीव ठेवली होती, त्याचे सुसंस्कारित रूप, सलिलदांनी आपल्या रचनांमधून आपल्या समोर आणले.

 

भारत सरकारच्या टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ २०१३ साली टपाल तिकीट प्रदर्शित केले.

 

सलील चौधरी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

 

प्रसाद जोग, सांगली

९४२२०४११५०

 

************

************

सप्टेंबर

संगीतकार आदेश श्रीवास्तव स्मृतिदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९६४

स्मृती - सप्टेंबर २०१५

 

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म सप्टेंबर १९६४ रोजी झाला.

 

आदेश श्रीवास्तव हे अभिनेता बनण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीत आले होते. 'अंगारेया चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. नंतर तब्बल दशकभर त्यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत काम केले.

 

१९९३ मध्ये 'कन्यादान' या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केले. त्यानंतर १०० हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. यात 'चलते चलते, बाबुल, बागबान, कभी खुशी कभी गम, राजनिती' या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत लक्षवेधी ठरले. त्यांनी 'सना' या लघुपटाचे दिग्दर्शनही केले.

 

आदेश यांना २०११ मध्ये कॅन्सर झाला होता. मात्र, त्यावर त्यांनी मात केली. आजारपणानंतर पुन्हा संगीतक्षेत्रात कार्यरत होत त्यांनी 'वेलकम बॅक' या सिनेमाला संगीत दिले. हा त्यांचा संगीत दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा ठरला.

 

आदेश श्रीवास्तव यांचे सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

समाजसेविका मदर तेरेसा स्मृतिदिन

************

 

जन्म - २६ ऑगस्ट १९१०

स्मृती - सप्टेंबर १९९७

 

भारतीय रोमन कॅथॉलिक नन मदर तेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी झाला.

 

मदर टेरेसा यांचे वडीलअल्बेनियनहे दुकानदार आणि आई ही एका शेतकऱ्याची मुलगी होती. आईचा काटकपणा आणि वडिलांचा व्यवहारीपणा हे गुण मदर टेरेसा यांच्यात उतरले. ‘अल्बेनियनयांचे कुटुंब छोटेच होते. त्यामुळे फार श्रीमंती नसतानाही मदर टेरेसा यांचे बालपण अगदी सुखा-समाधानात गेले. धर्माने त्या ख्रिश्चन होत्या.

 

वयाच्या १८ व्या वर्षी ऎन तारुण्यात उंबरठ्यावर असताना सर्व संगपरित्याग करून त्या (जोगिन) मिशनरी बनल्या. त्यांनी एक वर्षभर इंग्रजी अभ्यास केला. जानेवारी १९२९ रोजी त्या भारतात आल्या. कोलकत्ता येथे दाखल होऊन लॉरेटो मिशनच्यासेंट मेरी हायस्कूलमध्ये त्यांनी भूगोल शिकवण्यास सुरुवात केली. नंतर त्या पाटणा येथे आल्या. 'अमेरिकन मेडिकल मिशनमध्ये त्यांनी वैद्यकिय उपचार आणि परिचारिका यांचे प्राथमिक शिक्षण घेतले.

 

मदर टेरेसा यांनी १९४८ साली कोलकत्ताच्यामोतीझीलया झोपडपट्टीत आपले सेवा कार्य सुरु केले. तेथे त्या रोगी, अपंग-अनाथांची प्रेमाणे सेवा करू लागल्या. अनाथ-अपंग, गोर-गरीब यांच्या सेवेचे त्यांनी त्या वेळी घेतलेले खडतर व्रत शेवट पर्यंत हव्याहत चालू होते.

