!! 14 ऑगस्ट दिनविशेष ॥वाढदिवस.& स्मृतिदिन

 

१४ ऑगस्ट (१९४३) नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली

 

घटना

 

१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.

१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.

१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.

१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.

१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.

१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.

१९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.

१९५८: एअर इंडियाची दिल्ली मॉस्को विमानसेवा सुरू झाली.

१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.

२०१०: पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धासिंगापूरमधे घेण्यात आल्या.

 

जन्म

 

१७७७: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८५१)

१९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)

१९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.

१९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)

१९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.

१९६२: पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक रमीझ राजा यांचा जन्म.

१९६८: क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचा जन्म.

 

मृत्यू

 

१९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००)

१९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२६)

१९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)

२०११: हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)

२०१२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २६ मे १९४५)

************

१४ ऑगस्ट

मुंबई उच्च न्यायालय स्थापना दिन

************

 

स्थापना - १४ ऑगस्ट १८६२

 

आज मुंबई उच्च न्यायालयाचा स्थापना दिन.

 

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना १४ ऑगस्ट १८६२ साली झाली. महाराष्ट्र राज्याच्या उच्च न्यायालयाची इमारत हे आपल्या मुंबईचे वैभव आहे. मुंबई, मद्रास व कोलकाता येथील उच्च न्यायालयांच्या इमारती एकाच वेळी बांधल्या गेल्या आहेत. त्या वेळी भारतामध्ये या तिन्ही शहरांच्या ठिकाणी उच्च न्यायालये सुरू करण्यासाठी इंग्लंडच्या राणीने २६ जून १८६२ साली परवानगी दिली.

 

भारतातील ब्रिटिश काळातील न्यायालयांचा इतिहास १६७२ पासून सुरू होतो. त्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीचे मुंबईचे गव्हर्नर जेरॉल्ड ऑन्जियर होते. त्या वेळी त्यांनी मुंबईचा जो सर्वागीण आराखडा तयार केला, त्यामध्ये न्यायालयाची कल्पना मांडली. त्या वेळी त्यांनी ब्रिटिश सरकारला अशी ग्वाही दिली होती की, ‘हे न्यायालय स्वायत्त आणि पारदर्शी कारभार करणारे असेल.

 

तेव्हा ८ ऑगस्ट १६७२ साली या कोर्टाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मिरवणुकीत हिंदू, मुस्लीम व ख्रिश्चन अशा सर्व धर्माचे लोक होते. जे.पी. व न्यायाधीश घोडय़ांवर स्वार होते, तर गव्हर्नर पालखी मधून व वकील लोक पायीपायीच या मिरवणुकीमध्ये होते.

 

राजे दुसरे चार्ल्स यांनी ईस्ट इंडिया कंपनीला या बिगर सरकारी कोर्टाच्या स्थापनेसाठी दिलेले परवानापत्र खास गाडीतून आणले होते. नव्याने स्थापन झालेल्या या न्यायालयाचे लोकांनी चांगले स्वागत केले. त्यानंतर १६७७ साली ऑन्जियार यांची कारकीर्द संपली व त्याबरोबरच न्यायालयाचा प्रामाणिकपणा व पारदर्शी कामकाजही संपले.

 

या न्यायालयाचे न्यायाधीश ईस्ट इंडिया कंपनीकडून नेमले जायचे. त्यामुळे ही मंडळी प्रामाणिक नसायचीच, पण प्रशिक्षितही नसायची. त्यामुळे या न्यायालयाचे कामकाज बऱ्याच वेळा बंद पडायचे. हा सर्व प्रकार पाहून राजे पहिले जॉर्ज यांनी १७२८ मध्ये स्वतंत्रपणे पहिले मेयर्स कोर्टस्थापन केले. त्यानंतर राजे दुसरे जॉर्ज यांनी १७५३ साली दुसऱ्या मेयर्स कोर्टाची स्थापना केली. त्या वेळी मुंबईचा विकास जोरात होत होता व त्यामुळे सर्वच व्यापाऱ्यांना सुगीचे, भरभराटीचे दिवस आले होते. या सुमारास ईस्ट इंडिया कंपनी ही नुसती व्यापारी कंपनीच राहिली नव्हती, तर ती सत्ताधारी पण बनली होती. त्यानंतर तिसरे जॉर्ज यांनी १७९८ मध्ये मेयर्स कोर्टाऐवजी रेकॉर्ड्स कोर्टाची स्थापना केली.

 

या काळात न्यायाधीशांची जागा सतत बदलत होती. त्या वेळी रेकॉर्ड्स कोर्टासाठी अ‍ॅडमिरल्टी हाऊसही जागा निवडली. या वेळी कायदेतज्ज्ञ हिंदू पंडित, मुस्लीम काझी, पारसी धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मगुरू हे विद्वान लोक रेकॉर्डरला मदत करीत असत. कारण त्या काळात पर्सनल लॉ नुसार तंटे मिटविले जात. या काळात न्यायदानाचा दर्जा नक्कीच उंचावला होता. या न्यायाधीशांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांची बाजू न घेण्याचे ठरविल्यामुळे म्हणजेच निष्पक्षपाती निर्णय देण्यामुळे न्यायव्यवस्था व त्या वेळचे इंग्रज सरकार यांच्यामध्ये मधूनमधून वाद निर्माण होऊ लागले. त्यानंतर मुंबई व इतर प्रांतांच्या न्यायव्यवस्थेला कामाची शिस्त लावण्यासाठी १८२४ साली चौथे जॉर्ज यांच्या परवानगीने रेकॉर्ड्स कोर्ट बरखास्त करण्यात आले व त्या जागी सुप्रीम कोर्ट ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. अशामुळे परिस्थिती सुधारली नाहीच, पण गव्हर्नर व न्यायाधीश यांचे संबंध मात्र ताणले गेले.

 

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर ब्रिटिश राजवटीने ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रांत आपल्या अधिकारात घेतले व बंगाल, मद्रास व बॉम्बे अशा तीन प्रेसिडेन्सी तयार केल्या. त्या वेळी इंडियन हायकोर्ट अ‍ॅक्ट, १८६१ मध्ये निघून १४ ऑगस्ट १८६२ या दिवशी उच्च न्यायालय सुरू झाले.

 

उच्च न्यायालयाच्या स्थापनेमुळे पीनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर कोड व सिव्हिल प्रोसिजर कोड यांच्या कायद्यात रूपांतर झाले. या उच्च न्यायालयात १५ न्यायाधीश नेमण्याची मुभा होती, पण प्रत्यक्षात सातच न्यायाधीश नेमले गेले होते. या उच्च न्यायालयामध्ये दाव्यांचे प्रमाण वाढले असून सुद्धा जवळजवळ ५७ वर्षे (१८६२ ते १९१९) सातच न्यायाधीश या उच्च न्यायालयाचे सर्व कामकाज पाहत होते. ही परिस्थिती पहिल्या महायुद्धाच्या वेळी लक्षात आली, कारण त्या वेळी दाव्यांचे प्रमाण भरमसाट वाढले होते. या न्यायालयात ५०० दावे/ खटले होते, तो आकडा सात हजारांवर जाऊन पोहोचला.

