१ ऑगस्ट - दिनविशेष=आज चे दिन विशेष

 


 १ ऑगस्ट - दिनविशेष

📍आजची माहिती

 

📕हिमोग्लोबीन म्हणजे काय ?📕

***********

हिमोग्लोवीन म्हणजे जापल्या शरीराचा प्राणच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिमोग्लोबीन रक्तातील लाल पेशींमध्ये असते. हिमोग्लोबीन हे हिम व ग्लोबीन या दोन घटकांचे बनलेले असते. ग्लोबीन हे एक प्रथिन असून हिंम या रंगद्रव्यात पॉफयरीन असते. पॉफयरीनमध्ये लोह असते व चार पायरॉल रचना असतात. हिमोग्लोबीनच्या या विशिष्ट रचनेमुळे ते ऑक्सिजन वा कार्बनडायऑक्साइडशी संयोग पावते अनुक्रमे ऑक्सी व कार्बोक्सी हिमोग्लोबीन तयार होतात. या त्याच्या गुणधर्मामुळेच शरीराला ऑक्सिजन पुरविणे व शरीरात तयार झालेला कार्बन डाय ऑक्साइड फुफ्फुसापर्यंत पोहोचविणे, हे कार्य ते करू शकते. हिमोग्लोबीन लाल असते व त्यामुळे रक्ताला लाल रंग असतो.

     फुप्फुसामध्ये कार्बोक्सी हिमोग्लोबीनमधून कर्ववायू सोडला जातो ऑक्सिजनशी हिमोग्लोबीनचा संयोग होऊन ऑक्सी हिमोग्लोबीन तयार होते त्याद्वारे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हिमोग्लोबीनच्या निर्मितीसाठी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह यांची आवश्यकता असते. हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होण्यास रक्तक्षय असे म्हणतात. प्रौढ माणसाच्या रक्तात दर १०० मिलीला १३ ते १५ ग्रॅम इतके हिमोग्लोबीन असते हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढण्यासाठी समतोल आहार, हिरव्या पालेभाज्या यांचे खूप महत्त्व आहे. गरज पडल्यास लोहाच्या गोळ्या देऊन वा औषध देऊन वा क्वचित प्रसंगी व्यक्तीस रक्त देऊन हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविता येते. माणूस गुदमरल्यास वा श्वसनास ऑक्सिजन न मिळाल्यास रक्तातील कार्बोक्सी हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते. माणूस निळसर दिसतो. त्याला श्वास घेता येत नाही, दम लागतो व मृत्यूही ओढवतो. असे हे हिमोग्लोबीन आहे की नाही आपला जीव की प्राण?

 

~ दिपक तरवडे ~

~~~~~~

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~

डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

📍वेगळी माहिती

 

📘गुगलचे आधीचे नाव माहित आहे का ?📘

**************

🔍आपल्याला इंटरनेटवर काहीही शोधायचे असेल तर गुगल हे पाहिलं सर्च इंजिन आपल्या डोळ्यासमोर येतं याचंच आधीच नाव काय आहे? गुगल हे नाव कसं दिलं? बघुयात...

 

१९९८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गुगलचे आधीचे नाव होते बॅकरब अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन या संशोधकांनी गुगलची निर्मिती केली. ४ सप्टेंबर रोजी टायटॅनिक जहाजाचे ७३ सालापूर्वीचे फोटो सापडल्यामुळे गुगल पहिल्यांदा जगासमोर आले होते शोधण्यात आलेली वेबसाईट किती महत्वाची आहे हे जाणून घेण्यासाठी ते बॅक लिंक्स पद्धतीबरोबरच त्या साईटशी संबंधित इतर साईट्सचा वापर करत असत त्यामुळे त्याचे नाव बॅकरब असे ठेवण्यात आले बॅकरब हे जोपर्यंत कमी ब्रॅण्डविड्थ वापरत होते तोपर्यंत ते स्टॅण्डफर्डचाच सर्व्हर वापरत होते.

 

१९९७ मध्ये बॅकरब हे नाव तितकेसे चांगले नसल्याचे लक्षात आले. मग आहे ते नाव बदलून काय ठेवायचे यावर बऱ्याच चर्चा झाल्या विचारही करण्यात आला. मग गणितातील एका संकल्पनेवरुन हे नाव ठेवण्यात आले. googol याचा अर्थ एकावर १०० शून्य असा होतो. म्हणजेच एक गोष्ट शोधल्यावर १०० गोष्टी सापडतील असे मग याचेच पुढे Google झाले.

~~~~~~~~

राजेश काटवटे याच्या पोस्ट वरून

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~

सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून

📍आजची माहिती

 

 📕कार्बनचक्र म्हणजे काय ?📕

***********

पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही

🎧 आज 🎧

 

१ ऑगस्ट १७७४

 

📒ऑक्सिजन वायूचा शोध 📒

*********

जोसेफ प्रिस्टले आणि कार्ल विल्हेल्म यांनी १ ऑगस्ट १७७४ रोजी ऑक्सिजनचा शोध लावला.

 

ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे हे रासायनिक घटक आहे प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. पोलिश अल्केमिस्ट, दार्शनिक आणि चिकित्सक मायकेल सेंडिविगियस यांनी त्यांच्या कार्यामध्ये डी लॅपाइड फिलॉसॉफोरम ट्रॅक्टॅटस डुओडेसीम ई नट्युरे फोंट आणि मॅन्युअली अनुभवी डेम्रोटी (१६०४) यांनी हवेमध्ये असलेल्या पदार्थाचे वर्णन केले आहे. याचा अर्थ 'सिबस विटा' (जीवनाचे अन्न म्हणून संदर्भित आहे) आणि हे पदार्थ ऑक्सिजन सारखेच आहे.

