| 🌎🌍  दिनविशेष 🌍🌎 | 
| #DinVishesh | 
| 
 | 
| 🗓🗓 ११
  सप्टेंबर :- घटना
  🗓🗓 | 
| 
 | 
| 🌐 १२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत
  स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव. | 
| 
 | 
| 🌐 १७७३: बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स
  बाय विच
  ए ग्रेट
  एम्पायर मे
  बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन
  हा निबंध
  प्रकाशित केला. | 
| 
 | 
| 🌐 १७९२: होप
  हिरा चोरला
  गेला. | 
| 
 | 
| 🌐 १८९३: स्वामी विवेकानंद यांनी
  जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर आपले
  गाजलेले भाषण
  केले. | 
| 
 | 
| 🌐 १९०६: म.
  गांधींनी द.
  आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द
  पहिल्यांदा वापरला. | 
| 
 | 
| 🌐 १९१९: अमेरिकन सैन्याने होंडुरास ताब्यात घेतले. | 
| 
 | 
| 🌐 १९४१: अमेरिकेने पेंटागॉन बांधायला सुरुवात केली. | 
| 
 | 
| 🌐 १९४२: आझाद
  हिंद सेनेने जन गण
  मन राष्ट्रगीत म्हणून गायले. | 
| 
 | 
| 🌐 १९४४: दुसरे
  महायुद्ध – रॉयल
  एअर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार. | 
| 
 | 
| 🌐 १९६१: विश्व
  प्रकृती निधी
  (World Wildlife Fund) ची स्थापना. | 
| 
 | 
| 🌐 १९६५: भारतीय सैन्याने लाहोर
  जवळील बुर्की गाव ताब्यात घेतले. | 
| 
 | 
| 🌐 १९७२: नाट्यमंदार निर्मित आणि
  प्रा. मधुकर
  तोरडमल लिखित
  व दिग्दर्शित तरुण तुर्क,
  म्हातारे अर्क
  या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील
  डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला. | 
| 
 | 
| 🌐 १९९७: नासाचे मार्सग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोहोचले. | 
| 
 | 
| 🌐 २००१: वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन
  प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो
  लोक मृत्युमुखी. | 
| 
 | 
| 🌐 २००७: रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी
  केली. याचे
  नाव सगळ्या बॉम्बचा बाप
  असे ठेवण्यात आले आहे. | 
| 
 | 
| 🗓🗓 ११
  सप्टेंबर :- जन्म
  🗓🗓 | 
| 
 | 
| 🌐 १८१६: जर्मन
  संशोधक कार्ल
  झाइस यांचा
  जन्म. | 
| 
 | 
| 🌐 १८६२: इंग्लिश लेखक ओ.
  हेन्री यांचा
  जन्म. | 
| 
 | 
| 🌐 १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि
  राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा
  जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४) | 
| 
 | 
| 🌐 १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी,
  नाटककार डी.
  एच. लॉरेन्स यांचा जन्म.
  (मृत्यू: २ मार्च १९३०) | 
| 
 | 
| 🌐 १८९५: भूदान
  चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे
  यांचा जन्म.
  (मृत्यू: १५
  नोव्हेंबर १९८२) | 
| 
 | 
| 🌐 १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी
  देशपांडे तथा
  कवी अनिल
  यांचा जन्म.
  (मृत्यू: ८ मे १९८२) | 
| 
 | 
| 🌐 १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला
  अमरनाथ यांचा
  जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट
  २०००) | 
| 
 | 
| 🌐 १९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल
  जयकर यांचा
  जन्म. (मृत्यू: २९ मार्च
  १९९७) | 
| 
 | 
| 🌐 १९१७: फिलिपाइन्सचे १०
  वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा
  जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९) | 
| 
 | 
| 🌐 १९३९: ऍडॉब
  सिस्टम चे
  संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा
  जन्म. | 
| 
 | 
| 🌐 १९७६: भारतीय क्रिकेटर मुरली
  कार्तिक यांचा
  जन्म. | 
| 
 | 
| 🌐 १९८२: तामिळ
  चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण
  यांचा जन्म) | 
| 
 | 
| 🗓🗓 ११
  सप्टेंबर : मृत्यू 🗓🗓 | 
| 
 | 
| 🌐 १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे
  निधन. | 
| 
 | 
| 🌐 १९२१: तामिळ
  साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे
  निधन. (जन्म:
  ११ डिसेंबर १८८२) | 
| 
 | 
| 🌐 १९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना
  यांचे निधन.
  (जन्म: २५
  डिसेंबर १८७६) | 
| 
 | 
| 🌐 १९६४: हिंदी
  कवी, लेखक,
  टीकाकार व संपादक गजानन
  मुक्तिबोध यांचे
  निधन. (जन्म:
  १३ नोव्हेंबर १९१७) | 
| 
 | 
| 🌐 १९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे
  निधन. (जन्म:
  १५ एप्रिल १८९४) | 
| 
 | 
| 🌐 १९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं
  निधन. | 
| 
 | 
| 🌐 १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि
  गुरू नीम
  करळी बाबा
  यांचे निधन. | 
| 
 | 
| 🌐 १९७८: बल्गेरियाचे कवी
  जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी
  देण्यात आली. | 
| 
 | 
| 🌐 १९८७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे
  निधन. (जन्म:
  २६ मार्च
  १९०७) | 
| 
 | 
| 🌐 १९९३: चित्रपट सृष्टीतील अभिनेते अभी भट्टाचार्य यांचे निधन. | 
| 
 | 
| 🌐 १९९८: क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी प्रिं.
  नोशीरवान दोराबजी तथा एन.
  डी. नगरवाला यांचे निधन.
  (जन्म: १०
  ऑक्टोबर १९०९
  – अहमदनगर, महाराष्ट्र) | 
| 
 | 
| 🌐 २०११: भारतीय सैनिक व पायलट अंजली
  गुप्ता यांचे
  निधन. | 
| 
 | 
| ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● | 
| 🖌🖌 संकलन
  © सागर चिखले | 
| Don't Copy 【Forward Only】 | 
| ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● | 
| जॉईन @MPSCLiveTestSeries | 
|           @MPSCpdfNotes | 
| अधिक माहितीसाठी 👉 @ChaluGhadamodiMPSC | 
| ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● | 
| ************ | 
| ❀ ११
  सप्टेंबर ❀ | 
| अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर
  वर दहशतवादी हल्ला | 
| ************ | 
|  | 
| घटना - ११
  सप्टेंबर २००१ | 
|  | 
| जगातील सर्वात मोठा भीषण
  दहशतवादी हल्ला
  अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ११ सप्टेंबर २००१ रोजी
  केला गेला
  आणि त्यात
  हे जुळे
  टॉवर जमीनदोस्त झाले. | 
|  | 
| या हल्ल्यात ७०
  देशातील ३०००
  नागरिक ठार
  झाले होते.
  याच दिवशी
  अमेरिकन लष्करी यंत्रणा पेंटागॉनवर सुद्धा एक
  विमान दहशतवाद्यांनी धडकविले होते.  | 
|  | 
| अमेरिकेवरील या
  ऐतिहासिक हल्ल्यात १९ दहशतवादी सामील होते.
  या हल्ल्याचा मास्टरमाईंड अल
  कायदाचा म्होरक्या ओसामा बिन
  लादेन याच्यावर अमेरिकेने २.५ कोटी
  डॉलर्सचे बक्षीस लावले होते
  आणि २ मे २०११
  रोजी ओसामा
  याला पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे घुसून
  अमेरिकन सील
  कमांडोनी ठार
  केले. | 
|  | 
| न्युयॉर्क येथील
  वर्ल्ड ट्रेड
  सेंटरचे बांधकाम १९६६ मध्ये
  सुरु झाले
  आणि ही
  अतिप्रचंड इमारत
  १९७३ साली
  बांधून पूर्ण
  झाली होती.
