#आजचे ऐतिहासिक दिनविशेष=#३१जुलै१६५७ रघुनाथपंत दंडा-राजपुरी मोहिमेवर रवाना!


 

#आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३१जुलै१६५७

रघुनाथपंत दंडा-राजपुरी मोहिमेवर रवाना!

दंडा-राजपुरीचा किल्ला हा अरबी समुद्रकिनार्यावर आहे.

किनार्यालगतच दंडा व राजपुरी अशी दोन गावे आहेत, या किल्ल्याच्या जवळच खाडीमधे एका बेटावर जंजिरा किल्ला आहे, तो किल्ला वर्षानुवर्षे सिद्दीच्या ताब्यात होता व तो स्वराज्याला उपद्रव देत होता तसेच, स्वराज्याच्या रक्षणासाठी समुद्रावरही सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक होते म्हणुन मग १६५७ मधे ऐन पावसाळ्यात शिवाजीराजांनी सिद्दीनवर मोहिम काढली व त्याप्रमाणे रघुनाथ बल्लाळ सबनीस यांना नियुक्त केले.

रघुनाथराव दंडा राजपुरीवर चालुन गेले ती

तिथी होती शके १५७९, श्रावण शुद्ध १, शुक्रवार दि. ३१ जुलै १६५७.

रघुनाथपंतांनी तळे-घोसाळे काबीज करून नंतर दंडा राजपुरीचा किल्ला सिद्द्याकडुन जिंकला

व नंतर जंजिरा घेण्याचाही प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही.

ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र

हे तत्व शिवाजीराजांनी चांगलेच ओळखले होते, स्वराज्याचा विस्तार हा झपाट्याने होत होता. जंजिरा मोहिम आता निघणार हे निश्चित होते. राजांनी ही मोहिम रघुनाथपंत बल्लाळ यांच्यावर सोपवली, पंतानी दंडा-राजपुरी काबीज केली,

पंतानी लगेच जंजीऱ्यास मोर्चे लावले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३१जुलै१६५७

मुघलांनी विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात असलेला "कल्याणी किल्ला" जिंकून घेतला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३१जुलै१६७७

"दक्षिण दिग्विजय मोहीम"

छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेतील "तुंदुमगुती"ला आले, तिथून त्यांनी "वृद्धाचलम"ला शिवशंकराचे दर्शन घेतले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३१जुलै१६८१

औरंगजेबाने अजमिरहून आजमशहास शहजादा अकबर याच्यावर रवाना केले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३१जुलै१६८३

मराठयांनी युद्धाची तयारी करून दि.३१ जुलै इ.स.१६८३ रोजी मराठयांनी चेउलवर जोराचा हल्ला केला व त्यास वेढा घातला काही महिने निकाराचा लढा झाला. पण मराठ्यांना ते जिंकून घेण्यात यश आले नाही.

चौलचा वेढा उठवण्यास मराठ्यांस भाग पाडण्यासाठी गोव्याचा व्हाइसरॉय कोंदी द ऑलव्होर याने १७ ऑक्टोबर रोजी फोंडयावर स्वारी केली.

पोर्तुगीज हल्ल्याची तयारी करत असताना त्यावेळेस छत्रपती शंभुराजे तातडीने राजापूर वरून फोंडयास आले

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

No comments:

Post a Comment