नाविन्यपूर्ण उपक्रम

 

        नाविन्यपूर्ण उपक्रम

 

वर्ग 1, 2 , अप्रगत  विद्यार्थी व प्राथमिक वर्गासाठी* 

 

       

 

*नमस्कार सर्व विदयार्थी, पालक व शिक्षक मित्रांनो.* 

          *पुढील कृती व उपक्रम पालकांमार्फत विदयार्थ्यांपर्यंत पोहचवून मूलभूत वाचन व गणित संबोध उद्दिष्ट साठी  आनंददायी खेळ विदयार्थ्यांनी खेळायचे आहे.* 

 

         *खालील कृती वेगवेगळ्या विषयासाठी दिल्या  असल्या तरी त्यांचा आंतरसंबंध आहे.*

 

     

 

        *विषय -  मराठी*

 

       *भाषण - संभाषण* 

 

*🟣ओळख स्व:ची, कुटुंब, मित्र, परिसर  याविषयी माहिती  सांगणे.*

*🟣चित्रगप्पा*

१)चित्र सांगणे. 

२)चित्रातील कृती सांगणे. 

३) चित्रवर्णन करणे.

४)चित्रावरून गोष्ट सांगणे. 

५)चित्रमालिकेवरून गोष्ट सांगणे.

🟣गप्पा -

१) औपचारिक गप्पा उदा.( आठवडी बाजार ) विषय ठरवून मुलांशी गप्पा करणे.

२)अनौपचारिक गप्पा (विषय न ठरवता गप्पा) मुलांशी करणे.

 

*🟣संवाद, नाटुकली सादर करणे*

*🟣 प्रश्न विचारता येणे.*

*🟣मत व्यक्त करणे.*

 

*🟣घटनाक्रम सांगता येणे.उदा - चहा तयार करण्याचा घटनाक्रम* 

 

*🟣गोष्टी*

१)ऐकलेली गोष्ट सांगता येणे.

२) ससा - कासव सारखे शब्द देऊन त्यावर गोष्ट सांगता येणे.

३)अपूर्ण गोष्ट पूर्ण करा. 

४)अपूर्ण प्रसंग पूर्ण करा. 

*🟣गाणी*- ऐकून म्हणणे 

१) अक्षरांची पुनरावृत्ती होणारी गाणी.

२)यमक जुळणारी गाणी 

३) बडबड गिते 

 

*🟣पारंपारिक गाणी एकवीने व म्हणून घेणे*

१)भुलाबाई ची गाणी 

२)भजन

३)अभंग इ. 

 

*🟣खेळ--*

१)वन मिनिट शो (मुलाने एका परिचित विषयावर बोलणे)

२)शब्दभेंडया उदा - ब ध्वनी ने सूरु होणारे शब्द सांगा. सांगितलेले शब्द बोर्डवर लिहिणे. 

३)एक शब्द देऊन वाक्य मुलांनी सांगणे. 

४)थीम च्या संदर्भात शब्द लिहिणे. 

 

*🟣प्रश्न मंजुषा, विनोद कार्यक्रम घेणे*

*🟣चित्रवाचन* विदयार्थ्यांना वस्तू किंवा चित्र दाखवून 

१)एका वस्तूचे चित्र वाचन 

२)कृतीचे चित्र वाचन 

३)चित्रातील भावनांचे वाचन 

🟣मॅचिंग सेट -

सारखी चित्रे एकमेकावर ठेवणे. 

🟣चित्रगाडी (बाणानुसार चित्र जोडणे)

उदा -कुत्रा 🔜🐶मांजर 🔜🐱उंदीर 🐭🔜माकड 🐒😀

 

*🟣वलयांकित चित्रमय दिशादर्शक पट्टी वाचन(डावी कडून उजवीकडे बोटाने गिरवत वाचणे.*

 

उदा -🐱〰️〰️〰️〰️〰️🐭

अश्या चित्रमय पट्ट्या तयार करून वाचन सराव 

🟣पट्टीवरील चित्र वाचन(डावी कडून उजवी कडे )

उदा - हा 🐒 आहे. 

         हि 🐄आहे. 

 

*🟣चित्रातील वेगळा ओळखा.*

उदा -🐶🐱🐭🐒🦋

यात फुलपाखरू वेगळा आहे. 

