७ सप्टेंबर - दिनविशेष & स्मृतिदिन

 

************

सप्टेंबर

बॅंक ऑफ इंडिया स्थापना दिन

************

 

स्थापना - सप्टेंबर १९०६

 

 

रामनाराईन रुईया हे बँक ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत.

 

बॅंक ऑफ इंडिया हि एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बॅंकेची स्थापना  सप्टेंबर १९०६ रोजी मुंबईतील नामवंत उद्योजकांच्या गटाने केली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. जुलै १९६९ पर्यंत बँक अन्य १३ बँकासह राष्ट्रीयीकृत होते तेव्हा पर्यंत बँक खासगी मालकी आणि नियंत्रणाखाली होती.

 

मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्लेक्स मध्ये मुख्यालय असलेल्या या बॅंकेच्या २०१७ च्या सुरुवातीस ५१०० शाखा होत्या. यांपैकी ५६ शाखा भारत बाहेरच्या शाखा, पाच प्रतिनिधी कार्यालये आणि पाच उपकंपन्यांचा समावेश आहे.

 

बॅंक ऑफ इंडिया 'स्विफ्टया आर्थिक देवाणघेवाण प्रणालीची स्थापक सदस्य आहे.

 

उद्योगांच्या उत्पादन आणि प्रक्रियेद्वारे औद्योगिक उत्पादन आणि मूल्यनिर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी बँक ऑफ इंडियाचे स्थापना केली गेली. औद्योगिक क्षेत्राला वित्त तसेच व्यवसाय सहाय्य सेवा पुरविणे हे BOI चे उद्दिष्ट आहे.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

क्रांतिकारक उमाजी नाईक जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १७९१

स्मृती - फेब्रुवारी १८३२

 

भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले. अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला. तो म्हणजे 'उमाजी नाईक'.

 

फेब्रुवारीहा या आद्यक्रांतीकाराचा स्मृतिदिन. रामोशी बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. उमाजी नाइक फक्त रामोशी बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.

 

क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले पाहिजे. मग ते कोणत्या का जातीचे धर्माचे असेनात. मग हे उमाजी नाइक असे उपेक्षीत का राहून गेले हे समजेनासे झाले आहे. तसे पाहण्यास गेले तर या क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही खूप कमी आहे. त्यामुळेच ते उपेक्षीत राहिले असावेत.

 

'मरावे परि क्रांतीरूपे उरावे' अशी उक्ती आहे. ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?

 

तर टोस म्हणतो, उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे. जर इंग्रजांनी कुटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.

 

नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई दादोजी खोमणे यांच्या पोटी सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली.

 

उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचपुरा, करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली होती. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुऱ्हाडी, तीरकामठी, गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख ही जिंकत पुणे ताब्यात घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले. आणि त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.

 

सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोलसकर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरी च्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.

 

इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर तो भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला १८१८ ला एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले, आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या कारवाया आणखी वाढल्या.

 

उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने इंग्रज सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत. एका टोळीत जवळ जवळ हजार सैन्य होते.

 

१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले कि, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते, आणि काहीचे प्राण घेतले होते.

 

१६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते, इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये. तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता.

 

तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले. आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. मोठे सावकार, वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली. उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाण ही फितूर झाला आणि त्यांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.

 

१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. आणि पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले. अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली.

 

नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.

 

अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८५७ चे बंड सुरु केले. त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.

 

Post By...

आम्हीच ते वेडे शिवरायांचे

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

************

************

सप्टेंबर

समाजसेवक भाऊ दाजी लाड जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १८२२ (गोवा)

स्मृती - ३१ मे १८७४

 

महाराष्ट्रातील प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड यांचा जन्म सप्टेंबर १८२२ गोव्यातील मांजरे या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडिलांना दाजी म्हणत.

 

भाऊ दाजी लाड मित्र परिवारातभाऊया नावाने परिचित होते. त्यामुळे पुढेभाऊ दाजीहे नाव रूढ झाले. त्यांचे वडील पार्से  (गोवा) येथे शेती तसंच कारकुनीचे काम करायचे. व्यवसायानिमित्त १८३२ मध्ये लाड कुटुंब मुंबईला गेले. तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत.

 

भाऊ दाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खासगीरीत्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली. या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल द्वारकानाथ हे दोन मुलगे होते. द्वारकानाथ याचे तारुण्यातच निधन पावला. वडिलांनी संन्यास घेऊन एलिफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.

 

भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंध स्पर्धेत त्यांना ६०० रुपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उधृत केला आहे.

 

मुंबईत १८४५ मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळवली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (१८५१). कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यांमुळे त्यांना लोकप्रियता लाभली पैसाही मिळू लागला.

 

त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. पुढे दादाभाई नैरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. १८५४ मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.

 

जुन्या रूढी परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंटस लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालवल्या जात. विधवा विवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.

 

लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढेभाऊ दाजी गर्ल्स स्कूलहे नाव देण्यात आले. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रद्धेला फाटा द्यावा या मताचे ते होते. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली. वनस्पती प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणी बाग (जिजामाता बाग), अल्बर्ट म्युझियम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इन्स्टिटय़ूट . संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते.

 

जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. कारण ही वास्तू उभारण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली होती. त्यांच्या या योगदानाची दखल म्हणून त्या संग्रहालयाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे.

 

भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मीळ चित्रं, नाणी, ताम्रपट, शस्त्रे . वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, हेमचंद्र . व्यक्तींचे तसेच कालिदासांचा कालनिर्णय आणि शिलालेख ताम्रपट यावरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्युलर रा.गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोउद्गार काढले आहेत.

 

कालिदासाचे कुमारसंभव मेरुतुंगाचार्याचा प्रबंध, चिंतामणी हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिद्ध केले. तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊ दाजी या शीर्षकाने त्र्यं.गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिद्ध केले. मुंबईचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या भाऊ दाजी संग्रहालयाचीन्यूयॉर्क टाइम्सने घेतली होती.

 

पर्यटकांच्या दृष्टीने मुंबईमधील महत्त्वाच्या ठिकाणांच्या यादीमध्ये पहिल्या पाचमध्ये डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाचा समावेश न्यूयॉर्क टाइम्सने केला आहे. भाऊ दाजी लाड यांच्या  स्मरणार्थ संस्कृत विषयात बी.. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.

 

भाऊ दाजी लाड यांचे ३१ मे १८७४ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/प्रहार

 

************

************

सप्टेंबर

गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १८४९ (मिरज)

स्मृती - फेब्रुवारी १९२७

 

हिंदुस्थानी संगीतपरंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म सप्टेंबर १८४९ रोजी मिरज जवळील बेगड येथे झाला.

 

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे घराणे भिक्षुकांचे. त्यांचे वडील रामभट, यांनी भिक्षुकी सोडून साताऱ्याचे बाळाजीबुवा यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. आपल्या मुलानेही गाणे शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले.

 

बाळकृष्णाला भिक्षुकीची गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी तो वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडला. पुढे वडीलही वारले. फिरत फिरत तो धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिला. तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे बाळकृष्ण धार सोडून गाणे शिकण्यासाठी ग्वाल्हेरला गेला. तेथील हस्सूखाँचे शिष्य वासुदेवराव जोशी यांच्याकडे तो गायन शिकण्यास गेला. प्रथम वासुदेवबुवांनी गाणे शिकवण्यास नकार दिला. पण पुढे एक वर्षाने बनारस येथे त्यांनी बाळकृष्णबुवांना शिकविण्याचे कबूल करून, पुढे सहा वर्षे चांगले शिक्षण दिले.

 

बाळकृष्णबुवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आले. श्रीमंत बाबासाहेब घोपरडे, इचलकरंजीकर यांच्याकडे जवळजवळ ३० वर्षे दरबार-गवई म्हणून राहिले. पं.बाळकृष्णबुवा अत्यंत भरतीदार यशस्वी गायक होते. त्यांची गायकी साधी, निर्मळ, भारदस्त सौंदर्यपूर्ण होती. खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार महाराष्ट्रात बाळकृष्णबुवांनीच केला. मिरज आणि इचलकरंजी येथे त्यांचेकडे पुष्कळ लोक शिकू लागले. बाळकृष्णबुवांच्या आधीही महाराष्ट्रात ख्याल गायकी रूढ होतीच; पण तिच्या विस्तृत प्रमाणावरील प्रसाराचे श्रेय बाळकृष्णबुवांनाच दिले जाते. त्यांच्या दोन शिष्य-शाखा सर्वश्रुत आहेत. पहिल्या शाखेत पं.विष्णू दिगंबर पलुस्कर त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातून शिकून तयार झालेले विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, वामनराव पाध्ये, प्रा. बा.. देवधर . नामवंत गवयांचा समावेश होतो; तर दुसऱ्या शाखेत मिराशीबुवा, अनंत मनोहर जोशी, त्यांचे चिरंजीव गजाननराव, तसेच शिष्य बापूराव गोखले त्यांचे शिष्य राजारामबुवा पराडकर . प्रसिद्ध गवयांचा अंतर्भाव होतो.

 

१९२५ मध्ये त्यांचे चिरंजीव तरुण, सिद्धहस्त गायक अण्णाबुवा मृत्यू पावले, या घटनेचा त्यांच्यावर जबरदस्त आघात होऊन पं.बाळकृष्णबुवा हे इचलकरंजी येथे मृत्यू पावले. संगीतातीलभीष्माचार्य’, ‘गायनाचार्यह्या पदव्या रसिकांनी त्यांना स्वेच्छेने बहाल केल्या होत्या.

 

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे फेब्रुवारी १९२७ रोजी निधन झाले.

 

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

डॉ. भालचंद्र बाबाजी दिक्षीत जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९०२ (अमरावती)

स्मृती - १९९७

 

भालचंद्र बाबाजी दीक्षित यांचा जन्म अमरावती येथे झाला. ते पुढे फिजिओलॉजिस्ट, फार्माकॉलॉजिस्ट, उत्तम शिक्षक आणि शिस्तप्रिय अनुशासक म्हणून नावाजले गेले. घरची वकिली करण्याची परंपरा सोडून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यामुळेच स्वतंत्र भारतात वैद्यकीय शिक्षणाचा मजबूत पाया उभारला गेला.

 

डॉ.दीक्षित यांनी १९२५ साली मुंबईस्थित ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालयामधून एम.बी.बी.एस. पदवी मिळविली. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत त्यांच्या आयुष्याचे ठळक दोन टप्पे दिसून येतात. पहिली वीस वर्षे एक उत्तम शास्त्रज्ञ, तर नंतरची वीस वर्षे एक उत्तम मानवतावादी, प्रेमळ, विद्यार्थिप्रिय शिक्षक आणि अनुशासक म्हणून ते नावाजले गेले.

 

डॉ. दीक्षितांच्या संशोधनाची सुरुवात १९२६ साली कोलकाता येथीलस्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीनयेथे झाली. तेथे त्यांनी प्रा.चोप्रा यांच्या बरोबर संशोधनात भाग घेऊन मलेरियाविरोधीसुडोएफेडिनया औषधाचे हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेवरील परिणामाचे मूलभूत तत्त्व शोधून काढले. ही औषधी भारतात मिळणाऱ्या एफेडा या वनस्पतीपासून मिळविली होती, हे या संशोधनाचे वैशिष्ट्य होय. तसेच, मॉर्फिन ऐवजी नारकोटीन हेही तेवढेच उपयुक्त आणि निर्धोक आहे हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर वरील सर्व संशोधन त्यांनी अवघ्या तीन वर्षांत पूर्ण तर केलेच, शिवाय १९२७ सालीडिप्लोमा इन पब्लिक हेल्थहा अभ्यासक्रम पूर्ण केला.

 

१९३० साली त्यांची नेमणूक विशाखापट्टणम येथील वैद्यकीय महाविद्यालयातफार्माकॉलॉजीचे प्राध्यापक म्हणून झाली. तेथे त्यांनी चौलमुग्रा तेलातील कुष्ठरोग विरोधी घटक सर्वांत प्रथम शोधून काढले. तसेच, संशोधन करूनपर्टेननावाचे औषध मज्जारज्जूंमध्ये भूल देण्यासाठी निर्धोक परिणामकारक आहे हे सप्रयोग दाखवून दिले. परंतु १९३१ साली चेन्नई विभागाचे मूळ रहिवासी नसल्याच्या क्षुल्लक कारणामुळे त्यांना नोकरीस मुकावे लागले.

 

१९३१ सालीरॉयल कॉलेज ऑफ सर्जन्सया संस्थेचे सभासदत्व मिळवण्यासाठी ते एडिंबरोला गेले. तेथे ते प्रा.क्लार्क यांच्याकडे फार्माकॉलॉजी विभागात रुजू झाले. बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व यांच्या बळावर त्यांची नेमणूक शरीरविज्ञानशास्त्र विभागात सहाय्यक पदावर झाली. सततच्या अभ्यासू वृत्तीमुळे डॉ.दीक्षितांनी १९३३ साली एम.आर.सी.पी. नि नंतर पीएच.डी. संपादन केली.

 

एडिंबरोला डॉ.दीक्षितांनीअसेटायिल कोलीनया मज्जातंतूवरील संदेशवाहकावर जे संशोधन केले, त्याचे महत्त्व आजतागायत अबाधित आहे. त्यामुळे ते एकअभिजात संशोधनगणले जाते. आपले संशोधन सतत चालू ठेवून त्यांनी हृदयाची अनियमितता हायपोथॅलॅमस ग्रंथीचा परस्पर संबंध अभ्यासला. कॅफीनचे आणि बारबिटोनचे हृदयाच्या अनियमितते वरील परिणाम सिद्ध केले.

 

डॉ.दीक्षित १९३४ साली भारतात परतले. येथे आल्यावर त्यांची नेमणूक मुंबई येथीलहाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये झाली. तेथे त्यांनी आपले ॅसेटायिल कोलीनवरचे संशोधन चालू ठेवले, तसेच मलेरिया प्लेग या रोगांवरील औषधांचे संशोधन केले. हाफकिन इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी सर्पविषाचा अभ्यास करण्यासाठी एका सर्पालयाची स्थापना केली.

 

१९४६ साली तरुणवयात त्यांची नेमणूक पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि शरीररसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदी झाली. तेथे त्यांच्यापुढे वैद्यकीय पदवीसाठी अभ्यासक्रम, आराखडा तयार करण्याचे आव्हान होते. १९५१ साली त्यांच्यावर राज्यातील वैद्यकीय शिक्षण आरोग्य सेवेची जबाबदारी टाकण्यात आली. त्यांची मुंबई राज्याचेसर्जन जनरलम्हणून नेमणूक झाली.

 

१९५६ साली भारत सरकारने अत्युत्तम वैद्यकीय सेवा, उत्तम वैद्यकीय शिक्षक आणि संशोधक देशात निर्माण करण्यासाठी दिल्ली येथे एक संस्था स्थापन करण्याचे ठरविले. त्या संस्थेच्या पहिल्याच संचालकपदासाठी डॉ.दीक्षितांना आमंत्रित करण्यात आले, ती संस्था म्हणजेऑल इंडिया इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (AIIMS) होय.

 

डॉ. दीक्षितांपुढे देशाची गरज ओळखून अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण सेवा देण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले. त्याचा डॉ.दीक्षितांनी योग्य उपयोग करून AIIMS ला अत्युच्च दर्जा प्राप्त करून दिला. डॉ.दीक्षितांच्या अथक प्रयत्नांनी आणि यशस्वी पुढाकारामुळे जगाच्या विविध भागांत कार्यरत असणारे वैद्यकीय संशोधक या नावीन्यपूर्ण संस्थेसाठी एकत्र आले आणि AIIMS (एम्स) ही संस्था अत्युत्तम बनविण्याच्या कामी रुजू झाले.

 

डॉ. दीक्षितांनी प्रशासक म्हणून एक उत्तम स्वच्छ प्रतिमा निर्माण केली. त्यांनी कोणत्याही अतिरिक्त बेकायदेशीर व्यवहाराला मज्जाव केला. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन योग्य आणि समाधान कारक मार्ग काढताना ते कोणाचाही मुलाहिजा बाळगत नसत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या कार्यपद्धतीत ते अत्यंत परखडपणे आणि थोडक्यात शेरे अथवा सूचना फाइलीवर देत असत. ते एखाद्या केसच्या, घटनेच्या संदर्भात जे काय सत्य असेल, ते त्याच्या तोंडावर सांगत आणि तोच शेरा फाईलवर लिहीत. एखाद्याने चूक केल्यास ते रागावून ओरडत; पण क्षणार्धात त्यांचा राग निवळत असे.