     सेंडिविजिअस, १५९८ आणि १६०४ च्या दरम्यान केलेल्या प्रयोगांदरम्यान, पोटॅशियम नायट्रेटच्या थर्मल डिमपॉझिशनने प्रकाशीत केलेल्या वायू उपकरणाचे हे पदार्थ योग्यरित्या ओळखले गेले. बगजच्या दृश्यात, ऑक्सिजनचे पृथक्करण आणि जीवनासाठी हवेच्या त्या भागाच्या पदार्थाचा उचित संघटना, सेंडिविजिअसद्वारे ऑक्सिजनच्या शोधास पुरेसा वजन देतो. सेंडिविजिअसची हे शोध वारंवार नाकारण्यात आले. शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञांच्या पिढीने ती नाकारली. स्वीडिश फार्मासिस्ट कार्ल विल्हेम शेले यांनी ऑक्सिजनचा प्रथम शोध लावला होता. त्यांनी १७७१ -२ रिक ऑक्साईड आणि विविध नाइट्रेट्स गरम करून ऑक्सिजन वायू तयार केला होता. शेले गॅस हे "अग्नि हवा" म्हणतात कारण तो दहन समर्थन करण्यासाठी फक्त ज्ञात एजंट म्हणून कार्य करतो. त्यांनी या शोधाचा एक लेख लिखित स्वरुपात लिहिला आहे. त्या लेखात ट्रिटिझ ऑन एयर ॲंड फायर नावाचा एक हस्तलिखित आहे, जे त्यांनी १७७५ मध्ये आपल्या प्रकाशकांना पाठवले. ते कागदपत्र १७७७ मध्ये प्रकाशित झाले

     दरम्यान १ ऑगस्ट १७७४ रोजी ब्रिटीश पाळक जोसेफ प्रिस्टली यांनी केलेल्या प्रयोगाने काचेच्या नळ्यामध्ये असलेल्या मर्क्युरिक ऑक्साईड (एचजीओ) वर सूर्यप्रकाश केंद्रित केला ज्याने "डिफ्लिस्टिस्टिकेटेड एअर" नावाचा गॅस सोडला. त्याने नोंद केले की गॅसमध्ये मेणबत्त्या अधिक उजळतात आणि की उंदीर अधिक सक्रिय होतो श्वास घेताना तो जास्त काळ जगला स्वतः गॅस श्वास घेतल्यानंतर प्रीस्टली यांनी लिहिले "माझ्या फुफ्फुसांना याची भावना सामान्य वायुपेक्षा वेगळी नव्हती, परंतु मला वाटले की माझ्या छातीत अस्खलितपणे प्रकाश आणि नंतर काही काळ सहज वाटले." प्रिस्टलीने १७७५ मध्ये "ऍन ऍट्वेट ऑफ फॉर डिस्कव्हरी इन इन एयर" नावाच्या पेपरमध्ये त्याचे निष्कर्ष प्रकाशित केले. या पुस्तकाचे प्रयोग त्यांच्या पुस्तकाच्या दुसऱ्या व्हॉल्यूम मध्ये एक्सपर्टिम्स ॲंड ऑब्जर्व्हेशन्स ऑन डिफरन्स किंड्स ऑफ एअर असे करण्यात आले. त्याने आपले संशोधन प्रथम प्रकाशित केले असल्याने, प्रिस्टलीला नेहमीच प्राधान्य दिले जाते.

 