  या इमारतीत १८ हजार
  कर्मचारी काम
  करत असत. | 
|  | 
| याच्या बरोबर
  विरुद्ध घटना
  ११ सप्टेंबर १८९३ रोजी
  घडली होती.
  त्या दिवशी
  विश्व धर्म
  संमेलनात भारताचे अध्यात्मिक गुरु
  स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या भाषणाने जगावर
  एक न पुसता येणारा ठसा उमटविला होता.  | 
|  | 
| आज १२८ वर्षे
  उलटल्यावर सुद्धा विवेकानंदांचे भाषण
  जनमानसावर तसेच
  ठसलेले आहे.
  या भाषणाची सुरवात स्वामी विवेकानंदानी "माय
  सिस्टर्स अँड
  ब्रदर्स ऑफ
  अमेरिका" अशी
  करून पाश्चिमात्य देशांना भारतीय संस्कृती, सहिष्णुता यांचे
  नवे दर्शन
  घडविले होते.
  स्वामीच्या या
  भाषणाने भारताची प्रतिमा उज्ज्वल केली होती. | 
|  | 
| याशिवाय याच
  दिवशी अमेरिकेच्या इतिहासात आणखी काही
  घटना घडल्या आहेत. ११
  सप्टेंबर २०११
  रोजीच अमेरिकन लष्कराचे मुख्यालय पेंटागॉनचे बांधकाम सुरु झाले
  होते. तसेच
  ११ सप्टेंबर २००३ मध्ये
  चीनच्या विरोधाला न जुमानता तिबेटी धर्मगुरू दलाई लामा
  यांची भेट
  अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज
  बुश यांनी
  घेतली होती. | 
|  | 
| संकलन : मिलिंद पंडित, कल्याण | 
|  | 
| सौजन्य : माझा
  पेपर/शामला
  देशपांडे | 
|  | 
| ************ | 
| ************ | 
| ❀ ११
  सप्टेंबर ❀ | 
| आचार्य विनोबा भावे जन्मदिन | 
| ************ | 
|  | 
| जन्म - ११
  सप्टेंबर १८९५ | 
| स्मृती - १५
  नोव्हेंबर १९८२ | 
|  | 
| थोर गांधीवादी आचार्य आणि भूदान
  चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे
  यांचा जन्म
  ११ सप्टेंबर १८९५ रोजी
  झाला. | 
|  | 
| भगवद्गीतेचे सार
  सोप्या रसाळ
  शैलीत ‘गीताई’
  आणि ‘मधुकर’
  सारख्या ग्रंथांतून सांगणार्या विनोबांची भेट ७ जून १९१६
  रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली
  आणि त्यांच्या आयुष्यानेच एक
  नवे वळण
  घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ
  घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली.  | 
|  | 
| वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पांतजलयोगाचे शिक्षण घेतले. पुढे
  १९२१ मध्ये
  जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे
  संचालक म्हणून ८ एप्रिल १९२१ रोजी
  महात्माजींच्या १९४०
  त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले
  ते सत्याग्रही होते.  | 
|  | 
| विनोबांनी १९५१
  ते ५३
  हा भूदान
  यात्रेचा कालावधी वगळता सारे
  आयुष्य वर्ध्याच्या पवनार
  आश्रमात काढले.
  भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन
  सन्मान केला.
   | 
|  | 
| विनोबा भावे
  यांचे १५  नोव्हेंबर १९८२  रोजी निधन
  झाले. | 
|  | 
| विनोबा भावे
  यांना आदरांजली ! | 
|  | 
| संजीव वेलणकर, पुणे | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ : इंटरनेट | 
| आज ११ सप्टेंबर | 
| आज एक
  काळ हिंदी
  आणि मराठी
  चित्रपटात आपल्या मधुर सुरेल
  आवाजातल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या जुन्या काळातील गायिका #मधुबाला_जव्हेरी यांचा जन्मदिन. | 
| जन्म. १९
  मे १९३५
   | 
| मधुबाला चावला
  हे त्यांचे लग्नानंतरचे नाव.
  वडिलांचे नाव
  ननजीवनभाई जव्हेरी. त्यांच्या आई
  हिराबाई जव्हेरी आणि मावशी
  शामला माझगावकर या शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातल्या ख्यातनाम गायिका होत्या. हिराबाई व श्यामलाबाई यांनी
  १९२९ मध्ये
  स्वामी समर्थ
  संगीत विद्यालयाची स्थापना केली. दैवजात मधुर आवाजाचं देणं मधुबाला जव्हेरी यांना
  लाभलं होतं.
  आई आणि
  मावशीच्या सहवासात त्या मोहक
  आवाजावर पैलू
  पाडले गेले.
  शास्त्रीय संगीताचे संस्कार त्यांच्या गळ्यावर झाले.
  लता मंगेशकर यांच्याबरोबर दोन
  ओळी गाण्यासाठी संगीतकार स्नेहल भाटकर यांनी
  मधुबालांना पहिली
  संधी दिली
  आणि त्या
  संधीचं अक्षरश: त्यांनी सोनं
  केलं. या
  गान कोकिळेबरोबर गायिलेल्या या गाण्यानं संगीतकार हंसराज बहल यांना
  मोहवून टाकलं.
  वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी
  बहल यांनी
  मधुबालांना "अपनी
  इज्जत' या
  चित्रपटात तलत
  महमूद बरोबर
  दंव्व गीत
  गायची संधी
  दिली. या
  चित्रपटातली गाणी
  गाजली. पुढं
  हंसराज बहल,
  सी. रामचंद्र, श्रीनिवास खळे
  या संगीतकारांनी संगीत
  दिलेल्या चित्रपटातली गाणीही त्यांनी गायिली. मोहम्मद रफी,
  गीता दत्त,
  आशा भोसले,
  या गायक-गायिकांच्याबरोबरही त्यांनी गाणी गायिली. मधुबाला जव्हेरी या गायिकेचा नावलौकिक झाला.
  तलत बरोबर
  त्यांनी गायिलेली दंव्व गीतं
  गाजली आणि
  त्या सुवर्ण काळातल्या चित्रपट सृष्टीत अजरामर ठरली. सी.
  रामचंद्र यांनी
  संगीत दिलेल्या "झांझर' चित्रपटात लता मंगेशकर यांच्याबरोबर गायिलेलं "जा रे
  जा निंदिया', मोहम्मद रफींबरोबर गायिलेलं "मोती
  महल' चित्रपटातलं "जाएगा
  जब यहॉं
  से कुछ
  भी न साथ होगा',
  "आए भी
  अकेला, जाएभी
  अकेला', "आये
  जमाने बता,
  जब से
  मैनें दिल
  जगाया', ही
  "दोस्त' चित्रपटातली तलत
  मेहमूदबरोबर गायिलेलं गाणं रसिकांच्या ओठावर अनेक
  वर्षे होती.
  "रतन है
  अनमोल हमारे,
  इधर सुदामा', "चुपके चुपके कोई
  मेरे, होके
  बडा मेरा
  लाल', ही
  त्यांनी गायिलेली गाणी रसिकप्रिय ठरली होती.
  राज कपूर,
  नलिनी जयवंत,
  माला सिन्हा, निरूपा रॉय,
  दत्ताराम, उषा
  किरण, बलराज
  साहनी, रमेश
  देव या
  अभिनेते-अभिनेत्रींनी भूमिका केलेल्या चित्रपटांची गाणी
  झव्हेरी यांनी
  सहजपणे गायिली. "कृष्ण सुदामा, दोस्त, मोती
  महल, रियासत, बिंदिया, पेन्शनर, हिरो नंबर
  एक', हे
  त्यांनी गायिलेल्या गाण्यांचे चित्रपट तसे दुय्यम दर्जाचेच होते.
