२७ जुलै - दिनविशेष & स्मृतिदिन

 

 

ACTIVE AND ADVANCED EDUCATION ALl TYPES:

 

     यशवंत - एक प्रेरणास्रोत  

 

 २७ जुलै - दिनविशेष

( सहावे पर्व : भाग - १४५/१५०)

 

💫  डॉ. उद्धब भराली  💫

 

सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिलेल्या एका हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्याला, कुटुंबाच्या अचानक बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्ध्यातच सोडून द्यावे लागले.

 

त्याच तरुणाच्या नावावर आज १०० हून अधिक पेटंट आहेत. त्याचा हा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग !

 

७ एप्रिल १९६२ रोजी आसाम राज्यातील लखीमपुर येथे एका व्यापार्‍याच्या घरी उद्धबचा जन्म झाला. तो इतका हुशार आणि बुद्धिमान की, त्याला सहावीतून आठवीत थेट प्रवेश दिला गेला. 

 

आठवीत असतानाच अकरावी आणि बारावीचे अवघड प्रश्न सहज सोडवायचा. त्याच्या जिज्ञासू वृत्तीने त्याला अनेकदा वर्गाच्या बाहेर उभे राहण्याची शिक्षा मिळाली.

 

शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. पण वडिलांच्या व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे, त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा निर्माण झाला. बँकेने त्यांना तात्काळ घर खाली करण्यासाठी नोटीस पाठवली.

 

बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे त्याला पुढील शिक्षण घेणे, निव्वळ अशक्य झाले होते. त्यामुळेच, त्याला आपले शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. शिक्षण अर्धवट सोडावे लागले. याचा मोठा आघात सहन करून त्याने नोकरीला सुरुवात केली.

 

माणूस कितीही मोठ्या संकटात असला तरी, त्यातून बाहेर पडण्याची एक संधी त्याच्या समोर येतेच. फक्त ती संधी शोधण्याची नजर पाहिजे. एक पॉलिथिन बनवणारे, पाच लाख रुपये किंमतीचे विदेशी यंत्र, कमी पैशात बनविण्याचे आव्हान उद्धबच्या समोर ठेवण्यात आले. 

 

'प्रत्येक संकटात एक आव्हान असते आणि प्रत्येक आव्हानात एक संधी असतेनेमकं हेच त्यांना हेरलं. आपल्या बुद्धीचा अन् कौशल्याचा वापर करून मिळालेल्या आव्हानाचा सामना करून, त्या विदेशी यंत्राची, अगदी जशीच्या तशी भारतीय कॉपी बनवली. तेही केवळ ६७ हजार रुपया मध्ये.

 

या आव्हानामुळे उद्धबला आपल्यातील क्षमतेचा नव्याने शोध लागला. अनेक लोकांनी पाय ओढण्याचा प्रयत्न केला, पण, तरीही त्याला भीक न घालता त्याने आपले संपूर्ण लक्ष संशोधनावर केंद्रित केले. 

 

२०१२ साली त्याने बनवलेल्या एका यंत्रासाठी नासाने एक्सेप्शनल टेक्नॉलॉजी अचिवमेंट अ‍ॅवार्ड ने त्याला सन्मानित केले. तो जगप्रसिद्ध भारतीय संशोधक म्हणजेच "डॉ. उद्धब भराली" होय.

 

डॉ. उद्धब भराली यांच्या समोर परिस्थितीने मोठे आव्हान उभे केले. पण, आलेल्या आव्हानात सुद्धा त्यांनी संधी शोधली. यामुळेच त्यांना आपल्यातील क्षमतेचा शोध लागला. म्हणूनच त्यांच्याकडे १०० हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत.

 

त्यांच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीची दखल घेवून भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा मानाचा किताब देऊन सन्मानित केले आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

 

आज संपूर्ण जग कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. प्रत्येकजण आपल्या घरात लॉकडाऊन आहे. या आव्हानाच्या काळात आपण आपल्यातील क्षमतेचा शोध घेतला पाहिजे.

 

धावपळीच्या युगात अशी वेळ, अशी संधी परत कधी मिळेल? हे सांगता येत नाही. म्हणूनच या आव्हानात संधी शोधण्याचा प्रयत्न करा.

 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू. तो पर्यंत नमस्कार.

 

श्री. संदीप पाटील, दुधगाव

9096320023

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

 

************

२७ जुलै - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मृतिदिन

************

 

जन्म - १५ ऑक्टोबर १९३१

स्मृती - २७ जुलै २०१५

 

भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.

 

डॉ. कलाम हे जनतेचे राष्ट्रपती होते. मुलांबद्दल त्यांना विशेष प्रेम होते आणि देशातील युवकांना प्रेरित करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. शास्त्रज्ञ, प्रशासक, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक म्हणून त्यांनी या दोन गोष्टींसाठी त्यांनी आपले जीवन वेचले. २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपतीपदाची धुरा अत्यंत यशस्वीरीत्या संभाळून डॉ.कलाम यांनी त्या पदावर आपल्या चमकदार कामगिरीची मोहर उमटविली. साधी राहणी आणि ऋजू स्वभावामुळे जनतेचे राष्ट्रपतीम्हणून ते लोकप्रिय ठरले.

 

त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील 'नासा' या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

 

अब्दुल कलाम यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर विज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात डाव्यांचा अपवाद वगळता, डॉ.कलाम यांची राष्ट्रपतिपदासाठी एकमताने शिफारस करण्यात आली होती. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉरलॉजीमधून हवाई अभियांत्रिकी शाखेचे अभियंता असलेले डॉ.कलाम भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक ठरले. वाजपेयी यांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आणि त्यांच्याच कारकिर्दीत १९९८ मध्ये पोखरणची अणुचाचणी झाली.

 

भारत सरकारने 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व १९९८ मध्ये 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ.कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ.कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत असत.

 

राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यावर डॉ.कलाम यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे काम केले. मोठी स्वप्ने पाहा आणि त्यासाठी भरपूर कष्ट करा, असे ते सांगत. ते उत्तम वीणावादक होते. डॉ.कलाम यांना कर्नाटक संगीतात रुची होती. विंग्ज ऑफ फायर’, ‘इंडिया २०२०आणि इग्निटेड माइंड्‌सही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. राष्ट्रपतिपदावरून निवृत्त झाल्यावर डॉ.कलाम विविध संस्थांमध्ये व्याख्याने देत असत.

 

डॉ.अब्दुल कलाम यांचे २७ जुलै २०१५ रोजी निधन झाले.

 

डॉ.अब्दुल कलाम यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

यांचे प्रेरणादायी विचार !

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 

 

भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना देशाचे मिसाईल मॅनम्हणून ओळखलं जायचं.

 

डॉ. कलाम यांचे निवडक विचार :

 

* स्वप्न ती नाहीत जी रात्री झोपल्यावर येतात, स्वप्न ती आहेत जी रात्रभर झोपू देत नाही.

 

* पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. समस्या एकच असते पण दृष्टिकोन मात्र वेगळा असतो.

 

* काळा रंग हा अशुभ समजला जातो. पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थांचे आयुष्य उज्ज्वल करत असतो.

 

* 'अपयश' नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.

 

* तुमच्या पहिल्या विजयानंतर विश्रांती घेऊ नका. कारण, दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अयशस्वी झालात तर तुमचा पहिला विजय केवळ नशीबाचा भाग होता, असे म्हणायला अनेकजण सज्ज असतात.

 

* यशाचा आनंद अनुभवण्यासाठी व्यक्तीला आयुष्यात अडचणींची सामना करणे आवश्यक असते.

 

* यशाबद्दलची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही.

 

* यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात.

 

* जेंव्हा तुमची सही 'ऑटोग्राफ' बनते तेव्हा तुम्ही यशस्वी झालात असे समजा.

 

* देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात.

 

आजही त्यांचे विचार, त्यांची शिकवण नेहमीच सर्वांना प्रेरणा देणारी विशेषत: युवा पिढीला स्फूर्तिदायक ठरते.

 

डॉ. कलाम साहेबांना विनम्र अभिवादन !

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

सौजन्य : लेट्स अप

 

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 

************

२७ जुलै - हिंद केसरी मारुती भाऊ माने स्मृतिदिन

************

 

जन्म - २८ फेब्रुवारी १९२७ (सांगली)

स्मृती - २७ जुलै २०१०

 

हिंद केसरी मारुती भाऊ माने यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२७ सांगली जवळच्या कवठेपिरान (ता. मिरज) या छोट्याशा गावात झाला.

 

मारुती माने यांनी १९६२ मध्ये जकार्ता इथे झालेल्या आशियाई स्पर्धेत फ्रीस्टाईल प्रकारात गोल्ड मेडल पटकावले होते. त्यानंतर १९६४ मध्ये पंजाबच्या कर्नाल येथे झालेल्या अखिल भारतीय हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत हिंद केसरीचाही बहुमान त्यांनी पटकावला होता. त्यांची कामगिरी लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना १९८१ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवले होते.

 

मारुती माने ज्या काळात मोठे झाले, त्या काळात कोल्हापूरचे नाव कुस्तीसाठी घेतले जायचे. कुस्तीचे आखाडे गाजविणारे अनेक मल्ल कोल्हापुरातच होते आणि त्यांनी आपल्या कुस्तीमुळे त्या कलानगरीला एक वेगळा बाज आणून दिला होता. माने यांचे वैशिष्ट्य असे की, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी कुस्तीचे केंद्र कोल्हापुरातून सांगलीकडे वळविले.

 

हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धे मध्ये कुस्तीतील ब्राँझ पदक मिळविणारे खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्तीमुळे स्वत:चे नाव सर्वतोमुखी करणारे मारुती माने हेच नामवंत पैलवान होत. सर्वसाधारण मराठी माणसाच्या तुलनेत त्यांना सणसणीत उंची आणि तिला साजेल अशी भरदार शरीरयष्टी लाभली होती. हे शरीर त्यांनी अखंड मेहनत करून मिळविले होते.

 

मैदान मारण्यामध्ये नाव मिळविणाऱ्या अनेकांना आपल्याला मिळालेले यश पचवता येत नाही. अनेकदा त्याची परिणती मैदानी जीवनाला अतिशय विसंगत अशी जीवनशैली स्वीकारण्याकडे होते. साहजिकच अशा लोकांना मैदाने विसरावी लागतात आणि अल्पकाळातील चमकदार कामगिरीच्या रम्य आठवणींवरच दिवस काढावे लागतात. मारुती माने यांच्याबाबतीत असे घडले नाही; कारण त्यांच्या लाल मातीशी असलेल्या निष्ठा अतिशय पक्क्या होत्या आणि त्यांना साजेसेच त्यांचे जीवन होते. त्यामुळेच त्यांनी उणेपुरे एक दशक देश परदेशांतील कुस्तीचे आखाडे गाजविले.

