⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳📜 ९ सप्टेंबर इ.स.१६६२ महाराजांनी कुडाळ मोहीम हाती घेतली :-


 

🌻छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा 🌻:

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

 

📜 सप्टेंबर ..१६६२

देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन...

पण खुद्द बडी साहेबीण सुखरुप पोहचली...

याच वेळेला विजापूरची राणी बडी बेगम साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देशबांधवांची सुटका करणे इंग्रजांना शक्य नव्हते, परंतु तरी देखील त्यांनी आपल्या योजनेनुसार २१ जुलै १६६२ रोजी झालेल्या मीटिंगमध्ये पुढील ठराव केला:-

"कंपनीच्या नोकरांचा बंदीवास आणि त्यांच्या स्वतःच्या आमच्या मालकांच्या [म्हणजे कंपनीच्याच] दख्खनमधील मालमत्तेचे झालेले नुकसान या विषयांवर आम्ही विचार केला. शिवाजी आणि दख्खनचा बादशहा [ म्हणजे आदिलशहा ] या दोघांनाही पत्रे लिहून आम्ही कंपनीच्या नोकरांच्या सुटकेकरिता प्रयत्न केला. तरीही ते आता सतरा महिने बंधनात आहेत आणि मोठी खंडणी दिल्यावाचून त्यांच्या सुटकेची आशा नाही. सर्व वाजवी मार्गाचा यापूर्वीच अवलंब करण्यात आला आहे आणि त्यांचा उपयोग झालेला नाही म्हणून त्यांचे स्वातंत्र्य आणि त्यांची आमच्या मालकांची मालमत्ता बळाने परत मिळवणे योग्य आहे आणि ते आमचे कर्तव्य आहे असे आम्हास न्यायपणे वाटते.

त्याकरिता आम्ही या वेळी जमून आणि विचारविनिमय करून अशा निर्णयाला आलो की त्यांची [ म्हणजे शिवाजी महाराज आदिलशहा यांची ] जहाजे ती मोख्याहून परत येत असता पकडणे हा त्यांच्या [म्हणजे कैदेत असलेल्या इंग्रजांचा ] सुटकेचा सर्वात परिणामकारक व्यवहार्य उपाय आहे. कारण उपर्युक्त दोन्ही जहाजे [रॉयल वेलकम होपवेल ] त्या किनाऱ्यावर असतील अशी आम्हास अपेक्षा आहे. त्याकरिता आम्ही आता दोन तातडीची पत्रे आणि सोबत दोन्ही जहाजांच्या कमांडरांकरिता अशी अधिकारपत्रे पाठवली आहेत की त्यांनी ती मिळताच किंवा हवामान अनुकूल होताच बंदराबाहेर पडावे आणि , दख्खनची राणी [म्हणजे बडी साहेबीण ] मोख्याहून परतताना तिच्यावर छापा घालण्याकरिता , होपवेलने राजापूर खारेपाटण समोर रहावे आणि रॉयल वेल्कमने वेंगुर्ला , दाभोळ आसपासच्या बंदरासमोर राहावे. ती [ बडी साहेबीण ] राजापूर येथे उतरेल अशी अपेक्षा आहे. या कामगिरीकरीत त्यांना २० सप्टेंबरची मुदत घातली आहे .... त्यानंतर त्यांनी कारवारला परतायचे आहे."

याच दिवशी रॉयल वेलकम आणि होपवेल या जहाजांच्या कप्तानांसाठी अधिकारपत्र तयार करण्यात आले. त्याचा आशय पुढीलप्रमाणे होता :-

" दख्खनच्या कोणत्याही लोकांची - दख्खनच्या बादशहाची [ म्हणजे आदिलशहाची ] , शिवाजीची किंवा तेथील कोणत्याही व्यापाऱ्यांची जहाजे पकडावीत , दख्खनची राणी [ बडी साहेबीण ] या वर्षी मोखा येथून परत येईल अशी विश्वसनीय माहिती आहे आणि बहुधा ती वेंगुर्ला येथे येईल कारण ती तिथूनच निघाली होती. तिला पकडावे आणि योग्य त्या सन्मानाने वागवावे, पण ती निसटून जाऊ नये अशी दक्षता घ्यावी "