 

या न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम १ एप्रिल १८७१ ला सुरू होऊन नोव्हेंबर १८७८ मध्ये संपले. या बांधकामाचा प्रत्यक्ष खर्च १६,४४,५२८ एवढा झाला. या मूळ इमारतीला बरीच जोडकामे झाल्यामुळे मूळ वास्तूवर खूप भार आला आहे. न्यायालयातील खटले चांगल्याच प्रमाणात वाढले असल्यामुळे गर्दीचा भार पण चांगलाच वाढला आहे. ही हेरिटेज वास्तू सुस्थितीत करण्यासाठी राज्य सरकारने २० कोटींचा निधी पुरातत्त्व क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मंजूर केला. विशेष म्हणजे १८७८ साली या इमारतीच्या मूळ बांधकामाला साडेसोळा लाख लागले, तर सरकारला आता फक्त नुसत्या दुरुस्तीसाठी २० कोटी रुपये मंजूर करावे लागले.

 

अगदी सुरुवातीला या उच्च न्यायालयात सात न्यायाधीश बसत असत. त्या वेळी पहिल्या मजल्यावर एक कोर्ट रूम होती, तर दुसऱ्या मजल्यावर सहा कोर्ट रूम्स होत्या. उरलेल्या इमारती मध्ये प्रशासकीय कार्यालये, न्यायाधीशांची दालने, वरिष्ठ वकिलांची दालने, बार असोसिएशनचे ऑफिस व ग्रंथालय असे सर्वकाही होते. ही वसाहत स्थापन झालेली उच्च न्यायालयाची इमारत हे मुंबईचे वैभव आहे.

 

१४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री १२ वाजता या इमारतीवर तिरंगा फडकाविला गेला. त्या वेळी ब्रिटिश सरन्यायाधीश सर लिओनार्ड स्टोन यांनी त्याच वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती एम.सी. छागला यांच्या हाती सर्व सूत्रे सोपविली. ही वेळ होती रात्री ११ वाजून ४५ मिनिटांची. तेव्हा सर्व सभागृह न्यायाधीश, बॅरिस्टर्स, वकील, न्यायालयाचे कर्मचारी आणि इतर पाहुण्यांनी भरगच्च भरून गेले होते. त्या वेळी कोर्टरूम मध्ये तिरंगा फडकाविला गेला व त्याहून मोठा तिरंगा उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या सज्जामध्ये झळकला. तेव्हा उच्च न्यायालयाच्या समोरच्या ओव्हल मैदानामध्ये जमलेल्या गर्दीचा आनंद गगनात मावत नव्हता.

 

तेव्हा वसाहत काळात स्थापन झालेली न्याययंत्रणा गेल्या दीडशे वर्षांत भक्कम झाली आहे. सामान्य माणसाला सर्वोच्च न्यायालय पाहण्यासाठी मिळणे कठीण आहे; परंतु आपल्या मराठी राज्यात ज्या कोणी मुंबई उच्च न्यायालयाची इमारत पाहिलेली नाही, त्यांनी ही इमारत आवर्जून पाहावी. दोन मजल्यांतील अंतर पायऱ्यांवरून चढताना चांगलीच दमछाक होते. ही इमारत म्हणजे व्हिक्टोरियन बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे. जो कोणी प्रथमच ही इमारत पाहतो तो एकटक या इमारतीकडे पाहत असतो.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

अखंड भारत दिवस

************

 

आज अखंड भारत दिवस !

 

'अखंड भारत' ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस 'अखंड भारत दिन' म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे साजरा केला जातो.

 

प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमी वेळा झाले. अखंड भारत या संकल्पनेत, भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूटान, हिमालय, श्रीलंका आहे.

 

भारत हा प्राचीन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी जरा वेगळा होता. म्हणजेच भारत एक विशाल देश होता. इराण पासून इंडोनेशिया पर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले.

 

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तसेही एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी १८७६ ते १९४७ या ७१ वर्षाच्या कालखंडात Divide & Rule Policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले. भारताचा सर्वात शेवटचा तुकडा १९४७ साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत आताचा बांगलादेश जन्माला घातला.

 

१९४७ साली झालेली भारत व पाकिस्तानची फाळणी ही मागील २५०० वर्षांतील देशाची २४ वीं फाळणी होती. ज्या राजांनी मागील २५०० हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यांनी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याचा उल्लेख इतिहासातील कुठल्यााच ग्रंथात नाही. त्यानमुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टीक मिळते.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

स्विगी चा स्थापना दिवस

************

 

आज स्विगी चा स्थापना दिवस !

 

"स्विगी" झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी. १४ ऑगस्ट २०१४ ला सुरु झालेली ही कंपनी. अल्पावधीतच ग्राहकांच्या लोकप्रियतेला पात्र ठरणारी कंपनी म्हणून या कंपनीची ओळख आहे. या कंपनीची स्थापना नंदन रेड्डी, राहुल जेमिनी आणि श्रीहर्ष मजेती या तिघांनी केली.

 

यातील नंदन रेड्डी आणि श्रीहर्ष मजेती हे दोघे बिर्ला इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिट्स) पिलानीचे विद्यार्थी. या दोघांनी 'बंडल' नावाची कुरिअर लॉजिस्टिक्स कंपनी सुरु केली. वर्षानंतर लोकल हॉटेल व्यावसायिकांशी जोडुन फुड ऑर्डर डिलिव्हरीची सुरुवात केली. आयआयटी खरगपूर येथे शिकणाऱ्या राहुल जेमिनी यांच्याशी या दोघांची ओळख झाली. राहुल हे 'मिंत्रा' चे संगणक अभियंता म्हणून कार्यरत असणारे व्यक्ती. असे तिघे मिळवून स्विगी चालवू लागले.

 

स्विगीवर बिर्याणी, बटर नान, फ्राइड राईस हे पदार्थ सर्वाधिक मागविले जातात. ५७% ऑर्डर्स वेब तर ४३% ऑर्डर्स या अ‍ॅपच्या माध्यमातून दिल्या जातात. स्विगीच्या एका आकडेवारीनुसार ५५०००+ हॉटेल्स, ,२०,०००+ डिलिव्हरी पार्टनर्स, ५०००+ मनुष्यबळ कार्यरत आहेत.

 

आज स्विगी कंपनीचे बाजारमुल्य ३.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतके आहे. अ‍ॅपचे १० लाखांहून अधिक वापरकर्ते जगभरात आहेत. १५ हुन अधिक आर्थिक संस्थांनी भांडवल स्वरूपात १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा अधिक मदत केली आहे.

