शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*१३ आॅगस्ट इ.स.१६५७"किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*******

१३ आॅगस्ट इ.स.१६५७

विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब "शहाजीराजे भोसले" यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना "किल्ले सिंहगड" आदिलशहाला द्यावा लागला होता. तोच "किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ ऑगस्ट इ.स.१६५७

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बारा मावळातील खेडेबारे जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ आॅगस्ट इ.स.१६६६

औरंगजेब बादशहाने छत्रपती श्री शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे "कुंवर रामसिंग" हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती श्री शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले.

"कुंवर रामसिंग" हे मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" यांचे पुत्र होते तसेच छत्रपती शिवरायांची पुर्ण देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुंवर रामसिंगावर होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ आॅगस्ट इ.स.१७९५

महाराणी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी

दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (अहमदनगर जिल्ह्यातील) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. (जन्म: ३१ मे इ स.१७२५)

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

  जय जगदंब जय जिजाऊ

  जय शिवराय जय शंभूराजे

           जय गडकोट

       !! हर हर महादेव !!

🙏🏻🙏🏻🚩मराठा🚩🙏🏻🙏🏻

आपल्या सामर्थ्याची ओळख करून घ्यायची असेल तर सिंहगडावर जा.

अडचणीत असाल तर पन्हाळगडावर जा .

नवनिर्मितीचा ध्यास असेल तर राजगडावर जा .

आपल्या दूरदृष्टीचे मोजमाप करायचे असेल तर सिंधुदुर्गला भेट द्या .

कायदा व परस्थीती आपल्या विरोधात असेल तर प्रतापगडाला भेट द्या .

संपूर्ण आत्मविश्वासच गमावला असेल तर फक्त एकदाच रायगडावर जा ...

        जय शिवराय

शिवसकाळ मंडळी🙏

रक्ताचा एक थेंबही न सांडता,औरंग्याच्या अब्रूचे धिंडवडे काढणारा मुघलांचा पराभव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका...

# राष्ट्ररक्षक_मराठे🚩

# fearless_मराठा🚩

देवगिरी.. दख्खनी श्रीमंती.. एके काळी कोण्या यादवकुलाच्या श्रीमंतीचा वैभवाचा साथीदार.. यादव स्वतःला श्रीकृष्णचे वंशज समजत असत आणि देवांनी सुद्धा जेथे वस्ती करावी अशी सुंदर जागा म्हणून देवगिरी”...🚩

देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता अनेक शाह्यांनी यावर राज्य केले पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात...

किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत या भागाला कटकम्हणत असत या मध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल चाले सध्या या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे...

देवगिरीला एकुण मिळून चार कोट आहेत :

सर्वात बाहेरचा आहे तो अंबरकोटया कोटाची बांधणी निजामशाही सरदार मलिक अंबर याने केली आहे.. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात.. या कोटाच्या आतमधील तटबंदीला महाकोटअसे म्हणतात हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट.. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी कालाकोट’.. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्‌द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी अंबरकोटला पूर्वीच्या काळात सात वेशी होत्या या वेशींना आजुबाजुच्या गावांची नावे होती यापैकी लासूर वेसएक जी लासूर गावाकडे तोंड करुन उभी आहे...

देवगिरी किल्ल्या बाबत सभासदाने वर्णन केले :

दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडकाअसे केलेले आहे..या देवगिरी पूर्वी सुरगिरीया नावाने देखिल ओळखला जात असे..राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते असेही देवगिरीचे वर्णन आढळते या देवगिरीची देवगड व धारगिरीअशी ही नावे आहेत पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव दौलताबादचा किल्लाम्हणून प्रसिध्द झाले...

