🙏🌴🌹आजचे दिन विशेष🌹🌴🙏३ ऑगस्ट घटना आणि घडामोडी=मृत्यु / पुण्यतिथी / स्मृतिदिन

 

🙏🌴🌹आजचे दिन विशेष🌹🌴🙏

 

 

३ ऑगस्ट

 

 

घटना आणि घडामोडी

 

 

१४९२ - स्पेनच्या राज्यकर्त्यांनी ज्यू व्यक्तींची स्पेनमधून हकालपट्टी केली

 

१६७८ - अमेरिकेत बांधले गेलेले पहिले जहाज ग्रिफोन समुद्रात सोडण्यात आले.

 

१७८३ - जपानमध्ये माउंट असामा ज्वालामुखीचा उद्रेक. ३५,००० ठार.

 

१८६० - न्यू झीलॅंडमध्ये दुसरे माओरी युद्ध सुरू झाले.

 

१९०० - फायरस्टोन टायर कंपनीची स्थापना.

 

१९१४ - पहिले महायुद्ध - जर्मनीने फ्रांसविरुद्ध युद्ध पुकारले.

 

१९२३ - कॅल्विन कूलिज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.

 

१९४६ - अमेरिकेत नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनची स्थापना.

 

१९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

 

१९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार.

 

१९८१ - अमेरिकेच्या १३,००० हवाई वाहतुक नियंत्रकांनी संप पुकारला.

 

१९९७ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.

 

२००५ - मॉरिटानियाच्या राष्ट्राध्यक्षाविरुद्ध उठाव.

 

२०१४ - चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूकंपामुळे ३९८ ठार.

 

 

जन्म / जयंती / वाढदिवस

 

 

१७३० - सदाशिवरावभाऊ पेशवे सेनापती मराठा साम्राज्य.

 

१७७० - फ्रीडरिक विल्हेम तिसरा, प्रशियाचा राजा.

 

१८११ - इलायशा ग्रेव्ह्स ओटिस, अमेरिकन संशोधक.

 

१८५५ - ज्यो हंटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

 

१८५६ - आल्फ्रेड डीकिन, ऑस्ट्रेलियाचा दुसरा पंतप्रधान.

 

१८६७ - स्टॅन्ली बाल्डविन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

 

१८७२ - हाकोन सातवा, नॉर्वेचा राजा.

 

१९३३ - पॅट क्रॉफर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

 

१९३७ - डंकन शार्प, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

 

१९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.

 

१९४८ - ज्यॉॅं-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.

 

१९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.

 

१९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.

 

१९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

 

 

मृत्यु / पुण्यतिथी / स्मृतिदिन

 

 

११८१ - पोप अलेक्झांडर तिसरा.

 

१४६० - जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.

 

१७९७ - जेफ्री ऍम्हर्स्ट, इंग्लिश सेनापती.

 

१९२५ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

 

१९७७ - मकारियोस तिसरा, सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष.

 

१९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.

 

२००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.

प्रतिवार्षिक पालन

************

३ ऑगस्ट

राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त जन्मदिन

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १८८६ (चिरगाव)

स्मृती - १२ डिसेंबर १९६४

 

खडकाव्याला एक नवी प्रतिष्ठा मिळवून देणारा हा कवी. काव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी 'राष्ट्रकवी' म्हणून गौरविले होते. त्यांची कविता, भाषण किंवा उद्बोधासारखी होती. पूर्व आणि पश्चिम, प्राचीनता आणि आधुनिकता यांत समन्वय साधणारा हा कवी. पुराणे तिहापासून राष्ट्रीय जागरण समाजसुधारापर्यंत त्यांच्या कवितेचा प्रवाह होता.

 

आपल्या वाणीने आणि लेखणीने गुप्ता यांनी सामाजिक संघर्षाला, चळवळीला अधिक तीव्र केले. आपल्या कवितांतून राष्ट्रीयत्वाच्या, सांस्कृतिक परंपरेच्या जोपासनेला नवे परिणाम दिले. साकेत, यशोदरा, हे भारतीय संस्कृतीच्या उदात्ततेचा गौरव करणारे त्यांचे कवितासंग्रह.

