31 जुलै दिनविशेष ॥स्मृतिदिन

************

३१ जुलै

देशातील पहिला मोबाईल कॉल

************

३१ जुलै १९९५

भारतातला पहिला मोबाईल कॉल !

३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस. या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री कॉम्रेड ज्योती बसू यांनी कोलकातातील रायटर्स बिल्डींग मधून दिल्लीतील संचार भवन मध्ये असलेले केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना देशातील पहिला मोबाईल कॉल केला.

कोलकाता शहराला देशातील पहिली मोबाईल नेटवर्क सिटी करण्यासाठी ज्योति बसू यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी करून दाखवले.

देशातील सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल २३ वर्षे सलग मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देखील कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावावर आहे.

त्यासोबतच देशात एखाद्या राज्यात सलग ३४ वर्षे सत्ता असण्याचा विक्रम पश्चिम बंगाल मध्ये माकप प्रणित डाव्या आघाडीच्या नावे आहे.

तसेच देशातील मोबाईल क्रांतीची सुरुवातच माकप नेते कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावे आहे. म्हणून ३१ जुलै हा भारतातील मोबाईल क्रांतीचा ऐतिहासिक दिवस आहे.

लाल सलाम कॉम्रेड ज्योती बसू !

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक

************

************

३१ जुलै

लेखक मुन्शी प्रेमचंद जन्मदिन

************

जन्म - ३१ जुलै १८८० (वाराणसी)

स्मृती - ८ ऑक्टोबर १९३६

मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना उपन्यास सम्राटम्हणूनही ओळखले जाते.

प्रेमचंदांनी १९१३ ते १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क' मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली.

प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थान वरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त केली गेली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.

१९२१ पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. १९२३ मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस' ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले.

प्रेमचंद यांचे साहित्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील प्रेमचंद यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. एक संवेदनशील लेखक, सुजाण नागरिक आणि एक कुशल वक्ता अशी ओळख असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३०० लघुकथा, कादंबऱ्या आणि अनमोल अशा साहित्याचा खजिना दिला आहे.

संप्रदाय, भ्रष्टाचार, जमिनदारी, गरिबी अशा विषयांवर भाष्य करत मुन्शी प्रेमचंद यांनी आपले साहित्य रचले होते. अतिशय सोप्या सरळ भाषेत लिखाण करणाऱ्या प्रेमचंद यांचे साहित्य नवोदित लेखकांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

मुन्शी प्रेमचंद यांचे निधन ८ ऑक्टोबर १९३६ रोजी झाले.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

अभिनेता मोहन भंडारी जन्मदिन

************

जन्म - ३१ जुलै १९३७

स्मृती - २४ सप्टेंबर २०१५ (मुंबई)

मोहन भंडारी हे टीव्ही मालिका मध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेता. दूरदर्शन वाहिनीवरील खानदानया प्रसिद्ध मालिकेव्यतिरीक्त त्यांनी कर्ज, परंपरा, जीवन मृत्यू, पतझड, गुमराहया मालिका मध्येही काम केले आहे.

आमिरच्या मंगल पांडे- द रायझिंग स्टारया चित्रपटातही ते झळकले होते. ८०च्या दशकात त्यांनी अनेक मालिका मध्ये काम केले होते. मात्र, १९९४ मध्ये ते टीव्ही मालिका पासून दुरावले.

त्यानंतर त्यानी सात फेरेया मालिकेने पुनरागमन केले. त्यांचा मुलगा ध्रुव हा अभिनेता असून त्याने तेरे शहर मेया मालिकेत काम केले आहे.

मोहन भंडारी यांचे २४ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

गायक मोहंमद रफी स्मृतिदिन

************

जन्म - २४ डिसेंबर १९२४

स्मृती - ३१ जुलै १९८०

दिन ढल जायें हाय रात न जायें, तेरे मेरे सपने अब एक रंग है, कभी खुद पें कभी हालात पें रोना आया; अशा अनेक अजरामर गाण्यांमध्ये पडद्यावर दिसला तो चेहरा देव आनंदचा आणि आवाज होता मोहम्मद रफींचा. शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली.

रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे  'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला.

१९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चं दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शिर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅेवॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी; मन मोरा बावरा (रागिनी) आणि 'अजब है दास्तां तेरी ये जिंदगी' ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती.

१९६९-७० मध्ये आराधनातली 'मेरे सपनोंकी रानी ' आणि 'रूप तेरा मस्ताना' गाजल्यावर सुपरस्टार राजेशखन्ना नेहमी किशोरकुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली. पण त्यातूनही 'हम किसीसे कम नही' मधल्या 'क्या हुवा तेरा वादा' या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं. हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या मदतीने 'कर्ज' साठी 'दर्द्-ए-दिल' गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता 'संगीत' हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं.

लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या छोट्या छोट्या वादांचं आणि मतभेदांचं पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळलं, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. वैयक्तिक पातळीवर मात्र त्याचे वाद कधीच मिटले नाहीत. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते.

किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील. असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे.

'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत त्यांनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत.

रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.

मोहम्मद रफी यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले.

मोहम्मद रफी यांना आदरांजली !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

अभिनेत्री कियारा अडवाणी चा वाढदिवस

************

जन्म - ३१ जुलै १९९२ (मुंबई)

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज वाढदिवस.

कियाराचं खरं नाव आलिया. 'अंजाना-अंजानी' तलं प्रियांकाचं नाव तिला आवडलं आणि त्याच नावाने ती इंडस्ट्रीत आली. तिला सगळ्यात मोठा ब्रेक मिळाला तो नीरज पांडेच्या 'एम. एस. धोनी' मधून. ह्यात तिनं धोनीच्या बायकोची म्हणजेच साक्षीची भूमिका केली होती.

सुशांतसिंग बरोबर कियाराची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली त्यानंतर ती अब्बास-मस्तान यांच्या 'मशीन' या चित्रपटामध्ये झळकली. दुर्दैवाने तो चित्रपट फ्लॉप ठरला. 'कबीर सिंग' या चित्रपटातून सर्वत्र लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी हीचा चित्रपट सृष्टीतील सुरुवातीचा प्रवास म्हणावा तेवढा यशस्वी ठरला नव्हता.

'फगली' या चित्रपटातून कियारा अडवाणीने तिच्या करियरला सुरुवात केली. त्यानंतर 'मशिन' या चित्रपटात तिला भूमिका मिळली, मात्र या दोन्ही चित्रपटामध्ये तिला लोकप्रियता मिळाली नाही. पण त्यानंतर चर्चेत असलेल्या 'लस्ट स्टोरी' या वेब सिरीज मध्ये प्रेक्षकांनी तिची चांगलीच दखल घेतली. आणि त्यानंतर 'कबीर सिंग' चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे ती सर्वत्र प्रसिद्ध झाली.

नंतर कियारा 'गुड न्यूज' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलीआहे. या चित्रपटात तिच्यासोबत करीना कपूर, अक्षय कुमार व दिलजीत दोसांझ हे देखील मुख्य भूमिकेत होते. याशिवाय कियारा 'लक्ष्मी बॉम्ब', 'इंदु की जवानी', भूल भुलैया २' 'शेरशाह' हे आगामी चित्रपट येणार आहेत.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

अभिनेत्री मुमताज यांचा वाढदिवस

************

जन्म - ३१ जुलै १९४७

आपल्या अभिनय आणि सौंदर्याने एक काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री मुमताज यांचा आज वाढदिवस.

६० आणि ७० च्या दशकात एकामागून एक हिट सिनेमे देणाऱ्या मुमताज यांचा एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्ट ते सुपर हिरोईन पर्यंत प्रवास केला. मुमताज यांनी बाल कलाकाराच्या रुपात आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या हिंदी सिनेमांमध्ये एक्स्ट्रा ज्युनिअर आर्टिस्टच्या रुपात झळकल्या. सुरुवातीच्या काळात त्यांना नशीबाची साथ मिळाली नाही, म्हणून लो बजेट आणि बी ग्रेड सिनेमांमध्ये त्यांना काम करावे लागले.

१९६५ हे वर्ष मुमताज यांच्या करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले. यावर्षी मुमताज यांचा 'ऐ मेरे सनम' हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकेचे खूप कौतुक झाले होते. या नकारात्मक भूमिकेमुळे मुमताजच्या आयुष्यात सर्वकाही सकारात्मक होऊ लागले. बी ग्रेड सिनेमांमधली हिरोईनला आता ए ग्रेड सिनेमे मिळू लागले होते. पत्थर के सनम, राम और श्याम आणि ब्रम्हचारी या सिनेमांमध्ये त्यांनी सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. 'दो रास्ते' या सिनेमातील हीरो होते सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्यांच्या प्रेयसीच्या भूमिका मुमताज यांनी वठवली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि मुमताज एका रात्रीत बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील झाल्या. या सिनेमाबरोबर मुमताजच्या यशाचा काळ सुरु झाला. यानंतर मुमताजे यांनी वळून बघितले नाही.

