╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा
विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही
विनंती .
________.
🌄 परिपाठ
🌄.
_________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. |
आज दिनांक: १२/०८/२०२२. वार: गुरूवार , महिना :श्रावण,शुक्ल
पक्ष.४.
नक्षत्र: उत्तरा,.
योग:सिद्ध,करण:
बव.
सूर्योदय:०६.१९,सूर्यास्त:०७.०८. ■■■■■■■■■■■■■■. सुविचार:हृदयाची श्रीमंती नसेल तर कुबेरही
भिकरडाच राहतो.. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮. |
प्रतिज्ञा |
📜 भारताचे
संविधान 📚.◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏. गगन , सदन
तेजोमय ◆=========◆========. |
गगन, सदन
तेजोमय |
तिमिर हरून करुणाकर |
दे प्रकाश, देई
अभय |
|
छाया तव, माया
तव |
हेच परम पुण्यधाम |
वार्यातून, तार्यांतुन |
वाचले तुझेच नाम |
जग, जीवन, जनन, मरण |
हे तुझेच रूप सदय |
|
वासंतिक कुसुमांतून |
तूच मधुर हासतोस |
मेघांच्या धारांतुन |
प्रेमरूप भासतोस |
कधि येशील चपलचरण |
वाहिले तुलाच हृदय |
|
भवमोचन हे लोचन |
तुजसाठी दोन दिवे |
कंठातील स्वर मंजुळ |
भावमधुर गीत नवे |
सकल-शरण, मनमोहन |
सृजन तूच, तूच
विलय |
👩💻 बोधकथा 👨💻.
🛑 निरुत्तर🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
अरब
देशात हातिमताई हा त्याच्या उदारपणासाठी प्रसिद्ध होता. हातिमताई मोकळ्या
हाताने दान करायचा. त्याच्या दरवाजातून कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. तो
कोणाही गरजूला आपली मौल्यवान वस्तू देण्यास मागे हटत नसे. लोक त्याच्याकडे
बिनधास्तपणे येत असत. ते जे काही मागत ते हातिमताई देत होता एकदा हातिमताई मनात
विचार आला, आपण मोठी दावत आयोजित करावी. ज्यात सर्वच स्तरातील
व्यक्तिंना येण्याची मुभा असेल. यासाठी हातिमताईने खुले निमंत्रण दिले. दावतच्या
दिवशी लोकांचे येणेजाणे सुरु झाले. हातिमताई प्रत्येकाचे स्नेहपूर्वक स्वागत
करत होता. जेवल्यावर लोक त्याला आशिर्वाद देत होते. काही वेळाने हातिमताईने
विचार केला. दावतीचे ठिकाण दूर राहणा-या लोकांसाठी अडचणींचे ठरत आहे, त्यांना
सवारीतून घेऊन यावे. आपल्या काही साथीदारांना घेऊन तो दूर राहणा-या लोकांना
भेटण्यास गेला. वाटेत त्याला एक लाकूडतोड्या दिसला. त्याच्या चेह-यावर थकावट
स्पष्टपणे दिसत होती. हातिमताई म्हणाला,’’ मित्रा, जेव्हा
हातिमताईने दावतचे खुले आमंत्रण दिले तेव्हा तू इतकी मेहनत कशासाठी करत आहेस.
हे काम सोड, आणि माझ्या दावतमध्ये सामील हो. आरामात जेवण
कर.’’ हे ऐकून लाकूडतोड्याने उत्तर दिले,’’ जे
आपली भाकरी कष्टाने कमावितात त्यांना हातिमताईच्या जेवणाची गरज नाही.