  पण जव्हेरी यांच्या गाण्यामुळं ते रसिकांना आवडले होते.
  "पैशाचा पाऊस',
  "सांगत्ये ऐका',
  अशा काही
  मराठी चित्रपटांतही जव्हेरी यांनी गाणी
  गायिली होती.
  "सांगत्ये ऐका',
  या मराठी
  चित्रपटसृष्टीत इतिहास घडवलेल्या चित्रपटातली "काल
  राती मजसी,
  धौम्य ऋषी
  सांगत असे,
  अरे अरे
  नंदाच्या पोरा',
  ही जव्हेरी यांनी गायिलेली गाणी तेव्हा गाजली होती.
  "अवघाची संसार'
  या चित्रपटातलं "फुले
  स्वरांची उधळीत'...
  हे गाणंही त्यांनीच गायलं
  होतं. १९५०
  ते १९६०
  या दशकात
  लता मंगेशकर, आशा भोसले,
  सुमन कल्याणपूर, गीता दत्त,
  अशा दिग्गज गायिकांचा प्रभाव असतानाही मधुबाला जव्हेरी यांनी
  आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवून दिलं होतं.
  आपल्या कारकिर्दीत मधुबाला जव्हेरींनी ५५ हिंदी,
  २७ मराठी
  आणि ३ गुजराथी गाणी
  गायली. मधुबाला जव्हेरी या
  उत्तम चित्रकार होत्या. त्या
  संगीतज्ञ असल्याने त्यांनी काही
  गाणी संगीतबद्धही केली
  होती. मधुबाला जव्हेरी यांचे
  निधन ११
  सप्टेंबर २०१३
  रोजी झाले. | 
| मधुबाला जव्हेरी यांची मराठी
  गाणी.  | 
| https://www.youtube.com/watch?v=qJGHlVtBzlU | 
| https://www.youtube.com/watch?v=lggGtHp5rlM | 
| https://www.youtube.com/watch?v=3hCMRIBE-tg | 
| https://www.youtube.com/watch?v=vUm9UV0fk1M | 
| https://www.youtube.com/watch?v=hlw4HUOWdP8 | 
| मधुबाला जव्हेरी यांची हिंदी
  गाणी  | 
| https://www.youtube.com/watch?v=L65O_vIhO6c | 
| https://www.youtube.com/watch?v=ExOD2-AgcJc | 
| https://www.youtube.com/watch?v=W_3NrcbZzHQ | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज हॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते #रॉबर्ट_फॉर्सटर यांचा स्मृतिदिन.  | 
| जन्म.१३
  जुलै १९४१ | 
|  रॉबर्ट फॉर्सटर यांचा जन्म
  न्यूयॉर्कमध्ये झाला
  होता. रॉबर्ट यांनी आपल्या करियरमध्ये शंभरहून अधिक चित्रपटांत काम केले
  असून त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले
  आहेत. एवढेच
  नव्हे तर
  त्यांच्या चित्रपटांना ऑस्कर
  या प्रतिष्ठीत पुरस्कार सोहळ्यात नामांकन देखील
  मिळाले आहे.
   | 
| रिफलेक्शन इन
  अ गोल्डन आय, द स्टॉकिंग मून,
  जस्टिन, मीडियम कूल, कव्हर
  मी वेबस,
  पीसेज ऑफ
  ड्रीम, द डॉन इज
  डेड, स्टंटस, हॉलिवूड हॅरी,
  डिप्लोमेटिक इम्युनिटी, इन बिटविन, कव्हर स्टोरी, कमिटेड, गन्स
  एंड लिपस्टिक, अंकल सॅम,
  सुपरनोवा, रेयर
  विंडो, क्लीनर, द ट्रायल यांसारख्या अनेक
  प्रसिद्ध चित्रपटांमध्ये ते
  महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.
  त्यांनी चित्रपटांप्रमाणेच काही
  प्रसिद्ध शोमध्ये देखील काम
  केले आहे. | 
| रॉबर्ट फॉर्सटर यांच्या जॅकी
  ब्राऊन या
  चित्रपटाला ऑस्करचे नामांकन मिळाले होते. या
  चित्रपटात त्यांनी मॅक्स चेरी
  नावाची भूमिका साकारली होती. | 
|  ते नुकतेच एल कॅमिनोः अ ब्रेकिंग बॅड मुव्ही या चित्रपटात इडीच्या भूमिकेत दिसले होते.
  हा चित्रपट नुकताच अमेरिकेत प्रदर्शित झाला
  आहे. रॉबर्ट फॉर्सटर यांचे
  ११ सप्टेंबर २०१९ रोजी
  निधन झाले. | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री #श्रिया_सरन चा
  वाढदिवस. | 
| जन्म. ११
  सप्टेंबर १९८२
  डेहराडून येथे. | 
| तेलुगू चित्रपटांपासून सुरुवात करणारी श्रिया सरन तमिळ
  चित्रपटातील एक
  मोठी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती हिंदी
  भाषा चित्रपटांत देखिल काम
  करत आहे.  श्रिया सरनचे बालपण
  हरिद्वार जवळ
  असलेल्या राणीपूर येथे गेले.
  श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण
  झाले. तिचे
  महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज, दिल्ली मधून झाले
  व ती
  बी.ए.
  पर्यंत शिकलेली आहे. तिचे
  वडील भारत
  हेवी इलेक्ट्रिकल्स लिमीटेड (भेल) मध्ये
  कामाला होते,
  व आई
  शाळेत रसायनशास्त्राची शिक्षिका आहे, तसेच
  तिला एक
  मोठा भाऊ
  ज्याचे नाव
  अभिरूप हे
  आहे. | 
|  श्रिया एक
  कत्थक आणि
  राजस्थानी लोकनृत्यात पारंगत असून
  आपल्या आईकडून तिने नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले आहे. श्रिया चांगला डांस
  करीत असल्यानेच तिला ‘थिरकती क्यूं हवा’
  या म्यूझिक व्हीडियोमध्ये काम
  मिळाले. यात
  तिने आपल्या नृत्याची कमाल
  दाखवली होती.
  हा म्यूझिक व्हीडियो दक्षिणेतील प्रख्यात निर्माता दिग्दर्शक, दिग्दर्शक रामोजी राव
  यांनी पाहिला आणि लगेचच
  ‘इस्थम’ चित्रपटासाठी श्रियाला साईन केले.शिवाजी द बॉस हा
  तिचा एक
  गाजलेला यशस्वी (तमिळ) चित्रपट आहे. तुझे
  मेरी कसम,
  थोडा तुम
  बदलो थोडा
  हम, शुक्रिया, आवारापन, मिशन
  इस्तंबुल, दृश्यम या हिंदी
  सिनेमात ती
  झळकली. अजय
  देवगनसोबत तिचा
  'दृष्यम' हा
  चित्रपट प्रचंड गाजला होता.
  याशिवाय अनेक
  तेलुगू, तमिळ,
  कन्नड चित्रपटात तिने काम
  केलं आहे.
  संतोषम, टागोर,
  शिवाजी: द बॉस  कंदस्वामी  हे तिचे
  गाजलेले साऊथ
  सिनेमे आहेत.
  २०१८ मध्ये
  मध्ये श्रियाने रशियन राष्ट्रीय स्तरावरील टेनिस
  खेळाडू व व्यवसाईक आंद्रेई कोशीव सोबत
  लग्न केले.
  'डोमावकुस्नी' या
  रेस्टॉरंट चेनचा
  तो संस्थापक आहे.  | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज गायक,अभिनेते सुरेंद्रनाथ उर्फ
  #बॉम्बे_सहगल
  यांचा स्मृतिदिन. | 
| जन्म. ११
  नोव्हेंबर १९१०
  पंजाबच्या बटला
  गावात. | 
| कायद्याची पदवी
  मिळविणारे सुरेंद्रनाथ उर्फ
  सुरेंद्र उर्फ
  बॉम्बे सहगल
  हे हिंदी
  चित्रपटसृष्टीत एक
  मोठे अभिनेते  होतील, असा
  विचार कुणीही केला नसेल.