दिपक तरवडे

~~~~~~

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~

सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान व दिनविशेष मधून

आज १ ऑगस्ट

आज बॉलिवूड अभिनेत्री #इरा_दुबे चा वाढदिवस.

जन्म.१ ऑगस्ट १९८४ नवी दिल्ली येथे.

इरा दुबे ही प्रसिद्ध अभिनेत्री लिलेट दुबे व टाटा समूहाचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष रवी दुबे यांची मुलगी आहे. इरा वयाच्या ६ व्या वर्षापासूनच स्टेज शो आणि थिएटर करत आहे. त्याच्या कारकिर्दीत, तिने किमान दहा प्रॉडक्शन हाऊस साठी काम केले आहे. यात नाईट ड्रीम आणि मिडसमर देखील समाविष्ट आहे. इरा दुबेने आपल्या करीयरची सुरुवात 'द प्रेजिडेंट इज कमिंग' या चित्रपटात सहायक अभिनेत्री पासून केली. सहायक अभिनेत्री म्हणून तिने अनेक चित्रपटात कामे केली आहेत.२००५ मध्ये तिने 'मेरीगोल्ड' चित्रपटातही काम केले. यानंतर, ती 'आयशा' आणि 'एम क्रीम' मध्ये देखील दिसली होती.  तिला हिंदी चित्रपट सृष्टीत ओळख 'आयशा' चित्रपटाने दिली. तिने अनेक टेलीव्हीजन शोज होस्ट केले आहेत. मुख्य अभिनेत्री म्हणून ती 'ये जहाँ' 'दिल्लीवाली जालिम गर्लफ्रेंड' या चित्रपटात दिसली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स-ऑफिस पर आपली कमाल दाखवू शकले नाहीत.

#MeToo चळवळी दरम्यान इराने प्रसिद्ध लेखक चेतन भगतवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. इरा सोशल मीडियावर खूप अॅ क्टिव्ह आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज चित्रपट व टेलीव्हीजन अभिनेत्री #मृणाल_ठाकुर चा वाढदिवस.

जन्म.१ ऑगस्ट १९९२

मुळची नागपूरची असलेल्या मृणाल मृणाल ठाकूरने 'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मृणालने 'लव्ह सोनिया' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर मृणालने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिवसेंदिवस तिच्या करिअरचा आणि यशाचा आलेख उंचावतानाच दिसला. मृणालने पुढे रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी चित्रपटातही काम केले आहे. सुपर 30, जर्सी आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.

मृणाल ठाकूर यांचा बहुचर्चित चित्रपट 'तूफान' अमेझॉन प्राईम द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात मृणाल ठाकुर बरोबर फरहान अख्तर, परेश रावल आणि सुप्रिया पाठक हे कलाकार आहेत. मृणालने या चित्रपटात डॉक्टर अनन्या हे पात्र साकारले आहे. मृणाल येत्या काळात 'जर्सी', 'पिप्पा', 'आंख मिचौली' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज मराठी नाट्यसृष्टीतील सुवर्णक्षण असलेल्या गंधर्व युगाच्या साक्षीदार आणि बालगंधर्वांच्या कन्या #पद्माताई_खेडेकर यांचा स्मृतिदिन.

जन्म.

बालगंधर्व यांच्या धाकट्या कन्या असलेल्या पद्माताई खेडेकर यांना नाट्य आणि गायनाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते. वाचन आणि संगीताची त्यांना प्रचंड आवड होती. मात्र वडील बालगंधर्व त्या वेळी स्वत:च्या मालकीच्या 'गंधर्व नाटक मंडळी' या नाटक कंपनीत काम करत होते. त्यासाठी ते घरापासून सतत दूर असत. त्यामुळे पद्माताईंची संगीत शिकण्याची आवड अपुरीच राहिली.

पद्माताई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. वयाच्या सतराव्या वर्षी पद्माताईंचा मास्टर दुर्गाराम खेडेकर यांच्याशी विवाह झाला. दुर्गारामही बालगंधर्वांच्या नाटक कंपनीत स्त्री भूमिका आणि संगीतकार म्हणून काम करत. पद्माताई खेडेकर यांनी हरिभाऊ देशपांडे यांच्याकडून पेटीवादनाचे धडे घेतले होते. काही नाटकांमध्ये त्यांनी छोट्या भूमिकाही केल्या होत्या. प्रचंड कर्जामुळे बालगंधर्व नाटक कंपनी बंद पडली. त्याचा धक्का बालगंधर्व आणि खेडेकरांनाही बसला. त्यामुळे त्यांच्या पतीने इतरत्र नाटकात काम करण्यास सुरुवात केली. पद्माताईंना संगीताची आवड असूनही त्याचे शिक्षण घेता आले नाही. मात्र संगीत नाटके पाहून आणि ऐकून त्यांची संगीताची जाण वाढली. पतीच्या निधनानंतर त्यांनी भजनाचे सुरू केलेले वर्ग शेवट पर्यंत सुरू होते. पद्माताई खेडेकर यांचे १ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज बॉलिवूड अभिनेत्री #सुरवीन_चावला चा वाढदिवस.

जन्म.१ ऑगस्ट १९८४

 'सेक्रेड गेम्स' सारख्या प्रसिद्ध वेबसीरीजचा भाग असलेली अभिनेत्री सुरवीन चावला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा बॉलिवूडचे ग्लॅमरस जग खूपच कुरूप असल्याचं सिद्ध झाल्यानं सुरीनने तिच्या कास्टिंग काउचबद्दलच्या अशा अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिने कास्टिंग काऊचचा खुलासा केला आहे. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम केलेल्या या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी कायमच पसंत केलं आहे. अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे की, एक वेळा नाही तर तब्बल पाच वेळा कास्टिंग काऊचची शिकार झाली आहे. सुरवीन चावलाने छोट्या पडद्यावरून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मालिकेत काम केल्यानंतर हेट स्टोरी 2 व पार्च्ड या चित्रपटात तिने काम केले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज कवी व शायर #अलीसरदारजाफरी यांचा स्मृतिदिन.

जन्म. २९ नोव्हेंबर १९१३ उत्तर प्रदेश मधील गोंडा जिल्ह्यातील बलरामपुर येथे.

आपले शालेय शिक्षण गावी पूर्ण करून ते उच्च शिक्षणासाठी अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय आले. तिथे अख़्तर हुसैन रायपुरी, सिब्ते-हसन, मुईन अहसन जज़्बी, असरार-उल-हक़ मजाज़, जांनिसार अख़्तर व ख़्वाजा अहमद अब्बास अशांची संगत मिळाली. यांच्या मुळे शायरी मध्ये रुची निर्माण झाली. अली सरदार जाफरी स्वातंत्र लढ्यात भाग घेतला. 

अली सरदार जाफरी यांच्या साहित्यिक सफरीची सुरवात १९३८ साली 'मंजिल' नावाची लघु कथा संग्रह लिहून झाली. अली सरदार जाफरी यांनी बॉलीवूड मध्ये 'जलजला', 'धरती के लाल' 'परदेसी' या चित्रपटाची गाणी लिहीली. १९४८ ते १९७८ त्यांनी 'नई दुनिया को सलाम', 'खून की लकीर', 'अमन का सितारा', 'एशिया जाग उठा', 'पत्थर की दीवार', 'एक ख्वाब', 'पैरहन-ए-शरार' 'लहू पुकारता है' अशी पुस्तके लिहिली. १९९७  मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार  मिळाला होता. त्यांचा शेवटचा संग्रह सरहदया नावाने छापला गेला, तो १९९९ साली प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या लाहौर यात्रेच्या दरम्यान लिहिला गेला होता. अली सरदार जाफरी यांचे निधन १ ऑगस्ट २००० रोजी झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज बॉलीवूड अभिनेत्री #तापसी_पन्नू चा वाढदिवस.

जन्म. १ ऑगस्ट १९८७ नवी दिल्ली येथे.

