११ ऑगस्ट - दिनविशेष & स्मृतिदिन

 

! 11 ऑगस्ट  दिनविशेष ॥

 

! 11 ऑगस्ट  दिनविशेष ॥

 

             🔥 बुधवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 1999 - शतकातील शेवटचे खग्रास सुर्यग्रहण झाले

👉 1999 - बारा वर्षेखालील मुलांचा राज्यस्तरीय जलद बुध्दिबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला

            🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जन्म

 

👉 1950 - एॅपल इन्ककंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म

👉 1944 - फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ

 

मृत्यू

 

👉 2013 - भारतीय पक्षीशास्ञज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन

👉 2000 - दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी जयराज

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

             🔥 बुधवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 1999 - शतकातील शेवटचे खग्रास सुर्यग्रहण झाले

👉 1999 - बारा वर्षेखालील मुलांचा राज्यस्तरीय जलद बुध्दिबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला

            🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जन्म

 

👉 1950 - एॅपल इन्ककंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म

👉 1944 - फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ

 

मृत्यू

 

👉 2013 - भारतीय पक्षीशास्ञज्ञ आणि लेखक जफर फटहॅली यांचे निधन

👉 2000 - दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी जयराज

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏



११ ऑगस्ट

क्रिकेटपटू रामनाथ पारकर स्मृतिदिन

************

 

जन्म - ३१ ऑक्टोबर १९४६

स्मृती - ११ ऑगस्ट १९९९

 

भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले रामनाथ पारकर यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला.

 

भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले त्यांचे दोन्ही सामने इंग्लंड विरुद्धच होते. गुणवत्ता असूनही पारकर यांच्या वाट्याला केवळ दोनच कसोटी सामने आले. ७०च्या दशकात सुनील गावस्कर यांचे सलामीचे साथीदार म्हणून पारकर यांना पुरेशी संधी मिळाली नाही. ते कव्हर्समध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते. डॅशिंग फलंदाज अशी त्यांची इमेज होती.

 

१९७०-७१च्या रणजी हंगामात मुंबईचे अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय संघात खेळत असतानाही या संघाला रणजी अजिंक्यपद मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी न ठरलेल्या रामनाथ पारकर यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व करताना ८५ डोमेस्टिक सामन्यांत ४४५५ धावा केल्या.

 

रामनाथ पारकर यांचे ११ ऑगस्ट १९९९ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

क्रांतिकारक खुदिराम बोस स्मृतिदिन

************

 

जन्म - ३ डिसेंबर १८८९ (बंगाल)

स्मृती - ११ ऑगस्ट १९०८ (मुझफ्फरपुर)

 

भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात ३ डिसेंबर १८८९ ला झाला.

 

त्याच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि।वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यू झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.

 

बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्‍या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.

 

यातच खुदीरामने किंग्ज फोर्ड ला मारण्याची जबाबदारी स्वीकारली. ३० एप्रील १९०५ या दिवशी खुदीरामचा सहकारी प्रफुल्ल चक्रवर्ती याने किंग्ज फोर्ड याच्या गाडीवर एक बॉंब फेकला, परंतु तो चुकून दुसर्‍याच एका गाडीवर पडला. त्या गाडीतील दोन महिला ठार झाल्या, किंग्ज फोर्ड मात्र बचावला. या घटनेच्या दुसर्‍या दिवशी खुदीराम पकडले गेले तर प्रफुल्लने अटकेपूर्वीच आत्महत्या केली. खुदीराम यांच्यावर खटला भरण्यात आला. त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा शाबीत झाल्याने त्याला दि. ११ ऑगस्ट १९०५ या दिवशी फासावर जावे लागले. सशस्त्र क्रांतीत बॉंबचा उपयोग करणारे खुदीराम बोस हे पहिले क्रांतिकारक ठरले.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

११ ऑगस्ट

अभिनेता पी. जयराज स्मृतिदिन

************

 

जन्म - २८ सप्टेंबर १९०९

स्मृती - ११ ऑगस्ट २०००

 

पॅडी जयराज उर्फ पी. जयराज यांनी हिंदी, मराठी, गुजराथी चित्रपटात कामे केली. बोलपटाच्या काळात त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमधील चित्रपटात कामे केली.

 

पी. जयराज यांनी १७० हून अधिक चित्रपट मध्ये कामे केली. व्ही.शांताराम, पृथ्वीराज कपूर, मोतीलाल यांच्या बरोबर पी. जयराज यांनी कामे केली.

 

त्यांनी मोहर, माला, प्रतिमा, राजघर,।सागर अशा चित्रपटांचे दिग्दर्शन पण केले. १९८० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

पी. जयराज यांचे निधन ११ ऑगस्ट २००० रोजी झाले.

 

पी. जयराज यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

मानवशास्त्रज्ञ इरावती कर्वे स्मृतिदिन

************

 

जन्म - १५ डिसेंबर १९०५

स्मृती - ११ ऑगस्ट १९७०

 

प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञा इरावती कर्वे यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला.

 

त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव इरावती करमरकर. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांच्या स्नुषा व फर्ग्युसनचे माजी प्राचार्य दि.धों. कर्वे ह्यांच्या पत्नी होत. 

 

त्यांचा जन्म ब्रह्मदेशातील एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्यावेळी तेथे अभियंत्याचे काम करीत होते. इरावती कर्वे यांचे यांचे शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. १९२२ साली त्या मॅट्रिक पास झाल्या. १९२६ साली फर्ग्युसन महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषय घेऊन बी.ए. (ऑनर्स) झाल्या. त्यावेळी त्यांना रँग्लरर पु. परांजपे ह्यांचे बहुमोल साहाय्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणह्या विषयावर प्रबंध लिहून एम्‌.ए. ची पदवी मिळविली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.

 

मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणताह्या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून पी.एच्‌.डी. पदवी त्यांनी घेतली. तेथे असताना त्यांचा दि.धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिवाचे काम केले.

 

१९३९ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलजेमध्ये समाजशास्त्र व मानवशास्त्र ह्या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. ह्या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या. १९५५ साली लंडन विद्यापीठात व्याख्याता म्हणून एका वर्षासाठी त्यांनी पद भूषवले. मानववंशशास्त्र या विषयावर त्यांनी बरेच अध्ययन केले. आणि कुटुंब संस्थेवर आधारलेला किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडियाहा त्यांनी लिहिलेला ग्रंथ जगन्मान्यता पावला.

 

मराठी लोकांची संस्कृती’, ‘आमची संस्कृती’, ‘युगांत’, ‘धर्म’, ‘संस्कृती’, ‘महाराष्ट्र एक अभ्यास इत्यादी सदंर्भातील त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘गंगाजळहे त्यांचे ललित संग्रह. इरावती बाईंची भाषा साधी, सोपी, प्रसन्न आणि हलकासा विनोदाचा शिडकाव करणारी. संवेदनक्षम, भावोत्कटता हे त्यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्य होते. तर टवटवीत तरलता ही वाचकाच्या मनाला प्रफुल्लित करते.

 

मराठी लघुनिबंधाच्या विकासाचा एक टप्पा म्हणून इरावतीबाईंच्या लेखनाकडे पाहिले जाते. इरावती कर्वे यांनी केवळ खोलीत बसून संशोधनात्मक अभ्यास किंवा लेखन केले असे नाही, तर त्यांनी संशोधनासाठी भारतभ्रमण केले, अनेक वर्षे पंढरीची वारीही केली, अनेक जत्रा-यात्रा जवळून अनुभवल्या.

 

समाजाला गोधडीची उपमा देऊन त्यांनी त्यामागील व्यापक अर्थ सांगितला. वेगवेगळ्या रंगांच्या आकारांच्या तुकड्यांनी मिळून गोधडी हे अखंड वस्त्र तयार होते, त्याप्रमाणेच समाजातील निरनिराळी माणसे एकत्र येऊन समाज निर्माण होतो, माणसे एकमेकांच्या जवळ येतात, जोडली जातात, एकमेकांच्यात मिसळतात, व पुन्हा तुटली जातात, तरीही त्यांची समाजातील वीण मात्र पक्की असते.असा समर्पक विचार त्यांनी मांडला.

 

ललित व संशोधनात्मक-वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे लेखन त्यांनी विपुलतेने केले. वैचारिक लेखनाबरोबरच स्त्रीची सहृदयता, तरल सौजन्यशीलता, चिंतन या गुणांसह ललितलेखनही त्यांनी तितक्याच ताकदीने केले आहे. परिपूर्ती’, ’भोवरागंगाजलही काही उदाहरणे होत.ललितगद्याच्या अग्रदूतअसे त्यांना म्हटले जाई. अतिशय लवचीक, स्वाभाविक भाषाशैलीमुळे त्यांचे गद्य अधिकच खुले.

 

इरावतीबाईंनी मराठी व इंग्रजीतूनही लेखन केले. महाभारतावरील युगान्तया त्यांच्या ग्रंथास १९६८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला. युगान्तमध्ये त्यांनी महाभारतातील व्यक्तिरेखा अद्वितीय दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. या ग्रंथातून त्यांच्यातील स्त्री, संशोधिका व लेखिका एका वेगळ्याच उंचीवरून आपल्याला भेटते.