  ते आपल्या अभिनय आणि
  गाण्याच्या जोरावर चित्रपट सृष्टीत आले. ३०
  च्या दशकाच्या उत्तरार्धात ‘दक्कन
  की रानी’
  या चित्रपटापासून सुरू
  झालेली त्यांची कारकीर्द ५०
  पर्यंत च्या
  दशका पर्यत
  कायम होती.
  मेहबूब खान
  यांच्या 'मनमोहन' या चित्रपटाने त्यांना ओळख
  मिळवून दिली.
  अनिल बिस्वास यांनी सुरेंद्रनाथ यांना
  बर्यातच चित्रपटात गायला लावून
  त्यांना गायक
  म्हणून  ओळख मिळाली. गाण्यातून ठसा
  उमटविला. अनिल
  बिस्वास यांच्या बरोबरच नौशाद
  अली, खेमचंद प्रकाश, सचिन
  देव बर्मन
  आणि राम
  गांगुली सारख्या संगीतकारांनी त्यांच्या कडून गाणी
  गाऊन घेतली.
  ‘अनमोल घडी’
  मध्ये सुरेंद्रनाथ यांनी
  मल्लिका ए तरन्नुम नूरजहांसोबत 'आवाज
  दे कहां
  है' गाण्याची संधी मिळाली. त्या 'अनमोल
  घडी ' चे
  संगीत खूप
  लोकप्रिय झाले
  होते, त्यानंतर सुरेंद्र नाथ
  यांनी बर्याकच चित्रपटात गाणी
  गायली. खेमचंद प्रकाश यांचे
  संगीत असलेल्या ‘भरथरी’ चित्रपटाने त्यांना बरीच
  प्रसिद्धी दिली.
  स्वातंत्र्यलढ्यावरील पहिल्या चित्रपटात सुरैया यांच्याबरोबर गायलेले 'तेरी नजर
  में' हे
  गाणेही हिट
  झाले होती.
  सुरेंद्रनाथ यांनी
  बैजू बावरा
  या चित्रपटात तानसेनची केली
  होती. सुरेंद्रनाथ १९५७
  साली आलेल्या  ‘रानी रूपमति’या चित्रपटात तानसेन यांचा
  अभिनय केला
  होता. तसेच
  त्यांनी मुगल-ए-आजम
  मध्येही तानसेनचीच भूमिका केली
  होती.  | 
| सुरवातीला सुरेंद्रनाथ यांना
  नशिबाने साथ
  दिली. त्या
  काळी अभिनेता बनण्यासाठी गाणे
  येण्याची गरज
  होती. तीसच्या दशकात कुंदन
  लाल सहगल
  यांना टक्कर
  देण्यासाठी मेहबूब खान सुरेंद्रनाथ यांना
  हिंदी चित्रपट सृष्टीत आणले
  होते. मेहबूब खान यांचे
  सुरेंद्रनाथ यांच्यावर विशेष प्रेम
  होते. मेहबूब खान यांनी
  सुरेंद्रनाथ यांना
  आपल्या आठ
  चित्रपटाचे हीरो
  बनवले होते,
  ज्यात १९४०
  साली आलेल्या ‘औरत’चा
  समावेश आहे.
  जी पुढे
  १९५७ साली
  त्यांनी ‘मदर
  इंडिया’ या
  नावाने बनवली
  होती. ‘औरत’मध्ये सुरेंद्रनाथ यांनी
  तीच भूमिका केली होती,
  जी ‘मदर
  इंडिया’मध्ये
  राजेंद्र कुमार
  यांनी केली
  होती. चाळीसच्या दशकात हिंदी
  चित्रपट सृष्टीतील अनेक लोक
  कोलकत्ता येथे
  गेले, यात
  सहगल पण
  होते. मुंबईतील सहगल यांची
  कमी सुरेंद्रनाथ यांनी
  पूरी केली.
  महबूब खान
  यांनी अनेक
  उत्तम चित्रपट दिले, त्यातील देवदास एक
  होता. देवदास मध्ये त्यांनी अभिनेत्री बीब्बो यांच्या बरोबर
  काम केले.या दोघांचे गाणे ‘तुम्हीं ने मुझको
  प्रेम सिखाया’ खूप गाजले.याला संगीत
  दिले होते
  अशोक घोष
  यांनी. येथे
  सुरेंद्रनाथ यांनी
  सहगल यांना
  टक्कर दिली,
  मुंबईतील सागर
  मूवीटोनबरोबर काम
  करणारे सुरेंद्रनाथ यांचा
  आवाज  सहगल यांच्या जवळ जाणारा होता,म्हणून सुरेंद्रनाथ यांना
  बॉम्बे सहगल
  म्हणत असत.
  दक्कन की
  रानी या
  चित्रपटातील ‘बिरहा
  की आग
  लगी मोरे
  मन में’
  हे सुरेंद्र यांचे पहिले
  गाणे होते.
  सहगल यांच्या शैलीने प्रभावित होऊन गायलेले गाणे सहगल
  यांच्या ‘बलम
  आये बसो
  मेरे मन
  में’ गाण्यावर होते. सुरेंद्रनाथ यांच्या गायकीवर सहगल
  यांचा प्रभाव खूप कमी
  वर्षे राहिला. मेहबूब खान
  यांच्या ‘मनमोहन’ चित्रपटातील ‘तुम्हीं ने मुझको
  प्रेम सिखाया’ हे गाणे
  त्यांनी वेगळ्या पद्धतीने गायले
  होते. सुरेंद्रनाथ यांनी
  गायना बरोबरच अभिनयात नाव
  कमावले होते.
  जागीरदार, ग्रामोफोन सिंगर, फिर
  जीवन साथी,
  लाल हवेली,
  अलीबाबा अशा
  अनेक चित्रपटात सुरेंद्रनाथ यांनी
  महत्वपूर्ण रोल
  केले. चाळीसच्या दशका नंतर
  फाळणी झाल्यावर अनमोल घडी
  व लाल
  हवेली मधील
  त्यांच्या बरोबर
  गाणारी नूरजहां या पाकिस्तानात गेल्या. त्या मुळे
  त्यांना मल्लिका-ए-तरन्नुम नूरजहां यांच्या बरोबर पुढे
  काम करण्याची संधी मिळाली नाही. यामुळे त्यांनी एकट्याने गाणी गायला
  सुरुवात केली,यात त्यांचे  ‘तेरी याद
  का दीपक’
  हे गाणे
  हिट झाले.
  त्याकाळी मेहबूब खान, अनिल
  बिश्वास, सुरेंद्र यांची एक
  टीम उभी
  राहिली. सत्तरहून अधिक चित्रपटात अभिनेता म्हणून काम केलेले सुरेंद्रनाथ यांनी
  अनेक गाणी
  गायली. अनिल
  बिश्वास यांनी
  सुरेंद्रनाथ यांना
  सगळ्यात जास्त
  संधी दिल्या होत्या. | 
| पुढे आपल्या उतरत्या वयात
  सुरेंद्रनाथ यांनी
  चरित्र अभिनेत्याची कामे
  केली. मुगले
  आजम, वक्त,
  एन इवनिंग इन पेरिस,
  फिर मिलन,
  हरियाली ऑर
  रास्ता या
  चित्रपटात चरित्र अभिनेत्याची कामे
  केली. | 
| तसेच त्यांनी जाहिरात एजन्सीची सुरुवात केली,
  ही एजन्सी त्यांचा मुलगा
  कैलाश पुढे
  चालवत आहे. | 
| दूरदर्शन वरील
  मिले सुर
  मेरा तुम्हारा ही त्यांनी बनवली होती.