 

खडीबोली द्वारे हिंदी काव्यामध्ये अभिव्यक्तीचे नवे प्रभावी माध्यम आणणाऱ्या या कवीने बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरही कविता लिहिली आहे. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस 'कवि दिवस' म्हणून साजरा केला जातो.

 

१९५३ साली भारत सरकार ने त्यांना पद्म विभूषण व १९५४ मध्ये साहित्य पद्म भूषण देऊन सम्मानित केले होते.

 

मैथिलीशरण गुप्त यांचे १२ डिसेंबर १९६४ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

३ ऑगस्ट

'भाष्यकार' गुरुदेव रानडे जन्मदिन

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १८८६ (कर्नाटक)

मृत्यू - ६ जून १९५७

 

उपनिषदाचे गाढे अभ्यासक व निरुपणकार आणि भारतीय तत्वज्ञानातील अद्वैतवादाचे भाष्यकार  गुरुदेव रानडे यांचा जन्म ३ ऑगस्ट १८८६ कर्नाटकात विजापूर जिल्ह्यातील जमखिंडी येथे झाला.

 

आधुनिक युगात धर्माच्या पलिकडे जाऊन भारतीय उपनिषदांकडे पाहणारा असा अभ्यासक विरळाच.

ब्रह्मांड विज्ञान, मनोविज्ञान व धर्मशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा अभ्यास करून जीवनात 'अंतीम सत्य' प्राप्त करण्यासाठी त्यांचा कसा आधार घेता येईल, याचे सूत्र गुरुदेव अर्थात रामचंद्र दत्तात्रय रानडेनी प्रवचने, लेख व ग्रंथांतून सविस्तर विशद केले. मुळातच बुद्धिमान असलेल्या रानडेंनी उच्च शिक्षण पुण्यातच पूर्ण केले व तिथेच महाविद्यालयीन अध्यापनाला सुरुवात केली. पण उपनिषदांवरील त्यांच्या सखोल अभ्यासाची कीर्ती दिगंत पसरली. त्यामुळेच त्यांना अलाहाबाद विद्यापीठाने बोलावून तत्वज्ञान विभागाचे प्रमुख केले. नंतर ते याच विद्यापीठाचे कुलगुरूही झाले.

 

निवृत्तीनंतर रानडे कर्नाटकात निंबाळला स्थायिक झाले व त्यांनी तेथे आश्रम स्थापन करून शेकडो विद्यार्थ्यांना उपनिषदाचे शिक्षण दिले. तिथेच त्यांना त्यांच्या विद्यार्थांनी 'गुरुदेव' ही उपाधी दिली.

 

त्यांनी 'A Constructive Survey of Upanishadic Philosophy' हा ग्रंथ लिहून भारतीय तत्वज्ञान व उपनिषदे यांची माहिती जगाला पोहोचवली. ज्येष्ठ तत्वज्ञ डाॅ. एस. राधाकृष्णन् डाॅ. रानडेंना आपले 'गुरुदेव' मानत.

 

गुरुदेव रानडे यांचे ६ जून १९५७ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

३ ऑगस्ट

गीतकार शकील बदायूँनी जन्मदिन

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १९१६

स्मृती - २० एप्रिल १९७०

 

जेष्ठ गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला.

 

शकीलशब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत. शकील बदायूँनी यांचे वडील जमाल अहमद सोख्ता काद्रीहे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग - मोमीनच्या काळातले समीक्षक होते.

 

शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवी सारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते. शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कवि संमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि झुले मे पवन के आई बहारअसेच झाले. शकील अहमद यांचे नाव चित्रपटाद्वारे शकील बदायूँनीम्हणून झगमगू लागले.