 

स्विगीच्या अ‍ॅपमध्ये मुख्य गोष्टी तीन. पहिली ग्राहक, दुसरी डिलिव्हरी पार्टनर्स, तिसरी हॉटेल्स. ५००० ते ७५०० ग्राहक प्रतिदिन या अ‍ॅपवर फुड ऑर्डर करतात. ग्राहकांना वेगवेगळे कॅशबॅक देऊन आकर्षित केले जाते. ग्राहक त्याच्या आवडीनिवडी प्रमाणे ऑर्डर करू शकतो. मेंबरशिप असणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर्स दिल्या जातात.

 

अ‍ॅपवर येणाऱ्या ऑर्डर्स मधून ग्राहकाचा खाण्यापिण्याचा ट्रेंड शोधला जातो. त्यानुसार पुढील वेळी त्याच्या आवडीच्या हॉटेलचे अन्नपदार्थ स्क्रीनवर दाखवले जातात. ग्राहकांकडून किरकोळ स्वरूपात डिलिव्हरी चार्जेस आणि पॅकेजिंग चार्जेस आकारले जातात. जर आपण प्रीमियम सभासद असाल तर हे चार्जेस आकारले जात नाहीत.

 

सांगलीत जवळपास ४०० हून अधिक युवकांना येथे रोजगार मिळाला आहे. यामध्ये तरुण वर्गापासून आबालवृद्ध लोक कार्यरत आहेत. पार्टटाईम तसेच फुलटाईम अशा वेळेत काम करू शकता. जॉबला लागल्यानंतर सर्वसाधारणता १००० रु. भरावे लागतात (दोन्ही कंपनीचे नियम वेगवेगळे आहेत).

 

दर आठवड्याला कामाचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा होतात. फुल टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ८००० ते रु. १५००० दरम्यान पगार मिळतो. पार्ट टाईम काम करण्याऱ्या व्यक्तीला सरासरी रु. ६००० ते रु. ११००० दरम्यान पगार मिळतो.

 

ऑर्डर्स ऑनलाईन येत राहतात. त्याप्रमाणे त्या स्वीकारून हॉटेल मधून घेऊन ग्राहकापर्यंत पोहोचविल्या जातात. हॉटेल्सकडून या कंपन्या १०-२५% कमिशन चार्ज आकारतात. हॉटेल चालकांना एकसलग ऑर्डर्स मिळतात म्हणून ते देखील आनंदाने पैसे देऊ करतात.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

हान्स क्रिस्टीयन ओरस्टेड जन्मदिन

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १७७७

स्मृती - ९ मार्च १८५१

 

हान्स क्रिस्टीयन ओरस्टेड (Hans Christian Orsted) एक दानिश भौतिक एवं रसायन विज्ञानी थे जिन्होंने विद्युत धारा से चुम्बकीय क्षेत्र को व्युत्पन्न करने का आविष्कार किया था जो विद्युत-चुम्बकीकी में एक नया स्वरूप देने में महत्वपूर्ण मोड़ है। उन्होंने १९वीं सदी के उत्तरार्द्ध में कांटीय दर्शन और विज्ञान के क्षेत्र में प्रगति पर कार्य किया।

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

कवयित्री गायिका वीणा चिटको जन्मदिन

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९३५ (पुणे)

स्मृती - १९ सप्टेंबर २०१५

 

कवयित्री, संगीतकार नि गायिका वीणा चिटको यांचा जन्म १४ ऑगस्ट १९३५ रोजी झाला.

 

वीणा चिटको या शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक व संगीतकार मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या कन्या होत. वीणा चिटको या स्वत: लेखिका, कवयित्री, गीतकार आणि संगीत दिग्दयर्शक होत्या. कृष्णराव फुलंब्रीकर यांचा संगीत वारसा व परंपरा वीणा चिटको यांनी पुढे चालविली होती.

 

वीणा चिटको या माहेरच्या प्रभा फुलंब्रीकर. वीणा चिटको यांचा जन्म त्यावेळी मास्तर कृष्णराव यांनी संगीत दिलेला धर्मात्मा नुकताच प्रदर्शित झालेला होता आणि मास्तरांची संगीतकार म्हणून प्रभात फिल्म कंपनी मध्ये नेमणूक झालेली होती. मास्तरांना याच सुमारास कन्यारत्न प्राप्त झाल्याबद्दल प्रभातचे प्रतिभावान दिग्दर्शक व्ही.शांताराम यांनी बाळाचे नामकरण प्रभावती उर्फ प्रभा हे नाव प्रभातसंस्थे वरून ठेवले होते.

 

त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कूलमधून झाले. पुणे भारत गायन समाज येथून त्यांनी 'संगीत विशारद' ही हिंदुस्थानी शास्त्रीय गायन विभागातील पदवी संपादन केली. मास्तर कृष्णराव यांची मुलगी म्हणून वीणा चिटको यांचे प्रभात स्टुडिओ व नंतर राजकमल स्टुडिओमध्ये येणे जाणे होते. प्रभात स्टुडिओतल्या कोरस विभागात वीणा चिटको यांना लहानपणी गात असत.

 

चिटको यांनी केलेल्या कविता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदूमासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. एचएमव्हीग्रामोफोन कंपनीच्या त्या पहिल्या मराठी स्त्री गीतकार आणि संगीतकार आहेत. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांनी चिटको यांची काही गीते श्रीलंका टीव्हीवर ध्वनिमुद्रित केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धप्रार्थनाध्वनिमुद्रणातही चिटको यांचा सहभाग होता. केवळ भारतातच नव्हे; तर परदेशात जाऊनही त्यांनी संगीताचे कार्यक्रम केले होते. त्यांनी सतार वादनाचेसुद्धा प्रशिक्षण घेतले होते. त्या मराठी भावगीतांच्या पहिल्या स्त्री संगीतकार होत्या.

 

एच.एम.व्हीच्या त्या भावगीत प्रकारातील पहिल्या स्त्री संगीतकार होत्या म्हणून एच.एम.व्हीने त्यांचा जाहीर सन्मान केला होता. वीणा चिटको यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. यात; अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे, मयूरा रे फुलवीत ये रे पिसारा, मन माझे भुलले, सखी सांज उगवली, सांग प्रिये सांग प्रिये; आदी गाण्यांचा समावेश आहे.

 

गंगाधर महांबरे यांनी लिहिलेली, वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेली आणि रामदास कामत यांनी गायलेली पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव’, वाटे भल्या पहाटे यावे; ही गाणीही रसिकांच्या ओठावर आहेत. मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या चीजांवर आधारित गणेशभक्ती गीतांची ध्वनिफीतही प्रकाशित झाली आहे. यातील सर्व गाणी चिटको यांनीच संगीतबद्ध केली होती, तर त्यांनी संगीत दिलेली कितीतरी गाणी ज्येष्ठ गायक रामदास कामत, दशरथ पुजारी, उत्तरा केळकर यांनी गायली होती.