 

*🟣चित्र साम्यभेद ओळखणे.*

जसे -वर्ग २ री पान न. १ वर 

 

*🟣चित्रवर्णन (मुल चित्र वर्णन करतात)*

 

*🟣चित्रगप्पा(मुले चित्र गप्पा करतात)*

 *🟣चित्र कथा सांगणे (चित्र निरीक्षण करून )*

 

        *विषय - गणित*

 

       *गणनपूर्व तयारी*

 

*🟢१ - एक अंक ओळख व लेखन सराव*

अंक ओळख देतांना -

१)एक बोट दाखवून 

२)एक वस्तू दाखवून 

३)एक चित्र दाखवून 

४)एक असा आवाज करून 

५)एक रुपयाचं नाणं वा नोट दाखवून 

६)हातात वस्तू घेऊन -आईने एक लाडू दिला अशा गोष्टी सांगण्यास मुलांना प्रोत्साहन देणे. 

७)एक अंक अंक व अक्षरात काढून 

८) एक उडी मार कृती करून 

९)स्पर्शाने ओळखणे खेळ घेऊन 

 

*🟢१ अंक गिरवणे व लेखन सराव*

*🟢२ - दोन अंक ओळख व लेखन वरील नऊ भाषा नुसार* 

*🟢३-तीन अंक ओळख व लेखन सराव वरील प्रमाणे.*

*🟢४- तीन अंक ओळख व लेखन*

*🟢५-पाच अंक ओळख व लेखन*

 

*🟢बेरीज :  + चिन्ह ओळख व क्रिया*

बेरीज म्हणजे -मिळविने, एकत्र करणे, टाकणे, गोळा करणे, ओतने इ. 

गोष्टीतून बेरीज करविने.

 

➕उदा - साहिलला बाबाने १लाडू दिले, आईने २ लाडू दिले, तर साहिल जवळ एकूण किती लाडू झाले? 

 

            १   लाडू बाबाने         

         + २  लाडू आईने 

          -------

            ३  एकूण लाडू 

 

असे उदाहरण लिहून गोष्टी सांगण्यास प्रोत्साहन द्यावे.

 

गोष्टी तयार करून सोडवून घेणे.

   २           ३           ४      १

+ २        + २       + १    +४

--------     --------    -------  -------

आडवी मांडणी  बेरीज सराव-

१+२= 

२+२=

२+३=

२+१=

३+२=

 

 *🟢बेरीज उदाहरण सराव घ्यावा.*      

 

  *🟢वजाबाकी : - चिन्ह ओळख व क्रिया*

 

वजा म्हणजे  - कमी, काढणे, फेकने, तुटणे, सडने, हरवने, देणे इ. 

 

गोष्टीतून संकल्पना स्पष्ट करणे. मुलांनी गोष्ट सांगणे. 

 

उदा - साहिलजवळ २ पेन्सिल होत्या, त्यातील १ हरवली, तर साहिल जवळ किती पेन्सिल राहिली ? 

उभी मांडणी -

     २ साहिल जवळ पेन्सिल 

-    १ पेन्सिल हरवली 

-------- 

    १    राहिली 

 

  ३      ४     ५         ४       ५

-१     - १     -१    -   २     -२  

------ ------ -------  -------  -------

 

आडवी मांडणी :

२-१=१

३-१=२

४-१=३

५-१=४

 

*🟢० ची ओळख मुलांना गोष्टीतून करविणे.* 

*🟢मुलांनी ० च्या गोष्टी सांगणे.*

 

उदा - जय जवळ १  पेन्सिल होती ती त्याने साहिलला दिली, तर आता जय जवळ पेन्सिल किती?  

१-१=                   १        २      ३

२-२=                -  १      - २     -३

३-३=               --------- ------    ------

४-४=

५-५=

 

     १ च्या गोष्टी तयार करणे. 

उदा -१+०=१        २-१=१    ३-२=१

 

मिश्र उदाहरणे -

२+१-२=१            ३+२-४=१

 

*यात आपणही भाषा, गणित पूर्व तयारी संबंधी आनंददायी पूरक कृती जोडणार आहातच.*

 

*✔️महत्वाचे ---*कृतीमधे परिपूर्णता येई पर्यंत कृती पून्हा पुन्हा करून घ्यायच्या आहेत.*

 

 

       

No comments:

Post a Comment