२ ऑगस्ट - दिनविशेष

 

! 2 ऑगस्ट  दिनविशेष ॥

 

             🔥 सोमवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 2001 - ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद यांची भारतीय क्रिडा क्षेञातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

👉 1996 - अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धत अमेरिकेचे मायकेल जाॅन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत,एकाच ऑलिम्पिक स्पर्धत सुवर्णपदके पटकावून ऑलिम्पिक च्या इतिहासातील पहिला खेळाडू घेण्याचा मान पटकवला

 

         🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

जन्म

 

👉 1910 - पुरुषोत्तम शिवराम रेगे कांदबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक

👉 1941 - ज्युल्स हाॅफमन- नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ

 

 🎇 मृत्यू

 

👉 1922 - अलेक्झांडर ग्रॅहम बेल स्खाॅटिश- अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक, टेलिफोन चा संशोधक

👉 1978 - मोनॅको ग्रांपी चे संस्थापक ॲन्टोनी नोगेस यांचे निधन

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२ ऑगस्ट - दिनविशेष

 

२ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.

 

१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.

 

१८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.

 

१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.

 

१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.

 

१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.

 

१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यामुळे गुल्फ युद्ध सुरु झाले.

 

१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.

 

२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.

 

२ ऑगस्ट रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१८२०: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)

 

१८३४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४)

 

१८३५: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९०१)

 

१८६१: भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९४४)

 

१८७६: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९६३)

 

१८७७: भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९६५)

 

१८९२: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७८)

 

१९१०: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८)

 

१९१८: आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म.

 

१९२९: भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुन २०१३)

 

१९३२: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर २०१६)

 

१९४१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन यांचा जन्म.

 

१९४५: भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म.

 

१९५८: भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब यांचा जन्म.

 

 

२ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१५८९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १५५१)

 

१७८१: पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील यांचे निधन.

 

१९२२: टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४७)

 

१९३४: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८४७)

 

१९७८: मोनॅको ग्रांप्री चे स्थापक अॅन्टोनी नोगेस यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८९०)

************

२ ऑगस्ट - महाड सावित्री पूल दुर्घटना

************

 

दुर्घटना - २ ऑगस्ट २०१६

 

२ ऑगस्ट २०१६ रोजी अमावस्येच्या रात्रौ दोन वाजताच्या सुमारास रायगड जिल्ह्यातील महाड बिरवाडी येथे सावित्री नदीला आलेल्या पावसाच्या पुरामुळे त्या नदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल कोसळून वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहन ही वाहून गेली व त्यातील व्यक्तींचा बुडून मृत्यू झाला. सदर पुलाच्या जवळ असणाऱ्या गॅरेज मधील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली. सदर दुर्घटनेत मृत पावलेल्या निष्पाप व्यक्तींच्या मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली !

 

हा पूल कोसळून ४२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. रात्रीच्या अंधारात मुसळधार पावसात सावित्रीच्या उदरात घडलेल्या या काळरूपी घाल्याची तब्बल पाऊण तासाहून अधिक काळ कोणालाही कल्पना न आल्याने अनेक छोट्या वाहनांनाही नकळत जलसमाधी मिळाली.

 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर ते महाड दरम्यानचा राजेवाडी आणि नांगलवाडी (महाड) एमआयडीसी फाटा येथील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याची माहिती रात्री एका गॅरेज मधील मिश्रा नावाच्या कामगाराने मालकाला कळविल्यानंतर मालक आणि अन्य सहकार्यांनी त्याबाबत महाड एम.आय.डी.सी. पोलिसांना माहिती दिली.

 

सावित्री नदीवर पोलादपूर येथील रानबाजिरे येथे एम.आय.डी.सी.चे धरण असून महाबळेश्वतर आणि वाकण येथे त्या रात्री ४८ तासांमध्ये एक हजारहून अधिक मि.मी. पाऊस पडला. रानबाजिरे धरणातून प्रचंड विसर्ग झालेले पाणी सावित्री नदीपात्रातून सवादमार्गे महाड एमआयडीसी हद्दीतील धरणाकडे जाते. या ठिकाणी सावित्री नदीच्या प्रवाहाला पहिल्यांदा प्रतिरोध होतो.

 

या धरणापासून काही अंतरावरच नवीन सावित्री टोल पूल बांधण्यात आला असून या पुलाच्या पिलर्समुळे सावित्री नदीच्या प्रवाहाला प्रतिरोध होऊन नवीन पुलापासून केवळ २० फूट अंतरावर असलेल्या या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावर मोठ्या ताकदीने सावित्री नदीच्या पुराचे पाणी आदळले.

 

त्यामुळे जुन्या पुलाचे दगडी पिलर्स कमकुवत होऊन आणि दगडांमध्ये झाडे उगविल्यामुळे निर्माण झालेल्या खाचा अधिक रुंदावून हा ब्रिटिशकालीन सावित्री पूल कोसळला.

 

महाड दुर्घटनेनंतर सावित्री नदीवर बांधण्यात आलेला नवीन पूल म्हणजे कमाल आहे. सरकारने केवळ १६५ दिवसांत नव्या पूलाचे काम पूर्ण केले आहे. या नव्या पुलाचे ५ जून २०१७ रोजी उद्घाटन झाले.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

************

२ ऑगस्ट - शाहू महाराजांनी स्त्रीयांवरील अन्याय प्रतिबंध कायदा केला

************

 

२ ऑगस्ट १९१९ रोजी छत्रपती शाहू महाराजांनी स्त्रीयांवर होणार्‍या अन्याय, अत्याचार व क्रूरपणाच्या वर्तनास प्रतिबंध कायदा केला.

 

छत्रपती शाहू महाराजांनी स्त्री जातीच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी खास कायदे केले. बालविवाहास बंदी करून १८ वर्ष पूर्ण झालेल्या मुलीस आपल्या निवडीच्या वराशी विवाह करण्याचे स्वातंत्र्य दिले.