हातिमताई उदार असेल पण आमची कष्टाने मिळवलेली भाकरी ही त्याच्या दावतच्या
जेवणापेक्षा कित्येक पटीने गोड आहे. हवे असेल तर तूच ती भाकरी खाऊन बघ’’ हे
ऐकून हातिमताई निरूत्तर झाला. |
तात्पर्य:आपल्या कष्टाने जे लोक आपले जीवन
जगतात त्यांच्या गरिबीची किंमत ही सुद्धा श्रीमंतांच्या धनापेक्षा कित्येक पटीने
जास्त असते. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
🎼 समूहगीत🎼
गर्जत जयजयकार भूमिचा शत्रू हटवू
सीमेपार॥धृ॥ |
|
एकमुखाने एकदिलाने मातृभूमिला देऊ साद |
दुष्मन भिडला सीमेवरि या उठवू तोफांचा घननाद |
शुरविरांच्या तलवारींना आज चढे शौर्याची
धार॥१॥ |
|
लाख लाख भुजदंड तळपती घुमवित कानन गिरिकंदार |
कोटि कोटि नयनांतुन उठतो अपमानचा खदिरांगार |
जाळित कापित अरिसेना ना अम्हास ठाउक ती
माघार॥२॥ |
|
पक्ष पंथ वा प्रांतभेद हे मुळी न ठाउक आज
अम्हा |
मातृभक्त अम्ही एकच झालो प्राणांची ना अम्हा
तमा |
पराक्रमाची शर्थ करोनी धवल यशाचे उघडू
द्वार॥३॥ |
|
रणयज्ञाला अडसर करतिल जर देशद्रोही वेताळ |
पिसाळ - जयचंदाचे वारस रिपुरांष्ट्रांचे कुणी
दलाल |
भरडून काढू निर्दयतेने न ठेवू मातृभूमिला
भार॥४॥ |
|
शिव बाजीच्या पराक्रमाची इथे नांदली परंपरा |
मुरारजीच्या वीर कथांनी धन्य जाहली वसुंधरा |
त्या रक्ताची शपथ घेउनी चला पुढे व्हा करा
पुकार॥५॥
|
|
🎰 दिनविशेष🎰. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
|
महत्त्वाच्या घटना: |
◆१८३३ : शिकागो शहराची स्थापना. |
◆१९१४ : पहिले महायुद्ध : ग्रेट ब्रिटनने
ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले. |
◆१९५३ : सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु
बॉम्बची चाचणी केली. |
◆१९६४ : वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची
ऑलिंपिक खेळातून हकालपट्टी. |
◆१९८१ : आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक
विकायला काढला. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
◆१६२९ : ऍलेक्सेइ पहिला, रशियाचा
झार. |
◆१५०३ : क्रिस्चियन तिसरा, डेन्मार्क
आणि नॉर्वेचा राजा. |
◆१६४७ : योहान हाइनरिक ऍकर, जर्मन
लेखक. |
◆१९१९:विक्रम साराभाई -भारतीय
भौतिकशास्त्रज्ञ. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
◆१९८४: आनंदीबाई जयवंत - कवी, समीक्षक
व अनुवादक. |
◆१९७३: दयानंद बाळकृष्ण उर्फ 'भाऊसाहेब' बांदोडकर
-गोव्याचे पहिले मुख्यमंत्री. |
◆१९६८: बाळशास्त्री व्यकटेश हरदास - नामवंत
वक्ते, आणि विद्वान साहित्यिक. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)मुलीची पहिली शाळा पुण्यात कोणी
चालू केली?
२)'महाराष्ट्राचे
मार्टिन ल्युथर' म्हणून कोणास ओळखले जाते?
३)महात्मा गांधीजीचा जन्मदिवस
कोणत्या तारखेला असतो?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 *ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर मुख्य
सचिव सीताराम कुंटे यांची माहिती |
■ नीट रद्द करण्यासाठी जनहित याचिका |
■ शाळा सुरू करण्यासाठी उद्या नियमावली |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे. ======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
📚परीपाठ🌹 |
श्री. देशमुख. एस. बी, |
🌻सचिव🌻 |
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ |
📱-7972808064📱 |
|
❂ दिनांक:~ 12
ऑगस्ट 2021 ❂ |
🎴 वार
~ गुरुवार 🎴 |
|
🏮 आजचे पंचाग 🏮 |
━═•●◆❃★❂★❃◆●•═━ |
|
श्रावण. गुरु १२ |
तिथी : शु. चतुर्थी |
नक्षत्र : उत्तरा, |
योग :- सिध्द |
करण : बव |
सूर्योदय : 06:17, सूर्यास्त
: 19:10, ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🖋 सुविचार
🖋 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
|
💡नेहमी तयारीत राहा |
संधी केव्हाही येऊ शकते ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
⚜म्हणी व अर्थ ⚜ |
|
🕺कुडी तशी पुडी |
|
🔱अर्थ:- |
देहाप्रमाने आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
📆 दिनविशेष
📆 |
|
🌞या वर्षातील🌞 २२४
वा (लीप वर्षातील २२५ वा) दिवस आहे. |
|
🌹 महत्त्वाच्या
घटना 🌹 |
|
👉१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत
भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले. |
👉१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची
ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली. |
👉१९८१: आय. बी. एम. कंपनीचा पहिला पर्सनल
कॉम्प्युटर बाजारात आला. |
👉१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली
पहिली जागतिक मराठी परिषद मुंबई येथे सुरू झाली. |
