📚परीपाठ🌹 |
श्री. देशमुख. एस. बी, |
🌻सचिव🌻 |
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ |
📱-9011181718📱 |
|
❂ दिनांक:~ 17
ऑगस्ट 2021 ❂ |
🎴 वार
~ मंगळवार 🎴 |
|
🏮 आजचे
पंचाग 🏮 |
━═•●◆❃★❂★❃◆●•═━ |
|
श्रावण. मंगळ १७ |
तिथी : शु. दशमी |
नक्षत्र : ज्येष्ठा, |
योग :- वैधृती |
करण : तैतील |
सूर्योदय : 06:18, सूर्यास्त
: 19:09, ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🖋 सुविचार
🖋 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
|
💡कळकळ ही जीवनाची सुरूवात करते तर त्याग हा
त्याचा शेवट करतो. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
⚜म्हणी व अर्थ ⚜ |
|
🦊कोल्हा काकडीला राजी – |
|
🔱अर्थ :- |
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
📆 दिनविशेष
📆 |
|
🌞या वर्षातील🌞 २२९
वा (लीप वर्षातील २३० वा) दिवस आहे. |
|
🌹 महत्त्वाच्या
घटना 🌹 |
|
👉१६६६: शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून
पसार झाले. |
👉१८३६: रजिस्ट्रेशन ऑफ बर्थस अॅक्ट ब्रिटिश
संसदेने मान्यता दिलेल्या कायद्याची १८३७ पासून अंमलबजावणी सुरू झाली. |
👉१९४५: ईंडोनेशियाला नेदरलँड्सपासून
स्वातंत्र्य. |
👉१९५३: नार्कोटिक्स अॅनॉनिमस या संस्थेची
पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियात झाली. |
👉१९८२: पहिली सी. डी. जर्मनीमधे विकण्यात आली. |
👉१९८८: पाकिस्तानचे ६वे राष्ट्राध्यक्ष
मुहम्मद झिया उल हक आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड रॅफेल विमान
अपघातात ठार झाले. |
👉१९९७: उस्ताद अली अकबर खाँ यांना अमेरिकेचा
नॅशनल हेरिटेज पुरस्कार प्रदान. |
👉१९९९: तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ ७.४
रिश्टर तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,०००
जखमी. |
👉२००८: एकाच ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्ण पदक
जिंकणारे मायकेल फेल्प्स हे पहिले खेळाडू ठरले. |
|
🌹जन्मदिवस / जयंती🌹 |
|
👉१९०५: ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचा
जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर १९६४) |
👉१९१६: ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक
पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९७५) |
👉१९२६: चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट
पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जिआंग झिमिन यांचा जन्म. |
👉१९३२: नोबेल पारितोषिक विजेते
त्रिनिदादी-भारतीय लेखक व्ही. एस. नायपॉल यांचा जन्म. |
👉१९४४: ओरॅकल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक लैरी
एलिसन यांचा जन्म. |
👉१९४९: इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा
जन्म. |
👉१९७०: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिम कुरिअर
यांचा जन्म. |
|
🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹 |
|
👉१८५०: पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोस डे सान
मार्टिन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १७७८) |
👉१९०९: क्रांतीकारात मदनलाल धिंग्रा यांनी
न्यायलयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली असून त्यांचे निधन. (जन्म: १८
फेब्रुवारी १८८३) |
👉१९२४: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम
केन्डॉल यांचे निधन. |
👉१९८८: पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
मुहम्मद झिया उल हक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२४) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🥇सामान्य ज्ञान 🥇 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
👉जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश
कोणता? |
🥇जपान |
|
👉नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील
सर्वात मोठे पठार कोणते? |
🥇दख्खनचे पठार |
|
👉 'V' आकाराची दरी
कशामुळे तयार होते? |
🥇नदीचे अपघर्षण |
|
👉दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता
आहे? |
🥇लीगनाईट Lignite |
|
👉मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश
कोनता आहे? |
🥇चीन ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🕸 बोधकथा
🕸 |
|
◼️मन माणसाचे *डोके..........? |
|
एका माणसाला काही कामानिमित्त आपल्या गावातून
शहराकडे जायचे होते. तो बेरोजगार होता व गावात त्याला काही काम उपलब्ध नव्हते.
त्यामुळे त्याने शहरात जाऊन काम करण्याचे ठरवले होते. जवळ पैसे नसल्याने
गावापासून शहरापर्यंतचा प्रवास तो पायीच करणार होता. त्याला ज्या रस्त्याने
जायचे होते तो रस्ता जंगलातून जाणारा होता. त्यामुळे त्याला जंगली श्वापदांची
भीती वाटत होती. परंतु दुसरा काही मार्ग नसल्याने त्याने धाडस करून जंगलात प्रवेश
केला. काही अंतर गेल्यावर त्याला झाडावर एक माकड दिसले. त्याला पाहताच माकडाने
झाडावरून त्याच्या पुढ्यात उडी मारली. परंतु माकडाने त्याला काही इजा केली नाही.