 

विवाहित स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क दिला. विधवांना पुनर्विवाह करण्याची सुविधा निर्माण केली. विवाहितांचा क्रूर छळ करणार्‍या कुटुंबातील नातलगांना शिक्षा करणारा कायदा जारी केला. समाजाला कलंक असणार्‍या देवदासी प्रथेचे निर्मुलन करणारा कायदा केला.

 

आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. त्याची अंमलबजावणी घरापासून केली. आपल्या जनक घराण्यातील बहिणीचा (चंद्रप्रभा यांचा) विवाह तुकोजीराव होळकारांशी घडवून आणला. कोल्हापूर नि इंदूर यांच्या दरम्यान असे आणखी २५ आंतरजातीय विवाह घडवून आणले.

 

अशा प्रकारे शाहू छत्रपतींची कारकीर्द म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रबोधन, सुधारणा व प्रगती यांचे एक क्रांतीपर्व ठरले. प्रशासन, राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कृषी, उद्योग- व्यापार, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा अशा समाजाच्या सर्वच क्षेत्रात शाहू महाराजांनी मोठी कामगिरी केली. त्याकडे पहिले कि वाटते, शिवछत्रपतींनंतर महाराष्ट्राला लाभलेला हा एकमेव "जाणता राजा" होता.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

************

२ ऑगस्ट - भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या जन्मदिन

************

 

जन्म - २ ऑगस्ट १८७६ (आंध्रप्रदेश)

स्मृती - ४ जुलै १९६९

 

पिंगाली वेंकय्या यांचा जन्म आंध्रप्रदेशातील मछलीपट्टनम जवळील भतालपेंनमारू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग आणि आईचे नाव काळवती होते. ते भूतान ब्राह्मणांच्या एकूण नियोगाशी संबंधित होते.

 

काकीनाडात आयोजित भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनात, वेंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आणि गांधीजींना ही कल्पना फार आवडली. गांधीजींनी त्यांना राष्ट्रध्वजाचे आरेखन करण्यास सांगितले.

 

पिंगली वेंकय्या यांनी तीस वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रीय झेंडे शोधले. १९२१ मध्ये विजयवाडा येथे झालेल्या इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या सत्रात वेंकय्या यांनी महात्मा गांधी यांची भेट घेऊन त्यांना केलेल्या लाल आणि हिरव्या रंगाचे ध्वज दाखविले. त्यानंतरच कॉंग्रेसच्या सर्व संमेलनांमध्ये दोन-रंगांचा ध्वज वापरला जाई, परंतु त्यावेळी हा ध्वज कॉंग्रेसने अधिकृतपणे मंजूर केला नाही.

 

दरम्यान, जालंधरच्या हंसराजने ध्वजांकित एक वर्तुळ साइन करण्यास सुचविले. हे चक्र प्रगती आणि सामान्य माणसाचे प्रतीक मानले गेले. नंतर, गांधीजींच्या सूचनेनुसार, पिंगली वेंकय्या यांनी राष्ट्रीय ध्वजाकरिता शांतीचा पांढऱ्या रंगाचा समावेश केला.

 

१९३१ मध्ये कराचीतील अखिल भारतीय परिषदेत भगव्या, पांढऱ्या व हिरव्या रंगाचा बनवलेला हा ध्वज काँग्रेसने स्वीकारला. नंतर, राष्ट्रीय ध्वजमध्ये, अशोक चक्राने या तिरंग्यामध्ये चरख्याचे स्थान घेतले.

 

भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला.

 

भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा आणि निळा. त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे. २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला.

 

मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत.

 

निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.

 

भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण २:३ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया/नेट

 

************

************

२ ऑगस्ट - स्टॅच्यु ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडरिक बर्थोल्ड जन्मदिन

************

 

जन्म - २ ऑगस्ट १८३४

 

स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ही अमेरिकेची ओळख आहे. उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत घेऊन असलेली ही स्वातंत्र्यदेवता अमेरिकेत युरोपमार्गे समुद्र मार्गाने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करते.

 

नायगरा फॉल्स, हॉलिवूड, माऊंट रशमोर ह्यांच्या बरोबरच स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आजही अमेरिकेतील सर्वात महत्वाच्या खुणांपैकी एक मानला जातो.

 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील लिबर्टी आयलंडवर उभारण्यात आलेला हा पुतळा फ्रान्सने अमेरिकेला भेट दिला होता.

 

अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्याच्या शतकपूर्तीनिमित्ताने फ्रान्सने अमेरिकेला स्वातंत्र्यदेवतेचा १५१ फूट उंच पुतळा भेट म्हणून दिला व २८ ऑक्टोबर १८८६ रोजी ह्या पुतळ्याचे उद्घाटन झाले.

 

ह्या स्वातंत्र्यदेवतेच्या उजव्या हातात स्वातंत्र्याची ज्योत व डाव्या हातात एक पुस्तक आहे. ह्या पुस्तकावर ४ जुलै १७७६ ही अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या तारीख रोमन भाषेत लिहिलेली आहे. त्या पुस्तकावर “July IV MDCCLXXVI” असे कोरलेले आहे.

 

अमेरिकन क्रांतीच्या वेळेला फ्रांस आणि अमेरिकेच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून फ्रान्सने तांब्याची ही मूर्ती भेट दिली.

 

फक्त पुतळ्याचीच उंची १५१ फूट असून आधारशीला आणि पायथ्यापासून मोजल्यास स्वातंत्र्यदेवतेच्या मुकुटापर्यंत वास्तूची उंची ३०५ फूट इतकी भरते. ह्या मूर्तीच्या मुकुटापर्यंत जायचे असल्यास ३५४ पायऱ्या चढून वर जावे लागते.

 

पुतळ्याच्या मुकुटात ७ खिडक्या आहेत ज्या जगातील सात खंडांचे प्रतीक आहे. स्वातंत्र्यदेवतेच्या उजव्या हातातील ज्योत स्वातंत्र्याचा प्रकाश दर्शवते तर डाव्या हातातील पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे.

 

फ्रेडरिक बार्थोल्दी ह्या फ्रेंच शिल्पकाराने हा पुतळा घडवला आहे. पण ह्या पुतळ्याची कल्पना बार्थोल्दीची नसून एडवर्ड लॅब्युलाय ह्या फ्रेंच व्यक्तीची होती. अमेरिकन गृहयुद्धाच्या वेळेला त्याने ही कल्पना मांडून प्रत्यक्षात उतरवली.