या आज्ञेनुसार निदान रॉयल वेलकम या जहाजाने तरी त्या किनाऱ्यावर थोडे दिवस पाळत ठेवली होती, पण दख्खनच्या किनाऱ्यावरील एखादे जहाजाची तिच्या हाती सापडले नाही ! खुद्द बडी साहेबीण सप्टेंबर १६६२ रोजी वेंगुर्ला येथे सुखरूप पोचली !

कालांतराने आदिलशहावर दडपण आणून इंग्रज कैद्यांची सुटका करता येणार नाही हे इंग्रजांच्या लक्षात आले असावे. ही गोष्ट १९ ऑगस्ट १६६२ रोजी सुरतहुन रायरीला कैदेत असलेल्या इंग्रजांना पाठवलेल्या पत्रातून लक्षात येते. कालांतराने १७ जानेवारी १६६३ रोजी या कैद्यांची रायरीच्या तुरुंगातून सुटका झाली आणि ते २९ जानेवारी १६६३ रोजी राजापूर येथे आले !

तर हा होता बडी साहेबीणीचे अपहरण करण्याचा इंग्रजांचा धाडसी प्लॅन ! हा प्लॅन यशस्वी झाला असता तर पुढे काय झाले असते याची कल्पना करणे कठीण आहे , परंतु आपल्या देशबांधवांचे मोल या इंग्रजांना केवढे होते हे मात्र यावरून लक्षात येते !

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 सप्टेंबर ..१६६७

( अश्विन शुद्ध द्वितीया, शके १५८९, संवत्सर प्लवंग, सोमवार )

 

महाराजांनी कुडाळ मोहीम हाती घेतली :-

          हिंदवी स्वराज्याची हद्द पोर्तुगीज प्रदेशाला भिडली होती. त्यामुळे स्वाभाविकच पोर्तुगीजांचे धार्मिक जुलमांचे तीव्र प्रतिसाद या सरहद्दीमधील भागात उमटू लागले. त्याच पोर्तुगीजांना कायमचा धडा शिकवण्याची आवश्यकता आता प्रकर्षाने जाणवू लागली होती. तसा निश्चय करूनच महाराज रायगडावरुन कुडळाला निघाले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 स्पटेंबर ..१६७१

( भाद्रपद वद्य प्रतिपदा, शके १५९३, संवत्सर विरोधकृत, शनिवार )

 

इंग्रजांना शिवरायांची भीती : इंग्रजांच्या मुंबई येथील गव्हर्नरने मोठ्या साहेबाला पत्र लिहून कळवले की, 'शिवाजीमहाराजांच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार असणे. त्यामुळे आणखी कुमक पाठवावी' अशी विनंती केली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 सप्टेंबर ..१६७९

ह्युजेस ने सप्टेंबर रोजी मुंबईला संदेश रवाना केला कळवले की मराठे खांदेरीला तट उभारत असून ते तोफगाडेही तयार करताना दिसत आहेत. त्यांनी बेटावर आतील बाजूस काही खोपटी बांधली आहेत विविध ठिकाणी आडोसेही तयार केले आहेत. ह्यादरम्यान मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून हा प्रयत्न मोडून काढावा बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारीरिवेंजनामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 सप्टेंबर ..१६८६

औरंगजेब बादशहाने अखेर आदिलशाही संपवली.