  सुरेंद्रनाथ यांचे
  निधन ११
  सप्टेंबर १९८६
  रोजी झाले. | 
| सुरेंद्रनाथ यांची
  गाणी. | 
| ‘तेरा
  जहां आबाद…
  क्यूं याद
  आ रहे
  गुजरे जमाने…
  अब कौन
  मेरा… क्यूं
  मन ढूंढे
  प्रेमनदी का
  किनारा… भंवरा
  मधुबन में
  मत जा
  रे… मुझको
  जीने का
  बहाना मिल
  गया… काहे
  अकेला डोलत
  बादल मोहे
  भी संग
  ले जा…
  फिर तेरी
  याद का
  दीपक एवं
  दिन रात
  मेरे दीवाने में। अमीर
  बाई कर्नाटकी के साथ
  गाया युग्ल
  ‘आईने में
  एक चांद
  सी सूरत
  नजर आयी’
  याद आता
  है। उनके
  बेहतरीन युगल
  गानों में…
  जले क्यों
  न परवाना एवं क्यूं
  उसने दिल
  दिया (शमशाद
  बेगम)… बुलबुल को मिला
  फूल (गीता
  दत्त)… प्रेम
  नगर की
  ओर चलें
  एवं हम
  और तुम
  यह ख़ुशी
  (खुर्शीद), तेरी
  नजर में
  (सुरैया)  | 
| https://www.youtube.com/watch?v=XJlmddYE-7M | 
| https://www.youtube.com/watch?v=Sg8DjaVbayQ | 
| https://www.youtube.com/watch?v=ecQqrHhfkIU | 
| https://www.youtube.com/watch?v=P2MTYEcSXS8 | 
| https://www.youtube.com/watch?v=BpS71qqCfJA | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री #महादेवी_वर्मा यांचा
  स्मृतिदिन. | 
| जन्म.२६
  मार्च १९०७
   | 
| महादेवीं वर्मा
  यांचे प्राथमिक शिक्षण इंदुरातल्या मिशन
  शाळेत सुरू
  झाले. बरोबरच संस्कृत, इंग्रजी, संगीत आणि
  चित्रकलेचे शिक्षण शिक्षक घरी
  येऊन देत
  असत. १९१९
  मध्ये अलाहाबाद मधल्या क्रास्थवेट कॉलेजात प्रवेश घेऊन त्या
  १९३२ मधे
  अलाहाबाद विश्वविद्यालयातून संस्कृत विषयात एम.ए. झाल्या. महादेवींचे कार्यक्षेत्र लेखन,
  संपादन व अध्यापन होते.
  अलाहाबादच्या प्रयाग महिला विद्यापीठाच्या विकासकार्यात त्यांचा मोठा सहभाग
  होता. त्या
  काळात हे
  काम म्हणजे महिला क्षेत्रात क्रांती घडविणारे पाऊल होते.
  ह्या विद्यापीठाच्या त्या
  प्रधानाचार्य व कुलगुरू पण
  होत्या. १९३२
  मध्ये त्यांनी चाँद नावाच्या एका महिलांच्या मासिकाच्या मुख्य
  संपादक झाल्या. त्यांना हिंदी
  साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक
  समजले जाते.
  आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं
  असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा'
  पण म्हंटले जाते. कवी
  निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल
  मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे.
  प्रतिभावान कवयित्री व गद्य
  लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल
  चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी
  साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले होते.
  १९५६ मधे
  भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही उपाधी
  दिली.. १९७९
  मधे त्या
  साहित्य अॅकॅडमीच्या पहिल्या महिला सदस्य
  होत. भारत
  सरकार कडून
  १९८८ मधे
  त्यांना मरणोपरान्त पद्मविभूषण देऊन
  भूषविले. | 
| 'यामा'
  नामक काव्य
  संकलनासाठी त्यांना भारत सरकार
  चा सर्वोच्च सन्मान 'ज्ञानपीठ पुरस्कार' देण्यात आला. १९६८
  मधे सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते मृणाल सेन
  ह्यांनी त्यांच्या स्मरणार्थ 'वह
  चीनी भाई'
  वर 'नील
  आकाशेर नीचे'
  नामक एक
  बंगाली चित्रपटाची निर्मिती केली.
  १६ सप्टेंबर १९९१ ला
  भारत सरकारने महादेवी वर्मांच्या सन्मानार्थ जयशंकर प्रसादांसमवेत २ रुपयांचे एक
  पोस्टाचे तिकीट
  प्रकाशित केले.
  त्यांच्या अतीत
  के चलचित्र या पुस्तकाचा मराठी अनुवाद’ ’बिंदा, सांबिया आणि... ’या
  नावाने प्रकाशित झाला आहे.महादेवीं वर्मा
  यांचे ११
  सप्टेंबर १९८७
  रोजी निधन
  झाले. आपल्या समूहातर्फे महादेवीं वर्मा यांना
  आदरांजली. | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर  | 
| आज आत्माराम रावजी देशपांडे उर्फ #कवी_अनिल यांचा
  जन्मदिन. | 
| जन्म. ११
  सप्टेंबर १९०१
   | 
| कवि अनिलांना मुक्तछंद ह्या
  काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते.
  तसेच दशपदी
  १० चरणांची कविता हा
  काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.
  पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे
  गेले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर
  आणि नंदलाल बसू ह्यांचे मार्गदर्शन. त्यानंतर १९३५ साली
  विधिशाखेची पदवी
  मिळाली. सनद
  घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय केला.
  त्यांची १९४८
  साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून नेमणूक झाली.
  १९५६ साली
  राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे
  मुख्याधिकारीपदावर व पुढे १९६१
  साली भारत
  सरकारच्या समाज
  शिक्षण मंडळाचे सल्लागार ह्या
  पदांवर नेमणुक झाली. कवी
  अनिलांना १९७९
  ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.
  कवी अनिल
  हे मराठीत मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून अधिक
  प्रसिद्ध असले,
  तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा
  काव्यप्रकार देखील
  तितकाच लक्षणीय आहे. सुनीत
  ज्याप्रमाणे चौदा
  ओळींचे असते,
  तशाच दशपदी
  कवितेत दहा
  ओळी असतात.
  अनिलांच्या दशपदींमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचे शब्दांकन किंवा मनाच्या भावावस्थेचे चित्रण केले आहे.
