छत्रपती राजाराम (तिसरे राजाराम) महाराज यांचा आज ( 31 जुलै१८९७ )



  

🌻छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा 🌻:

#शिवविचार_प्रतिष्ठान

छत्रपती राजाराम (तिसरे राजाराम) महाराज यांचा आज ( 31 जुलै१८९७ ) जन्मदिवस छत्रपती राजाराम महाराज हे १९२२ ते १९४० पर्यंत कोल्हापूरचे महाराज होते. त्यांचे वडील छत्रपती शाहू महाराज होते. एक उदार शासक, आपल्या राज्यातील दलित आणि उदासीन जातींच्या उन्नतीसाठी ते महत्त्वाचे होते. त्यांनी कोल्हापूर उच्च न्यायालय, आधुनिक गृहनिर्माण विकास, अद्ययावत पाणीपुरवठा प्रणाली, मोफत प्राथमिक शिक्षण आणि उच्च दर्जाची स्त्री शिक्षण यांची स्थापना केली. शेतीशास्त्रात त्यांना विशेष रुची होती. शाहू महाराजांनी जी कामे हाती घेतली होती त्यांचा विस्तार राजाराम महाराजांनी केला. त्यांनी अनेक व्यापारीपेठांची निर्मिती केली. औद्योगिक धोरणाची नवी घडी बसवली.

'दि कोल्हापूर शुगर मिल्स' या पहिल्या साखर कारखान्याची निर्मिती केली. लक्ष्मीपुरी व ताराबाई पार्क या वसाहतींची स्थापना केली.छत्रपती राजाराम महाराजांनी वडिलांप्रमाणेच समाजकारणात भाग

घेतला. त्यांनी ब्राह्मणेतर परिषदेचे व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. विविध खेळांना तसेच चित्रपटसृष्टीला त्यांनी संस्थानात प्रोत्साहन दिले.शेतकी शाळा व कॉलेज काढण्यात त्यांचा पुढाकार होता. अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातही ते सहभागी झाले. झुणका-भाकरीचे स्वराज्य' असे त्यांच्या कार्याला म्हटले जाई.औद्योगिक, व्यापारी, नवसुधारणावादी विकासाचा कार्यक्रम राजाराम महाराजांनी दिला. मात्र, आज कोल्हापुरातील औद्योगिक प्रगती संथ झाली आहे. त्या काळातील सूत मिल आणि साखर कारखाना बंद पडला आहे.

संस्थानिकांची नवी पिढी आता प्रतिमापूजनात रमली आहे.

 

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

 

📜 ३१ जुलै इ.स.१६५७

छत्रपती शिवरायांनी "दंडाराजपुरी" स्वराज्यात दाखल केले.

आदिलशहाच्या कारकिर्दीत नागोठाण्यापासून सावित्री नदी पर्यंतचा मुलुखाची सत्ता जंजिरा किल्ल्याच्या सिद्दीकडे होती. त्यांचे मुख्य ठाणे होते दंडा राजपुरी.सन १६१८ मध्ये सिद्दी सुरुलखान हा जंजिऱ्याचा पहिला हबशी सुभेदार होता.इसवीसन १६४२ मध्ये जंजिऱ्याचा सुभेदार सिद्दी अंबर मृत्यू पावल्यावर १६५५ पर्यंत सिद्दी युसूफ जंजिऱ्याचा सुभेदार होता.त्यानंतर सिद्दी फतहखान अधिकारावर आला. जंजिऱ्याच्या प्रदेशात पक्के पाय रोवलेले सिद्दी हे धर्मान्ध व अत्यंत क्रूर होते.दुबळ्या कोकणी प्रजेवर अत्याचाराची परिसीमा त्यांनी गाठली होती. जावळी पाठोपाठ उत्तर कोकण शिवाजी महाराजांनी जिंकल्यावर स्वराज्याची सीमा सिद्दीच्या मुलखाला जाऊन भिडली होती. प्रजेला जाचक ठरणाऱ्या या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी १६५७ च्या ऐन पावसाळ्यात महाराजांनी सिद्दीवर मोहीम काढायचे ठरवले. या मोहिमेसाठी महाराजांनी रघुनाथ बल्लाळ सबनीस यांची नेमणूक केली.त्यानुसार ५ ते ७ हजार सैन्यासह ते दंडा राजपुरीवर चालून गेले.रघुनाथपंतांनी दंडा राजपुरीवर हल्ला केला व जिंकून घेतले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 ३१ जुलै इ.स.१६८३

(श्रावण वद्य ३, नृतीया, शके १६०५, रुधिरोद्वारी संवत्सर, वार मंगळवार)

 

सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना पत्र !

            सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना लिहीलेले एक पत्र उपलब्ध असून त्यात, छत्रपती संभाजी महाराज स्वार होऊन राजापुरास गेले. फिरंग्यांशी बिघाड केला. रेवदंडा यासी वेढा घातला. या आशयाचे हे पत्र असून या सुमारास छत्रपती संभाजी महाराज स्वतः युद्ध नेतृत्व करत असल्याचे निदर्शनास येते.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 ३१ जुलै इ.स.१८५७

१८५७ च्या प्रथम स्वातंत्र्यलढ्यातील महाराष्ट्राचा सहभाग

कोल्हापूर:इथल्या २७ व्या नेटिव-देशी पायदळ तुकडीतील २०० सैनिकांनी ३१ जुलै १८५७ ला उठाव करून इंग्रज अधिकाऱ्यांच्या घरांवर हल्ले करून तिघा अधिकाऱ्यांना ठार मारले.नंतर स्थानिक जनता पण ह्या उठावात सामील झाली.ह्या उठावाचे नेते कोल्हापूर महाराजांचे धाकटे बंधू चिमासाहेब हे होते.

 

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 ३१ जुलै इ.स.१९४०

क्रांतिकारी उधमसिंग बलिदान दिन

लंडनमधल्या कोर्टात खटला चालून क्रांतिकारी उधमसिंगांना ३१ जुलै १९४० रोजी लंडनमधल्या पेंटॉनव्हिले तुरुंगातच फाशी झाली आणि त्यांचे प्रेतही तुरुंगाच्या आवारातच पुरले गेले.

१३ मार्च १८४० रोजी लंडनमधल्या कॅक्स्टन हॉलमध्ये ब्रिगेडियर जनरल सर पर्सी साईक्सचं अफगाणिस्तानबद्दल भाषण चाललं होतं. भाषण संपल्यावर भारतमंत्री लॉर्ड झेटलंडने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले. ह्या कार्यक्रमाला मुंबईचा पूर्वीचा गव्हर्नर लॉर्ड लॅमिंग्टन आणि पंजाबचा पूर्वीचा गव्हर्नर सर लुईस डेन हेही उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाला अजून दोन लोक उपस्थित होते - ते म्हणजे पंजाबचा पूर्वीचा अजू एक गव्हर्नर सर मायकेल ओड्वायर आणि मोहम्मद सिंग आझादहे नाव (नाव नीट वाचा म्हणजे गंमत कळेल!) घेऊन तिथे आलेला भारतीय क्रांतिकारी उधम सिंग!

 

कसेबसे पैसे जमा करून फक्त जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी लंडनमध्ये आलेल्या उधम सिंगांनी इथे लंडनमध्ये चरितार्थ चालवण्यासाठी अनेक फुटकळ कामे केली. गाड्या दुरुस्त करणे, रंगारीकाम, सुतारकाम वगैरे. एक सहसा माहीत नसलेली गोष्ट म्हणजे त्यांना अभिनयाचेही अंग होते. त्यांनी लंडनमध्ये असताना द फोर फेदर्सएलिफंट बॉयया दोन इंग्रजी चित्रपटांत कामही केले होते. (एलिफंट बॉयची लिंक खाली देतोय.) पण हे सगळं वरवरचं होतं. त्यांचा लंडनला यायचा मूळ हेतू जालियनवाला हत्याकांडाचा बदला घेणे हाच होता आणि ते संधीची वाटच पहात होते.

 

कॅक्स्टन हॉलच्या सभेचं आमंत्रण त्यांना मिळालं. मग त्यांनी तयारी सुरु केली. बोर्नमाऊथला जाऊन एका इंग्रज शिपायाकडून जाऊन एक जुनं पिस्तूल आणि गोळ्या विकत घेतल्या. एका पुस्तकात त्या पिस्तुलाच्या आकाराची पोकळी बनवून त्यात ते लपवलं. सोबत खिशात एक चाकूही घेतला.

 

१३ मार्च रोजीच्या सभेला उधमसिंगांनी मोहम्मद सिंग आझाद ह्या नावाने मस्त सूट - टाय - ट्रिल्बी हॅट वगैरे त्यावेळचा टिपिकल इंग्रजी पोशाख घालून हॉलमध्ये ऐटीत एंट्री केली. वर सांगितलेले साईक्सचे भाषण संपताच त्यांनी पुस्तकातून पिस्तुल काढून सहा गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या ओड्वायरला लागल्या आणि तो तिथेच गतप्राण झाला. दोन गोळ्या लॉर्ड झेटलंडला चाटून गेल्या. एक गोळी सर लुईस डेनच्या मनगटावर लागली तर एक गोळी लॉर्ड लॅमिंग्टनच्या हाताला लागली. दोन लोकांनी लगेच झडप मारून उधमसिंगांना पकडले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩


No comments:

Post a Comment