 

ह्यासाठी लॅब्युलायाने निधी उभारणे सुरु केले व बार्थोल्दीची ह्या प्राचीन देवतेचा पुतळा तयार करण्यासाठी नियुक्ती केली.

 

हा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकाराने स्वतःच्या आईला ह्या पुतळ्यासाठी मॉडेल म्हणून उभे केले आणि तिच्यासारखा पुतळा तयार केला. त्याने ह्या पुतळ्याचे “Liberty Enlightening the World” असे नामकरण केले होते. नंतर लोक तिला "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" म्हणू लागले.

 

दर वर्षी जगातून लाखो लोक हा पुतळा बघण्यासाठी जातात. किंबहुना अमेरिकेला गेल्यानन्तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघणे अनिवार्यच आहे.

 

ही स्वातंत्र्यदेवता अमेरिकेच्या अक्षय आणि अखंड स्वातंत्र्याचे प्रतीक आहे आणि ते पुस्तक अमेरिकेतील कायदेशीर लोकशाहीचे प्रतीक आहे.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२ ऑगस्ट - निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांचा वाढदिवस

************

 

जन्म - २ ऑगस्ट १९७४ (मुंबई)

 

निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर यांचा आज वाढदिवस.

 

बॉलीवूडच्या काही आघाडीच्या निर्मात्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ रॉय कपूर. सिद्धार्थ रॉय कपूर यांनी बॉलीवुड मध्ये काए पो चे, चेन्नई एक्सप्रेस, हैदर, सत्याग्रह, बर्फी, हिरोइन, ग्रांडमास्टर, दंगल, नो वन किल्ड जेसिका; असे चित्रपट बनवले आहेत.

 

विद्या बालनचे पती असलेले सिद्धार्थ रॉय कपूर यांची आई शलोमी रॉय कपूर या पूर्व मिस इंडिया राहिल्या होत्या. त्यांचे दोन्ही भाऊ कुणाल रॉय कपूर व आदित्य रॉय कपूर बॉलीवुड अभिनेते आहेत.

 

सिद्धार्थ रॉय कपूर यांनी २०१३ मध्ये विद्या बालनशी लग्न केले. विद्या बालनचे पती असलेले सिद्धार्थ आणि विद्याचे नाते पाहता येत्या काळात हे दोघंही उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करतील अशी आशा प्रेक्षकांना होती. पण, तसं काहीच झालं नाही. नो वन किल्ड जेसिकाहा चित्रपट वगळता विद्याने सिद्धार्थच्या निर्मिती संस्थेअंतर्गत पुन्हा कधीही काम केलं नाही. फिल्म अ‍ॅन्ड टेलीव्हीजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे प्रेसीडेंट म्हणून काम केले आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२ ऑगस्ट - शास्त्रज्ञ प्रफुल्लचंद्र रे जन्मदिन

************

 

जन्म - २ ऑगस्ट १८६१ (बांगलादेश)

स्मृती - १६ जून १९४४ (कलकत्ता)

 

प्रफुल्लचंद्र रे - डॉक्टर प्रफुल्लचंद्र राय हे बंगाली रसायनशास्त्रज्ञ, उद्योजक शिक्षक होते. 'बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स' या भारतातील पहिली औषधनिर्मिती कंपनी त्यांनी स्थापन केली.

 

प्रफुल्लचंद्र रायांनी १८८२ साली कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजातून नैसर्गिक विज्ञान हा प्रधान विषय घेऊन बी.ए. पदवी मिळवली. पुढे त्यांनी युनायटेड किंग्डम येथे प्रयाण करून एडिन्बरा विद्यापीठात प्रवेश घेतला. १८८६ साली त्यांनी बी.एस्सी पदवी, तर १८८७ साली डी.एस्सी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरे केले.

 

१८८९ साली ते भारतात परतले व कोलकात्यात प्रेसिडेन्सी कॉलेजात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी १९१६ सालापर्यंत शिकवले

************

२ ऑगस्ट - अविनाश धर्माधिकारी यांचा वाढदिवस

************

 

जन्म - २ ऑगस्ट १९५९ (कोल्हापूर)

 

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा आज वाढदिवस.

 

१९८६ मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्नाहगिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव, अशा महत्त्वाच्या पदांचा त्यांनी कार्यभार सांभाळला होता.

 

अविनाश धर्माधिकारी यांनी एक दशक प्रशासकीय सेवा देऊन १ मार्च १९९६ मध्ये रोजी राजीनामा दिला. मात्र, त्यांच्यात लपलेला उत्तम मार्गदर्शक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. देशाला मी अधिक प्रशासकीय अधिकारी तयार करवून देतो आणि ह्याच उद्देशाने अविनाश धर्माधिकारी यांनी चाणक्य मंडल परिवारह्या मार्गदर्शक प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली.

 

चाणक्य मंडल ही एक शासकीय स्पर्धापरीक्षांसाठी विद्यार्थ्यांची पुर्वतयारी करून घेणारी पुणे येथील खासगी संस्था आहे. चाणक्य मंडलची स्थापना १० ऑगस्ट १९९६ रोजी झाली. चाणक्य मंडल परिवारात देशभरातून विद्यार्थी येतात. या वास्तूतून बहुतांश विद्यार्थी खूप सारी ऊर्जा घेऊन बाहेर पडतात. ही संस्था त्यांनी पुण्यात पहिल्यांदा सुरू केली नि तेथेच ते विद्यार्थ्यांना UPSC MPSC परीक्षेबद्दल प्रशिक्षण देऊ लागले. चाणक्य मंडलने पुढे चालून ते उत्तम अधिकारी दिले आहेत.

 

संस्था सुरू असतांना अविनाश धर्माधिकारी चालू घडामोडी, ऐतिहासिक व्यक्तींवर, घटनांवर, मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांवर, अभ्यासपूर्ण सविस्तर व्याख्यान करत असतात.