 

मदर टेरेसा ख्रिश्चन मिशनरी असल्या तरी धर्म, पंथ, जात त्यांच्या जन सेवेच्या आड येत नव्हती. प्रत्येक मानवात त्यांना भगवान येशू दिसत होता. म्हणूनच जनसेवा हीच ईश सेवा आहे. असे समजूनच त्या समाज कार्य करीत होत्या. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर मग तो कोणत्याही धर्माचा असो, अपंग, गरीब, किंवा महारोगी असो, आबाल-वृद्ध स्री-पुरुष कोणीही असो त्यांच्या वर मदर टेरेसा प्रेम करीत होत्या त्यांची सेवा करीत असत. प्रत्येकाला दिलासा, धीर, आधार, देऊन दुखीतांचे अश्रू पुसीत असत, म्हणूनच त्यांनी स्थापन केलेल्यानिर्मल हृद्य’ ‘शिशु भवन’ ‘महारोगी केंद्रया संस्था मधिल प्रत्येक व्यक्तीला मदर टेरेसा या आई प्रमाणे होत्या.

 

कोलकत्ता मध्ये कालिमाता मंदिरातील धर्म शाळेत १९५२ साली त्यांनीनिर्मल हृद्यहि संस्था प्रथम उघडली. तिथे सर्व जाती धर्माचे दु:खी रोगी, वृद्ध, अपंग आश्रय घेतात. त्यांच्या या उद्दात्त कार्याच्या शाखा आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही पसरलेल्या आहेत. १९५७ साली त्यांनीमहारोगी सेवा केंद्रसुरु केले. महारोग्यांची सेवा करण्याचे जणू त्यांनी व्रतच घेतले होते. हे कार्य त्यांचे अखंड चालू होते. त्यांच्या कार्याला लोक खुशीने पैसा, धान्य, कोणी गाद्या, रजया, चादरी देत. कारण देणार्याचे मदर टेरेसा वर त्यांच्या कार्यावर प्रेम होते. आपण दिलेल्या पैशाचा चांगलाच उपयोग होतो यावर सार्यांचाच विश्वास असायचा.

 

मदर तेरेसा म्हणजे चालती बोलती प्रेम मूर्ती  होती. १९६२ साली भारत सरकारने यांनापद्मश्रीहि पदवी देऊन त्यांचा बहुमान केला. 'पद्मश्री' हां पुरस्कार मिळविणारी पण भारतात जन्मणारी हि पहिली महिला होय. पद्मश्री शिवाय आणखी कितीतरी बहुमान आणि पारितोषिके टेरेसा यांना मिळाली आहे.

 

१९७२ साली इंदिरा गांधींच्या उपस्थितीत मदर टेरेसा यांना त्यावेळेचे राष्ट्रपती गिरी यांच्या हस्ते नेहरू पारितोषिक देण्यात आले. त्या पूर्वी १९७१ मध्ये २१,५०० डॉलर्सगुड स्यमोरीटनहे पारीतोषिक  आणि तेविसावे पोप जॉन यांच्या नावाने देण्यात येणारे शांतता पारीतोषिक हि मदर टेरेसा यांना देण्यात आले. शिवाय त्याच वर्षी पन्नास हजार पौउंडाचेजोसेफ केनेडी ज्युनिअर फौन्डेशन, पारीतोषिक ही त्यांना देण्यात आले. त्याच पारितोषिका तून कोलकत्ता विमानतळाजवळ मतीमंद मुलांसाठी शाळा सुरु झाली.

 

१९७२ सालीटेपलटन फौन्डेशनबक्षिसही मदर टेरेसा यांना मिळाले. पारितोषिक मिळालेले पैशातून त्या एकही रुपया स्वत: खर्च करीत नसत. तो सेवाकार्या साठीच वापरत. १९७८ मध्ये त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळाला. १९८० साली त्याभारतररत्नझाल्या. १९९३ साली राजीव गांधी सद्भाभावना अवार्ड देण्यात आला.

 

मदर टेरेसा पक्षीय राजकरणापासून दूर होत्या. प्रसिद्धीच्या त्यांना हाव नव्हती, तरीही त्या जगभर प्रसिद्ध झाल्या. आजमदर टेरेसाहे नाव आणि त्यांचे कार्य माहित नाही असा माणूस कोठेही सापडणार नाही. स्वतःच्या सुखःदुख पुढे दुसरे काहीही पाहणाऱ्या, जगात दुसऱ्यांचे दुखः हलके करण्यासाठी सतत परिश्रम करणाऱ्या मदर टेरेसा म्हणजे एक अलोकिक, थोर 'स्त्रीरत्न' आहेत.