आदमी और इन्सान, परदेसी, सच्चा-झुठा या सिनेमांमुळे त्यांची गणती बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्री मध्ये होऊ लागली. १९७० साली रिलीज झालेल्या 'खिलौना' या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

मुमताज यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक संस्मरणीय सिनेमे दिले. अधिकाधिक सिनेमांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. के. बालाचंदर दिग्दर्शित आणि १९७४ मध्ये रिलीज झालेल्या 'आईना' या सिनेमात मुमताजच्या अभिनयाचा वेगळा पैलू बघायला मिळाला. समीक्षक आणि स्वतः मुमताज या सिनेमातील भूमिकेला सर्वोत्कृष्ट अभिनय समजते.

फिरोज खान यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'अपराध', 'इंटरनॅशनल गँग', 'कॉनमॅन' या क्राईमवर आधारित सिनेमांमध्ये मुमताज यांनी खूप बोल्ड सीन दिले होते. या सिनेमांमध्ये त्यांनी टू पीस बिकिनी परिधान करुन सगळ्यांना आश्चर्यचकित केले होते. मुमताज यांच्यावर चित्रीत झालेले 'हमारे सिवा तुम्हारे और कितने दिवाने है' हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.

यशोशिखरावर असताना १९७४ मध्ये मुमताज व्यावसायिक मयुर माधवाणी यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. लग्नगाठीत अडकल्यानंतर आपले प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण होईपर्यंत हिंदी सिनेमांमध्ये काम केले.

२०१२ मध्ये भारतीय सिनेसृष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुमताज यांना इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमीच्या वतीने सेकंड मोस्ट पॉप्युलर ब्युटी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या मुमताज लंडनमध्ये वास्तव्याला आहेत.

मुमताज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬

            🤔 कुतूहल 🤔

🎯 स्पर्धेतील यशाची किल्ली

**********

गणिती द्यूत (गेम) हे पर्यायी डावपेचांचे, त्यातील नफ्यातोट्याचे गणिती प्रारूप असते. जास्तीत जास्त फायदा किंवा कमीत कमी नुकसान होईल असे डावपेच निवडण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या प्रारूपाची रचना एका उदाहरणातून पाहू

द्यूतात दोन किंवा अधिक खेळाडू असतात. प्रत्येक खेळाडूला ठरावीक चाली वा डावपेच निवडता येतात कोणती चाल किती गुण देईल ते सापेक्षपणे गुण-मेळ सारणीत दर्शवले जाते. आकृतीत दिलेल्या द्यूतात दोन खेळाडू आहेत आणि प्रत्येकाला आक्रमक वागणे म्हणजे ससाणा चाल किंवा सामोपचाराने वागणे म्हणजे कबुतर चाल, असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. गुण-मेळ सारणीत (आकृती पाहा) कंसातले डावीकडचे गुण पहिल्या खेळाडूचे व उजवीकडचे दुसऱ्याचे आहेत एकाच ध्येयासाठी झगडणाऱ्या या दोन खेळाडूंपैकी एकाने आक्रमक ससाणा चाल व दुसऱ्याने कबुतर चाल खेळली तर अर्थात पूर्ण फायदा म्हणजे एकंदर १० गुण ससाणा चाल खेळणाऱ्यास आणि दुसऱ्यास ० गुण मिळतील. दोघांनी सामोपचाराने कबुतर चाल खेळली, तर उपलब्धी अर्धी-अर्धी होईल व प्रत्येकी ५ गुण मिळतील. दोघांनी आक्रमक चाल खेळल्यास होणाऱ्या व्यवहारात दोघांचेही थोडे नुकसान होईल व ते एकंदर उपलब्धीतून वजा जाऊन उरलेली उपलब्धी समान वाटली जाईल नुकसान प्रत्येकी ३ मानल्यास प्रत्येकास २ गुण मिळतील.

सारणीतून द्यूताच्या निष्पत्तीचा अंदाज बांधता येतो. उदाहरणार्थ, दुसरा खेळाडू ससाणा चाल खेळेल असे गृहीत धरल्यास, पहिल्या खेळाडूला ससाणा चाल २, तर कबुतर चाल ० गुण देईल. म्हणजे ससाणा चाल फायदेशीर ठरेल. तसेच दुसरा खेळाडू कबुतर चाल खेळणार असे गृहीत धरल्यास, पहिल्याला ससाणा चाल १० आणि कबुतर चाल ५ गुण देईल. म्हणजे ससाणा चालच खेळणे कधीही फायदेशीर आहे. सारणी सममिती (सिमेट्रिक) असल्याने दुसऱ्या खेळाडूबाबत हेच तर्कशास्त्र वापरून तोसुद्धा ससाणा चालच निवडील असा निष्कर्ष निघतो ससाणा-ससाणा हा मेळ या द्यूतातील समतोल (इक्विलिब्रिअम) असून त्याची संकल्पना जॉन नॅश या गणितज्ञाने सर्वप्रथम वापरली, म्हणून त्याला नॅश समतोलम्हटले जाते. अर्थात, प्रत्येक द्यूतात असा एकमेव नॅश समतोल मिळतोच असे नाही. अशा वेळी दुसरा खेळाडू विविध चालींपैकी विवक्षित चाली निवडण्याच्या संभाव्यता लक्षात घेऊन, पहिला खेळाडू त्याच्या प्रत्येक चालीतून किती अपेक्षित फायदा आहे, त्याचे गणित मांडून जास्तीत जास्त फायदा देणारी चाल निवडू शकतो. स्पर्धात्मक जगात द्यूत-प्रारूपाने निर्देशित केलेल्या योग्य चालींच्या निवडीने इष्टतम यश मिळू शकते.

प्रा. माणिक टेंबे

office@mavipamumbai.org

~~~~~~

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~

 📡 जय विज्ञान 🔬

दैनिक लोकसत्ता,दिनांक -२६ जुलै २०२१

📍आजची माहिती

📕माणूस कोणकोणते अवयव  दुसऱ्याला दान करू शकतो?📕

*************

दानाचे माहात्म्य फारच मोठे आहे. अन्नदान, वस्त्रदान, तसेच आर्थिक मदत इत्यादींना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे दानशून कर्णाच्या गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच परंतु या सर्व दानांपेक्षाही मौल्यवान असे दान सामान्यातला सामान्य माणूस देऊ शकतो. आश्चर्य वाटले ना? पण हे अगदी खरे आहे. हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड, अस्थिमज्जा, त्वचा इत्यादी अवयवांचे माणूस दुसऱ्याला दान करू शकतो. मेंदूचे कार्य थांबल्यास व्यक्तीला मृत समजावे, असा कायदा भारतीय संसदेने मंजूर केल्यामुळे इंद्रियदान करणे वा इंद्रियारोपण करणे शक्य झाले आहे.

डोळ्यात फूल पडल्याने वा जखम झाल्याने नेत्रपटल निकामी झालेल्या लोकांना मृत व्यक्तीचे नेत्रपटल वसवतात. यामुळे त्यांना दृष्टी प्राप्त होते. यालाच नेत्रदान असे म्हणतात. मूत्रपिंड खराब झालेल्या व्यक्तीचे जवळचे वा रक्ताचे नातेवाईक त्याला स्वतःचे मूत्रपिंड दान करू शकतात. सामान्यपणे सर्व व्यक्तींना दोन मूत्रपिंडे असल्याने त्यापैकी एक दान केले तरी मूत्रपिंडाच्या द्वारे आयुष्यभर कार्य केले जाते. साहजिकच एका रुग्णाचे प्राण वाचतात.

अपघातामध्ये मेंदूला जबर दुखापत झाल्याने मेंदू निकामी झालेल्या रुग्णाचे हृदय, नेत्र, यकृत, मूत्रपिंड असे अवयव काढून घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवता येतात.

मरणोत्तर काही व्यक्ती देहदानही करू शकतात. यासाठी मरणोत्तर पोस्टमॉर्टम झालेले नसावे. तसेच शरीरातील अवयव शस्त्रक्रियेने काढलेले नसावे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीररचना शास्त्राच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. अस्थिमज्जा नष्ट झालेल्या व्यक्तींना अस्थिमज्जा दुसऱ्या निरोगी व्यक्तीने दान करावी लागते.

अशा प्रकारे माणूस अनेक अवयवांचे दान करू शकतो. काही जिवंतपणी तर काही मरणोत्तर. मरावे परि कीर्तिरूपी उरावे" या उक्तीची प्रचीती या दानांमुळे येऊ शकते.

~ दिपक तरवडे ~

~~~~~~

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~

डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

📍आजची माहिती

📘दूरचित्रवाणी (Television) 📘

***********

दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.

१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला.

नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.

हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.

१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंग तीन लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते.

 दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो.

टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो.

टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.

टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून

~ दिपक तरवडे ~

~~~~~~

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~~

डाॅ.बाळ फोंडके यांच्या किती? या पुस्तकातुन

************

३१ जुलै

देशातील पहिला मोबाईल कॉल

************

३१ जुलै १९९५

भारतातला पहिला मोबाईल कॉल !

३१ जुलै १९९५ चा तो ऐतिहासिक दिवस. या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री कॉम्रेड ज्योती बसू यांनी कोलकातातील रायटर्स बिल्डींग मधून दिल्लीतील संचार भवन मध्ये असलेले केंद्रीय संचार मंत्री सुखराम यांना देशातील पहिला मोबाईल कॉल केला.

कोलकाता शहराला देशातील पहिली मोबाईल नेटवर्क सिटी करण्यासाठी ज्योति बसू यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी करून दाखवले.

देशातील सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल २३ वर्षे सलग मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देखील कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावावर आहे.

त्यासोबतच देशात एखाद्या राज्यात सलग ३४ वर्षे सत्ता असण्याचा विक्रम पश्चिम बंगाल मध्ये माकप प्रणित डाव्या आघाडीच्या नावे आहे.

तसेच देशातील मोबाईल क्रांतीची सुरुवातच माकप नेते कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावे आहे. म्हणून ३१ जुलै हा भारतातील मोबाईल क्रांतीचा ऐतिहासिक दिवस आहे.

लाल सलाम कॉम्रेड ज्योती बसू !

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक

************

************

३१ जुलै

लेखक मुन्शी प्रेमचंद जन्मदिन

************

जन्म - ३१ जुलै १८८० (वाराणसी)

स्मृती - ८ ऑक्टोबर १९३६

मुन्शी प्रेमचंद यांचे धनपत राय हे खरे नाव होते. साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना उपन्यास सम्राटम्हणूनही ओळखले जाते.

प्रेमचंदांनी १९१३ ते १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांची पहिली कादंबरी 'असरारे महाबिद' उर्दू भाषेत होती. ती उर्दू साप्ताहिक 'आवाज-ए-ख़ल्क' मध्ये ८ ऑक्टोबर १९०३ पासून क्रमशः प्रसिद्ध झाली, तर त्यांची शेवटची कादंबरी 'मंगलसूत्र' अपुरी राहिली.

प्रेमचंद यांनी महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली सरकारी नोकरी सोडली व पहिली कादंबरी हिंदुस्थान वरील ब्रिटिश सत्तेच्या जुलमाची आणि भारतीयांच्या गुलामगिरीवर लिहिली. ती जेव्हा पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली, तेव्हा जप्त केली गेली. मात्र, देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक होण्यापासून प्रेमचंद वाचले. त्यानंतर त्यांनी आपले नबाब धनपतराय हे नाव बदलून प्रेमचंद घेतले.

१९२१ पर्यंत प्रेमचंद शिक्षण खात्यात डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरी करीत होते, मात्र त्यानंतर ते बनारसला परतले, आणि त्यांनी फक्त देशमुक्तीच्या संघर्षाकरिता आपली लेखणी चालवण्याचे ठरविले. १९२३ मध्ये त्यांनी 'सरस्वती प्रेस' ची स्थापना केली. प्रेसच्या खर्चासाठी कर्ज मिळविण्याच्या उद्देशाने प्रेमचंद मुंबईला आले व त्यांनी एक चित्रपटकथा लिहून दिली. चित्रपटात त्यांनी मजुराच्या बापाची भूमिकाही केली. मात्र वर्षभरात प्रेमचंद परत गेले.

प्रेमचंद यांचे साहित्य अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील प्रेमचंद यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. एक संवेदनशील लेखक, सुजाण नागरिक आणि एक कुशल वक्ता अशी ओळख असणाऱ्या मुन्शी प्रेमचंद यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३०० लघुकथा, कादंबऱ्या आणि अनमोल अशा साहित्याचा खजिना दिला आहे.

संप्रदाय, भ्रष्टाचार, जमिनदारी, गरिबी अशा विषयांवर भाष्य करत मुन्शी प्रेमचंद यांनी आपले साहित्य रचले होते. अतिशय सोप्या सरळ भाषेत लिखाण करणाऱ्या प्रेमचंद यांचे साहित्य नवोदित लेखकांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहे.

मुन्शी प्रेमचंद यांचे निधन ८ ऑक्टोबर १९३६ रोजी झाले.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

शास्त्रज्ञ दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये जन्मदिन

************

जन्म - ३१ जुलै १८८७ (रत्नागिरी)

स्मृती - २६ फेब्रुवारी १९७१

दत्तात्रेय बाळकृष्ण लिमये यांचा जन्म मणचे, ता.देवगड, जि.रत्नागिरी येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच एका मागोमाग आई आणि वडील निधन पावल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण हावनूर, जि. धारवाड येथे झाले. नंतरचे शिक्षण नाशिक व मुंबई येथे झाले.

१९०५ साली मॅट्रिक झाल्यावर गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हणूनच त्यांचा एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश झाला. पुढच्याच वर्षी त्यांनी फर्गसन महाविद्यालयात प्रवेश मिळवला. १९०९ साली बी.एस्सी. आणि १९११ साली रसायन हा विषय घेऊन एम.ए. (सायन्स) ही पदवी त्यांनी प्रथम क्रमांकाने संपादन केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, आर्थिकदृष्ट्या ओढग्रस्त असताना लिमये यांनी हे यश मिळवले. त्यांचे सगळे शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले, इतकी गुणवत्ता त्यांनी आपल्या शिक्षणादरम्यान दाखवली होती. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांचा लोभ त्यांना मिळाला. त्यामध्ये एल्फिन्स्टनचे प्राचार्य शार्प यांचा मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. त्यांनी लिमयांना नोकरीही देऊ केली होती, पण ती त्यांनी देशप्रेमामुळे नाकारली.

प्राचार्य कानिटकरांनी स्थापन केलेल्या रानडे इन्स्टिट्यूट मध्ये कानिटकरांचे साहाय्यक म्हणून त्यांनी काम सुरू केले. नंतर तिथे ते स्वकर्तृत्वाने संचालक झाले. औद्योगिक दृष्टीने उपयोगी पडेल असे काम लिमयांनी सुरू केले. त्यामध्ये हिरडा व तरवड यांचे अर्क काढून त्याचा कातडी कमावण्यासाठी उपयोग, लोखंड, मँगनीज, बॉक्साईट इत्यादी खनिजांचे रासायनिक विश्‍लेषण, काचेवर पारा चढवणे, बिलोरी काचेचे विविधरंगी गोळे बनवणे, पेनची, मुद्रणालयाची, कापडावर छापायची अशी वेगवेगळ्या प्रकारची शाई बनवणे, असे नानाविध प्रकारचे प्रयोग करून ते यशस्विरीत्या पार पाडले.

गोंद, साबण, घासकामाचा कागद इत्यादीचे उत्पादन केले, तर संस्थेच्या नियामक मंडळाच्या सूचनेनुसार सिमेंट टेस्टिंगचे कामही केले. निंबोळी, उंडी, करंजेल या वनस्पतींवर त्यांनी संशोधन केले. त्यांना करंजेल मध्ये रवाळ स्फटिकरूप आणि अल्कोहोलमध्ये विरघळणारा फ्लॅव्होन जातीचा नवीन पदार्थ, तेलाच्या साक्यात मिळाला. त्याला करंजिनअसे नाव लिमयांनी दिले. रसोद प्रक्रिया, रंजोर्व प्रक्रिया, निधोन पद्धती अश वेगवेगळ्या पद्धतींना समर्पक नावे दिली. पाश्चात्त्य संशोधकांनीही लिमयांनी दिलेली नावे वापरली. यावरून त्यांच्या संशोधनाचे आणि प्रक्रियांचे महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक बळाची कमतरता असताना त्यांनी असे महत्त्वाचे संशोधन करता येते, हे स्वत:च्या उदाहरणावरून दाखवून दिले. अडचणींवर मात करून उत्तम दर्जाचे संशोधन त्यांनी केलेच आणि आपल्या विद्यार्थ्यांकडून करूनही घेतले. त्यांच्या संशोधनानेच त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली.

त्यांचे एकूण ६२ संशोधनपर निबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. तसेच, त्यांनी सुमारे ५५ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर संशोधनासाठी मार्गदर्शन केले. पदव्युत्तर पातळीवर त्यांचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाल्यावर मुंबई विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची मान्यता दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून चार विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली.