 

रामदास कामत यांना भावगीत गायक म्हणून ओळख ही वीणा चिटको यांच्यामुळे मिळाली. मयूरा रे फुलवीत ये रे पिसारा, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, वाटे भल्या पहाटे यावे; ही आणि इतरही गाणी ते त्यांच्याकडे गायले.

 

वीणा चिटको ह्या संगीतकार तर होत्याच पण त्या उत्तम कवयित्री, गीतकार आणि लेखिका होत्या. त्यांचे कितीतरी संगीत विषयक आणि ललित लेख अनेक मासिके आणि वृत्तपत्रे यामध्ये आत्तापर्यन्त प्रसिद्ध झालेले होते. बालगंधर्वांचे गाणे व नाट्यसंगीतहा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. मुकेश, मोहम्मद रफी आदी गायक तसेच अन्य काही कलाकारांवर त्यांनी लिखाण केले होते.

 

वीणा चिटको यांचे १९ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

लेखक जयवंत दळवी जन्मदिन

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९२५

स्मृती - १६ सप्टेंबर १९९४

 

लेखक, नाटककार, पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला.

 

अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवी सारख्या मोठ्या साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसांचे चित्रण आढळते.

 

जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या उभा जन्म उन्हातया कथेवर त्यांनी नाटक लिहून नाट्य लेखनाला सुरुवात केली.

 

सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फुकट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि दळवी, हे बंद करा!नाटक हा तुमचा प्रांत नाही. भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले.

 

सभ्य गृहस्थ हो!हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. 'तुम्ही तो नाद सोडा!या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली! मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले.

 

काही वर्षे 'प्रभात' 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (USIS) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच मी लेखक आहेअशी ऐट घरात ठेवली नाही.

 

जयवंत दळवी नाटककार, कथा, कादंबरी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते पण 'ठणठणपाळ' या नावाने ललितमध्ये जे सदर लिहिले तसे यश आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. एकदा बॉम्बे बुक डेपोमध्ये स्वाक्षरी सप्ताहात ठणठणपाळ स्वाक्षरी देण्यासाठी येणार म्हणून वाचकांनी मोठी गर्दी केली. ठणठणपाळच्या मोठ्या कटआऊट शेजारी जयवंत दळवी बसले होते. उपस्थितांची मागणी अशी होती की आम्हाला ठणठणपाळ कोण आहे ते कळू द्या. शेवटी जयवंत दळवींना आपला मुखवटा दूर करावा लागला. असे भाग्य फार थोड्या लेखकांना मिळते.

 

जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणाऱ्या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र! मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना - ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते.

 

जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले.

 

जयवंत दळवी यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : प्रहार/विकिपीडिया

 

************

************

१४ ऑगस्ट

राजकारणी स. का. पाटील जन्मदिन

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९०० (आंदुर्ले,कुडाळ)

स्मृती - २४ जून १९८१

 

स. का. पाटील यांचा जन्म १४ ऑगस्ट १९०० कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले या गावी झाला.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक, स्वातंत्र्यसैनिक, धुरंधर राजकारणी, कोकणचे तेजस्वी सुपुत्र व मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून भारतीय राजकारणात ६० वर्षे अधिराज्य गाजवलेल्या, भारतात अमेरिकेतील गहू आणून त्याच बरोबर गाजर गवत वाढविणारे तसेच "या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तो पर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही" अशी वल्गना करणारे सदाशिव कान्होजी पाटील उर्फ स. का. पाटील यांचा जन्म कुडाळ देशकर ब्राह्मण ज्ञातीतील कान्होजी व कृष्णाई या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांच्या पाच अपत्यांतील सदाशिव हे थोरले पुत्र जन्मत:च हुशार व बुद्धिमान होते.

 

शालेय शिक्षण केळूस, साळगांव, कुडाळ व मालवण येथे झाले. शालेय जीवनात भगवत गीता, महाभारत यांसह संस्कृत व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे वक्तृत्व कलेत पारंगत झाले. त्यांना लाभलेल्या पहाडी आवाजामुळे ते उत्तम वक्ता बनू शकले. टोपीवाला हायस्कूल मधून मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला.

 

आपले इंटरनंतरचे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी महात्मा गांधीजींनी पुकारलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात झोकून दिले. लोकमान्य टिळक यांच्या निधनानंतर लढ्याचे नेतृत्व महात्मा गांधींच्या हाती आल्याने त्यांच्या विचारांनी प्रभावित होत त्यांनी सभा, सत्याग्रह व मोर्चा यांसारख्या अहिंसात्कम मार्गाने इंग्रजांवर प्रहार करायला सुरुवात केली. परिणामी इंग्रज सरकारने त्यांना १०-१२ वेळा तुरुंगात टाकले; पण कोकणी बाण्याचेस.का. पाटील डगमगले नाहीत. त्यांनी लंडनला जाऊन पत्रकारितेचे दर्जेदार शिक्षण घेत स्वत:ची प्रेस काढून प्रकाशहे साप्ताहिक चालवले.

 

दरम्यान, काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण भाषण करण्यात हातखंडा असल्याने ते उत्तम वक्ता बनले. पुढे काँग्रेसचे मुलुख मैदान तोफ असा त्यांचा लौकिक झाला. शेवट पर्यंत आपल्या मतांशी ठाम राहिले ते केवळ स्वत:च्या आंतरिक बळावरच.

 

माणसे जोडण्याची कला अवगत असल्याने मुंबईतील बहुजन समाजाचा प्रचंड पाठिंबा त्यांना लाभला. खादीची पांढरी शुभ्र टोपी, सदरा व धोतर असा त्यांचा पेहराव असे. कधी गळाबंद लांब कोट व पँट असाही वेष असायचा. १९३१ मध्ये कराचीला जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेतल्यावर काँग्रेसचे सदस्य म्हणून पक्षकार्याला वाहून घेताना पटेलांना गुरुस्थानी मानले. कालांतराने आपल्या धुरंधर राजनीतीच्या जोरावर नेहरूंच्या खास मर्जीतील एक बडे नेते बनले.

 

द्विभाषिक राज्यातील मुंबई शहराच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनावर त्यांचा प्रचंड पगडा होता. १९३७ साली प्रथमच ते मुंबई प्रांतिक विधानसभेत निवडून गेले तर १९४२च्या आंदोलनात त्यांना कारावास भोगावा लागला. १९४५ मध्ये मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व १९५६ पर्यंत अध्यक्षस्थानही भूषवले. १९४९ ते १९५१ अशी सलग तीन वर्षे ते महानगरपालिकेत मुंबईचे महापौरम्हणून कार्यरत राहण्याचा त्यांचा विक्रम आजपर्यंत अबाधित आहे.