उलट त्याने माणसाला त्याच्याबाबत माहिती विचारली. त्यावर माणसाने बरीच मोठी
पाल्हाळीक कथा त्याला ऐकवली. ती ऐकल्यावर माकडाने त्याला पूर्ण मदत करण्याचे
आश्वासन दिले. पण त्यासाठी त्याला एक अटही घातली, तू
मला क्षणभरही कामाशिवाय मोकळे सोडायचे नाही. नाही तर मी तुला मारून टाकीन.
माणसाने त्या माकडाची अट मान्य केली. माकड त्या दिवसापासून माणसाची सर्व कामे
करू लागले. माणसाची सर्व कामे करून माकड त्याच्यासोबत चांगलेच रुळले. परंतु
माणसाच्या मनात मात्र, सुरुवातीला हा आपल्याला मारणार तर नाही ना? अशी
धास्ती वाटत होती. पण नंतर त्याला एक युक्ती सुचली. माकडासाठी जेव्हा काहीच काम
नसे तेव्हा माणूस एक शिडी लावून त्यावर माकडाला चढ - उतार करण्यास सांगत असे.
हळूहळू माकडाला त्याची सवय झाली. माणसाची सर्व कामे ते करू लागले. |
|
✅तात्पर्य
:- माकड हे मानवी मेंदूचे प्रतीक आहे. आपण मेंदूला सदैव विविध कार्यात गुंतवून
ठेवले पाहिजे. तरच ते सदैव रचनात्मक विचारांनी प्रेरित होऊन सकारात्मक योगदान
देत राहील. परंतु त्याला काही काम नसेल तर ते नकारात्मक विचार करू लागेल. हिंसक
होईल, भरकटेल. त्यामुळेच म्हटले जाते की, रिकामा
मेंदू हा सैतानाचे घर असतो. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🌐 आजच्या
बातम्या 🌐 |
|
➡️कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी
तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, रुग्णसंख्या
वाढल्यावर ऑक्सिजन टंचाई निर्माण झाल्यास राज्यात पुन्हा निर्बंध लावावे लागतील, टास्क
फोर्स प्रमुख डॉ संजय ओक यांची स्पष्टोक्ती.. |
➡️अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर
तेथील परिस्थिती भयावह. नागरिकांचा देश सोडून जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न.
रस्त्यांवर लोकांची गर्दी. विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून
खाली पडून काही जणांचा मृत्यू. |
➡️केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्याचे
अधिकार काढून घेतले. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसीसंबंधी यादी
तयार करण्याचा अधिकार दिला. मात्र,
केंद्र सरकारने ओबीसी वर्गाची फसवणूक
केलीय.. शरद पवार |
➡️मनी लाँड्रिंग प्रकरणात जबरदस्तीच्या
कारवाईपासून संरक्षण, तसंच अटकेची कारवाई टाळण्यासाठी सर्वोच्च
न्यायालयात अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी.. सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम
दिलासा देण्यास नकार.. |
➡️कोरोना संकट, राष्ट्रपतींची
हत्या, अफाट गरीबी या समस्यांचा सामना करणारं हैती
भूकंपानं हादरलं.. 1297 लोकांचा मृत्यू, तर
5700 जण गंभीर जखमी .. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏 |
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸 |
[6:56 am, 17/08/2021] R. M. Doifode 53 Jio: ══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा
विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही
विनंती .
________.
🌄 परिपाठ
🌄.
_________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. |
आज दिनांक: १७/०८/२०२२. वार:मंगळवार, महिना :श्रावण,शु.१०.
नक्षत्र :जेष्ठां . योग:वैधृती, |
करण:तैतील.
सूर्योदय:०६.२०,सूर्यास्त:०७.०३. ■■■■■■■■■■■■■■.
सुविचार:जीवन सुखी होण्यासाठी ज्ञान, कर्म
व भक्ती यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮. |
प्रतिज्ञा |
📜 भारताचे
संविधान 📚.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆========.
●●●●●●●●●◆◆◆◆◆◆◆. 🙏 सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना🙏
"सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना |
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या
ने जीवना |
|
सुमनात तू, गगनात
तू |
तार्यांमध्ये फुलतोस तू |
सद्धर्म जे जगतामध्ये |
त्यांच्या मध्ये वसतोस तू |
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना |
|
श्रमतोस तू शेतांमध्ये |
तू राबसी श्रमिकांसवे |
जे रंजले अन् गांजले |
पुसतोस त्यांची आसवें |
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे
तुझे पद पावना |
|
न्यायार्थ जे लढती रणीं |
तलवार तू त्यांच्या करीं |
ध्येयार्थ जे तमीं चालती |
तू दीप त्यांच्या अंतरी |
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस
त्या तू साधना |
|
करुणाकरा, करुणा
तुझी |
असता मला भय कोठले ? |
मार्गावरी पुढती सदा |
पाहीन मी तव पाउलें |
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी
भीतीविना"
________.
________.
•••••••••••••••••••••••••••••••••
👩💻 बोधकथा 👨💻.