 

धर्माधिकारी यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची देखल घेऊन पुण्यातील सार्वजनिक संस्थेने त्यांचा २०१५  मध्ये 'सार्वजनिक काका पुरस्कार' ने गौरव केला होता.

 

अविनाश धर्माधिकारी एक प्रसिद्ध व्यख्याते मानले जातात. अविनाश धर्माधिकारी यांची १५ ते २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चाणक्य मंडल परिवार चे स्वतःचे मासिक आहे, ज्यातून सर्व दूरवरचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

 

आत्म्याचे नाव अविनाशया नावाने अविनाश धर्माधिकारी यांनी आत्म चरित्र लिहिले आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

२ ऑगस्ट - टेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल स्मृतिदिन

************

 

जन्म - ३ मार्च १८४७ (स्कॉटलंड)

स्मृती - २ ऑगस्ट १९२२

 

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.

 

बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले.

 

मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या प्रयत्नात ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.

 

कार्य :

 

बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.

 

योगदान :

 

बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी "द अमेरिकन टेलिफोन ॲंड टेलिग्राफ" कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली.

 

२ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

आज २ ऑगस्ट

आज लेखक, कवी, नाटककार #चिन्मय_मोघे चा वाढदिवस.

जन्म.२ ऑगस्ट २००१

चिन्मय मोघे मूळचा नाशिकचा आहे. काही काळापूर्वी नाटकासाठी पुण्यात आला.

तो त्याचे सर्व लिखाण 'समर' या नावाने करतो. पुण्याच्या एस. पी. कॉलेज मध्ये बी.ए. चे शिक्षण त्याने घेतले आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने  'संगीत चंद्रप्रिया' हे संगीत नाटक लिहून, स्वतः दिग्दर्शित करून रंगभुमीवर आणले ...१२ नाट्यपदं या संगीत नाटकात आहेत. तसेच यातले कलाकारही रंगभूमीवरचे ज्येष्ठ व्यावसायिक  कलाकार आहेत. १६ जानेवारी २०१९ रोजी त्याचा पहिला प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात झाला ...त्यानंतर या नाटकाचे पुणे, नाशिक, मुंबई, रत्नागिरी इथे  प्रयोग झाले. मुंबईच्या नेहरू सेंटरने  २९ व्या संगीत नाट्य महोत्सवात या नाटकाचा आवर्जून समावेश केला होता. या नाटकाच्या लिखाणासाठी पुण्याच्या बालगंधर्व संस्थेचा २०१९ चा 'अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार' त्याला मिळाला. जर्मनीचा हुकुमशहा अॅ डॉल्फ हिटलरच्या राजकीय प्रवासावर भाष्य करणा-या किंवा त्याच्या क्रूरपणाचे दर्शन घडविणा-या आजवर अनेक कादंब-या देशविदेशात प्रसिद्ध झाल्या.  मात्र हिटरला केंद्रस्थानी ठेवून इतिहासात असे झाले असते तरया कल्पनेतून पहिली मराठी कल्पनाप्रधान कादंबरी साकार झाली आहे. विशेष म्हणजे, ही कादंबरी मूळ मराठीतील. मात्र मराठीमध्ये त्याचे अद्यापही प्रकाशन झालेले नाही. कादंबरीच्या मूळ संहितेवर इंग्रजीमध्ये '1970 : Return Of Adolf Hitler’ या शीर्षकांतर्गत हे  पुस्तक अनुवादित होऊन तब्बल २३ देशांमध्ये ते प्रकाशित होण्याचा मान चिन्मय मोघे या तरूण लेखकाला मिळाला आहे. वयाच्या १८ व्या वर्षी इंग्रजीत पुस्तक अनुवादित होणारा तो पहिला मराठी कादंबरीकार ठरला आहे. या इंग्रजी अनुवादित पुस्तकाची पहिली प्रत नेदरलँडमध्ये विकली गेली आणि मग इंग्लंड, फ्रान्स मध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २३ देशांमध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या कादंबरीवर चित्रपट निर्मित व्हावा अशी त्याची इच्छा आहे.

ॲमेझॉनवर सदर इंग्रजी कादंबरी उपलब्ध असून बावीस देशात कादंबरीला प्रतिसाद मिळाला आहे. मुळ मराठी कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे..

 चिन्मय मोघे ने मराठीत पाचवा वेद लिहिला आहे. 'समरवेद'. यात ९ मंडले आणि १०२८ ऋचा आहेत. अठराव्या वर्षी वेद लिहिणारा हा आजच्या युगातला एकमेव तरुण असावा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज बॉलीवुड अभिनेते #कमल_कपूर यांचा स्मृतिदिन.

जन्म. २२ फेब्रुवारी १९२० लाहोर येथे.

त्यांनी लाहोरमधील डीएवी कॉलेज मधुन शिक्षण पूर्ण केले. ते पृथ्वीराज कपूर चुलत भाऊ होत.कमल कपूर यांनी आपले करीयरची सुरुवात १९४०-५० च्या दशकात नायक म्हणूण केली.त्यांचा पहिला चित्रपट "दूर चलें" होता जो १९४६ मध्ये प्रदर्शित झाला. साठ च्या दशकात त्यांनी खलनायक म्हणून भूमिका कण्यास सुरुवात केली,त्यांचे लोकप्रिय चित्रपट व त्यातील रोल पुढील प्रमाणे पाकीजा (१९७२) मधील नवाब जफर अली खान, डॉन (१९७८) मधील नारंग व मर्द (१९८५) मध्ये जनरल डायर.कमल कपूर यांनी जवळपास ६००  हिन्दी, पंजाबी व गुजराती चित्रपटात अभिनय केला होता. कमल कपूर यांचे निधन २ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज ज्येष्ठ रंगकर्मी #वसंत_सोमण यांचा स्मृतिदिन.

जन्म.

