आजचे ऐतिहासिक दिनविशेष १८ऑगस्ट१६६६ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:


छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:

shiv_dinvishesh_ #आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१८ऑगस्ट१६६६

आग्रा कैदेतून निसटल्याबरोबर पुर्वनियोजीत व्यूहरचनेनुसार काही गुप्तहेर, निवडक मावळे आग्रा किल्ल्याच्या थोडसं दुरवर एका कुंभारवाड्यात दबा धरुन बसले होते.

तेथेच मोठी शेकोटी करुन त्याचा धुर बघत त्या दिशेला शिवराय व मावळे एकत्र जमा होऊन तडक घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट मथुरा मध्ये येऊन पोहोचल्या.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

१८ ऑगस्ट इ.स.१६६६

आग्र्याच्या कैदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेनंतर महाराजांच्या जवळचे साथीदार यांना कैद करण्यात आले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१८ऑगस्ट१६८३

मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बादशहाने रहूल्लाखान यास निराकाठच्या प्रदेशाकडे व बरामदखान यास आष्टीकडे रवाना केले.

🚩🏇🏻��🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

#१८ऑगस्ट१६८३

मुघल आणि सिद्दी याच्याबरोबरच संभाजीराजेना पोर्तुगीजांचाही सामना करावा लागला. पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला घेण्यासाठी शंभुराजेंनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ घेऊन जून १६८३ मध्ये चौलवर हल्ला केला.

(१० ते १८ ऑगस्ट)

🚩🏇🚩🏇��🏇🚩🏇🚩

#१८ऑगस्ट१७००

महापराक्रमी महायोद्धा थोरले बाजीराव पेशवे यांची जयंती.

असा धुरंदर की ज्याचा कधीही पराजय झाला नाही, ज्यांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.

वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी पेशवा झालेल्या या वीराने ४० वर्षाच्या आयुष्यात अतुलनीय पराक्रम गाजवला.

आपल्या अद्वितीय पराक्रमाने सर्वांना गर्भगळीत करून, दरारा निर्माण करणारे, वीस वर्षांच्या वादळी कारकिर्दीत पराक्रमाचे नवनवे अध्याय रचणारे बाजीराव पेशवे.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇��🚩🏇🏻🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

 

पाच पातशाह्या आपल्या तलवारीच्या पात्यावर आणि राजकारणाच्या जोरावर नाचवनारे वादळ छत्रपती शिवाजी महाराज..🚩

# शिवराय असे शक्तिदाता...🚩

 

हिंदवी स्वराज्याचे मास्टर माइंड शहाजीराजे

भातवडीच्या लढाईमुळे मालोजीराजे व शहाजीराजे या पितापुत्रांच्या पराक्रमाचे दर्शन घडले. शहाजीराजांची प्रतिष्ठा, पराक्रम व मुत्सद्दीपणा या गोष्टी सिद्ध झाल्या. गनिमी काव्याची लढाई ही किती उपयुक्त आहे हे भातवडीच्या लढाईने सिद्ध केले. कदाचित हाच गनिमी काव्याचा श्रीगणेशा ठरला व पुढे मराठेशाहीत उपयोगी ठरला. पुढे मलिक अंबरास शहाजीराजांचा द्वेष वाटू लागला. त्यामुळे शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीत दाखल झाले. शहाजीराजांनी चार वर्षें शहाजहानशी जो सामना दिला तो फार महत्त्वाचा आहे. गनिमी काव्याने मोगलांशी लढल्यामुळे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश त्यांना माहीत झाला. शहाजीराजांनी त्यांच्या पाठीशी मावळ्यांची सेना उभी केली. निजामशाही बुडाल्यावर ते आपल्या साधनसंपत्तीसह परत आदिलशाहीत गेले. त्यांच्याएवढा मातब्बर सरदार दक्षिणेत नव्हता म्हणून आदिलशाहीत त्यांना त्याच सन्मानाने घेतले.

 

अर्थात भातवडीच्या या युद्दात मराठी राज्याचा थेट संबधच नाही पण ह्या लढाईचा परीणाम काही वेगळाच आहे,निजमाशाहीच्या मलिक अंबरने आदिलशाही आणी मुघलं या सत्तेला शह दिला. अहमदनगर येथुन पाच कोसावर इ.स. ३१ ऑक्टोबर १६२४ साली झालेल्या या युद्धाने मलिकंबरच नाव भारतीय राजकारणात खुप पक्क झालं,पण या युद्धात शरीफ भोसले मारले पण शहाजी भोसले नावाचा एक तडफ़दार सरदार खर्या अर्थाने नावारुपाला आला. पाहायला गेलं तर मराठेतर कोणत्याही लेखात शहाजीराजेंच नाव या लढाईत नाही,पण शिवभारतकार शहाजींच या लढाईत पराक्रम गाजवला म्हणुन वर्णन करतो जे योग्यच आहे, पुढे या युद्धामुळे शहाजीराजेंच राजकीय वजन नक्कीच वाढलं, त्यातूनच शहाजीराजें निजामशाही सोडुन आदिलशाहीत गेले,यातून शहाजींचा बोलाबाला व्हायला सुरुवात झाली, पुढे शहाजींनी मुर्तिजा निजामशाही स्थापुन, समर्थपणे चालवली, यातच मराठे राज्य चालवू शकतात हे सिद्ध झालं,थोडक्यात या युद्धाने शहाजींचा भारतीय राजकारणात उगम झाला,शहाजीराजे हे मातबर सरदार म्हणुन उदयाला आले,याचा परीणाम शिवाजी महाराजांच्या बालपणावर नक्कीच झाला असेल कदाचित स्वराज्याच्या देखण्या स्वप्नाचा हा श्रीगणेशा असावा.

 

लेखन व माहिती संकलन :- विजयश भोसले

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

 

१८ ऑगस्ट इ.स.१६६६

आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला. दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. महाराजांची पादत्राणे पलंगाखाली पडलेली होती तर त्यांचा मंदिल व एक आरसा बिछान्यावर होता.छावणीत फक्त ३ घोडे, २ पालख्या व एक तबेल्याचा नोकर एवढेच होते. हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली. रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली. चिडलेल्या औरंगजेबाने रामसिंहाला महाराजांचा तपास करून त्यांना हजर करण्यास सांगितले. वाटेवरील फौजदारांना जागरूक राहण्यास सांगण्यात आले. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित, रामकीशन, जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले. दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत, त्रंबकपंत व इतर दोन चाकर हेही फौलादखानाच्या हाती सापडले.औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केल.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 १८ ऑगस्ट इ.स.१६८३

मुघल आणि सिद्दी याच्याबरोबरच संभाजीराजेना पोर्तुगीजांचाही सामना करावा लागला. पोर्तुगीजांच्या कुरापतीचा बदला घेण्यासाठी शंभुराजेंनी ६ हजार पायदळ व २ हजार घोडदळ घेऊन जून १६८३ मध्ये चौलवर हल्ला केला.ही स्वारी जवळपास ६ महिने सुरू होती. या स्वारीत पुढे निळोपंत पेशव्यांनी दमण ते चौल पर्यंतचा मुलुख ताब्यात आणला. स्वतः शंभुराजेंनी चौलच्या ठाण्यास वेढा घालून तटबंदीवर तोफाचा मारा केला.पोर्तुगीज सैनिक सततच्या लढाईने थकून गेले. मराठ्यांनी माघार घ्यावी म्हणून पोर्तुगीजानी 'मेरी व्हर्जिन' 'सेंट स्टीफन' यांची प्रार्थना करण्यास सुरुवात केली. ठाण्याच्या कॅप्टनने तर 'सेंट अँथनी' ची प्रार्थना करून त्याच्या पायाशी ६० आश्रफ्या ठेवल्या पण मराठे काही मागे हटले नाहीत.शंभुराजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी चौलच्या ठाण्यावर हल्ला केला.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 १८ ऑगस्ट इ.स.१७००

महापराक्रमी महायोद्धा थोरले बाजीराव पेशवे अर्थात राऊसाहेबांचा जन्म..