 

हिंदकेसरी किताब पटकाविला आणि कुस्तीची कला शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रशिक्षित केले. राजकारणाच्या सावलीमध्ये ते गेले नसते तर कदाचित त्यांच्या हातून कुस्तीच्या क्षेत्रासाठी अधिक भरीव असे कार्य घडूही शकले असते, असे काहीजण म्हणतात. परंतु राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतरही माने पैलवानकी विसरले नाहीत किंवा उत्साही, मेहनती आणि जिद्दी तरुणांना शिकविण्यामध्ये कमी पडले नाहीत.

 

अलीकडच्या काळामध्ये ज्यांना नजरेत भरेल अशी उंची आणि भरदार शरीरयष्टी लाभलेली असते अशा मैदानीवीरांना सिनेमात कामे करण्याबाबत विचारणा होते आणि बहुतेक सर्वचजण त्या रंगीत पडद्याच्या मोहाने तिकडे वळतात सुद्धा. त्यामुळे मिळणारी प्रसिद्धी ही क्षणभराची असते. अशा कोणत्याही क्षणैक वलयाच्या मागे न लागता माने त्यांनी आयुष्यभर कुस्ती हेच आपले ध्येय ठेवले आणि त्याप्रमाणेच ते वागत आले.

 

लाल मातीमध्ये रंगून जाणाऱ्या या बलदंड माणसाच्या मनाचा एक कोपरा हळुवार होता आणि तो हळवेपणा त्यांच्या बासरी वादनातून व्यक्त होत राहिला.

 

मारुती माने यांचे २७  जुलै २०१० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

   📕 वडस म्हणजे काय ? 📕

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

वडस हा डोळ्यांचा विकार आहे. तुम्ही काही लोकांच्या डोळ्यात पांढुरका पडदा पाहिला असेल. डोळ्यांच्या नाकाजवळच्या भागापासून बुबुळापर्यंत असणाऱ्या या पडद्याला वडस असे म्हणतात.

 

वडस होण्याचे मुख्य कारण म्हणजे वयोमानानुसार डोळ्यातील श्लेष्मल आवरणाच्या खालील पेशी व उतींमध्ये होणारे हानिकारक बदल हे होय. सामान्यतः प्रौढ पुरुषांना हा रोग होतो.

 

वडस म्हणजे डोळ्यातील श्लेष्मल आवरणाची एक त्रिकोणाकृती घडीच असते. ती बुबुळापर्यंत व कधीकधी बाहुलीच्या वरच्या बाजूपर्यंत वाढते. बाहुलीवर या पडद्याची वाढ झाल्यास दिसायला त्रास होतो. डोळ्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्याने क्वचित एका ऐवजी दोन वस्तू दिसायला लागतात.

 

वडसाचा आकार जर वाढत नसेल व त्यामुळे दिसायला त्रास होत नसेल, तर उपचार करण्याची आवश्यकता नसते. वडसाचा आकार जर वाढत असेल वा दिसायला त्रास होत असेल, तर मात्र उपचार करणे गरजेचे असते. यात शस्त्रक्रिया करावी लागते. ही सोपी शस्त्रक्रिया असून यात वाढलेला पडदा कापून टाकतात. वडस उपचाराने नक्कीच बरा होतो.

 

डाॅ. अंजली दिक्षित व डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन

 

संकलक - दिपक तरवडे

 

https://m.facebook.com/vidnyandinvishesh

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

************

२७ जुलै - ट्रॅफिक सिग्नल चे निर्माता गरेट मोरगन स्मृतिदिन

************

 

जन्म - ४ मार्च १८७७

मृत्यू - २७ जुलै १९६३

 

Garrett Augustus Morgan, Sr. was an African American inventor and community leader. His most notable inventions included a type of protective respiratory hood (or gas mask), a traffic signal, and a hair-straightening chemical. He is renowned for a heroic rescue in 1916 in which he and three others used the safety hood device he had developed to save workers trapped within a water intake tunnel, fifty feet beneath Lake Erie. He is also credited as the first African American in Cleveland, Ohio, to own an automobile.

 

जगाच्या पाठीवर कुठेही जा, वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांचे रंग बदलत नाहीत. त्या ठिकाणी बोलली जाणारी भाषा कितीही वेगळी असो, त्यातलं ओ की ठो आपल्याला कळत नाही अशी परिस्थिती उद्भवो, वाहतूक दिव्यांची भाषा काही बदलत नाही. चालतं वाहन थांबवण्यासाठीचा सिग्नल लाल रंगाचा, तर थांबलेल्या वाहनाला वाट मोकळी करून देणारा दिवा हिरव्या रंगाचा हे समीकरण सगळीकडे सारखंच असतं.

 

आपण दुसऱ्याशी संवाद साधतो तो नेहमीच शब्दांद्वारे किंवा भाषेच्या माध्यमातून साधतो असं नाही. हातवारेही बरंच काही सांगून जातात. डोळ्यांच्या भाषेबद्दल तर काय बोलावं ! ती भाषा नसती तर असंख्य लैला-मजनूंची शिरी-फरहादची पंचायतच झाली असती. रंग हेही संवादाचं असंच एक माध्यम आहे. या रंगकरवी आपल्याला नेहमीच काही संदेश मिळत असतात. कोणता रंग कोणता संदेश देतो हे थोडंफार आपापल्या सांस्कृतिक शिकवणीवर अवलंबून आहे हे खरं असलं तरी विशिष्ट रंग विशिष्ट भावना मनात उत्पन्न करतात हेही मानसशास्त्रज्ञ आणि मज्जाशास्त्रज्ञांनी पडताळून पाहिलं आहे.

 

वाहतुकीच्या दिव्यांच्या रंगांची निवड आपल्या नजरेला कोणते रंग अधिक स्पष्ट दिसतात यावरून ठरवले गेले असावेत, असा सर्वसाधारण समज आहे. तो अगदीच चुकीचा नाही हे खरं असलं तरी ते या रंगांच्या निवडीपाठचं सगळ्यात महत्त्वाचं कारण नाही. रंगांमुळे उत्पन्न होणाऱ्या मानसिक ऊर्मीचं महत्त्व त्यापेक्षा जास्त आहे.

 

आज जरी रस्त्यावरच्या वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या दिव्यांसाठी हे रंग वापरले जात असले तरी त्यांची पहिली निवड लोहमार्गावरील वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी झाली होती. एकाच रुळावरून असंख्य गाड्या एकाच वेळी जात असतात. त्यामुळे पुढचा मार्ग मोकळा आहे हा संदेश इंजिनचालकाला देण्यासाठी जेव्हा सिग्नल वापरायला सुरुवात झाली तेव्हा या रंगांची निवड करण्यात आली. तीच पुढं रस्त्यावरच्या वाहतुकीसाठीही वापरण्यात येऊ लागली.

 

पुढं जाणं धोक्याचं आहे, गाडी थांबवा, असा संदेश देण्यासाठी लाल रंगांची निवड करण्यात आली ती तो रंग रक्ताचा असल्यामुळं. अनादिकाळापासून या रंगाची आणि धोक्याची सांगड घालण्यात आली आहे. हा रंग पाहिला की रक्ताची आणि त्यामुळं रक्तपाताची, धोक्याची भावना मनात जागृत होते. माणूस उत्तेजित होतो. त्याची नाडी वेगात धावू लागते. रक्तदाब वाढतो. भयापोटी वाहू लागणाऱ्या संप्रेरकांचा पाझर सुरू होतो. हे अजमावलं गेलं आहे. त्यामुळे 'थांबा' या संदेशासाठी या रंगाची निवड आपोआप झाली.

 

'धोका टळला आहे', 'आता जायला हरकत नाही' या आदेशांसाठी सुरुवातीला पांढऱ्या रंगाची निवड केली गेली होती; पण तो रंग आणि सूर्याप्रकाशाचा किंवा रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशाचा रंग यांच्यात गोंधळ उडू लागल्यामुळे मग त्यापेक्षा वेगळा तसंच, लाल रंगांपेक्षाही वेगळा असलेल्या हिरव्या रंगाची निवड केली गेली. या रंगाचा संबंध शांततेशी असल्यामुळे, तो रंग बघितला की मनातही शांत भाव निर्माण होतात.

 

या दोन्ही रंगांपेक्षा वेगळा आणि त्यांच्यामध्ये असणारा रंग पिवळा म्हणून मग त्याची निवड दक्षतेसाठी करण्यात आली.

 

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

 

************

२७ जुलै - शास्रज्ञ जॉन डाल्टन स्मृतिदिन

************

 

जन्म - ६ सप्टेंबर १७६६ (इंग्लंड)

स्मृती - २७ जुलै १८८४

 

जॉन डाल्टन हे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होते. 'आधुनिक अणु सिद्धांता' मांडण्यासाठी जॉन डाल्टनची ओळख आहे.

 

डाल्टनचा जन्म क़्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या कुम्बरलॅन्ड प्रदेशातील कॉकरमाऊथ च्या जवळ असलेल्या इगल्सफील्ड या गावी ६ सप्टेंबर १७६६ रोजी झाला. त्याचे वडील विणकर होते. डाल्टनचे शिक्षण गावाजवळच असलेल्या पर्डशाव-हॉल खाजगी शाळेत झाले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी डाल्टन मॅंचेस्टरच्या नव महाविद्यालय” (न्यू कॉलेज) येथे निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित विषय शिक्षक पदावर रुजू झाला. येथे तो त्याच्या वयाच्या चौतिसाव्या वर्षापर्यंत काम केले. निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित याच विषयात, खाजगी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे असे डाल्टननी ठरविले आणि प्रारंभ केले.

 

अर्थार्जनासाठी निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित या विषयात काम करीत असला तरी त्याच्या आवडीचा विषय म्हणजे हवामानशास्त्र. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांना भेटी देऊन तेथील हवामानासंबंधी माहिती एकत्र करण्याचा त्याला छंद होता. हवेतील वायू घटक पृथ्थकरण करण्याच्या निमित्ताने, डाल्टनला रसायन शास्त्राची गोडी लागली.

 

त्या काळात, हायड्रोजन वायु हा सर्वात हलका असल्याचे ज्ञात होते. याच माहितीचा आधार घेऊन डाल्टननी इतर वायू (इथिलीन, मिथेन, ऑक्सिजन, अमोनिया, इत्यादी), अभ्यासाकरिता निवडले. मिथेन या वायुच्या अभ्यासादरम्यान डाल्टनला अणु कल्पना सुचली असल्याचे बऱ्याच माहिती स्रोतामध्ये आढळते.