 

या बहुरंगी नगरीला प्रति पॅरिस बनवण्याचे त्यांचे स्वप्न होते. म्हणूनच पाटील बोले आणि महानगरपालिका चालेअशी स्थिती असल्यानेच त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राटम्हणून ओळखले जायचे. त्यांचा दांडगा लोकसंग्रह, पक्षनिष्ठा, भांडवलदारांशी असलेले घनिष्ट संबंध यामुळे पक्षासाठी फंडिंग करण्याचे काम ते अत्यंत निष्ठेने करीत. १९५२, १९५७ दक्षिण मुंबईतून व १९६२ गुजरात मधून लोकसभेवर निवडून गेले आणि १९५७ ते १९६७ पर्यंत सुमारे दहा वर्षे ते केंद्रीय मंत्रिमंडळात अन्न, दळणवळण व रेल्वेमंत्री म्हणून काम करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला.

 

१९६८ हे वर्ष महाराष्ट्रासाठी, विशेषतः मुंबईसाठी राजकीयदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे आहे. कारण त्यावर्षी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने केवळ मुंबई वा महाराष्ट्राच्याच नाही, तर संपूर्ण देशाच्या राजकारणाला एक कलाटणी दिली.  यात सर्वाधिक भाजून निघाले ते मुख्यमंत्री मोरारजी देसाई आणि स.का. पाटील. त्यांच्यावर तोफा डागण्यात आघाडीवर होते, आचार्य अत्रे आणि त्यांच्या मागोमाग व्यंगचित्रकार बाळ ठाकरे.

 

मुंबई हे 'कॉस्मोपॉलिटनअर्थात, बहुसांस्कृतिक शहर आहे,’ अशी भूमिका घेत स.का. पाटलांनी मुंबई महाराष्ट्राला जोडण्यास विरोध केला होता. त्यावेळी ते मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांना 'मुंबईचे अनभिषिक्त सम्राटअसं संबोधलं जाई. त्यामुळे तेच पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्रवाद्यांच्या टार्गेटवर आले. अत्र्यांनी तर १९४८ पासूनच 'नवयुगमधून पाटलांवर नेम धरला होता.  'नवयुगचे कव्हर्स 'बी.के. ठाकरेंच्या धमाल व्यंगचित्रांनी सजले. या चित्रांमध्ये मुख्य पात्र असे मोरारजी किंवा स. का. पाटील.

 

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात अत्र्यांनी पाटलांची केलेली जाहीर हजामत तर प्रसिद्धच आहे. एका सभेत स.का. पाटील म्हणाले, "यावश्चंद्रदिवाकरौ (म्हणजे आकाशात सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत) ही मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही." त्यावर अत्र्यांनी "सूर्य आणि चंद्रनावाचा तिखटजाळ अग्रलेख लिहिला. त्यात ते म्हणाले, "जसे काही चंद्र सूर्य याच्या बापाचे नोकर. जणू सूर्य आणि चंद्र यांची थुंकी झेलणारे आणि जोडे पुसणारे केशव बोरकर आणि रामा हर्डीकर."

 

सदोबा कोळसे पाटील, द्विभाषिकवादी सदोबा, अशा विशेषणांनी अत्र्यांनी स.का. पाटलांना या काळात हिणवलं. अत्र्यांचीच री पुढे बाळासाहेबांनी ओढली. 'मार्मिकमधून त्यांनी स.का. पाटलांना यथेच्छ ओरबाडलं. पुढे याच पाटलांनी बाळासाहेब आणि त्यांच्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवली.

 

निवडणूक होती १९६७ ची. माजी संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांनी काँग्रेस विरोधात बंडखोरी केली. दाक्षिणात्य म्हणून त्यांना विरोध करत शिवसेनेने काँग्रेसचे मराठी उमेदवार स.गो. बर्वे यांना पाठिंबा दिला. कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस, आचार्य अत्रे तसंच इतर तीन काँग्रेस विरोधी उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेने 'पंचमहाभूतांना गाडाअसं आवाहन करत प्रचार केला. परिणामी मेनन, अत्रे पडले. तसंच सूत्रधार स.का. पाटलांना पाडून जॉर्ज मुंबईचे अनभिषिक्त सम्राट बनले. तेथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आहोटी लागली, तोपर्यंत ते निवडणुकीचे जादूगारम्हणून प्रसिद्ध होते. केरळात कम्युनिस्टांचा पराभव करून काँग्रेसची सत्ता आणणाऱ्या या बलाढय़ नेत्याने तोपर्यंत मात्र पराभव कधीच अनुभवला नव्हता.

 

फिरोजशा मेहता यांच्यानंतर राष्ट्रीय स्थान प्राप्त करणारे दुसरे नेते म्हणजे स.का. पाटील. भारतीय महापौरपदाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एकमेव महापौर अशी इतिहासात नोंद आहे. मुंबई नगरीवर त्यांचे विशेष प्रेम तर होतच; परंतु त्यांच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन न्यूयॉर्कच्या महापौरांनी एकाच आठवडय़ात तीन वेळा त्यांना आमंत्रित केले होते. अशा धूर्त राजकारणी, कार्यक्षम प्रशासक, प्रभावी संघटक आणि उत्तम वक्ता असलेल्या महापौरांचे योगदान लक्षात घेऊन आजच्या मुंबईच्या महापौरांनी अवश्य बोध घ्यावा तरच गेलेली प्रतिष्ठा राखण्यात यश येईल.

 

वास्तविक पाटलांची मानहानी होण्यास कारण म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा लढा. पंडित नेहरूंच्या भाषावार प्रांत रचनेला असलेल्या विरोधाची धार लक्षात घेऊनच, त्यांनी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत मुंबई कदापि महाराष्ट्राला मिळणार नाही’, असे उद्गार काढले. महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतल्याने जनप्रक्षोभ त्यांच्या विरोधात गेला व ते महाराष्ट्रद्वेष्टे असा प्रसार झाला.

 

यशवंतराव चव्हाण हे सुद्धा संयुक्त महाराष्ट्र चळवळी विरोधात असतानाही पुढे त्यांना मराठी जनतेने माफ केले; परंतु पाटलांना मात्र किंमत मोजावी लागली. दोघेही नेहरूंच्या मर्जीतले तर होतच; परंतु दोघांचे गणित मात्र कधीच जुळले नाही. त्यात मोरारजींचे मत चव्हाणांच्या बाजूने झुकल्याने ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकले.

 

१९६९ मध्ये काँग्रेस फुटली. त्यावेळी ते इंदिराजींच्या विरोधात गेले. परळच्या पोटनिवडणुकीत महाडिक यांना पाठिंबा जाहीर करून त्यांनी सर्वानाच आचंबित केले. पुढे राजकारणापासून अलिप्त राहून ते आपल्या कुटुंबात रमले.

 

स. का. पाटील यांचे २४ जून १९८१ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

लेखिका गोदावरी परुळेकर जन्मदिन

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९०८

स्मृती - ८ ऑक्टोबर १९९६

 

महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९०८ रोजी झाला.

 

या माहेरच्या गोदावरी गोखले. ना. म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद सहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षण प्रसाराच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

 

गिरगावपासून परळ पर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे त्यांनी सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास १९१७ मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले.