रसायनशास्त्रातील संशोधनास मदत व्हावी म्हणून त्यांनी रसायननिधीचा शुभारंभ केला. त्यामध्ये प्रथम आपण रु.१,०००/- दिले आणि मग समाजाला आवाहन केले. संशोधनातील कामे सुचतात, पण त्यासाठी निधी नाही, अशी अडचण नवीन पिढीला येऊ नये म्हणून ही व्यवस्था केली. खूप प्रयत्नांनंतर विश्वस्तांनी एक लाख रुपये जमा केले. विश्वस्तांनी १९२५ साली रसायनशास्त्रावरील संशोधनास मान्यता दिली आणि १९३० साली रसायननिधी स्थापना विषयक विश्वस्तपत्र लिमयांनी रजिस्टर केले.

१९३० ते १९३९ साली रिसोरसिनॉल हा पदार्थ माहीत होता, पण त्यावर जगभर नवीन संशोधन सुरू होते. लिमये यांनी प्रदीर्घ संशोधनानंतर प्रक्रिया करून तीन टप्प्यांत अल्किल रिसोरसिनॉल यशस्विरीत्या मिळवले. या संशोधनाला निधोन प्रोसेसहे नाव दिले. त्यामुळे लिमयांचे नाव जगभर ज्ञात झाले. याबाबत त्यांचा संशोधन निबंध त्यांनीच सुरू केलेल्या रसायनम्या संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाला. नोबेल पुरस्कार विजेते प्रा.डोनाल्ड क्रम यांनी १९९० साली अमेरिकन जर्नलमध्ये लिमयांच्या संशोधन निबंधाचा संदर्भ दिला आहे. यातच लिमयांच्या संशोधनाचे महत्त्व समजते, तसेच संशोधन किती उच्च दर्जाचे होते, त्याची प्रचिती येते. १९६७ साली लिमये यांचा डॉक्टर ऑफ सायन्सही पदवी देऊन पुणे विद्यापीठाने  सत्कार केला.

बाळकृष्ण रसशाळा हा औद्योगिक प्रकल्प स्थापन करून त्यांनी आपल्या पायावर उभे राहण्याची कामगिरी केली. रसायननिधीच्या त्रैवार्षिक सभेस नोबेल पुरस्कार विजेते सर चंद्रशेखर रमण हे आले होते. त्यांनी लिमयेंच्या संशोधनाची माहिती समजून घेतली आणि त्यांच्या कामाविषयी नॅशनल केमिकल सोसायटीच्या समारंभात आणि सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात गौरवोद्गार काढले, ही पण लिमयेंच्या कामाला मिळालेली पावतीच म्हणावी लागेल.

रसायनमंदिरया संस्थेला सरकारी अनुदान न मिळाल्यामुळे १९६४ साली रसायननिधीच्या विश्वस्तांना ते बंद करावे लागले आणि रसायननिधी पुणे विद्यापीठाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यातून विद्यापीठाने प्रा.द.बा. लिमये पदव्युत्तर रसायननिधी शोधवृत्ती चालू केली. १९८७ साली डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ (डी.आर.डी.ओ.) तर्फे रसायननिधीच्या व्याजातून देण्यात येणार्‍या शोधवृत्तीमध्ये भर घालण्यात आली. पण ही शोधवृत्ती विशेष कोणालाही ज्ञात नाही.

लिमये यांचे कार्य तीन प्रकारचे आहे. त्यांनी साधन सामग्रीची संपन्नता नसतानाही कल्पकतेने संशोधन करून रसायनशास्त्रातील ज्ञानात मौलिक भर घातली, अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून संशोधकांची परंपरा निर्माण केली आणि संशोधनासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून रसायननिधीची उभारणी करून त्याचे संवर्धन केले. सर्वांना प्रेरणा देणारे असे कार्य त्यांनी केले, त्याचा तपशील रसमहर्षीया समर्पक शीर्षक असलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल.

~ दिलीप हेर्लेकर ~

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

************

************

३१ जुलै

गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी जन्मदिन

************

जन्म - ३१ जुलै १९०७ (गोवा)

स्मृती - २९ जून १९६६ (पुणे)

प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म ३१ जुलै १९०७ रोजी झाला.

दामोदर कोसंबी अर्थात डी.डी. कोसंबी हे भारताच्या प्रखर बुद्धिवान लोकांपैकी एक होते. आपल्या वडिलांप्रमाणेच ते जिज्ञासू, अभ्यासू तर होतेच पण मानवतेसाठी झटण्याचा वसा त्यांनी त्यांच्यापासूनच घेतला होता. दामोदर कोसंबी यांचे वडील धर्मानंद दामोदर कोसंबी हे भारतातलं नावाजलेलं नाव. बौद्ध तत्त्वज्ञ म्हणून त्यांची कीर्ती सर्वदूर होती.

धर्मानंद दामोदर कोसंबी यांनी आपल्या मुलाचं नाव आपल्या वडिलांच्या नावावरुनच ठेवलं. पुण्यात शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते वडिलांसोबत अमेरिकेला गेले आणि केंब्रिज लॅटिन स्कूल मध्ये १९२५ पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. पदवीचं शिक्षण त्यांनी हार्वर्ड मधून घेतलं. हार्वर्ड मध्ये असताना त्यांनी गणित, इतिहास आणि भाषांमध्ये रस घेतला. याच ठिकाणी ते ग्रीक, लॅटिन, जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्ये पारंगत झाले. हार्वर्ड मध्ये असतानाच ते प्रसिद्ध गणितज्ञ जॉर्ज बर्कऑफ आणि नॉर्बर्ट विनर यांच्या संपर्कात आले.

ते १९२९ मध्ये भारतात परतले. पुढे ते बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले.  त्यांना अलीगढ मुस्लीम विद्यापीठाने गणिताचे प्राध्यापक म्हणून बोलावलं. त्या ठिकाणी ते वर्षभर होते. १९३२ मध्ये ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये नोकरी करू लागले. याच ठिकाणी धर्मानंद कोसंबी यांनी पाली भाषा शिकवली होती.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी १४ वर्षं नोकरी केली.

या काळात त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये सिद्ध केलं होते. आधुनिक भारतातील एक महत्त्वपूर्ण विचारवंत अशी त्यांची ओळख बनली.

१९४६  मध्ये ते टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या गणित विभागाचे प्रमुख बनले. १९६२ सालापर्यंत ते या पदावर होते. या संस्थेमुळेच त्यांच्याच तोडीच्या जगभरातल्या तत्त्वज्ञ आणि अभ्यासकांच्या ते संपर्कात आले. त्यांच्या कारकीर्दीचा बहुतांश काळ त्यांनी गणितामध्ये विशेष प्राविण्य मिळवण्यात आणि अध्यापन करण्यात समर्पित केला. त्यांच्या या विषयातल्या योगदानाचं कौतुक ब्रिटिश वैज्ञानिक जे.डी. बर्नाल यांनी केलं. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे कोसंबी यांच्या विश्वशांती चळवळीतील योगदानाची प्रशंसा देखील त्यांनी तितक्याच आत्मीयतेनं केली होती.

भारतात धरणं बांधण्यासाठी जागा कोणती निवडावी यासाठी कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती. या गोष्टीला त्यांनी विरोध केला इतकंच नाही तर संख्याशास्त्रावर आधारित पद्धतीनं जागा निवडण्यात यावी यासाठी त्यांनी आग्रह धरला.

याच प्रमाणे त्यांनी मुंबई भागात पावसाळ्यात टायफॉइडनं होणाऱ्या मृत्युचा अभ्यास केला. पावसाळ्याआधी तीन आठवडे टॉयफाइड रोखण्यास योग्य पावलं उचलली गेली तर केवळ मुंबईत वर्षाला किमान १००० हून अधिक जीव वाचतील असं त्यांनी आपल्या अभ्यासातून सिद्ध केलं होतं. त्यावेळच्या मुंबई सरकारला त्यांनी शिफारस केली होती की, नाणेघाटसाठी महागडा रोप-वे तयार करण्याऐवजी सर्व ऋतुंमध्ये उपयोगी येईल असा रस्ता बांधण्यात यावा.

कोसंबी यांना 'प्रबोधनकालीन वैविध्य' असलेली व्यक्ती असं म्हटलं जात असे. गणितातील अमूर्त कल्पनांचा वापर त्यांनी सामाजिक शास्त्रांमधल्या वेगवेगळ्या उपशाखांवर करून पाहिलं. चिन्हांकित नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संख्याशास्त्राची पद्धत वापरली. त्यांनी त्या पद्धतीनं १२,००० नाण्यांचं वजन केलं होतं. त्यापैकी ७००० नाणी ही आधुनिक होती.

त्यांनी आधुनिक नाणेशास्त्राचा पाया भारतामध्ये रोवला. कोसंबी यांनी प्राचीन नाण्यांच्या समूहांचा अभ्यास केला आणि त्यावर ते प्रश्न विचारत असत. ही नाणी कुणी काढली? पुराणं, बौद्ध आणि जैन ग्रंथांमध्ये त्यांना अनेक विसंगती आढळून आल्या. एकाच राजासाठी ते विविध नावं वापरत असत. त्यामुळे त्यांनी ठरवलं की, आपण स्वतःच मूळ ग्रंथांचा अभ्यास करायचा. त्यासाठी संस्कृतवर प्रभुत्व मिळवणं आवश्यक होतं. ते म्हणत की, 'मला संस्कृत शिकण्यासाठी फारसे कष्ट करावे लागले नाहीत.' ते संस्कृत, पाली आणि प्राकृत शिकले.