 

प्रयोगातील आपल्या सर्व निरीक्षण नोंदींच्या आधारे डाल्टननी प्रथमतः हवेतील सर्व वायूंचे रासायनिक वर्गीकरण केले. 'हवेतील वायूंचे रासायनिक वर्गीकरण' या शीर्षकांतर्गत डाल्टननी ३० ऑक्टोबर १८०१ रोजी, एक पुस्तक प्रकाशित केले.

 

डाल्टनच्या मते, पदार्थाचा लहानात लहान (ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही) घटक म्हणजे अणु. एकाच मूलद्रव्याचे सर्व अणु सारखेच असतात. दोन मूलद्रव्यांचे अणु संयोगाने तयार होणारा पदार्थ भिन्न गुणधर्म दाखवितो.

 

सर्व रासायनिक पदार्थांची अणु रचना स्पष्ट करण्याकरिता, डाल्टननी पुढे, अणु सिद्धांत मांडला. 'अणुचे विभाजन करता येत नाही' हे एकच तत्व, आधुनिक विज्ञानाला अमान्य आहे. डाल्टनच्या अणु-वादातील इतर सर्व तत्व, सर्वामान्य आहेत.

 

जॉन डाल्टन, सृष्टीचे 'रासायनिक आणि भौतिक' मूळ रचना प्रस्तावित करणारा एक नवा विज्ञान यात्री”.

 

२७ जुलै १८४४ रोजी जॉन डाल्टनचे निधन झाले.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

 

************

२७ जुलै - गणितज्ञ पांडुरंग वासुदेव सुखात्मे जन्मदिन

************

 

जन्म - २७ जुलै १९११ (सातारा)

स्मृती - २८ जानेवारी १९९७ (पुणे)

 

पोषक आहारतज्ज्ञ म्हणून नाव झालेले संख्याशास्त्रज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या कारकिर्दीचा आरंभ झाला तो कृषी संशोधन संख्याशास्त्रज्ञ म्हणून. लंडन युनिव्हसिर्टी कॉलेज मधून पीएच्.डी. (१९३६) व डी.एस्सी. (१९३९) ह्या अत्युच्च पदव्या संपादन केल्यावर आपल्या ह्या ज्ञानाचा उपयोग भारतातल्या गरीब जनतेस व्हावा म्हणून सुखात्मे यांनी सुखाच्या प्राध्यापकी ऐवजी कर्तबगारीस आव्हान देणारं शेतकी संशोधनक्षेत्र नोकरीसाठी निवडलं. त्याचबरोबर जागतिक भूक, अपुरा आहार, कुपोषण यांच्या जोडीनं विशेषत: सेवानिवृत्ती नंतर गरीबांसाठी पोषक आहाराकरिता 'इंदिरा कम्युनिटी किचन', खेड्यातली स्वच्छता यांसारखे प्रकल्प राबवले.

 

त्यासाठी लंडनला शिकताना, विषयाच्या सैद्धांतिक बाजूऐवजी त्यांनी नमुना निवड पाहणी, सवेर्क्षणाचं पद्धतीशास्त्र अशा कौशल्यांचा उपयोग करून पशुसंवर्धन, दुग्धोत्पादन, एकरी पिकांचा अंदाज, जागतिक भूक इ. सामान्य माणसाच्या जीवनाशी भिडणाऱ्या मूलभूत प्रश्नांकडं आपल्या संशोधनाची दिशा वळवली.

 

भारतात परतल्यावर 'अ. भा. स्वास्थ्य व सार्वजनिक आरोग्य' या कोलकात्याच्या संस्थेत केलेल्या पहिल्याच नोकरीत, डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवातून सुखात्म्यांना सैद्धांतिक तत्त्वांची व्यवहारोपयोगी उदाहरणांशी सांगड घालण्याची सवय लागली. पुढं दिल्लीच्या 'भारतीय कृषीसंशोधन मंडळात' (ICAR) संख्याशास्त्र सल्लागार म्हणून नियुक्त झाल्यावर सुखात्मे यांनी नमुना निवड पाहणी व जीवमितीशास्त्र या दोन्हींत बारकाईनं लक्ष घातलं. त्या आधारे उत्तर प्रदेशातल्या इटाह इथं ब्रिटिश प्रजनन तज्ज्ञांच्या प्रमुखत्वाखाली चाललेला शेळीच्या दुधाचा, तोपर्यंत यशस्वी मानला गेलेला प्रकल्प, वाषिर्क संख्याशास्त्रीय विश्लेषणाअभावी फसल्याचा सुखात्म्यांचा धक्कादायक निष्कर्ष पचवणं अधिकाऱ्यांना जड गेलं. पण त्यातून सावरल्यावर ह्या अधिकाऱ्यांनी त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या मंडळींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुखात्म्यांवर टाकली.

 

ह्या प्रशिक्षण कार्यक्रमास बळकटी यावी म्हणून 'स्टॅटिस्टिकल मेथड्स् फॉर अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च' हे कृषी विद्यापीठं व महाविद्यालयातून लोकप्रिय ठरलेलं व पुढं ज्याची स्पॅनिश आवृत्ती निघाली, ते पुस्तक सुखात्मे यांनी लिहिलं.

 

डॉ. सुखात्मे यांनी व्यावहारिक उपयोगासाठी नमुना निवड पाहणी व पद्धतीशास्त्रविषयक जे अनेक नवीन उपक्रम भारतात विकसित केले, त्यांची कीर्ती युनोच्या FAO पर्यंत जाऊन धडकली. त्यामुळं त्या संघटनेनं सुखात्मे यांना आग्नेय आशियातल्या सरकारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण केलं.

 

कृषी सवेर्क्षणाच्या संदर्भात भूखंडाचा आकार आणि विस्तार याबद्दल सुखात्मे यांचे अग्रगण्य संख्याशास्त्रज्ञांशी तात्त्विक मतभेद झाल्यावर त्या मंडळींनी, संशोधनाच्या कोणत्याही उपयोजित क्षेत्रातला संख्याशास्त्रीय प्रस्ताव एका केंदीय यंत्रणेनं मंजूर केल्याशिवाय पुढे जाऊ नये असा धोरणात्मक निर्णय केंदशासनाकडून पारित करवून घेतला. त्यामुळे सुखात्मे यांचे बरेच अधिकार काढून घेतले गेले. तसेच कृषीसंशोधनात जवळजवळ संस्था म्हणून कार्यरत असणाऱ्या ICARचं 'इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स्' असं नामांतर करण्यास वरील तज्ज्ञांसह केंद सरकारातल्या डुढ्ढाचार्यांचा विरोध. ह्या दोन्ही कारणांसाठी सुखात्म्यांची घुसमट वाढली व हा कोंडमारा इत:पर सहन होणार नाही म्हणून १९४८ पासून त्यांना आलेलं FAOचं संख्याशास्त्र प्रमुखपद स्वीकारून ते १९५१ साली रोम इथं रुजू झाले.

 

FAOत दाखल झाल्यानंतर सुखात्मे यांनी विविध देशांना नेमून दिलेले कार्यक्रम तर फलदूप झालेच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे FAOचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते सरसंचालक लॉर्ड बॉईड यांनी विकसनशील देशातला अपुरा आहार, भूक व प्रथिनांची कमतरता लक्षात घेऊन, जगातले दोन तृतीयांश लोक भुकेनं बेजार होतात, हा काढलेला निष्कर्ष खोटा ठरवून त्यांनी प्रतिवादासाठी भुकेनं गांजलेल्या २० ते ३० वयोगटाच्या अन्नग्रहण आकडेवारीच्या मदतीनं अशी माणसं फक्त २० टक्केच असल्याचा दावा केला. अर्थातच FAOतल्या वरिष्ठांच्या विरोधात जाणारा हा निर्णय त्यांच्या गळी उतरवण्यासाठी डॉ. सुखात्मे यांना, 'जागतिक भूक' हा या कामावर लिहिलेला निबंध वरिष्ठ नामवंत संख्याशास्त्रज्ञ हजर असलेल्या 'रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी' 'न्युट्रिशनल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन' यांच्या संयुक्त सभेपुढं २७ मे १९६१ रोजी वाचून अग्निपरीक्षा द्यावी लागली. या दिव्यातून ते सहीसलामत बाहेर पडले इतकंच नव्हे तर, पुढं या दोन्ही संस्थांनी त्यांना 'गाय पदकानं' सन्मानित केलं.

 

डॉ. सुखात्मे यांच्या विशेष कामात, मुंबई विद्यापीठात, संख्याश

 

ास्त्र विभाग काढण्यात (१९४८) त्यांनी पुढाकार घेतला व इकडच्या तरुणांना संख्याशास्त्रीय नोकऱ्यांची दार खुली करून दिली याचा उल्लेख अनिवार्य आहे.

 

सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात स्थायिक झाल्यावर आपल्या ज्ञानाचा गोरगरीबांना उपयोग करवून देण्याचं ठरवलं. कारण विलायतेहून आल्यावर त्यांना पं.मदनमोहन मालवीय यांनी 'आपल्या गरीब देशाला तुमच्या ह्या ज्ञानाचा उपयोग कसा होईल?' विचारलेला हा प्रश्न कायम त्यांच्या कानात गुंजारव करीत होता.

 

त्यासाठी १) पुण्याच्या मंडईत 'इंदिरा कम्युनिटी किचन' हा अत्यंत अभिनव व पथदर्शक कार्यक्रम राबवून त्यात दुर्बल घटकांना रोजगार व गरीबांना आपण घरी रोज जे अन्न खातो तो प्रथिनयुक्त आहार २० ते २५ टक्के इतक्या स्वस्त दरानं पुरवला. २) खेडी व झोपडपट्ट्यांतली रोगराई निपटून काढण्यासाठी स्वच्छता व आरोग्य याकडं लक्ष देऊन त्यांचं जीवनमान पालटण्यासाठी सुखात्मे यांनी पुण्याजवळ किर्कतवाडी इथं १९७९ साली, शाळेजवळील कचऱ्याचे ढीग हलवून मुलांना होणाऱ्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त केला. गावात संडास व मुताऱ्या बांधून देऊन खेडूतांना उघड्यावर घाण करण्यातले धोके समजावले. विहिरीत क्लोरीन टाकून पिण्याचा स्वच्छ पाण्याची सोय केली. त्याचे अपेक्षित परिणाम दिसून आले.