 

गोदावरी परुळेकर यांचे ८ ऑक्टोबर १९९६ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट स्मृतिदिन

************

 

जन्म - १९ मार्च १९०० (फ्रांस)

स्मृती - १४ ऑगस्ट १९५८ (पॅरिस)

 

 

मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३५) फ्रेन्च पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचा आज जन्मदिन.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

************

१४ ऑगस्ट

अभिनेता शम्मी कपूर स्मृतिदिन

************

 

जन्म - २१ ऑक्टोबर १९३१ (मुंबई)

स्मृती - १४ ऑगस्ट २०११ (मुंबई)

 

'याहू' स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला.

                                                           

शम्मी कपूर यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्या या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले.

 

शम्मी कपूर यांनी ज्यांना गंभीर, शोकात्मक भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन

************

१४ ऑगस्ट

कुस्तीगीर खाशाबा जाधव स्मृतिदिन

************

 

जन्म - १५ जानेवारी १९२६ (सातारा)

स्मृती - १४ ऑगस्ट १९८४

 

खाशाबा जाधव हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.

 

जाधवांनी १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.

 

खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यातील एका महार कुटूंबात झाला. त्यांची कुस्ती खेळात ख्याति होती. भारत देशातील ते ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू होते.

 

सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्वर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला १९४८ चे ऑलिंपिक पूर्वी मार्गदर्शन केले.

 

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

१४ ऑगस्ट

नेते विलासराव देशमुख स्मृतिदिन

************

 

जन्म - २६ मे१९४५ (लातूर)

स्मृती - १४ ऑगस्ट २०१२

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विलासराव देशमुख यांचा जन्म २६ मे१९४५ रोजी लातूर मधील बाभळगाव मध्ये झाला.

 

पुण्यात बीएस्सी, बीए, एलएलबी चे शिक्षण करुन आलेले विलासराव १९७४ साली बाभळगावचे सरपंच झाले. १९७५ साली ते युवक काँग्रेसच्या कार्यात सक्रीय झाले. १९८० साली लातूर विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. ते लागोपाठ तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले.

 

१९८२ साली ते पहिल्यांदा कृषी, ग्रामविकास, शिक्षण, तंत्रशिक्षण, सहकारी, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे राज्यमंत्री बनले. १९८६ मध्ये त्यांना महसूल व सहकार खात्याचे कॅबिनेटमंत्री म्हणून बढती देण्यात आली. उद्योग व सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी विशेष छाप पाडली.

 

१९९५ साली विधानसभा निवडणुकीत त्यांना दारूण पराभव पत्करावा लागला होता. १९९९ साली शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यासाली झालेल्या विधानसभा निवडणुकी नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे नक्की झाले. त्यावेळी लातूर मधून पुन्हा निवडून आलेल्या विलासरावांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.

 

१९९९ साली  पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण २००३ मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. २००४ मध्ये दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवण्याची संधी त्यांना मिळाली.

 

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विलासरावांना मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडावे लागले. मात्र अल्पावधीतच केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची नियुक्ती झाली.

 

विलासराव देशमुख यांचे निधन १४ ऑगस्ट २०१२ रोजी झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१४ ऑगस्ट

बाबुराब गोविंदराव शिर्के स्मृतिदिन

************

 

जन्म - १ ऑगस्ट १९१८ (वाई,सातारा)

स्मृती - १४ ऑगस्ट २०१० (पुणे)

 

महाराष्ट्र आणि देशाच्या बांधकाम क्षेत्रामध्ये 'सिपोरेक्स' हे नवे क्रांतिकारी तंत्रज्ञान आणुन आपल्या विलक्षण कल्पकतेने ते प्रत्यक्षात यशस्वी करुन दाखविणारे बी. जी. शिर्के यांचा जन्म १ ऑगस्ट १९१८ रोजी पसरणी ता.वाई, जि.सातारा येथे झाला.

 

बी. जी. शिर्के उर्फ बाबुराब गोविंदराव शिर्के यांचा जन्म एका अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात झाला. आई वडील दोघेही अशिक्षित. त्यांच्या गावालाही शिक्षण आणि व्यवसायाची कसलीच पार्श्वभुमी नाही. छत्रपती शिवरायांच्या प्रतापगड रणसंग्रामाच्या काळातील घटनांमध्ये उल्लेख असणारा हा पसरणीचा भाग. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतुन कमवा व शिका पद्धतीने वाईच्या द्रविड हायस्कुल मधुन त्यांनी आपले शालेय शिक्षण पुर्ण केले. पुढे त्यांनी पुण्यात फर्ग्युसन व नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातुन सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.

 

शिकत असताना खानावळीत वाढपी (वेटर) म्हणुन त्यांनी काम केले. ६ जुन १९४३ रोजी बांधकाम अभियांत्रिकी पदवी पुर्ण केली. वाई पसरणी भागातील त्या काळचे ते पहिले इंजिनिअर होते. नोकरी न करता स्वतःची कंपनी सुरु करावी अशी त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु सुरुवातीला अनुभवासाठी नाशिक येथे त्यांनी तेजुकाया बांधकाम कंपनीत काही दिवस नोकरी केली. त्यानंतर ९ सप्टेंबर १९४४ रोजी दसऱ्याच्या मुहुर्तावर त्यांनी कोणतेही पैशाचे पाठबळ नसताना, व्यावसायिक परंपरा नसताना आपल्या जिद्द आणि ज्ञानाच्या जोरावर आपल्या Supreme Construction या कंपनीची पायाभरणी केली.

 

कामाच्या शोधात सुरुवातीला ते सायकलवर फिरले. पुण्यातील लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्याला काम मिळावे अशी त्यांनी विनंती केली. शिर्केंची जिद्द, कष्ट आणि प्रामाणिक धडपड बघता अधिकाऱ्याने त्यांना काम दिले. पुण्याच्या लष्करी छावणीची कंपाउंड भिंत बांधण्याच्या कामापासुन शिर्केंनी आपल्या बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली.

 

लवकरच १९४५ मध्ये कोल्हापुर कारागृहाच्या बांधकामाचे मोठे कंत्राट त्यांना मिळाले. तिथुन त्यांचा नावलौकिक वाढला आणि लवकरच १९५३ मध्ये पुणे विद्यापीठात केमिस्ट्री डिपार्टमेंटची मोठी बिल्डिंग तसेच नीरा नदीवरील वीर येथील धरण अशी मोठी बांधकामे त्यांनी पुर्ण केली.