★★★★★★★★★★★★
_________ |
🛑 लबाड बोका🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका जंगलात एका वडाच्या झाडावर
बरीच माकडे राहात असत. एकदा एक गवळी दुध, तूप, लोणी
यांनी भरलेली मडकी घेऊन ते विकायला शहरात निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून त्या
वडाच्या झाडाखाली मडकी ठेवून तो निवांत झोपी गेला. गवळी झोपला आहे आणि बाजूच्या
मडक्यात दुध, तूप, लोणी आहे. हे
त्या झाडावरील दोन माकडांनी पाहिले. ती माकड खाली उतरली आणि त्यातील एक लोण्याचे
मडके त्यांनी पळविले. परंतु त्या मडक्यातील लोणी दोघांनी बरोबर अर्धे अर्धे
वाटून घ्यायचे यावरून दोघात वाद सुरु झाला. म्हणून हे लोणी दुसऱ्या कोणाकडून
वाटून घेऊ, असे ठरवून ते दोघे लोणी घेऊन एका बोक्याकडे
आले. बोक्याला आयतीच संधी चालून आली.
बोक्याने त्यांना लोणी सारखे मोजण्यासाठी एक तराजू आणण्यास सांगितला.
तराजू मिळताच बोक्याने लोण्याचे दोन भाग करून तराजूत टाकले. एका पारड्यात लोणी जास्त झाले म्हणून वजन
सारखे करतो असे दाखवून त्याने त्या परड्यातले थोडे लोणी खाऊन टाकले. त्यामुळे
दुसऱ्या पारड्यात वजन जास्त झाले. मग त्यातील थोडे लोणी खाल्ले. असे करता करता
बोक्याने आलटून पालटून एकेका पारड्यातले लोणी खात सर्व लोणी संपविले. माकडांना
काहीच लोणी शिल्लक राहिले नाही. आपण दोघ
भांडलो त्याचा फायदा बोक्यानी घेतला. हे उशीरा त्याच्या लक्षात आले. |
तात्पर्य: दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ 🎼 समूहगीत🎼
💫 आव्हान
द्यावया आम्हा कुणाची छाती.
आव्हान द्यावया आम्हा कुणाची छाती |
दश दिशांत अमुच्या सामर्थ्याची ख्याती॥धृ॥ |
|
कैलासी अजुनी जागा तांडव राग |
सागरी धगधगे वडवाग्नीची आग |
मंत्रात शांतिच्या इथे जागते क्रांती॥१॥ |
|
नगराज हिमालय उन्नत अमुचा माथा |
इतिहास गातसे पुरुषार्थाची गाथा |
प्रसवते वीरता कण कण इथली माती॥२॥ |
|
आसेतु हिमचल एक आमुचा देश |
ही एक संस्कृती एकच दे संदेश |
भारतीय रुधिरें जडली अमुची नाती॥३॥ |
|
सुकोमल आणि कठिण वज्रही आम्ही |
खलसंहारस्तव होऊ रुद्रहि आम्ही |
खड् गापरि कणखर इथे तृणांची पाती॥४॥ |
|
ही असे अनादी अनंत अमुची माता |
हो धन्य वेदही हिचीच महती गाता |
जगजननीची या किर्ति देवही गाती॥५॥
_________. |
🎰 दिनविशेष🎰.
_________ |
|
महत्त्वाच्या घटना: |
◆१८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून
लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या
श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला. |
◆ १९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या
किनार्यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,०००
डॉलरचे नुकसान. |
◆१९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन
विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार. |
◆१९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
◆१८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा
सम्राट. |
◆१९२६ - ज्याँग झमिन, चीनचा
राष्ट्राध्यक्ष. |
◆१९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश
लेखक. |
◆१९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा
उड्डाण निदेशक. |
◆१९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच
फुटबॉल खेळाडू.
|
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
●१९०९- भारत
मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे क्रांतीकारक
मदनलाल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली.
|
●१९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन
क्रिकेट खेळाडू. |
●१९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा
राष्ट्राध्यक्ष. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा ~~~★~~~.
१)ग्रामपंचायतींसाठी पंचसूत्री योजना
कोणी तयार केली?
२)लोकसभेला एकदाही समोर न गेलेले
पंतप्रधान कोण? ३)भारतीय राज्यघटनेचा सरनामा
(उद्देशपत्रिका)कोणी तयार केली? उत्तरे:(१.आचार्य विनोबा भावे, २.चौधरी चरण सिंह,३.पंडित
जवाहरलाल नेहरू.) ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ नागपूर -शिक्षकाच्या अवयवदानाने तिघांना
जीवदान दोघांना मिळणार दृष्टी. |
■ सीईटी रद्द झाल्याने अकरावी प्रवेश कसे होणार?मनासारखे
कॉलेज मिळण्यासाठी कसरत |
■ शाळा सुरु करण्याबाबत राज्यात संभ्रम |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :. घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
======★■◆●====== |
No comments:
Post a Comment