 

मदर तेरेसा यांचे सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.

 

मदर तेरेसा यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : Marathi Unlimited

 

************

************

सप्टेंबर

अभिनेत्री शुभांगी जोशी स्मृतिदिन

************

 

जन्म - जुन १९४६

स्मृती - सप्टेंबर २०१८

 

जेष्ठ मराठी अभिनेत्री शुभांगी जोशी यांचा जन्म जुन १९४६ रोजी झाला.

 

आपल्या अतिशय सहज अभिनयाने घराघरात प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी या टीव्हीवरची लाडकी आजी म्हणुन प्रसिध्द होत्या. छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री अशीही त्यांची ओळख होती.

 

आभाळमाया, काहे दिया परदेस या मालिकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. कलर्स वाहिनीवरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत त्यांनी जिजीची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती.

 

शुभांगी जोशी यांचे निधन सप्टेंबर २०१८ रोजी झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ - इंटरनेट

 

************

************

🌹 सप्टेंबर 🌹

अभिनेत्री सई लोकूर चा वाढदिवस

************

 

जन्म - सप्टेंबर १९८९ (बेळगांव)

 

अभिनेत्री सई लोकूरचा आज वाढदिवस.

 

सई लोकूर मूळची बेळगावची. सईचे बालपण आणि शालेय शिक्षण सुध्दा बेळगावातच झाले. १२ वी नंतर ती मुंबईला आली. सई लोकूर ही गेली तीस हून अधिक वर्षे बेळगावातील नाट्यक्षेत्रात कार्य करणाऱ्या विणा लोकूर यांची कन्या.

 

सईच्या बालपणी तिच्या आईने खूप क्लासेस लावले होते. शाळेतून आल्यानंतर क्लासला जायचे, त्यानंतर चित्रकला, तबला, पेटी, गाणं, भरतनाट्यम, संस्कारभारती रांगोळी, मेहंदी या क्लासला जायचे. तसंच सईला स्विमिंग, बॅटमिंटनची खूप आवड होती. तसेच सई स्टेट लेवल स्विमर राहिली आहे.

 

सईला लहानपणापासून चित्रपट, गाणी खूप आवडायचे. सई चित्रपट पाहून आरशा समोर अभिनय, डान्स करायची. ‘रायगडाला जाग आलीया नाटकात तिने काम केले होते. ते तिच्या आयुष्यातले पहिले नाटक होते. या नाटकाचे बेळगाव सोबतच सांगली, मिरज, कोल्हापूरात प्रयोग झाले.

 

नाटक संपले की प्रेक्षकांकडून खूप कौतुक व्हायचे. या नाटकानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सईने बालकलाकार म्हणून अनेक नाटकात काम केली. चित्रपटसृष्टी मुंबईत असल्यामुळे बेळगावातून मुंबईला ऑडिशनसाठी यायला लागायचे.

 

बेळगावरुन ती आई सोबत बसने रात्रीचा प्रवास करून मुंबईत येऊन ऑडिशनसाठी यायची. खूप वर्ष तिने बेळगाव मुंबई प्रवास केला. त्यानंतर तिने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आणि १२ वी नंतर मुंबईत आली. तेव्हा तिच्या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात झाली.

 

सई लोकूर नेप्लॅटफॉर्मया चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले. विणा लोकूर यांनीमिशन चॅम्पियनया चित्रपटानंतरप्लॅटफॉर्महा चित्रपट बनवला हिंदीत जसे नट, दिग्दर्शक आपल्या मुलांना संधी देतात त्याप्रमाणे मुलगी सई लोकूर हिच्या साठी यातून लॉन्च केले. 

 

मुंबईत आल्यावर तिने आपले शिक्षण रुपारेल कॉलेज मध्ये बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले. कपिल शर्मा सोबतकिस किस को प्यार करुहा हिंदी चित्रपट तिने केला. त्यानंतर एसएनडीटी कॉलेज मधून तिने इंटिरिअर डिझायनिंग पूर्ण केले.