वसंत सोमण हे मराठी रंगभूमीवरचे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. ते मुंबईत रिझव्ह बँकेत काम करीत. आपल्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत वसंत सोमण यांनी प्रायोगिक नाटक, बालनाट्य आणि व्यावसायिक रंगभूमीवर काही मोजक्याच, पण संस्मरणीय भूमिका केल्या. काही नाटकांचे दिग्दर्शनही केले. वसंत सोमण यांचे २ ऑगस्ट १९९६ रोजी निधन झाले. त्या नंतर रत्नािकर मतकरी, प्रतिभा मतकरी, दिलीप प्रभावळकर प्रदीप भिडे, प्रभाकर सावंत, कमलाकर नाडकर्णी, विनोद भट, अरविंद औंधे, युधिष्ठिर वैद्य, वगैरे मित्रमंडळींनी एकत्र येऊन वसंत सोमण मित्रमंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे वसंत सोमण सारखीच जी माणसे झगमगाटापासून दूर राहून महत्त्वाचे काम करतात अशा प्रयोगशील समाजाभिमुख रंगकर्मींना 'वसंत सोमण पुरस्कार' देऊन गौरवण्याची प्रथा सुरू केली. हा पुरस्कार दरवर्षी २ ऑगस्ट किंवा त्याच्या आसपासच्या सोईस्कर दिवशी दिला जाई. २०१६ साल हे या पुरस्कारांचे शेवटचे वर्ष होते.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज मराठी लेखक, कवी व नाटककार #पुशिरेगे यांचा जन्मदिन.

जन्म. २ ऑगस्ट  १९१० रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे.

पु.शि.रेगे यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत झाले होते. लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी बी.एस्सी. ची पदवी संपादन केली होती. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्याि उत्कट अशा मनोहर भावनांनी नाटककार  पु.शि.रेगे यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्न. करीत होते. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती. फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळहे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवायांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि मातृकाया कादंबर्याा दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. सावित्री ही कादंबरी १९६२ मध्ये लिहिलेली. म्हणजे तिला आता ५५ वर्षे झाली. पण अजूनही तिचं गारुड जाणकार मराठी वाचकांच्या मनावरून उतरलेलं नाही.  छांदसीहा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह आहे. या साहित्याखेरीज त्यांनी काही शैक्षणिक पुस्तकेही लिहिली आहेत. छंद या द्वैमासिकाचे संपादन ही रेगे यांची आणखी एक क्षणीय कामगिरी होय. हे भाषा, कला व साहित्य या विषयांना वाहिलेले हे एक वाङ्मयीन नियतकालिक होते. १९५४ मध्ये काही समानधर्मीयांच्या सहकार्याने त्यांनी ते सुरू केले. १९६० साली ते त्यांनी बंद केले. रेगे यांनी छंदमध्ये विपुल लेखन तर केलेच; पण त्याची संपादकीय व्यावहारिक व आर्थिक बाजूही आस्थेने संभाळली. पु.शि.रेगे यांनी १९६५ मध्ये रशियाचा येथे मॉस्को लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात एक भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे ते उद्घघाटक होते. वर्धा येथे १९६७ साली आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. * पु.शि.रेगे* यांचे १७ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे * पु.शि.रेगे* यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज निर्माता #सिद्धार्थरॉयकपूर यांचा वाढदिवस.

जन्म.२ ऑगस्ट १९७४

बॉलीवूडच्या काही आघाडीच्या निर्मात्यांपैकी एक म्हणजे सिद्धार्थ रॉय कपूर. सिद्धार्थ रॉय कपूर यांनी बॉलीवुड मध्ये 'काए पो चे', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हैदर', 'सत्याग्रह', 'बर्फी', 'हिरोइन', 'ग्रांडमास्टर', 'दंगल',‘नो वन किल्ड जेसिकाअसे चित्रपट बनवले आहेत. विद्या बालनचे पती असलेले सिद्धार्थ रॉय कपूर यांची आई शलोमी रॉय कपूर या पूर्व मिस इंडिया राहिल्या होत्या. त्यांचे दोन्ही भाऊ  कुणाल रॉय कपूर व आदित्य रॉय कपूर बॉलीवुड अभिनेते आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर यांनी २०१३ मध्ये विद्या बालनशी लग्न केले. विद्या बालनचे पती असलेले सिद्धार्थ आणि विद्याचे नाते पाहता येत्या काळात हे दोघंही उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करतील अशी आशा प्रेक्षकांना होती. पण, तसं काहीच झालं नाही. नो वन किल्ड जेसिकाहा चित्रपट वगळता विद्याने सिद्धार्थच्या निर्मिती संस्थेअंतर्गत पुन्हा कधीही काम केलं नाही. फिल्म अॅन्ड टेलीव्हीजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाचे प्रेसीडेंट म्हणून काम केले आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज अभिनेत्री #नयन_पवार  यांचा वाढदिवस.

जन्म.२ ऑगस्ट

अरविंदो मीरा नाट्य संस्थेच्या सर्वेसर्वा, नाट्य निर्मात्या, अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना नयन पवार यांनी रंगभूमीवर येण्यासाठी खूप मेहनत घेतली. मराठी रंगभूमीशी नाळ जोडलेल्या नयन पवार यांचा शालेय जीवनापासूनच कलेशी संपर्क आला. त्यांनी भरतनाट्यम तसेच नाट्यशास्त्रात एम.ए. केले आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात बालनाटयाने करीत २००५ साली साक्षीला राजा हवा’ (संदीप घेवडे) या व्यावसायिक नाटकात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी सलग १३ व्यवसायिक नाटकात आपला अभिनय सादर केला. एक चतुर नार’ (राज कुबेर), ‘पहिली भेट’ (वैभव परब), ‘ज्योतिषाचे तीन-तेरा’ (राजेश मयेकर), ‘फोडली सुपारी लग्नाची’ (सुशील आंबेकर), ‘या सुखासाठी (शशिकांत भोबेकर), ‘जय राधे माँ (जनार्दन लवंगारे), ‘झाकला तर उजडला’ (आशिष पवार), ‘दोन बायकांचा नवरा’ (जनार्दन लवंगारे), ‘गेला माधव कुणीकडे’ (शशिकांत भोबेकर), ‘धक्का स्टार्ट’ (विलास दांगट), ‘काळे निळे’ (अजित भागवत) अशा आशयघन विनोदी नाटकांमधून नामांकित दिग्दर्शकांसोबत काम करण्याची त्यांना सुवर्णसंधी मिळाली.