 

मराठी लोकांची संस्कृती, धर्म, हिंदूंची समाजरचना, महाराष्ट्र एक अभ्यास, Hindu Society An Interpretation, Maharashtra Its Land & People, Bhils of West Khandesh  अशी मौल्यवान ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.

 

एक ज्ञानभाषा म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचे महत्त्व ओळखले होते. त्यांचा संस्कृत भाषेचाही मोठा अभ्यास होता. रामायण-महाभारताची संस्कृतमधील रचना, प्रसिद्ध कवींची संस्कृत काव्ये, असंख्य सुभाषिते असे त्यांचे पाठांतर होते.

 

इरावती कर्वे यांचे ११ ऑगस्ट १९७० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

दिग्दर्शक भालचंद्र पेंढारकर स्मृतिदिन

************

 

जन्म - २५ नोव्हेंबर १९२१

स्मृती - ११ ऑगस्ट २०१५

 

मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, निर्माते दिग्दर्शक, आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९२१ रोजी झाला.

 

भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते.

 

मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली.

 

१ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली.

 

भालचंद्र पेंढारकर यांचे निधन ११ ऑगस्ट २०१५ रोजी झाले.

 

भालचंद्र पेंढारकर याना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

कलाकार बण्डा जोशी यांचा वाढदिवस

************

 

जन्म - ११ ऑगस्ट १९५२ (कोल्हापूर)

 

सुप्रसिद्ध निवेदक, हास्यकवी विडंबनकार आणि एकपात्री कलाकार बण्डा जोशी यांचा आज वाढदिवस.

 

बण्डा जोशी हे हास्यकवी आणि लेखक, नाट्य, रेडिओ आणि टीव्ही कलाकार, नाट्यसमीक्षक आणि ख्यातनाम एकपात्री प्रयोगकार, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. बण्डा जोशी हे जेव्हा एकपात्रीचा प्रयोग करतात तेव्हा त्यात त्यांच्या कविताही ते म्हणून दाखवतात. बण्डा जोशी हे आम्ही एकपात्रीया संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत.

 

बण्डा जोशी पुणे केंद्रावरून सुप्रभात नावाचा कार्यक्रम करीत. तो खूप लोकप्रिय ठरला होता. बण्डा जोशी यांनी ई टीव्हीच्या हास्यरंग’, साम वाहिनीच्या नववर्ष २०११आणी दूरदर्शनच्या पुणेरी पुणेकर, नाट्यावलोकन, बालचित्रवाणी, कंट्रीवाईड क्लासरुम, अशा टीव्हीच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

 

बण्डा जोशी यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर सुप्रभात, आरसा, हसवाहसवी; असे अनेक गाजलेले कार्यक्रम केले. बण्डा जोशी यांनी ठाणे, कऱ्हाड, सासवड साहित्य संमेलनात भाग घेऊन हास्यकवी म्हणून स्टेज गाजवले होते. तसेच पहिल्या मराठी हास्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान बण्डा जोशी यांना मिळाला होता.

 

बण्डा जोशी यांच्या हास्यपंचमीया एकपात्री कार्यक्रमांचे ५००० हून अधिक आणि खळखळाट या एकपात्री कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग झाले आहेत. खळखळाट' हा त्यांचा हास्यकविता आणि विडंबन गीतांचा संग्रह अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

 

बण्डा जोशी यांना २००९ मध्ये नाट्य समीक्षणासाठी माधव मनोहरपुरस्कार, २०१२ मध्ये आचार्य अत्रे पुरस्कार, २०१४ मध्ये सुखकर्ता पुरस्कार, व इतर अनेक पुरस्कार आणि मानसन्मानाने गौरवण्यात आले आहे. अलिकडेच पु.लं. च्या शैलीत लेख लिहिण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या लेखाची सर्वोत्कृष्ट लेख म्हणून निवड झाली.

 

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर बण्डा जोशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विनोद, किस्से, आणि विविध विडंबन अशा सादरीकरणातून विनोदाची पखरण करत आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

उर्दू शायर राहत इन्दौरी स्मृतिदिन

************

 

जन्म : १ जानेवारी १९५० (इंदौर)

स्मृती : ११ ऑगस्ट २०२०

 

उर्दू शायर राहत इन्दौरी एक भारतीय उर्दू शायर और हिंदी फिल्मों के गीतकार थे।

 

राहत का जन्म इंदौर में १ जनवरी १९५० में कपड़ा मिल के कर्मचारी रफ्तुल्लाह कुरैशी और मकबूल उन निशा बेगम के यहाँ हुआ। वे उन दोनों की चौथी संतान हैं। उनकी प्रारंभिक शिक्षा नूतन स्कूल इंदौर में हुई। उन्होंने इस्लामिया करीमिया कॉलेज इंदौर से १९७३ में अपनी स्नातक की पढ़ाई पूरी की और १९७५ मे बरकतउल्लाह विश्वविद्यालयभोपाल से उर्दू साहित्य में एमए किया। तत्पश्चात १९८५ में मध्य प्रदेश के मध्य प्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय से उर्दू साहित्य में पीएचडी की उपाधि प्राप्त की।

 

राहत इंदोरी जी ने शुरुवाती दौर में इंद्रकुमार कॉलेज, इंदौर में उर्दू साहित्य का अध्यापन कार्य शुरू कर दिया। उनके छात्रों के मुताबिक वह कॉलेज के अच्छे व्याख्याता थे। फिर बीच में वो मुशायरों में व्यस्त हो गए और पूरे भारत से और विदेशों से निमंत्रण प्राप्त करना शुरू कर दिया। उनकी अनमोल क्षमता, कड़ी लगन और शब्दों की कला की एक विशिष्ट शैली थी, जिसने बहुत जल्दी व बहुत अच्छी तरह से जनता के बीच लोकप्रिय बना दिया। राहत साहेब ने बहुत जल्दी ही लोगों के दिलों में अपने लिए एक खास जगह बना लिया और तीन से चार साल के भीतर ही उनकी कविता की खुशबू ने उन्हें उर्दू साहित्य की दुनिया में एक प्रसिद्ध शायर बना दिया था। वह न सिर्फ पढ़ाई में प्रवीण थे बल्कि वो खेलकूद में भी प्रवीण थे,वे स्कूल और कॉलेज स्तर पर फुटबॉल और हॉकी टीम के कप्तान भी थे। वह केवल 19 वर्ष के थे जब उन्होंने अपने कॉलेज के दिनों में अपनी पहली शायरी सुनाई थी।

 

राहत जी की दो बड़ी बहनें थीं जिनके नाम तहज़ीब और तक़रीब थे, एक बड़े भाई अकील और फिर एक छोटे भाई आदिल रहे। परिवार की आर्थिक स्थिति बहुत अच्छी नहीं थी और राहत जी को शुरुआती दिनों में काफी मुश्किलों का सामना करना पड़ा था। उन्होंने अपने ही शहर में एक साइन-चित्रकार के रूप में 10 साल से भी कम उम्र में काम करना शुरू कर दिया था।

 

चित्रकारी उनकी रुचि के क्षेत्रों में से एक थी और बहुत जल्द ही बहुत नाम अर्जित किया था। वह कुछ ही समय में इंदौर के व्यस्ततम साइनबोर्ड चित्रकार बन गए। क्योंकि उनकी प्रतिभा, असाधारण डिज़ाइन कौशल, शानदार रंग भावना और कल्पना की है कि और इसलिए वह प्रसिद्ध भी हैं। यह भी एक दौर था कि ग्राहकों को राहत द्वारा चित्रित बोर्डों को पाने के लिए महीनों का इंतजार करना भी स्वीकार था। यहाँ की दुकानों के लिए किया गया पेंट कई साइनबोर्ड्स पर इंदौर में आज भी देखा जा सकता है।

 

राहत इन्दौरी ११ अगस्त २०२० को दिल का दौरा आने की वजह से निधन हुआ।

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

११ ऑगस्ट

अभिनेता सुनील शेट्टी यांचा वाढदिवस

************

 

जन्म - ११ ऑगस्ट १९६१

 

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा आज वाढदिवस.

 

सुनिल शेट्टीचे पूर्ण नाव सुनिल लामा शेट्टी असे आहे. परंतु, हिंदी चित्रपट सृष्टीने त्यांना अण्णा हे टोपण नाव दिले आहे. सुनिल शेट्टी यांनी १९९२ मध्ये करिअरची सुरवात केली. त्याच्या अदाकारीला प्रेक्षकांची चांगलीच वाहवाह मिळाली आहे. काही चित्रपटा मधील त्याची अदाकारी कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे.

 

सुनिल शेट्टीची ओळख अ‍ॅक्शन हिरो अशी होती. मोहरा, धडकन, खेल, रक्त, भागम भाग, थॅंक्यू, कयामत, बॉर्डर इत्यादी चित्रपटा मधील त्यांची भूमिका स्मरणात राहणाऱ्या आहेत.

 

२००१ मध्ये त्यांना धडकन या चित्रपटातील अभिनयासाठी बेस्ट व्हिलनच्या फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत.

 

'धडकन' या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी सुनील ला २००१ या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अक्षय कुमार सोबत त्याने अनेक चित्रपट केले व बहुदा सर्वच चित्रपट यशस्वी ठरले.

 

अक्षय कुमार व सुनील शेट्टी या जोडीला भरपूर लोकप्रियता मिळाली. हिंदी चित्रपट सृष्टीत कलाकाराप्रमाणेच त्याने निर्माता म्हणूनही काम केले आहे. अ‍ॅक्टिंग करता करता ते आता हॉटेल व्यवसायात पण आहेत.