 

प्रत्येक घटना, प्रत्येक फाईल ते स्वत:च्या पद्धतीने नव्याने, निरपेक्षपणे बघत. त्यावर मागील घटनांचा परिणाम होऊ देत नसत. त्यामुळे ते न्यायी प्रशासक म्हणून गणले जात. त्यांचे निर्णय व्यक्तिनिष्ठ नसून तत्त्वनिष्ठ असत; त्याचमुळे एखाद्याचे मागणे त्यांनी अमान्य केले, तरी त्याच्या मताचा आदर आणि मान ते ठेवत असत.

 

विषयाचे सखोल ज्ञान, प्रायोगिक कौशल्य, शिकवण्याची असामान्य हातोटी, खेळाविषयी आत्यंतिक प्रेम त्यामुळे ते युवाविद्यार्थ्यांसह सर्वत्र लोकप्रिय होते. ते विद्यापीठीय स्तरावरचे हॉकी, टेनिस आणि बॅडमिंटन खेळाडू होते. त्यांना परदेशातून निरनिराळी आमंत्रणे येऊनही ती नाकारून, ते आपल्या देशाला कार्यभूमी मानून, शेवट पर्यंत देशसेवा करत राहिले.

 

~ मृणालिनी साठे ~

 

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

सप्टेंबर

डॉ. बानू कोयाजी जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९१७

स्मृती - १५ जुलै २००४ (पुणे)

 

महिला आणि बाल आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. बानू कोयाजी यांचा जन्म सप्टेंबर १९१७ रोजी झाला.

 

डॉ. बानू कोयाजी केईएम हॉस्पिटल आणिसकाळच्या संचालक राहिल्या होत्या. बानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानू कोयाजी या १९४६ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रँट मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेज मध्ये व्याख्याता म्हणून काम केले. बानूबाई स्त्रीरोग आणि प्रसुतिशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.

 

बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची बानूबाईंना जाणीव झाली. आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत.

 

भारतीय समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतितज्ज्ञांची गरज आहे, त्यांनी दिरांच्या सूचनेला मान देऊन आपल्या ज्ञानाची कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानूबाई के..एम. हॉस्पिटल मध्ये आल्या आणि कायमच्या के..एम. च्या बनल्या. के..एम. त्यांचे झाले. पुण्यातील के..एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले.

 

सुरुवातीला केवळ ४० खाटा असणारे के..एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले. डॉ.बानूबाईंनी आपले काम के..एम. पुरते मर्यादित ठेवले नाही. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री..धो. कर्वे यांच्या पासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते. तेच काम नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरविले.

 

वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले.

 

डॉ.बानू यांनी स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या.

 

डॉ. बानू यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे सकाळ वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ' चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ.कोयाजी १९५५ पासून 'सकाळ' च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्या नंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या.

 

'सकाळ'चे इंडिया फाऊंडेशन सारखे सर्व उपक्रम सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉ. परुळेकरा नंतर चालू ठेवले. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी त्यांनी ग्रामीण आरोग्य क्षेत्रात नमुनादर्श ठरेल असा प्रकल्प वढू येथे राबवला. ग्रामीण आरोग्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर रॅमन मॅगसेसे पुरस्काराने केला गेला; तर भारत शासनाने त्यांनापद्म भूषणदेऊन गौरवले.

 

डॉ. बानू कोयाजी यांच्या जीवनावर डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांनी 'बानूबाई' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाची संकल्पना, संशोधन आणि लेखन डॉ. बानू कोयाजी यांच्या सोबत काम केलेल्या डॉ. प्रतिभा कुलकर्णी यांचे आहे.

 

डॉ. बानू कोयाजी यांचे निधन १५ जुलै २००४ रोजी झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

निर्माता बी. आर. इशारा जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९३४

स्मृती - २५ जुलै २०१२

 

हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी बी.आर. इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम बी.आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. 'इन्साफया चित्रपटाच्या लेखनापासून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. बी.आर. इशारा यांनी चित्रपटसृष्टीत 'बोल्डविषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले.

 

'चेतनामध्ये त्यांनी वेश्यां च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी प्रेम शस्त्र, औरत और इंतकाम, वो फिर आयेगी, हम दो हमारे दो, जरूरत, मिलाप; आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना हिंदी चित्रपट सृष्टीचे दार उघडून दिले. त्यामध्ये परवीन बाबीचा समावेश होता.

 

अमिताभ बच्चन, जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, रेहाना सुलतान, विजय अरोरा, रीना रॉय, रझा मुराद आदी अभिनेत्यांसह क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्यासह इशारा यांनी काम केले. चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी.आर. इशारा यांच्या पत्नी होत.

 

बी. आर. इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

 

बी. आर. इशारा यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

साहित्यिक सुनील गंगोपाध्याय जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९३४ (बांगलादेश)

स्मृती - २३ ऑक्टोबर २०१२ (कोलकाता)

 

बंगाली साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष  सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म सप्टेंबर १९३४ रोजी झाला.

 

साहित्याचे विविध प्रकार हाताळलेल्या सुनील गंगोपाध्याय यांचे खरे प्रेम कवितेवरच होते. दोनशेहून अधिक ग्रंथसंपदा असलेल्या गंगोपाध्याय यांनी कथा, कादंबरी, नाटक, टीका, प्रवासवर्णन, बालसाहित्य असे विविध साहित्य प्रकार लिलया हाताळले.

 

२००८ मध्ये त्यांना याच साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. त्यांचीपार्थो आलोआणिपूर्बो-पश्चिमही पुस्तकेही प्रचड गाजली. त्याच्या 'प्रतिध्वनी' या कादंबरीवर सत्यजित रे यांनी सिनेमाही काढला होता.

 

गंगोपाध्याय यांनी एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील बंगाल मधील जागृतीवर 'प्रथम आलो' (पहिला प्रकाश) ही प्रदीर्घ अशी दोन भागा मधील कादंबरी लिहिली. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ ठाकूर आदी पात्ररुपात या कादंबरीत असून या कादंबरीचा मराठी अनुवाद 'पहिली जाग' या नावाने रंजना पाठक यांनी केला आहे.

 

त्यांच्या 'सेई समय' या ग्रंथाला १९८५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते, तसेच त्यांना हिंदू साहित्यिक पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

 

सुनील गंगोपाध्याय यांचे २३ ऑक्टोबर २०१२ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

ऑक्टोबर

दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९३३

स्मृती - ऑक्टोबर २०१०

 

दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर यांचा जन्म सप्टेंबर १९३३ रोजी झाला.

 

प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या प्रभाकररावांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली. प्रभाकर यांनी १९५२ ते १९५९ पर्यंत भालजी आणि व्ही. शांतराम यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६१ पासून त्यांनी फिल्म डिव्हिजन सोबत काम केले.

 

भारतीय फिल्म डिव्हिजनच्या माध्यमातूनही अनेक डॉक्यूमेंटरीज त्यांनी तयार केल्या होत्या. भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागाची एक शाखा म्हणजे 'बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन' जे भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे बिकट काम करते. त्यांच्यावर डॉक्यूमेंटरी बनवतांना पेंढारकरांना 'रारंग ढांग' ह्या कादंबरीची कल्पना सुचली आणि मराठी साहित्यातलं एक मंत्रमुग्ध करणारं लेणं त्यांनी घडवलं.

 

स्वतः लेखक चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक असल्याने 'रारंग ढांग' वाचतांना एखादा सुंदर चित्रपट पाहतो आहोत असंच वाटत राहातं. अमोल पालेकर यांनी 'रारंग ढांग' वर चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला होता पण संरक्षण खात्याने परवानगी नाकारली होती. (ज्याने कोणी ही कादंबरी वाचली असेल त्याला ह्या मागचे कारण सहज उमजेल).

 

पेढारकरांनी सुनामी संकटावर 'चक्रीवादळ', काश्मीरच्या धगधगत्या पार्श्वभूमीवरची 'आणि चिनार लाल झाला' अश्या इतरही चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांना सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १९६१ मध्ये भाव तिथं देव, १९८१ मध्ये बाल शिवाजी, १९८६ मध्ये शाब्बास सुनबाई हे चित्रपट काढले.

 

भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र.. प्रतीक्षा, आणि चिनार लाल झाला, रारंगढांगया कादंबऱ्यांसहएका स्टुडिओचे आत्मवृत्तया पुरस्कार विजेत्या पुस्तकाचे लेखक. ‘फिल्म्स डिव्हिजनमध्ये घडविलेली कारकीर्द. असा प्रभाकर पेंढारकर यांचा जीवनप्रवास.

 

एक परीस स्पर्शया लघुपटाद्वारे उलगडला आहे.

पेंढारकर यांच्याकडे लेखन सहायक म्हणून काम करण्याच्या माध्यमातून त्यांचा सहवास लाभलेल्या यशस्विनी गोडसे यांनीप्रभाकर पेंढारकर - एक परीस स्पर्शया लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांचे पती डॉ. मोहन गोडसे हे या लघुपटाचे निर्माते असून पेंढारकर यांच्या समवेत फिल्म डिव्हिजन मध्ये काम केलेले अरुण गोंगाडे लघुपटाचे सहदिग्दर्शक आहेत.

 

प्रभाकर पेंढारकर यांचे ऑक्टोबर २०१० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

लेखक चंद्रकांत खोत जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९४० (भीमाशंकर)

स्मृती - १० डिसेंबर २०१४

 

लेखक नि कवी चंद्रकांत खोत यांचा जन्म सप्टेंबर १९४० रोजी झाला.

 

चंद्रकांत खोत यांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सर्व मुलांना सातवी पर्यंत शिक्षण घेऊ दिले. पण त्यानंतर नोकरीधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले चंद्रकांत खोत यांनी स्वत:चे पुढील शिक्षण स्वकष्टाने पूर्ण केले. एम.. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडी साठी गाईड मिळाल्यामुळे खोत यांचे डॉक्टरेटचे स्वप्न अधुरेच राहिले. पण तोपर्यंत खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसली तरी त्यांचाच मुळगावातील एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएच.डी. करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती.

 

चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेला 'मर्तिक' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारित 'उभयान्वयी अन्वय' ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.

 

त्यानंतर दोन वर्षांनी 'बिनधास्त' आणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेली 'विषयांतर' ही कादंबरीदेखील लैंगिक विषयावर आधारीत होती. या कादंबर्यां मध्ये कामगार वस्तीतील जीवन, या भागांमध्ये होणाऱ्या लैंगिक घुसमट याचे वर्णन अगदी हुबेहुब केले होते.

 

'अबकडई' या दिवाळी अंकाचे चंद्रकांत खोत यांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणाऱ्या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. खोत यांनी कादंबरी, चरित्र, कथा या साहित्यप्रकारात विपुल लेखन केले, यामधील उल्लेखनीय म्हणजे; अंकाक्षर ज्ञान (संपादित अंकलिपी), अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र), अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी), अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर), गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र), चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा), दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील कादंबरी), मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी), संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी), हम गया नही जिंदा है (स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी), दुरेघी (दोन दीर्घकथा). त्यासोबतच यशोदा या चित्रपटासाठी गीतलेखन देखील केले यामधील घुमला हृदयी नाद हा, धर धर धरा, माळते मी माळते ही गीते लोकप्रिय ठरली.

 

मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्या वरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. मात्र काही जण म्हणत असत की खोत हिमालयात गेले होते, कारण त्यांचा कल आध्यात्मिकतेकडे झुकला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते चिंचपोकळी जवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात वेळ व्यतित केला.

 

चंद्रकांत खोत यांचे अखेरचे जीवन अत्यंत हलाखीचे गेले. कारण त्यांना रहाण्यासाठी हक्काचे घर देखील नव्हते. त्यांनी अखेरचा श्वासही साईबाबा मंदिरात घेतला.

 

चंद्रकांत खोत यांचा १० डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले ! तत्पूर्वी म्हणजे सप्टेंबर २०१४ला त्यांचा मित्र परिवाराने अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा केला होता.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/सागर मालाडकर

 

************

************

सप्टेंबर

वीरांगना नीरजा भानोत जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९६३ (चंदिगढ)

स्मृती - सप्टेंबर १९८६ (कराची,पाकिस्तान)

 

भारताची धीरोदात्त वीरांगना नीरजा भानोत यांचा जन्म सप्टेंबर १९६३ रोजी चंदिगढ येथे झाला.

 

'हिंदुस्थान टाइम्स' चे तेव्हाचे मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार हरीश भानोत यांची ती कन्या, हीच काय ती तिची ओळख. पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील नीरजा भानोत ही हवाई सुंदरी होती. सप्टेंबर १९८६ साली झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणा दरम्यान प्रवाशांना वाचविताना त्यांचे निधन झाले.

 

सप्टेंबर १९८६ रोजी कराची विमानतळावर तिच्या विमानात अतिरेकी चढले. त्यांनी पायलटना काॅकपिट मधून बाहेर काढले. प्रवाशांपैकी जे अमेरिकन असतील, त्यांचे पासपोर्ट जमा करण्याची मागणी त्यांनी नीरजा यांच्या कडे केली. तिने ठामपणे नकार दिला. ही हुज्जत तब्बल १५ तास चालली. अखेर अतिरेक्यांनी बाॅम्बस्फोट करून विमान उडवून देण्याची धमकी दिली.

 

नीरजाने मोठ्या शिताफीने विमानाचा दरवाजा उघडला प्रवाशांना बाहेर काढायला सुरूवात केली. खरे तर त्या स्वत: आधीच उतरू शकल्या असत्या पण नीरजा यांनी आधी लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.

 

त्या एका वर्षांच्या मुलाला बाहेर काढत असताना संतापलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. तिच्या शरीराची चाळण झाली, पण त्यांनी मुलाला वाचवले आणि ते करताना वयाच्या २३व्या वर्षी शहीद झाली.

 

हा अमेरिकन मुलगा पुढे पायलट झाला. त्याने लिहिले, माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट नीरजाच्या बलिदानाचे आहे. नीरजा भानोत यांनी जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचविले, म्हणून भारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

 

नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या. नीरजा भानोत यांना अशोक चक्र मिळालेली ती सर्वात तरुण व्यक्ती होती. नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर 'नीरजा' नावाचा हिंदी चित्रपट निघाला.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

"नीरजा" चित्रपट : 👇

 https://www.youtube.com/watch?v=PS_T77gdMAU

 

************

************

सप्टेंबर

अभिनेत्री जेनिफर केंडल स्मृतिदिन

************

 

जन्म - २८ फेब्रुवारी १९३४ (साउथपोर्ट,UK)

स्मृती - सप्टेंबर १९८४ (लंडन,UK)

 

अभिनेता शशि कपूर यांची पत्नी जेनिफर केंडल यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९३४ रोजी झाला.

 

जेनिफर यांचे वडील गोफरे केंडल जेष्ठ रंगकर्मी होते. ते आपली पत्नी दोन्ही मुलीच्या सोबत कोलकाता येथे शेक्सपियरन ग्रुप चालवत असत. जेनिफर यांची बहीण फ्री केंडल यांनी 'शेक्सपीयर वाला' या ऑटोबायोग्राफी मध्ये सांगितलं की, शशी आणि जेनिफर यांची पहिली ओळख एका कनफ्यूजन मुळे झाली होती.

 

कोलकाताच्या एंपायर हाऊसनं जेफ्री यांच्या 'शेक्सपीयराना' आणि शशी कपूर यांच्या 'पृथ्वी थिएटर्स' यांना परफॉर्मन्सला एकच तारीख दिली होती. या अनोख्या लव्ह स्टोरीचा एक पैलू जेनिफर यांच्या वडिलांनीही उघड केला होता. या गोंधळानंतर असं ठरलं की, दोन्ही ग्रुप एक दिवस सोडून एक दिवस असं परफॉर्म करतील ज्यामुळे दोघांनाही पुरेसा वेळ मिळेल.