२०१७ साली त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. थरचित्रपटात त्यांनी ६० वर्षाच्या आजीची भूमिका केली. अजिंक्यचित्रपटात त्यांनी उदय टिकेकरांच्या पत्नीची भूमिका केली. ऑनलाईन मिस्टेकया चित्रपटात त्यांनी एका डॅशिंग आईचा अभिनय केला आणि पुरुषचित्रपटात त्यांनी गावंढळ आईची भूमिका केली. जगु जाड्याह्या चित्रपटात अभिनेत्री गौरी नलावडेच्या मावशीचा रोल साकारला असून भारत गणेशपुरे आणि नंदेश उमप ह्यांच्या भूमिका असलेल्या संबळया चित्रपटात पाटलीणबाईची भूमिका नयन पवार ह्यांनी साकारली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना अभिनयाची आवड असते पण कधी कधी आर्थिक गणिते न जुळवता आल्याने कित्येकांना अभिनयाचे शिक्षण घेता येत नाही हे ज्यावेळेस नयन पवार ह्यांच्या निदर्शनात आले त्यावेळी त्यांनी १९९९ पासून शालेय विद्यार्थ्यांकरिता मोफत अभिनयात शिबिरांचे आयोजन सुरु केले आणि आजतागायत त्यात खंड पडलेला नाही. त्यांच्या अरविंदो मिराह्या संस्थेमार्फत त्यांनी बालनाट्यांची निर्मिती सुरु केली. त्यात प्रामुख्याने हॅपी बर्थ डे टू यु’, ‘वेताळ चंद्रावर भुते मंगळावर’, “अभ्यास गेला उडत’, ‘डोरेमॉन तू सांगशील काही अत्यंत गाजलेली बालनाट्ये असून ह्यात नयन पवार ह्यांनी आपल्या खुबीने दिग्दर्शन सुद्धा केले आहे. त्यांच्या ह्या सर्व बालनाट्यांचे प्रयोग महाराष्ट्रातील प्रमुख नाट्यगृहात झाले असून त्यात त्यांना मोठा प्रतिसाद लाभला आहे.

 बालनाट्यात दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय करीत असतानाच त्यांना व्यावसायिक रंगभूमी खुणावू लागली. पहिली भेट’, ‘ज्योतिषाचे तीन तेरा’, ‘पांढरपेशी वेश्या’, ‘आई ग कुछ कुछ होता है रे’, ‘आरची परशा झिंगाट’, ‘मार्ग युद्धाचा की बुद्धाचाअशा दर्जेदार आणि आशयघन नाटकांची त्यांनी निर्मिती केली. सोबत अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक त्यांनी टीव्हीवरच्या प्रेक्षकांनाही दाखवली. २०२० मध्ये त्यांनी अभिनय केलेले २ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होते. अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती करीत असतानाच सामाजिक भान जपणाऱ्या नयन पवार समाजसेवेच्या कार्यातही स्वतःला मग्न ठेवत असतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची मुलगी लावण्या पवार अभिनय आणि नृत्यात स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. स्वतः लावण्या सुद्धा गंधर्व विद्यालयातून भरतनाट्यम विशारद आणि संगीत विशारद आहे. असे असूनही शिक्षणातही लावण्या मागे नाही सायकोलॉजी, आणि पोलिटिकल सायन्स ह्या दोन विषयांत तिने मास्टर्स डिग्री प्राप्त केली असून सध्या ती आपल्या आईचे अर्थात अभिनेत्री नयन पवार ह्यांचे अभिनय, गायन आणि नृत्य ह्याचे जे क्लासेस होतात त्याची पूर्ण जबाबदारी सांभाळते.

अभिनेत्री नयन पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे तरुण नाटककार, लेखक आणि दिग्दर्शक #चेतन_दातार यांचा स्मृतिदिन.

जन्म.

चेतन दातार यांची नाटककार म्हणून कामगिरी बरोबरच दिग्दर्शक म्हणून तर त्यांनी अफाट कामगिरी केलेली आहे.

चेतन दातार हे 'अविष्कार' या संस्थेशी अनेक वर्षे जुळले होते. १९९० ते २००७ ह्या १७ वर्षात जवळपास ३० नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. त्यांनी देवदासी प्रथा, समलैंगिकता यांसारख्या संवेदनशील विषयांवर नाटके लिहिली. तसेच चेतन दातार यांनी अनेक जर्मन-इंग्रजी नाटकांची मराठी भाषांतरे केली होती. ज्येष्ठ रंगकर्मी सत्यदेव दुबे यांचे चेतन दातार हे शिष्य होते. त्यांरचे अचानक, सावल्या, गिरीबाला, माता हिडिंबा, राधा वजा रानडे, प्रतिबिंब ही गाजलेली नाटके होत. रविंद्रनाथ टागोरांच्या कथेवर आधारित 'हरवलेली प्रतिबिंब' आणि 'गिरीबाला' या नाटकांमधून त्यांनी पद्यमय नाटकांची ओळख रसिकांना करून दिली.  चेतन दातार यांना तन्वीर पुरस्कार मिळाला होता. चेतन दातार यांचे २ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज पुण्यातील बालगंधर्व संगीत रसिक मंडळाच्या उपाध्यक्ष #अनुराधा_राजहंस यांचा वाढदिवस.

जन्म. २ ऑगस्ट १९५८

अनुराधा राजहंस या मा.बालगंधर्व यांच्या नातसून असलेल्या अनुराधा राजहंस यांनी अनेक मालीका व संगीत नाटकांमधून अभिनय केला आहे. अनुराधा राजहंस  या बालगंधर्व संगीत रसिक मंडळ येथे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत, असून बालगंधर्व संगीत रसिक मंडळीच्या माध्यमातून त्या संगीत नाटक जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.तसेच त्या बालगंधर्व पुरस्कार निवड समितीच्या सम्मानीय सदस्या असून, त्यांना पुणे महानगरपालीकेसह अनेक पुरस्कारांनी सन्मानीत केले गेले आहे. अनुराधा राजहंस यांना बालगंधर्व यांच्या कलेचा वारसा प्राप्त त्यांना झाला असून त्यांनी बालगंधर्वांचा ठेवा जतन करुन, त्यांची आठवण नवीन पिढीला करुन देण्यासाठी विविध नाटयसंमेलनात प्रदर्शन भरवली आहेत.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज बॉलीवूड अभीनेत्री #चेतना_पांडेय चा वाढदिवस.