'पिंक' या सुपरहिट चित्रपटामुळे नावारुपाला आलेली अभिनेत्री तापसी पन्नू आपल्या अभिनयासोबतच बिनधास्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. तिने आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.जाहिरात ते सिनेमांमध्ये आपले सौंदर्य आणि तडफदार अभिनयाने सर्वांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नूचा जन्म एका शिख कुंटुंबात झाला. तिचं शालेय शिक्षणही दिल्लीच झालं. आपल्या मॉडेलिंगच्या दिवसांत तापसीने पँटालून फेमिना मिस फ्रेश आणि साफी फेमिना ब्युटीफूल स्किनचा किताब जिंकला होता. तापसी पन्नू सिनेमात येण्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजीनियर होती.

 तापसीने आपल्या करीयरची दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून केली. झुममंदी नादां या सिनेमातून २०१० मध्ये तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तापसीने मिस्टर परफेक्ट, डबल्स, वीरा रराम्बम या फिल्म्समध्ये काम केले. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यासोबत पिंक आणि अक्षय कुमारसोबत बेबी या बॉलिवूड सिनेमांमध्येही ती झळकली होती.

पाहता पाहता बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना हेवा वाटावा, असेच काही तापसीने केलेय. होय, मागच्या वर्षभरात तिचे एक-दोन नाही तर पाच सिनेमा रिलीज झालेत आणि यासोबतच ती बॉक्स ऑफिसवर एक यशस्वी अभिनेत्री ठरली. झूम टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तापसीच्या गतवर्षीच्या सर्व सिनेमांनी मिळून एकूण ३५२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गतवर्षी तापसीचे मिशन मंगल, गेम ओव्हर, बिल्ला, सांड की आंख  असे चार सिनेमे रिलीज झाले होते. तर थप्पड हा याचवर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम तापसीच्या सिनेमावरही झाला. पण या पाचही सिनेमात तापसीने तिच्या अभिनयातून सर्वांची मनं जिंकली आहेत. तापसी चे भावी  रॉकेट रश्मीआणि हसीन दिलरुबाअसे अनेक चित्रपट आहेत.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज लेखक, कवी व समाजसुधारक #अण्णाणाऊ_साठे यांचा स्मृतिदिन.

जन्म. १ ऑगस्ट १९२० सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी.

अण्णा भाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव तुकाराम ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत. अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी मुंबईत उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फक्त दिड दिवस शाळेत गेले.

लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठरे गावच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली.

याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट. विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले. मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.

वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले.

मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. १९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृ

आज १ ऑगस्ट

आज सुप्रसिद्ध गझलकार #अनिल_कांबळे यांचा स्मृतिदिन.

जन्म. १९५३ सासवड येथे.

अनिल कांबळे साध्या, सोप्या भाषेत आशय मांडणारे कवी म्हणून ते प्रसिद्ध होतेच.

अनिल कांबळे खरं तर १९७२ पासूनच ते कविता लिहीत होते, पण गझलच्या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि कांबळे हे स्वतः गझलमय झाले. आयुष्यभर त्यांनी हा काव्यप्रकार आपल्या रक्तात भिनवला. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयातून बीए झालेल्या अनिल कांबळे यांना लहानपणापासूनच कवितेची आवड. कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले होते. कवी, गीतकार आणि गझलकार हा प्रवास अतिशय खडतर होता, पण या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. त्यांची सहाशेहून अधिक गाणी अनेक नामवंत संगीतकारांनी स्वरबद्ध केली. अनुप जलोटा, शंकर महादेवन, पद्मजा फेणाणी, रवींद्र साठे अशा गायकांनी ही गाणी गायली. त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी.. पैशात भावनेचा व्यापार पाहिला मीही गझल ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या हातात पडली आणि त्यांनी त्याचे सोने केले. लहान वयातच वाममार्गाला लागलेल्या मुलीच्या आयुष्याची दुखरी जखम त्यांनी जणू शब्दबद्ध केली. समाजाचे भीषण वास्तव, काळजाला भिडणारे शब्द व तेवढीच समर्पक चाल यामुळे ही गझल लोकप्रिय झाली. ही गझल श्रीधर फडके यांनी अनेक मैफलींमध्ये सादर केली. या एका गझलेने अनिल कांबळे रसिकांच्या काळजात जाऊन पोहचले. त्यांचे माझ्या कविताकोवळ्या फुलांचाहे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. गेली 40 वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने कवितांचे कार्यक्रम केले. त्याशिवाय बासरीचा सूर आला, माझ्या कविता, गझलांच्या प्रदेशात हे स्वतःच्या कवितांचे सर्वत्र कार्यक्रम केले. यानिमित्ताने संपूर्ण हिंदुस्थानभर त्यांनी प्रवास केला. कोणतीही साहित्यिक पार्श्वभूमी नसतानाही अनिल कांबळे यांनी कवितेच्या क्षेत्रात आपल्या नावाचा झेंडा रोवला. त्यांच्या हातात लेखणीबरोबरच ब्रशही होता. अनेक तरल चित्रे त्यांनी साकारली आहेत. आपले जगणे सच्चे तर आपली कविताही सच्ची आणि आपण खोटे तर कविताही खोटी असे सुरेश भट नेहमी सांगायचे. हा मूलमंत्र कांबळे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपला म्हणून त्यांची गझल असो की कविता किंवा गीत, त्यात प्रामाणिकपणा दिसून येतो. केवळ कवितांचे कार्यक्रम करून ते थांबले नाहीत तर अनेक संस्था स्थापन करून रचनात्मक कार्यदेखील केले. युनिव्हर्सल पोएट्री फाऊंडेशन, प्रेरणा आर्ट फाऊंडेशन या दोन संस्थांचे ते अध्यक्ष होते. त्याशिवाय कवितेच्या प्रदेशात, आंतरिक सेतू व अक्षर अयान ही तीन प्रकाशने त्यांनी समर्थपणे चालवली. हिंदी, मराठी, उर्दू, गुजराती, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषांमधील कवींची संमेलने त्यांनी आयोजित केली. कविता किंवा गझल माणसाचं आयुष्य घडवते. तो आपल्या जीवनाचा आरसा असतो असे ते नेहमी म्हणायचे. याच गझलचा समर्पक वापर त्यांनी कैद्यांसाठी केला. जेलमध्ये जाऊन त्यांनी कैद्यांचे कविसंमेलन आयोजित केले होते. या हटके उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले. मराठी कविता जपत असतानाच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात इमानेइतबारे नोकरी केली. कांबळे यांनी अनेक तरुण कवींना मार्गदर्शन केले. भटांनी गझल हा काव्यप्रकार मराठीमध्ये रुजवला तेव्हा अनेक जण मोठय़ा उत्साहाने गझल लिहू लागले, पण त्यातील फार थोडय़ांनीच लिखाणात सातत्य राखले. त्यात अनिल कांबळे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. अनिल कांबळे हे अभिजात कला अकादमी अध्यक्ष आणि युनिव्हर्सल पोएट्री फाऊंडेशनचे संस्थापक होते. ते 'अक्षर अयान' नावाच्या दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादकही होते. अनिल कांबळे यांचे निधन १ ऑगस्ट २०१९ रोजी झाले.