 

हळुहळु त्यांचा व्यवसाय स्थिरावु लागला. शिर्केंच्या कामाची गुणवत्ता पाहुन शंतनुराव किर्लोस्कर यांनी १९६२ ते १९८१ पर्यंतची आपल्या कंपनीची पुण्यातील सर्व बांधकामे शिर्केंना विनानिविदा करण्यास दिली. व्यवसायात थोडीशी स्थिरता आल्यानंतर बी.जी. शिर्केंनी मागे वळुन न बघता व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरुवात केली. पडेल ते कष्ट करण्याची तयारी, कोणत्याही संकटाला तोंड देण्याची धैर्य, गुणवत्तेचा आग्रह, कल्पकवृत्ती, अफाट जिद्द, समाजसुधारणेची तळमळ आणि भ्रष्टाचाराची चीड या गुणांच्या जोरावर त्यांनी आपला शिर्के कन्स्ट्रक्शन व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेला.

 

सहा दशकांहुन अधिक काळ बांधकाम उद्योगविश्वात बी.जी. शिर्के यांच्या नावाचा बोलबाला राहिला. बांधकाम क्षेत्रात जागतिक स्तरावर एक यशस्वी उद्योजक म्हणुन त्यांनी ख्याती मिळविली. परंतु हे यश मिळविताना, मुख्यत्वे 'Siporex म्हणजे शिर्के' हे समीकरण साधताना त्यांच्या सहनशीलतेचा खुप अंत पाहिला गेला.

 

'सिपोरेक्स' या बांधकामाचे साहित्य निर्माण करणाऱ्या कंपनीची भारतात स्थापना करताना त्यांना खुप संघर्ष, अडथळे, सरकारी कारभार, भ्रष्टाचार, तांत्रिक अडचणी, अतोनात भांडवल अशा गोष्टींवर मात करावी लागली.

 

दरम्यानच्या काळात दुबई मध्ये बांधकामासाठी माणसांचा तुटवडा निर्माण झाला होता. माणसं मिळेनात इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी बांधकामासाठी बी.जी. शिर्केंच्या 'सिपोरेक्स'ला काम मिळाले. त्यांनी भारतातुन लोकं नेऊन दुबईत अनेक इमारती, मशिदी उभ्या केल्या. दुबईच्या या पहिल्या कामाने 'सिपोरेक्स' तारली गेली.

 

२००३ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. त्यांनी महाराणी येसुबाई (छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी व राजेशिर्के घराण्यातील कन्या) यांचे जगातील पहिले स्मारक शिरकोली येथे बांधले आहे. बी.जी. शिर्कें यांनी 'जिद्द' नावाने आत्मचरित्र लिहिले  आहे.

 

बी. जी. शिर्के यांचे १४ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/अनिल माने

 

************

************

🌹 १४ ऑगस्ट 🌹

अभिनेता मोहनीश बहल यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९६१ (मुंबई)

 

बॉलीवूडचा आवडता बडे भैय्यामोहनीश बहल यांचा आज वाढदिवस.

 

जेष्ठ अभिनेत्री नूतन यांनी १९५९ साली रजनीश बहल यांच्या सोबत लग्न केले होते. रजनीश बहल हे नेवी मध्ये लेफ्टिनंट कमांडर होते. नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल हे बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता आहेत.

 

मोहनीश बहल यांनी आपल्या करियरची सुरुवात १९८३ साली आलेल्या बेकरारचित्रपटापासून केली. तेरी बाहो मेहा १९८४ साली आलेला मोहनीश बहल यांचा दुसरा चित्रपट होता. यात आएशा दत्त (जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी) या त्यांच्या सोबत अभिनेत्री होत्या.

 

मोहनीश बहल यांनी सुरुवातीच्या काही चित्रपटात प्रथम नायक आणि पुढे व्हिलनच्या भूमिका केल्या.  मोहनिश बहल अनेक वर्षं बॉलिवूड मध्ये काम करत आहेत, पण त्यांना ओळख 'हम आपके हैं कौन' 'हम हम साथ साथ' या चित्रपटातून मिळाली.

 

सलमान खान आणि मोहनिश बहेल हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. 'मैंने प्यार किया' या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी मोहनिशचे नाव सलमानने खान यांनीच सुचवले होते. मोहनिश सध्या खूपच कमी चित्रपटा मध्ये आणि मालिका मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.

 

२०१० पासून ते खूपच कमी चित्रपटा मध्ये झळकलं आहेत. 'क्रिश' आणि 'जय हो' व २०१९ मध्ये 'पानीपत' वगळता कोणत्याही मोठ्या बजेटच्या चित्रपटात आपल्याला त्यांना या दरम्यान पाहायला मिळाले नाही.

 

स्टार प्लसच्या 'संजीवनी २' या मालिकेत मोहनीश बहल यांनी काम केले होते. प्रनुतन बहल मोहनिश बहल यांची मुलगी आहे. प्रनुतन बहलने नोटबुक चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. या मुळे या कुटुंबातील चौथी पिढी या क्षेत्रात आली आहे असे म्हणता येईल.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 १४ ऑगस्ट 🌹

अभिनेता जॉनी लिव्हर यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९५७

 

बॉलिवुड मधील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिव्हर यांचा आज वाढदिवस.

 

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉनराव प्रकाशराव जनुमाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावी मध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्नच करीत. फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले.

 

देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. काम मिळाले ते स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे.

 

पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनी यांनी तर्हेतर्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनी यांना गेट्टुगेदर मध्ये संधी दिली.

 

रंगभवनच्या त्या संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीनी सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.

 

कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर ते कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरले. जॉनी यांची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे.

 

त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी तेजाबमधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अ‍ॅक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. जॉनी लिव्हर यांनी आतापर्यंत ३५० सिनेमा मध्ये काम केले आहे.

 

जॉनी लिव्हर स्टँडिंग कॉमेडी सुद्धा करतात. जॉनी लिव्हर यांनी बेस्ट कॉमेडिअन श्रेणी मध्ये १३ फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकले आहेत.

 

जॉनी लिव्हर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 १४ ऑगस्ट 🌹

गायिका सुनिधी चौहान चा वाढदिवस

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९८३ (न्यू दिल्ली)

 

बॉलिवुड गायिका सुनिधी चौहानचा आज वाढदिवस.

 

दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.

 

शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.

 

वयाच्या १३व्या वर्षी 'मेरी आवाज सुनो' या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. मस्त या सिनेमातील 'रुकी रुकीसी जिंदगी..' हे तिने गायलेले पहिले बॉलिवूड गाणे आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीने आपल्या नावी केले. त्यानंतर सुनिधीने कधीही मागे वळून पाहिले नाही.

 

सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत गाणी गायली आहेत. सुनिधी चौहानचे लग्न २००२ मध्ये वयाच्या १८ वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला. एप्रिल २०१२ मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सौनिक बरोबर सुनिधीने संसार थाटला आहे.

 

सुनिधी चौहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 १४ ऑगस्ट 🌹

अभिनेता जॉनी लिव्हर यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९५७

 

बॉलिवुड मधील लोकप्रिय हास्य कलाकार जॉनी लिव्हर यांचा आज वाढदिवस.

 

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉनराव प्रकाशराव जनुमाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावी मध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्नच करीत. फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले.