संस्कृतचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळाला होता. ज्या प्रमाणे त्यांनी नाणेशास्त्र आणि साहित्याच्या विश्लेषणाचं महत्त्व पटवून दिलं. त्याचप्रमाणे त्यांना भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी पुरातत्त्व विभागाचं महत्त्व देखील पटलं होतं. त्यांनी या क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिलं. पुणे जिल्ह्यातल्या पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या पाषाणांचा त्यांनी अभ्यास केला. त्याच बरोबर त्यांनी पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या छोट्या दगडांचा संग्रह केला. त्यांच्या निरीक्षणाच्या आधारावर त्यांनी प्राचीन काळातील राहणीमान, दक्षिण आणि मध्य भारतातील प्रागैतिहासिक काळातील संबंध याची निरीक्षण मांडली.

दामोदर धर्मानंद कोसंबी यांचे निधन २९ जून १९६६ रोजी झाले.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

संतचरित्रकार ल. रा. पांगारकर जन्मदिन

************

जन्म - ३१ जुलै १८७२ (चिपळूण)

स्मृती - १० नोव्हेंबर १९४१

प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार व संतचरित्रकार ल.रा. पांगारकर शालेय शिक्षणासाठी चिपळूणहून पुण्यास न्यू इंग्लिश स्कूल मध्ये दाखल झाले. लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांना शाळेत शिकवत असत. त्यांनी मुमुक्षूहे नियतकालिक साप्ताहिक स्वरूपात तेरा वर्षे आणि मासिक स्वरूपात बारा वर्षे चालवले. मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथही त्यांनी लिहिला. १९१० मध्ये त्यांनी तुकाराम चरित्रलिहिले. ह.भ.प. लक्ष्मण रामचंद्र पांगारकरांचे भक्तिमार्ग प्रदीपहे पुस्तक आजही महाराष्ट्रात घरोघरी असते.

ल.रा. पांगारकर उर्फ लक्ष्मण रामचंद्र पांगारकर हे संतचरित्रे लिहिण्यासाठीच जन्माला आले होते असे म्हणतात. हे विधान अतिशयोक्तीचे नाही याची प्रचीती त्यांनी लिहिलेले संत तुकारामांचे चरित्र वाचताना येते. तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिताना त्यांनी अगदी रामेश्वर भटास देखील झुकते माप दिले आहे. ल.रा. पांगारकर यांनी त्यांचा गौरव केलेला आहे. आतां प्राकृत भाषेंत अधिकारसंपन्न शूद्रालाही धर्मरहस्य सांगायला हरकत नाहीं. कारण धर्मरहस्य भगवत्कृपेनें कोणत्याही जातीच्या शुद्धचित्त मनुष्यांत प्रगट होतें. ही गोष्ट सिद्ध करून देण्याला तुकोबाचा छळ होऊन ते त्यांत यशस्वी व्हावयास पाहिजे होते व या छळाचा कस होण्याचा मान रामेश्वरभटास मिळाला!अशा शब्दांत रामेश्वरभट्टांची भलामण केली आहे.

पांगारकरांनी आनंदलहरी-काव्यसंग्रह, चरित्रचंद्र (आत्मचरित्र), तुकाराम चरित्रामृत, नवविद्या भक्ती, पारिजातकाची फुले, भक्तिमार्ग प्रदीप-भक्तिपर वेच्यांचा संग्रह, मराठी भाषेचे स्वरूप, मराठी वाङ्मयाचा इतिहास -खंड १, २ भागांचे संपादन (१९३२), महाराष्ट्रमहोदय, मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन, संत एकनाथांचे चरित्र, ज्ञानेश्वरांचे चरित्र अशी ग्रंथसंपदा सिद्ध केलेली आहे. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव पांगरी (ता.बार्शी, जि.सोलापूर). त्यांचे कॉलेजचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले. १८९९ मध्ये बी.ए.ची पदवी संपादन केली. काही काळ त्यांनी शिक्षकी पेशात घालवले. पुढे १९१६ ते १९२३ या कालखंडात इंदूर संस्थानचे तत्कालीन राजे तुकोजीराव होळकर यांच्याकडे पारमार्थिक शिक्षणाचे धडे देण्यासाठी नोकरी केली. पुढे आयुष्यातील अखेरची बरीच वर्षे त्यांनी नाशिकला काढली.

संतचरित्रे लिहिण्यासाठी आवश्यक असलेली मनोभूमिका पांगारकरांच्या ठायी होती. उत्कट भक्तिभावामुळे ते संतांच्या जीवनाचे व कार्याचे मर्म सहृदयपणे समजून घेऊ शकले. चरित्राची साधने ते परिश्रमपूर्वक जमवत. संतांच्या जीवनातील आणि काव्यातील दोष दाखविणे त्यांना मान्य नव्हते. संतांनी केलेल्या चमत्काराच्या पारंपरिक कथांवर अविश्वास दाखविणे त्यांना योग्य वाटत नसे. श्री ज्ञानेश्वर, तुकाराम व एकनाथ महाराज या संतांची चरित्रे त्यांनी लिहिली. कोणाही सत्पुरुषाचे वर्णन ते नम्रभावाने करीत.

पांगारकरांच्या स्वभावातील अनेक मौजा समकालीन लोकांनी सांगितल्या आहेत. त्यांच्या रसाळ वक्तृत्वाने व अपार पाठांतराने तृप्त झालेले श्रोते महाराष्ट्रात अनेक होते. त्यांचा स्वभाव खर्चिक होता. खाद्यपदार्थां विषयी त्यांना विशेष रुची होती. संशोधक पांगारकर संतवाङमयात इतके रममाण झाले, की त्यातून त्यांचा मूळचा भाबडेपणा वाढला. पुढे तर ते अनेकांच्या गुरूस्थानी झाले. बेसुमार खर्चिक स्वभावामुळे त्यांना पुढे कष्टाचे दिवस आले.

समर्थ रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर यांच्या वाङमयाची गोडी त्यांना विद्यार्थिदशेपासूनच होती. वाचन आणि पाठांतर भरपूर असे. लहान वयातच त्यांना भाषणाची, व्याख्यानाची सवय लागली. श्रोते रंगून जात हे पाहून त्यांना हुरूप चढे. दासनवमी, मोरोपंत पुण्यतिथी, अहिल्यादेवी पुण्यतिथी असली, की पांगारकर रंगून जात. गणेशोत्सव, शिवाजी महाराज उत्सवासाठी त्यांना हमखास व्याख्यानासाठी आमंत्रणे असत. यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र व बृहन्महाराष्ट्र त्यांचा प्रवास झाला होता. संतपुरुषांची स्थाने त्यांनी श्रद्धेने अवलोकिली. तेथील जुन्या वाड्यातील कागदपत्रांची बाडे परिश्रम घेऊन तपासली.

व्याख्याने, प्रवास व अवांतर वाचन यांच्यामुळे बीए होण्यास बराच काळ लागला. तरी पुढे त्याचा फायदाच झाला. पुणे जिल्ह्यातील शिवापूरहून सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोंढाणपूरजवळ पांगारकर एका रात्री थांबले. घरमालकाकडील दप्तर त्यांनी चाळले. तो त्यांना मुक्तेश्वरांची साहित्यसंपदा सापडली. त्यांना अतिशय आनंद झाला. बार्शी जवळील सोनारी येथे त्यांना मुक्तेश्वराच्या आरत्या व पदे यांची प्राप्ती झाली.

१९०१ मध्ये पांगारकरांचा एका पुरोहिताच्या घरी, नाशिकला मुक्काम होता. रात्री त्यांना घरात माळ्यावर जुन्या ग्रंथांचे ढीग दिसले. रात्रभर बसून त्यांनी एक एक पोथी सोडून तिचे वाचन केले. एके दिवशी या कागदपत्रात त्यांना अमृततूल्य ठेवा गवसला. निरंजन माधव या पेशवेकालीन कवीचा पाच हजार कवितांचा संग्रह त्यांना मिळाला. काळाच्या आड गेलेला हा कवी पांगारकरांनी शोधून काढला व चरित्रही मिळवले. त्यांचा संप्रदाय शोधून काढला.

पांगारकरांनी मोरापंतांवर खूप संशोधन केले. पंढरपूरच्या वास्तव्यात पंतांच्या स्वलिखित कविता वाचून काढल्या. पंतांचा फार मोठा पत्रव्यवहार त्यांना पाहायला मिळाला. कोल्हापूर मुक्कामी पंतांच्या हरिश्चंद्राख्यानाची मूळ प्रत त्यांना सापडली. त्यांच्या या व्यासंगाचे व दीर्घ परिश्रमाचे फळ म्हणजे त्यांचा सर्वोत्कृष्ट असा मोरोपंत चरित्र व काव्यविवेचनहा ग्रंथ होय. या ग्रंथाने त्यांना चांगली कीर्ती मिळवून दिली. आजही हे चरित्र आदर्शभूत कविचरित्र म्हणून मानले जाते.

पारमार्थिक वृत्तीच्या लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी संत बोधावर आधारलेले मुमुक्षूनावाचे वर्तमानपत्र त्यांनी १९०७ मध्ये सुरू केले. संतचरित्रे, जुन्या संतकवींची वचने, अध्यात्मरहस्य, धर्मसंस्कृती, तत्त्वज्ञान या विषयावरील सोप्या व रसाळ लेखनामुळे मुमुक्षूअल्पावधीतच प्रसिद्धीला आले. त्यांच्या भक्तिमार्गप्रदीपाच्या तर लाखाच्या वर प्रती त्यांच्या हयातीत खपल्या. आजही भक्तिमार्गप्रदीप हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असावे इतके प्रासादिक आहे.

पांगारकरांचे स्मरण मराठी भाषेच्या व वाङमयाच्या अभ्यासकाला निरंतर राहील ते त्यांच्या मराठी वाङमयाच्या इतिहासाच्या तीन खंडांमुळे. ज्ञानेश्वर- नामदेवांचा पहिला खंड, एकनाथ-तुकारामांचा दुसरा खंड व रामदास स्वामींचा तिसरा खंड लिहून त्यांनी प्राचीन मराठी वाङमयाची फार मोठी सेवा केली आहे.