 

सईने मराठी बिग बॉस मध्ये भाग घेतला होता. बिग बॉसच्या घरात असताना पुष्कर, मेघा आणि सईची खूप चांगली मैत्री होती. पुष्कर आणि तिची जोडी गाजली होती. ‘पारंबीआणिआम्ही तुमचे बाजीरावया चित्रपटातही सई लोकूरने भूमिका केली होती.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

सप्टेंबर - दिनविशेष

 

सप्टेंबर रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली नायजर या राष्ट्रांत विभाजन.

 

१९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला.

 

१९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद अली यांनी सुवर्ण पदक जिंकले.

 

१९६१: अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद बेलग्रेड येथे सुरू.

 

१९६७: . वि. पाटसकर पुणे विद्यापीठाचे ७वे कुलगुरू झाले.

 

१९७०: इटालियन ग्रांप्रीच्या प्रॅक्टिसमध्ये मारल्याच्या घटनेनंतर मरणोत्तर फॉर्मूला वन वर्ल्ड ड्रायव्हर्स चॅम्पियनशिप जिंकणारे जोकेन रांड हे एकमेव ड्रायव्हर ठरले.

 

१९७२: ब्लॅक सप्टेंबर नावाच्या पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी म्युनिक ऑलिंपिकमधील इस्राएलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले.

 

१९७५: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्डवर असफल खुनी हल्ला.

 

१९७७: व्हॉयेजर या अंतराळयानाचे प्रक्षेपण.

 

१९८४: एस. टी. एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.

 

२०००: ऋषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

 

२००५: इंडोनेशियातील सुमात्रा येथे मंडाला एअरलाइन्सचे फ्लाईट ०९१ हे उड्डाण दाट लोकवस्तीच्या भागात कोसळुन विमानातील १०४ आणि जमिनीवरील ३९ लोक ठार झाले.

 

सप्टेंबर रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: नोव्हेंबर १२२६)

 

१६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: सप्टेंबर १७१५)

 

१८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. . चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९३६)

 

१८८८: भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

 

१८९५: भाषा इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९७३)

 

१९०७: शिक्षणतज्ञ, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संस्थापक, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग चे संस्थापक जयंत पांडुरंग तथा जे. पी. नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९८१)

 

१९१०: भारतीय क्रिकेट खेळाडू फिरोझ पालिया यांचा जन्म.

 

१९२०: बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर २०१३)

 

१९२८: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी (मृत्यू: १९ सप्टेंबर २००४)

 

१९४०: अमेरिकन अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचा जन्म.

 

१९४६: मूळ भारतीय वंशाचा ब्रिटीश गायक संगीतकार फ्रेडी मर्क्युरी यांचा जन्म.

 

१९५४: वेस्ट इंडिजचा क्रिकेट खेळाडू रिचर्ड ऑस्टिन यांचा जन्म.

 

१९८६: भारतीय क्रिकेटर प्रग्यान ओझा यांचा जन्म.

 

सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन.

 

१९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४)

 

१९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१)

 

१८७६: चिली देशाचे पहिले राष्ट्रपती मॅन्युएल ब्लॅनको एन्कालदा यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १७९०)

 

१९७८: कवी, संवादलेखक, नाटककार पत्रकार रॉय किणीकर यांचे निधन.

 

१९९१: हिन्दी कवी, लेखक उपहासकार शरद जोशी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९३१)

 

१९९२: उद्योगपती अतूर संगतानी यांचे निधन.

 

१९९५: हिंदी बंगाली चित्रपट सृष्टीतील संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२२चिंगरीपोथा, २४ परगणा, पश्चिम बंगाल)

 

१९९६: भारतीय बिशप बॅसिल सालदवदोर डिसोझा यांचे निधन. (जन्म: २३ मे १९२६)

 

१९९७: नोबेल पुरस्कार विजेत्या ऑग्नीस गाँकशा वाजक्शियू उर्फ मदर तेरेसा यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १९१०)

 

२०००: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्स यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९४२)

 

२०१५: भारतीय गायक-गीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन. (जन्म: सप्टेंबर २०१५)

No comments:

Post a Comment