 

सुनील शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

संगीतकार अजय गोगावले यांचा वाढदिवस

************

 

जन्म - ११ ऑगस्ट १९७४

 

संगीतकार जोडी 'अजय-अतुल' पैकी अजय गोगावलेचा आज वाढदिवस.

 

सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्या मध्ये 'अजय-अतुल' हे नाव आवर्जून घेतलं जातं. केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषा मधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच मंत्रमुग्ध करतं. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानलाही त्यांनी मंत्रमुग्ध केले आहे.

 

या जोडीने आपल्या करीयरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली. विश्वविनायक या अल्बम मध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला. संगीतकार असण्या बरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक काँबो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्यांना त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो.

 

त्यांनी संगीतबद्ध केलेल्या सावरखेड एक गावया चित्रपटातलं वार्‍यावरती गंध पसरलाहे गाणं असो किंवा अगंबाई अरेच्चामधलं अतिशय मधुर चालीचं मन उधाण वार्‍याचेहे गाणं असो किंवा जत्रामधली; कोंबडी, दे धक्का, साडे माडे तीन, उलाढाल, नटरंग, जोगवा, बेधुंद, एक डाव धोबी पछाड, सही रे सही, लोच्या झाला रेसारखी मराठी नाटकांची, मालिकांची शीर्षकगीते, अनेक हिंदी चित्रपट, ‘झी मराठीचे गौरवगीत; अगदी मराठी हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सैराट मधील याड लागले, झिंगाट, सैराट झालं जी, आत्ताच बया या चारही गाण्यांनी  सर्वांनाच 'याडलावलं.

 

मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही? या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्मिली. इतकेच नव्हे, तर एस्.पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, ऋचा शर्मा, सुजाता अशा अनेक अमराठी गायकांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहेत. अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवले गेले आहे. 'जोगवा' या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

 

अजय गोगावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा वाढदिवस

************

 

जन्म - ११ ऑगस्ट १९५४ (लुधियाणा,पंजाब)

 

भारताचे उपयुक्त फलंदाज यशपाल शर्मा यांचा आज वाढदिवस.

 

आपल्या कसोटी कारकिर्दीत यशपाल शर्मा यांनी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कामगिरी केली. १९७७-७८ मध्ये उत्तर विभागाकडून खेळताना यशपाल शर्मा यांनी दक्षिण विभाग विरुद्ध दुलिप ट्रॉफीत १७३ धावांची मोठी खेळी होती. ज्यामुळे यशपाल शर्मा यांची राष्ट्रीय संघातील निवडीची दारे खुली झाली होती. त्यानंतर त्यांची १९७८ साली पाकिस्तान विरुद्धच्या वनडे सामन्यात निवड झाली होती. तर १९७९ साली कसोटीत निवड झाली होती.

 

यशपाल शर्मा यांनी १९७९ च्या इंग्लड दौऱ्यात कसोटीत चांगले प्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी ५८.९३ च्या सरासरीने ८८४ धावा केल्या होत्या. नवी दिल्ली येथील १९७९-८०च्या कसोटी सामन्यात यशपाल शर्मा यांनी ऑस्टेलिया विरुद्ध महत्त्वाचे शतक ठोकले होते. तर, पुढील वर्षात म्हणजेच १९८१-८२ मध्ये चेन्नई येथे इंग्लंड विरुद्दच्या कसोटीत त्यांनी गुंडप्पा विश्वनाथ यांच्या सोबत मिळून ३१६ धावांची मोठी भागीदारी रचली होती. यातील १४० धावा यशपाल यांच्या होत्या.

 

इंग्लंड दौऱ्यानंतर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतही यशपाल भारतीय संघाचा भाग होते. तसेच यशपाल शर्मा हे १९८३ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. १९८३ च्या वर्ल्डकप उपांत्य सामन्यात इंग्लंड विरुद्ध केलेली त्यांची आक्रमक फटकेबाजी विशेष गाजली. पण १९८३ -८४ च्या मालिकेत पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्यांचा फलंदाजी फॉर्म घसरला. ज्यामुळे त्यांना पुढे संघात सामील करण्यात आले नाही आणि नंतर त्यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली.

 

मात्र, तरीही पुढे काही काळ ते वनडे मध्ये खेळले. निवृत्ती नंतर यशपाल शर्मा यांनी २००५ पर्यंत राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर पुन्हा २००८ मध्ये त्यांची निवड समीतीत पुन्हा नियुक्ती झाली होती.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

११ ऑगस्ट

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस चा वाढदिवस

************

 

जन्म - ११ ऑगस्ट १९८५ (कोलंबो,श्रीलंका)

 

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा आज वाढदिवस.

 

जॅकलीन फर्नांडिसचे वडील श्रीलंकन तामिळ तर आई मलेशियन आहे. खुपच कमी चित्रपटा मध्ये काम करून जॅकलिन बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री बनली आहे.

 

इंडस्ट्रीतील सर्वात फिट आभिनेत्री मध्ये जॅकलिनचे नाव समाविष्ट आहे. जॅकलिनचे जिम मधील छायाचित्रे किंवा व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात.

 

जॅकलिनच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. या कोर्स मध्ये पदवी घेतल्यानंतर जॅकलिनने श्रीलंकेच्या एका टीव्ही चॅनेल मध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली. जेव्हा ती वृत्तवाहिनी मध्ये काम करत होती तेव्हा तिचे सौंदर्य तिथल्या लोकांना खूप प्रभावित करत होते.

 

जॅकलिन श्रीलंकेतील सर्वोत्कृष्ट दिसणारी पत्रकार होती. जॅकलिनला तिच्या लूकमुळे मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्यानंतर जॅकलिनने या क्षेत्रातही आपला हात आजमावला आणि ती ग्लॅमरच्या जगात आली. २००६ मध्ये तिने मिस श्रीलंका स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकून ती मिस श्रीलंका बनली.

 

२००६ साली आलेल्या अलादीन चित्रपटातून जॅकलिनला बॉलिवूड मध्ये पहिला ब्रेक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. यानंतर ती मर्डर २, किक, हाऊसफुल २, रेस यांसारख्या बॉलिवूड मधील अनेक नामांकित चित्रपटा मध्ये दिसली, पण मर्डर २ या चित्रपटा द्वारे जॅकलिनला प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली.

 

जॅकलिन शेवटच्या वेळी ड्राईव्ह या चित्रपटात दिसली होती, ज्यात तिचा नायक सुशांत सिंग राजपूत होता. जॅकलिन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

 

चित्रपटा व्यतिरिक्त जॅकलिन तिच्या अफ़ेअर्समुळे खुप चर्चेत होती. जॅकलिन बहरीनचा राजकुमार हसन बिन राशिद अल खलिफाला डेट करत होती, परंतु जेव्हा दिग्दर्शक साजिद सोबत जॅकलिनच्या अफेअरच्या अफवा समोर येवू लागल्या तेव्हा त्यांचे नाते तुटले. नंतर साजिद आणि जॅकलिनचेही ब्रेकअप झाले आणि सध्या ती अविवाहित आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

ACTIVE AND ADVANCED EDUCATION ALl TYPES:

पी. जयराज

 (पाइदीपती जयराजुलु नायडू)

(जन्म: 28 सितम्बर, 1909; मृत्यु: 11 अगस्त, 2000)

 

हिन्दी फ़िल्म जगत् के एकमात्र ऐसे अभिनेता थे, जिन्होंने मूक फ़िल्मों के दौर से लेकर वर्तमान दौर तक की अनेक फ़िल्मों में काम किया। हिन्दी सिनेमा के पर्दे पर सर्वाधिक राष्ट्रीय और ऐतिहासिक नायकों को जीवित करने का कीर्तिमान इसी कलाकार के साथ जुड़ा है। नौशाद जैसे महान् संगीतकार को फ़िल्मों में ब्रेक देने का श्रेय भी पी. जयराज को ही जाता है। उनकी ज़िंदगी हिन्दी सिने जगत् के इतिहास के साथ-साथ चलती हुई, एक सिनेमा की कहानी जैसी थी।

 

जीवन परिचय

 

जयराज का जन्म 28 सितम्बर, 1909 को निजाम स्टेट के करीमनगर ज़िले में हुआ था। पाइदीपती जयराजुलु नायडूउनका आन्ध्रीय नाम था। हैदराबाद में पले बड़े हुए जिससे उर्दू भाषा पर पकड़ अच्छी थी, वो काम आयी। उनके पिताजी सरकारी दफ्तर में लेखाजोखा देखा करते थे। उनकी प्रारंम्भिक शिक्षा हैदराबाद के रोमन कैथोलिक स्कूल में हुई। फिर तीन साल के लिए उन्हें वुड नेशनल कॉलेजके बॉडिंग हाउस में पढ़ाया गया जहां से उन्होंने संस्कृत की शिक्षा ली। फिर हैदराबाद के निजाम हाईस्कूलमें उर्दू पढी। बी. एस. सी. करने के बाद नेवी में जाना चाह्ते थे किंतु उनके बडे भाई सुन्दरराज इंजीनिय्ररिंग की पढाई के लिए लंदन भेजना चाह्ते थे। उनकी माताजी बड़े भाई को ज्यादा प्यार देतीं थीं और उनकी इच्छा थी इंग्लैंड जाकर पढाई करने की जिसका परिवार ने विरोध किया जिससे नाराज होकर, युवा जयराज, किस्मत आजमाने के लिए सन् 1929 में मुम्बई आ गये। उस समय उनकी उम्र 19 वर्ष थी।