 

पहिल्या दिवशी बॅकस्टेजला झालेल्या ओळखी नंतर १८ वर्षांचे शशी कपूर २३ वर्षांच्या जेनिफर यांच्या प्रेमात पडले. ही लव्ह स्टोरी सुरु झाल्यावर यात समस्या यायला सुरुवात झाली. ८० च्या दशकातील सिनेमांच्या टिपिकल लव्ह स्टोरी प्रमाणे या दोघांच्याही प्रेमाचा प्रवास सोपा नव्हता.

 

जेनिफर यांच्या वडिलांनी आपल्या नाटकाच्या ग्रुप मध्ये शशी कपूर यांना घेतलं होतं. मात्र ते जेनिफर आणि शशी यांच्या प्रेमाच्या विरोधात होते. शशी यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीवरुन जेफ्री अनेकदा त्यांची थट्टा करत आणि यामुळे अनेकदा जेफ्री आणि जेनिफर यांच्यात भांडण होत असे.

 

शशी आणि जेनिफर यांनी मिळून जेफ्री यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. बराच काळ प्रयत्न केल्यानंतर शशी आणि जेनिफर यांनी शेक्शपीयराना ग्रुप सोडला. विदेशातील त्यांचे शो रद्द होऊ लागल्यावर शशी कपूर यांनी मोठा भाऊ राज कपूर यांच्याकडे मदत मागितली. भावाने मदत मागितल्यावर राज कपूर यांनी मुंबईच्या विमानाची दोन तिकीटं पाठवली. शशी आणि जेनिफर मुंबईला परतल्यावर कपूर कुटुंबीयांनी या दोघांचं लग्न लावून दिलं.

 

१९८१ साली आलेल्या '३६ चौरंगी लेन' या चित्रपटा साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार जेनिफर यांना मिळाला होता. त्यांचे इतर चित्रपट 'बॉम्बे टॉकी, जूनून, हीट एंड डस्ट, घरे बायर' हे होते. शशी जेनिफर यांना तीन मुलं आहेत. करण, कुणाल आणि संजना मात्र या तिघांपैकी कोणीही अभिनय क्षेत्रात नाहीत.

 

जेनिफर केंडल यांचे निधन सप्टेंबर १९८४ रोजी झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

दिग्दर्शक मुकुल आनंद स्मृतिदिन

************

 

जन्म - ११ ऑक्टोबर १९५१

स्मृती - सप्टेंबर १९९७

 

दिग्दर्शक निर्माता मुकुल आनंद यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९५१ रोजी झाला.

 

मुकुल आनंद यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे चित्रपट भव्य असायचे. मुकुल आनंद यांचे काका इंदर राज आनंद हे एकेकाळचे प्रसिद्ध आणि यशस्वी संवाद लेखक. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक टिनू आनंद हा त्यांचा चुलत भाऊ. सख्खा छोटा भाऊ टीव्हीवर मालिका दिग्दर्शित करायचा. घरातच सिनेमाचा वारसा असल्यामुळे मुकुल आनंद यांना लहानपणापासूनच सिनेमात जायचं होते.

 

मुकुल आनंद यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता 'कानून क्या करेगा'. 'केप फियर' या हॉलिवूड सिनेमावरून तो घेतला होता. 'कानून क्या करेगा' हा अतिशय उत्तम खिळवून ठेवणारा थ्रिलर होता. डॅनी डेंगझोप्पा हा खलनायक भूमिकेत होता. त्यांचा दुसरा सिनेमा 'एतबार ' पण हिचकॉकच्या 'डायल एम फॉर मर्डर' वरून घेतला होता.

 

मुकुल आनंद प्रसिद्धीच्या झोतात सर्वप्रथम आले ते 'सल्तनत' या भव्य चित्रपटामुळे. या सिनेमात धर्मेंद्र आणि सनी देओल एकत्र आले होते. या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जुही चावला यांचा हा पहिला सिनेमा. ह्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हा बॉलिवूडच्या इतिहासातला मैलाचा दगड मानला जातो. पण हा चित्रपट दणकून आपटला.

 

१९८७ साली आलेल्या 'इन्साफ' मधून मुकुल आनंद यांनी काही काळ प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या विनोद खन्नाच्या कारकिर्दीचे पुनरुज्जीवन केलं. 'इन्साफ' च्या रुपाने मुकुल आनंद यांना बॉक्स ऑफिसवरच पहिलं यश मिळालं. आदित्य पांचोलीला खलनायकी इमेजमध्ये सेट करणारा 'महा संग्राम' हा पण आपटला. तो पर्यत मुकुल आनंद यांची प्रतिमा अतिशय उत्तम पण तिकीट खिडकीवर अपयशी ठरणारा दिग्दर्शक अशी बनली होती.

 

पण याच सुमाराला उतरणीला लागलेल्या सुपरस्टार अमीताभ बच्चन यांच्या सोबत मुकुल आनंद यांची जोडी जमली आणि त्यांच्या कारकिर्दीला चांगल्या अर्थाने कलाटणी मिळाली. १९९० साली अमीताभ बच्चन यांचा राजकारणात भ्रमनिरास होऊन ते पुन्हा सिनेमात पुनरागमन करण्याची धडपड करत होते. पण बॉक्स ऑफिसवरच यश बच्चन यांना सातत्याने हुलकावण्या देत होत.

 

'तुफान', 'मै आजाद हू', 'अजूबा' तिकीट खिडकीवर दणकून आपटले होते. याचवेळेस मुकुल आनंद आणि अमीताभ बच्चन यांचा 'अग्निपथ' आला. मुकुल आनंद यांच्या बहुतेक सिनेमाच्या प्रेरणा या हॉलिवूड सिनेमावरून आलेल्या असत.

 

'अग्निपथ' या चित्रपटावर पण 'स्कारफेस' चा जाणवण्याइतका प्रभाव होता. 'अग्निपथ' हा बिग बजेट सिनेमा होता. या सिनेमातून कॅमेरावर्क आणि संकलन यात मुकुल आनंद दहा पावलं समकालीन दिग्दर्शकांपेक्षा पुढं गेला. या सिनेमात 'गॉडफादर' मधल्या मार्लन ब्रँडोप्रमाणे बच्चनने तोंडात कापसाचे बोळे ठेवून वेगळ्या आवाजात संवाद बोलण्याचा प्रयत्न केला होता. भारदस्त आवाज हाच ज्याचा यूएसपी आहे अशा बच्चनचा आवाज बदलण्याचा हा प्रयोग प्रेक्षकांना रुचला नसावा. चित्रपट तिकीट खिडकीवर फारसा चालला नाही. पण अमीताभ बच्चन यांना अभिनयासाठीचा कारकिर्दीतला पहिला वहिला राष्ट्रीय पुरस्कार 'अग्निपथ' मुळे मिळाला.

 

मुकुल-बच्चन जोडगोळीचा 'हम'. यात बच्चन यांच्या सोबतच रजनीकांत आणि गोविंदा हे मोठे स्टार पण होता. 'हम' बॉक्स ऑफिसवर चालला. यात अमीताभ बच्चन यांचा 'टायगर' आणि त्याची केसांना झटके देत मान हलवण्याची लकब प्रेक्षकांना खूप आवडली. नंतर बच्चनसोबत मुकुल आनंद यांनी 'खुदा गवाह' सिनेमा केला.

 

मुकुल आनंद यांचे निधन  सप्टेंबर १९९७ रोजी झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/अमोल उदगीरकर

 

************

************

सप्टेंबर

गीतकार पी. एल. संतोषी स्मृतिदिन

************

 

जन्म - ऑगस्ट १९१६

स्मृती - सप्टेंबर १९७८

 

गीतकार पी. एल. संतोषी यांचा जन्म ऑगस्ट १९१६ रोजी झाला.

 

पी. एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच 'अनोखे बोल' हा गीतप्रकार 'टिका लई कली दई' (चित्रपट - शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला.

 

कोई किसीका दिवाना ना बने (सरगम), महफिल में जल उठी शमा (निराला), तुम क्या जानो तुम्हारी याद में (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती. संतोषी हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम गीतकार होते. मग ते पटकथाकार बनले. मग दिग्दर्शक. यानंतर त्यांना चित्रपट निर्माता होण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्यापायी ते कफल्लक बनले. या माणसाने दोन्ही हातांनी पैसा कमावला दहा हातांनी तो उधळला. नटीच्या प्रेमात पडले तिच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली. जवळ मोटारींचा ताफा असलेला माणूस बसच्या रांगेत उभा राहिलेला जगाने पाहिला. हिंदी सिनेमाचे जग कसे मोहमयी असते याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे संतोषी यांचे आयुष्य.

 

संतोषी यांनी १९५२ मध्ये 'शिनशिनाकी बबला बु'  या नावाचा चित्रपट निर्माण केला. त्याचे लेखक,  दिग्दर्शक, निर्माते गीतकार तेच होते. संगीतकार होते त्यांचे खास मित्र सी. रामचंद्र. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक उत्तम नमुना होता. या सिनेमात एकीकडे त्यांनी 'अरे बाबा ये हसी बाबा ये खुशी बाबा खा बाबा पी बाबा' अशी निरर्थक गाणी लिहिली आणि दुसरीकडे मनाची व्याकुळता अतिशय आर्तपणे व्यक्त करणारे उत्कट गीतही लिहिली.

 

रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. शहनाई, खिडकी, सरगम' हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. संतोषीच्या 'हम पंछी एक डालके' या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते.

 

पी.एल. संतोषी बरोबर सी.रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारा पैकी एकाची तरी आढळतात.

 

पी. एल. संतोषी यांचे निधन सप्टेंबर १९७८ रोजी झाले.

 

पी. एल. संतोषी यांना आदरांजली.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/श्री.पद्माकर पाठक

 

************

************

सप्टेंबर

गीतकार विठ्ठलभाई पटेल स्मृतिदिन

************

 

जन्म - २१ मे १९३६ (सागर,मध्यप्रदेश)

स्मृती - सप्टेंबर २०१३ (सागर,मध्यप्रदेश)

 

गीतकार तथा काँग्रेस सरकार मध्ये उद्योगमंत्री राहिलेले विठ्ठलभाई पटेल यांचा जन्म २१ मे १९३६ रोजी झाला.

 

गीतकार तथा काँग्रेस सरकार मध्ये उद्योगमंत्री राहिलेले विठ्ठलभाई पटेल यांची दुसरी ओळख म्हणजे ते जुन्या अविट गाण्यांचे गीतकार होते. विठ्ठ्लभाई पटेल यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. ‘फुल छाप बिडीमध्यप्रदेश मध्ये प्रसिद्ध होती ती विठ्ठल पटेल यांचीच.

 

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या विठ्ठलभाई पटेल यांना आवड मात्र धंद्यामध्ये नव्हती. त्यांना कविता करायला आवडायच्या. कार चालवायला आवडायची. तरुणात आलेल्या प्रत्येकाला असतात ते सगळे शौक होते. एवढच नाही तर १९६९ साली झालेल्या मध्यप्रदेश कार रेसिंग स्पर्धेत विठ्ठलभाई पटेल यांनी पहिला नंबर देखील पटकावला होता.

 

कायम खिशात फुल छाप बिडी आणि एक सोन्याचा लायटर बाळगणारा हा मुलगा हळव्या कविता लिहायचा. त्या पेपर मध्ये छापून यायच्या. यापैकी काही कविता गाजल्या देखील. त्यांची प्रसिद्धी राजकपूर यांच्या पर्यंत जाऊन पोहचली. राजकपूर त्यावेळीबॉबीहा चित्रपट बनवत होते. ‘बॉबी’ (१९७३) या चित्रपटासाठी राजकपूर यांच्यासाठी त्यांनी 'झूट बोले कौआ काटे काले कौसे डरियो' हे गाणे विठ्ठलभाई पटेलांनी लिहिले.

 

हिंदी मधल्या एका म्हणीला गाण्यात बदलल्यामुळे ते प्रचंड पॉप्युलर झालं. विठ्ठलभाई पटेलांना या गाण्यासाठी फिल्मफेअर नॉमिनेशन मिळालं. पण अवार्ड काही मिळालं नाही. पुढे पटेलांनी राज कपूर यांच्या सत्यम शिवम सुंदरम, सुभाष घाई यांचाविश्वनाथअसे अनेक चित्रपट त्यांनी केले. चित्रपटदरिया दिलमधीलवो कहते है हमसे अभी उमर नही है प्यार कीदेखील त्यांनीच लिहिले होते. पणबॉबीसारखं यश त्यांना इतर गाण्यांना मिळालं नाही.

 

त्यांनी प्रसिद्ध गायक किशोर कुमार, मुकेश चित्रपट अभिनेता राज कपूर यांच्या सोबत काम केले होते. त्यांनी चित्रपटासाठी ५५ गाणी लिहिली. त्यांचे पाच कविता संग्रह प्रकाशित झाले. विठ्ठलभाई पटेल आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होते. कॉंग्रेस मध्ये राहूनही पक्षाच्या विरोधात एखादी गोष्ट बोलायची झाली तरी ते घाबरायचे नाहीत.

 

विठ्ठलभाई पटेल हे कायम असे वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून मध्यप्रदेश मध्ये प्रसिद्ध राहिले. पण कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. स्वतःचा बिडी उद्योग मोठा असल्यामुळे पैसे खाण्याची त्यांना कधी गरज नव्हतीच पण याशिवायही क्लीन इमेज त्यांनी सांभाळली. याबद्दल त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता.

 

विठ्ठलभाई पटेल हे सागर विधानसभा क्षेत्रातून दोन वेळा निवडून आले. ९० च्या दशकात पटेल यांनी अर्जुन सिंह, मोतीलाल वोरा श्यामाचरण शुक्ल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले होते. उद्योग मंत्री असताना त्यांनी बुंदेलखंड भागातील लोकांसाठी अनेक योजना आणाल्या. पुढे जाऊन ते राजकारणातून विरक्त झाले. त्यांना रावतपुरा सरकार या गुरुच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त वेळ अध्यात्मा मध्ये घालवू लागले. पूर्ण जन्मात केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून त्यांनी स्वतःचा अंतिम संस्कार करून घेतला होता. पण हा अंतिम संस्कार केल्यावर त्यांनी प्राणत्याग वगैरे काही केलं नाही.

 

विठ्ठलभाई पटेल यांचे निधन सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

खगोलशास्त्राज्ञ डॉ. गोविंद स्वरूप स्मृतिदिन

************

 

जन्म - १९२९ (ठाकुरद्वारा)

स्मृती - सप्टेंबर २०२० (पुणे)

 

डॉ. गोविंद स्वरुप यांचा जन्म ठाकुरद्वारा येथे १९२९ साली झाला.

 

डॉ. गोविंद स्वरूप यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक बोलले जाते. कल्याण येथे प्रायोगिक रेडिओ दुर्बीण उभारून त्यांनी भारतात या शास्त्राचा श्रीगणेशा केला. पुणे जिल्ह्यामध्ये खोडद या गावी त्यांच्या पुढाकाराने रेडिओ दुर्बिणींचे संकुलच उभारण्यात आले.

 

मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण (GMRT) म्हणून ओळखला जाणारा हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षणीय ठरलेला आहे. भारतातील रेडिओ खगोलशास्त्राचा लौकिक जगभर नेणारे उमदे आणि उत्साही शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप आज आपल्यात नाहीत.

 

गोविंद स्वरूप, भारतीय रेडिओ खगोलशास्त्रचे जनक आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओचे संस्थापक संचालक होते.

 

प्रा. स्वरूप यांनी अलाहाबाद विद्यापीठातून १९५० साली एम.एस्सी. पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून १९६१ साली पी.एचडी पूर्ण केली. त्यानंतर ते टाटा इंन्स्टीट्युट  (NCRA) मध्ये जॉईन झाले.

 

प्रो. स्वरुप यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री, भटनागर पुरस्कार आणि ग्रोटे रेबर पदक देण्यात आले. ते अनेक प्रतिष्ठीत संस्थेचे सदस्य देखील होते. त्यांना रॉयल सोसायटीची फेलोशिप देखील मिळाली होती.

 

डॉ. गोविंद स्वरूप यांचे सप्टेंबर २०२० रोजी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

सौजन्य : ABP माझा

 

************

************

🌹 सप्टेंबर 🌹

संगीतकार मीनाताई खडीकर यांचा वाढदिवस

************

 

जन्म - सप्टेंबर १९३१

 

संगीतकार मीनाताई खडीकर यांचा आज वाढदिवस.

 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या मीनाताई खडीकर या भगिनी. कारकीर्दीच्या सुरुवातीला काही चित्रपटा मध्ये त्यांनी गायनही केलं. मात्र त्यांचा ओढा संगीत दिग्दर्शनाकडे होता.