 

पां. वा. सुखात्मे यांचे २८ जानेवारी १९९७ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट/स.पां. देशपांडे

 

************

 

************

२७ जुलै - अभिमान चित्रपट प्रदर्शीत

************

 

२७ जुलै १९७३ साली 'अभिमान' चित्रपट प्रदर्शीत झाला.

 

हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटा पैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला 'अभिमान' चित्रपट.

 

सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.

 

दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटा मध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती.

 

'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस.डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते.

 

चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान' ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती.

 

तेरे मेरे मिलन की ये रैना, पिया बिना; या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

 

'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर' तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२७ जुलै - फ्रेडरिक बैटिंगने इंशुलिनचा शोध लावला

************

 

२७ जुलै १९२१

 

मधुमेह अर्थात डायबेटीस, आपल्या सर्वांच्या चांगल्या परिचयाचा आजार. त्याने गेल्या अर्धशतकात समाजात जे काही थैमान घातले आहे त्याला तोड नाही. जगभरातील असंख्य लोक मधुमेहाने त्रस्त आहेत आणि त्यावरील विविध उपचार घेत आपले आयुष्य कंठत आहेत.

 

ढोबळमानाने मधुमेहाचे दोन प्रकार पडतात- प्र.१ आणि प्र.२. पहिल्या प्रकारातील रुग्णांना. जगण्यासाठी इन्सुलिनचे उपचार घ्यावेच लागतात. तर दुसऱ्या प्रकारच्या रुग्णांसाठी निरनिराळ्या गोळ्या उपलब्ध आहेत; पण जर का अशा गोळ्यांनी त्यांचा आजार आटोक्यात आला नाही तर मात्र त्यांनाही इन्सुलिनचे पाय धरावे लागतात. म्हणजेच हा आजार काबूत ठेवण्यासाठी इन्सुलिन हे एक प्रभावी अस्त्र आहे हे निःसंशय.

 

तर मधुमेहींसाठी वरदान ठरलेल्या या इन्सुलिनचा शोध कसा लागला, त्यासाठी कित्येक वैज्ञानिकांनी त्यांचे आयुष्य कसे खर्ची घातले, या क्रांतिकारक शोधासाठी दिले गेलेले नोबेल पारितोषिक आणि त्यावरून सबंधित वैज्ञानिकांमध्ये झालेले रुसवेफुगवे हा सगळा इतिहास मोठा मनोरंजक आहे. सर्वसामान्य वाचकांसाठी त्याचा आढावा या लेखात घेत आहे.

 

मधुमेह हा अतिप्राचीन आजार असून इसवीसनपूर्व काळापासून त्याच्या नोंदी सापडतात. Celsus या ग्रीक संशोधकाने खूप प्रमाणात लघवी होणाऱ्या आणि त्याच्या जोडीला शरीराचे वजन प्रचंड घटणाऱ्या रुग्णांची नोंद घेतल्याचा उल्लेख आढळतो . Memphites या संशोधकाने डायबेटीसहा शब्द प्रथम वापरला आणि त्याच्या मते हा आजार मूत्रपिंडातील बिघाडाने होत असावा. डायबेटीसचा शब्दशः अर्थ असा की शरीरातले खूप मांस जणू काही वितळून लघवीवाटे निघून जाते. त्यानंतरचे महत्वाचे निरिक्षण हे आपल्या चरक आणि सुश्रुत या वैद्यांनी केले. त्यांनी अशा रुग्णांचे जेव्हा बारकाईने निरिक्षण केले तेव्हा त्यांना एक महत्वाची गोष्ट आढळली. या रुग्णांच्या लघवीचे जे अंश मुतारीत राहत असत त्यांच्या बाजूस मुंग्या गोळा होत. त्यातूनच या रुग्णांची लघवी ही चवीला गोड असल्याचा निष्कर्ष निघाला.

 

त्यापुढे जाऊन चीनच्या Tchang Tchong-King यांनी या रुग्णाची भूक प्रचंड वाढलेली असल्याची नोंद केली. नंतर Avicenna या अरेबिक डॉक्टरने या आजाराची सर्व वैशिष्ट्ये एकत्रित प्रसिद्ध केली. त्यांच्या मते तर या आजाराचे मूळ मज्जासंस्था आणि यकृतातील बिघाडात होते. तर Sydenham यांच्या मते या आजाराचे मूळ अन्नातील काही घटकांच्या अपचनात होते. अशा प्रकारे इजिप्त, पर्शिया, चीन, भारत, ग्रीस, जपान आणि कोरिआ येथील अनेक संशोधक शर्थीने मधुमेहाची कारणमीमांसा करीत होते. पण, त्याचे समाधानकारक उत्तर मात्र मिळत नव्हते.

 

अखेर १६८२ मध्ये इंग्लंडमधील Johann Brunner यांनी एक अनोखा प्रयोग एका कुत्र्यावर करून ही कोंडी फोडली. त्यांचा असा अंदाज होता की मधुमेहाचा संबंध स्वादुपिंडाशी (pancreas) असावा. मग त्यांनी त्या कुत्र्याच्या शरीरातील स्वादुपिंड काढून टाकले आणि मग त्याचे निरिक्षण केले. आता त्या कुत्र्याला भरपूर लघवी होऊ लागली व तो प्रचंड तहानलेला होता. यातून पुढील संशोधनाला निश्चित अशी दिशा मिळाली.

 

प्रमाणाबाहेर लघवी होणाऱ्या रुग्णांची आता बारकाईने तपासणी होऊ लागली. तशी भरपूर लघवी होण्याची अनेक कारणे असू शकतात. तेव्हा अशा रुग्णांची लघवी गोडच आहे याची खात्री करणे जरूरीचे होते. त्यासाठी दवाखान्यात लघवी चाखणाऱ्याव्यक्तीची नेमणूक केलेली असे. १९वे शतक संपताना पुरेशा प्रयोगशाळा चाचण्या उपलब्ध झाल्या आणि मग हा लघवीतील गोडपदार्थ ग्लुकोजअसल्याचे सिद्ध झाले.

 

या दरम्यान जर्मनीतील अवघा बावीस वर्षांचा एक तरुण संशोधक Paul Langerhans यांनी स्वादुपिंडाचा सखोल अभ्यास चालू केला. तेव्हा त्यांना त्या इंद्रियात एक विशिष्ट पेशींचा पुंजका (islet) आढळून आला. अर्थात या पुंजक्यातून नक्की कोणता स्त्राव बाहेर पडतो हे मात्र समजत नव्हते. त्या पुंजक्यासंबंधी खोलात जाऊन संशोधन केल्यास नक्की काहीतरी खजिना हाती लागेल, असे बऱ्याच संशोधकांना वाटून गेले.

 

मग १९१०-१९२० च्या दरम्यान पाश्चिमात्य जगातील अनेक संशोधक स्वादुपिंडातील त्या पुंजक्यांवर अक्षरशः तुटून पडले आणि त्यावर जोमाने काम करू लागले. त्यामध्ये प्रामुख्याने बुखारेस्टचे Paulescu यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी प्राण्यामधील स्वादुपिंड वेगळे काढून त्याचा अर्क बनवला आणि तो अर्क नंतर जिवंत प्राण्यामध्ये टोचला. त्या अर्काचा परिणाम तात्काळ दिसला. रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले. अनेक प्रयोगांती Paulescu यांची खात्री पटली की तो अर्क हेच मधुमेह आटोक्यात ठेवण्याचे प्रभावी औषध आहे. त्यांनी वेगाने आपले त्यावरील तीन शोधनिबंध वैद्यकीय विश्वात दाखल केले.

 

नंतर अनेकांनी तसा अर्क वापरून त्याच्या गुणधर्माची खात्री केली. पण तो अर्क क्रूडस्वरूपाचा असल्याने त्याचे अन्य दुष्परिणा

 

मही वाईट होते. त्यामुळे काही काळ हे संशोधन ठप्प झाले होते. आता गरज होती ती म्हणजे तो अर्क शुद्ध करून त्यातून नेमके उपयुक्त रसायन वेगळे काढण्याची.

 

हा मुद्दा Frederick Banting या तरुण सर्जनने गांभीर्याने घेतला. कॅनडात जन्मलेला हा तरुण वृत्तीने धाडसी होता. त्याने पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवून मिलिटरी क्रॉसप्राप्त केला होता. आता त्याची मूलभूत संशोधनाची आवड त्याला स्वस्थ बसू देईना. ते रसायन वेगळे काढण्याचा त्याने ध्यास घेतला. अर्थात त्यासाठी त्याला एखाद्या बुजुर्गाचे मार्गदर्शन लागणार होते.

 

मग त्याने त्याच्या देशातील ज्येष्ठ प्राध्यापक JJR Macleod यांची भेट घेतली. पहिल्यांदा Macleod यांनी त्या पोरसवदा तरुणाकडे पाहून चक्क नकारार्थी मान हलवली. याआधी कित्येक रथी-महारथी हे काम करू शकलेले नसताना संशोधनातील ओ का ठो कळत नसलेला हा बावीस वर्षाचा तरुण काय दिवे लावणार आहे असेच त्यांना मनोमन वाटत होते. पण Banting ने त्यांचा पिच्छा सोडला नाही. अखेर त्याच्या मनधरणीला यश आले आणि Macleod नी त्याला त्यांच्या सुसज्ज प्रयोगशाळेत उन्हाळी सत्रात त्याला संशोधनाची परवानगी दिली.

 

त्याच्या दिमतीला प्रयोगांसाठी लागणारी भरपूर कुत्री आणि Charles Best हा पदव्युत्तर विद्यार्थी हे होते. खरे तर Charles Best हा अगदी नाराजीनेच या कामात सहभागी झाला. त्याच्या बॉसने लादलेली नवी झकझक त्याला मनातून नकोशी होती. अखेर Macleod यांच्या अधिपत्याखाली हे काम १७ मे १९२१ ला झोकात सुरू झाले.

 

पुढील दोन महिने हे संशोधक रात्रंदिवस प्रयोगशाळेत झटत होते. कुत्र्याच्या स्वादुपिंडापासून अर्क बनवला गेला व त्याची चाचणीही कुत्र्यावर घेतली गेली. अखेर ते या निष्कर्षाला पोचले की त्या पुंजक्यांच्या अर्कातच एक औषधी द्रव्य आहे जे मधुमेह आटोक्यात ठेवते. त्या द्रव्याला त्यांनी आयलेटीन’ (Isletin) असे नाव दिले. त्याचेच पुढे इन्सुलिनअसे नामकरण झाले आणि ते एक हॉर्मोन असल्याचेही सिद्ध झाले.