👉१९९८: सचिन तेंडुलकर यांना राजीव गांधी खेल
रत्न पुरस्कार जाहीर. |
👉२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण
कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली. |
|
🌹जन्मदिवस / जयंती🌹 |
|
👉१८६०: एडॉल्फ हिटलर यांही आई क्लारा
हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर
१९०७) |
👉१८९२: भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ
एस. आर. रंगनाथन यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७२) |
👉१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव
(पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२) |
👉१९१९: भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे
शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१) |
👉१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक
नॉरिस मॅक्विहिर यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २००४) |
👉१९४८: कवी, समीक्षक
व अनुवादक फकिरा मुंजाजी तथा फ. मुं. शिंदे यांचा जन्म. |
|
🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹 |
|
👉१९६४: दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार
आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०८) |
👉१९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान
साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन. |
👉१९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी
गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब
बांदोडकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९११) |
👉१९८४: कवी, समीक्षक
व अनुवादक आनंदीबाई जयवंत यांचे निधन. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🥇सामान्य ज्ञान 🥇 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
👉डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती
केंव्हा असते? |
🥇5
सप्टेंबर (शिक्षक दिवस) |
|
👉कानिफनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे? |
🥇मढ़ी (अहमदनगर) |
|
👉देशातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते? |
🥇मुंबई आकाशवाणी केंद्र |
|
👉महाराष्ट्रातील मुख्य व्यवसाय कोणता आहे? |
🥇शेती |
|
👉365
दिवस असणाऱ्या वर्षाला काय म्हणतात? |
🥇सौर वर्ष ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🕸 बोधकथा
🕸 |
|
👴🏻म्हातारा आणि मृत्यु👤 |
|
एक अतिशय म्हातारा माणूस लाकडे आणण्यासाठी रानात गेला. तेथे काही लाकडे
जमा करून त्याची एक मोळी बांधली व ती डोक्यावर घेऊन मोठ्या कष्टाने पावले टाकत
घराकडे चालला. |
वाटेत डोक्यावरच्या ओझ्याने तो अगदी थकून गेला आणि ओझे खाली टाकून धापा
टाकत खाली बसला. त्यावेळी तो मृत्युला म्हणाला, 'हे
प्राणीमात्राच्या विसाव्या, तू ये आणि या दुःखातून मला सोडव.' |
ते ऐकताच प्रत्यक्ष मृत्यू म्हातार्याच्या पुढे येऊन उभा राहिला व
त्याला म्हणाला, 'बाबा, तू माझी आठवण
का केली होती?' मृत्यू इतका जवळ आहे हे त्या बिचार्या
म्हातार्याला माहीत नव्हते. |
मृत्यूची ती भितीदायक मूर्ति पाहून म्हातार्याची भितीने गाळण उडाली. मग
थोड्या वेळाने तो थरथरत मृत्यूला म्हणाला, 'मृत्यू देवा, मी
अशक्त, माझ्या डोक्यावरची मोळी अचानक खाली पडली. ती
उचलून देशील म्हणून मी हाक मारली. दुसरं काही कारण नाही. खरंचच इतकं काम होतं
आणि यात जर मी तुझा अपमान केला असं तुला वाटत असेल, तर
मी तुझ्या पाया पडतो. मला क्षमा कर व आलास तसाच कृपा करून माघारी जा.' |
|
✅तात्पर्य :- |
मृत्यूविषयी थट्टेने बोलण्याची काही लोकांना
सवय असते. थोडेसे संकट आले की मरण येईल तर बरे असे म्हणतात पण मृत्यू दूर आहे
तोवरच ह्या गोष्टी. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🌐 आजच्या
बातम्या 🌐 |
|
➡️शाळा सुरु करण्यास राज्यातील कोरोना टास्क
फोर्स चा विरोध..शाळा सुरु करण्याच्या निर्णयास ब्रेक.. |
➡️राज्यात हॉटेल्स हॉटेल शॉपिंग मॉल्स ला १५
ऑगस्ट पासून रात्री १० वाजेपर्यंत परवानगी, |
➡️भारताने भेट दिलेले खतरनाक हेलिकॉप्टर
तालिबानच्या ताब्यात, अफगाण सैन्य तेथेच टाकून पळाले |
➡️एटीएममध्ये पैसे नसल्यास बॅंकेला होणार दंड, 'आरबीआय'चा
मोठा निर्णय..! |
➡️टेंशन वाढले: लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळ
मध्ये ४० हजार जणांना कोरोणा लागण ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏 |
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸 |
No comments:
Post a Comment