 

माणसाला पंख असतात, रथ जगन्नाथाचा, शाबास सूनबाई आणि चॅम्पियन या चित्रपटांना मीनाताई खडीकर यांनी संगीत दिलं आहे. परंतु, त्यांची खरी ओळख आहे ती बालगीतांसाठी.

 

मीनाताईंनी संगीत दिलेली; सांग सांग भोलानाथ, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, खोडी माझी काढाल तर, आई मला पावसात जाऊ दे, पुस्तक नंतर वाचा; ही बालगीते खूप गाजली आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/मंदार जोशी

 

************

************

🌹 सप्टेंबर 🌹

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा चा वाढदिवस

************

 

जन्म - सप्टेंबर १९८३ (वर्धा)

 

स्टायलीश बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा आज वाढदिवस.

 

देशातील सर्वात स्टायलीश आणि ग्लॅमरस स्पोर्ट स्टार मध्ये ज्वालाचा देखील समावेश होतो. ज्वालाने आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. तिचे वडील क्रांति गुट्टा हे एका स्वतंत्रता सेनानीच्या कुटूंबातील असून, आई येलेना चीनच्या तियानजिन येथील आहे.

 

ज्वालाच्या आईला लिखानाची विशेष आवड आहे. त्यांनी महात्मा गांधींच्या आत्मकथेचे ट्रांसलेशनही केले आहे. ज्वाला बॅडमिंटन मधील सर्वात ग्लॅमरस खेळाडू पैकी एक आहे. महिला दुहेरीतील एक्स्पर्ट असलेली ज्वाला ज्याप्रमाणे ती कोर्टवर कलरफूल लूक मध्ये दिसते त्याच प्रमाणे कोर्टच्या बाहेरही ती तिच्या स्टाईल मुळे चर्चेत असते.

 

ज्वाला तिच्या स्टाईल मुळे कधी फॅशन मॅगझीनच्या कव्हरवर झळकली तर, तर कधी तेलुगु सिनेमा मध्ये डांस करतानाही दिसली. ज्वालाने २०१३ मध्ये साउथ इंडिअन सिनेमा मध्ये आयटम नंबरही केले आहे. ज्वाला एक स्मार्ट ड्रेसरही आहे. ज्वालाला लहाणपणी टेनिस प्लेयर व्हायचे होते, मात्र ती नंतर बॅडमिंटनकडे आकर्षित झाली. मागच्या वर्षीच तिने देशाला ग्लासगो येथे झालेल्या खेळा मध्ये सिल्व्हर मेडल मिळऊन दिले.

 

ज्वाला हैद्राबादमध्ये राहते. आपल्या बॅडमिंटन करिअर दरम्यान ज्वाला गुट्टा बॅडमिंटनपटू चेतन आनंदला डेट केरायची. ज्वालाचे भारताचा बॅडमिंटनपटू चेतन आनंद बरोबर २००५ साली लग्न झाले होते. पण या दोघांचे लग्न जास्त काळ टिकले नाही. २०११ साली ज्वाला आणि चेतन यांचा घटस्फोट झाला होता.

 

ज्वालाचे यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिन बरोबर अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. सध्या ज्वाला तमीळ अभिनेता विष्णू विशाल सोबत नात्यात आहे.

 

ज्वाला गुट्टाचे करिअर :

* २००६ : कॉमनवेल्थ गेम्स मध्ये - ब्रॉन्झ

* २०१० : कॉमनवेल्थ गेम्स - महिला डबल्स मध्ये गोल्ड, मिक्स्ड टीम मध्ये सिल्व्हर

* २०१४ : कॉमनवेल्थ गेम्स मध्ये - सिल्व्हर

* २०११ : अर्जुन पुरस्कार देऊन गौरव

* २०१३ :पर्यंत एकूण १४ वेळा नॅशनल बॅडमिंटन चॅम्पिअनशिप जिंकली.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 सप्टेंबर 🌹

अभिनेत्री राधिका आपटे चा वाढदिवस

************

 

जन्म - सप्टेंबर १९८५ (पुणे)

 

बोल्ड अभिनेत्री राधिका आपटेचा आज वाढदिवस.

 

'वाह लाइफ हो तो ऐसी' या सिनेमात छोटेखानी भूमिके द्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी राधिका ही; वेटिंग रुम, रक्तचरित्र, शोर इन सिटी, बदलापूर, हंटर, लायन, मांझी माऊंटन मॅन, पार्च्ड, फोबिया, कबाली; यांसह अनेक गाजलेल्या हिंदी आणि साऊथच्या सिनेमांत काम करणारी, मराठी इंडस्ट्रीत सुद्धा ॅक्टिव आहे.

 

मराठीत तिने; घो मला असला हवा, समांतर, तुकाराम, पोस्टकार्ड, लय भारी; या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 

राधिका आपटे आणि बोल्ड सीन हे जणू आता समीकरणच तिच्या चित्रपटा बाबत बनले आहे. तिच्या 'पार्च्ड' या चित्रपटातील इंटिमेट सीन्सची बरीच चर्चा झाली होती.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

.      🌀 || गंभीर बनू नका ||🌀

♻️ फार गंभीर बनून जगू नका. हे विश्वकरोडों वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कुणावाचून कुणाचे काही थांबत नाही. जे व्हायचे ते होत राहणार आहे. तुम्हाला विचारुन काही घडणार नाही.

 

♻️ या जगात आपले काहीच नसते, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका. मी अमूक ,मी तमूक असा अंहकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने रहा.

 

♻️धर्म, जात,तत्व , या गोष्टी मध्ये अडकून पडू नका..स्वतःचा भरवसा नसतांना इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका.

 

♻️इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करु नका. त्यांचे जीवन ते जगले. तुम्ही तुमचे जीवन जगा इतरांना जगू द्या.

 

♻️आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे,ओळखा! उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका.

 

♻️हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना, क्षुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका. जीवन गंमतीने जगा!

 

♻️जरा मोकळे पणाने हसा. इतरांनाही आनंदी करा. लक्षात ठेवा तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही भले होणार नाही. साऱ्या जगाचा विचार करू नका. नसती चिंता करु नका.

 

♻️लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या. सतत गंभीर बनू नका. इतरांशी मोकळेपणाने बोला. त्यामध्ये

कमीपणा मानू नका. तुम्ही स्वतः ला काही ही समजले तरी निसर्गाच्या पुढे तुम्ही फक्त एक जीव आहात.

कुणाचाही द्वेष करु नका. सूडबुद्धीने वागू नका.

 

♻️आपल्या अवतीभोवतीचे जग बघा. किती गंमत आहे चोहीकडे. मुंग्याची रांग बघा. पाखरांचे थवे बघा. बघा कावळ्याची स्वच्छता. खळखळणारा समुद्र तुमच्या सोबतीला आहे. त्याच्या उसळणाऱ्या लाटा तुम्हाला खुणावत आहेत.

 

♻️ जा उंच डोंगरावर! किती प्रेमाने तो डोंगर खांद्यावर खेळवतो. विचारा त्या कोकीळेला, इतकी सुंदर कशी गातेस?

विविध रंगाची फूले बघा. आयुष्यात विविध रंग भरा. एकसारखे जीवन जगू नका.

 

♻️नवी ठिकाणे, नवी माणसे यांच्याशी मैत्री करा. प्राण्यांशी संपर्क ठेवा, त्यांचे जगणे बघा. कटकटी कमी करा. अधिक आनंदी जगा!

 

🌀आनंदाने.....

      जगण्यासाठी सर्वांना.....

    मनमोकळ्या आभाळ भरुन शुभेच्छा!.🌀

 

सौजन्य सकारात्मक विचार बोधकथा

🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬

            🤔 कुतूहल 🤔

 

🎯 असा असावा गणितशिक्षक

***********

‘‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर?’’ या गाण्यातील गणिताची भीती शाळेतच अनेक मुलांचा ताबा घेते. गणित विषय अवघड वाटतो याचे कारण या विषयाचे स्वरूप, ज्यात अनेक अमूर्त संकल्पना, सूत्रे, चिन्हे, आकडेमोड, आकृती रेखाटन, गणिती परिभाषा, तर्कशुद्ध विचार, काटेकोरपणा अचूकता अशा गोष्टी आहेत. शिवाय गणित हा क्रमबद्ध विषय असल्याने मागील इयत्तेत शिकलेला घटक नीट समजला नसेल तर पुढील वर्गात त्या घटकावर आधारित भाग समजत नाही. उदाहरणार्थ, शेकडेवारी नीट समजली नाही तर नफा-तोटा, सरळव्याज, गुणोत्तर-प्रमाण यातील प्रश्न सोडवताना कठीण जाते. त्यामुळे शालेय स्तरावर गणिताची गोडी लावून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हे आव्हानात्मक काम गणिताच्या शिक्षकांना विशेष प्रयत्नांनी करावे लागते. यासाठी अध्यापनात खेळ, गोष्टी, कोडी, प्रतिकृती, कागदकाम, जादूचे चौरस, गणिताचा इतिहास यांचा समावेश हवा.

 

चालायला शिकणारे लहान मूल जसे अनेकदा अडखळते, तसे गणितात विद्यार्थी खूप ठिकाणी अडखळतात. जसे की, शाब्दिक उदाहरणांचे गणिती रूपांतर, दिलेल्या मापांनुसार आकृती रेखाटन, समीकरण सोडवणे, किचकट आकडेमोड इत्यादी. कोनमापकाचा उपयोग करून योग्य मापाचा कोन आखणे अशा काही बाबतींत वैयक्तिक लक्ष पुरवावे लागते. अपूर्णाक त्यावरील क्रिया हा तर आकलनाचा कठीण भाग. / + / = /१३ असे चुकीचे उत्तर अनेक मुले देतात. हे टाळण्यासाठी विविध कृतींतून अपूर्णाक समजावून देऊन त्याचे दृढीकरण होण्यासाठी सराव घेणे गरजेचे असते अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत पाठय़पुस्तकाला महत्त्व आहे. गणिताचे पुस्तकही वाचून नमुना उदाहरणे समजून घेऊन विद्यार्थी स्व-अध्ययन करू शकतात यावर शिक्षकांचा भर हवा. मुलांच्या दैनंदिन व्यवहारांतील उदाहरणे शिक्षकांनी दिली तर मुलांना रस वाटतो. स्वत: उदाहरणे तयार करण्यास प्रोत्साहन दिले तर मुलांना आवडते. वॉक, चॉक, टॉक (डब्ल्यूसीटी) या पद्धतीला नव्या डब्ल्यूसीटीची म्हणजे वेब, कम्युनिकेशन, टीमवर्क यांची जोड, तसेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, व्हिडीओ निर्मिती यांसारखे तंत्रस्नेही उपक्रम प्रभावी होऊ शकतात. गणिताचा विज्ञान, भूगोल, अर्थशास्त्र, खगोलशास्त्र यांच्याशी असलेला सहसंबंध, दैनंदिन जीवनातील गणिताचे स्थान, गणिताच्या स्पर्धापरीक्षांचे महत्त्व या गोष्टी शाळेतच पटल्या तर मुले अवधानपूर्वक गणित शिकतील. हा विषय तर्कशुद्ध विचार करायला शिकवतो, एखादी समस्या सोडविण्याची प्रक्रिया शिकवतो आणि मेंदूसाठी उत्तम व्यायामाचे काम करतो हे अधोरेखित करण्यात जर शिक्षक यशस्वी झाले तर उत्तमच!

 

शालेय पातळीवरच गणिताचा पाया भक्कम करून घेणे, हे शिवधनुष्य पेलण्याचे काम शिक्षकाचे!

 

शोभना नेने

office@mavipamumbai.org

~~~~~~

प्रसारक : दिपक तरवडे

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~

 📡 जय विज्ञान 🔬

दैनिक लोकसत्ता,दिनांक - ०७ सप्टेंबर २०२१

📍आजची माहिती

 

📙 सांधेदुखी 📙

******

 

'सांधे कुरकुरतात' असे आजीबाई नेहमीच म्हणत असते वयोवृद्ध माणसांना जिना चढणे उतरणे वा खाली मांडी घालून बसणे उठणे गुडघे दुखत असल्याने अनेकदा नको वाटते. शरीरात असंख्य सांधे आहेत. पण मुख्य भार पडतो तो गुडघ्यांवरच. वयोपरत्वे सांधे कुरकुरु लागून दुखतात. सांधा म्हणजे काय असे पाहिले तर दोन हाडे जेथे एकत्र येऊन हालचाल होते, तेथे दोन्ही हाडांच्या टोकांना कुर्चा नावाचा मऊ श्लेष्मल पदार्थाने झाकुन टाकलेले असते. दोन्ही हाडांचे एकमेकांवर घर्षण होऊ नये म्हणून ही काळजी घेतलेली असते. या कुर्चा जेथे संपतात तेथपासून हाडाचा प्रत्यक्ष भाग स्नायूंनी झाकला जातो. दोन्ही हाडांच्या कुर्च्यांनी बनलेला हालचाल करणारा जोड एका आवरणाने संपूर्ण झाकला जातो या आवरणाच्या आत एक मऊ वंगण सतत स्रवत असते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपण कोणतीही हालचाल करताना सांधा कुरकुरत नाही.

 

 वयानुसार अन्य काही कारणाने कुर्चा झिजतात काही वेळा मार लागूनही त्यांची झीज होऊ शकते. कधी जिवाणूंचा शिरकाव सांध्यात झाल्यानेही त्या खराब होतात. कुर्चांची झीज झाल्याने ज्या सहजपणे सांध्याची हालचाल व्हायला पाहिजे ती झाल्याने हाडांच्या टोकांशी घर्षण होऊन सूज धरू लागते. या सुजेमुळे घर्षणामुळे सांधेदुखी सुरू होते काही आजारात सांध्यातील वंगण कमी होते. ज्या मोठय़ा आजारात संपूर्ण शरीराची झीज होत जाते त्यावेळी सांधेही त्रास देऊ लागतात. काही प्रकारात सांध्याच्या आवरणाच्या आत विविध क्षारांचे किटण जमून ते हालचालीला अडथळा आणते. जेव्हा सांधा मोठा जेथे हालचाल सतत होत असते, तेथे वेदना जास्त तीव्र होत राहतात.

 

 सांधेदुखीचा वंशपरंपरेचाही तो थोडाफार संबंध आहे. शरीरातील कॅल्शियम कमी होत गेल्याने स्त्रियांमध्ये वाढत्या वयात हे प्रमाण जास्त आढळते, वरचेवर सांध्यांना सूज येऊन कुर्च्यांची झीज जास्त होत गेली तर कालांतराने सांध्याच्या कामकाजावर कायमचा परिणामही दिसून येऊ शकतो. एखादा माणूस नेहमीच वाकडा होत चालताना दिसतो तो अशाच प्रकारच्या दुखण्यामुळे. या सर्व वर्णनावरून एक समजूत अशी होण्याची शक्यता आहे की जास्त वापरामुळे संधी मागे लागू शकते. ती मात्र पूर्णत चुक आहे. या उलट वापरला गेल्यानेच सांधा निकामी होत जातो हेही प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. ज्यांनी आयुष्यभर नियमित हालचाल व्यायाम सर्व सांध्यांचा वापर होईल अशी काळजी घेतली आहे त्यांचे साधे क्वचितच त्रास देतात.

 

शरीरात सांधे आहेत म्हणूनच हालचाल शक्य आहे. ते शक्यतो पूर्ण निरोगी रहावेत, याची निगा राखणे त्यासाठीच आवश्यक आहे.

~~~~~~

प्रसारक : दिपक तरवडे

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~

सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान दिनविशेष मधून

📍आजची माहिती

 

📕जगात भुते असतात का ?📕

***********

लहानपणापासून तुम्हाला भुताखेतांची भीती दाखवली गेली असेल अंधार, बागूलबुवा, तसेच भुते यांच्याबद्दल कोणत्याही लहान मुलाला भीती वाटतेच ज्ञानाच्या कक्षा विस्तारतात तसे भीती कमी होत जाते. खरेच का जगात भुते असतात? या प्रश्नाच्या दोन्ही बाजूंनी अत्यंत निर्धारपूर्वक बोलणारे अनेक जण भेटतील. देव आहे किंवा नाही पुनर्जन्म आहे किंवा नाही तसाच हाही एक वादाचा, तर कधी वितंडवादाचा मुद्दा होऊ शकतो. माहिती नसलेल्या गोष्टींबद्दल गूढतेचे वलय निर्माण होतेच त्यामुळेच सर्वांनाच भुतांच्या गोष्टीत कमालीचे स्वारस्य असते. भुते माणसाच्या मनात असतात, असे म्हणतात ते खरे आहे. माणसाच्या मानसिक दौर्बल्याचा एक आविष्कार म्हणजे भुते होत. भुताचे अस्तित्व शास्त्राने अमान्य केले आहे. भूतं आहे हे कोणालाही सिद्ध करता आलेले नाही. भुताने झपाटणे, भूतबाधा आदी गोष्टी हे मनोविकार असल्याचे सिद्ध झाले आहे. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली आहे, असे ठरवून मांत्रिकाकडे तिला नेण्यात येते. तेथे भूत उत्तरवण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीचा शारीरिक छळ केला जातो. कधीकधी ती व्यक्ती मृत्युमुखीही पडते.