 

संशोधन अद्याप चालूच होते. आता तेच प्रयोग गाय व बैल यांच्यावरही करण्यात आले व त्यास तसेच यश मिळाले. आता तो अर्क जास्तीत जास्त शुद्ध करणे आवश्यक होते. त्या कामासाठी J.Collip या जीवरसायनशास्त्रज्ञाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या अनेक प्रयोगांती आता तो अर्क शुद्ध स्वरूपात तयार झाला.

 

आता पुढची महत्वाची पायरी होती ती म्हणजे त्या अर्काचा प्रयोग मधुमेही माणसावर करणे. ती संधी लवकरच चालून आली. टोरंटोच्या रुग्णालयात १४ वर्षांचा एक मुलगा तीव्र मधुमेहाने मरणासन्न अवस्थेत पडून होता. त्याच्यावर या अर्काचे दोन-तीन वेळा प्रयोग केल्यावर त्याच्या तब्बेतीत चांगली सुधारणा दिसली. लगोलग इतर अनेक मधुमेहींवर ते प्रयोग झाले आणि इन्सुलिनच्या परिणामावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

 

टोरंटोच्या या प्रकल्पाची कीर्ती आता दूरवर पसरू लागली होती. नोव्हेंबर १९२१ मध्ये डेन्मार्कच्या प्रा. August Krogh जे स्वतः १९२० चे नोबेलविजेते होते यांनी या प्रकल्पाला भेट दिली. Macleod यांच्या चमूने केलेले जबरदस्त काम पाहून ते खूप प्रभावित झाले. त्यांना इन्सुलिनमध्ये खूपच रस होता कारण त्यांची पत्नी मधुमेहाची रुग्ण होती. पूर्ण विचारांती Krogh यांनी या चमूची नोबेल-समितीकडे जोरदार शिफारस केली.

 

१९२२ चे नोबेलहे इन्सुलिनच्या शोधासाठी द्यायचा समितीचा निर्णय पक्का झाला. पण, नक्की किती जणांना ते द्यायचे यावर खूप वादंग झाला. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ कित्येक संशोधक या शोधासाठी झटत होते. स्वादुपिंडातील पुंजका शोधण्यापासून ते इन्सुलिन शुद्ध स्वरूपात मिळवण्या पर्यंत संशोधनाची प्रत्येक पायरी महत्वाची होती. त्यामुळे हे नोबेलकोणाला द्यायचे ही समितीपुढची खरोखर डोकेदुखी होती.

 

अखेर बऱ्याच काथ्याकूटानंतर हे पारितोषिक Frederick Banting आणि JJR Macleod यांना विभागून जाहीर झाले. त्यामध्ये Best चा समावेश न झाल्याने Banting खूप नाराज झाले. पण त्यांनी आपल्या वाट्याच्या बक्षिसाची निम्मी रकम Best ना दिली. तसेच Macleod नी सुद्धा आपली निम्मी रकम Collip ना दिली. या कृतीबद्दल या दोघा विजेत्यांना दाद दिली पाहिजे.

 

हे नोबेल जाहीर होताच जगात इतरत्रही नाराजीचे सूर उमटले. Zuelger आणि Paulescu यांनी त्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त केला आणि बक्षिसातील काही वाटाआपल्याला मिळण्याची इच्छा व्यक्त केली.

 

एकूण काय तर कुठलाही जागतिक सन्मान हा वादाच्या भोवऱ्यात सापडतोच. असो. Frederick Banting आणि JJR Macleod हे या मानाच्या नोबेलमुळे अजरामर झाले. पण त्यांच्या शोधाचा मूळ पाया हा Langerhans ने स्वादुपिंडातील त्यापेशींचा पुंजका शोधून आधी घातला होता. हा पुंजका म्हणजेच इन्सुलिनची जननी होय. तेव्हा त्या पुंजक्याला Langernans चे यथोचित नाव (islets of Langerhans) देउन वैद्यकविश्वाने त्यालाही अजरामर केले आहे.

 

त्यानंतर इन्सुलिनचे उत्पादन औषध-उद्योगांनी सुरू केले. हे इन्सुलिन गाय

 

, म्हैस किंवा डुक्कर यांच्या स्वादुपिंडापासून बनवले जाई. ते मधुमेहावर गुणकारी असे पण, जेव्हा ते माणसाच्या शरीरात टोचले जाई त्यानंतर काही allergy उत्प्पन्न होई. आता यापासून सुटका मिळवायची तर मानवी इन्सुलिनतयार करणे आले. हा संशोधनातील पुढचा टप्पा होता. इन्सुलिनची गरज मोठी असल्याने ते विपुल प्रमाणात प्रयोगशाळेत तयार करता यायला हवे होते.

 

जेव्हा जैवतंत्रज्ञान ही शाखा पुरेशी विकसित झाली तेव्हा हा प्रश्न सुटला. मानवी इन्सुलिनचे जनुक (gene) वेगळे करून त्यापासून प्रयोगशाळेत मोठ्या प्रमाणावर इन्सुलिनचे उत्पादन सुरू झाले. हे यशस्वी व्हायला १९८३ साल उजाडले. किंबहुना जैवतंत्रज्ञानाचा वापर करून मानवी उपयोगासाठी बनवलेले इन्सुलिन हे पहिले औषध ठरले.

 

आज जगभरात असंख्य मधुमेही इन्सुलिन घेत आहेत. या रुग्णांच्या दृष्टीने कटकटीची बाब म्हणजे ते इंजेक्शनने घ्यावे लागते. दीर्घ काळ त्वचेला सुया टोचून टोचून रुग्ण जेरीस येतो. इंजेक्शनच्या पुढच्या ज्या आधुनिक पद्धती निघाल्या आहेत त्यात इन्सुलिन पंपवगैरेचा समावेश होतो. असे पंप त्वचेखाली बसवून घ्यावे लागतात. म्हणजेच रुग्णांचे दृष्टीने तेही फारसे सुखकारक नाही. परत पंपाची काही लाख रुपयांच्या घरातील किंमत आणि त्याच्या देखभालीचा खर्च हे महागडे प्रकरण आहे.

 

कोणतेही औषध घ्यायचा सर्वात सुखकारक मार्ग म्हणजे त्याची गोळी तोंडातून घेणे (Oral Insulin). इथे इन्सुलिनच्या बाबतीत मोठा अडथळा आहे. पारंपरिक औषध-पद्धतीने त्याची गोळी बनवल्यास ती आपल्या पचनसंस्थेतून शोषली जात नाही. तेव्हा शोषली जाईल अशी गोळी बनवणे हे यापुढचे मोठे आव्हान आहे. अनेक औषध-उद्योग त्यासाठी १९९० पासून झटत आहेत. हे काम अजिबात सोपे नाही. सर्व उपलब्ध तंत्रज्ञान त्यासाठी पणाला लावले जात आहे.

 

२००६च्या दरम्यान काही उद्योगांनी नाकातून फवारा मारायचे इन्सुलिन तयार केले होते. पण ते फारसे समाधानकारक न ठरल्याने वापरातून बाद करण्यात आले. आता पुन्हा एकदा संशोधकांनी तोंडाने घ्यायचे इन्सुलिन बनवण्यासाठी कंबर कसली आहे. नेटाने प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी आता nanotechnology चा वापर करण्यात येत आहे. हे प्रयोग नजीकच्या काळात यशस्वी होतील अशी आशा आहे.

 

तर वाचकहो, अशी ही इन्सुलिनची जन्मकथा आणि त्याच्या प्रगतीचा आलेख. मधुमेहींसाठी अत्यंत प्रभावी आणि वेळप्रसंगी जीवरक्षक असे हे औषध आहे. १९२२ला त्याचा अधिकृतपणे जन्म झाला. तेव्हा आतापासून अवघ्या पाच वर्षांवर त्याची जन्मशताब्दी येऊन ठेपली आहे. ती शताब्दी साजरी होण्यापूर्वीच तोंडाने घ्यायचे इन्सुलिन रुग्णांसाठी तयार होवो, अशी सदिच्छा व्यक्त करून हा लेख संपवतो.

आज २७ जुलै

आज दक्षिण भारतातील लोकप्रिय गायिका #केएसचित्रा यांचा वाढदिवस.

जन्म.२७ जुलै १९६३ तिरुवनंतपुरम येथे.

के एस चित्रा यांचे पूर्ण नाव कृष्णन नायर शांतिकुमारी चित्रा. एका संगीतकार परिवारात जन्मलेल्या चित्रा यांनी आपल्या गायनाचे पहिले धडे आपले वडील कृषणन नायर यांच्या कडून घेतले. चित्रा यांनी कर्नाटक संगीतात शिक्षण घेतल्यावर त्या केरळ विश्वविद्यालयात संगीत शिकवण्यास सुरुवात केली. मल्याळम चित्रपटाचे प्रसिद्ध संगीतकार एम. जी. राधाकृष्णन यांनी के एस चित्रा यांना  त्यांच्याअत्ताहसमस्नेहापुरमम मीरानंजन एकानानुमध्ये संधी दिली. प्रसिद्ध तमिळ संगीतकार इलाईराजा यांनी के एस चित्रा यांना नेथन अनंत कुयिलया त्यांच्या  तमिळ चित्रपटात गाण्याची संधी दिली.या अलावा के एस चित्रा यांना सलिल चौधरी, अनु मलिक, नदीम-श्रवण व ए आर रहमान यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. के एस चित्रा यांनी 'लव', ‘प्यार तूने क्या किया','विरासत','अक्स','अशोका' 'रंगीला' अशा हिंदी चित्रपटात गाणी गायली आहेत. सारंगी वादक उस्ताद सुलतान खान यांच्या सोबत आलेला त्यांचा  अल्बम पिया बसंतीखूप लोकप्रिय झाला. के एस चित्रा यांनी भूपिंदर यांच्या बरोबर गुलजार यांचा अल्बम सनसेट पॉइंटमध्ये पण गायन केले आहे.

त्यांनी मल्याळम, कन्नड, तामिळ, तेलगू, उडिया, हिंदी, आसामी, बंगाली, संस्कृत, तुळु, उर्दू आणि पंजाबी या भाषेत गाणी गायली आहेत. के एस चित्रा यांनी या सर्व भाषेत मिळून ११००० हून अधिक गाणी गायली आहेत.के एस चित्रा यांना तामिळ चित्रपट सिंधु भैरवी’(१९८६), मल्याळम चित्रपट नखक्षथंगल’(१९८७),‘वैशाली’(१९८९), तामिळ चित्रपट मिनसारा कनवू’(१९९६) व हिंदी चित्रपट विरासत’(१९९७) या साठी सर्वश्रेष्ठ पार्श्व गायिके च्या श्रेणी मध्ये पाच वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित केले गेले आहे.