 

समुन्दर के साथ पहले से बहुत लगाव था सो, डॉक यार्ड में काम करने लगे ! वहाँ उनका एक दोस्त था जिसका नाम रंग्याथा उसने सहायता की और तब, पोस्टर को रंगने का काम मिला जिससे स्टूडियो पहुंचे। उनकी मजबूत कद काठी ने जल्द ही उन्हें निर्माता की आंखों में चढ़ा दिया। महावीर फोटोप्लेज़ में काम मिला। उस समय चित्रपट मूक थे। कई जगह काम, ऐक्टर के बदले खड़े डबल का मिला, पर बाद में मुख्य भूमिकाएँ भी मिलने लगीं। मामा वरेरकर उनके आकर्षक और सौष्ठव शरीर को देखकर उनके व्यक्तित्व से बहुत प्रभावित हुए और उन्होंने अपनी पहली फ़िल्म में नायक की भूमिका के लिए चुन लिया। दुर्भाग्य से यह फ़िल्म बीच में ही बंद हो गई क्योंकि वरेरकर का अपने पार्टनर के साथ मनमुटाव हो गया था।

 

बतौर सहायक निर्देशक

 

भायखाला स्थित स्टुडियो में निर्देशक नागेन्द्र मजूमदार के पास उन्हें सहायक निर्देशक की नौकरी मिल गई। उनके साथ निर्देशन के अलावा संपादन, सिने-छांयाकन आदि का कार्य भी सीखा। दिलीप कुमार की पहली फ़िल्म प्रतिमाका निर्देशन जयराज ने किया था।

 

बतौर निर्देशक

 

पी. जयराज ने फ़िल्मों के निर्देशन का काम भी किया जिसमें बतौर निर्देशक पहली फ़िल्म थी-प्रतिभा’, जिसकी निर्मात्री देविका रानी थीं।

 

अभिनय की शुरूआत

 

फ़िल्मों में बतौर अभिनेता वर्ष 1929 में नागेन्द्र मजूमदार ने ही प्रथम फ़िल्म जगमगाती जवानीमें ब्रेक दिया। जिसमें माधव काले नायक थे और जयराज सहायक चूंकि माधव काले को घुड़सवारी और फाइटिंग नहीं आती थी, लिहाजा जयराज ने मास्क पहनकर उनका भी काम किया। जिसके मुख्य कलाकार माधव काले के स्टंट सीन भी उन्होंने ही किए थे। उसके बाद यंग इन्डिया पिक्चर्सने 35 रुपये प्रतिमाह, 3 वक्त का भोजन और 4 अन्य लोगों के साथ गिरगाम मुम्बई में रहने की सुविधा वाला काम दिया। अब जीवन की गाड़ी चल निकली। 1930 में रसीली रानीफ़िल्म बनी। माधुरी उनकी हिरोइन थीं। उसके बाद जयराज शारदा फ़िल्म कम्पनीसे जुड़े। 35 रुपये से 75 रुपये मिलने लगे। जेबुनिस्सा हिरोइन थीं जो हिन्दुस्तानी ग्रेटा के नाम से मशहूर थीं और जयराज जी गिल्बर्ट थे हिन्दुस्तान के। (Anthony Hope’s की फ़िल्म द प्रिज़नर ऑफ़ जेंडाही हिन्दी फ़िल्म रसीली रानीके रूप में बनी थी) बतौर नायक उनकी पहली फ़िल्म रसीली रानी’ 1929 में प्रदर्शित हुई माधुरी उनकी नायिका थीं। नवजीवन फ़िल्म्सके बैनर तले बनी नागेन्द्र मजूमदार द्वारा निर्देशित वह फ़िल्म बहुत सफल रही थी। मूक फ़िल्मों के दौर में वह फ़िल्म कई सिनेमाघरों में पांच सप्ताह चली थी जो उन दिनों बहुत बड़ी बात थी। मूक फ़िल्मों में तो जयराज के नाम की धूम मची हूई थी।

 

बोलती फ़िल्मों का नया दौर

 

1931 में जब आलम आरासे बोलती फ़िल्मों का दौर शुरू हुआ तो उन्होंने भी बोलती फ़िल्मों के अनुरूप खुद को ढाला। उनकी पहली बोलती फ़िल्म थी शिकारी1932 में प्रदर्शित इस फ़िल्म में जयराज ने एक बौद्ध भिक्षुक की भुमिका निभाई थी और सांप, बाघ, शेर जैसे हिंसक जानवरों के साथ लड़ने के दृश्य दिए। बोलती फ़िल्म के साथ संगीत शुरू हुआ। कई कलाकार प्ले बैक भी देने लगे पर 1935 से दूसरे गाते और कलाकार सिर्फ़ होंठ हिलाते जिससे आसानी हो गयी। अब सिनेमा संगीतमय हो गया। हमजोली फ़िल्म में नूरज

 

हाँ और जयराज जी ने काम किया था। राइफल गर्ल, हमारी बात आदि फ़िल्म मिलीं। जयराज की लोकप्रियता देखकर बाम्बे टॉकीजके मालिक हिमांशु राय ने अपनी कंपनी की फ़िल्म भाभीके लिए उन्हें बतौर नायक अनुबंधित किया, जिससे फ़िल्म-जगत् में सनसनी फैल गई। तब बाम्बे टॉकीजबाहर के कलाकारों को अपनी फ़िल्म में काम नहीं देता था। फांज आस्टिन द्वारा निर्देशित वह फ़िल्म भाभीबहुत सफल रही। मुम्बई में उस फ़िल्म ने रजत जयंती मनाई थी तो कलकत्ता में वह 80 सप्ताह चली थी। फिर आयी स्वामीफ़िल्म, जिसमें सितारा देवी थीं। हातिम ताई, तमन्ना, उस समय के सिनेमा थे। जयराज ने मराठी, गुजराती फ़िल्म भी कीं। अपने फ़िल्मी कैरियर में बतौर अभिनेता तो लगभग 300 फ़िल्मों में अभिनय किया जिनमें से 160 फ़िल्मों में नायक की भूमिकाएँ निभाईं। बतौर नायक उनकी अंतिम फ़िल्म थी-खूनी कौन मुजरिम कौन’, जो वर्ष 1965 में प्रदर्शित हुई थी। उसके बाद उन्होंने उम्र की मांग के अनुसार चरित्र भूमिकाएँ निभानी शुरु कर दीं। महात्मा गांधी की हत्या पर आधारित अमरीकी फ़िल्म- नाईन आवर्स टू रामा’, मार्क रोब्सन निर्मित में जी. डी. बिड़ला की भूमिका निभाने का भी अवसर मिला जो आज तक हिन्दुस्तान में प्रदर्शित नहीं हो पायी है। माया फ़िल्म में आई. एस. जौहर के साथ काम किया। यह दोनों अमरीकी फ़िल्में हैं। इन्डो-रशियन फ़िल्म परदेसीमें भी काम किया। दो बार दुर्घट्ना ग्रस्त हो जाने के कारण चलने फिरने में तकलीफ होने लगी तो फ़िल्मों से दूरी बनानी शुरु कर दी।

 

बतौर निर्माता

 

एक फ़िल्म जयराज जी ने बनाना शुरू किया था जिसमें नर्गिस, भारत भूषण और ख़ुद वे काम कर रहे थे। फ़िल्म का नाम था सागर। उनका बहुत नाम था सिने जगत में और कई सारे निर्माता, निर्देशक, कलाकार उन्हें जन्मदिन की बधाई देने सुबह से उनके घर पहुँचते थे। 1951 में सागर फ़िल्म बनायी, जो लॉर्ड टेनिसन की इनोच आर्डेनपर आधारित कथा थी। वह निष्फल हुई क्योंकि जयराज ने अपना खुद का पैसा लगाया था और उन्होंने कुबूल किया था कि व्यवासायिक समझ उनमें नहीं थी।

 

परिवार

 

1939 में अपने घनिष्ठ मित्र पृथ्वीराज कपूर के कहने पर उन्होंने सावित्री नाम की युवती से विवाह कर लिया। तब उन्होंने ही सावित्री के कन्यादान की रस्म निभाई थी। 1942 में उनका वेतन 200 रुपये प्रतिमाह से बढ़कर 600 रुपये प्रतिमाह हो गया। उनकी 5 संतान थीं, दो पुत्र, दिलीप राज व जयतिलक और तीन पुत्रियाँ, जयश्री, दीपा एवं गीता। सबसे बड़े दिलीप राज, जो ऐक्टर बने। उनके द्वारा अभिनीत के. ए. अब्बास की फ़िल्म शहर और सपनाको राष्ट्रपति पुरस्कार मिला था। जयराज का दूसरा पुत्र अमेरिका में रहता है। दूसरी बेटी थीं जयश्री, उनका विवाह राजकपूर की पत्नी कृष्णा के छोटे भाई भूपेन्द्रनाथ के साथ हुआ था। तीसरी बेटी थीं दीपा, फिर थी गीता सबसे छोटी।

 

मुख्य फ़िल्में

 

सन् 1938 – रायफल गर्ल

सन् 1939 – भाभी

सन् 1942 – खिलौना

सन् 1942 – मेरा गाँव

सन् 1943 – नई कहानी

सन् 1954 – बादबान

सन् 1954 – मुन्ना

सन् 1956 – अमरसिंह राठौड़

सन् 1956 – हातिमताई

सन् 1957 – परदेसी

सन् 1959 – चार दिल चार राहें

सन् 1962 – रजिया सुल्तान

 

पुरस्कार

 

50 के दशक में पी. जयराज को लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड से नवाजा गया। 1982 में उन्हें दादा साहेब फाल्के पुरस्कार भी मिला।

 

निधन

जयराज का निधन लीलावती अस्पताल, मुम्बई में 11 अगस्त सन् 2000 को हुआ और हिन्दी सिने संसार का मूक फ़िल्मों से आज तक का मानो एक सेतु ही टूट कर अदृश्य हो गया। 11 मूक चित्रपट और 200 बोलती फ़िल्मों से हमारा मनोरंजन करने वाले एक समर्थ कलाकार ने इस दुनिया से विदा ले ली।

 

प्रस्तुति : यशवंत वाघ(नाना)

संदर्भ : इंटरनेट

 

🎞️🎞️🎞️

आज १० ऑगस्ट

आज मराठी अभिनेत्री #आभा_वेलणकर यांचा वाढदिवस.