 

दर्दहा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले अफसाना लिख रही हूँगाणार्या उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील बदायूँनी यांची जोडी संगीतकार  हेमंत कुमार यांच्या बरोबर चित्रपट सृष्टीत जास्ती जमली.

 

शकील बदायूँनी यांनी हेमंत कुमार यांच्या सोबत बेकरार कर के हमें यूं न जाइये, कहीं दीप जले कहीं दिल, जरा नजरों से कह दो जी निशाना चूक ना जाये, भंवरा बड़ा नादान है बगियन का मेहमान है, ना जाओ सइयां छुड़ा के बहियां, जब जाग उठे अरमान तो कैसे नींद आये अशी अप्रतींम गाणी दिली.

 

निर्माता-निर्देशक ए.आर. कारदार यांच्या चित्रपटात शकील बदायूँनी यांनी गाणी लिहिली होती. १९४७ मधील चित्रपट दर्द मधील गाणी शकील बदायूँनी यांनी लिहिली होती, जी सुपरहिट झाली होती. त्या नंतर या दोघांनी दुलारी, दिल्लगी, दास्तान, जादू, दीवाना, दिले नादान, दिल दिया दर्द लिया अशा चित्रपटासाठी एकत्र काम केले. शकील बदायूँनी यांनी गुरुदत्त, महबूब खान, के आसिफ, राज खोसला, नितिन बोस  यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती.

 

दिलीप कुमार यांच्या मेला, बाबुल, दीदार, आन, अमर, उड़न खटोला, कोहिनूर, मुग़ले आज़म, गंगा जमुना, लीडर, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, संघर्ष व आदमी या चित्रपटांची गाणी शकील बदायूँनी यांची होती.

 

शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे १९६१ ते ६३ सलग तीन वर्षे फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. १९६० मध्ये  चौदहवी का चांद या चित्रपटातील चौदहवीं का चांद हो या आफताब हो, १९६१ मध्ये 'घराना' या चित्रपटातील हुस्न वाले तेरा जवाब नहीं व १९६२ मध्ये 'बीस साल बाद' या चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल या गांण्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते.

 

शकील बदायूँनी  यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.

 

विनम्र अभिवादन !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

३ ऑगस्ट

अभिनेत्री कामिनी कदम जन्मदिन

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १९३३

स्मृती - १९ जून २००० (मुंबई)

 

माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात कामे केली. कामिनी कदम यांनी स्मिता हे नाव धारण करून 'ये रे माझ्या मागल्या' या चित्रपटा द्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवले.

 

व्ही. शांताराम यांचे बंधू व छायालेखक व्ही. अवधूत यांच्या त्या मेहुणी. असे म्हणतात, अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे नाव तिच्या नावावरुन ठेवले होते. १९५८ साली आपले नाव कामिनी कदम करून हिंदी चित्रपट सृष्टीत 'तलाक' या चित्रपटाद्वारे प्रवेश केला.

 

कामिनी कदम यांचे चित्रपट- ये रे माझ्या मागल्या, माझा होशील का?, वाट चुकलेले नवरे, गाठ पडली ठका ठका, देवाघरचं लेणं, नवरा म्हणू नये आपला, पहिलं प्रेम, दोन घडीचा डाव, आंधळा मागतो एक डोळा, तलाक, संतान, मिया बिबी राजी, स्कूल मास्टर, माँ बाप, सपने सुहाने, धर्मपत्नी.

 

कामिनी कदम यांचे १९ जून २००० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

३ ऑगस्ट

क्रांतिसिंह नाना पाटील जन्मदिन

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १९०० (सांगली)

स्मृती - ६ डिसेंबर १९७६ (वाळवा)

 

क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

 

महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.

 

नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.

 

स्वातंत्र्य लढा :

 

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.

 

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. आपुला आपण करू कारभारहे सूत्र त्यांनी १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग.दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

 

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे "तुफान दलाचे" फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉंबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.

 

या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी तुफान सेनाया नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती.