त्यांना आपल्या गायनासाठी सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार-दक्षिण आणि ३१ वेगवेगळे दक्षिण भारतीय राज्य चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

दक्षिण भारतीय चित्रपटातील पार्श्व गायनात सर्वाधिक गाणी म्हणणाऱ्या त्या पहिला महिला गायिका आहेत की ज्यांना दक्षिणी भारतातील चारही राज्य सरकार ने सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून गौरवले आहे.के एस चित्रा यांना दक्षिण भारताची छोटी बुलबुल आणि केरळची बुलबुल असे म्हणले जाते. चित्रा यांचे एक व्यापारी विजयशंकर यांच्या सोबत लग्न झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज दूरचिवाहिन्यांवर गाजलेल्या विविध मराठी मालिकांचे संवाद आणि पटकथालेखक दिग्दर्शक आणि अभिनेता #अभिजित_गुरू यांचा वाढदिवस.

जन्म. २७ जुलै १९८० नागपूर येथे.

अभिजित गुरू हे मुळचे नागपूरचे. नागपूरहून मुंबईला ते आले तेव्हा अभिनय करायचा हे डोक्यात होतेच. नागपूरला त्यांनी राज्य नाटय़स्पर्धेसाठी लेखन, दिग्दर्शन, अभिनय केला होता. मुंबईत आल्यानंतर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, चित्रा पालेकर यांच्याकडे साहाय्यक म्हणूनही काम केले आहे.अभिजित गुरू यांनी अवघाची संसारया मालिके द्वारे संवाद लेखनाला सुरुवात केली. त्यानंतर कशाला उद्याची बात’,‘अनामिका’, ‘लज्जा’,‘झुंज’,‘आभास हा’,‘देवयानी’,‘दोन किनारे दोघी आपण’,‘क्राइम डायरी’, ‘माझिया माहेरा’,‘लक्ष्य’, 'पुढचं पाऊल',‘माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे', 'ग्रहण', 'रंग माझा वेगळा', 'सुख म्हणजे नक्की काय असतं' आदी विविध मालिकांचे पटकथा लेखन गुरू यांनी केले आहे. पुढचं पाऊलया मालिकेच्या ९५० भागांसाठी पटकथा लेखन त्यांनी केले होते तर पुढे त्यांनी याच मालिकेसाठी ते कथा विस्तारलेखनाचे काम केले आहे. पुढचं पाऊलया मालिकेत त्यांनी अभिनेता म्हणून केले आहे. पुढचं पाऊलया मालिकेत त्यांनी बंटी मिश्राही व्यक्तिरेखा साकारली आहे. गुरू यांचे तळ्यात मळ्यातहे नाटक सध्या व्यावसायिक रंगभूमीवर आले आहे.आजही ते दोन मराठी आणि दोन हिंदी मालिकांचे लिखाण करत आहेत. अभिजित गुरू यांनी अभिनेत्री समिधा गुरू यांच्या सोबत लग्न केले आहे. अभिनेत्री #समिधा_गुरू यांनी आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मराठी मालिका सोनियाचा उंबरा' या मालिकेपासून केली, पण त्यांना खरी लोकप्रियता झी मराठी वरील अवघाची संसार या टीव्ही मालिकेमुळे मिळाली. या मालिकेनंतर त्यांनी खूप साऱ्या मराठी मालिकांमध्ये काम केलेले आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज बॉलिवूड आणि टीव्हीसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता #आसिफ_बसरा यांचा जन्मदिन.

जन्म.२७ जुलै १९६७ अमरावती येथे.

आसिफ यांनी अभिनयाचं कोणतेही प्रशिक्षण घेतलं नव्हतं. अगदी लहान वयातच त्यांनी स्टेजवर अभिनय करण्यास सुरुवात केली होती.आसिफ बसरा यांनी भौतिकशास्त्रात बीएससी केलं होतं. पदवी आणि त्यानंतर संगणक कोर्स केल्यानंतर आसिफ मुंबईत कामाला लागले. तसेच जो काही पगार मिळायचा तो सर्व ते नाटक पाहण्यासाठी खर्च करायचे. नाटकांमधून त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. आसिफ मुंबईत अभिनयाशिवाय पृथ्वी थिएटरमधील तरुणांना अभिनयाचे प्रशिक्षण द्यायचे. आसिफ बसरा यांनी आपल्या करिअरची सुरूवात वोया टीव्ही मालिकेतून केली होती. १९९८ मध्ये आलेली हॉरर सीरिज 'X Zone' मध्येही काम केलं होतं. याशिवाय गेल्या वर्षी ते 'हॉस्टेजेस' या वेब सीरिजमध्येही दिसले होते. त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे. नाट्यप्रेमी म्हणूनही त्यांना ओळखलं जातं.आसिफ बसरा यांनी 'ब्लॅक फ्रायडे', 'परजानिया', 'काय पो छे', 'जब वी मेट', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'क्रिश ३', 'एक व्हिलन', 'मंजुनाथ', 'कालाकांडी', 'फ्रिक्की अली' आणि 'द ताश्कांत फाइल्स' यांसारख्या नावाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या. आसिफ बसरा गेल्या पाच वर्षांपासून मॅकलॉडगंज येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची यूकेमधील एक मैत्रीणही राहत होती. दोघं लिव्ह इनमध्ये राहत होते.

आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील कांगरा जिल्ह्यातील धर्मशाला येथे १३ नोव्हेंबर २०२० रोजी आत्महत्या केली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक #वामनरावहरीदेशपांडे यांचा जन्मदिन.

जन्म.२७ जुलै १९०७  भोर येथे.

वामनराव यांचे बालपण शिरवळ (जि. सातारा) येथे गेले. नंतर त्यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांचे थोरले बंधू पांडुरंगशास्त्री (पंडितराव) यांचे त्यांना सर्वच बाबतींत प्रोत्साहन होते. प्रतिकूल परिस्थितीत शिकतशिकत वामनराव जी.डी.ए., एफ.सी.ए आदी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्या वर्षी एफ.सी.ए परीक्षेचे दोन्ही भाग एकाच वेळी पूर्ण करणारे ते एकमेव भारतीय होते.

वामनरावांना लहानपणापासून संगीताची ओढ होती. ग्वाल्हेर गायकीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. मॅट्रिकनंतर मुंबई येथे त्यांच्या गायकीचे शिक्षण सुरू झाले. शंकरराव कुलकर्णी व यादवराव जोशी यांची तालीम त्यांना मिळाली. त्यानंतर १९२८ मध्ये ते नोकरीच्या निमित्ताने पुन्हा पुण्यास आले व किराणाघराण्याचे गायक सुरेशबाबू माने यांच्या संपर्कात आले. सुरेशबाबूंची उत्तम तालीम आणि जिव्हाळ्याचा सहवास त्यांना लाभला. तसेच त्यांच्या भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्या तालमीचाही प्रभाव त्यांच्यावर पडला. वामनराव हे सुरेशबाबूंपेक्षा फक्त पाच वर्षांनी लहान होते; पण दोघांचा अकृत्रिम आणि मायेचा संबंध निर्माण झाला. ही तालीम सुमारे दहा वर्षे चालली. सुरेशबाबू शिकवतही उत्तम; पण पुढे आपल्या अपेक्षेनुसार ही गायकी आपल्या गळ्यावर चढत नाही, असे वामनरावांना वाटू लागले आणि त्यांना विफलता येऊ लागली. या अवस्थेतून त्यांना विख्यात हार्मोनियमवादक गोविंदराव टेंबे यांनी बाहेर काढले आणि जयपूरघराण्याचे गायक नथ्थनखाँ यांच्याशी त्यांची भेट घडवली. या वेगळ्या गायकीचीही  वामनरावांना गोडी वाटू लागली. त्यांचे गंडाबंधनदेखील झाले आणि त्यानंतर नथ्थनखाँच्या निधनापर्यंत सुमारे सहा वर्षे ही तालीम चालली. सुरेशबाबूंनी वामनरावांना सुरांचा साक्षात्कार घडविला, तर नत्थनखाँ यांनी ताललयीची अनुभूती. त्यानंतर त्यांचे शिक्षण मोगूबाई कुर्डीकर यांच्याकडे सुरू झाले, ते अखेरपर्यंत. दोन्ही घरांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. वामनरावांनी संगीताची उपासना अगदी मनापासून केली. गोविंदरावांचे त्यांना मार्गदर्शन होतेच. त्यांचा रियाझही भरपूर होता. तरीही व्यवसायाच्या दृष्टीने विचार करून त्यांनी जाहीर मैफली न करण्याचा निर्णय घेतला. जवळजवळ तीस वर्षे त्यांनी सनदी लेखापाल (Chartered Accountant) म्हणून काम केले. मे. बाटलीबॉय अँड पुरोहित चार्टर्ड अकौंटंट्स, मुंबई येथे ते सनदी लेखापाल व ज्येष्ठ भागीदार होते.

वामनरावांचे लेखन विचारसंपन्न व दर्जेदार आहे. ते कसदार आणि माहितीपूर्ण आहेच; पण त्याची भाषादेखील स्पष्ट व प्रासादिक आहे. गायनाच्या घराण्यांची प्रदीर्घ चर्चा त्यांनी सुरू केली, असे मत त्यावेळी व्यक्त होत असे. घरंदाज गायकी  (१९६१), आलापिनी (१९७९), एका गायकाचा ताळेबंद,  Maharashtra’s Contribution to Music (१९७२) ही त्यांनी लिहिलेली पुस्तके खूप गाजली. त्यांच्या काही लिखाणावर आक्षेपही घेण्यात आले. त्यांच्या घरंदाज गायकी  या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद इंडियन म्युझिकल ट्रॅडिशन्स (१९७३) या नावाने झाला असून हिंदी अनुवाद घराणेदार गायकी  या नावाने झाला आहे. त्यांच्या या ग्रंथास संगीतातील उत्कृष्ट समीक्षाग्रंथ म्हणून १९६२ या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा व १९६१ ६९ या कालावधीतील संगीतक्षेत्रातील उत्कृष्ट मराठी ग्रंथ म्हणून संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार लाभला. या ग्रंथामध्ये सुरुवातीपासूनचे रागदारी संगीत, त्यातील घराणी, त्या-त्या घराण्याचे वैशिष्ट्य आणि हार्मनी व मेलडी यांचा ऊहापोह केलेला आहे. त्यांच्या आलापिनी  या ग्रंथाचा Between two tanpuras (१९८९) या नावाने इंग्रजी अनुवाद झाला असून या ग्रंथासही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला आहे. त्यांच्या Maharashtra’s Contribution to Music  या ग्रंथाचा मराठी अनुवाद त्यांचे बंधू श्रीधर हरी देशपांडे यांनी महाराष्ट्राचे संगीतातील कार्य (१९७४) ह्या नावाने केला आहे. गोविंदराव टेंबे ह्यांच्या माझा संगीत व्यासंग (१९८४)  ह्या ग्रंथाचे संपादन वामनरावांनी केले आहे. वामनराव महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या कलाशाखेचे व सेंट्रल ऑडिशन बोर्ड ऑफ ऑल इंडिया रेडिओचे सदस्य होते. देवधर्स स्कूल, आर्य संगीत मंडळ आदींचे ते पदाधिकारी होते. मुंबई विद्यापीठात संगीत विभाग सुरू करण्यात पु.ल.देशपांडे, प्रो.ढेकणे यांच्या बरोबरीने वामनरावांचाही मोलाचा वाटा होता. वामनराव यांचे पुत्र सत्यशील देशपांडे हेदेखील नावाजलेले गायक आणि संगीतज्ञ आहेत. वामनराव हरी देशपांडे यांचे ७ फेब्रुवारी १९९० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज बॉलीवूड अभिनेत्री #कृति_सेनन चा वाढदिवस.