🚩The Great Maratha 🚩

" छञपती श्री शिवाजी महाराज ":

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

📜 १३ ऑगस्ट इ.स.१६६६

आग्र्याला येऊन शिवाजी महाराजाना जवळजवळ २ महिने झाले होते.कैदेतून सुटकेच्या कामी मदत करण्यासाठी महाराजाना मुघल सरदारांच्यावर बराच खर्च करावा लागे. जवळचे पैसे संपल्यावर महाराजानी रामसिंहाकडून ६६ हजार रुपये कर्ज घेतले. हा पैसा मुगल सरदारांवर खर्च करत महाराजानी पुन्हा त्यांच्यामार्फत औरंगजेबाला पत्र लिहिणे सुरू केले. पण औरंगजेब अत्यंत कपटी आणि धूर्त होता. महाराजांच्या अर्जावर त्याने कोणताही विचार केला नाही. याच दरम्यान आग्र्यातील सामान्य जनतेत शिवाजी महाराजांच्या बद्दल सहानुभूती वाढत होती,या कारणाने औरंगजेब मनातून धास्तावला होता. महाराजांचा एकदाचा काय तो निकाल लावण्याचे ठरवून त्याने अतिशय गुप्तपणे हालचाली करण्यास प्रारंभ केला. त्यानुसार महाराजाना विठ्ठलदासाच्या हवेलीत नेऊन ठार करण्याचे त्याने निश्चित केले. आपला बेत अतिशय गुप्त रहावा या हेतूने औरंगजेबाने महाराजांच्या निवासस्थानभोवतीची गस्त अत्यंत कडक केली. पण महाराजांच्या सुदैवाने ही गुप्त बातमी महाराजांच्यापर्यंत पोहीचलीच. महाराजांच्या छावनीभोवतीची गस्त अतिशय कडक करण्यात आली

🏇🏻🚩🏇��🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

📜 १३ आऑगस्ट इ.स.१६८०

(श्रावण वद्य १४, चतुर्दशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शुक्रवार)

सिद्दी यांची लुट!

        मध्यरात्री सिद्दीची ५  गलबते बंदरात शिरली आणि त्यांनी मराठ्यांचे १  भात भरलेले गलबत सिद्दीने पळविल्याचे कळून आले. त्यामुळे सिद्दीच्या लोकांचे चाबकाचे फटके वाचले. त्यांना तसेच हाकलण्यात आले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

📜 १३ ऑगस्ट इ.स.१७९५

.🚩पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन 🚩

                 चौंडी ता.जामखेड , जि.अहमदनगर

 हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान . याच गावात ३१ मे १७२५ रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला .पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी वयाच्या ८व्या वर्षी त्यांचा विवाह झाला.अहिल्यादेवी बालपणापासूनच चाणाक्ष, तल्लख व कुशाग्र बुद्धीच्या होत्या.खंडेराव राज्यकारभारावर अजिबात लक्ष देत नव्हते. पण अहिल्याबाईनी कधीही तक्रार न करता सासरे मल्हारराव यांनी  नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या सुनबाई यांचेवर सासरे मल्हारराव होळकर यांचा मोठा विश्वास होता.आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाई वर सोपवत असत.अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.  कुंभेरीच्या लढाईत पती  खंडेराव मरण पावले .त्यावेळी  सासरे  मल्हारराव म्हणाले " माझा खंडूजी गेला म्हणून काय झाले  तुझ्या रुपाने माझा खंडुजी  अजून जिवंत आहे तू सती जाऊ नकोस" अहिल्यादेवीने ते ऐकले.व मल्हाररावांनी अहिल्यादेवींच्या हाती सत्तेची सूत्रे दिली.

           महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा वारसा घेऊन  

  आदर्श राज्यकारभार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी असेच  होते. त्यांच्या  प्रत्येक कामात दूरदृष्टी दिसून येत . व्यक्तिगत जीवनात अहिल्याबाईंनी अनेक संकटांना तोंड देत सुमारे २७वर्षे राज्यकारभार केला. पण या सगळ्या कारभारात अहिल्यादेवींनी स्वतःची अशी अर्थनीती व जलनीती ठरवली .महिला असूनही राजसत्तेचे नेतृत्व कसे असावे  याचे उत्तम उदाहरण अहिल्याबाईंनी घालून दिले. राज्यातील शेतकरी कष्टकरी उपेक्षित वर्ग हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता .शिवाय कसण्यास दिलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी वीस फळझाडे लावावीत त्यातील 11 झाडे सरकारची आणि नऊ झाडे शेतकऱ्यांची असे सूत्र ठरवले होते. अहिल्यादेवींच्या जलनीती मध्येही  अर्थनीती प्रमाणेच सर्वसमावेशकता होती. त्याकाळी फड पद्धतीने पाणी वाटपावर अहिल्यादेवींनी भरपूर पैसे खर्च केले. ज्यादा पैसे खर्च करून पाणी दिल्याने उत्पन्न वाढीचा वायदा त्यांनी शेतकऱ्यांशी केला पण शेतकऱ्यांकडून उत्पन्ना एवढाच सारा वसूल केला .शेतीच्या पाण्याचे महत्त्व त्यांनी जाणले होते, पण पिण्याच्या पाण्यासाठीही पुढे अनेक भागात विहिरी बारव ,आड ,घाट यासारख्या योजना त्यांनी त्यांच्या कल्पनेतून उभारल्या त्यापैकी बहुतांश विहिरी आजही सुस्थितीत आहेत.ग्राम व्यवस्थेची घडी त्यानी  चांगली बसवली होती.गावोगावी न्याय देणारे पंचाधिकारी नेमले होते.राज्यकारभार करताना जुन्या रूढी-परंपरांना त्यांनी कायमच विरोध केला.पुरूषप्रधान व्यवस्थेत स्वच्छ आणि शिस्तबध्द कारभार करणार्या त्या रणरागिनी होत्या ,प्रचंड आत्मविश्वास, धाडस ,दूरदृष्टी, त्यागी वृत्ती असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. अहिल्याबाईंचा नंतर महेश्वर येथे १३ आॅगस्ट १७९५ ला वृद्धापकाळाने निधन  झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

***********

१३ आॅगस्ट इ.स.१६५७

विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब "शहाजीराजे भोसले" यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना "किल्ले सिंहगड" आदिलशहाला द्यावा लागला होता. तोच "किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ ऑगस्ट इ.स.१६५७

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बारा मावळातील खेडेबारे जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ आॅगस्ट इ.स.१६६६

औरंगजेब बादशहाने छत्रपती श्री शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे "कुंवर रामसिंग" हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती श्री शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले.

"कुंवर रामसिंग" हे मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" यांचे पुत्र होते तसेच छत्रपती शिवरायांची पुर्ण देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुंवर रामसिंगावर होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ आॅगस्ट इ.स.१७९५

महाराणी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी

दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (अहमदनगर जिल्ह्यातील) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. (जन्म: ३१ मे इ स.१७२५)

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

***********

१३ आॅगस्ट इ.स.१६५७

विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब "शहाजीराजे भोसले" यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना "किल्ले सिंहगड" आदिलशहाला द्यावा लागला होता. तोच "किल्ले सिंहगड" आज मराठ्यांनी पुन्हा जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ ऑगस्ट इ.स.१६५७

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बारा मावळातील खेडेबारे जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ आॅगस्ट इ.स.१६६६

औरंगजेब बादशहाने छत्रपती श्री शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे "कुंवर रामसिंग" हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती श्री शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले.

"कुंवर रामसिंग" हे मुघल सरदार "मिर्झाराजे जयसिंग" यांचे पुत्र होते तसेच छत्रपती शिवरायांची पुर्ण देखरेख ठेवण्याची जबाबदारी कुंवर रामसिंगावर होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

१३ आॅगस्ट इ.स.१७९५

महाराणी अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी

दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (अहमदनगर जिल्ह्यातील) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी, खंडेरावांशी झाले. (जन्म: ३१ मे इ स.१७२५)

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

No comments:

Post a Comment