╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा
विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही
विनंती .
________.
🌄 परिपाठ
🌄.
_________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. आज दिनांक: १०/०८/२०२१. वार: मंगळवार ,. महिना :श्रावण शुक्लपक्ष.३.
नक्षत्र :मघा. योग:परीघ, |
करण:बालव.
सूर्योदय:०६.२८,सूर्यास्त:०७.०९. ■■■■■■■■■■■■■■.सुविचार:स्वप्ने प्रत्यक्षात यायला हवी असतील
तर झोपून राहू नका .. ★★★★★★★★★★★★.
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
•••••••••••••••••••••••••••••••.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
प्रतिज्ञा |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📜 भारताचे
संविधान 📚.
•••••••••••••••••••••••••••••••.
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆========.
●●●●●●●●●◆◆◆◆◆◆◆. 🙏 सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना🙏
"सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना |
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या
ने जीवना |
|
सुमनात तू, गगनात
तू |
तार्यांमध्ये फुलतोस तू |
सद्धर्म जे जगतामध्ये |
त्यांच्या मध्ये वसतोस तू |
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना |
|
श्रमतोस तू शेतांमध्ये |
तू राबसी श्रमिकांसवे |
जे रंजले अन् गांजले |
पुसतोस त्यांची आसवें |
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे
तुझे पद पावना |
|
न्यायार्थ जे लढती रणीं |
तलवार तू त्यांच्या करीं |
ध्येयार्थ जे तमीं चालती |
तू दीप त्यांच्या अंतरी |
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस
त्या तू साधना |
|
करुणाकरा, करुणा
तुझी |
असता मला भय कोठले ? |
मार्गावरी पुढती सदा |
पाहीन मी तव पाउलें |
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी
भीतीविना"
________.
________.
•••••••••••••••••••••••••••••••••
👩💻 बोधकथा 👨💻.
★★★★★★★★★★★★
_________ 🛑 हरणाची
चतुराई🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर
होता. परंतु आपल्या सहका-यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या
लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्याच्याकडे
लक्ष दिले नाही. त्या हरणाने आपल्या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च
पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण
या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला.
तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्यास सुरुवात केली.
चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्याने मित्राला
सावध केले पण मित्र हरीण लोभाच्या बळी पडून फळे खाण्यासाठी पुढे गेला आणि
शिका-याने त्याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्याचे
म्हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.
तात्पर्य: आजच्या काळात कोणी आपल्याला प्रलोभन दाखवत असेल तर आपण सावध
राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्याचे ऐकायला हवे |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼
💫 आव्हान
द्यावया आम्हा कुणाची छाती.
आव्हान द्यावया आम्हा कुणाची
छाती |
दश दिशांत अमुच्या सामर्थ्याची ख्याती॥धृ॥ |
|
कैलासी अजुनी जागा तांडव राग |
सागरी धगधगे वडवाग्नीची आग |
मंत्रात शांतिच्या इथे जागते क्रांती॥१॥ |
|
नगराज हिमालय उन्नत अमुचा माथा |
इतिहास गातसे पुरुषार्थाची गाथा |
प्रसवते वीरता कण कण इथली माती॥२॥ |
|
आसेतु हिमचल एक आमुचा देश |
ही एक संस्कृती एकच दे संदेश |
भारतीय रुधिरें जडली अमुची नाती॥३॥ |
|
सुकोमल आणि कठिण वज्रही आम्ही |
खलसंहारस्तव होऊ रुद्रहि आम्ही |
खड् गापरि कणखर इथे तृणांची पाती॥४॥ |
|
ही असे अनादी अनंत अमुची माता |
हो धन्य वेदही हिचीच महती गाता |
जगजननीची या किर्ति देवही गाती॥५॥
________. 🎰 दिनविशेष🎰.
__________ |
|
महत्त्वाच्या घटना: ■१९९९ : औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्या
औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा
केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय. सामिष |
■१९९९ : ’इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे
देण्यात येणारा ’डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ.
निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर |
■१९९० : मॅगेलान हे अंतराळयान शुक्रावर पोचले. |
■१८१० : ’स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन’ ची
स्थापना झाली. |
■१६७५ : चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील
जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal
Observatory) शिलान्यास
केला. |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
◆१९६० : देवांग मेहता – भारताच्या
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ
सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM)
चे अध्यक्ष. |
◆१९१३ : डॉ. अमृत माधव घाटगे – संस्कृत
व प्राकृत विद्वान. |
◆१८९४ : व्ही. व्ही. गिरी – भारताचे
चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य. |
◆१८६० : पं. विष्णू नारायण भातखंडे – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी
संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक
संस्थापक. |
◆१८५५ : ’गान सम्राट’ उस्ताद
अल्लादियाँ खाँ – जयपूर -अत्रौली घराण्याचे संस्थापक व
कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक . |
१७५५ : नारायणराव पेशवा – ५
वा पेशवा. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
●२०१२ : सुरेश
दलाल – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक
आणि संपादक. |
●१९९७ : नारायण
पेडणेकर – कवी व नाट्यसमीक्षक . |
●१९९२ : लेफ्टनंट
जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त
राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती
होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर
पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. |
●१९५० : खेमचंद
प्रकाश – संगीतकार . |
●१९४२ : हुतात्मा
शिरीषकुमार. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)क्रांती दिन कोणत्या तारखेला असतो? २)अटल बिहारी वाजपेयी कोणता नारा दिला होता?
३)गायन कोकिळा कुणाला म्हणतात?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 *ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■
टीईटी आणि यूपीएससीच्या परीक्षेचे
वेळापत्रक बदलण्याची मागणी;दोन्ही परीक्षा एकाच दिवशी |
■ शाळा दिवाळीनंतर?कृतीदलाचा
मुख्यमंत्र्यांना सल्ला ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७. ======★■◆●====== |
No comments:
Post a Comment