शके १६२२, विक्रमनाम संवत्सर,भाद्रपद शुद्ध १५ या तिथीला बाजीरावांचा जन्म झाला. त्यांचे जन्मस्थान कोणते याबद्दल दुर्दैवाने नेमका पुरावा सापडत नाही. राऊंचे पाळण्यातले नाव विश्वनाथ उर्फ विश्वासराव होते. तसेच लहानपणी त्यांना विसाजी असेही हाक मारत. बाजीरावांची मुले त्यांना बाबासाहेब म्हणत. 'बाजीराव' हे नाव का ठेवले याबद्दल एक उल्लेख आहे. बाजीरावांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडील त्यांनी स्वतः लिहिलेली एक बखर वाचत होते. त्या बखरीत पुर्वी जे 'बाजी' नावाचे नावाचे पराक्रमी लोक होऊन गेले त्यांची माहिती होती. ही बखर वाचत असतानाच बाळाजींना मुलगा झाल्याची बातमी समजली म्हणून त्या मुलाचे नाव बाजीराव असे ठेवले. पुढे जाऊन हेच नाव जास्त प्रसिद्ध झाले. बाजीरावांचे हे भट आडनावाचे घरणे मुळ कोकणातील श्रीवर्धनचे होते. पुढे ते काही कारणाने देशावर आले. कालांतराने राजाराम, ताराबाई, शाहू या कालखंडात बाळाजी पराक्रम गाजवत १७१३ साली पेशवेपदावर पोचले. बाळाजींचा मुक्काम सासवडला होता. पुढे बाजीरावांच्या काळात तिथुन सातारा व नंतर पुण्यात शनिवारवाड्यात स्थलांतर केले. १७२० मधेच बाजीरावांची बाळाजींच्या जागेवर पेशवेपदावर नेमणूक झाली व पुढे अनेक पराक्रम गाजवत बाजीरावांनी हिंदवी साम्राज्य व्रुद्धिंगत केले.

१७२९ साली बाजीरावांच्या जीवनात मस्तानी आली. यावरुन पुढे काही वाद झाले. तसेच पुढे बाजीरावांचा दाभाडे सरदारांशी संघर्ष झाला. हे दोन अपवाद सोडले तर बाजीरावांची कारकीर्द पराक्रम व राजकारणाने भरली आहे.

१७१३ सालची पांडवगडाची चकमक,१७२० मधे निजामाचा केलेला पराभव, १७२१ मधे दाऊदखान पन्नीचा पराभव, १७२२ चा पोर्तुगीजांशी केलेला तह, १७२४ ला उज्जैनला दयाबहाद्दूराचा केलेला पराभव, १७२५ ते १७२७ दरम्यान चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टणची यशस्वी मोहिम, १७३७ मधे दिल्लीवर मोहिम काढुन तिची केलेली दुर्दशा या आणि अनेक मोहिमांत बाजीरावांनी पराक्रम केला. १७२८ मधे बाजीरावांनी निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव केला. त्या लढाईतील बाजीरावांचे युद्धकौशल्य बर्नार्ड मॉन्टेगमरी या इंग्रज सेनानीला पुढे अनेक वर्षांनी इतके भावले की त्याने त्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. यावेळी भारत इंग्रजांच्या पारतंत्र्यात होता हे विशेष.

बर्नार्ड म्हणतो त्यातील काही वाक्ये:

 

"The way Bajirao outgenerelled Nizam-Ul-Mulk at the Battle of Palkhed was the Masterpiece of Strategic Mobility ...."

इस १७२८ मधे बुंदेलखंडचे छत्रसाल बुंदेला यांच्या जैतापूरच्या राज्यावर मोहंमद बंगशने आक्रमण केले. सुरूवातीला छत्रसालांनी प्रतिकार केला मात्र नंतर बंगश वरचढ ठरू लागला तेव्हा छत्रसालांनी बाजीरावांकडे मदत मागितली. त्यासंदर्भात छत्रसाल काय म्हणाले याचा एक उल्लेख आहे 'जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज ।। बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज ।। '

बाजीरावांनी तिथेही मोठा पराक्रम गाजवत बंगशाला नामोहरण करत शरण यायला भाग पाडले. छत्रसालांचे राज्य वाचले व खुष होऊन त्यांनी बाजीरावांना मुलगा मानून त्यांच्या राज्याचा तिसरा हिस्सा देण्याचे जाहिर केले. त्याच वेळी छत्रसालांनी त्यांची एक दासीकन्या बाजीरावांना नजर केली. तिच पुढे बाजीरावांशी जन्मभर जोडली गेली व 'मस्तानी' या नावाने ओळखली गेली. इस १७२२ साली बाजीराव पेशव्यांनी स्वतः चा शिक्का तयार केला. त्यात शाहुराजांबद्दल आदरभाव व्यक्त होतो.

"श्री राजा शाहू नरपति हर्षनिधान, बाजीराव बल्लाळ मुख्य प्रधान।।"

आपल्या पराक्रमाने मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, निजाम व काही आपल्याच फितुरांना नामोहरण करणार्या राऊंना इतिहास कायम लक्षात ठेवेल ही अपेक्षा!!

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 १८ आॅगस्ट इ.स.१७००

हणमंतराव निंबाळकर यांनी खटाव जिंकले

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 १८ ऑगस्ट इ.स.१९४५

सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू ?

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्दचा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩


No comments:

Post a Comment