जन्म.१० ऑगस्ट १९६६ मुंबई येथे.

आभा वेलणकर यांनी अनेक वर्षे मराठी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. आभा वेलणकर यांनी अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. त्या बहुतेक मालिका, चित्रपट व नाटका मध्ये आईची भूमिका साकारण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत.

आभा वेलणकर यांचे बालपण गिरगावात गेले. शालेय शिक्षण आर्यन हायस्कूल व सेंट कोलंबा येथे झाले. त्यानंतर सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून पेंटिंग विषयात पदवी घेतली. कॉलेज मधे असताना इंटर कॉलेज स्पर्धांमधे काम करायला लागले. तेव्हा च ' दुर्गा झाली गौरी' या नॄत्यनाट्यात काम करत होते.

१९८६ साली राजन क्रिएशनचे दीपक (राजन) वेलणकर यांच्याशी लग्न झाले.

१९ वर्षांनंतर २००५ साली आविष्कार संस्थेतून चेतन दातार यांच्या कडे वर्कशॉपमध्ये सहभागी झाले आणि पुन्हा काम सुरू केले. त्यानंतर अनेक एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा तून कामं केली. २००६ मधे बायकोच्या नकळतचया नाटकातून या क्षेत्रात पदार्पण केले. नंतर   बऱ्याच वर्षांनी  दीपक वेलणकर यांच्या निर्मिती संस्थेचे झालं गेलं विसरून जाऊहे नाटक केले. स्मिता ची गोष्ट, चार दिवस सासूचे, लक्ष, स्वराज्य रक्षक संभाजी, तू अशी जवळी रहा, शुभमंगल ऑनलाईन, काय घडलं त्या रात्री अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत त्यांनी कावेरीबाईची भूमिका केली आहे. तसेच मनातल्या मनात, टकाटक, पार्टी, प्रीतम अशा चित्रपटातून काम केले.

त्यांचा सर्वात अलीकडचा चित्रपट डार्लिंगनावाचा चित्रपट आहे, ज्याचा प्रीमियर जानेवारी २०२१ मध्ये झाला होता. 'प्रीतम' या मराठी चित्रपटात पण त्यांनी अभीनय केला आहे. आभा यांची काही काळापूर्वी M X Player वर  "इंदोरी इश्क" ही वेब सिरीज रिलीज झाली आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज संगीत संयोजक #तुषार_देवल चा वाढदिवस.

जन्म.११ ऑगस्ट १९७८

तुषार देवल संगीतकार म्हणून नावारुपास आला. घडलंय बिघडलंय, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज, रणवीर कॅफे, हास्यसम्राट अशा अनेक शोजसाठी त्याने संगीत संयोजक म्हणून भूमिका बजावली. तसेच तो सध्या 'चला हवा येऊ द्या' या गाजत असलेल्या शोमध्ये संगीत संयोजकाची भूमिका पार पाडत आहे. तुषार देवलचे स्वाती सोबत ऑक्टोबर २००३ मध्ये लव्ह कम अरेंज मॅरेज झाले. दोघेही डोंबिवलीचे. तुषारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज अभिनेत्री #गौरी_नलावडे चा वाढदिवस.

जन्म.११ ऑगस्ट १९८७ मुंबई येथे.

गौरी नलावडेने आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण मुंबई महाराष्ट्र मधून पूर्ण केले आहे तसेच आपले ग्रॅज्युएशन भारती विद्यापीठांमधून पूर्ण केलेले आहे.

गौरीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

गौरी नलावडेने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २०१५ मध्ये प्रदर्शित झालेली शॉट फिल्म रिड्राफ्टपासून केली. मराठी चित्रपटांमध्ये तिने २०१६ मध्ये फ्रेंड्स या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करून आपले पाऊल ठेवले. या चित्रपटानंतर तिने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला अधम आणि कान्हा या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करत असतानाच तिला मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी मालिकांमध्ये गौरीने स्वप्नांच्या पलीकडे, अवघाची संसार, सूर राहू दे या सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला होता.

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर तिला मराठी नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली दोन फुल्या तीन बदामहे नाटक तिचे विशेष करून गाजलेले आहे. गौरी नलावडेचा गोदावरी हा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गौरी सोशल मीडिया नेहमी सक्रीय असते.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

एका गायकाला भूल देताना....

डॉ बालाजी आसेगावकर

भूलतज्ञ औरंगाबाद

नाथराव नेरळकर यांचे अचानक दुःखद निधन झाले. खूप वाईट वाटले. मला पाच सहा वर्षांपूर्वी नाथरावांना  जवळून अनुभवण्याचा योग आला. तसे ते आमचे दूरचे नातेवाईक, त्यामुळे ओळख होती. वर्षातून एखाद वेळेस तरी घरी जाणे-येणे असायचे. बऱ्याचदा त्यांचे संगीतही जवळून अनुभवण्याचा प्रसंग आला.

 निमित्त असे झाले की नाथरावांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यांच्या तपासणीअंती  त्यांना बायपास सर्जरी करावी लागणार हे स्पष्ट होते. पण ते सर्जरी करून घेण्यास काही केल्या ते तयार नव्हते. त्यांचे मेव्हणे डॉ मधुसुदन बोर्डे अमेरिकेत हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांचा मला फोन आला की नाथरावांना समजावून सांग की बायपास कशी आवश्यक आहे.  मी त्यांना भेटावयाला  गेलो. त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. ते म्हणाले हे पहा डॉक्टर मला बायपास सर्जरीची भीती नाही पण मी जरी या सर्जरीतुन सहीसलामत बाहेर आलो, पण माझ्या गळ्यावर व पर्यायाने गाण्यावर काही परिणाम झाला तर ते माझ्यासाठी खरे मरण असेल. सुधीर फडकेंच्या गाण्यावर बायपास सर्जरीनंतर परिणाम झाला होता ह्याचे उदाहरणही त्यांनी मला सांगितले. मी आणि डॉ बोर्डे हे फक्त डॉक्टर म्हणून त्यांचा विचार करत होतो तर नाथराव गायक म्हणून विचार करत होतो. एक भूलतज्ञ म्हणून मला ही माहीत होते की ह्या सर्जरीला पूर्ण भूल देणे आवश्यक आहे. ही पूर्ण भूल देताना स्वरयंत्रातून कृत्रिम  श्वासासाठी एक नळी टाकावी लागते. यामध्ये रुग्णाच्या स्वरयंत्राला इजा होण्याची शक्यता असते आणि  नाथरावांची  मूळ  भीती  हीच होती. मी नाथरावांना म्हणालो माझ्या पद्धतीने मी जास्तीत जास्त काळजी घेईल की तुमच्या स्वरयंत्राला काहीही त्रास होणार नाही. पण बऱ्याचदा कितीतरी गोष्टी  डॉक्टरांच्या हातात  नसतात. नाथराव काही सर्जरीला तयार झाले नाही.

पण काही दिवसांनी त्यांना पुन्हा हृदयाचा त्रास झाला व ते युनायटेड सिग्मा रुग्णालयात भरती झाले. आता बायपास सर्जरी शिवाय पर्याय नव्हता. सर्जरीच्या एक दिवस अगोदर मी त्यांना भेटायला गेलो तेव्हाही  "डॉक्टर माझा गळा वाचवा हो" अशी कळकळीची विनंती त्यांनी मला केली. सर्जरीनंतरपण आपला आवाज चांगला राहावा हीच अपेक्षा ते वारंवार व्यक्त करत होते. हे त्यांनी डॉ देवधरांना पण सांगितले. मी आणि डॉ देवधर सरांनी पुन्हा ह्या विषयी चर्चा केली आणि आपण काय काळजी घेऊ शकतो ह्याची उजळणी केली. मी घरी आलो पण मलाही प्रचंड ताण जाणवत होता. कारण सर्जरी व भुलेनंतर आवाज बदललेले अनेक रुग्ण मी जवळून पहिले होते.  नाथरावांचा आवाज जपण्यासाठी मी सर्व काही करणार होतो पण त्यांच्या आवाजाला जर काही झाले तर मीच निमित्तमात्र असेल असे उगाच वाटून मला ही झोप येत नव्हती. मी रात्री पुन्हा आमच्या पुस्तकातून काय काळजी घ्यायची ह्याचे वाचन केले. त्यांच्या स्वरयंत्राला काही होणार नाही यासाठी मला जे  काही करता येणे शक्य होते त्या  सर्व गोष्टींची यादी  बनवली. तरीही या पट्टीच्या गायकाच्या गळ्याला काहीच  होणार तर नाही ह्याची हमी मी देऊ शकत नव्हतो  हेच सत्य होते.