 

असे होणे हे सुसंस्कृत समाजासाठी एक लांछनच होय.

~~~~~~

प्रसारक : दिपक तरवडे

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~

डॉ.जगन्नाथ दीक्षित, डाॅ.अंजली दीक्षित

यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून

🎧आजचे शास्त्रज्ञ 🎧

 

आज गोविंद स्वरूप यांचा स्मृतिदिन

 

📕भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक📕

 

स्मृतिदिन - सप्टेंबर २०२०

*********

डॉ.गोविंद स्वरूप (२३ मार्च १९२९, ठाकूरद्वार, उत्तर प्रदेश,[] सप्टेंबर २०२०, पुणे[]) यांना भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जाते.

 

शिक्षण

डॉ.गोविंद स्वरूप यांनी अलाहाबाद येथून १९४८ मध्ये बी.एससी.ची पदवी मिळवली. त्यानंतर १९५० मध्ये विज्ञानाची मास्टर्स (MSc) पदवी संपादन करून त्यांनी १९५२ मध्ये ऑस्ट्रेलियामधील सी.एस.आय.आर.. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. पुढे १९६१ मध्ये त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पी.एचडी. संपादन केली.

 

कारकीर्द

डॉ.गोविंद स्वरूप यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत १९५०-५३ आणि १९५५-५६ या काळात काम केले तसेच CSIRO ऑस्ट्रेलिया येथे १९५३-५५ या काळात काम केले. त्यांनी १९५६-५७ मध्ये हार्वर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले तर १९५७-६० या काळात स्टॅनफर्ड विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी १९६१-६३ या काळात स्टॅनफोर्ड विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. सिडनी जवळील पॉट्स हिल येथे फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (parabolic) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळील कल्याणच्या परिसरात उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या सहाय्याने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. त्यानंतर डॉ. गोविंद स्वरूप यांनी दक्षिण भारतात उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारली. उटी येथील दुर्बिणीच्या यशानंतर महाराष्ट्रातील पुण्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या खोडद नारायणगाव येथे जगातील दुसर्या क्रमांकाची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले.