 

ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

 

नाना पाटलांच्या प्रति सरकारला लोक पत्रीसरकारम्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.

 

१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.

 

यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

 

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.

 

स्वातंत्र्योत्तर काळ :

 

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

३ ऑगस्ट

संगीतकार जयदेव जन्मदिन

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १९१९

स्मृती - ६ जानेवारी १९८७

 

संगीतकार जयदेव यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१९ रोजी झाला.

 

जयदेव यांनी जेष्ठ सरोद वादक उस्ताद अली अकबर खान यांच्यासह अनेक गुरू कडून संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले. संगीतकार होण्याआधी आधी जयदेव एस. डी. बर्मन यांचे सहाय्यक म्हणून काम केले.

 

संगीतकार जयदेव यांनी १९५५ मधल्या 'जोरू का भाई' पासून संगीत देण्यास सुरुवात केली; तरी १९५५ ते १९७० या प्रदीर्घ काळात जोरू का भाई, अंजली, आणि समुंदरी डाकू, हम दोनो, मुझे जीने दो, किनारे किनारे, हमारे गम से मत खेलो; अशा फक्त सात चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली.

 

'जोरू का भाई' साहिरने लिहिलेली 'सुबह का इंतजार कौन करें' तलत आणि लता यांनी गायलेले गाणे अजून ही लोकांच्या लक्षात आहे. चित्रपट उद्योगात जास्त तीन दशके काम करून सुद्धा जयदेव यांनी फक्त ४० चित्रपटाना संगीत दिले.

 

चित्रपट संगीता बरोबरच अनेक संतकवींच्या रचनाही जयदेव यांनी लता, आशा, भीमसेन जोशी अशा लोकांकडून गाऊन घेऊन अजरामर केल्या आहे. कौनो ठगवा नगरिया लूटल हो, रघुवर तुमको मेरी लाज हरी आओ हरी आओ, मैं जानू नाही; या व्यतिरिक्त जयदेव यांनी हिंदी- उर्दूमधील प्रसिद्ध रचना आशा भोसलेकडून गाऊन घेतल्या आहेत. निराला, महादेवी वर्मा, नरेंद्र शर्मा तसेच गालिब, वगैरे कवी शायरांच्या रचना त्यात आहेत. त्यातले 'मन तुमुल कोलाहल कलय में मैं हृदय की बात रे' हे गाणे ऐकणे हा 'आऊट ओफ वर्ल्ड' अनुभव आहे.

 

जयदेव यांचे ६ जानेवारी १९८७ निधन झाले !

 

जयदेव यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९३२२४०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

३ ऑगस्ट

संशोधक एमिल बर्लिनर स्मृतिदिन

************

 

जन्म - २० मे १८५१

स्मृति - ३ ऑगस्ट १९२९

 

एमिल बर्लिनर जर्मन-अमेरिकन शोधक होते. फोनोग्राफसह वापरल्या जाणार्‍या उभ्या-कट फ्लॅट डिस्क रेकॉर्ड (ज्याला ब्रिटिश आणि अमेरिकन इंग्रजीत 'ग्रामोफोन रेकॉर्ड' म्हणतात) शोधण्यासाठी तो प्रख्यात आहे.

 

काही काळ लिव्हरी स्टॅबिल मध्ये काम केल्यानंतर, त्याला दूरध्वनी आणि फोनोग्राफच्या नवीन ऑडिओ तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्याने सुधारित टेलिफोन ट्रान्समीटर (पहिल्या प्रकारच्या मायक्रोफोन पैकी एक ) शोध लावला. बेल टेलिफोन कंपनीने पेटंट विकत घेतले आहे (टेलीफोन प्रकरणे पहा).