सर्जरी च्या दिवशी नेहमीपेक्षा मी आधीच पोहोचलो. कागदावरची यादी पुन्हा एकदा नजरेखालून घातली. नाथराव नेहमीप्रमाणे रिलॅक्स होते. सर्जरी यशस्वी पणे संपली. पण भूल उतरल्यावर,  त्यांचा आवाज ऐकल्यावरच  माझ्या मनावरचा ताण कमी होणार होता. संध्याकाळी भूल उतरवली गेली आणि मी स्वतः त्यांच्या स्वरयंत्राच्या आतील ती नळी काढली. त्यांना वाफ  वगैरे देऊन मी त्यांना विचारले "कसे आहात?"  त्यावर नाथराव म्हणाले "ठीक आहे " हे दोन शब्द बोलताच ते नंतर खणखणीत आवाजात म्हणाले "गळा वाचला की हो डॉक्टर….."  त्यांचे ते शब्द व किंचीत पाणावलेले डोळे पाहून मीही भारावून गेलो. त्या स्थितीतही त्यांचा गळा चांगला राहिला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

 समाजात नाथरावांसारखे आनंदाचे  झरे खूप कमी होत चालले  आहेत. असे झरे पाहणार्यातला तर सुखावतात आणि  त्यात संगीत रुपी आंघोळ करणाऱ्यांना तर  शुचिर्भूत करतात. कोणीही व्यक्ती  अशा आनंददायी झऱ्याच्या संपर्कात आली  की गंगास्नानाचे पुण्य नक्कीच मिळते.आपल्यासारख्या सामान्यांनी या झऱ्यांना  जपणे एवढेच करावे आणि मी एका वळणावर हे करू शकलो याचेच मला आत्मिक समाधान आहे.

आज ११ ऑगस्ट

आज मराठवाड्यातील जेष्ठ गायक तथा शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि भावसंगीतकार पंडित #नाथराव_नेरळकर यांचा जन्मदिन.

जन्म.११ ऑगस्ट १९३५ नांदेड येथे.

कृष्णनाथ गणपती नेरळकर ऊर्फ नाथराव नेरळकर यांचे वडील धर्माबाद येथील धनगिरिराज गिरणीत कार्यवाह म्हणून नोकरी करत असत. नाथराव यांचे काका धोंडोपंत यांना संगीताची आवड होती व ते मराठवाड्यातील गायनाचार्य पं.अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य होते. त्यांच्या प्रोत्साहनाने १९४७ पासून कृष्णनाथही गुंजकरांच्या संगीतशाळेत गायन शिकू लागले. लवकरच त्यांनी गायनात प्राविण्य मिळवले. शालेय वयातच त्यांनी नकला, गाणी यांनी रंगभूमी गाजवायला आरंभ केला. त्यांनी १९५७ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारदही पदवी विष्णू दिगंबर पारितोषिकासह मिळवली.

आरंभीच्या काळात कृष्णनाथ नेरळकरांनी सौभद्र’, ‘शारदा’, ‘मानापमान’, ‘कुलवधू’, ‘सुवर्णतुला’, ‘देवमाणूस’, ‘देव नाही देव्हार्या्त’, ‘सोन्याचा कळसया संगीत नाटकांतून भूमिका व गायन यशस्वीपणे केले. त्यांनी मराठी अभंग, गझल, भावगीते स्वरबद्ध करून त्यांचे शाम-ए-गझलसारखे कार्यक्रमही केले. मराठवाड्याखेरीज मुंबई, पुणे, कोल्हापूर, भोपाळ, बडोदा (वडोदरा), दिल्ली, कलकत्ता (कोलकाता), हैदराबाद, इ. ठिकाणच्या महोत्सवांत त्यांनी गायन केले. एच.एम.व्ही.ने त्यांच्या गायनाची ध्वनीफीत वितरित केली होती, तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठवाडा मुक्ती संग्राम’, ‘साक्षरता अभियानअशा ध्वनीफीतसंचांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले. अनेक प्रचलित रागांसह कृष्णकल्याणसारख्या अप्रचलित रागांत व पंचमसवारीसारख्या अनवट तालांत त्यांनी ढंगदार बंदिशी बांधल्या असून त्या मितवाया संग्रहातून  प्रसिद्धही केल्या आहेत. प्रभाकर कारेकर, श्रीकांत देशपांडे, आरती अंकलीकर इ. कलाकारांनी त्या मैफलींतून सादरही केल्या आहेत.

कृष्णनाथ नेरळकरांनी नांदेड येथे १९६४ पासून संगीतसभांचे आयोजन सुमारे दहा वर्षे केले, मग औरंगाबाद येथे युवक महोत्सव सुरू केला. तेरखडे हे गाव सांगीतिक विकासासाठी दत्तक घेतले. त्यांनी मराठवाडा संगीत प्रसारक मंडळाची स्थापनाही केली.

संगीत मैफलींच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलावंत नांदेडला येत आणि मितभाषी नाथरावांच्या प्रेमात पडत. या मितभाषी स्वभावामुळे, साहित्य व संगीत क्षेत्रातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, श्री. ना. पेंडसे, प्राचार्य राम शेवाळकर, हिराबाई बडोदेकर, गंगूबाई हनगल, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, शोभा गुर्टू, किशोरी आमोणकर, पं. जितेंद्र अभिषेकी, संगीतकार यशवंत देव, हार्मोनियम वादक आप्पा जळगावकर, पं. जसराज, बकुळ पंडित, सुरेश वाडकर, झाकीर हुसेन यांच्यासारख्या दिग्गजांशी स्नेह आणि जिव्हाळा निर्माण झाला. नांदेडच्या वास्तव्यात नाथराव संगीत विशारद परीक्षेत देशभरात प्रथम आले आणि त्यांचा पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सुवर्णपदकाने सन्मान झाला. प्रतिभा निकेतनमध्ये तेरा वर्षे संगीत शिक्षक, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कोलकाता येथील रिसर्च अकादमीचे गुरुपद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुखपद भूषविले. पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सव, उज्जैन येथील कालिदास संगीत महोत्सव, संभाजीनगरातील वेरुळ महोत्सव, नामधारी संगीत महोत्सवाच्या मैफली नाथरावांनी गाजवल्या. पु. ल. देशपांडे आणि कुसुमाग्रज या दोघांशी नाथरावांचा खूप जिव्हाळा. मैफलीचे गायक, संगीतनट, संघटक, संगीत दिग्दर्शक व बंदिशकार अशी बहुआयामी ओळख असणार्याै नाथराव नेरळकरांचे खरे श्रेय गायनगुरू म्हणून अधिक होती. संगीत शिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द नांदेडच्या प्रतिभा निकेतन विद्यालयात (१९५२ ते १९७३) सुरू झाली. नंतर औरंगाबाद येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात १९७३ पासून त्यांनी संगीत विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. औरंगाबाद विद्यापीठात संगीत विभाग सुरू करून तो वाढवण्याचे श्रेय नाथरावांना आहे. त्यांनी नांदेड येथे अनंत संगीत विद्यालय (१९५६ ते १९७३) व औरंगाबाद येथे (१९७३ पासून आजवर) हिंदुस्थानी संगीत विद्यालय सुरू केले. नाथरावांनी गुरुकुल पद्धतीने शिष्यांचा सांभाळ करत विद्यादान केले. शिवदास देगलूरकर, चित्रा देशपांडे, शिवराम गोसावी, संदीप देशमुख, प्रियदर्शनी कुलकर्णी व शशांक मक्तेदार असे अनेक शिष्य त्यांनी घडविले, त्यांपैकी काहींनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीनेही नाथरावांना मानद गुरू म्हणून पाचारण केले होते. नांदेड सेडून संभाजीनगरला स्थायिक व्हावे असा या दोन दिग्गजांचा नाथरावांना प्रेमळ सल्ला होता. हो-नाही करीत तो नाथरावांनी मानला. ५ जुलै १९७३ रोजी प्रतिभा निकेतनमधील संगीत शिक्षकाची नोकरी सोडली आणि संभाजीनगरात गोविंदभाईंनी त्यांना आपल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत सामील करून घेतले.

पंडित अण्णासाहेब गुंजकर यांची परंपरा चालविणारे धुरंधर कलाकार, अनेक शिष्य घडविणारे संगीत गुरू अशी पंडित नाथराव नेरळकर यांची ओळख होती.