पांगारकरांच्या चिकित्सक वृत्तीचा परिचय करून घ्यायचा असेल तर त्यांचे मोरापंत चरित्र पाहावे, तुकाराम चरित्र पाहावे. प्राचीन वाङमयाचा विचार करताना पांगारकरांची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येण्यासारखे नाही. त्यांनी प्राचीन मराठी वाङमयाचे अत्यंत आवडीने आणि समरसतेने अध्ययन केले.

मराठी भाषा आणि इतिहास यांचा व्यासंग करून, आपल्या लेखणीचा आणि वाणीचा प्रभावी वापर करून, जनमानसात या विषयांची गोडी निर्माण करण्याचे महान कार्य त्यांनी आमरण केले. त्यांना अनेक चाहते, मित्र लाभले. भगवंतांच्या स्मरणात त्यांनी नेहमीच गोडी मानली. आयुष्यभर ग्रंथरचनेचा हव्यास अडचणी सोसून रसिकतेने केला.

ल. रा. पांगारकर यांचे १० नोव्हेंबर १९४१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/अ.वि. पाठक

************

************

३१ जुलै

अभिनेता मोहन भंडारी जन्मदिन

************

जन्म - ३१ जुलै १९३७

स्मृती - २४ सप्टेंबर २०१५ (मुंबई)

मोहन भंडारी हे टीव्ही मालिका मध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेता. दूरदर्शन वाहिनीवरील खानदानया प्रसिद्ध मालिकेव्यतिरीक्त त्यांनी कर्ज, परंपरा, जीवन मृत्यू, पतझड, गुमराहया मालिका मध्येही काम केले आहे.

आमिरच्या मंगल पांडे- द रायझिंग स्टारया चित्रपटातही ते झळकले होते. ८०च्या दशकात त्यांनी अनेक मालिका मध्ये काम केले होते. मात्र, १९९४ मध्ये ते टीव्ही मालिका पासून दुरावले.

त्यानंतर त्यानी सात फेरेया मालिकेने पुनरागमन केले. त्यांचा मुलगा ध्रुव हा अभिनेता असून त्याने तेरे शहर मेया मालिकेत काम केले आहे.

मोहन भंडारी यांचे २४ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

क्रांतिकारक उधमसिंह स्मृतिदिन

************

जन्म - २६ डिसेंबर १८९९ (पंजाब)

स्मृती - ३१ जुलै १९४० (लंडन)

सरदार उधम सिंग हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एक महान सैनिक आणि क्रांतिकारक होते. लंडन मधील जालियनवाला बाग घटनेदरम्यान त्याने पंजाबचा गव्हर्नर जनरल मायकेल ओ'ड्वायर यांना गोळ्या घातल्या. बर्‍याच इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही हत्या पंजाबवर नियंत्रण राखण्यासाठी पंजाबियांना धमकावण्यामागील ओ'ड्वायर आणि इतर ब्रिटीश अधिकाऱ्यांनी केलेली योजनाबद्ध योजना होती. इतकेच नाही तर जनरल डायर यांच्या पाठिंब्याने ओ'ड्वायर यांनी माघार घेतली नाही.

जालियनवाला बाग हत्याकांडासाठी उधम सिंगने जनरल डायर यांना ठार मारलेल्या समान नावामुळे सामान्य समज आहे, परंतु प्रशासक यांना असा विश्वास आहे की एका गोळ्यामुळे उधम सिंग यांचा मृत्यू झाला, तर गोळीबार करणार्‍या जनरल डायरचा अर्धांगवायू आणि विविध आजारांनी मृत्यू झाला.

उधम सिंगचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी पंजाबच्या संगरूर जिल्ह्यातील सुनम गावात झाला. १९०१ मध्ये उधम सिंगच्या आईचे आणि १९०७ मध्ये वडिलांचे निधन झाले. या घटनेमुळे त्याला आपल्या मोठ्या भावासोबत अमृतसर मधील अनाथाश्रमात आश्रय घ्यावा लागला. उधम सिंग यांचे बालपणीचे नाव शेरसिंह आणि त्याच्या भावाचे नाव मुक्तासिंग होते ज्यांना अनाथाश्रमात अनुक्रमे उधम सिंग आणि साधुसिंह असे नावे मिळाली. इतिहासकार मालती मलिक यांच्या मते, उधमसिंह हे देशातील सर्व धर्माचे प्रतीक होते आणि म्हणूनच त्यांनी आपले नाव राम मोहम्मदसिंग आझाद असे ठेवले जे भारताच्या तीन प्रमुख धर्मांचे प्रतीक आहे.

१९१७ मध्ये उधम सिंग अनाथ आश्रमात राहत होता नि त्याच वेळेस त्याच्या मोठ्या भावाचाही तेव्हा मृत्यू झाला. तो पूर्णपणे अनाथ झाला. १९१९ मध्ये त्यांनी अनाथाश्रम सोडले आणि क्रांतिकारकांसह स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. उधमसिंह अनाथ होते, परंतु असे असूनही तो विचलित झाला नाही आणि त्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी डायरची हत्या करण्याच्या वचनपूर्तीसाठी कार्य केले.

१३ एप्रिल १९१९ रोजी झालेल्या जालियांवाला बाग हत्याकांडातील उधम सिंग हे प्रत्यक्षदर्शी होते. जालियनवाला बागेत ठार झालेल्या लोकांची नेमकी संख्या राजकीय कारणांमुळे कधीच उघडकीस येऊ शकली नाही. या घटनेने वीर उधमसिंह 'तिलमिला' येथे गेला आणि मायकल डायरला धडा शिकवण्या साठी जालियनवाला बाग हातात घेतला.

आपले ध्येय पार पाडण्यासाठी उधमसिंग आफ्रिका, नैरोबी, ब्राझील आणि अमेरिकेच्या विविध नावांनी प्रवास केला. १९३४ मध्ये उधम सिंग लंडनला पोहोचला आणि तेथे ९, एल्डर स्ट्रीट कमर्शियल रोड येथे वास्तव्य केले. तेथे त्याने प्रवासाच्या उद्देशाने एक कार खरेदी केली आणि आपले अभियान पूर्ण करण्यासाठी सहा बुलेटसह एक रिवॉल्व्हर खरेदी केली. मायकेल डायरचा ठावठिकाणा स्थापित करण्यासाठी भारताच्या या वीर क्रांतिकारकाने योग्य वेळी प्रतीक्षा केली.

उधम सिंग यांना १९४० मध्ये शेकडो भावंडांच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी मिळाली. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या २१ वर्षांनंतर १३ मार्च १९४० रोजी रॉयल सेंट्रल एशियन सोसायटीची लंडनमधील कॅक्सटन हॉल येथे बैठक झाली जिथे मायकेल डायर हे देखील भाषक होते. उधम सिंग त्या दिवशीच सभास्थळी पोहोचला. त्याने आपली रिवॉल्व्हर जाड पुस्तकात लपविली. त्यासाठी त्यांनी पुस्तकातील पाने रिवॉल्व्हरच्या आकारात अशा प्रकारे कापली होती की, डायरचे जीवघेणे हत्यार सहज लपू शकेल.

बैठकीनंतर भिंतीच्या मागून उधम सिंगने मायकेल डायरवर गोळीबार केला. मायकल डायरला दोन गोळ्या लागल्या ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. उधम सिंगने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याला अटक केली. त्याच्यावर खटला चालविला गेला.

४ जून १९४० रोजी उधमसिंग हत्येचा दोषी ठरला आणि ३१ जुलै १९४० रोजी त्याला पेंटनविले कारागृहात फाशी देण्यात आली.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : विकिपीडिया

************

************

३१ जुलै

सुधारक नाना शंकरसेठ स्मृतिदिन

************

जन्म - १० फेब्रुवारी १८०३ (मुरबाड)

स्मृती - ३१ जुलै १८६५ (मुंबई)

जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेठ मुरकुटे हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या जडण घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.

जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म सुनार कुटुंबात झाला. पूर्वजांप्रमाणे त्यांनी व्यापार केला व अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक व्यापारी असल्याची ख्याती मिळविली. अनेक अरब, अफगाण तसेच इतर परदेशी व्यापारी आपली भारतातील मालमत्ता बॅंकांकडे न देता शंकरशेटठ यांच्या हवाली करीत.

१० फेब्रुवारी १८०३ रोजी नाना शंकर शेठ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी व्यापारामध्ये मोठी संपत्ती मिळवलेली होती, त्यामुळे नानांचा बालपण हे अतिशय संपन्नते मध्ये गेलं. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले. या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारा साठी व्हावी या हेतूने त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे

त्यांनी स्वतः मिळवलेल्या अमाप संपत्तीपैकी मोठा हिस्सा दान केला, तसेच सार्वजनिक कामांकरीता खर्च करून टाकला. एक थोर समाजसेवक, शिक्षणप्रेमी व आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक. त्यांचे पूर्ण नाव जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, तथापि ते नाना शंकरशेठ या नावानेच अधिक परिचित आहेत.

त्यांचा जन्म एका दैवज्ञ ब्राह्मण व्यापारी कुटुंबात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड गावी झाला. त्यांचे वडील व्यापारासाठी मुंबईस आले. म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना अमाप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली.