~~~~~~

प्रसारक : दिपक तरवडे

संकलन : प्रविण सरवदे, कराड

~~~~~~~~~

सृष्टी विज्ञानगाथा विज्ञान दिनविशेष मधून

आज सप्टेंबर

आज ज्येष्ठ दिग्दर्शक #प्रभाकर_पेंढारकर यांचा जन्मदिन.

जन्म. सप्टेंबर १९३३

प्रभाकर पेंढारकर हे चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सुपुत्र असलेल्या प्रभाकर पेंढारकर यांनी अनेक दर्जदार चित्रपटांची निर्मिती केली.

प्रभाकर पेंढारकर यांनी १९५२ ते १९५९ पर्यंत भालजी आणि व्ही. शांतराम यांच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९६१ पासून त्यांनी फिल्म डिव्हिजन सोबत काम केले.

भारतीय फिल्म डिव्हिजनच्या माध्यमातूनही अनेक डॉक्यूमेंटरीज त्यांनी तयार केल्या होत्या. भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी विभागाची एक शाखा म्हणजे 'बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन' जे भारताच्या सीमावर्ती भागांमध्ये रस्ते बांधण्याचे बिकट काम करते. त्यांच्यावर डॉक्यूमेंटरी बनवतांना पेंढारकरांना 'रारंग ढांग' ह्या कादंबरीची कल्पना सुचली आणि मराठी साहित्यातलं एक मंत्रमुग्ध करणारं लेणं त्यांनी घडवलं.

स्वतः लेखकच चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक असल्याने 'रारंग ढांग' वाचतांना एखादा सुंदर चित्रपट पाहतो आहोत असंच वाटत राहातं. अमोल पालेकर यांनी रारंग ढांगवर चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला होता पण संरक्षण खात्याने परवानगी नाकारली होती. (ज्याने कोणी ही कादंबरी वाचली असेल त्याला ह्या मागचे कारण सहज उमजेल) पेढारकरांनी सुनामी संकटावर 'चक्रीवादळ', काश्मीरच्या धगधगत्या पार्श्वभूमीवरची 'आणि चिनार लाल झाला' अश्या इतरही चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांना सर्वोत्तम शैक्षणिक चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १९६१ मध्ये भाव तिथं देव, १९८१ मध्ये बाल शिवाजी, १९८६ मध्ये शाब्बास सुनबाई हे चित्रपट काढले.

भालजी पेंढारकर यांचे सुपुत्र.. ‘प्रतीक्षा’, ‘आणि चिनार लाल झाला’, ‘रारंग ढांगया कादंबऱ्यांसहएका स्टुडिओचे आत्मवृत्तया पुरस्कार विजेत्या पुस्तकाचे लेखक.. ‘फिल्म्स डिव्हिजनमध्ये घडविलेली कारकीर्द.. असा प्रभाकर पेंढारकर यांचा जीवनप्रवासएक परीसस्पर्शया लघुपटाद्वारे उलगडला आहे. पेंढारकर यांच्याकडे लेखन सहायक म्हणून काम करण्याच्या माध्यमातून त्यांचा सहवास लाभलेल्या यशस्विनी गोडसे यांनीप्रभाकर पेंढारकर-एक परीसस्पर्शया लघुपटाची निर्मिती केली आहे. त्यांचे पती डॉ. मोहन गोडसे हे या लघुपटाचे निर्माते असून पेंढारकर यांच्यासमवेत फिल्म डिव्हिजनमध्ये काम केलेले अरुण गोंगाडे लघुपटाचे सहदिग्दर्शक आहेत. प्रभाकर पेंढारकर यांचे ऑक्टोबर २०१० रोजी निधन झाले.

प्रभाकर पेंढारकरएक परीसस्पर्शहा लघुपट.

https://www.youtube.com/watch?v=wibC6j6FBek

"रारंग ढांग" शुभांगी गोखले लेखक: प्रभाकर पेंढारकर

https://www.youtube.com/watch?v=ZaMEe4XudoU

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज ज्येष्ठ हार्मोनियम वादक #विश्वनाथ_कान्हेरे यांचा वाढदिवस.

जन्म. सप्टेंबर १९५१

विश्वनाथ कान्हेरे हे गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य होत. अनेक कलाकारांच्या गायनात त्यांनी संवादिनीची संगत केली आहे. ते पेटीवादनाचे एकल (सोलो) कार्यक्रमही करतात. कान्हेरे हे अत्यंत निष्णात हार्मोनियमवादक म्हणून ओळखले जातात. भीमसेन जोशींपासून जसराजांपर्यंत आणि माणिक वर्मापासून पद्मा तळवलकरांपर्यंत सर्व गायक कलाकारांना त्यांनी साथसंगत केली आहे. कान्हेरे यांनी त्यांच्या पुस्तकात नोंद केल्याप्रमाणे कुमार गंधर्वाखेरीज इतर सर्व प्रसिद्ध गायक कलाकारांबरोबर त्यांनी साथ केली आहे.

कान्हेरेंनी अत्यंत कष्टाने ही विद्या मिळवली आणि उमेदवारीच्या काळात प्रचंड हालअपेष्टा काढल्या. पुण्यात एका केशकर्तनालयाच्या पायरीवर दिवस काढले ते हार्मोनियम वादन आणि संगीत शिकण्याच्या जिद्दीने. अचानक राम मराठेंना आपल्या संगीत नाटकासाठी ऑर्गनवादकाची गरज भासली आणि त्यांनी पुण्यातून या मुलाला हुडकून काढले आणि त्यातून कान्हेरेंच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जितेन्द्र अभिषेकींचाही अत्यंत प्रेमळ सहवास कान्हेरेंना लाभला.

विश्वनाथ कान्हेरे यांनी 'तीव्र कोमल' हे आत्मचरीत्रपर पुस्तक लिहिले आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज सतार वादक पंडित #प्रतीक_चौधरी यांचा जन्मदिन.

जन्म. सप्टेंबर १९७१

ज्येष्ठ सतार वादक देबू चौधरी यांचे पुत्र पंडित प्रतीक यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सतारवादनाच्याच क्षेत्रात आपले जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. जन्मापासूनच सतारीचा झंकार ऐकत आलेल्या प्रतीक यांनी देशभरातील अनेक संगीत महोत्सवातून आपली कला सादर केली. बनारसच्या संकटमोचन संगीत महोत्सवाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. देशातील एक अत्यंत महत्त्वाचे कलावंत म्हणून प्रतीक यांना मान होता. अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यात सतारवादक म्हणून रसिकांमध्ये स्थान निर्माण करणे ही क्वचित घडणारी गोष्ट. ती प्रतीक यांनी साध्य केली होती. वडिलांचे छत्र असले, तरी मुलाला रसिकांसमोर स्वत: परीक्षा द्यावी लागते. ‘सांगे वडिलांची कीर्तीअसे म्हणत प्रयोगकलांच्या दुनियेत कोणालाच मानाचे स्थान मिळत नाही. प्रतीक यांनी ते स्वष्टाने मिळवले आणि त्यासाठी प्रचंड साधना केली. कलावंत म्हणून लौकिक मिळवलेल्यांपैकी फारच थोड्यांना संशोधन, अध्यापन यांसारख्या शैक्षणिक बाबींमध्येही रस असतो. देबब्रत यांच्याप्रमाणेच प्रतीक यांनीही दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. प्रतीक चौधरी यांना वडील देबब्रत हे गुरू म्हणून लाभलेच परंतु देबू यांचे गुरू उस्ताद मुश्ताक अली खाँ यांच्याकडे प्रतीक यांनाही सतारीचे शिक्षण घेता आले. प्रतीक चौधरी यांचे मे २०२१ रोजी करोनाने निधन झाले. त्यांचे वडील देबू चौधरी यांचे आठ दिवस आधी म्हणजे मे २०२१ रोजी निधन झाले होते. गुरू आणि शिष्य, पिता आणि पुत्र अशा दोघाही स्वरसाधकांचे निधन ही संगीतक्षेत्रासाठी चटका लावणारी घटना ठरली आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज बॉलीवूड मधील बोल्ड अभिनेत्री #राधिका_आपटे चा वाढदिवस.

जन्म. सप्टेंबर १९८५ पुणे येथे.

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. राधिकाला अभिनयात क्षेत्रात एक उत्कृष्ट अभिनेत्री मानले जाते. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये राधिकाने काम केलं आहे. त्यामुळे दिग्गज कलाकार म्हणून राधिका आपटेची ओळख आहे. राधिका आपटे एक्टिंग व्यतिरिक्त आपल्या वादग्रस्त आणि दिलखुलास वक्तव्यामुळे ओळखली जाते. राधिका आपटेने आपले सुरुवातीचे शिक्षण पुण्यात घेतले नंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून राधिकाने अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी घेतली. रंगभूमीपासून अभिनयाची सुरुवात केल्यांनतर राधिकानं कधीच मागं वळून पाहिलं नाही. राधिकाचा नेहमीच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करण्याकडे कल असतो. राधिकाच्या 'न्यूड सीन'ने इंटरनेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. 'पार्च्ड' या चित्रपटातील काही न्यूड सीन्स असलेला एक व्हिडिओ लीक झाला होता.

'वाह लाइफ हो तो ऐसी' या सिनेमात छोटेखानी भूमिकेद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी राधिका ही वेटिंग रुम, रक्तचरित्र, शोर इन सिटी, बदलापूर, हंटर, लायन, मांझी माऊंटन मॅन, पार्च्ड, फोबिया, कबाली,भूल,सेक्रेड गेम्स,लस्ट स्टोरीज, अंधाधुंद, पॅडमॅन यांसह अनेक गाजलेल्या हिंदी आणि साऊथच्या सिनेमांत काम करणारी मराठी इंडस्ट्रीतसुद्धा अॅक्टिव आहे. मराठीत तिने घो मला असला हवा, समांतर, तुकाराम, पोस्टकार्ड, लय भारी या चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.२००९ साली भारतातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेल्या 'अंतहीन' या बंगाली चित्रपटामध्ये तिने 'बृंदा' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. राधिका आपटे आणि बोल्ड सीन हे जणू आता समीकरणच तिच्या चित्रपटांबाबत बनले आहे. तिच्या 'पार्च्ड' या चित्रपटातील इंटिमेट सीन्सची बरीच चर्चा झाली होती. राधिकानं परदेशी बॉयफ्रेंड बेनिडिक्ट टेलरसोबत २०१२ मध्ये लग्न केलं. बेनिडिक्ट लंडनमध्ये राहतो. तिची नुकतीच नेटफ्लिक्सवर रात अकेली है ही वेबफिल्म भेटीला आला आहे. यात तिच्यासोबत नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. या बरोबरच ती आता इंग्रजी भाषेतील प्रोजेक्टमध्येही तिने काम केले आहे. वेडिंग गेस्टमध्ये देव पटेलसोबत काम केल्यानंतर ती आणखीन एका इंटरनॅशनल फिल्ममध्ये झळकली आहे. या चित्रपटाचे नाव आहे कॉल टू स्पाय. २०२० मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतचा राधिकाचाराते अकेली हैहा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील राधिकाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. नुकताच राधिकाचा 'ओके कंप्यूटर' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता, त्यात विजय वर्मा तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज दाक्षिणात्य मेगास्टार #मामूटी यांचा वाढदिवस.

जन्म. सप्टेंबर १९४८ चंदिरूर, आलप्पुषा जिल्हा, केरळ येथे

 मामूटी पूर्ण नाव मुहम्मद कुट्टी इस्माइल पानीपराम्बिल आहे. पण चित्रपटांसाठी त्यांनी त्यांचे नाव मामूटी ठेवले. ते घरात सर्वात मोठे आहेत. त्यांना दोन लहान भाऊ आणि बहीण आहे. १९६० मध्ये ते एर्नाकुलमला कुटुंबासोबत शिफ्ट झाले. त्यांनी येथेच एलएलबीचे शिक्षण घेतले.  २० वर्षाचे असताना अॅक्टिंग करिअरला सुरुवात करणाऱ्या मामूटी यांनी चित्रपटात येण्यासाठीस फार संघर्ष केला आहे. शिक्षण सुरु असतानाच त्यांनी चित्रपटात काम करणे सुरु केले पण काही दिग्दर्शकांनी त्यांना असे म्हणून रिजेक्ट केले की, त्यांचा चेहरा आणि आवाज योग्य नाही. पण तरीही त्यांनी हार मानली नाही आज त्यांची गणना साऊथच्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. लहानपणापासून मामूटी यांना अभिनयाचा शौक होता. त्यांनी अगोदरच ठरवले होते की त्यांना अभिनयात करिअर करायचे आहे. त्यांनी १९७१ मध्ये 'अनुभवांगल पालीचकल' या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्यांनी 'कालाचक्रम' (1973), 'देवलोकम' (1979) या चित्रपटात काम केले. पण हे चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत.

मामूटी यांनी १९८४ से १९९३ पर्यंत जवळपास ३०० हून अधिकचित्रपटात काम केले आहे. त्यांनी 'थीरम तेंदुन्ना थीरा' , 'रुग्मा' , 'कोट्टायम कुंजाचान' , 'कनलकट्टू' , 'सागरम साक्षी' , 'राजमनिक्यम' , 'मिशन ९० डेज', ' ट्रेन' , 'फेस फेस', ग्रेट फादर, कसबा, थाप्पना, रोडरम, इंस्पेक्टर बलराम, अमराम, किंग, ध्रुव, बिग बी  यांसारख्या चित्रपटात काम केले. मामूटी यांनी आतापर्यंत 300 चित्रपटात काम केले आहे. १९८१ साली त्यांना 'अहिंसा' चित्रपटासाठी बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर अवॉर्डही मिळाला.  त्यांना आतापर्यंत तीन नॅशनल अवॉर्ड, सात केरळ स्टेट फिल्म अवॉर्ड आणि तेरा फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले आहेत. १९९८ मध्ये भारत सरकारने त्यांनापद्मश्रीदेऊन गौरवले होते.

मामूटी यांच्याजवळ एक दोन नव्हे तब्बल ३५० हून अधिक कार आहेत. मामूटी यांनी काही वर्षापूर्वी देशातील पहिली मारुती खरेदी करण्याची इच्छा प्रकट केली होती. मामूटी यांनी त्यांच्या कारसाठी खास गॅरेज बनवले आहे. ते स्वतः कार ड्राईव्ह करतात. मामूटी यांच्याजवळ जॅग्वार XJ-L (कैवियर), टोयोटा लैंड क्रूज़र LC 200, फरारी, मर्सडीज और ऑडी के कई मॉडल, पोर्श, टोयोटा फॉर्च्यूनर, Mini Cooper S, F10 BMW 530d और 525d, E46 BMW M3, Mitsubishi Pajero Sport,फॉक्सवैगन पैसेट X2 और कई SUV's यांसारख्या कारचे कलेक्शन आहे.

मामूटी आणि साउथचे अभिनेते मोहनलाल चांगले मित्र आहेत. दोघांनी ५६ चित्रपटात सोबत काम केले आहे आणि हे सर्व ब्लॉकबस्टर ठरले आहेत. मामूटी यांना सिगरेट पिण्याचे व्यसन होते पण त्यांनी नंतर मुलांसाठी हे व्यसन सोडले. मामूटी २५६ कोटींचे मालक आहेत. पनाम्पिल्ली नगर, एर्नाकुलम येथे त्यांचा मोठा बंगला आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज ज्येष्ठ गायिका संगीतकार #मीनाताई_खडीकर यांचा वाढदिवस.

जन्म. सप्टेंबर १९३१

मीना मंगेशकर-खडीकर या अतिशय गोड आवाजाच्या गायिका अनेक गाजलेल्या भावगीतांच्या, बालगीतांच्या संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मीना या मा. दीनानाथ माई मंगेशकर यांच्या द्वितीय कन्या. घरात संगीत असल्यामुळे मीना बालवयातच गायला लागल्या. मा. दीनानाथ यांनी मीना यांना शास्त्रीय संगीत शिकवायला सुरुवात केली. मीनाच्या स्मरणशक्तीवर ते फार खूश असत. मा. दीनानाथांनी रागदारी चिजांच्या दोन वह्या तयार केल्या होत्या; एक लतासाठी, तर दुसरी मीनासाठी. मास्टर दीनानाथ नेहमी म्हणत, ‘‘माझी मीना शास्त्रीय संगीत उत्तम गाईल. तिचा आवाज शास्त्रीय संगीताला योग्य आहे.’’ मीना दहा वर्षांची असताना मा. दीनानाथांचे दु:खद निधन झाले आणि त्यांच्या आयुष्यातील शास्त्रीय संगीत गायिका होण्याचे स्वप्न अपुरे राहिले.

१९४२ सालच्या एप्रिल महिन्यात मा. दीनानाथांचे निधन झाले. त्याच महिन्यात लता मंगेशकरांनापहिली मंगळागौरया चित्रपटात काम मिळाले. नंतर मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल चित्रपट कंपनीत त्यांना काम मिळाले आणि लतासह मंगेशकर कुटुंबीय कोल्हापूरला आले. लता मंगेशकरांनी तिथे मीना यांना शाळेत घातले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढे कुणाकडे गाणे शिकणे शक्य झाले नाही; परंतु त्यांच्या आई, माईंच्या प्रोत्साहनामुळे, धाकामुळे घरी रियाझ सुरू होता.

मा. विनायकांनी १९४५ साली कंपनी मुंबईला आणायचे ठरविले. त्यामुळे लताबरोबर मीनाही मुंबईला आल्या मा. विनायकांच्या घरी राहू लागल्या. वडिलांच्या नाटक कंपनीचा वैभवकाळ बघितल्यामुळे मीना यांना मा. विनायकांच्या घरी असताना मोकळेपणा जाणवत नसे. त्यामुळे पुन्हा त्यांचे गाणे मागे पडले. मा. विनायकांनी मीनास त्यांची मुलगी नंदाबरोबर बालमोहन शाळेत घातले. काही काळानंतर लता यांच्या वेगळ्या बिर्हावडाची सोय नाना शंकरशेट चौकात झाली आणि मग सारी मंगेशकर भावंडे माईंबरोबर एकत्र राहू लागली. तेवढ्यात १९४७ साली विनायकराव वारले आणि मंगेशकर कुटुंबीयांना पुन्हा दु:खद परिस्थितीला सामोरे जावे लागले. हळूहळू लता यांना पार्श्वगायनाच्या क्षेत्रात काम मिळू लागले आणि मंगेशकरांना पुन्हा सुखाचे दिवस आले. त्यानंतर लता मंगेशकरांनी मीनास पुन्हा बालमोहन शाळेतून काढून सेवासदन शाळेत घातले. ‘माझं बाळया चित्रपटात मीना मंगेशकरांनी पहिल्यांदा गायन अभिनय केला. त्यास दत्ता डावजेकरांचे संगीत होते. प्रभातफेरीच्या प्रसंगामध्ये लता, मीना, आशा, उषा हृदयनाथ या सर्वांवरचला चला नवबालाहे गाणे चित्रित करण्यात आले होते. या गाण्यामध्ये त्या पहिल्यांदाकोरसमध्ये गायल्या. त्यानंतर मधली काही वर्षे त्या चित्रपटात अजिबात गायल्या नाहीत; पण उत्तमोत्तम गाणे ऐकणे मात्र सुरू होते, आणि सकाळी तंबोर्याबवर गाण्याचा रियाझ मात्र चुकता सुरू होता.

मा. विनायक गेल्यावर प्रफुल्ल कंपनीतील लोकांनी एक नवीन चित्रपट कंपनी काढली, तिचे नाव होते, ‘उदय कला चित्र’. या कंपनीमध्ये दिनकर . पाटील, माधवराव शिंदे इतर अनेक कलावंत होते. त्यांनी एक चित्रपट काढायचे ठरविले. त्याचे नाव होते, ‘राम राम पाव्हणं’, आणि त्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी लता मंगेशकरांवर सोपविली. या चित्रपटाच्या गीतकार शांताबाई शेळके या होत्या. या चित्रपटामध्ये लता यांच्या संगीत दिग्दर्शनात मीना खडीकरांनी दोन गाणी म्हटली. त्यांतील एक गाणे, ‘हात जोडिते, पदर पसरते, आई अंबिके तुलाहे एकलगीत होते, तर दुसरे गाणे, ‘माझ्या शेतात सोनंच पिकतंय, पानापानांत लखलख करतंयहे द्वंद्वगीत मीना यांनी सी. रामचंद्र यांच्याबरोबर गायले होते. ही दोन्ही गाणी अतिशय गाजली.

पुढे मीना वसंत प्रभू, वसंत देसाई, शंकरराव कुलकर्णी, सी. बालाजी . संगीतकारांकडे गायल्या. ‘तारकाया वसंत प्रभूंच्या चित्रपटात मीना खडीकर लता मंगेशकरांबरोबर द्वंद्वगीत गायल्या, तर संगीतकार वसंत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनात, ‘गाठ पडली ठकाठकाया चित्रपटात, ‘नको जाऊ नारी यमुनाकिनारीहे गीत लता उषा यांच्यासमवेत गायल्या. ‘अंतरीचा दिवाया चित्रपटात मीना आपले धाकटे बंधू हृदयनाथ यांच्या संगीत दिग्दर्शनात गायल्या, तरथोरातांची कमळाया चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी त्यांच्याकडून एक गाणे गाऊन घेतले.

वसंत हसला’ (‘कांचनगंगा’, संगीत : वसंत देसाई), ‘बावरले मी बावरते’ (‘एक होता राजा’, संगीत : शंकरराव कुलकर्णी), ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ (‘कांचनगंगा’, संगीत : वसंत देसाई), ‘दयाळा तूच आता सांभाळ’ (‘संत भानुदास’, संगीत : सी. बालाजी), ‘माझं नाव शोभलं मैना’ (‘पाटलाचं पोर’, संगीत : वसंत प्रभू) ही मीना खडीकरांची काही गाजलेली चित्रपटगीते होत. पण नंतर त्यांनी पार्श्वगायन संपूर्ण सोडून दिले. लता आणि मीना यांच्या आवाजात कमालीचे साम्य आहे. त्यामुळेपाटलाचं पोरया चित्रपटातीलमाझं नाव शोभलं मैनाही लावणी अनेक लोकांना लता मंगेशकरांनी गायलेली आहे असे वाटते.