त्यांच्या गाजलेल्या गझलीच्या काही पंक्ती

त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला

पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी

अंधार वेदनांनी आक्रंदतो तरीही

नजरेत वासनेचा श्रृंगार पाहिला मी

रस्ते उन्हात न्हाले, सगळीकडे परंतू

वस्तीतूनी दिव्यांच्या अंधार पाहिला मी

थोडा उजेड ज्याला मागावयास गेलो

तो सूर्यही जरासा लाचार पाहिला मी

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज कवी, गायक व गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त #आनंद_माडगूळकर यांचा वाढदिवस.

जन्म.१ ऑगस्ट

आनंद माडगूळकर हे ग.दि. माडगूळकर यांचे चिरंजीव असून एक मराठी लेखक आहेत.

ग.दि.माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत. या प्रयोगाच्या दरम्यान रसिकांना गीतरामायण कसे घडले हे जाणून घेण्यात स्वारस्य आहे, हे त्यांना जाणवले. आनंद माडगूळकर यांनी गीतरामायणाचे रामायणजिप्सीच्या वाटाही पुस्तके लिहिली आहेत. यात गीतरामायणाचा हा इतिहास आनंद माडगूळकरांनी लिहून पुस्तक रूपाने प्रकाशित केला आहे. 

गदिमांच्या काही निवडक साहित्यकृतींचा मनसोक्त आस्वाद रसिक श्रोत्यांना घेता यावा या उद्देशाने,अक्षय तृतियेच्या सुमुहूर्तावर आनंद माडगूळकरांनी "पॉडकास्ट" सुरू केला आहे.

हा podcast Hubhopper, Spotify Gaana या mobile apps वर, त्याच प्रमाणे online देखील उपलब्ध आहे.

पुण्यात गदिमांचे स्मारक उभारण्याबाबत ते गेले अनेक वर्षे पाठ पुरावा करत होते नुकतेच याला यश आले असून ग. दि. माडगूळकर यांच्या कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथे साकारण्यात येत असलेल्या स्मारकाचे मार्च २०२१ मध्ये  भूमिपूजन झाले आहे. कोथरूड येथील नियोजित एक्झिबिशन सेंटर या प्रकल्पातील सुरुवातीच्या भागातील इमारतीमध्ये गदिमा स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे. स्मारकाचे एकूण बांधकाम क्षेत्र ९३१ चौरस मीटर असून या स्वतंत्र इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमांचे स्मारक आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारी विविध दालने करण्यात येणार आहेत 

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज #मास्टर_भगवान यांचा जन्मदिन.

जन्म. १ ऑगस्ट १९१३

मास्टर भगवान यांचे पूर्ण नाव भगवान पालव. गव्हाळ वर्ण,अपुरी उंची,चौकोनी रापलेला चेहरा,बटबटीत डोळे,लालपिवळे दात या दादांच्या रुपावर कोणती नायिका भाळणार आणि ते कधी काळी चित्रपटाचे नायक होतील यावर कुणाचा विश्वास बसला नसता, पण दादांच्या मेहनतीने ते घडवलं. मास्टर विठ्ठल हे दादांचे दैवत...! १९३० मध्ये दादांना कॉमेडियन म्हणून 'बेवफा आशिक' हा पहिला चित्रपट मिळाला. पण या चित्रपटानंतर दादांना एक वर्ष काहीच काम मिळालं नाही. मात्र 'बेवफा आशिक' या चित्रपटातील भूमिका गाजल्यामुळे भगवानदादांना लोक ओळखायला लागले. एक वर्षानंतर जी.पी. पवार यांनी दादाला आपल्या 'जनता जिगर' या चित्रपटात भगवानदादांना मेन कॉमेडीयनचा रोल दिला. या चित्रपटानंतर त्यांच्या पाच मुकपटात भगवानदादांनी काम केलं. 'हिम्मते मर्दा' या पहिल्या बोलपटात भगवानदादांनी काम केले. इथुनच भगवानदादांना धडाधड चित्रपट मिळत गेले. मात्र १९५० पर्यंत श्रीमंत, उच्चभ्रू व सुशिक्षित सिनेदर्शकात दादांच्या चित्रपटांना स्थान नव्हते.

१९५१ ला रिलीज झालेल्या 'अलबेलातील  एकाहून एक "सुपरडुपर हिट' गाणी आणि त्यावरील खास "भगवान-डान्स'ने चारी बाजूला धमाल उडवून दिली. भगवानदादांना अचानक तुफान लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील 'भोली सुरत दिल के खोटे' हे गाणं जबरदस्त हिट झाले. दादांचा एकाच जागेवर उभे राहून, धीम्या लयीवर, शरीराला विशेष कष्ट न पडू देता केलेला मोहक पदन्यास, रेखीव हावभाव व गीतातील मार्मिक शब्दार्थाला अनुसरून केलेली भावमुद्रेमुळे या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. भारतीय सिनेमात खऱ्या अर्थानं पाश्चा त्य संगीत आणि डान्स रुजवण्याचे काम भगवानदादांच्या "अलबेला'नं केलं. भगवानदादा यांचं "अलबेला'चं हे यश मात्र "एकमेवाद्वितीय' ठरलं. त्यानंतर त्यांनी कितीतरी सिनेमे बनवले.. पण एकाही सिनेमाला यश मिळालं नाही. दादा कोंडके यांच्यासोबत त्यांची छान जोडी जमली होती. डान्स हाच भगवानदादा यांचा "प्लस पाइंट' होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली. "चोरी चोरी', "झनक झनक पायल बाजे' या सिनेमांतील भगवानदादा यांच्या भूमिका गाजल्या. नृत्य-संगीताचा अभिनव आविष्कार घडवीत भारतीय सिनेमाला "पहिला डान्सिंग ऍक्टउर' -अर्थात्‌ भगवानदादा या सिनेमानं मिळवून दिला. भगवान दादांच्या जीवनावर आधारीत एक अलबेलाहा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. भगवानदादा यांचे ०४ फेब्रुवारी २००२ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे * भगवानदादा* यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=cgKTQFu5IeY

आज १ ऑगस्ट

आज विरह व्याकुळता, सोशिकता, शालीनता या भावांची ती मूर्तिमंत स्वामिनी म्हणून ज्या हिंदी अभिनेत्रीचा नियमित उल्लेख केला जातो ती म्हणजे ट्रॅजिडी क्वीन’ #मीनाकुमारी यांचा जन्मदिन.

जन्म.१ ऑगस्ट १९३२

मीनाकुमारी यांचे मूळ नाव महजबी बानो होते. मीनाकुमारी हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. रुपेरी पडद्यावर दु:खद आणि ट्रॅजिक भूमिका केल्या आणि दमदार अभिनय करून आपली ओळख युगायुगांपर्यंत कायम ठेवली. मीना कुमारी नृत्यकलेत पारंगत होत्या. मीना कुमारी यांना  कलेचा वारसा आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी तिचे जवळचे नातेसंबंध होते. मीना कुमारी यांना परिवारात मुन्नाया नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा लेदर फेसहा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून तिला लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार बेबी मीनाम्हणून चमकल्या. नायिका म्हणून अभिनय केलेला बच्चों का खेलहा त्यांचा  पहिला चित्रपट.  बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटांतून मीनाकुमारी यांचे लोभस दर्शन प्रेक्षकांना घडले. छोट्याच्या चणीची, निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रुपात विलक्षण गोडवा असलेली मीनाकुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरुपात अनुभवायला मिळाली. काही निखळ विनोदी भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या पण पडद्यावर त्यांनी साकारलेल्या 'शोक'नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं. चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल आपण और प्रीत पराई, मी चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटांतून मीनाकुमारी यांनीदर्जेदार अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. ३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. यामधील सर्वाधिक सिनेमे क्लासिक मानले गेले. त्यांचे खासगी आयुष्यसुध्दा ट्रॅजिक होते. १९५३ साली वयाने पंधरा वर्षे मोठे असलेल्या आणि विवाहित असलेल्या दिग्दर्शक कमाल अमरोहीशी त्या विवाहबद्ध झाल्या. सुरवातीची काही मोजकी वर्षे जरा बरी गेली पण नंतर दोघांमधील वैचारिक अंतर वाढू लागले. त्यानंतर अवघ्या सात वर्षांनी म्हणजे १९६० साली त्यांची वैवाहिक कारकीर्द घटस्फोटापर्यंत पोहोचली.  'साहिब, बीवी और गुलाम'  या सिनेमामध्ये मीना कुमारी यांनी धाकट्या सूनेची भूमिका साकारली होती. केवळ या पात्रामुळेच त्या दारूच्या आधीन गेल्या होत्या असे म्हणतात. करिअरच्या यशोशिखरावर पोहोचल्यानंतर आपले दु:ख लपवण्यासाठी मीना कुमारी दारू प्यायला लागल्या. प्रेमात वारंवार धोका खाल्ल्याने त्यांचे मन खचून गेले होते. त्या सतत ख-या प्रेमाच्या शोधात असायच्या. परंतु या झगमग जगात त्यांनी केवळ धोका आणि विश्वासघातच मिळतच गेला. त्यांना अनेकदा अपमानही सहन करावा लागला. याला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य मद्यपानात बुडवून टाकले. फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मीना कुमारी ह्या पहिल्या अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी बैजू बावराआणि परिणिताया चित्रपटांतील भूमिकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या. पुढे साहिब बिवी और गुलामआणि काजलचित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी मैं चुप रहूंगी’, ‘आरतीआणि साहब बिवी और गुलामचित्रपटांसाठी सर्वत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने मीनाकुमारी यांनाच मिळालेली होती. मीनाकुमारी ह्या अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. नाझया नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. अभिनेत्री मधुबाला मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते. १९८१ मध्ये आलेल्या मीनाकुमारी की अमर कहानीनावाच्या चित्रपटात मीना कुमारी यांची दर्दभरी अजीब दास्तां मांडण्यात आ

आज १ ऑगस्ट

आज लोकमान्य #बाळगंगाधरटिळक यांची पुण्यतिथी.

जन्म. २३ जुलै १८५६ रत्नागिरी येथे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे त्यांचे मूळ गांव. अर्थात, त्यांचा जन्म रत्नागिरीचाच. त्यांचे मूळ नाव केशव असे होते. पण, ‘बाळहे टोपण नावच कायम राहिले. त्यांचे वडील गंगाधर पंत हे सुरूवातीला प्राथमिक शिक्षक होते. पुढे ते शिक्षण-निरीक्षक बनले. टिळक १० वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांची पुणे येथे बदली झाली. त्यामुळे बाळ गंगाधर टिळकांचे शिक्षण पुणे येथे झाले.

१८७२ मध्ये टिळक मॅट्रीकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला. याच कॉलेजातून ते १८७७ मध्ये बी.ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे सन १८७९ मध्ये ते एल.एल.बी. च्या वर्गात असतानाच त्यांचा आगरकरांशी परिचय झाला. समान ध्येयाने प्रेरित झालेल्या या दोन तरुणांनी ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून आपल्या मातृभूमीची सुटका करण्यासाठी लोकजागृतीच्या आणि राष्ट्रोद्धाराच्या कार्यात स्वतःला वाहुन घेण्याचा निश्चय केला.

विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे न्यु इंग्लीश स्कूलची स्थापना केली. पुढे टिळक व आगरकर यांनी इंग्रजी भाषेत मराठा’ (२ जानेवारी १८८१) आणि मराठी भाषेत केसरी४ जानेवारी १८८१ रोजी ही वृत्तपत्रे सुरू केली. आगरकर

केसरीचे तर टिळक मराठाचे संपादक बनले. त्यानंतर टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पुढे एका वर्षाने २ जानेवारी, १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेजसुरु करण्यात आले.

यापुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्नावरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यामुळे आगरकरांनी २५ ऑक्टोबर १८८७ रोजी केसरीच्यासंपादकपदाचा राजीनामा दिला व टिळक केसरीचे संपादक बनले. आपल्या या वृत्तपत्रद्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर टिळकांनी कॉंग्रेसच्या कार्यात भाग घेण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात परकीय सत्तेविरुद्ध लोक जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी सातत्याने केले. गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले. टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला शिवाजी उत्सव१५ एप्रिल १८९६ रोजी रायगडावर साजरा केला गेला. या सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यायोगे त्यांच्यात राष्ट्रवादी विचार व भावना यांचे बीजारोपण करता येईल, अशी त्यांची धारणा होती.

टिळकांनी राजकारणात जहाल मतवादाचा पुरस्कार केला. ब्रिटिश राज्यकर्त्याच्या न्याय बुद्धीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हिंदी लोकांना अर्ज-विनंतीच्या मार्गाने राजकीय हक्क मिळू शकणार नाहीत किंवा सनदशीर मार्गाने त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, असे त्यांचे स्पष्ट मत होते. आपल्या देशाचे राजकीय दास्य दूर करण्यासाठी परकीय राज्यकर्त्यांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. असे त्यांना वाटत होते. पुढे याच प्रश्नावरुन कॉंग्रेसमध्ये मवाळमतवादीजहालमतवादीअसे दोन गट पडले. त्यातील जहाल गटाचे नेतृत्व टिळकांनी केले. त्यांचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरही मान्य झाले होते. सन १९०७ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मवाळ गटातील संघर्ष विकोपाला पोहोचला. परिणामी, मवाळ गटाने जहालांची कॉंग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली. २४ जून १९०८ रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन त्यांची ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुगांत रवानगी करण्यात आली. या सहा वर्षाच्या प्रदीर्घ तुरुंगवासातून १७ जून १९१४ रोजी सुटका झाल्यानंतर टिळकांनी पुन्हा राजकीय कार्याला सुरुवात केली. भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत आणि भारतातील प्रातिनिधीक संस्था आधिकाधिक व्यापक बनवून त्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली पाहिजे इत्यादी मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी १ मे १९१६ रोजी टिळकांनी मुंबई प्रांतात होमरूल लीगची’ (स्वराज्य संघाची) स्थापना केली. पुढे सप्टेंबर, १९१६ मध्ये अॅनी बेझंट यांनी ऑल इंडिया होमरूल लीगची स्थापना केली. टिळकांची होमरुल लीग आणि अॅनी बेझंट यांची होमरुल लीग या दोन्ही संघटना पूर्णपणे स्वतंत्र होत्या. परंतु टिळक आणि अॅनी बेझंट यांच्यात सख्य असल्यामुळे या दोन्ही संघटनामध्ये परस्पर समन्वय होता इतकेच, हे याठिकाणी लक्षात घ्यावे.