नानांचे वडील १८२२ मध्ये वारले व तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. नाना शंकरशेठ यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला. त्यांच्यावर सर जमशेटजी जिजीभाईंची छाप पडली होती.

हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स.का.छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.

एल्‌फिन्स्टन नंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले. बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले.

स्टुडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (१८४५) आणि जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा (१८४८) या त्यांनी स्वतःच्या वाड्यात चालू केल्या. १८५७ मध्ये, द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल सुरू केले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली व तेही पुढे मराठीतून देण्याची व्यवस्था केली. अ‍ॅग्रि-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्रॅफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख व अध्यक्ष नाना शंकरशेठ होते. या शैक्षणिक कामाशिवाय त्यांनी १८५२ मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.

नानांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. महानगर पालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.

बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. तसेच नानांनी अनेक मान्यवर संस्थांना देणग्या सुद्धा दिल्या.

देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या सार्‍या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने २५,००० रु जमविले होते. १८५७ मध्ये आलेले किटाळ पूर्णतः दूर होऊन त्यांचे कार्य अधिकच चमकले. नानांचे वयाच्या ६२व्या वर्षी मुंबईत देहावसान झाले.

नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणार्‍या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.

नानांना 'मुंबईचा अनभिषिक्त सम्राट' किंवा 'मुंबईचे शिल्पकार' असे हि म्हणतात.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : विकिपीडिया

************

************

३१ जुलै

डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांचा वाढदिवस

************

जन्म - ३१ जुलै १९३५ (गडहिंग्लज)

सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचवले अशा डॉ.शांताराम बळवंत मुजूमदार यांचा आज वाढदिवस.

पुण्यात भारतीय आणि विदेशी विद्यार्थ्यांना एकत्र आणून शिक्षणाच्या माध्यमातून सांसाकृतिक मिलाफ घडवून आणण्याचे काम केले ते डॉ. शांताराम बळवंत मुजूमदार यांनी. सिम्बायोसिस संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात त्यांचे शैक्षणिक कार्य पोहोचले. डॉ. एस.बी. मुजूमदार यांचे पूर्ण नाव शांताराम बळवंत मुजूमदार. त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते.

गडहिंग्लज मध्ये त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी कोल्हापूर आणि पुण्यातून पूर्ण केले. पुण्यात शिक्षण पूर्ण करत त्यांनी बॉटनी मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर मायक्रोबायोलॉजीनमध्ये त्यांनी पुणे विद्यापीठातून पी.एचडी मिळवली. डॉ. एस.बी. मुजूमदार हे फर्ग्युसन महाविद्यालयात बॉटनीचे विभागप्रमुख होते. सुमारे २० वर्षे ते या पदावर होते. त्यांचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे ५० च्या वर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी जीव शास्त्रावर आधारित काही पुस्तकेही लिहिली आहेत. पण निवृत्तीला १६ वर्षे बाकी असतानाच त्यांनी सिम्बायोसिस संस्था वाढवण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.

डॉ.मुजूमदार यांनी त्यांचा बंगला विकून आणि पेन्शनच्या पैशाचा उपयोग करून पैसा गोळा केला. गरीब विद्यार्थ्यांना वाजवी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतून शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय डॉ.मुजूमदार यांनी घेतला.

मैलाचा दगड ठरलेल्या सिम्बायोसिसचा प्रवास १९७१ मध्ये सुरू झाला होता. विशेष म्हणजे यामागची कथाही अत्यंत रंजक अशी आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. एस.बी. मुजुमदार यांनीच हा किस्सा सांगितला आहे. सिम्बायोसिसच्या वेबसाईटवरही त्यांनी हा किस्सा सांगितला आहे.

मुजूमदार सांगतात, एकदा मी घराच्या खिडकीत उभा राहून हॉस्टेलकडे पाहत होतो. मी त्यावेळी हॉस्टेलचा प्रमुख होतो. त्यावेळी मला एक विचित्र घटना दिसली. एक मुलगी हॉस्टेल मध्ये एका मुलाच्या खोलीकडे जाताना दिसली. तिने त्या मुलाच्या हातात पटकन काहीतरी दिले आणि लगेचच निघून गेली. मी अनेक दिवस हा प्रकार पाहत होतो. रोज तसेच घडत होते. त्या दोघांमध्ये अफेयर सारखं काहीतरी भलतंच असल्याचा संशय माझ्या मनात आला. त्यामुळे मी एक दिवस पाहायला गेलो. त्या मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा आतील दृश्य पाहून मी स्तब्ध झालो. आत मॉरीशसचा एक विद्यार्थी बेडवर पडलेला होता. त्याचा चेहरा सुकलेला होता, डोळे खोल गेलेले होते. तो फारच अशक्त दिसत होता. मला काहीही कळत नव्हते. मी त्या मुलाला जेव्हा विचारले, तेव्हा त्याने सांगितले, सर मला कावीळ झालेला आहे. त्यामुळे प्रचंड अशक्तपणा आला होता. मला चालताच काय उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे माझ्या ओळखीची ही मुलगी मला जेवण आणून देते. मुलांच्या हॉस्टेल मध्ये मुलींना प्रवेश नसल्याने ती मला डबा देऊन लगेच निघून जायची. हे सर्व ऐकूण मी स्तब्ध झालो. कारण मला संशय आला तसा काहीही प्रकार (अफेयरचा) नव्हता. मला खूप वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय शोधायला हवे असे मला प्रकर्षाने जाणवले. हीच ती वेळ होती. सिम्बायोसिसचा जन्म झाला होता.

डॉ.एस.बी. मुजूमदार यांना त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने २००५ मध्ये पद्मश्री तर २०१२ मध्ये पद्मभूषण या नागरी पुरस्कारांनी गौरवले. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा पुण्यभूषण आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कारही त्यांना देण्यात आला.

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

************

************

३१ जुलै

जादूगार पी. सी. सरकार ज्युनियर यांचा वाढदिवस

************

जन्म - ३१ जुलै १९४६ (कोलकत्ता)

प्रख्यात भारतीय जादूगार पी. सी. सरकार ज्युनियर यांचा आज वाढदिवस.

पी. सी. सरकार हे कुटुंब गेल्या नऊ पिढ्या पूर्णवेळ जादूवर उपजीविका करतं. पी. सी. सरकार ज्युनियर हे उच्चविद्याभूषित आहेत. त्यांनी मानसशास्त्र, विज्ञान या विषयांत पदव्या मिळवल्या आहेत. एवढंच नव्हे, पीएच.डी. केली आहे. इंद्रजाल और उसका मायाजाल या खेळाने प्रसिद्ध असलेले  प्रदीपचंद्र सरकार आज पंच्याहतरीत आहेत. तरीही त्यांच्या वावरण्यातली लगबग, बोलण्यातली मिष्किलता तशीच आहे. त्यांची संवादाची ढब ही पहिल्यासारखी बरीचशी नाटकी आहे. 

पी. सी. सरकार ज्युनियर यांचे वडिल प्रतुलचंद्र अर्थात पहिले सरकार हे मोठे जादूगार होते. त्यांना भारत सरकारने पद्मश्री सन्मानाने गौरवलं होते. जपानच्या दौऱ्यात ते जादूचे प्रयोग करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि प्रयोग संपताच त्यांनी प्राण सोडले. त्यानंतरच्या खेळात खंड पडू न देता त्यांच्या जागी पी.सी. सरकार ज्युनियर उभे राहिले. व आपली कला लोकांच्या पुढे सादर करत राहिले.

पी. सी. सरकार ज्युनियर यांनी भारतात तसेच परदेशात जादूचे प्रयोग सादर केले आहेत. बंगाल का जादूया विशेषणाने सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगभरात मॅजिक ऑफ इंडियाया नावाने प्रसिद्ध आहे. त्यांना 'मर्लिन अवॉर्ड' मिळाला आहे.