जन्म. २७ जुलै १९९० दिल्ली येथे.

आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीं कृति सेनन मध्ये आहे.

कृतिचे वडील राहुल सेनन सीए आहेत आणि आई गीत सेनन या दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक आहेत. दिल्ली येथे राहणार्याआ कृती सॅनॉनने नोएडामधील महाविद्यालयातून बी.टेक केले आहे. कृति सेननने आपले चित्रपटातील करिअर तेलगु तेलगु चित्रपट नेनोक्कडीपासून सुरु केले.या सिनेमात तिचा हिरो महेश बाबू होता. पुढे तिने 'हिरोपंती' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं यात तिच्या बरोबर अभिनेता टायगर श्रॉफ होता. त्याचबरोबर अनेक सुपरहिट चित्रपटात तिने काम केले आहे. या शिवाय ती बरेली की बर्फी मध्ये आयुष्मान खुराना, लुका चुप्पी मध्ये कार्तिक आर्यन, हाऊसफुल मध्ये अक्षय कुमार आणि पानीपत मध्येअर्जुन कपूर सोबत काम केले आहे. ती लवकरच मिमीया हिंदी चित्रपटात झळकणार आहे. कृती सेननचा हा सिनेमा मराठीतील मला आई व्हायचंयया उर्मिला कानेटकर-कोठारेच्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ही कथा एका दापत्यासाठी सरोगेट मदर होण्यासाठी तयार होते मात्र तिचा हा निर्णय पुढे तिचं पूर्ण आयुष्यचं बदलून टाकतो. या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि पाहवा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.कोविड मुळे आता हा चित्रपट ओटीटीच्या व्यासपीठावर प्रदर्शित करावा लागणार आहे. कृति सेनन ही खास करून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे.अनेक तरूणी तिला फॉलो करतात, तर अनेक तरूणींना तिच्यासारखा फिगर हवी असते. कृति नेहमी सोशल मिडियावर अॅ क्टिव्ह असते. ती नेहमी सोशल मिडियावर फोटो शेअर करत असते. कृतीची बहिण नुपूर सेनन ही मॉडेल आहे. नुपूर अलिकडेच अक्षय कुमारसोबत फिलहाल 2 या म्युझिक अल्बममध्ये झळकली होती.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज बॉलीवूड अभिनेता #राहुल_बोस यांचा वाढदिवस.

जन्म. २७ जुलै १९६७

राहुल बोस यांनी द परफेक्ट मर्डर या चित्रपटातून बॉलवूड मध्ये पदार्पण केलं. चमेली, मि. अँड मिसेस  अय्यर, प्यार के साइड इफेक्ट्स, विश्वरुपम व दिल धडकने दो या चित्रपटातील भूमिकेतून त्यांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. राहुल बोस हा एक अभिनेता, खेळाडू असण्याबरोबरच एक सामाजिक कार्यकर्ता असून तो सामाजिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असतो आणि ह्याच कार्याच्या माध्यमातून अंदमान- निकोबार येथील ११ वर्षांच्या  जवळपास सहा मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी त्याने २४ लाखांची व्यवस्थादेखील केली. अंदमान-निकोबार येथील गरीब मुलांसाठी त्याने स्कॉलरशिप प्रोग्रॅम देखील सुरु केला आहे. राहुल हा एकट्याने आपल्या मुलांचा सांभाळ करत आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज भारतीय शास्त्रीय संगीताला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे पंडित #विश्वमोहन_भट्ट  यांचा वाढदिवस.

जन्म. २७ जुलै १९५० रोजी जयपूर येथे.

पंडित विश्वमोहन भट्ट  हे भारतीय शास्त्रीय संगीतामधलं एक जगप्रसिद्ध नाव! त्यांनी मोहनवीणाया सहा तारांच्या हवाईयन गिटारमध्ये तांत्रिक बदल घडवून बनवलेल्या वाद्याद्वारे अद्भुत संगीत निर्माण करून जगभरच्या रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. ते पंडित रविशंकर यांचे शिष्य राहिले आहेत. राय कुडरबरोबर २००२ साली त्यांनी बनवलेल्या ए मीटिंग बाय द रिव्हरया अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांना मोहनवीणा वादनासाठी आणि फ्युजन कॉन्सर्टसाठी जगभरातून मानाची बोलावणी येत असतात. पंडित विश्वमोहन भट्ट यांना २००२ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. २०१२ मध्ये राजस्थान रत्न, तर २०१७ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण प्रदान केला.त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे. तसेच विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. सात्विक वीणा वादक पंडित सलील भट्ट हे पं.विश्वमोहन भट्ट यांचे चिरंजीव होत. 

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=U_TbLTHLg-M

https://www.youtube.com/watch?v=36wvaZMx9OQ

आज २७ जुलै

आज अभिनेत्री #रिंकी_खन्ना चा वाढदिवस.

जन्म.२७ जुलै १९७७ रोजी मुंबई येथे.

रिंकीचे खरे नाव रिन्कल आहे परंतु नंतर तिने आपल्या आईच्या सांगण्यावरून एल काढून टाकले, वडील राजेश खन्ना बॉलिवूड चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार आणि आई डिम्पल कपाडिया एक उत्कृष्ट अभिनेत्री.तिची मोठी बहीण ट्विंकल खन्ना ने सुद्धा चित्रपटांत नशीब आजमावले होते. रिंकी खन्नाने प्यार में कभी-कभी चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

ह्या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा झी सिने पुरस्कार मिळाला होता.

चित्रपटसृष्टीतले सुपरस्टार राजेश खन्ना आपल्या आयुष्य संपे पर्यंत चर्चेत राहिले आणि त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगी ट्विंकल खन्ना ओळखली गेली पण त्यांची दुसरी मुलगी रिंकी खन्ना अनेकदा प्रसिद्धीपासून दूरच राहिली. १९९९ साली, ‘प्यार में कभी कभीचित्रपट आला होता, आणि त्या चित्रपटातले मुसू-मुसु हासी दिल मलाइ लाईहे गाण सुपरहिट होते. हा चित्रपट यशस्वी झाला आणि त्या काळातील तरुणांना रिंकी खन्ना खूप आवडली. पण यानंतर रिंकी खन्नाला बॉलिवूडमध्ये फारसे काही करता आले नाही. रिंकीने बॉलिवूडमध्ये यशस्वी चित्रपट बनविले आहेत, मुझे कुछ केहना है,ये है जलवा, प्राण जाय पर शान ना जाए, झंकार बीट्स आणि चमेली आणि त्यानंतर ती इंडस्ट्रीपासून दूर गेली. रिंकीने तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आणि बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वी ती हिंदी आणि इंग्रजी भाषेतही काम करायची. २००३ मध्ये रिंकी हिची उद्योगपती समीर सारण यांची भेट झाली आणि त्यांना रिंकी आवडली. लग्नानंतर रिंकी खन्ना दिल्लीत स्थायिक झाली आणि समीरला भेटल्यानंतरच रिंकीचे आयुष्य खूप बदलले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज बॉलीवूड अभिनेत्री #कुब्रा_सेठ चा वाढदिवस.

जन्म.२७ जुलै १९८३ बंगलोर येथे.

कुबरा चे शिक्षण बंगलोर मध्ये झाले. कुबराने फायनान्स व मार्केटिंगचे शिक्षण घेतले आहे. कुबरा सेठ ने एक मॉडेल म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. पण त्या आधी ती दुबईमध्ये माइक्रोसॉफ्ट कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून काम करत होती. पुढे ती भारतात कुबरा व तिने एयरटेल, अमेझॉन फॅशन व बिग बाजारच्या अॅड फिल्म मध्ये काम केले. या बरोबर तिने इंडियन इवेंट मॅनेजमेंट कंपनी जॉईन केली. २००९ मध्ये कुबरा ने मिस वर्ल्ड वाइड ब्यूटी स्पर्धेत मिस पर्सनालिटी २००९चा पुरस्कार जिंकला. २०११ मध्ये तिला सलमान खानचा चित्रपट 'रेडी' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. कुबराला ३० हून अधिक देशात शाहरुख खान इवेंट, चेन्नई सुपर किंग इवेंट, क्लब महिंद्रा, टेड एक्स व मंतरा असे अवार्ड फंक्शन होस्ट करण्याची संधी मिळाली. २०१३ मध्ये तिला आशियाची सर्वतोम पब्लिक स्पीकरचा पुरस्कार मिळाला. या दरम्यान तिने जोडी ब्रेकेर्स, आई लव न्यूयॉर्क व सुलतान या चित्रपटात अभिनय केला. कुबरा सेठने रणवीर सिंह व अलिया भट्ट बरोबर 'गल्ली बॉईज' या चित्रपटात काम केले आहे.

'सेक्रेड गेम्स' वेब सीरीज मध्ये कुब्रा सेठ ची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या मध्ये कुब्रा सेठने 'कुक्कू'  या नावाच्या ट्रांसजेंडरची भूमिका केली होती. ही तिची भूमिका खूप गाजली होती. कुब्रा सेठचा भाऊ दानिश सेठ एक रेडियो जॉकी असून तो सुपारी वाले प्रेंक(prank)ने  फेमस झाला आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज अभिनेते #रवी_वासवानी यांचा स्मृतीदिन.