इंग्रज सरकारच्या अन्ययी व पक्षपाती धोरणा-विरुद्ध आवाज उठविण्यात लोकमान्य टिळक नेहमीच आघाडीवर राहिले होते. त्यासाठी त्यांनी अनेकदा कारावासही भोगला होता. टिळकांच्या निर्भीडपणाची साक्ष देण्यास त्यांचे केसरीतील अग्रलेख पुरेसे आहेत. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’? असा सवाल विचारण्याइतकी त्यांची लेखणी निर्भीड व सडेतोड होती. दुष्काळ, प्लेग यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकर वर्ग यांच्याकडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्यांचा त्यांनी अत्यंत कडक शब्दामध्ये निषेध केला. नोकरशाहीच्या बेपर्वा व सहानुभूतीशून्य वृत्तीवर त्यांनी नेहमीच टिकेची झोड उठविली. इंग्रज सरकारच्या पक्षपाती व जनविरोधी धोरणांवर ते सदैव तुटून पडले. १६ ऑक्टोबर १९०४ रोजी बंगालच्या फाळणीची प्रत्यक्ष अमंलबजावणी झाल्यावर त्यांविरुद्ध संपूर्ण देशातील लोकमत जागृत करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.

लोकमान्य टिळक हे हिंदी राष्ट्रवादाचे कट्टर पुरस्कर्ते होते. प्राचीन भारतीय वैदिक संस्कृती सनातन हिंदू धर्म व धर्मग्रंथ आणि भारताचा गौरवशाली इतिहास व परंपरा हे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख आधार होत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रवादाचे सांस्कृतिक राष्ट्रवादअसेही वर्णन केले जाते. वरील घटकांनी भारतीय जनतेत एकात्मतेची भावना निर्माण केली आहे. तथापि, ही भावना अधिक दृढ बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे असे त्यांचे मत होते. भारतीय जनतेत वरील घटकांच्या आधारे राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिव जयंती उत्सव सुरु केले होते.

लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुःसूत्रीकार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारचअशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचला. स्वराज्य हे त्यांचे अंतिम उदिष्ट होते. या उदिष्टाप्रत पोहोचण्याची साधने म्हणून त्यांनी स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यांचा पुरस्कार केला होता. खरे तर, टिळकांचा मूळचा पिंड अभ्यासू विद्वानाचा होता. राजकारणाच्या धकाधकीत राहूनही त्यांनी गीता रहस्य’, ओरायन, दि आर्क्टिक होम इन दि वेदाज असे अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत.

लोकमान्य टिळकांनी राजकारणात जहाल मतवादी भूमिका घेतली होती. परंतु समाज सुधारणेच्या बाबतीत मात्र ते काहिसे नेमस्त होते. म्हणूनच या संबंधातील त्यांच्या भूमिकेचे वर्णन राजकीय जहाल पण सामाजिक नेमस्तअसे केले जाते. समाज सुधारणे बाबत टिळकांचे म्हणणे होते की, इंग्रजी राज्य हीच आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील खरी धोंड आहे. तेव्हा प्रथम आपल्या मार्गातील ही धोंड दूर करण्यावरच आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. एकदा ही धोंड दूर केल्यावर आपणास आपल्या मताप्रमाणे सामाजिक सुधारणा करता येईल. परंतु आपण सामाजिक सुधारणेला अग्रक्रम दिला तर परकीय इंग्रज राज्यकत्यांनी आपल्या धर्मात व सामाजिक प्रश्नांत हस्तक्षेप करण्याची आयतीच संधी मिळेल आणि त्यामुळे आपल्या राजकीय उद्दिष्टास मोठीच हानी पोहोचेल. टिळकांच्या या भूमिकेमुळे त्यांनी समाज सुधारणेच्या चळवळीला अनेकदा विरोध केला. संमती व विधेयकाला विरोध करताना या विधेयकामुळे आमच्या धर्मात परकीयांचा हस्तक्षेप होतो, असे त्यांनी म्हटले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरात उद्भवलेल्या वेदोक्त प्रकरणाच्या वेळी टिळकांनी प्रतिगामी वृत्तीच्या पुरोहित वर्गाची बाजू घेऊन शाहू महाराजांवर टीका केली होती. थोडक्यात, सामाजिक प्रश्नाबाबत टिळकांनी सनातन्यांची बाजू घेऊन समाजसुधारकांना विरोध केला होता.

लोकमान्य टिळक हे प्रथम राजकीय नेते होते आणि आपली ही भूमिका त्यांनी अत्यंत समर्थपणे बजावली. इंग्रजी सत्तेला त्यांनी सर्व सामर्थ्यानिशी प्रखर विरोध केला. भारतात राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या देशातील सर्वसामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करून तिला परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठिण कार्य त्यांनी केले. म्हणूनच भारतीय असंतोषाचे जनकही उपाधी त्यांना मिळाली. हिंदुस्थानातील त्या काळातील प्रमुख राष्ट्रीय नेत्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते.

आतापर्यंत देशासाठी केलेली अविश्रांत धडपड, उतारवयात जाणवणारी दगदग, मधुमेहाच्या आजाराचा जाणवणारा त्रास आता त्यांच्या प्रकृतीला सोसवत नव्हता. तरीसुद्धा ते स्वस्थपणाने पूर्ण विश्रांती घेत नसत. काम करण्याची ते पराकाष्ठा करीत. औषधोपचार चालू होते. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण मनातील विविध विचारांच्या वावटळी मुळे तो कृतीत येत नव्हता. १९२० जुलैत त्यांना हिवताप झाला त्यातच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन झाले.

लोकमान्य टिळक* यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज भोजपुरी, हिंदी आणि उर्दू भाषेचे गीतकार, कवी आणि साहित्यिक #मोतीबीए यांचा जन्मदिन.

जन्म. १ ऑगस्ट १९१९ देवरिया (उ.प्र.)मधील बरेजी गावी.

मोतीलाल उपाध्याय यांना मोती बी.ए. या नावाने प्रसिद्धी मिळाली. ८० हून अधिक चित्रपटात गाणी लिहिणाऱ्या मोती बी.ए.यांनी दिलीप कुमार आणि कामिनी कौशल अभिनित व किशोर साहू यांच्या 'नादिया के पार' चित्रपटाची गाणी लिहून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. नदिया के पारया चित्रपटात त्यांनी चित्रपट जगतातीला पहीले भोजपुरी गाणे कठवा के नइयां, बनइहे रे मलहवा, नदिया के पार दे उतारलिहिले. या सोबतच या चित्रपटातील त्यांची एक गजल हमको तुम्हारा ही आसरा, तुम हमारे हो न हो...खूप गाजली. या सोबतच त्यांनी साजन, कैसे कहूं, राजपूत, राम विवाह, गजब भइले रामा, वीर घटोत्कच या चित्रपटात अभिनया बरोबर गाणी पण लिहिली.

त्यांनी १९४४ ते १९५१ या काळात पंचोली आर्ट्स पिक्चर्स लाहौर, फिल्मिस्तान लिमिटेड, बम्बई, प्रकाश पिक्चर्स, मुंबई चे  गीतकार म्हणून नदिया के पारसोडून कैसे कहूँ’, ‘साजन’, ‘सिन्दूर’, ‘रिमझिम’, ‘सुभद्राया चित्रपटाच्या गाणी लिहिली.