जी भूमिका . . १६६५, ते . . १६६६, मध्ये शिवरायांनी घेतली. त्यानुसार अदिलशाही, मराठे, निजामशाही एकत्र येऊन मोगलशाही संपवून टाकावी. त्यास मात्र, अदिलशाहीने निजामशाहीने विरोध दर्शविला... तीच अदिलशाही औरंगजेबाने अश्विन शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, गुरूवार, म्हणजेच आजच्या दिवशी सप्टेंबर ..१६८६ मध्ये नेस्तनाबूत करून टाकली. औरंगजेब मराठेशाही आणि मराठा साम्राज्य कधिच संपवू शकला नाही. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर अखंड २७, सत्तावीस वर्षे मराठ्यांचा यल्गार अग्निप्रमाणे प्रखर होत गेला अखेर औरंगजेबास खुलताबाद येथे म्रुत्यूनंतर गाडले गेले. मराठ्यांच्या चिवट संघर्षाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच खणली गेली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

  सप्टेंबर ..१६९५

 चंदन वंदन जवळ औरंगजेबाचा सरदार हमीदुद्दीनखान याने संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांचा पराभव केला. ह्या लढाईत धनाजी जाधवांचा मुलगा मारला गेला. लढाई करून तिकडून हमीदुद्दीनखान तसाच आपल्या फौजेसहित औरंगजेबाच्या छावणीत हजर झाला तेंव्हा औरंगजेब बादशाह खुश होऊन म्हणाला, "आफरीन बाद, आफरीन बाद , गनीमरा खूब तंबी नमुदा."म्हणजे 'धन्य धन्य तुझी गनिमांना चांगले खडे चारलेस.'

औरंगजेब बादशहाने खुश होऊन हमीदुद्दीनखानाला तलवार भेट केली.

पण असे भाग्य औरंगजेबाला फारच क्वचितच मिळे. तसेही विव्हळत विव्हळत हाय-हाय.. औरंगजेब तर रोजच म्हणत असे. हमीदुद्दीनखानसारखे यशस्वी लोक औरंगजेबाजवळ फारच थोडे होते. बाकी जिथे तिथे मुघलांची हमखास फजिती आणि पराभव होत असत आणि औरंगजेबाला ह्यामुळे अत्यंत कष्ट होत असे. औरंगजेबाच्या मनोधैर्याला आणि मनः स्वास्थाला सर्वात जबरदस्त सुरुंग लावला तो संताजी घोरपडे यांनी. मदोन्मत्त हत्तीच्या शुंडा-दंडाच्या आघाताने मोठं मोठे महावृक्ष उन्मळून पडावेत तसे मी मी म्हणणारे मुघलांचे एकाहून एक शूर धुरंधर सेनानायक संताजींच्या तडाख्यापुढे वेगाने भुईसपाट होत होते. संताजींनी ऑगस्ट महिन्याच्या धो-धो पडणाऱ्या पावसात औरंगजेबाच्या कोरेगावच्या छावणीवर रात्री छापा घालून खुद्द औरंगजेबाच्या तंबुचेच सोन्याचे कळस कापून जेंव्हा आणले होते तेंव्हाच औरंगजेबाला हा संताजी काय भयंकर शूरवीर आहे ह्याचा साक्षात्कार झालेला होता. साताऱ्याच्या उघड्या मैदानात संताजींनी सर्जाखानाला जिंकले होते. कर्नाटकाच्या सरहद्दीवरील बिदनूरच्या राणीचे राज्य धुळीला मिळविण्याची औरंगजेबाची महत्वकांक्षा पूर्ण करण्यास गेलेल्या जाननिसारखान आणि तुहब्बर खान यांचा दारुण पराभव करून संताजींनी औरंगजेबाच्या महत्वकांक्षेलाच मूठमाती दिली होती. संताजींनी मायणी खटावला असलेल्या लुफतुल्लाखानाला मुसळधार कोसळणाऱ्या पावसात गाठून बंदुकीच्या गोळ्यांच्या तुफान वर्षावाचा मारा करत नेस्तनाबूत केले होते. तसेच जिंजीला जाऊन झुल्फीकारखानालाही झोडपून काढले होते. संताजींनी अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 सप्टेंबर ..१९४२

शिरिषकुमार मेहता, लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा बलिदान दिन

"मुलींवर काय गोळ्या झाडता?? हा मी उभा आहे समोर...हिंमत असेल माझ्यावर झाडा गोळ्या...वंदे मातरम् ..!" - हुतात्मा शिरिषकुमार