  कवी अनिल
  यांचे निधन
  ८ मे
  १९८२ रोजी
  झाले. #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
|  | 
| * कवी
  अनिल यांच्या कविता*  | 
| 'तळ्याकाठी' | 
| अशा एखाद्या तळ्याच्या काठी
  बसून राहावे, मला वाटते, | 
| जिथे शांतता स्वतःच निवारा शोधीत थकून
  आली असते | 
|  | 
| जळाआतला हिरवा
  गाळ निळ्याशी मिळून असतो
  काही | 
| गळून पडत
  असताना पान
  मुळी सळसळ
  करीत नाही | 
|  | 
| सावल्यांना भरवीत
  कापरे जलवलये उठवून देत | 
| उगीच उसळी
  मारून मासळी,
  मधूनच वर
  नसते येत | 
|  | 
| पंख वाळवीत बदकांचा थवा
  वाळूत विसावा घेत असतो | 
| दूर कोपर्याबत एक बगळा
  ध्यानभंग होऊ
  देत नसतो | 
|  | 
| हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत
  जाते | 
| अशा एखाद्या तळ्याच्या काठी
  बसून राहावे, मला वाटते! | 
| अनिल | 
|  | 
|  | 
| जुई | 
| पावसाची सर
  ओसरून जाते,
  उगाच तुषार
  भिरभिरती | 
| इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती | 
|  | 
| आधीच हळवा
  सुवास कोमल
  त्यात जळाआत
  विरघळला | 
| ओल्या झुळकीत भरून वारा
  नेत असतो
  अशा वेळेला | 
|  | 
| तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते
  सौम्य चांदणे | 
| जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे
  नितळ रूप
  देखणे | 
|  | 
| कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा
  पाचूच्या पानांत झाकून घेत | 
| शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे
  लावण्य लेऊन
  येत | 
|  | 
| मादकता जाते
  मार्दवी विरून,
  सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते
   | 
| सोलीव सुखाचे स्वप्नच एक
  जीवाला जगतेपणी पडते ! | 
| कवी अनिल | 
|  | 
|  | 
|  | 
| पावसा पावसा
  थांब ना
  थोडा | 
|  | 
| पावसा पावसा
  थांब ना
  थोडा  | 
| पिळून काढुन
  न्हालेले केस
   | 
| बांधु दे
  एकदा सैल
  अंबाडा | 
| पावसा पावसा
  लप ढगात
   | 
| सागफ़ुलांची कशिदा
  खडीची  | 
| घालु दे
  तंगशी चोळी
  अंगात | 
| पावसा पावसा
  ऊन पडु
  दे  | 
| वाळाया घातला
  हिरवा शालू
   | 
| चापूनचोपून तिला
  नेसू दे | 
| पावसा पावसा
  पाहा ना
  जरा  | 
| जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने  | 
| वेणीत घालाया केला गजरा | 
| पावसा पावसा
  आडोश्यातुन  | 
| साजरा शृंगार रानराणीचा  | 
| दुरून न्याहाळ डोळे भरून
  … | 
| कवी अनिल | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज संगीतकार जोडी अजय-अतुलपैकी #अजय_गोगावले यांचा
  वाढदिवस. | 
| जन्म. ११
  सप्टेंबर १९७४
  राजगुरुनगर, पुणे
  येथे. | 
| सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय-अतुल हे
  नाव आवर्जून घेतलं जातं.
  केवळ मराठीतच नाही तर
  हिंदी आणि
  तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या
  जोडीने संगीत
  दिग्दर्शन केलंय.
  राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या
  जोडीचे संगीत
  अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर
  खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले
  आहे.  | 
| या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात ‘विश्वविनायक’ या
  प्रसिद्ध अल्बमने केली. ‘विश्वविनायक’ या
  अल्बममध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या
  वेगळेपणामुळे हा
  अल्बम जगभर
  लोकप्रिय झाला.
  संगीतकार असण्याबरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख
  आहे. अनेक
  काँबो म्युझिकल गाणी आणि
  लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत.
  त्या गाण्यांना त्यांचा आवाज
  चपखल आणि
  साजेसा वाटतो.
  अजय -अतुल
  यांचे वडील
  महसूल खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांची सारखी
  बदली होत
  असे.त्यामुळे अजय व अतुल यांना
  पश्चिुम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावी राहावे लागे. ग्रामीण संस्कृती, तिथल्या परंपरा, त्याचप्रमाणे तिथल्या भाषेचा ढंग,
  उच्चारातले बारकावे त्यांना जवळून
  हेरता आले.
  लहानपणापासूनच अजय
  यांना शिक्षणामध्ये विशेष
  रस नव्हता. पण शालेय
  जीवनातच संगीताविषयीचा त्यांचा ओढा वाढला.
  शाळेत असतानाच गाणी-नृत्य
  बसवणे, बँड
  पथकात भाग
  घेणे असे
  त्यांचे उद्योग चालूच होते.
  घरात संगीताची पार्श्विभूमी नसल्यामुळे त्यांना संगीतासाठी घरातून प्रोत्साहन मिळाले नाही.
  तसेच, वाद्ये विकत घेण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी पुण्याला आल्यावर घराजवळच्या बँडवाल्याशी ओळख
  करून घेऊन
  त्यांच्याकडून अनेक
  वाद्ये शिकून
  घेतली. पुण्याच्या काही वाद्यवृंदांतून ते
  कार्यक्रम करू
  लागले. | 
| अजय अतुल
  यांनी शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण घेतलेले नाही. इलाई
  राजा यांना
  ते आपले
  गुरुस्थानी मानतात. शिक्षणानंतर त्यांनी मुंबईत येऊन
  टाइम्स म्युझिक च्या विश्वविनायक या
  संगीत सीडीसाठी काम सुरू
  केले . यातले
  श्री गणेशाय धीमही हे
  शंकर महादेवन यांनी गायलेले गीत खूप
  गाजले. | 
| जोगवा चित्रपट त्यांच्या आत्तापर्यंत च्या
  कारकिर्दीतला सर्वांत विशेष चित्रपट ठरला. या
  चित्रपटाच्या उत्कृष्ठ संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  तसेच याच
  चित्रपटातील जीव
  दंगला या
  गाण्यासाठी अतुलv
  यांना पुरस्कार मिळाला आहे
  . व्यावसायिक जिंगल्सपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणार्याि अजय-अतुल यांनी
  जाहिराती, बॅले
  यांना दिलेले संगीतही वेगळ्या धाटणीचे होते.
  सैराट’ चित्रपटामधील गाण्यांनी तर लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ‘जाऊं
  द्या ना
  बाळासाहेब’ या
  चित्रपटाची त्यांनी निर्मितीही केली
  आहे. | 
| मराठीप्रमाणेच हिंदी
  चित्रपटसृष्टीतही फार
  थोड्या अवधीत
  या जोडीने आपल्या नावाचा ठसा उमटवला. ‘लाईफ हो
  तो ऐसी’‘विरुद्ध’, ‘गायब’,
  ‘सिंघम’, ‘अग्निपथ’, ‘बोल बच्चन’
  अशा हिंदी
  चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले.
  ‘सैराट’च्या
  ‘धडक’ या
  हिंदी रीमेकलाही अजय-अतुल
  यांनीच संगीत
  दिलं. या
  सर्व चित्रपटांमधील त्यांचे संगीत लोकप्रिय ठरले, आणि
  ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगीतकार म्हणून नावारूपाला आले.
  दक्षिणेतले प्रसिद्ध संगीतकार इलया
  राजा यांच्याबरोबर काम
  करायची संधीही त्यांना मिळाली. | 
| अजय-अतुल
  यांना आपल्या यशस्वी संगीत
  कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार, २००५
  सर्वोत्कृष्ट संगीतकार (सावरखेड एक
  गाव), माता
  सन्मान, २००५
  सर्वोत्कृष्ट संगीतकार (सावरखेड एक
  गाव), संस्कृती कला दर्पण,
  २००५ सर्वोत्कृष्ट संगीतकार (अगं बाई
  अरेच्चा), माता
  सन्मान – सर्वोत्कृष्ट संगीतकार, २००९ (जोगवा),
  व्ही. शांताराम पुरस्कार २००९
  सर्वोत्कृष्ट संगीतकार (उलाढाल), राज्य
  पुरस्कार २००९
  सर्वोत्कृष्ट संगीतकार (जोगवा), आदी
  पुरस्कार मिळालेले आहेत, तर
  २०११ चा
  राम कदम
  पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. | 
| मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे
  त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी
  संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू
  शकत नाही?
  या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा
  मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे.
  अजय गोगावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर  | 
| आज लेखिका #पुपुल_जयकर
  यांचा स्मृतीदिन. | 
| जन्म. ११
  सप्टेंबर १९१५ | 
| पुपुल जयकर
  यांचे वडील
  सुरतचे विनायक एन. मेहता
  अलाहाबाद येथे
  आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल
  जयकर यांचे
  बरेचसे बालपण
  अलाहाबादमध्ये गेले.
  तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले.