पुढे त्या संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आल्या. माधवराव शिंदे यांच्या आग्रहामुळेमाणसाला पंख असतातया चित्रपटास त्यांनी संगीत दिले (१९६०). या चित्रपटात त्यांनी लता हृदयनाथ यांचा आवाज पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटातील लता यांनी गायलेलेये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंताहे गाणे आजही लोकप्रिय आहे. १९६२ साली मीना मंगेशकरांचे लग्न झाले आणि त्यांना योगेश रचना ही अपत्ये झाली. मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांनी पुन्हा संगीत क्षेत्राकडे वळायचे ठरविले आणि विशेषत: बालगीतांच्या क्षेत्रात कार्य केले. राजा मंगळवेढेकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके यांची बालगीते मीना खडीकरांनी निवडली आणि मुलगा योगेश, मुलगी रचना आणि शमा खळे (संगीतकार श्रीनिवास खळे यांची मुलगी) यांच्याकडून ती गीते बसवून घेतली.

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, ‘कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘खोडी माझी काढाल तर’, इत्यादी बालगीते ध्वनिमुद्रित झाली आणि ती लोकप्रियही झाली. आज लहान मुलांची तिसरी पिढीसुद्धा ही गाणी आवडीने ऐकते.

बालगीतांबरोबर मीना खडीकर यांनी काही भावगीतांनासुद्धा संगीत दिले आहे. त्यांची बहुतांश भावगीते उषा मंगेशकरांनी गायलेली आहेत. ‘साजणी सई ’, ‘तू नुसता मजसंगे’, ‘कान्हु घेऊन जायही उषा यांनी गायलेली भावगीते मीना खडीकरांनी स्वरबद्ध केलेली आहेत. ‘मनी जे दाटले’, ‘आनंदघन क्षणाचाही गाजलेली भावगीते त्यांनी प्रसिद्ध गायक श्रीकांत पारगावकर यांच्याकडून गाऊन घेतलेली आहेत.

मीना खडीकर यांनी मराठीव्यतिरिक्त हिंदी, पंजाबी बंगाली भाषांत गीते गायलेली आहेत. ‘रथ जगन्नाथाचाया चित्रपटाला त्यांनी संगीत दिले. त्यातील सुरेश वाडकरांच्या एका गाण्याला राज्य सरकारचा त्या वर्षीचा उत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्याच चित्रपटात मीना यांनी हिंदीतील पार्श्वगायक शैलेन्द्रसिंग यांच्याकडून मराठी भाषेत एक गीत गाऊन घेतले. आजचे तरुण गायक शान, सागरिका, दुर्गा शारंगदेव जसराज, साधना सरगम इत्यादींकडून मीना खडीकरांनी ते लहान असताना अनेक बालगीते गाऊन घेतली आहेत.

अद्वैत धर्माधिकारी

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज लेखक कवी #चंद्रकांत_खोत यांचा जन्मदिन.

जन्म. सप्टेंबर १९४० भीमाशंकर येथे.

चंद्रकांत खोत यांची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी सर्व मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेऊ दिले. पण त्यानंतर नोकरीधंद्याचे बघा असे सांगितले. मात्र शिक्षणाची ओढ असलेले चंद्रकांत खोत यांनी स्वत:चे पुढील शिक्षण स्वकष्टाने पूर्ण केले. एम.. झाल्यावर त्यांनी पीएच.डी. करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सत्तरच्या दशकातील कवितांचा मागोवा घेतला. पण पीएचडीसाठी गाईड मिळाल्यामुळे खोत यांचे डॉक्टरेटचे स्वप्न अधुरेच राहिले. पण तोपर्यंत खोत यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले होते. विशेष म्हणजे खोत यांना पीएचडी करता आली नसली तरी त्यांचाच मुळगावातील एका तरुणाने खोत आणि त्यांचे साहित्य यावर पीएच.डी. करुन डॉक्टरेटची पदवी मिळवली होती. चंद्रकांत खोत हे साहित्य क्षेत्रात पदार्पण केले ते कवी म्हणून. १९६९ मध्ये प्रकाशित झालेलामर्तिकहा त्यांचा पहिला कवितासंग्रह. यानंतर ते कादंबरी लेखनाकडे वळले. १९७० मध्ये पुरुष वेश्या या बोल्ड विषयावर आधारितउभयान्वयी अन्वयही त्यांची कादंबरी प्रसिद्ध झाली साहित्य क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली.

त्यानंतर दोन वर्षांनीबिनधास्तआणि १९७४ मध्ये प्रसिद्ध झालेलीविषयांतरही कादंबरीदेखील लैंगिक विषयावर आधारीत होती. या कादंबर्यां मध्ये कामगार वस्तीतील जीवन, या भागांमध्ये होणाऱ्या लैंगिक घुसमट याचे वर्णन अगदी हुबेहुब केले होते. “अबकडईया दिवाळी अंकाचे चंद्रकांत खोत यांनी अनेक वर्षे संपादन केले. रुळलेल्या वाटेवरून चालणाऱ्या मराठी साहित्यिकांना या अंकांनी आणि त्यांच्या वेगळ्या बोल्ड शैलीने अनेक धक्के दिले. खोत यांनी कादंबरी, चरित्र, कथा या साहित्यप्रकारात विपुल लेखन केले यामधील उल्लेखनीय म्हणजे; अंकाक्षर ज्ञान (संपादित अंकलिपी), अनाथांचा नाथ (साईबाबांचे आत्मनिवेदनात्मक चरित्र), अपभ्रंश (कवितासंग्रह किंवा कादंबरी), अलख निरंजन (नवनाथांच्या जीवनावर), गण गण गणात बोते (गजानन महाराजांचे चरित्र), चनिया मनिया बोर (मुलांसाठी कथा), दोन डोळे शेजारी (शारदामाता यांच्या जीवनावरील आत्मनिवेदनात्मक कादंबरी), मेरा नाम है शंकर (धनकवडीच्या शंकर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी), संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी), हम गया नही, जिंदा है (स्वामी समर्थांच्या जीवनावरील कादंबरी), दुरेघी (दोन दीर्घकथा). त्यासोबतच यशोदा या चित्रपटासाठी गीतलेखन देखील केले यामधीलघुमला हृदयी नाद हा”, “धर धर धरा”, “माळते मी माळतेही गीते लोकप्रिय ठरली; मुंबईच्या परळ-लालबागच्या वातावरणात वाढलेले खोत मालवणी मुलखातला ठसक्यात कुणाचाही मुलाहिजा ठेवता बोलत असत. १९९५ नंतर ते अज्ञातवासात गेले होते. सुमारे १५ वर्षांनी ते प्रकट झाले तेव्हा त्यांच्या डोक्या वरील फरकॅप गायब झाली होती. पठाणी वेशातील त्यांचे व्यक्तिमत्त्व लोप पावले होते. पांढरीशुभ्र मोठी दाढी त्यांच्या छातीवर रुळत होती. ते कुठे होते, हे त्यांनी कुणालाही सांगितले नाही. मात्र काही जण म्हणत असत की खोत हिमालयात गेले होते, कारण त्यांचा कल आध्यात्मिकतेकडे झुकला होता. भगवी वैराग्यवृत्ती अंगावर वागवत ते चिंचपोकळीजवळच्या डिलाईल रोडवरील साईबाबा मंदिरात बसून नास्मस्मरणात वेळ व्यतित केला. चंद्रकांत खोत यांचे अखेरचे जीवन अत्यंत हालाखीचे गेले. कारण त्यांना रहाण्यासाठी हक्काचे घर देखील नव्हते. त्यांनी अखेरचा श्वासही साईबाबा मंदिरात घेतला. १० डिसेंबर २०१४ रोजी त्यांचे निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट / सागर मालाडकर

ही माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री #मीरा_राजपूत चा वाढदिवस.

जन्म. सप्टेंबर १९९४

मीरा राजपूत ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं काही वर्षांपुर्वी बॉलिवूडमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. परंतु ती त्यामध्ये ती अपयशी ठरली परिणामी तिनं आपलं लक्ष दाक्षिणात्य सिनेमांच्या दिशेनं वळवलं. चित्रपटांसोबतच ती देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. मीरा राजपूत ही अभिनेता शाहिद कपूरची पत्नी. जुलै २०१५ रोजी शाहिद मीराचे लग्न झाले आहे. शाहिद कपूरपेक्षा मीरा राजपूत तब्बल १३ वर्षांनी लहान आहे. वयातील अंतर पाहून सुरुवातीला मीरा शाहिदसोबत लग्नास तयार नव्हती. लग्नाच्यावेळी शाहिद ३४ वर्षांचा तर मीरा २१ वर्षांची होती. दोघांनाही एक मुलगीमिशाआणि एक मुलगाजैन’, अशी दोन अपत्ये आहेत.

मीरा राजपूत ही बॉलिवूडमधली सगळ्यात लोकप्रिय स्टार वाईफ्समधील एक आहे. शाहिदपेक्षा मीरा सोशल मीडियावर जास्त सक्रीय आहे. मीरा कलाविश्वामध्ये सक्रीय नसली तरी ती काही जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. लाइमलाइटपासून दूर असली तर लाखोंच्या संख्येने तिचे चाहते आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टसाठी तिचे चाहते उत्सुक असतात.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज प्रख्यात तबलावादक पंडित #सदाशिव_पवार यांचा स्मृतिदिन.

जन्म.२८ जुलै १९३४

पं.सदाशिव पवार यांचे साता-यामधील मापरवाडी हे मूळगाव होते. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांना तबला वादनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे ते मुंबईत आले. प्रारंभीचे तबला वादनाचे शिक्षण पं. चतुर्भुज राठोड यांच्याकडे आणि पुढचे शिक्षण फारूखाबाद घराण्याचे खलिफा उस्ताद आमीर हुसेन खॉ यांच्याकडे घेतले. तब्बल पन्नासहून अधिक वर्ष पं.पवारांनी उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ साहेबांना साथसंगत केली. बारा तासांचा रोजचा रियाझ, आणि आपल्या स्वतंत्र वादनशैलीमुळे ते लोकप्रिय तर झालेच, परंतु गेल्या साठ-पासष्ट वर्षातील तमाम गायकांना साथ दिली.

पं. सदाशिव पवारांनी डोंबिवलीत १९८३ साली सदाशिव अॅकॅडेमी ऑफ म्युझिकची स्थापना केली होती त्यांनी जागतिक कीर्तीच्या गायक-वादकांचे कार्यक्रम डोंबिवलीकर रसिकांपुढे सादर केले.

देशभरातील बहुतांश सुविख्यात शहरांमध्ये त्यांचे साथसंगतीचे आणि एकल वादनाचे कार्यक्रम झाले. याबरोबरच भारताबाहेर अमेरिका, कॅनडा, मॉरिशस, अफगाणिस्थान, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आदी अनेक देशांमध्येही त्यांनी कार्यक्रम सादर केले.

पं. सदाशिव पवारांना डोंबिवली भूषण पुरस्कार, चतुरंग सन्मान, हलीन अॅकॅडेमी ऑफ सितारचा शरावती पुरस्कार, स्वरांकुर सन्मान, शारदा संगीत संस्थेचा सन्मान, आणि पं. राम मराठे स्मृति पुरस्काराने गौरवण्यात आले होते. पंडित सदाशिव पवार यांचे सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज 'व्हॉइस ऑफ किशोर' म्हणून ओळखले जाणारे गायक #जितेंद्र_भुरूक यांचा वाढदिवस.

जन्म. सप्टेंबर १९६५

जितेंद्र भुरूक यांना किशोर कुमारांचेएकलव्य शिष्य  म्हणता येईल कारण संगीतातील कोणतंही शास्त्रीय शिक्षण घेता किशोरदांना फक्तऐकून ऐकून’, जितेंद्र गाऊ लागले आणि किशोर कुमारांचा भास व्हावा इतकं ते तंतोतंत गातात. भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, अभिनेता, दिग्दर्शक आणि एक अवलिया हरहुन्नरी व्यक्तिमत्व किशोर कुमार यांची सेवा म्हणून त्यांच्या सर्व योगदानाची एक चळवळच जितेंद्र भुरूक योग्य आणि अजोड प्रयत्नांनी आपल्या परिवाराच्या आणि मित्रपरिवाराच्या मदतीने पुढे नेत आहेत. किशोर कुमार गायक अशी ओळख निर्माण झालेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरूक हे संगीत क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून योगदान देत आहेत. जितेंद्र भुरुक यांनी वाद्यवृंद जगत

आज सप्टेंबर

भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचं नाव मराठी रंगभूमीच्या संदर्भात आदराने आणि मानाने घेतलं पाहिजे. एकीकडे संगीत नाटकांचा पारंपरिक प्रवाह जोरदार असताना युरोपियन रंगभूमीवरील इब्सेनिक तंत्र मराठी रंगभूमीवर आणण्याचा जोरदार प्रयत्न करणारे ते अग्रणी नाटककार. स्वतंत्र सामाजिक-समस्याप्रधान नाटकांची परंपरा मराठीत निर्माण करण्यातही त्यांचा मोठा वाटा. त्यांनी १९१७ साली तत्कालीन हुंड्याच्या समस्येवर लिहिलेलं 'हाच मुलाचा बाप!' हे याचं ठळक उदाहरण. मामांनी पुढे 'सत्तेचे गुलाम', 'संन्याशाचा संसार', 'सोन्याचा कळस' आणि अशी बरीच समस्याप्रधान सामाजिक नाटकं लिहिली तरी त्यांच्या प्रारंभिक काळात त्यांना नाटककार म्हणून मान्यता मिळवून देणारं आणि त्या काळी 'एकच प्याला'सारखं गडकऱ्यांचं तालेवार नाटक समोर जोरात चालू असताना अत्यंत लोकप्रिय झालेलं नाटक म्हणजे 'हाच मुलाचा बाप!' १९१७ साली ते लोकमान्य नाटक मंडळींनी सादर केलं असलं तरी पुढच्याच वर्षी मूळ गद्य नाटकात पदं घालून ते 'ललितकलादर्श' या संस्थेतर्फे ख्यातनाम नट केशवराव भोसले यांनी सादर केलं. ती तारीख होती सप्टेंबर १९१८. या घटनेला शंभरहून अधिक वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने ज्ञानेश पेंढारकर यांनी 'ललितकलादर्श'तर्फे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणून त्याची शताब्दी साजरी केली. या नाटकात केशवराव भोसले, बापूराव पेंढारकर यांच्यापासून ते मा. दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, मामा पेंडसे अशा बलिष्ठ नटांनी वेगवेगळ्या काळात भूमिका केल्या आणि नाटक गाजत ठेवलं. 'ललितकलादर्श'च्या नव्या प्रयोगात मात्र सगळे नवे आणि जवळपास पहिल्यांदाच नाटकात उभे राहणारे कलावंत आहेत. तरीही त्यांनी नाटकाचा प्रयोग रंगवला. मामा वरेरकरांच्या प्रसन्न लेखनशैलीशी प्रामाणिक राहत मन:पूर्वकतेने प्रयोग वठवला आणि त्यातला संगीताचा भाग बहारदार केला. या प्रयोगात नटसंचाचं हौशीपण डोकावत असलं तरी संगीत नाटकाचा प्राण असलेलं संगीत मात्र तयारीच्या गायकनटांच्या तोडीने सादर केलं.

मामा वरेरकरांनी हे नाटक लिहायला घेतलं तेव्हा निश्चितपणे त्यांच्या डोळ्यासमोर 'सं. शारदा' होतं. बंगालमधल्या स्नेहलता नावाच्या १४ वर्षीय मुलीने हुंड्यापायी जाळून घेतल्याच्या प्रकरणाचा या नाटकात संदर्भ येतो. निष्कांचन झालेल्या दिगंबर पंतांच्या मुलीच्या, यमुनेच्या मनातही असेच स्वत:ला संपवण्याचे विचार येतात. नाटकात दोन घरं समोरासमोर आहेत. एकीकडे श्रीमंत रावसाहेबांचा दिवाणखाना दिसतो तर दुसऱ्या बाजूला दिगंबर पंतांचं भकास घर. रावसाहेबांचा सुशिक्षित मुलगा वसंत याने आपण हुंडा घेणार नसल्याचं जाहीर केलंय, त्याला त्याची बहीण मंजिरीचाही पाठिंबा आहे. पण धनलोभी रावसाहेबांना काही हे मंजूर नाही. त्यांना वठणीवर आणण्यासाठी यमुनाचा भाऊ डॉ. गुलाब हा वसंताच्या मदतीने एक नाटक रचतो आणि रावसाहेबांचेच दात घशात घालतो, याची चटपटीत आणि रंजक शैलीत मांडलेली गोष्ट म्हणजे हे नाटक. या नाटकाचं बेतलेपण उत्तरार्धात दिसून येतं आणि वसंत-यमुना आणि डॉ. गुलाब-मंजिरी यांच्या जोड्या जुळवून सुखान्त सिद्ध होतो. तरीही मामा वरेरकरांनी कायम राखलेली नर्मविनोदी शैली आणि मेलोड्रामाला पूर्णपणे दिलेला फाटा ह्या त्या काळाच्या संदर्भातल्या लेखनातल्या वेगळ्या गोष्टी उठून दिसतात. रावसाहेबांची व्यक्तिरेखा ही तर खास आहे. त्यांची वरकरणी संभावितपणे वागणारी आणि आतून पक्की व्यवहारी असलेली वृत्ती हा उत्तम विनोदाचा नमुना आहे. 'संशयकल्लोळ'मधल्या फाल्गुनरावाची इथे आठवण येते.

दिग्दर्शक ज्ञानेश पेंढारकर यांनी मूळ तीन अंकी आणि चार तासांहून अधिक चालणारं हे नाटक दोन अंकांत आणि सुमारे पावणे तीन तासांत बसवताना नाटकाचा ओघ चांगला ठेवला आहे. ते वेगवान झालं आहे आणि संकलनात कथानकाची संगती राखली आहे. पूर्वी दिवाणखान्याचा सेट आणि रंगवलेल्या पडद्यांच्या नेपथ्यावर होणारं हे नाटक आता सुटसुटीत द्विभाजित बॉक्ससेटमध्ये त्यांनी उभं केलं आहे. नाटकाची संवादशैली बोलीभाषेच्या जवळ जाणारी, सहज, ओघवती असली तरी कथेतला काळ, त्यातले संदर्भ, पात्रांची व्यक्त होण्याची तऱ्हा हे सर्व विसाव्या शतकाच्या आरंभकाळातलं आहे. त्यामुळे नाट्यरचना आपोआपच जुन्या सामाजिक नाटकांची होऊन जाते. ती तशीच ठेवून ज्ञानेश पेंढारकरांनी नाटक खेळतं ठेवलेलं आहे.

संकलन. #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ #बी_रघुनाथ यांचा स्मृतिदिन.

जन्म. १५ ऑगस्ट १९१३ 

बी.रघुनाथ यांनी १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले. बी.रघुनाथ यांनी १९३० ते १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली. मा. बी.रघुनाथ यांचे सप्टेंबर १९५३ रोजी निधन झाले. बी.रघुनाथ यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज अभिनेत्री शशि कपूर यांची पत्नी #जेनिफर_केंडल (कपूर) यांचा स्मृतीदिन.

जन्म. २८ फेब्रुवारी १९३४ यूके साउथपोर्ट येथे.

जेनिफर यांचे वडील गोफरे केंडल जेष्ठ रंगकर्मी होते. ते आपली पत्नी दोन्ही मुलीच्या सोबत कोलकाता येथे शेक्सपियरन ग्रुप चालवत असत. जेनिफर यांची बहीण फ्री केंडल यांनी 'शेक्सपीयर वाला' या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की, शशी आणि जेनिफर यांची पहिली ओळख एका कनफ्यूजनमुळे झाली होती. कोलकाताच्या एंपायर हाऊसनं जेफ्री यांच्या 'शेक्सपीयराना' आणि शशी कपूर यांच्या 'पृथ्वी थिएटर्स' यांना परफॉर्मन्सला एकच तारीख दिली होती. या अनोख्या लव्ह स्टोरीचा एक पैलू जेनिफर यांच्या वडिलांनीही उघड केला होता. या गोंधळानंतर असं ठरलं की, दोन्ही ग्रुप एक दिवस सोडून एक दिवस असं परफॉर्म करतील ज्यामुळे दोघांनाही पुरेसा वेळ मिळेल. पहिल्या दिवशी बॅकस्टेजला झालेल्या ओळखी नंतर १८ वर्षांचे शशी कपूर २३ वर्षांच्या जेनिफर यांच्या प्रेमात पडले. ही लव्ह स्टोरी सुरु झाल्यावर यात समस्या यायला सुरुवात झाली. ८० च्या दशकातील सिनेमांच्या टिपिकल लव्ह स्टोरी प्रमाणे या दोघांच्याही प्रेमाचा प्रवास सोपा नव्हता. जेनिफर यांच्या वडिलांनी आपल्या नाटकाच्या ग्रुपमध्ये शशी कपूर यांना घेतलं होतं. मात्र ते जेनिफर आणि शशी यांच्या प्रेमाच्या विरोधात होते. शशी यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीवरुन जेफ्री अनेकदा त्यांची थट्टा करत आणि यामुळे अनेकदा जेफ्री आणि जेनिफर यांच्यात भांडण होत असे.

शशी आणि जेनिफर यांनी मिळून जेफ्री यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. बराच काळ प्रयत्न केल्यानंतर शशी आणि जेनिफर यांनी शेक्शपीयराना ग्रुप सोडला. विदेशातील त्यांचे शो रद्द होऊ लागल्यावर शशी कपूर यांनी मोठा भाऊ राज कपूर यांच्याकडे मदत मागितली. भावाने मदत मागितल्यावर राज कपूर यांनी मुंबईच्या विमानाची दोन तिकीटं पाठवली. शशी आणि जेनिफर मुंबईला परतल्यावर कपूर कुटुंबीयांनी या दोघांचं लग्न लावून दिलं.