इयत्ता आठवीत शिकणारा तो मुलगा आपल्या मित्रांसह इंग्रज शिपायांना आव्हान देत होता. सप्टेंबर १९४२ चा तो दिवस. हातात झेंडा घेऊन काही शाळेतल्या मुलांनी प्रभातफेरी काढली होती. भारतमातेचा जयघोष करत हातात झेंडा घेऊन शिरिषकुमार मेहता अग्रभागी होता. त्याच्यासोबत त्याचे मित्र लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हेही होते.  नंदुरबार शहराच्या एका चौकात पोलिसांनी त्यांना अडवले प्रभातफेरी थांबवण्याचा आदेश दिला.

 

तरीही मुलं ऐकत नाही हे पाहून एका पोलीस अधिकाऱ्याने मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा या कोवळ्या शिरीषने त्याला आव्हान दिले, "गोळी मारायचीय तर मला मार.!" संतापलेल्या अधिकाऱ्याने गोळीबार सुरू केला आणि एका मागे एक ०३ गोळ्या शिरीषकुमारने आपल्या छातीवर झेलल्या. त्याच्यासोबत त्याचे चार मित्रही हुतात्मा झाले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

आजचेऐतिहासिकदिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#९सप्टेंबर१६६७

छत्रपती शिवराय रायगडहून कुडाळला रवाना झाले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#९सप्टेंबर१६७१

इंग्रजाच्या मुंबई येथील गव्हर्नरने त्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला लिहीलेल्या पत्रात तो म्हणतो की, "शिवाजीराजांच्या हाती खांदेरी असणे म्हणजे मुंबईवर टांगती तलवार आहे".

"khanderi in the hands of shivaji is a dagger pointed at the heart" (Mumbai)"

काही महत्वाच्या घडामोडी 👇

२८ नोव्हेंबर १६७० रोजी ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची शिवरायांकडून दिवस पाहणी झाली होती. खांदेरी बेत पूर्णपणे ताब्यात घेऊन पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#९सप्टेंबर१६७९

ह्युजेस ने सप्टेंबर रोजी मुंबईला संदेश रवाना केला कळवले की मराठे खांदेरीला तट उभारत असून ते तोफगाडेही तयार करताना दिसत आहेत. त्यांनी बेटावर आतील बाजूस काही खोपटी बांधली आहेत विविध ठिकाणी आडोसेही तयार केले आहेत. ह्यादरम्यान मुंबईकरांना त्यांच्या सुरतेतील मुख्यालयाकडून हा प्रयत्न मोडून काढावा बेट ताब्यात घ्यावे असा स्पष्ट आदेश आला त्याप्रमाणे आता मुंबईकरांनी १६ तोफा असणारीरिवेंजनामक फ्रिगेट कॅप्टन विल्यम मिन्चीनच्या अधिपत्याखाली खांदेरीस रवाना केली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#९सप्टेंबर१६८६

औरंगजेब बादशहाने अखेर आदिलशाही संपवली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#९सप्टेंबर१६९५

चंदन वंदन जवळ औरंगजेबाचा सरदार हमीदुद्दीनखान याने संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव ह्यांचा पराभव केला.

ह्या लढाईत धनाजी जाधवांचा मुलगा मारला गेला. लढाई करून तिकडून हमीदुद्दीनखान तसाच आपल्या फौजेसहित औरंगजेबाच्या छावणीत हजर झाला तेंव्हा औरंगजेब बादशाह खुश होऊन म्हणाला, "आफरीन बाद, आफरीन बाद , गनीमरा खूब तंबी नमुदा."

म्हणजे 'धन्य धन्य तुझी गनिमांना चांगले खडे चारलेस.'

औरंगजेबाने खुश होऊन हमीदुद्दीनखानाला तलवार भेट केली. पण असे भाग्य औरंगजेबाला फारच क्वचितच मिळे.

तसेही विव्हळत विव्हळत हाय-हाय..औरंगजेब तर रोजच म्हणत असे.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

No comments:

Post a Comment