जन्म. २९ सप्टेंबर १९४६

रवी वासवानी यांनी १९८१ साली प्रदर्शित झालेल्या चष्मेबद्दूरया चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. अनेक दूरचित्रवाणी मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. जाने भी दो... या चित्रपटातून त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले होते. बंटी और बबली, प्यार तुने क्या किया हे चित्रपट आणि अनेक टीव्ही मालिकांमधूनही त्यांनी भूमिका रंगवल्या होत्या. रवी वासवानी यांचे २७ जुलै २०१० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

*आजच्या दिवशी १९७३ साली #अभिमान_चित्रपट प्रदर्शीत झाला याला आज ४८ वर्षे झाली.

हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक उल्लेखनीय चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे, १९७३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'अभिमान' होय.

सांगितिक बहर असलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मूख्य भूमिका साकारल्या होत्या. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात बिंदू, असरानी यांसारख्या कलाकारांनीही उल्लेखनीय व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांच्या कारकिर्दीतील लक्षणीय चित्रपटांमध्ये अनेक सिनेरसिकांनी 'अभिमान' या चित्रपटालाही पसंती दिली होती. 'अभिमान' चित्रपटाच्या लोकप्रियतेचे आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटाचे संगीत. एस. डी. बर्मन यांच्या संगीताने परिपूर्ण अशा या चित्रपटातील गाण्यांनाही सिने व संगीत रसिकांनी फार पसंत केले होते. चित्रपटाचे कथानकच मुळात संगीतावर आधारलेले असल्यामुळे आजही 'अभिमान'ची गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिष्ठीत गीतकार मजरुह सुलतानपुरी यांच्या लेखणीने शब्दबद्ध केलेली ही सुमधुर गीते लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार या नामवंत आणि पट्टीच्या गायकांनी गायली होती. 'तेरे मेरे मिलन की ये रैना', 'पिया बिना' या गाण्यांसह चित्रपटातील इतर सर्वच गीते आणि अमिताभ व जया यांच्या जोडीने साकारलेल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. 'अभिमान' मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी अभिनेत्री जया बच्चन यांना 'फिल्मफेअर'तर्फे 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

अभिमान चित्रपटाची गाणी

https://www.dailymotion.com/video/x3gknt8

आज २७ जुलै

आज अभिनेत्री व व्यावसायिक फोटोग्राफर #सखी_गोखले चा वाढदिवस.

जन्म. २७ जुलै १९९३

सखी गोखले ही दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखलेंची मुलगी आहे

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतील रेश्मा म्हणजे सखी... बरोबर माजघराचा आणि त्यातील स्वयंपाकघराचा ती प्राण... दिल दोस्ती दुनियादारीमध्ये पाककौशल्यात निपुण असलेली रेश्मा म्हणजेच सखी गोखले खऱ्या आयुष्यात अभिनेत्रीसोबतच एक व्यावसायिक फोटोग्राफर आहे,  दिवंगत अभिनेते मोहन गोखले आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी ही एकुलती एक लेक आहे. अल्पावधीतच तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली आहे. मात्र या मालिकेपूर्वी तिने हिंदी सिनेमातही काम केले आहे. 'रंगरेज' या हिंदी सिनेमाच्या निमित्ताने सखीने पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. यामध्ये तिने वेणू हे पात्र रेखाटले होते. मात्र त्यावेळी फारसे कुणाचे लक्ष तिच्याकडे गेले नाही. पण 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून सखीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीनेसुद्धा अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा आता सखी पुढे नेत आहे. सोबतच फोटोग्राफीची आवडसुद्धा जोपासत आहे. सखी गोखलेने अभिनेता सुव्रत जोशीशी लग्न केले आहे.  सखी गोखलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज हिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक #अमजद_खान यांचा स्मृतिदिन.

जन्म.१२ नोव्हेंबर १९४०

शोले चित्रपटात अमजद खान यांनी साकारलेला गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपेकी एक आहे. शोलेमधील गब्बरची भूमिका करून 'अमजद खान' यांच्या एंट्री ने सिनेप्रेक्षकांना अक्षरश: अचंबित करून सोडले. 'शोले' या सुपर डूपर हिट सिनेमातील निर्दयी, सहृदयतेचा लवलेशही नसणारा, कल्पनातित क्रूर, रांगडा डाकू त्याने पडद्यावर असा जिवंत केला कि तो पहिल्याच सिनेमानंतर खलनायकांच्या श्रेणीत अत्यंत वरच्या क्रमांकावर जाऊन बसला. खरंतर या कॅरेक्टरसाठी आधी डॅनीला साईन करण्यात आले होते. मात्र फिरोझ खानच्या 'धर्मात्मा' सिनेमासाठी डॅनी यांनी "शोले" सोडला आणि अमजद खानची वर्णी लागली. प्राण जसा शम्मी कपूर च्या प्रत्येक सिनेमात खलनायक म्हणून दिसला, तसाच अमजद खान, अमिताभ चा 'प्राण' बनला. शतरंज के खिलाडीया प्रेमचंद यांच्या लघुकथेवर सत्यजित राय यांनी त्याच नावाने एक चित्रपट बनवला. त्यातील कंपनी सरकारचे पत्र भिरकावून देत लखनवी अस्मिता आणि स्वतःच्या शायरीच्या बढाया मारणारा वाजिद अली (अमजद खान) आपल्याला अजूनही आठवतो. अमजद खान यांच्या  गब्बरने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक पार केले होते. ब्रिटानियाच्या ग्लुकोज बिस्किटांसाठी वापरण्यात आलेला तो व्यक्तिरेखेवर आधारलेला अमजद खान पहिला ब्रँड ठरला होता. आपल्या करिअर मध्ये त्यांनी 'शोले', 'परवरिश', 'मुकद्दर का सिकंदर', 'लावारिस', 'हीरालाल-पन्नालाल', 'सीतापुर की गीता', 'हिम्मतवाला' आणि 'कालिया'सारखे हिट सिनेमे दिले. जवळपास १३० सिनेमांत काम करणा-या अमजद खान यांचे अनेक डायलॉग्स आजही आठवणीत आहेत. मा.अमजद खान यांचे २७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज अभिनेता #प्रणव_रावराणे चा वाढदिवस.

जन्म.२७ जुलै

मराठी सिनेमांसोबतच प्रणव रावराणे हे मराठी रंगभूमीवरील नावाजलेले नाव आहे.एक सात नमस्ते, आपण यांना पाहिलंत का?, लगे रहो राजाभाई, एक दोन तीन चार, तीन जीव सदाशिव, वाऱ्यावरची वरात, वासूची सासू यांसह अनेक नाटकांमध्ये प्रणव रावराणेने काम केले आहे. दुनियादारी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे तर चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटात त्याने

साकारलेली सॉरीची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. प्रणव रावराणे याची मराठी जगतात उत्तम कॉमेडी कलाकार म्हणून ख्याती आहे. प्रणव रावराणे आणि अभिनेत्री सायली संजीव यांच्या मुख्य भूमिका असलेला 'आटपाडी नाईट्स' हा चित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला असून या चित्रपटात प्रणव एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या 'वासूची सासू' या नाटकात थोडा फार बदल करून हीच भूमिका प्रणवणे सादर केली होती. या नाटकातील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते.

नाटकासोबतच अनेक मराठी चित्रपटात त्याने काम केले आहे. भागमभाग, आबांनी उडवला बार, हिप हिप हुर्रे, धाव मन्या धाव यातील भूमिका त्याने उत्कृष्टरित्या साकारल्या. प्रणवसोबतच त्याची पत्नी देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याचे तुम्हाला माहीत आहे का? होय, हे खरे आहे. प्रणवची पत्नी एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. प्रणवने डिसेंबर २०१७ मध्ये अभिनेत्री अमृता सकपाळसोबत लग्न केले असून अमृता ही देखील एक अभिनेत्री असून 'माझे मन तुझे झाले' या मालिकेतील स्वामिनीही अमृता यांनी साकारलेली व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली होती.  तसेच ऑल द बेस्ट नाटकात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. प्रणव रावराणेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच अभिनेते #मंदार _चांदवडकर यांचा वाढदिवस.

जन्म.२७ जुलै १९७६

मंदार हे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. अभिनयाच्या क्षेत्रात येण्या आधी १९९७ ते २००० या काळात त्यांनी दुबईत नोकरी पण केली. शाळेत शिकत असल्यापासूनच मंदार यांना अभिनयाची आवड होती. प्रतिबिंब या नावे त्यांचा नाटकाचा एक ग्रुप आहे व त्यांनी स्वतः बऱ्याच एकांकिका दिग्दर्शित केल्या आहेत. सुप्रसिद्ध मराठी नाटक 'ऑल दि बेस्ट' तसेच अनेक गुजराती नाटकांमधूनही मंदार यांनी काम केले आहे. हिंदी, मराठी व उर्दू नाटकांमधून व मालिकांमधून तसेच मराठी चित्रपटांमधून कामाचा अनुभव असलेले मंदार हे स्वतः एक चांगले लेखक आहेत व नियमितपणे ऑनलाईन ब्लॉग्ज लिहीत असतात. आधी इंग्रजी व नंतर हिंदी रंगभूमीवर लोकप्रिय झालेले, "पंच अ तंत्र" या अश्विनी गिडवाणी निर्मित नाटकाचे दिग्दर्शन व अभिनय या दुहेरी जबाबदाऱ्या मंदार यांनी अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळल्या आहेत. मंदार यांना लाभलेल्या लवचिक आवाजाच्या देणगीमुळे ते व्हॉइस ओव्हर व डबिंगच्या कामातही व्यस्त असतात. मिशन चॅम्पियन या मराठी चित्रपटातील त्यांनी केलेली कोच ची भूमिका नुकतीच  खूप गाजली. भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वात जास्त काळ तितकीच लोकप्रियता कायम ठेवत चाललेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सुप्रसिद्ध मालिकेचे 'भिडे' मात्र सर्वांनाच सुपरिचित आहे. अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छता प्रिय व अगदी वक्तशीर असे गोकुळधाम सोसायटीचे मराठमोळे भिडे गुरुजी मंदार यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने छानच साकारले  आहेत.

मंदार चांदवडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २७ जुलै

आज किराणा घराण्याचे प्रवर्तक,विख्यात रुद्रवीणा वादक उस्ताद #बंदेअलीखाँ यांचा स्मृतिदिन.

जन्म. १८२६

बीनकार, किराणा घराण्याचे प्रवर्तक, सूक्ष्म स्वरांचे भान असणारे व मधुर वादन करणारे असा त्यांचा लौकिक होता. उस्ताद बंदे अली खाँ यांचे २७ जुलै १८९५ रोजी निधन झाले. पुण्यात नव्या पुलाजवळील दर्ग्याच्या परिसरात उस्ताद बंदे अली खाँ यांची कबर आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९३२२४०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

No comments:

Post a Comment