 

अमेरिकेत, पेटंट हक्कांबद्दल थॉमस एडिसन आणि बर्लिनर यांनी एक लांब कायदेशीर लढा दिला. परंतु २७ फेब्रुवारी १९०१ रोजी अमेरिकेचे अपील कोर्टपेटंट शून्य असल्याचे जाहीर केले आणि एडिसन यांना शोधास संपूर्ण हक्क देण्यात आले, असे नमूद केले की, "एडिसन भाषणाच्या संप्रेषणात बर्लिनरच्या अगोदर ट्रान्समिटर मध्ये कार्बनचा वापर हा वादविवादाच्या पलीकडे म्हणजे एडिसनचा शोध आहे" आणि बर्लिनर पेटंटला अवैध ठरविण्यात आले.

 

१८८६ मध्ये बर्लिनरने ध्वनी रेकॉर्डिंगच्या पद्धतींसह प्रयोग करण्यास सुरवात केली.

 

ग्रामोफोन (gramophone) हे एका चक्राकार तबकडीवर चिरा पाडून ध्वनिमुद्रित केलेल्या आवाजाचे पुन्हा ध्वनीत रूपांतर करणारे उपकरण होते. ते प्रामुख्याने १८७०च्या दशकापासून १९८०च्या दशकापर्यंत प्रचलित होते. या तबकड्या लाखेच्या किंवा तत्सम पदार्थाच्या असत. याउलट, फोनोग्राम म्हणजे आवाजाचे तबकडीवर ध्वनिमुद्रण करणारे उपकरण.

 

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532

 

************

************

३ ऑगस्ट

अभिनेता रमेश भाटकर जन्मदिन

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १९४९ (कोल्हापूर)

स्मृती - ४ फेब्रुवारी २०१९ (मुंबई)

 

आपल्या 'डॅशिंग' आणि सहजसुंदर अभिनयाने रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेता रमेश भाटकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ रोजी झाला.

 

रमेश भाटकर हे स्नेहल भाटकर यांचे चिरंजीव. वासुदेव भाटकर अर्थातच स्नेहल भाटकर हे प्रसिध्द संगीतकार होते. संगीताची बॅकग्राऊंड असतानाही रमेश भाटकर अभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना ते स्विजमिंग चॅम्पिंयन होते. तसेच ते खो-खो मध्येही चॅम्पियन होते.

 

रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरूनच झाली. 'अश्रूंची झाली फुले' हे त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक असले तरी नोकरी करत असताना ते नाटकात काम करायचे.

 

'काका किशाचा' हे पहिले नाटक होते. 'अश्रूंची झाली फूले' नंतर त्यांना अनेक नाटके मिळत गेली. मग, नोकरी आणि नाटके यांचा ताळमेळ बसेना म्हणून त्यांनी आपल्याल नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्णवेळ नाटकाकडे लक्ष दिले.

 

उघडले स्वर्गाचे दार (१९८२), देणार्या चे हात हजार (१९८०), बिजांकुर, षडयंत्र (१९९१), केव्हा तरी पहाटे, धंदेवाईक, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ताल, द बॉस-सूत्रधार, किनारा अशा पन्नाासहून अधिक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला.

 

दूरदर्शनवरील 'विक्रम और वेताल' ही त्यांची पहिली मालिका ठरली. या नंतर 'रिश्ते-नाते' ही मालिका मिळाली. या दोन्हीही मालिका हिंदी होत्या्. कमांडर (१९९२), हॅलो इन्पेक्टर (१९९०), दामिनी, तिसरा डोळा, अधांतरी, बंदिनी, युगंधरा या मालिकांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

 

'तिसरा डोळा' मध्ये त्यांच्या बराबेर अभिनेत्री शालिनी कामत यांचीही महत्त्वा्ची भूमिका होती. मुख्यत: त्यांच्या पोलिस इन्पेंक्टरच्या भूमिका गाजल्या. मिश्किकलपणे विनोदी मित्राची फिरकी घेणारा 'लाईफ मेंबर' मधील 'गौत्याइ' ची भूमिकाही गाजली.