जन्म. २ ऑगस्ट १९८९  देहराडून येथे.

चेतनाने मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली, तिने मॉडेलिंगच्या दुनियेत खूप नाव कमावले. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'आय डोंट लव्ह यू' या चित्रपटातून केली. शाहरुख खान आणि काजोलचा 'दिलवाले' या चित्रपटात देखील चेतना झळकली होती.तसेच ती 'दंगल' या चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारताना दिसली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज जुन्या काळातील अभिनेते #करण_दिवाण यांचा स्मृतीदिन.

जन्म. ६ नोव्हेंबर १९१७ गुजरानवाला, पंजाब येथे.

करण दिवाण यांचे पूर्ण नाव करण दिवाण चोप्रा. १९४१ ते १९७९ पर्यंत करण दिवाण यांनी सत्तर हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी लाहोरमध्ये शिक्षण घेतले, जिथे त्यांना पत्रकारितेत रस निर्माण झाला. महाविद्यालयात असताना  त्यांनी पत्रकार म्हणून सुरुवात केली, त्या वेळी ते उर्दू भाषेतील चित्रपट-आधारित मासिकाचे संपादन करत असत. त्यांचे भाऊ जयमणी दिवाण हे चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक होते. त्यांच्या भावा मुळे ते चित्रपट सृष्टीत आले. १९३९ मध्ये कलकत्ता मध्ये पंजाबी चित्रपटातून मध्ये भूमिका करून करण दीवान यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. १९४१ सालचा पंजाबी चित्रपट मेरा माही हा त्यांचा दुसरा चित्रपट होता, त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजे १९४४ साली आलेला रतन. हा चित्रपट त्यांच्या भावाने निर्मित केला होता. त्यांनी या चित्रपटात गाणीही गायली होती. त्यांनी गायलेली जब तुम, हाय चले परदेस ही गाणी लोकप्रिय झाली होते. या चित्रपटाला संगीत नौशाद यांचे होते. त्यांनी १९४७ साली आलेल्या पिया घर आजा १९४८ च्या मिट्टी के खिलौने आणि १९४९ साली आलेल्या लाहोर  सारख्या चित्रपटांमध्ये गाणी गायली होती. भाईजान, फिर भी अपना है, दुनिया,  झीनत, दहेज, बहार आणि तीन बत्ती चार रास्ता हे त्यांचे अभिनय केलेले इतर चित्रपट. त्यांचे सुमारे वीस चित्रपट ज्युबिली (पंचवीस आठवडे किंवा त्याहून अधिक) हिट गेले होते त्यामुळे त्यांना "ज्युबिली स्टार" म्हणून ओळखले जात असे. रतन चित्रपटाच्या रिलीजनंतर करण दीवान यांनी त्यांची या चित्रपटातील सह अभिनेत्री मंजू यांच्याशी लग्न केले, ज्यात त्यांची मुख्य भूमिका होती. अभिनेत्री मंजू  यांनी 'आदमी' आणि 'मूळ' मराठीतील  माणूस या चित्रपटात ही काम केले होते, त्यांनी चित्रपटांमध्ये सहा वर्षे काम केले होते, आणि करण दिवाण यांच्याशी लग्न झाले आणि त्यांनी काम करणे बंद केले. १९६६ नंतर ते सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसू लागले. माया या चित्रपटाच्या युनिटसाठी कास्टिंग एजंट म्हणून त्यांनी काम केले. ७० च्या दशकात त्यांनी अपना घर, शहीद, नादान, जीने की राह  सारख्या चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याचे काम केले. त्यांचा शेवटचा चित्रपट १९६९ साली आलेला सोहनलाल कंवर यांचा आत्माराम ठरला. करण दिवाण आणि मंजू यांना पाच मुली आणि दोन मुले आहेत.

करण दिवाण यांचे निधन २ ऑगस्ट १९७९ रोजी झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=FPa55utuh_Y

https://www.youtube.com/watch?v=WbIOt1kWv8E

https://www.youtube.com/watch?v=E_NpAV-ko_4

आज २ ऑगस्ट

आज सुप्रसिद्ध पखवाज वादक #गोविंद_भिलारे यांचा स्मृतिदिन.

जन्म. ८ जून १९७४

गोविंद भिलारे हे आघाडीचे पुण्यातील सुप्रसिध्द तरुण पखवाज वादक होते. गोविंद भिलारे यांनी सुरुवातीचे शिक्षण पं. रामदास पळसुले, नंतर तुकारामजी भूमकर, पेंडसे घराण्याचे सुप्रसिद्ध गुरू पंडित वसंतराव घोरपडकर यांच्याकडे झाले असून, अजूनही तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेमध्ये ते शिक्षण घेतले होते.

भिलारे यांनी भारतभरात आजवर वेगवेगळ्या सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये पखवाज सोलो वादन केले होते, तसेच त्यांनी पंडित जसराज, राहुल शर्मा, उल्हास पं. कशाळकर अशा दिग्गजांना साथ दिली होती.गोविंद भिलारे यांचे २ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २ ऑगस्ट

आज हवा में उड़ता जाए, मोरा लाल दुपट्टा मलमल का... हे गाणे लिहणारे गीतकार डॉ. #रमेश_शास्त्री यांचा जन्मदिन.

जन्म.२ ऑगस्ट १९३५ भावनगर गुजराथ येथे.

