|
══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
|
शिक्षक विचार
मंच पुणे |
|
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक ,आज
कोरोना कहर
असल्याने सर्वच
आपण घरी
आहोत वर्ग
,शाळा बंद
आहेत पण
शिक्षण सुरू
आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर
मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे
त्याचे वाचन
करावे ही
विनंती .
________.
🌄 परिपाठ 🌄.
_________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके
संजय सर. 📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. |
|
आज दिनांक: ०७/०९/२०२१ वार: मंगळवार ,
महिना :भाद्रपद,शुक्लपक्ष.प्रतिपदा.
नक्षत्र :पूर्वा.
योग:साध्य, |
|
करण:किंस्तूघ्न.
सूर्योदय:०६.२५,सूर्यास्त:१८.४८. ■■■■■■■■■■■■■■. सुविचार:लहान
मुलांमध्ये आढळणारी चुकसवृत्ती म्हणजे ज्ञानाची भूक
होय ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
|
|
प्रतिज्ञा |
|
📜 भारताचे संविधान 📚. 🙏 प्रार्थना 🙏.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना🙏
"सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या
अभिवादना |
|
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना |
|
सुमनात तू,
गगनात तू |
|
तार्यांमध्ये फुलतोस तू |
|
सद्धर्म जे
जगतामध्ये |
|
त्यांच्या मध्ये
वसतोस तू |
|
चोहीकडे रूपें
तुझी जाणीव
ही माझ्या मना |
|
श्रमतोस तू
शेतांमध्ये |
|
तू राबसी
श्रमिकांसवे |
|
जे रंजले
अन् गांजले |
|
पुसतोस त्यांची आसवें |
|
स्वार्थाविना सेवा
जिथे, तेथे
तुझे पद
पावना |
|
न्यायार्थ जे
लढती रणीं |
|
तलवार तू
त्यांच्या करीं |
|
ध्येयार्थ जे
तमीं चालती |
|
तू दीप
त्यांच्या अंतरी |
|
ज्ञानार्थ जे
तपती मुनी,
होतोस त्या
तू साधना |
|
करुणाकरा, करुणा
तुझी |
|
असता मला
भय कोठले
? |
|
मार्गावरी पुढती
सदा |
|
पाहीन मी
तव पाउलें |
|
सृजनत्व या
हृदयामध्ये नित
जागवी भीतीविना" ◆=========◆========. |
|
आजची बोधकथा
👩💻 सोन्याची कुदळ
👨💻.
|
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
एका माणसाला दोन मुले
होती जेव्हा तो
म्हातारा झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि
म्हटले,'
आता माझे
वय झाले
आहे, देवाचे कधी मला
बोलावणे येईल
आणि मरण्यापूर्वी मी
तुम्हाला
काही सांगू
इच्छितो. पैसा
हा भांडणाचे मूळ आहे.
त्यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू
इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे.
तिला जितके
चालवाल तितके
सोने ती
उकरते. एकीकडे ही कुदळ
आहे आणि
दुसरीकडे सारे
धन-संपत्ती, तुम्ही
सांगा की
कोण काय
घेणार? मोठ्या मुलाने विचार
केली की
कुदळीला कोणी
चोरले तर
आपल्याकडे
काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपत्ती घ्यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला
की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ
घेतली. वडील
हरिद्वारला निघून
गेले. त्यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा
पाण्यासारखा पैसा खर्च
करायला सुरुवात केली आणि
काही काळानंतरच तो गरीब
झाला. इकडे
लहानमुलाने शेतात
जाऊन कुदळ
चालवणे सुरु
केले परंतू
त्यातून
मातीच निघाली. सोने नाही,
तो हैराण
झाला की
वडिलांनी आपल्याला खोटे
का सांगितले? मग त्याच्या
आत्म्याने म्हटले,''
नाही, वडील
खोटे बोलू
शकत नाहीत.
एक दिवस
कुदळ सोने
अवश्य देईल आणि
आपण श्रीमंत होऊ.'' असा
विचार करून
तो दररोज
शेतात कुदळ
चालवायचा. त्याने शेतात
पिकाची पेरणी
केली आणि
भरघोस पीक
आले. गावात
सर्वात जास्त पीक
त्याच्या शेतात
आले होते.
अशा प्रकारे कुदळीने वास्तवात सोने
दिले होते
आणि तो
श्रीमंत झाला.
|
|
तात्पर्य : संन्नतेची खरी चावी
परिश्रमात आहे.जो परिश्रम करत असतो
त्याच्या घरी
समृद्धी, सुख
आवश्य येते. |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼 💫 आव्हान द्यावया आम्हा
कुणाची छाती.