नाथराव नेरळकरांना श्रेष्ठ गायक-अभिनेतापुरस्कार , ‘कलादानपुरस्कार , ‘उत्कृष्टतापुरस्कार , ‘औरंगाबाद भूषण’, ‘चतुरंगप्रतिष्ठानचा पुरस्कार  तसेच २०१४ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अशा अनेक पुरस्कार/ सन्मानांनी गौरविण्यात आले होते.संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळवणारे नाथराव हे मराठवाडय़ातील पहिलेच कलावंत होत. नाथरावांच्या पत्नी सुशीला यांनीही त्यांच्या सांगीतिक वाटचालीत हातभार लावला. नाथरावांचा संगीत वारसा अनंत नेरळकर (गायन), जयंत नेरळकर (गायन, हार्मोनिअम व तबलावादन) व हेमा उपासनी (गायन) ही त्यांची अपत्येही चालवत आहेत.

नाथराव नेरळकर यांचे २८ मार्च २०२१ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/चैतन्य कुंटे

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १० ऑगस्ट

आज ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेत्री #भावना तथा सुमन ताटे यांचा स्मृतिदिन.

जन्म.?

काचेचा चंद्र’, ‘माझं काय चुकलं?’, ‘स्पर्श’, ‘अश्वमेधयांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांतून तसेच पाठलाग’, ‘मुंबईचा जावईआदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेत्री भावना यांचे खरे नाव सुमन ताटे होते. सुमन ताटे यांची अभिनय कारकीर्द गाजली ती भावनाया नावानेच! त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात लिटिल थिएटरच्या मधुमंजिरी’, ‘जादूचा वेलइत्यादी बालनाटय़ांतून केली. बालरंगभूमीच्या सुधाताई करमरकर यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर साहित्य संघाच्या सुंदर मी होणारया नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांची हॅम्लेटमधील भूमिका चांगलीच गाजली. सतीश दुभाषींबरोबर त्यांनी देह देवाचे मंदिरया नाटकात काम केले होते. त्यांची भूमिका असलेल्या कलावैभवसंस्थेच्या काचेचा चंद्रया नाटकाला प्रचंड यश लाभले. त्यातली त्यांची भूमिकाही खूप गाजली, पुढे  गोवा हिंदु असोसिएशनची स्पर्श’, ‘सूर्याची पिल्लेही नाटके त्यांनी केली. त्यांच्या नाटय़सुमनया संस्थेतर्फे माझं काय चुकलं?’, ‘अश्वमेधइत्यादी नाटकांची निर्मिती करून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर ही संस्था सुस्थापित केली. अनेक चित्रपटांतूनही त्यांनी कामे केली. त्यांचा पाठलागहा राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपट सर्वाधिक गाजला. आपल्या नाटय़सुमनया संस्थेतर्फे त्यांनी अनेक यशस्वी नाटकांची निर्मितीही केली होती. जून २००९ मध्ये नाटय़ परिषदेनं त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. अभिनेत्री भावना यांचे ११ ऑगस्ट २००९ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज सुप्रसिद्ध निवेदक,हास्यकवी-विडंबनकार आणि एकपात्री कलाकार #बण्डा_जोशी यांचा वाढदिवस.

जन्म. ११ ऑगस्ट १९५२ कोल्हापूर येथे.

बण्डा जोशी हे हास्यकवी आणि लेखक, नाट्य, रेडिओ आणि टीव्ही कलाकार,नाट्यसमीक्षक आणि ख्यातनाम एकपात्री प्रयोगकार, असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. बण्डा  जोशी हे जेव्हा एकपात्रीचा प्रयोग करतात तेव्हा त्यात त्यांच्या कविताही ते म्हणून दाखवतात. बण्डा जोशी हे आम्ही एकपात्रीया संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. बण्डा जोशी पुणे केंद्रावरून सुप्रभात नावाचा कार्यक्रम करीत. तो खूप लोकप्रिय ठरला होता. बण्डा जोशी यांनी ई टीव्हीच्या हास्यरंग’, साम वाहिनीच्या नववर्ष २०११आणी दूरदर्शनच्या पुणेरी पुणेकर’, ’नाट्यावलोकन’, बालचित्रवाणी, कंट्रीवाईड क्लासरुम, अशा टीव्हीच्या अनेक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. बण्डा जोशी यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर सुप्रभात’,’आरसा’,’हसवाहसवीअसे अनेक गाजलेले कार्यक्रम केले. बण्डा  जोशी यांनी ठाणे, क-हाड, सासवड साहित्य - संमेलनात भाग घेऊन हास्यकवी म्हणून स्टेज गाजवले होते. तसेच पहिल्या मराठी हास्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्याचा मान बण्डा जोशी यांना मिळाला होता. बण्डा जोशी यांच्या हास्यपंचमीया एकपात्री कार्यक्रमांचे ५००० हून अधिक आणि खळखळाट या एकपात्री कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग झाले आहेत. खळखळाट' हा  त्यांचा हास्यकविता आणि विडंबन गीतांचा संग्रह अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे. बण्डा जोशी यांना २००९ मध्ये नाट्यसमीक्षणासाठी माधव मनोहरपुरस्कार, २०१२ मध्ये आचार्य अत्रे पुरस्कार, २०१४  मध्ये सुखकर्ता पुरस्कार, व इतर अनेक पुरस्कार आणि मानसन्मानाने गौरवण्यात आले आहे. अलिकडेच पु.लं.च्या शैलीत लेख लिहिण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या लेखाची सर्वोत्कृष्ट लेख म्हणून निवड झाली.

सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर बण्डा जोशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विनोद, किस्से, आणि विविध विडंबन अशा सादरीकरणातून विनोदाची पखरण करत आहेत.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

बण्डा  जोशी यांची वेबसाईट.

http://www.bandajoshi.com

आज ११ ऑगस्ट

आज हिंदी सिनेमाचे सुप्रसिद्ध गीतकार, कवी व शायर #राहत_इंदोरी यांचा स्मृतिदिन.

जन्म.१ जानेवारी १९५० इंदोर येथे.

राहत इंदोरी यांचे राहत कुरेशी हे त्यांचे खरे नाव. ते उर्दू भाषेचे माजी प्राध्यापक आणि एक चित्रकार देखील होते. याआधी ते इंदोरच्या देवी अहिल्या विद्यापीठात उर्दू साहित्याचे शिक्षण शास्त्रज्ञ होते. राहत इंदोरी यांनी आपले शिक्षण नूतन स्कूल इंदोर येथून पूर्ण केले  त्यांनी इंदोरच्या इस्लामिया करीमिया महाविद्यालयातून १९७३ साली पदवी संपादन केली आणि त्यांनी बरकत उल्ला विद्यापीठातून उर्दू साहित्यात १९७५ साली एम ए केले. १९८५ मध्ये राहत यांनी भोज विद्यापीठातून उर्दू साहित्यात पीएचडी मिळविली होती.

राहत इंदोरीजी यांनी सुरुवातीच्या काळात इंदोर येथील इंद्रकुमार महाविद्यालयात उर्दू साहित्य शिकवायला सुरुवात केली. राहतजींमध्ये जबरदस्त प्रतिभा, क्षमता, कठोर परिश्रम आणि शब्दशैलीची एक विशिष्ट शैली होती ज्यामुळे ते लोकप्रिय झाले. ते केवळ अभ्यासातच हुशार नव्हते तर ते खेळातही पारंगत होते, ते  शाळा व महाविद्यालयीन स्तरावर फुटबॉल व हॉकी संघाचे कर्णधारही होते. महाविद्यालयीन काळात त्यांनी जेव्हा पहिली कविता केली तेंव्हा  ते केवळ १९ वर्षांचे होते. राहत इंदोरींनी ४० ते ४५ वर्षांपासून असंख्य मुशायरा आणि कवि संमेलनात भाग घेतला. आपले काव्य वाचन त्यांनी भारतभर व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा अमेरीका, ब्रिटन, युएई, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, मॉरिशस, कुवेत, कतार, बहरेन,ओमान, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ येथे सादर केले होते. राहत इंदोरी यांनी अनेक चित्रपटांसाठी गीत लिहिले. यामध्ये मुन्ना भाई एमबीबीएस, मीनाक्षी, जानम, सर, खुद्दार, नाराज, मर्डर, मिशन कश्मीर, करीब, बेगम जान, घातक, इश्क, आशियां और मैं तेरा आशिक, दरार, गली गली में चोर है, हमेशा, द जेंटजलमेन, पहला सितारा, जुर्म, हनन, इंतेहा, प्रेम अगन, हिमालयपुत्र, पैशन, दिल कितना नादान है, वैपन, बेकाबू, याराना, गुंडाराज, नाजायज, टक्कर, मैं खिलाड़ी तू अनाड़ी आणि तमन्ना, यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ते छोट्या पडद्यावर 'द कपिल शर्मा' शोमध्येही सहभागी झाले होते. कुमार विश्वास आणि शबीना अदीब यांच्यासोबत ते २०१७ मध्ये पहिल्यांदा या शोमध्ये आले होते. जुलै २०१९ मध्ये अशोक चक्रधर यांच्यासोबत ते या शोमध्ये दुस-यांदा आले होते. याशिवाय सब टीव्हीच्या 'वाह वाह क्या बात है' या टीव्ही कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून आले होते.

राहत इंदोरी यांचे ११ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेत्री भावना तथा सुमन ताटे यांचा अभिनय; तसंच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा  सुरेश खरे यांनी मांडलेला पट..