डॉ. रमेश शास्त्री हे वयाच्या १० व्या वर्षी घर सोडून बनारसला आले. तेथे त्यांनी संस्कृतचा अभ्यास करून डिग्री मिळवली. काही काळ त्यांनी संस्कृत शिकवण्याचे काम केले. रमेश शास्त्री यांनी Philosophical Principles of Charak Sanhitaa विषय घेऊन डॉक्टरेट प्राप्त केली होती. सुरवातीच्या काळात ते शाळेत शिकवत असत. पुढे त्यांनी गवर्नमेंट आयुर्वेद कालेज, भावनगर येथे शिकवण्यास सुरवात केली. अभिनेता-निर्माता-निर्देशक राजकपूर यांचा पहिला चित्रपट आगअसफल झाल्यावर आपला दुसरा चित्रपट बरसातबनवण्यास सुरुवात केली. या चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी त्यांनी पेपर मध्ये जाहिरात दिली होती.याला प्रतिसाद देत रमेश शास्त्री यांनी आपण लिहिलेल्या काही कविता पाठवल्या होत्या, यातील हवा में उड़ता जाए, मोरा लाल दुपट्टा मलमल का, हो जी, हां जी... ही कविता गाणे म्हणून निवडण्यात आले. या गाण्याच्या नंतर रमेश शास्त्री यांनी अनेक चित्रपटाच्या साठी गाणी लिहिली, पण या एका गाण्याने जी त्यांना प्रसिद्धी मिळाली ती इतर गाण्यांनी मिळवली नाही. जास्त करून त्यांची गाणी पौराणिक चित्रपटात दिसली. तसे त्यांचे अजून एक गाणे जे गीता दत्त यांनी गायलेले कंकर-कंकर से मैं पूछूं, शंकर मेरा कहां है, कोई बताए... हे पण काही प्रमाणात गाजले होते.

रमेश शास्त्री यांची काही गाणी व त्याचे चित्रपट. राम विवाह-1949 (रूप अनूप सुहाए... गौरी पूजन चली जानकी), उषा हरण -1949 (झिलमिल झिलमिल तारे चमके..., रात सुहानी खिली चांदनी..., आज मेरे जीवन के नभ में छाई है अन्धियारी) इनके अतिरिक्त हर हर महादेव-1950 (मन न माने..., गुन गुन गुन गुंजन करता भंवरा...,कंकर- कंकर से मैं पूछूं..., ऋतु अनोखी प्यार अनोखा..., रूमझूम- रूमझूम चली जाऊं..., हलुलुलुल- हलुलुलु हाल रे... एवं टिम टिमाटिम... ), जय महाकाली 1951 (चम चमा चम... दुनिया मेरी बसाने वाले...)  हे होत. रमेश शास्त्री यांनी काही गैर फिल्मी गीत पण लिहिले. जे रेडियो सिलोन वर वाजवले जात असत. त्यांच्या कन्या संगीता शास्त्री पटकथा लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. रमेश शास्त्री यांचे ३० एप्रिल २०१० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=SHKmTSDx3zE

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२ ऑगस्ट - दिनविशेष

 

२ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१६७७: शिवाजीमहाराज तामिळनाडूतील विरुधाचलम येथे देवदर्शनास गेले. तिथे त्यांनी डच प्रतिनिधींशी बोलणी केली.

 

१७९०: अमेरिकेत पहिली जनगणना सुरू झाली.

 

१८७०: जगातील पहिल्या भूमिगत ट्यूब रेल्वेची टॉवर सबवे ची लंडन मध्ये सुरवात झाली.

 

१९२३: काल्व्हिन कूलिज अमेरिकेचे ३०वे राष्ट्राध्यक्ष बनले.

 

१९५४: दादरा व नगर हवेली हा प्रांत भारतीयांनी पोर्तुगीजांकडुन ताब्यात घेतला.

 

१९७९: नगर जिल्ह्यातील डॉ. रजनीकांत आरोळे व त्यांच्या पत्‍नीला मॅगसेसे पुरस्कार जाहीर केला.

 

१९९०: इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्यामुळे गुल्फ युद्ध सुरु झाले.

 

१९९६: अटलांटा ऑलिंपिक स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतीत, एकाच ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदके पटकावून ऑलिंपिकच्या इतिहासातील पहिला खेळाडू होण्याचा मान पटकवला.

 

२००१: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील विजेता पुल्लेला गोपीचंद याची भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेल रत्‍न पुरस्कारासाठी निवड.

 

२ ऑगस्ट रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१८२०: ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन टिंडाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १८९३)

 

१८३४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकार फ्रेडेरीक ऑगस्टे बर्र्थोल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९०४)

 

१८३५: वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीचे एक संस्थापक अलीशा ग्रे यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९०१)

 

१८६१: भारतीय रसायनशास्त्रज्ञ, बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनी चे संस्थापक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९४४)

 

१८७६: भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगाली वेंकय्या यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १९६३)

 

१८७७: भारतीय वकील आणि राजकारणी रविशंकर शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९६५)

 

१८९२: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक जॅक एल. वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७८)

 

१९१०: कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९७८)

 

१९१८: आध्यात्मिक गुरू, सिंधी धर्मीयांतील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व, साधू वासवानी यांचे पुतणे व शिष्य दादा जे. पी. वासवानी यांचा जन्म.

 

१९२९: भारतीय राजकारणी विद्याचरणा शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुन २०१३)

 

१९३२: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे सहसंस्थापक लमेर हंट यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर २०१६)

 

१९४१: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च जीवशास्त्रज्ञ ज्यूल्स हॉफमन यांचा जन्म.

 

१९४५: भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते बंकर रॉय यांचा जन्म.

 

१९५८: भारतीय क्रिकेटपटू आणि व्यवस्थापक अर्शद अयुब यांचा जन्म.

 

 

२ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१५८९: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १५५१)

 

१७८१: पेशवाईतील मुत्सद्दी, साडेतीन शहाण्यांपैकी एक पूर्ण शहाणे सखारामबापू बोकील यांचे निधन.

 

१९२२: टेलिफोन चे संशोधक अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १८४७)

 

१९३४: जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष पॉल फॉन हिन्डेनबर्ग यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १८४७)

 

१९७८: मोनॅको ग्रांप्री चे स्थापक अॅन्टोनी नोगेस यां

No comments:

Post a Comment