 

'संसार' ही त्यांची गाजलेली मालिका अजूनही लक्षात राहण्यांसारखी आहे. १९७७ ला 'चांदोबा चांदोबा भागलास का' या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे त्यांनी अष्टविनायक, आपली माणसं, दुनिया करी सलाम, शपथ तुला बाळाची, रंगतसंगत, दे टाळी, घरकुल, पुन्हा  हसावे, लपवाछपवी, आई पाहिजे या चित्रपटांत विविध प्रकारच्या, भूमिका केल्या.

 

त्यांनी जवळपास ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. माहेरची साडी (१९९१), सवत माझी लाडकी असे एकापेक्षा एक हिट चित्रपट त्यांधनी दिले. 'माहेरची साडी' हा चित्रपट तुफान गाजला.

 

अष्टमविनायक या चित्रपटात त्यांनी सहाय्यक भूमिका केली होती. द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टरया चित्रपटात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती. ही त्यांची अखेरची भूमिका ठरली.

 

गेल्याच वर्षी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा जीवनगौरवपुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. ९८ व्या मराठी नाट्य संमेलनामध्ये रमेश भाटकर यांचा जीवनगौरवपुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

 

रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश आहेत. रमेश भाटकर यांचे ४ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

३ ऑगस्ट

लेखिका सरोजिनी वैद्य स्मृतिदिन

************

 

जन्म - १५ जून १९३३ (अकलूज)

स्मृती - ३ ऑगस्ट २००७

 

ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्य प्रकारांत सरोजिनी वैद्य यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले.

 

जेष्ठ कवी शंकर वैद्य हे त्यांचे पती होत. डॉ. सरोजिनी वैद्य यांनी या लंडनच्या आजीबाईंची गोष्ट कहाणी लंडनच्या आजीबाईंचीया पुस्तकातून सांगितली होती. 

 

सरोजिनी वैद्य यांचे ३ ऑगस्ट २००७ रोजी निधन झाले.

 

सरोजिनी वैद्य यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

३ ऑगस्ट

'पब्लिसिटी डिझायनर' श्रीकांत धोंगडे यांचा वाढदिवस

************

 

जन्म - ३ ऑगस्ट १९४५ (पुणे)

 

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल छपन्न वर्षांची अष्टपैलू व चौफेर वाटचाल असलेल्या ज्येष्ठ 'पब्लिसिटी डिझायनर' श्रीकांत धोंगडे यांचा आज वाढदिवस.

 

सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांच्या जाहिराती मध्ये रेखाचित्रे अथवा लाइन ड्रॉइंग्जचा वापर अधिक असायचा. त्यामुळे श्रीकांत धोंगडे यांनी काढलेली रेखाचित्रे तत्कालीन शैलीची आठवण करून देतात. फूटपाथवरील फेरीवाला ते पब्लिसिटी डिझाइनर हा श्रीकांत  धोंगडे यांचा प्रवास अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेला आहे.

 

श्रीकांत धोंगडे यांचे बालपण पुण्यात व शालेय शिक्षण नूतन मराठी शाळा पुणे येथे झाले. १९६२ साली नूतन मराठी विद्यालय, पुणे येथून एसएससी परीक्षा देऊन बाहेर पडलेले श्रीकांत धोंगडे लहानपणा पासून चित्रकलेची आवड असल्याने कुठलेही चित्रकलेचे शिक्षण न घेता ते कमर्शिअल आर्टिस्ट म्हणून पुण्यात काम करू लागले.

 

श्रीकांत धोंगडे यांनी आपल्या पब्लिसिटीच्या कामांची सुरुवात केली ती १९६० आणि ७० च्या दशकात. धोंगडे यांच्या कारकीर्दीची सुरुवात पुण्यातील दुकानांची छोटी मोठी जाहिरातीची कामे करण्यातून आणि चित्रशाळेत ज्युनिअर आर्टिस्टचे काम करून झाली. सुरुवातीला काही काळ नोकरी करून त्यांनी १९६४ साली स्वतःचा प्रभा अ‍ॅडव्हर्टायझर्सहा स्वत:चा स्टुडिओ चालू केला. धोंगडे यांना चित्रपटसृष्टीत काम करायची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांना कामंही मिळत गेली.