१९८४-८५ मध्ये भोजपुरी चित्रपट गजब भइलें रामा’ ‘चम्पा चमेली’ ‘ठकुराइनया साठी गीत लेखन केले. आकाशवाणी व दूरदर्शन मुंबई , इलाहाबाद, लखनऊ, गोरखपुर येथे त्यांचे  काव्य वाचनाचे प्रसारण झाले. १९३६ ते २००० या काळात त्यांनी हिन्दी, भोजपुरी, उर्दू व इग्लिश मध्ये गीत, गजल, कविता, अनुवाद, आत्मकथा अशी 50 हून अधिक  पुस्तके लिहिली आहेत.  त्यांनी अनेक शेक्सपियरच्या रचनांना भोजपुरी मध्ये अनुवादित केले होते. म्हणून मोती बी.ए. यांना भोजपुरीचे शेक्सपियर या नावाने ओळखले जात असे. मोती बी.ए. यांचे १८ जानेवारी २००९ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १ ऑगस्ट

आज सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉ.#राहीमासूमरझा यांचा जन्मदिन.

जन्म.१ ऑगस्ट १९२७ उत्त्तर प्रदेशातील गाझीपुर येथे.

डॉ. राही मासूम रझा यांचे महाविद्यालयीन शिक्षण अलीगढ विद्यापीठात झाले. १९६४ साली त्यांना पी.एच.डी. मिळाली. नंतर काही काळ ते अलीगढ विद्यापीठात शिकवत होते. १९६८ साली ते मुंबईला आले. आपल्या साहित्य कृती बरोबरच ते हिंदी सिनेमाला जोडले गेले. डॉ. राही मासूम रझा यांनी अनेक चित्रपटांचे तसेच अनेक मालिकांचे संवादही लिहिले. दूरदर्शन साठी १०० हून अधिक धारावाहिक त्यांनी लिहिल्या त्यातील 'महाभारत' और 'नीम का पेड़' या अविस्मरणीय होत्या. "महाभारत" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक म्हणूनही डॉ.राही मासूम रजा यांनी काम केले. "महाभारत" बनवायच्या आधी डॉ. राही मासूम रझा यांनी बी.आर.च्या बॅनरखाली संवादलेखक म्हणून पूर्वीही काम केलं होतं. बी आर चोप्रा यांनी "महाभारत"ची कल्पना जेव्हा डॉ. राही मासूम रझा यांना सांगितली. आश्चर्य म्हणजे डॉ. राही मासूम रझा केवळ चोवीस तासातच, ‘समय अथवा काळालाच आपण महाभारताचा सूत्रधार केला तर?’ अशी एक भन्नाट व अभिनव कल्पना घेऊन चोप्रांकडे आले, इतकंच नव्हे तर त्यांनी महाभारताच्या अगदी पहिल्या भागाचं सूत्रधाराचं निवेदनही लिहून बरोबर आणलं होतं. चोप्रांना डॉक्टरांची कल्पना विलक्षण आवडली आणि त्या दिवशी प्रथम चोप्रांना समजलं की, डॉ.राही मासूम रझा हे नुसतेच पटकथालेखक नसून संस्कृत व हिंदी विषयाचे गाढे विद्वान आहेत. चोप्रांनी त्या क्षणापासून डॉक्टरांना महाभारताचे कथालेखक म्हणून आपल्या टीममध्ये सन्मानाने सामावून घेतलं. राही आपल्या एकूण यांनी ३०० चित्रपटाच्या पटकथा लिहिल्या. त्यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या तसेच कविताही लिहिल्या आहेत. निमका पेड या कादंबरीतून त्यांनी स्वातंत्र्य पूर्व भारत व आताचा भारत याचे वर्णन केले आहे. आधा गाव, उसकी बुंद वगैरे त्यांचे चित्रपट गाजले. "तिलिस्म -ए -होशरुबा" हा त्यांचा कथा संग्रह आहे. आधा गाँव, नीम का पेड़, कटरा बी आर्ज़ू, टोपी शुक्ला, ओस की बूंद और सीन अशी ७५ प्रसिद्ध पुस्तके आहेत. १९७९ मध्ये 'मैं तुलसी तेरे आँगन की' या चित्रपटासाठी फिल्म फेयरचा सर्वश्रेष्ठ संवाद पुरस्कार डॉ. राही मासूम रझा यांना मिळाला होता. भारत सरकारने पद्मश्री’ , पद्म भूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांचे चिरंजीव नदीम खान हे सिनेमेटोग्राफर आहेत. डॉ.राही मासूम रजा यांचे निधन १५ मार्च १९९२ रोजी झाले. आपल्या समुहा तर्फे #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

डॉ. राही मासूम रझा यांची रामजन्म भूमी वरील कविता

" लेकिन मेरा लावारिस दिल

मस्जिद तो अल्लाह की ठहरी

मंदिर राम का निकला

लेकिन मेरा लावारिस दिल

अब जिस की जंबील में कोई ख्वाब

कोई ताबीर नहीं है

मुस्तकबिल की रोशन रोशन

एक भी तस्वीर नहीं है

बोल ए इंसान, ये दिल, ये मेरा दिल

ये लावारिस, ये शर्मिन्दा शर्मिन्दा दिल

आख़िर किसके नाम का निकला

मस्जिद तो अल्लाह की ठहरी

मंदिर राम का निकला

बंदा किसके काम का निकला

ये मेरा दिल है

या मेरे ख़्वाबों का मकतल

चारों तरफ बस खून और आँसू, चीखें, शोले

घायल गुड़िया

खुली हुई मुर्दा आँखों से कुछ दरवाजे

खून में लिथड़े कमसिन कुरते

जगह जगह से मसकी साड़ी

शर्मिन्दा नंगी शलवारें

दीवारों से चिपकी बिंदी

सहमी चूड़ी

दरवाजों की ओट में आवेजों की कबरें

ए अल्लाह, ए रहीम, करीम, ये मेरी अमानत

ए श्रीराम, रघुपति राघव, ए मेरे मर्यादा पुरुषोत्तम

ये आपकी दौलत आप सम्हालें

मैं बेबस हूँ

आग और खून के इस दलदल में

मेरी तो आवाज़ के पाँव धँसे जाते हैं।

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

१ ऑगस्ट - दिनविशेष

 

१ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

 

१८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

 

१९१४: पहिले महायुद्ध जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

 

१९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

 

१९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

 

१९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

 

१९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

 

१९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

 

२००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

 

२००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला

 

१ ऑगस्ट रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

ख्रिस्त पूर्व १०: रोमन सम्राट क्लॉडियस यांचा जन्म.

 

१७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)

 

१८३५: कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर पुणे)

 

१८८२: भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

 

१८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)

 

१९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २००२)

 

१९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.

 

१९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९)

 

१९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९६७)

 

१९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७२)

 

१९४८: मार्वल स्टुडिओ चे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.

 

१९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म.

 

१९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.

 

१९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

 

 

१ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १०८१)

 

१९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: २३ जुलै १८५६ रत्‍नागिरी)

 

१९९९: बंगाली साहित्यिक निरादसी चौधरी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)

 

२००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२१)

 

२००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशनसिंग सुरजित यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१६)

 

२००८: क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन.

No comments:

Post a Comment