  १९३० साली
  त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय
  झाला. लंडन
  विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी
  संपादन केल्यावर पुपुल जयकर
  यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज
  केला. तेव्हा आम्ही तुमचे
  लेख छापू,
  पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो
  असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल
  मेहता यांचे
  बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर
  यांच्याशी लग्न
  झाले. १९४१
  साली काँग्रेस पक्षात सामील
  झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता,
  युसुफ मेहेरअीली यांच्यांशी ओळख
  झाली. १९४८
  साली जे.
  कृष्णमूर्तींची भेट
  झाल्यावर जयकर
  यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला. पुपुल
  जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि
  जपान येथे
  झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या
  मुख्य सूत्रधार होत्या. त्या
  इंडियन नॅशनल
  ट्रस्ट फॉर
  आर्ट अंड
  कल्चरल हेरिटेज (इन्टॅक) या
  संस्थेच्याही अध्यक्ष होत्या. त्या
  भारतीय कला
  आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या. पुपुल जयकर
  यांचे २९
  मार्च १९९७
  रोजी निधन
  झाले. आपल्या समूहातर्फे पुपुल
  जयकर यांना
  आदरांजली. | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.#बारदेवधर यांचा
  जन्मदिन. | 
| जन्म.११
  सप्टेंबर १९०१ | 
| गुरुवर्य देवधर
  मास्तर ह्यांचे प्राथमिक शिक्षण मिरज येथे
  आणि त्या
  नंतरचे शालेय
  शिक्षण गिरगाव मुंबई येथील
  आर्यन एज्युकेशन ह्या शाळेत
  झाले  तदनंतर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेज मध्ये
  इतिहास आणि
  अर्थशास्त्र ह्या
  विषयांमध्ये झाले. | 
| वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांनी पं निळकंठबुवा जंगम ह्यांच्याकडे संगीत
  शिक्षण घेण्यास प्रारंभ केला.
  त्यानंतर सन
  १९१८ पासून
  त्यांनी गायनाचार्य पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांच्याकडे संगीत
  शिक्षण घेण्यास प्रारंभ केला.
  पं विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांनी हिंदुस्थानी संगीताच्या प्रचार प्रसाराचे कार्य हाती
  घेतले होते
  आणि त्या
  कामी त्यांचे शिष्य सुद्धा त्यांना मदत
  करत होते.
  परंतु पु
  ल देशपांडे म्हणाले ते
  अगदी खरे
  होते, ते
  म्हणाले होते
  की पं
  पलुस्कर ह्यांना जे कार्य
  अपेक्षित होते
  ते खऱ्या
  अर्थाने देवधर
  मास्तरांनीच केले...
  ह्या कार्याचा एक भाग
  म्हणून गुरूच्या आज्ञेवरून १९२५
  साली संगीत
  विद्यालयाची स्थापना केली. देवधर्स स्कूल ऑफ
  इंडियन म्युझिक ची हि
  वस्तू आजही
  ऑपेरा हाऊसच्या कोपऱ्यावर अस्तित्वात आहे आणि
  संगीत शिक्षण देण्याचं कार्य
  आजही ह्या
  वास्तू मध्ये
  चालू आहे. | 
| देवधर मास्तर हे त्या
  काळात सुशिक्षित आणि आधुनिक विचारसरणीचे मानले
  जायचे. त्यांचा पेहेरावसुद्धा सूट
  बूट आणि
  टाय असाच
  असायचा त्यामुळे त्यांना सुटाबुटातले गवई
  असे गमतीने म्हटले जायचे.
  अनेक घराण्यांच्या बंदिशींचा संग्रह करून
  त्यातील व्याकरण दुरुस्त करून
  त्यांची योग्य
  अशी संहिता बनवण्याचे काम
  केले. हे
  करत असताना त्यांना पाश्चात्य संगीताचे अजिबात वावडे नव्हते ... जवळ जवळ
  ५ वर्षे
  त्यांनी प्रो.
  स्क्रीन्झी ह्यांच्याकडे त्यांनी पाश्चात्य संगीताचे धडे घेतले.
  त्या नंतर
  वयाच्या साठीला आल्यावर त्यांनी अमेरिकेत काही
  वर्षे राहून
  प्रो. इंगम
  ह्यांच्याकडून आवाज
  साधना शास्त्राचे धडे घेतले....
  भारतातील आवाज
  साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चर चे
  ते आद्य
  प्रणेते आहेत
  .... त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले
  ... किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले
  संगीतकार आहेत.
  आशियाई तसेच
  युरोपिअन देशातील विश्वव संगीत
  संमेलनासाठी त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
  बनारस आणि
  वनस्थळी विश्ववं विद्यालयात कला
  विभागाचे अधिष्ठाता पद भूषविले. मुंबई विश्ववं विद्यालयात संगीत
  विभागाच्या स्थापनेत त्यांचा मोठा
  वाटा होता. | 
| गांधर्व महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमानुसार त्यांनी रागबोध नावाचे ६ भाग
  प्रकाशित केले
  ... गायनाचार्य पं
  विष्णू दिगम्बर पलुस्कर ह्यांचे चरित्र तसेच
  थोर संगीतकार आणि थोर
  संगीतकारांची परंपरा ह्या तीन
  पुस्तकांचे लिखाणही केले. त्यांच्या ह्या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कारही मिळाले. संगीत नाटक
  अकादमीची फेलोशिप , भारत सरकारद्वारे पद्मश्री आणि मध्य
  प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार हे मन
  सन्मान त्यांना मिळाले . | 
| अजून एक
  त्यांची विशेष
  ओळख म्हणजे पं कुमार
  गंधर्व ह्या
  महान गायकाचे ते गुरु
  ...जवळ जवळ
  १२ वर्ष
  आपल्या जवळ
  ठेवून त्यांनी आपल्या ह्या
  शिष्याला घडवले. | 
| प्रा.बा.र.देवधर
  यांचे १०
  मार्च १९९०
  रोजी निधन
  झाले.  | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ. इंटरनेट / संगीता गोगटे | 
| ही व माझ्या इतर
  पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर
  पाहू शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज नारद
  मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव
  स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी #नूतनपेंढारकर म्हणजेच #अनंतदामले यांचा
  जन्मदिन. | 
| जन्म. ११
  सप्टेंबर १९१५ | 
| अनंत दामले
  यांनी १९३०
  ते १९९०
  अशी जवळ-जवळ सहा
  दशके मराठी
  संगीत रंगभूमी आपल्या गायकीने व अभिनयाने ९२ नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका करीत समर्थपणे गाजविली.  आपल्या रंगभूमीवरील कारकिर्दीच्या काळात  अनंत
  दामले यांनी
  अनेक भूमिका वठविल्या, परंतु
  त्यांचा मुख्य
  लौकिक झाला
  तो नारदाच्या भूमिकेमुळे. 'नारद
  म्हणजे दामलेबुवा आणि दामलेबुवा म्हणजे नारद'
  असं समीकरणच होऊन बसलं.
  रंगभूमीवर ३०००
  पेक्षा ज्यास्तवेळा नारदाची भूमिका साकारण्याचा उच्चांक अनंत दामले
  यांनी केलेला होता. १९३९
  साली न.चि.केळकर
  अनंत दामले
  यांचे 'कृष्णार्जुन युद्ध'
  या नाटकाचा प्रयोग पहायला आले होते.
  त्यांना मनापासून असे वाटले
  की अनंत
  बापू पेंढारकरांसारखाच बोलतो
  व गातो.
  बापू पेंढारकर हे अनंत
  दामले यांचे
  गुरू होते.
  १९४० ला
  ऑपेरा हाऊसला 'सत्तेचे गुलाम'
  या नाटकाचा प्रयोग एका
  संस्थेच्या मदतीसाठी धर्मार्थ प्रयोग म्हणून लावला
  होता.अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते.