 

१९६५ साली अनंत माने यांच्या केला इशारा जाता जाताचित्रपटाच्या सिल्व्हर ज्युबिलीची जाहिरात करण्याचं काम त्यांना मिळालं. हे त्यांचे पहिलेच चित्रपट सृष्टीतील काम होते. पुणे सोडून मुंबईत आपला स्टुडिओ चालू करण्याचा धोंगडे यांचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला.

 

ताराचंद बडजात्या यांच्या राजश्री फिल्म्ससाठी १९७४ पासून चार दशके ते काम करीत असून नव्याने प्रसिद्ध होत असलेल्या प्रेम रतन धन पायोचित्रपटासाठी काम केले आहे. सुभाष घई यांच्या अनेक चित्रपटांची कामं  श्रीकांत धोंगडे यांनी केली आहेत.

 

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर यांनी निर्मिलेल्या 'अपराध ' या १९६९ सालच्या चित्रपटाचे पोस्टर डिझाईन धोंगडे यांनी केले होते. सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटाचे काम आजही श्रीकांत धोंगडे बघत असतात. तसेच अनेक मराठी चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर्स त्यांनी केली.

 

श्रीकांत धोंगडे यांनी ४८ वर्षांपूर्वी म्हणजे १९७२ पिंजराचित्रपटाची जाहिरात केली होती आणि २०१६ मध्ये नवा साज घेऊन सादर झालेल्या त्याच पिंजराची जाहिरातही धोंगडे यांनीच केली होती. गेली ५६ हून अधिक वर्ष ते पब्लिसिटी डिझायनरम्हणून चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत.

 

धोंगडे यांनी आतापर्यंत ३०० मराठी चित्रपटांसह विविध प्रादेशिक भाषांतील एक हजारांहून अधिक चित्रपटांच्या जाहिरात आणि प्रसिद्धीचे काम केले आहे. चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, चित्रपती व्ही. शांताराम, अनंत माने, राजा परांजपे, राजा बारगीर यांच्यापासून ते ग्रेट शोमन सुभाष घई आणि सचिन अशा विविध चित्रकर्मीबरोबर त्यांनी काम केले आहे.

 

श्रीकांत  धोंगडे यांची 'साठवणीतील आठवणी' 'राहून गेलेल्या आठवणी' अशी दोन पुस्तक प्रसिद्ध झाली आहेत. ही पुस्तके ब्रेल लिपीत पण आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

🌄  दिनविशेष

🌞  मंगळवार - ३ ऑगस्ट  २०२१

🎇  आषाढ कृ. १० रोहिणी

🚩  श्री मंगाईदेवी यात्रा, वडगाव - बेळगाव

🇮🇳  डाॅ आंबेडकर कायदा मंत्री झाले ( १९४७ )

--------------------------------------------------------------

         ⚘ "पानं" वाचता वाचता

         ---------------------------------------

 काही पानं भरावयाची असतात (वही)

काही पानं वाढायची असतात (जेवण)

काही पानं रंगवायची असतात (खायची पानं)

काही पानं जाळायची असतात (पालापाचोळा)

काही पानं जपायची असतात ( पिंपळ)

काही पानं कुटायची असतात ( पुदिना)

काही पानं लुटायची असतात (आपटा)

काही पानं खुडायची असतात (चहाची पानं)

काही पानं जोडायची असतात (पुरवणी)

काही पानं लपवायची असतात (प्रगती पुस्तक)

काही पानं तोरणात सजवायची असतात (आंब्याची )

काही पानं केसात घालायची असतात (केवड्याची )

काही पानं दुमडायची असतात तर काही नवीन उघडायची असतात.

( पानं सुख दुःखाच्या क्षणांची )

-------‐------------------------------------------------------

आपला दिवस आनंदात जावोमन प्रसन्न राहो.

No comments:

Post a Comment