१९८१ साली आलेल्या ३६ चौरंगी लेन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार जेनिफर यांना मिळाला होता. त्यांचे इतर चित्रपट बॉम्बे टॉकी (1970), जूनून (1978), हीट एंड डस्ट (1983) घरे बायर (1984) हे होते. शशी जेनिफर यांना तीन मुलं आहेत. करण, कुणाल आणि संजना मात्र या तिघांपैकी कोणीही अभिनय क्षेत्रात नाहीत.

जेनिफर केंडल यांचे निधन सप्टेंबर १९८४ रोजी झाले.

https://www.youtube.com/watch?v=IcgNcxmISy0

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज हिंदुस्थानी संगीतपरंपरेतील एक थोर, प्रतिभावंत गायक #बाळकृष्णबुवा_इचलकरंजीकर यांची जन्मदिन.

जन्म. सप्टेंबर १८४९ मिरजजवळील बेगड येथे.

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे घराणे भिक्षुकांचे. त्यांचे वडील रामभट,यांनी भिक्षुकी सोडून साताऱ्याचे बाळाजीबुवा यांच्याकडे गाण्याचे शिक्षण घेतले. आपल्या मुलानेही गाणे शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले. बाळकृष्णाला भिक्षुकीची गोडी नसल्यामुळे गायन शिकण्यासाठी तो वयाच्या दहाव्या वर्षी घर सोडून बाहेर पडला. पुढे वडीलही वारले. फिरत फिरत तो धार येथे देवजीबुवांकडे गाणे शिकण्यास राहिला. तीन वर्षे त्यांच्याकडे शिक्षण घेतल्यानंतर गुरुपत्नीच्या त्रासामुळे बाळकृष्ण धार सोडून गाणे शिकण्यासाठी ग्वाल्हेरला गेला. तेथील हस्सूखाँचे शिष्य वासुदेवराव जोशी यांच्याकडे तो गायन शिकण्यास गेला. प्रथम वासुदेवबुवांनी गाणे शिकवण्यास नकार दिला. पण पुढे एक वर्षाने बनारस येथे त्यांनी बाळकृष्णबुवांना शिकविण्याचे कबूल करून, पुढे सहा वर्षे चांगले शिक्षण दिले. बाळकृष्णबुवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात आले. श्रीमंत बाबासाहेब घोपरडे, इचलकरंजीकर यांच्याकडे जवळजवळ ३० वर्षे दरबार-गवई म्हणून राहिले. पं. बाळकृष्णबुवा अत्यंत भरतीदार यशस्वी गायक होते. त्यांची गायकी साधी, निर्मळ, भारदस्त सौंदर्यपूर्ण होती. खास ग्वाल्हेर गायकीचा प्रचार महाराष्ट्रात बाळकृष्णबुवांनीच केला. मिरज आणि इचलकरंजी येथे त्यांचेकडे पुष्कळ लोक शिकू लागले. बाळकृष्णबुवांच्या आधीही महाराष्ट्रात ख्याल गायकी रूढ होतीच; पण तिच्या विस्तृत प्रमाणावरील प्रसाराचे श्रेय बाळकृष्णबुवांनाच दिले जाते. त्यांच्या दोन शिष्य-शाखा सर्वश्रुत आहेत. पहिल्या शाखेत पं. विष्णू दिगंबर पलुस्कर त्यांच्या गांधर्व महाविद्यालयातून शिकून तयार झालेले विनायकबुवा पटवर्धन, नारायणराव शंकरराव व्यास, ओंकारनाथ ठाकूर, वामनराव पाध्ये, प्रा. बा. . देवधर . नामवंत गवयांचा समावेश होतो; तर दुसऱ्या शाखेत मिराशीबुवा, अनंत मनोहर जोशी, त्यांचे चिरंजीव गजाननराव, तसेच शिष्य बापूराव गोखले त्यांचे शिष्य राजारामबुवा पराडकर . प्रसिद्ध गवयांचा अंतर्भाव होतो. १९२५ मध्ये त्यांचे चिरंजीव तरुण, सिद्धहस्त गायक अण्णाबुवा मृत्यू पावले, या घटनेचा त्यांच्यावर जबरदस्त आघात होऊन पं. बाळकृष्णबुवा हे इचलकरंजी येथे मृत्यू पावले. संगीतातीलभीष्माचार्य’, ‘गायनाचार्यह्या पदव्या रसिकांनी त्यांना स्वेच्छेने बहाल केल्या होत्या.

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे फेब्रुवारी १९२७ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे.

बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/ मराठी विश्वकोश

ही माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज दिग्दर्शक, निर्माते #मुकुल_आनंद यांचा स्मृतीदिन.

जन्म. ११ ऑक्टोबर १९५१.

मुकुल आनंद यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे चित्रपट भव्य असायचे. मुकुल आनंद यांचे काका इंदर राज आनंद हे एकेकाळचे प्रसिद्ध आणि यशस्वी संवादलेखक. प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक टिनू आनंद हा त्यांचा चुलत भाऊ. सख्खा छोटा भाऊ टीव्हीवर मालिका दिग्दर्शित करायचा. घरातच सिनेमाचा वारसा असल्यामुळे मुकुल आनंद यांना लहानपणापासूनच सिनेमात जायचं होते. मुकुल आनंद यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा होता 'कानून क्या करेगा'. 'केप फियर' या हॉलिवूड सिनेमावरून तो घेतला होता. 'कानून क्या करेगा' हा अतिशय उत्तम खिळवून ठेवणारा थ्रिलर होता. डॅनी डेंगझोप्पा हा खलनायक भूमिकेत होता. त्यांचा दुसरा सिनेमा 'एतबार ' पण हिचकॉकच्या 'डायल एम फॉर मर्डर ' वरून घेतला होता. पण मुकुल आनंद प्रसिद्धीच्या झोतात सर्वप्रथम आले ते 'सल्तनत ' या भव्य चित्रपटामुळे. या सिनेमात धर्मेंद्र आणि सनी देओल एकत्र आले होते. या सिनेमाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जुही चावला यांचा हा पहिला सिनेमा. ह्या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हा बॉलिवूडच्या इतिहासातला मैलाचा दगड मानला जातो. पण चित्रपट दणकून आपटला.

१९८७ साली आलेल्या 'इन्साफ ' मधून मुकुल आनंद यांनी काही काळ प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या विनोद खन्नाच्या कारकिर्दीचे पुनरुज्जीवन केलं. 'इन्साफ' च्या रुपाने  मुकुल आनंद यांना बॉक्स ऑफिसवरच पहिलं यश मिळालं. आदित्य पांचोलीला खलनायकी इमेजमध्ये सेट करणारा 'महा संग्राम' हा पण आपटला. तो पर्यत मुकुल आनंद यांची प्रतिमा अतिशय उत्तम पण तिकीट खिडकीवर अपयशी ठरणारा दिग्दर्शक अशी बनली होती.

पण याच सुमाराला उतरणीला लागलेल्या सुपरस्टार अमीताभ बच्चन यांच्या सोबत मुकुल आनंद यांची जोडी जमली आणि त्यांच्या कारकिर्दीला चांगल्या अर्थाने कलाटणी मिळाली. साल १९९० साली अमीताभ बच्चन यांचा राजकारणात भ्रमनिरास होऊन ते पुन्हा सिनेमात पुनरागमन करण्याची धडपड करत होते. पण बॉक्स ऑफिसवरच यश बच्चन यांना सातत्याने हुलकावण्या देत होत. 'तुफान', 'मै आजाद हू', 'अजूबा' तिकीट खिडकीवर दणकून आपटले होते. याचवेळेस मुकुल आनंद आणि अमीताभ बच्चन यांचा 'अग्निपथ' आला. मुकुल आनंद यांच्या बहुतेक सिनेमाच्या प्रेरणा या हॉलिवूड सिनेमावरून आलेल्या असत.

'अग्निपथ' या चित्रपटावर पण 'स्कारफेस'चा जाणवण्याइतका प्रभाव होता. 'अग्निपथ' हा बिग बजेट सिनेमा होता . या सिनेमातून कॅमेरावर्क आणि संकलन यात मुकुल आनंद दहा पावलं समकालीन दिग्दर्शकांपेक्षा पुढं गेला.

 या सिनेमात 'गॉडफादर' मधल्या मार्लन ब्रँडोप्रमाणे बच्चनने तोंडात कापसाचे बोळे ठेवून वेगळ्या आवाजात संवाद बोलण्याचा प्रयत्न केला होता. भारदस्त आवाज हाच ज्याचा यूएसपी आहे अशा बच्चनचा आवाज बदलण्याचा हा प्रयोग प्रेक्षकांना रुचला नसावा. चित्रपट तिकीट खिडकीवर फारसा चालला नाही. पण अमीताभ बच्चन यांना अभिनयासाठीचा कारकिर्दीतला पहिला वहिला राष्ट्रीय पुरस्कार 'अग्निपथ ' मुळे मिळाला.मुकुल-बच्चन जोडगोळीचा 'हम'. यात बच्चन यांच्या सोबतच रजनीकांत आणि गोविंदा हे मोठे स्टार पण होता.

'हम' बॉक्स ऑफिसवर चालला. यात अमीताभ बच्चन यांचा 'टायगर' आणि त्याची केसांना झटके देत मान हलवण्याची लकब प्रेक्षकांना खूप आवडली. नंतर बच्चनसोबत मुकुल आनंद यांनी 'खुदा गवाह' सिनेमा केला.  मुकुल आनंद यांचे निधन  सप्टेंबर १९९७ रोजी झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/अमोल उदगीरकर

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका लेखिका #भानुमती_रामकृष्ण यांचा जन्मदिन.

जन्म. सप्टेंबर १९२५

तेलुगु सिनेमा दक्षिण भारतीय फिल्म उद्योगाच्या पहील्या महिला सुपरस्टार म्हणून ओळखले जात असत. भानुमती रामकृष्ण यांना भारत सरकारने कला क्षेत्र में पद्म भूषण देऊन सम्मानित केले होते.

भानुमती रामकृष्ण यांचे २४ डिसेंबर २००५ निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज सप्टेंबर

आज गीतकार #पीएलसंतोषी यांचा स्मृतिदिन.

जन्म. ऑगस्ट १९१६

पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच 'अनोखे बोल' हा गीतप्रकार 'टिका लई कली दई' (चित्रपट - शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. 'कोई किसीका दिवाना ना बने' (सरगम), 'महफिल में जल उठी शमा' (निराला), 'तुम क्या जानो तुम्हारी याद में' (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती.पी.एल.संतोषी हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम गीतकार होते. मग ते पटकथाकार बनले, मग दिग्दर्शक. यानंतर त्यांना चित्रपट निर्माता होण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्यापायी ते कफल्लक बनले. या माणसाने दोन्ही हातांनी पैसा कमावला दहा हातांनी तो उधळला. नटीच्या प्रेमात पडले तिच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली. संतोषी यांनी १९५२ मध्ये 'शिनशिनाकी बबला बु'  या नावाचा चित्रपट निर्माण केला. त्याचे लेखक,  दिग्दर्शक, निर्माते गीतकार तेच होते. संगीतकार होते त्यांचे खास मित्र सी. रामचंद्र. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक उत्तम नमुना होता. या सिनेमात एकीकडे त्यांनी 'अरे बाबा, ये हसी बाबा, ये खुशी बाबा,  खा बाबा, पी बाबा, ' अशी निरर्थक गाणी लिहिली आणि दुसरीकडे मनाची व्याकुळता अतिशय आर्तपणे व्यक्त करणारे उत्कट गीतही लिहिली. रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि पी. एल. संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. 'शहनाई', 'खिडकी', सरगम' हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. पी. एल. संतोषीच्या 'हम पंछी एक डालके' या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एल.संतोषींबरोबर सी. रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी पी.एल.संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारापैकी एकाची तरी आढळतात. पी.एल.संतोषी यांचे निधन सप्टेंबर १९७८ रोजी झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट/ श्री.पद्माकर पाठक

ही माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=AtOBU_ziYMQ

https://www.youtube.com/watch?v=00hGh_v7dAs&t=281s

*आज सप्टेंबर *

आज ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक #बीआरइशारा यांचा जन्मदिन.

जन्म. सप्टेंबर १९३४.

बी.आर. इशारा यांचं मूळ नाव रोशनलाल शर्मा. हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मा.बी. आर.इशारा १९६० च्या दशकात मुंबईत आले. आणि त्यांचं नामकरण आधी बाबूराम आणि नंतर बी.आर. इशारा असं झालं. याच नावाने ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले. मुंबई मध्ये येईपर्यंत त्यांचा आणि सिनेमा या माध्यमाचा दुरान्वयानेही संबंध आला नव्हता. परंतु चहा-पाणी द्यायच्या अगदी किरकोळ कामापासून त्यांनी सुरुवात केली. त्यामुळेच त्यांची अनेक मान्यवरांशी ओळखी होत गेल्या. उपजत कलागुण, अंगभूत समज, उर्दू भाषेवर असलेली पकड आणि कष्ट घ्यायची तयारी यामुळे इशारांनी अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केलं. क्लॅप देण्यापासून सुरुवात करून त्यांनी दिग्दर्शकाच्या सेकंड असिस्टंट होण्यापर्यंत मजल मारली. १९७० मध्ये त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शनाला सुरुवात केली. पृथ्वीराज कपूर यांना घेऊन त्यांनीइन्साफ का मंदिरहा पहिला चित्रपट केला. हिंदी चित्रपटांत नवीन ज्वलंत विषयांची लाट आणण्याचे काम मा.बी. आर. इशारा यांनी १९७० च्या दशकात केले. त्यांनी १९६९ ते १९९६ या काळात ३४ चित्रपट बनवले. मा.बी. आर.इशारा यांनी चित्रपटसृष्टीत "बोल्डविषय आणले. कोणीही हाताळले नाहीत, अशा विषयांवर त्यांनी चित्रपट तयार केले. "चेतनामध्ये त्यांनी वेश्यां च्या पुनर्वसनासारखा विषय घेतला. हा चित्रपट २५ दिवसांत पूर्ण झाला होता. बंगल्यात चित्रीकरण करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यांनी "प्रेम शस्त्र‘, "औरत और इंतकाम‘, "वो फिर आयेगी‘, "हम दो हमारे दो‘, "जरूरत‘, "मिलापआदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दार उघडून दिले. त्यामध्ये परवीन बाबीचा समावेश होता. अमिताभ बच्चन, जया भादुरी, शत्रुघ्न सिन्हा, डॅनी, रेहाना सुलतान, विजय अरोरा, रीना रॉय, रझा मुराद आदी अभिनेत्यांसह क्रिकेटपटू सलीम दुराणी यांच्यासह इशारा यांनी काम केले. चित्रपटांचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अशा तिन्ही जबाबदाऱ्या त्यांनी कौशल्याने पार पाडल्या. ज्येष्ठ कलाकार रेहाना सुलतान ह्या बी. आर. इशारा यांच्या पत्नी होत. ज्येष्ठ हिंदी चित्रपट दिग्दर्शकबी.आर. इशारायांचेबाबूरामहे जीवनचरित्र. पुस्तकाचे लेखक डॉ.तापकीर इशारांच्या संपर्कात दीर्घकाळ होते. इशारांचं चरित्र त्यांनी आस्थेने लिहिलं आहे.

मा.बी.आर.इशारा यांचे २५ जुलै २०१२ रोजी निधन झाले. मा.बी.आर.इशारा यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=pF3FnvHi3sc

 https://www.youtube.com/watch?v=iz_xZvRXaPA

https://www.youtube.com/watch?v=ArOCOR4XnTw

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

सप्टेंबर - दिनविशेष

 

सप्टेंबर रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

 

१८१४: दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

 

१८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

 

१९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

 

१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

 

१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

 

१९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.

 

१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

 

१९७९: दिवाळ

सप्टेंबरदिनविशेष

 

सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.

 

♻️१६७९: सिद्दी जौहर आणि इंग्रजांचा मारा रोखत मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंचीचा तट उभारून पूर्ण केला.

 

♻️१८१४: दुसर्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या साहाय्याने उंदेरी-खांदेरी किल्ल्यांचा ताबा परत मिळवला.

 

♻️१८२२: ब्राझिलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.

 

♻️१९०६: बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.

 

♻️१९२३: इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.

 

♻️१९३१: दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.

 

♻️१९५३: निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.

 

♻️१९७८: मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.

 

♻️१९७९: दिवाळखोरी टाळण्यासाठी ख्रायसलर कॉर्पोरेशन ने अमेरिकन सरकारकडे . बिलियन डॉलर्सची मागणी केली.

 

♻️२००५: इजिप्तमधे पहिल्यांदाच बहुपक्षीय सार्वत्रिक निवडणुका

 

 

सप्टेंबर रोजी झालेले जन्म.

 

१७९१: आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: फेब्रुवारी १८३२)

 

१८०७: न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान हेन्री सिवेल यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १८७९)

 

१८२२: प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १८७४)

 

१८४९: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म. (मृत्यू: फेब्रुवारी १९२७)

 

१९१२: ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचा जन्म. (मृत्यू: २६ मार्च १९९६)

 

१९१५: प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री डॉ. महेश्वर नियोग यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९५)

 

१९२५: तामिळ तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री भानुमती रामकृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर २००५)

 

१९३३: मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा [Self Employed Women’s Association] या संस्थेच्या संस्थापिका इला भट्ट यांचा जन्म.

 

१९३४: बंगाली कवी कादंबरीकार सुनील गंगोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर २०१२)

 

१९३४: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक बी. आर. इशारा यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१२)

 

१९४०: लेखक संपादक चंद्रकांत खोत यांचा जन्म.

 

१९६७: भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी आलोक शर्मा यांचा जन्म

 

सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.

 

१६०१: विल्यम शेक्सपियर यांचे वडील जॉन शेक्सपियर यांचे निधन.

 

१८०९: थायलंडचा राजा बुद्ध योद्फा चुलालोके यांचे निधन.

 

१९५३: मराठी कवी आणि लेखक भगवान रघुनाथ कुळकर्णी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१३)

 

१९७९: कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक जे. जी. नवले यांचे निधन. (जन्म: डिसेंबर १९०२)

 

१९९१: कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचे निधन. (जन्म: जून १९०८)

 

१९९४: इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचे निधन. (जन्म: २० जून १९१५)

 

१९९७: हिन्दी चित्रपट निर्माते दिग्दर्शक मुकूल आनंद यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९५१)

 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment