|
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
|
शिक्षक विचार मंच पुणे |
|
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा कांही प्रमाणात बंद आहेत पण शिक्षण सुरू
आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन
करावे ही विनंती .
________
🌄 _परिपाठ
🌄.
________ 📚 संकल्पना/संकलन ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ _श्री .घोडके संजय सर. 📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■ |
|
आज
दिनांक: ३१/०७/२०२१.
वार:शनिवार , महिना :आषाढ,कृष्णपक्ष
अष्टमी. नक्षत्र
:अश्विनी.
योग:शूल,करण: बालव
सूर्योदय:०६.१५,सूर्यास्त:०७.०१५. ■■■■■■■■■■■■■ |
|
सुविचार:सुविचार:कविता म्हणजे भावनांचे
चित्र!
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇨🇮 राष्ट्रगीत🇨🇮
|
|
प्रतिज्ञा |
|
📜 भारताचे
संविधान 📚. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏. ◆=========◆=======
🙏 सर्वेश्वरा,शिवसुंदरा🙏
●●●●●●●●●◆◆◆◆◆◆ |
|
सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार
या अभिवादना |
|
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या
ने जीवना |
|
सुमनात तू, गगनात
तू |
|
तार्यांमध्ये फुलतोस तू |
|
सद्धर्म जे जगतामध्ये |
|
त्यांच्या मध्ये वसतोस तू |
|
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना |
|
श्रमतोस तू शेतांमध्ये |
|
तू राबसी श्रमिकांसवे |
|
जे रंजले अन् गांजले |
|
पुसतोस त्यांची आसवें |
|
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे
तुझे पद पावना |
|
न्यायार्थ जे लढती रणीं |
|
तलवार तू त्यांच्या करीं |
|
ध्येयार्थ जे तमीं चालती |
|
तू दीप त्यांच्या अंतरी |
|
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस
त्या तू साधना |
|
करुणाकरा, करुणा
तुझी |
|
असता मला भय कोठले ? |
|
मार्गावरी पुढती सदा |
|
पाहीन मी तव पाउलें |
|
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी
भीतीविना"
|
|
═════ ♢.✰.♢ ═════ |
|
आजची बोधकथा |
|
🛑 सोन्याची
कुदळ🛑
|
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
एका माणसाला दोन मुले होती जेव्हा तो म्हातारा
झाला. तेव्हा त्याने आपल्या दोन्ही मुलांना बोलावले आणि म्हटले,' आता
माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्यापूर्वी
मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्यामुळे मी माझ्यासमोरच
पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके
चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्ही
सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी
चोरले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. त्यामुळे धन-संपत्ती घ्यायला पाहिजे.
लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्यायला पाहिजे.
अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील
हरिद्वारला निघून गेले. त्यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्यासारखा
पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे
लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्यातून मातीच निघाली. सोने
नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्याला खोटे का
सांगितले? मग त्याच्या आत्म्याने म्हटले,'' नाही, वडील
खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा
विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्याने शेतात पिकाची पेरणी केली आणि
भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्त पीक त्याच्या शेतात आले होते. अशा प्रकारे
कुदळीने वास्तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला. |
|
तात्पर्य :संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे
.जो परिश्रम करीत असतो त्याच्या घरी समृद्धी, सुख
अवश्य येते. |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━
◆
🎼 समूहगीत🎼
हिमालयाशी संगती नाते सह्यागिरीचे
कडे |
|
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती
चौघडे |
|
दगडांचा हा देश छाती दगडाची याची |
|
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबाची २ |
|
राष्ट्रधर्म हा एकाच नारा बुद्धी शक्तीच्या
पुढे |
|
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती
चौघडे |
|
गडागडावर कडयाकड्यांवर इतिहासाच्या खुणा |
|
मनामनांवर मंत्र घालूनी देत नव्या प्रेरणा २ |
|
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे २
|
|
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती
चौघडे |
|
संतांचा हा देश, सोयरा
पिडीत दु:खीतांचा |
|
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा २ |
|
तळपत राहील सदैव जोवरी चंद्र सूर्य हे खडे |
|
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती
चौघडे |
|
|
|
-विद्या बापट
________ 🎰 दिनविशेष🎰.
|
|
✧══════•❁❀❁•══════✧ |
|
छ. राजाराम महाराज जयंती -करवीर |
|
महत्त्वाच्या घटना: |
|
■१७०३ : डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध
वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी
मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला
दगडांऐवजी फुले मारली |
|
■१९१७ : पहिले महायुद्ध - य्प्रेसची तिसरी
लढाई |
|
■१९४८ : न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ
खुला. |
|
■१९५१ : जपान एरलाइन्सची स्थापना. |
|
■१९७१ : अपोलो १५च्या अंतराळवीरांनी चंद्रावर
पहिल्यांदा मानवनिर्मित बग्गी चालवली. |
|
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
|
●११४३:
निजो ,जपानी सम्राट . |
|
●१९४१:
अमरसिह चौधरी मा.मुख्यमंत्री (गुजरात) |
|
●१९८२:
ब्लेसिंग महविरे , झिम्बाब्वे क्रिकेट खेळाडू . |
|
●१८८०:
मुन्सी प्रेमचंद ,प्रसिध्द साहित्यिक. |
|
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतिदिन |
|
●१९८०:
मोहम्मद रफी, भारतीय गायक |
|
●१९९३:
बाँद्वा पहिला , बेल्जियमचा राजा . |
|
●१९६५:जगन्नाथ
उर्फ नाना शंकरशेट, जेष्ठ समाजसुधारक. |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~. १)भारताचे पंतप्रधान कोण आहेत?
२) 'जागतिक
मानवी दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
३)राम मंदिराची कुठे उभारणी करण्यात
येणार आहे?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 *ठळक
घडामोडी |
|
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬. |
|
■
लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका! |
|
■ दहावीच्या गुणपत्रिकांना ९ ऑगस्टचा
मुहूर्त-पुणे |
|
■ शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख कालवश- ११वेला आमदार होण्याचा विक्रम, भावपूर्ण
श्रद्धांजली!
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक
विचार मंच पुणे.
======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 |
No comments:
Post a Comment