  या प्रयोगाच्या वेळी
  अ.ह.गद्रे यानी
  स्वा.सावरकरांच्या हस्ते
  अनंत दामले
  यांना "नूतन
  पेंढारकर"ही
  पदवी देऊ
  केली आणि
  सावरकर अनंत
  दामले यांच्या कानात हळूच
  म्हणालेही, "पदवी
  मिळविणे सोपे
  असते पण
  टिकविणे कठीण
  असते बर!".
  पुण्यातील 'भारत
  गायन समाज'
  हे अनंत
  दामले यांचे
  श्रद्धास्थान होते.  अनंत
  दामले यांनी
  सत्तेचे गुलाम,
  कृष्णार्जुन युद्ध,
  संगीत सौभद्र, संगीत शारदा
  संगीत संशयकल्लोळ संगीत पंढरपूर  रीती अशी
  प्रीतीची, संगीत
  मृच्छकटिक, सुवर्णतुला, शारदा अशा
  अनेक नाटकात कामे केली.
  अनंत दामले
  यांचे ९ ऑक्टोबर १९९९
  रोजी निधन
  झाले. | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज बॉलीवूड अभिनेत्री #ट्युलिप_जोशी चा
  वाढदिवस. | 
| जन्म.११
  सप्टेंबर १९७९ | 
| ट्युलिपचा जन्म
  गुजराती कुटुंबामध्ये झाला.
  जमनाबाई नरसी
  स्कूलमधून तिने
  आपले शालेय
  शिक्षण पूर्ण
  केले. त्यानंतर विवेक कॉलेजमध्ये ‘फूड सायन्स अॅण्ड केमिस्ट्री’मध्ये पदवीचे शिक्षण घेतले.
  तिने २०००
  मध्ये ‘मिस
  इंडिया’ स्पर्धेत सहभाग घेतला
  होता. पण
  ती ही
  स्पर्धा जिंकू
  शकली नव्हती. | 
| ट्युलिपने ‘मेरे
  यार की
  शादी है’
  या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. | 
| या चित्रपटातून तिला
  चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.
  ' मेरे यार
  की शादी
  है ' या
  चित्रपटात काम
  करण्याची संधी
  ट्युलिपला योगायोगानं मिळाली होती. | 
| चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा त्याच्या मित्राच्या लग्नात गेले
  होते. तिथे
  त्याने ट्युलिपला पाहिलं होतं.
  तिथेच त्याने ट्युलिपला मेरे
  यार की
  शादी हैसाठी ऑडिशन देण्याची ऑफर केली.
  त्यावेळी ट्युलिपला हिंदी तितकं
  नीट येत
  नव्हते. त्यानंतर तिने हिंदी
  धडे गिरविले आणि चित्रपटात काम केलं.
  या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप
  चांगला प्रतिसाद मिळाला.२००४
  मध्ये ट्युलिपला शाहिद कपूरसोबत ‘दिल मांगे
  मोर’मध्ये
  संधी मिळाली. पण हा
  सिनेमा इतका
  दणकून आपटला.
  ट्युलिप जवळपास २० चित्रपटात दिसली. पण
  आपली ओळख
  निर्माझ करू
  शकली नाही. | 
| ट्युलीपने ‘मातृभूमि’, ‘दिल मांगे
  मोर’, ‘धोखा’,
  ‘मिशन 90 डेज’,
  ‘कभी कहीं’,
  ‘सुपरस्टार’, ‘डैडी
  कूल’, ‘रनवे’
  सिनेमांमध्ये काम
  केले आहे.
  पण यातले
  अधिकतर चित्रपट हे फ्लॉपच होते. त्यामुळे अगदी थोड्याच कालावधीत तिचे
  बॉलिवूडमधील करिअर
  संपुष्टात आले.
  तिने हिंदी
  व्यतिरिक्त पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि तेलगू
  सिनेमांमध्ये काम
  केले आहे. | 
| सिनेसृष्टीत फार
  काही होत
  नाही असे
  दिसल्यावर तुलिप
  छोट्या पडद्याकडे वळली. ‘स्टार
  प्लस’वरील
  ‘एअरलाइन्स’ मालिकेत ती झळकली
  होती. पायलट
  होणं हे
  तिचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं असं
  तिने एका
  मुलाखतीत सांगितले होते. | 
| याच दरम्यान ट्युलिपचे कॅप्टन विनोद नायरवर प्रेम जडलं.
  विनोद प्रसिद्ध कादंबरीकार 'प्राइड ऑफ लॉयन्स'चे लेखक
  असून तो
  यशस्वी बिझनेसमॅनदेखील आहे.
  विनोद १९८९
  पासून १९९५
  पर्यंत भारतीय लष्करात होते.
  दोघे जवळपास ४ वर्षे
  लिव इन
  रिलेशीपमध्ये राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न
  केलं. २००७
  मध्ये त्यांनी ‘किमया’ ही
  ट्रेनिंग आणि
  मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी सुरू
  केली. ट्युलिप या कंपनीचा कार्यभार सांभाळते. मीडिया वृत्तानुसार, या
  कंपनीची किंमत
  साधारणपणे ६००
  कोटी रुपये
  आहे.  | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ.इंटरनेट | 
| ही व इतर पोस्ट
  माझ्या फेसबुक पेजवर पाहू
  शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज गायिका #अपर्णा_केळकर
  यांचा वाढदिवस. | 
| जन्म.११
  सप्टेंबर १९७२ | 
| अपर्णा केळकर
  या तरुण
  पिढीतील एक
  प्रतिभावान गायिका आहेत. त्यांनी आपला शास्त्रीय संगीतातील आपला
  प्रवास श्रीमती पोर्णिमा तळवलकर यांच्या आशीर्वादाने सुरू
  केला. त्यानंतर त्यांनी पद्मभूषण पं. सी
  आर व्यास
  यांच्याकडे शिक्षण घेतले.तसेच
  त्यांनी ज्येष्ठ हार्मोनियम वादक
  डॉ.अरविंद थत्ते आणि
  श्रीराम शिंत्रे  यांच्याकडे पण
  शिक्षण घेतले
  आहे. अपर्णा केळकर यांना
  वाढदिवसाच्या शुभेच्छा. | 
| https://www.youtube.com/watch?v=c6VVIAHgeZM | 
| https://www.youtube.com/watch?v=or1SbW_JhcM | 
| https://www.youtube.com/watch?v=Ul8faGCr5FI | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ. इंटरनेट | 
| ही व माझ्या इतर
  पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर
  पाहू शकता. | 
| आज ११
  सप्टेंबर | 
| आज अभिनेते #राजू_खेर
  यांचा वाढदिवस. | 
| जन्म.११
  सप्टेंबर १९५७
  काश्मीर येथे. | 
| अभिनेते अनुपम
  खेर यांचे
  लहान बंधू
  असलेले राजू
  खेर राजू
  खेर यांनी
  टीव्हीच्या दुनियेत आपला ठसा
  उमटवला आहे.
  राजू खेर
  एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहेत. मालिकांव्यतिरिक्त राजू
  खेर यांनी
  चित्रपटांमध्येही काम
  केले आहे.
  त्यांनी संस्कार, रेत का
  दरिया, मंजिलें, अभिलाषा या
  मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
  मालिकांव्यतिरिक्त राजू
  खेर यांनी
  चित्रपटांमध्येही काम
  केले आहे.
  राजू खेर
  यांनी १९८६
  मध्ये रीमा
  यांच्याशी लग्न
  केले आणि
  त्यांना वृंदा
  खेर आणि
  प्रणित खेर
  अशी दोन
  मुले आहेत. | 
| #संजीव_वेलणकर पुणे. | 
| ९४२२३०१७३३ | 
| संदर्भ. इंटरनेट | 
| ही व माझ्या इतर
  पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर
  पाहू शकता. | 
 
 
No comments:
Post a Comment