 

देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. १८व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. काम मिळाले ते स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे.

 

पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले. एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनी यांनी तर्हेतर्हेच्या नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनी यांना गेट्टुगेदर मध्ये संधी दिली.

 

रंगभवनच्या त्या संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीनी सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.

 

कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर ते कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरले. जॉनी यांची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे.

 

त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी तेजाबमधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अ‍ॅक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने 'दर्द का रिश्ता' या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. जॉनी लिव्हर यांनी आतापर्यंत ३५० सिनेमा मध्ये काम केले आहे.

 

जॉनी लिव्हर स्टँडिंग कॉमेडी सुद्धा करतात. जॉनी लिव्हर यांनी बेस्ट कॉमेडिअन श्रेणी मध्ये १३ फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकले आहेत.

 

जॉनी लिव्हर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 १४ ऑगस्ट 🌹

अभिनेता मोहनीश बहल यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९६१ (मुंबई)

 

बॉलीवूडचा आवडता बडे भैय्यामोहनीश बहल यांचा आज वाढदिवस.

 

जेष्ठ अभिनेत्री नूतन यांनी १९५९ साली रजनीश बहल यांच्या सोबत लग्न केले होते. रजनीश बहल हे नेवी मध्ये लेफ्टिनंट कमांडर होते. नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल हे बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता आहेत.

 

मोहनीश बहल यांनी आपल्या करियरची सुरुवात १९८३ साली आलेल्या बेकरारचित्रपटापासून केली. तेरी बाहो मेहा १९८४ साली आलेला मोहनीश बहल यांचा दुसरा चित्रपट होता. यात आएशा दत्त (जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी) या त्यांच्या सोबत अभिनेत्री होत्या.

 

मोहनीश बहल यांनी सुरुवातीच्या काही चित्रपटात प्रथम नायक आणि पुढे व्हिलनच्या भूमिका केल्या.  मोहनिश बहल अनेक वर्षं बॉलिवूड मध्ये काम करत आहेत, पण त्यांना ओळख 'हम आपके हैं कौन' 'हम हम साथ साथ' या चित्रपटातून मिळाली.

 

सलमान खान आणि मोहनिश बहेल हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. 'मैंने प्यार किया' या चित्रपटातील नकारात्मक भूमिकेसाठी मोहनिशचे नाव सलमानने खान यांनीच सुचवले होते. मोहनिश सध्या खूपच कमी चित्रपटा मध्ये आणि मालिका मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे.

 

२०१० पासून ते खूपच कमी चित्रपटा मध्ये झळकलं आहेत. 'क्रिश' आणि 'जय हो' व २०१९ मध्ये 'पानीपत' वगळता कोणत्याही मोठ्या बजेटच्या चित्रपटात आपल्याला त्यांना या दरम्यान पाहायला मिळाले नाही.

 

स्टार प्लसच्या 'संजीवनी २' या मालिकेत मोहनीश बहल यांनी काम केले होते. प्रनुतन बहल मोहनिश बहल यांची मुलगी आहे. प्रनुतन बहलने नोटबुक चित्रपटातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. या मुळे या कुटुंबातील चौथी पिढी या क्षेत्रात आली आहे असे म्हणता येईल.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 १४ ऑगस्ट 🌹

गायिका सुनिधी चौहान चा वाढदिवस

************

 

जन्म - १४ ऑगस्ट १९८३ (न्यू दिल्ली)

 

बॉलिवुड गायिका सुनिधी चौहानचा आज वाढदिवस.

 

दिल्लीत जन्मलेली सुनिधी प्रतिभावंत असल्याचे तिच्या वडिलांनी तिच्या बालपणीच ओळखले होते. सुनिधी चौहानचे बालपणीचे नाव निधी चौहान असे होते. चौथ्या वर्षापासून तिने मंदिरात गायन सुरु केले होते.

 

शालेय जीवनात सुनिधी दिल्लीत अनेक ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स देत होती. याच काळात टीव्ही अँकर तबस्सुम यांची नजर सुनिधीवर पडली. त्यांनी आपल्या एका शोमध्ये सुनिधीला गाण्याची संधी दिली आणि तिच्या कुटुंबाला मुंबईत स्थायिक होण्याचा सल्ला दिला. तबस्सुम यांनीच सुनिधीची भेट प्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी सोबत घालून दिली. त्यांनी सुनिधीला त्यांच्या ग्रुपमध्ये गाण्याची संधी दिली होती.

 

वयाच्या १३व्या वर्षी 'मेरी आवाज सुनो' या शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर राम गोपाल वर्मा यांनी सुनिधीला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक दिला. मस्त या सिनेमातील 'रुकी रुकीसी जिंदगी..' हे तिने गायलेले पहिले बॉलिवूड गाणे आहे. हे गाणे जबरदस्त हिट ठरले. या गाण्यासाठी सुनिधीला तब्बल 14 वेगवेगळ्या अवॉर्ड्ससाठी नॉमिनेशन मिळाले होते. यापैकी दोन अवॉर्ड्स सुनिधीने आपल्या नावी केले. त्यानंतर सुनिधीने कधीही मागे वळून पाहिले नाही.

 

सुनिधीने केवळ हिंदीतच नव्हे तर उर्दू, उडिया, पंजाबी, मराठी, तामिळ, तेलगू, भोजपुरी, बंगाली, आसामी, गुजराती आणि नेपाळी भाषेत गाणी गायली आहेत. सुनिधी चौहानचे लग्न २००२ मध्ये वयाच्या १८ वर्षी दिग्दर्शक बॉबी खानबरोबर केले होते. पण फार काळ त्यांचे लग्न टिकू शकले नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला. एप्रिल २०१२ मध्ये सुनिधीने दुसरे लग्न केले. बालपणीचा मित्र आणि म्युझिक डायरेक्टर हितेश सौनिक बरोबर सुनिधीने संसार थाटला आहे.

 

सुनिधी चौहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

!! 14 ऑगस्ट  दिनविशेष ॥

 

             🔥 शनिवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 2010 - पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूरमध्ये घेण्यात आला

👉 1947 - भारताचा घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याच्या ठराव मंजूर केला आणि लार्ड मांऊटबॅटन यांची स्वतंञ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक दिली

👉 1943 - नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्य वीर सावरकर यांना सन्माननीय डी लिट पदवी दिली

 

            🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

जन्म

 

👉 1957 - विनोदी अभिनेता जाॅन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जाॅनी लिव्हर

👉 1925 - साहित्यीक आणि नाटककार पञकार जयवंत दळवी

 

मृत्यू

 

👉 2012 - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख

👉 2011 - हिन्दी चिञपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर यांचे निधन

👉 1988 - एन्झो फेरारी रेस कार निर्माते आणि  ड्रायव्हर

👉 1984 - कुस्तीगीर खाशाबा जाधव यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिक मधे वैयक्तिक पदक मिळविणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏


No comments:

Post a Comment