मनेका सरकार या पी.सी. सरकार ज्युनियर यांच्या कन्या आहेत. हे कुटुंब गेल्या नऊ पिढ्या पूर्णवेळ जादूवर उपजीविका करतं. मनेका सरकार ही नववी पिढी. आतापर्यंत सरकार कुटुंबात पुरुष मंडळीच जादूचे प्रयोग करीत. पण मनेका सरकार या अमेरिकेतून एमबीएची पदवी घेऊन आलेल्या आपल्या वडिलांचा, आजोबांचा, पणजोबांचा व्यवसाय पुढे नेत आहेत आणि पूर्णवेळ हा जादूचा व्यवसाय करत आहेत.

पी.सी. सरकार ज्युनियर यांना तीन मुली असल्यामुळे त्यांचा वारसदार म्हणून नवा पी.सी. सरकार कोण म्हणून प्रश्न होता पण मनेका सरकार त्यांच्याच प्रयोगात सफाईने उभ्या राहिल्या आहेत. आपले पिता पी.सी. सरकार ज्युनियर यांच्या बरोबर त्या जादूचे प्रयोग सादर करत असतात. त्यांच्या इतर दोन कन्या मोउबानी व मुमताज या पण काही प्रमाणात जादू शिकल्या असून त्यांना थिएटर व नृत्याची आवड आहे. पीसी सरकार ज्युनियर व मनेका सरकार आपलं इंद्रजाल बालबच्च्यांपासून त्यांच्या आई-वडिल आणि आाजोबा आज्यांपर्यंत सर्वांवर पसरून त्यांना चकित करून सोडतात.

पीसी सरकार ज्युनियर यांच्या पत्नी जयश्री सरकार या त्यांच्या शो मध्ये कोरियोग्राफी करतात. पीसी सरकार हे राजेशाही ड्रेस वापरात असतात. हा राजासारखा ड्रेस जादूगारांनी घालण्याची परंपरा केव्हा सुरू झाली? त्यावर मनेका सरकार यांनी जे उत्तर दिले ते मोठे रंजक आहे.

जोधपूरचे राजपुत्र हरबंत सिंग हे तिच्या आजोबांचे म्हणजे पी.सी. सरकार सीनियर यांचे खास मित्र होते. राजपुत्र हरबंत सिंग हे कलासक्त होते. अतिशय देखणे, उंचपुरे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना कला, चित्रकला, संगीत अशा विविध गोष्टींमध्ये रस होता. त्यांना जादूचे प्रयोग करण्याची विशेष आवड होती. लंडनला गेले की, ते राजपुत्र तिकडून जादूच्या प्रयोगांचे विविध साहित्य घेऊन येत व ते शिकवण्यासाठी ते पी.सी. सरकार सीनियर यांना बोलावत. त्यातून दोघांची मैत्री झाली. एक दिवस राजपुत्र हरबंत सिंग यांनी फक्त आपल्या राजघराण्यातीलच लोकांना जादूचे प्रयोग दाखविण्याचे ठरविले. सहकारी म्हणून त्यांनी पी.सी. सरकार सीनियर यांना बोलावले होते. पण राजपुत्र हरबंत सिंग यांनी फक्त पंधरा-वीस मिनिटेच जादूचे प्रयोग दाखवले.

पुढचे प्रयोग पी.सी. सरकार सीनियर यांनी दाखवावेत असे राजपुत्र हरबंत सिंग यांनी सांगितले. पण शर्ट-पॅण्ट या साध्या कपड्यातील पी.सी. सरकार सीनियर यांना स्वीकारायला राजघराण्यातील लोक तयार होईनात. म्हणून हरबंत सिंग यांनी पी.सी. सरकार सीनियर यांना एका रूममध्ये नेऊन आपला राजाचा ड्रेस दिला. राजेशाही पगडी दिली आणि त्या राजेशाही वेशात पी.सी. सरकार सीनियर यांनी जोधपूर राजघराण्यातील व्यक्तींना जादूचे प्रयोग दाखवून थक्क केले.

पी.सी. सरकार यांच्या शाही पगडीवर जो तुरा दिसतो, तो जोधपूर राजघराण्याने दिलेला आहे. तो त्यांच्या पुढच्या पिढीने आजही जपून ठेवला आहे. त्याच वेळी पी.सी. सरकार यांचे व्यंगचित्रकार मित्र कुका त्यांना भेटले व म्हणाले, ‘‘तुम्ही महाराजांच्या वेशात जादूचे प्रयोग चालू केलेत त्यावेळी मी चित्रकार असल्यामुळे मीही एक जादूचे प्रयोग झाल्यावर प्रेक्षकांना लवून दाद देणारा तुमच्यासारखा महाराजा रेखाटला आहे, तुमच्यासारखाच मिशीवाला!’’ हाच तो एअर इंडियाचा जगप्रसिद्ध महाराजा.

मनेका सरकारने आणखी एक रंजक गोष्ट सांगितली. मनेका सरकारच्या आजोबांचे प्रयोग जपानला खूप गाजले. त्यांना जपानला जाण्याची प्रेरणा सुभाषचंद्र बोस यांनी दिली. फक्त एवढेच सांगितले की, जपानच्या दौऱ्यातला फायद्याचा काही हिस्सा रासबिहारी बोस यांना देशसेवेसाठी द्या.

[12:24 pm, 31/07/2021] R. M. Doifode 53 Jio: ************

[12:24 pm, 31/07/2021] R. M. Doifode 53 Jio:

     यशवंत - एक प्रेरणास्रोत  

( सहावे पर्व : भाग - १४९/१५०)

💫  गेनाभाई दर्गाभाई पटेल  💫

एक सामान्य 'शेतकरी ते पद्मश्री' असा प्रवास असणाऱ्या एका अपंग शेतकऱ्याचा प्रेरणादायी प्रवास आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग !

गुजरात मधील बनासकाठा जिल्ह्यातील सरकारी गोलिया गावात एका गरीब अडाणी शेतकरी कुटुंबात गेनाचा जन्म झाला. सर्व भावंडात सर्वात लहान असलेला गेना जन्मतः पोलिओ सारख्या असाध्य व्याधीने ग्रासला होता. त्याचे दोन्ही पाय लुळे पडले होते. त्यामुळे त्याला तीनचाकी सायकलीचा आधार घ्यावा लागला.

घरची परिस्थिती बेताची, शिवाय वडील अशिक्षित असल्याने, त्यांनी गेना व्यतिरिक्त इतर मुलांना शिकवण्या ऐवजी शेतीतच मदतीला घेतले.

गेनाची शेतीच्या कामी कोणतीच मदत होणार नसल्यामुळे, त्याला एका हॉस्टेल मध्ये शिक्षणासाठी पाठवले. परंतु, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी न पाठविता, गावी परत आणले.

आपण शेतात कोणतीही मदत करू शकणार नाही. याची जाणीव होती. तरीही गेना कुटुंबिया सोबत दररोज शेतात जायचा व थोडीफार मदत करायचा.

काही दिवसानंतर आपण ट्रॅक्टर चालवण्याचे काम करू शकतो. असा विश्‍वास त्यांच्या मनी निर्माण झाला. तो ट्रॅक्टर शिकला. क्लच आणि ब्रेक हाताने नियंत्रित करण्याचे तंत्र तो शिकला.

कालांतराने शेतातील काही त्रुटी त्याच्या लक्षात येऊ लागल्या. वडील पारंपरिक पद्धतीने शेती करतात. वर्षभर शेतात राबतात. पण, तुटपुंजे उत्पन्न मिळते. याची त्यांना जाणीव झाली.

"आपण अपंग आहोत. त्यामुळे एकदा लावले की, दीर्घकाळ त्याचे उत्पादन घेता येईल. असे पीक शोधले पाहिजे." याची त्याला जाणीव झाली.

त्याची शोधा-शोध सुरू झाली. अभ्यास सुरू झाला. दौरे सुरू झाले. शेवटी तो महाराष्ट्रात आला. दोन्ही कडील हवामानाची सांगड घातली आणि डाळिंब पिकाची निवड केली.

हे सारे करत असताना कित्येक लोकांनी त्याला वेड्यात काढले. या जिल्ह्यात आजवर असे धाडस कोणी केले नाही. असेही कित्येकांनी सुनावले. पण, स्वतःवर विश्वास असणारी माणसं कुठल्याही परिस्थितीत हार मानत नाहीत. गेना त्यांपैकीच एक होता.

त्याने मनाचेच काय करायचे ते ठरविले. त्याने डाळिंब लागवड केली. बाग फुलविली. त्यातून भरघोस उत्पन्न घेतले. जी लोकं त्याच्यावर हसत होती, त्याला वेडा ठरवीत होती, तिचं लोकं डाळिंब लागवड करण्याबाबत त्याचे मार्गदर्शन मागू लागले.

त्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे उत्पन्न वाढविले. त्यामुळेच तो परिसरात 'अनार दादा' म्हणून प्रसिद्ध झाला. तो "अनार दादा" म्हणजेच "गेनाभाई दर्गाभाई पटेल" होय.

स्वतः अपंग असून शेतीत सुधारणा करण्यावर गेनाभाई यांनी भर दिला. अशा वेळी खूप त्रास झाला, लोकांकडून खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले. पण, तरीही त्यांनी आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. अत्यंत धाडसाने, जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी आपले स्वप्नं सत्यात आणले.

मंजिलें उन्ही को मिलती है

जिनके सपनों में जान होती है।

पंखो से कुछ नहीं होता 

हौसलों से उडान होती है।

या ओळी गेनाभाई यांच्या आजवरच्या प्रवासाला चपखल बसणाऱ्या आहेत. 

गेनाभाई यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत. 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.

श्री. संदीप पाटील, दुधगाव

9096320023

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

!! 31 जुलै  दिनविशेष ॥

             🔥 शनिवार 🔥

🌎🌎 घडामोडी🌎🌎

👉 2012 - मायकेल फेल्प्स यांनी ऑलिम्पिक मध्ये जिकलेल्या सर्वाधिक पदक जिकण्याचा विक्रम मोडला

👉 2001 - दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांना राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार प्रदान

         🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जन्म

👉 1965 - हॅरी पाॅटर च्या लेखिका जे.के.रोलिंग

👉 1947 - हिंदी चिञपट अभिनेञी मुमताज यांचा जन्म

 🎇 मृत्यू

👉 2014 - भारतीय पञकार आणि लेखक नबरूण भट्टाचार्य

👉 1980 - पार्श्र्वगायक मोहम्मद रफी यांचे निधन

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

No comments:

Post a Comment