आव्हान द्यावया आम्हा कुणाची छाती |
|
दश दिशांत अमुच्या सामर्थ्याची ख्याती॥धृ॥ |
|
कैलासी अजुनी
जागा तांडव
राग |
|
सागरी धगधगे
वडवाग्नीची आग |
|
मंत्रात शांतिच्या इथे जागते
क्रांती॥१॥ |
|
नगराज हिमालय उन्नत अमुचा
माथा |
|
इतिहास गातसे
पुरुषार्थाची गाथा |
|
प्रसवते वीरता
कण कण
इथली माती॥२॥ |
|
आसेतु हिमचल
एक आमुचा
देश |
|
ही एक
संस्कृती एकच
दे संदेश |
|
भारतीय रुधिरें जडली अमुची
नाती॥३॥ |
|
सुकोमल आणि
कठिण वज्रही आम्ही |
|
खलसंहारस्तव होऊ
रुद्रहि आम्ही |
|
खड् गापरि
कणखर इथे
तृणांची पाती॥४॥ |
|
ही असे
अनादी अनंत
अमुची माता |
|
हो धन्य
वेदही हिचीच
महती गाता |
|
जगजननीची या
किर्ति देवही
गाती॥५॥
_________. |
|
🎰 दिनविशेष🎰.
_________ |
|
दिनविशेष : ७ सप्टेंबर : ब्राझिलचा स्वातंत्र्यदिन |
|
वेद दिन |
|
◆=========◆========. |
|
महत्त्वाच्या घटना: |
|
◆२००५ : इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. |
|
◆१९७९ : दिवाळखोरी टाळण्यासाठी ’ख्रायसलर कॉर्पोरेशन’ने
अमेरिकन सरकारकडे १ बिलियन डॉलर्सची मागणी
केली. |
|
◆१९७८ : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक
अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश. |
|
◆१९३१ : दुसर्या
गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. |
|
◆१९०६ : ’बँक ऑफ
इंडिया’ची
स्थापना झाली.
ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक
आहे. |
|
◆१८२२ : ब्राझिलला (पोर्तुगालपासुन) स्वातंत्र्य मिळाले. |
|
◆१८१४ : दुसर्या
बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने ’उंदेरी-खांदेरी’ किल्ल्यांचा ताबा
परत मिळवला. |
|
◆१६७९ : सिद्दी जौहर
आणि इंग्रजांचा मारा रोखत
मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक
मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला. |
|
जन्मदिवस / जयंती
/ वाढदिवस: |
|
◆१९४० : चंद्रकांत खोत
– लेखक व संपदक |
|
◆१९३४ : सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार |
|
◆१९३४ : बी. आर.
इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि
पटकथालेखक |
|
◆१९३३ : इला भट्ट
– मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका, वकील व
’सेवा’ [Self Employed Women's Association] या संस्थेच्या संस्थापिका |
|
◆१९२५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका |
|
◆१९१५ : डॉ. महेश्वर नियोग – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री (१९७४),
आसाम साहित्य परिषदेचे अध्यक्ष |
|
◆१९१२ : डेव्हिड पॅकार्ड – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक
संस्थापक |
|
◆१८४९ : बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक, ग्वाल्हेर गायकीचा महाराष्ट्रात प्रचार केला |
|
◆१८२२ : रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ
दाजी लाड
– प्राच्यविद्या पंडित,
पुरातत्त्वज्ञ, कर्ते
समाजसेवक आणि
कुशल धन्वतंरी, ग्रँट मेडिकल कॉलेजच्या पहिल्या तुकडीतील विद्यार्थी |
|
◆१७९१ : उमाजी नाईक
– पहिला क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक |
|
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
|
◆१९९७ : मुकूल आनंद
– तांत्रिक करामतीचे जादूगार म्हणून नाव कमावलेले हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक |
|
◆१९९४ : टेरेन्स यंग,
चिनी – इंग्लिश दिग्दर्शक आणि
पटकथाकार |
|
◆१९९१ : रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ
इंडिया’ चे
सहसंस्थापक |
|
◆१९७९ : जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे.
जी.‘ नवले
– भारतीय कसोटी
क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक |
|
◆१९५३ : भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ
’फुलारी’ ऊर्फ
’बी. रघुनाथ’ – लेखक व कवी |
|
|
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)७५०१पेक्षा जास्त लोकसंख्यासाठी सदस्यसंख्या किती
असते?
२)भारतातील व्याग्र प्रकल्प योजनेचे जनक
कोण?
३)भारतातील सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू आणि गुटखा
यांच्या सेवणावर बंदी करणारे पहिले राज्य
कोणते? |
|
उत्तरे:(१.सतरा,२.कैलास सांकला,३.महाराष्ट्र.)
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक
घडामोडी |
|
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
|
■ राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी तज्ञांची नियुक्ती |
|
■ बालभारतीने पाठ्यपुस्तकांचे वितरण
करण्याची मागणी |
|
■ नाशिक:विनाअनुदानित संस्थांचे ऑडिट करावे;विद्यार्थी पालकांनी मांडल्या व्यथा. |
|
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन
:.
घोडके संजय
सर. मो.९७३७१११२७७.
======★■◆ |
No comments:
Post a Comment