काचेचा चंद्रहे काही माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं नाटक नव्हे. त्याआधी दोन वर्ष माझं स्वर जुळता गीत तुटेहे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं होतं. त्या नाटकाची नायिका होती- भावना. तिची माझी साधी ओळखही नव्हती. तिच्या अभिनयगुणांविषयीही मला फारशी माहिती नव्हती. कारण तिची फारशी नाटकं मी पाहिली नव्हती. स्वर जुळता..मधली भूमिका तशी अवघड होती. तिला ती कितपत पेलवेल, याविषयी मी साशंक होतो. निर्मात्याला तसं मी बोलूनही दाखवलं होतं. शिवाय मामा पेंडसेंसारखा बलदंड अभिनेता खलनायकाच्या प्रमुख भूमिकेत समोर होता. एकूण मला तरी सारंच अवघड वाटत होतं. पण नंदकुमार रावतेंच्या दिग्दर्शनाखाली नाटकाच्या तालमी सुरू झाल्या, नाटक हळूहळू उभं राहायला लागलं आणि माझ्या लक्षात आलं की, लहान चणीच्या या अभिनेत्रीत अभिनयाची विलक्षण जाण आहे.

एक दिवस तालीम संपल्यावर तिनं मला विचारलं, ‘‘जमतंय ना मला? बरं करतेय ना मी काम?’’ ‘‘बरं नाही, चांगलं!’’ मी म्हटलं. तिला खूप बरं वाटलं. तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. भावना हसायची खूप छान. तिचं हसणं निर्मळ होतं. तिच्या स्वभावासारखंच.

स्वर जुळता..मधली नायिका भावनानं सुरेख रंगवली. माझ्या या पहिल्यावहिल्या व्यावसायिक नाटकाची नायिका होती- भावना. पाठोपाठ येणाऱ्या काचेचा चंद्रया माझ्या नाटकाची नायिकाही तीच असणार आहे आणि ते नाटक गाजणार आहे, याची सुतराम कल्पना मला त्यावेळी नव्हती. त्यावेळी हे नाटक लिहिणं सोडाच, पण ते डोक्यातही नव्हतं.

काचेचा चंद्रव्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं ठरल्यावर निर्माते मोहन तोंडवळकरांनी नायिकेच्या भूमिकेसाठी भावनाचं नाव सुचवल्यावर मी नाहीम्हणायचं काही कारणच नव्हतं. काचेच्या चंद्रमधील नायिकेची भूमिका हे एक आव्हान होतं. पहिल्या अंकात गरीब कुटुंबातली, साधीसुधी शाळकरी मुलगी, दुसऱ्या अंकात कीर्तीच्या आणि ऐश्वर्याच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री, तर तिसऱ्या अंकात व्यसनात आकंठ बुडालेली, भावाची गुलाम बनून राहिलेली कळसूत्री बाहुली या साऱ्या छटा तिनं अत्यंत प्रभावीपणे दाखविल्या. शाळेतले मास्तर तिला शेवटी भेटायला येतात त्या प्रसंगातली तिची अगतिक, केविलवाणी नायिका पाहताना प्रेक्षक गलबलून जायचे. उलटय़ा काळजाच्या, थंड डोक्याच्या, पाताळयंत्री भावाच्या भूमिकेत डॉ. श्रीराम लागू आणि असहाय नायिकेच्या भूमिकेतली भावना यांचे नाटकातले प्रसंग चढत्या क्रमाने रंगत जायचे. डॉ. लागू काय किंवा भावना काय, पहिला प्रयोग असू दे किंवा पाचशेवा असू दे- पाटी टाकणं हा प्रकार नाही.. अभिनयात कसूर नाही.

भावनाचा आवाज खणखणीत होता. कधी कधी तो लाऊडव्हायचा- की मग वाचिक अभिनयातले बारकावे, आवाजातले चढउतार निसटायचे. तिला या त्रुटीची जाणीव होती. आपला अभिनय लाऊड होऊ नये यासाठी तिला प्रयत्नपूर्वक काळजी घ्यावी लागायची. काचेचा चंद्रची जातकुळी मेलोड्रामाची असल्यामुळे तेव्हा हे फारसं खटकलं नाही. भावनानं याबाबतीत कसोशीनं प्रयत्न केले. परिणामी हळूहळू हा दोष कमी होत गेला. नंतरच्या अनेक नाटकांत तिनं आवाजाचा वापर सुरेख केल्याचं दिसून आलं.

पपा सांगा कुणाचे?’ या माझ्या विनोदी नाटकात भावनाच्या अभिनयाचा एक वेगळाच पैलू पाहायला मिळाला. काचेचा चंद्रया नाटकाच्या यशामुळे निर्माण होऊ पाहणाऱ्या ट्रॅजेडी क्वीनया प्रतिमेला पपा सांगा कुणाचे?’ या नाटकातल्या तिच्या विनोदी भूमिकेने छेद दिला. डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे, राजा बापट, लता कर्नाटकी आणि भावना अशा उत्कृष्ट संचात या नाटकाचे प्रयोग झाले. या नाटकात एका विवाहित पुरुषाच्या प्रेयसीची भूमिका भावनानं साकारली. या भूमिकेतला तिचा मनमोकळा अभिनय पाहणं हा एक आनंद होता. कलावंत विविध प्रकारची भूमिका करतात; पण काही काही भूमिका अशा असतात, की त्या रंगवताना कलावंताला मनस्वी आनंद देतात. ते ती भूमिका एन्जॉय करतात. पपा सांगा कुणाचे?’ या नाटकातली भूमिका तिनं खूप एन्जॉय केल्याचं तिनं मला एकदा बोलता बोलता सांगितलं.

भावनानं माझ्या असूनी नाथ मी अनाथआणि शततारकाया आणखी दोन नाटकांत नायिकेच्या भूमिका केल्या. त्याही तिनं तितक्याच ताकदीनं केल्या. न कंटाळता अथक परिश्रम करायची तिची तयारी असे. लेखकाचे शब्द आणि दिग्दर्शकाच्या सूचना यांच्या बाहेर कधी ती गेली नाही. काचेचा चंद्रया नाटकाच्या प्रयोगांत अनेक कलाकार बदलले. काही आयत्या वेळीही बदलले गेले. पण तिनं कधी तक्रार केली नाही. उलट, नवीन कलाकारांना तिनं सांभाळून घेतलं. मुळातच ती सहनशील होती. कुणाला त्रास देणं तिच्या स्वभावात नव्हतं. निर्मात्यांना तिनं कधी नाचवलं नाही. ती सदैव प्रसन्न आणि हसतमुख असायची. भावनानं अनेक नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका केल्या. स्वत:च्या नाटय़सुमनया संस्थेतर्फे अजून यौवनात मी’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’ अशा काही नाटकांची निर्मितीही केली. त्यात तिने भूमिकाही केल्या. अबोल झालीस का?’, ‘देह देवाचे मंदिर’, ‘समोरच्या घरात’, ‘ऋणानुबंधया नाटकांतही तिच्या भूमिका होत्या. शं. ना. नवरे यांच्या मन पाखरू पाखरूआणि जयवंत दळवींच्या स्पर्शया नाटकांतल्या तिच्या अभिनयाला रसिकांची भरभरून दाद मिळाली. ती एक चांगली अभिनेत्री होती. पण जसं पाठलागचित्रपट यशस्वी होऊनही तिच्याकडे फारसे चित्रपट आले नाहीत, तसंच नाटकांत अनेक चांगल्या भूमिका यशस्वी करूनही नाटय़क्षेत्रात ती आपला स्वतंत्र ठसा उमटवू शकली नाही, याचं वाईट वाटतं. तिच्या नाटय़-कारकीर्दीचा गौरव म्हणून दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेल्या वर्षी तिला जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. ती तिची शेवटची भेट. कुणाच्या तरी आधारानं हळूहळू पावलं टाकत ती आली. एकेकाळी उत्साहानं सळसळणारी, आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकणारी हीच का ती भावना? माणसं ओळखून न येण्याइतकी दृष्टी अधू झालेली. पण आवाजावरून तिनं ओळखलं आणि दिलखुलास हसली. तिचं नेहमीचं प्रसन्न, निर्मळ हसू लोपलं नव्हतं. मला खूप बरं वाटलं. ‘‘अशीच कायम हसत राहा..’’ मी म्हटलं. कायम’! ‘कायमम्हणताना आपल्याला जाणीव नसते- या जगात कायमकाहीच नसतं. मृत्यू हा कायमला पूर्णविराम असतो. कायमचा!

सुरेश खरे.

संकलन. #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज बॉलिवूडची अभिनेत्री #जॅकलीन_फर्नांडिस चा वाढदिवस.

जन्म. ११ ऑगस्ट १९८५ श्रीलंकेतील मनामा बहरीन येथे.

जॅकलीन फर्नांडिसचे वडील श्रीलंकंन तामिळ तर आई मलेशियन आहे. खुपच कमी चित्रपटांमध्ये काम करून जॅकलिन बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री बनली आहे.

इंडस्ट्रीतील सर्वात फिट आभिनेत्रींमध्ये जॅकलिनचे नाव समाविष्ट आहे. जॅकलिनचे जिम मधील छायाचित्रे किंवा व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. जॅकलिनच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर तिने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. या कोर्समध्ये पदवी घेतल्यानंतर जॅकलिनने श्रीलंकेच्या एका टीव्ही चॅनेलमध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली. जेव्हा ती वृत्तवाहिनीमध्ये काम करत होती तेव्हा तिचे सौंदर्य तिथल्या लोकांना खूप प्रभावित करत होते. जॅकलिन श्रीलंकेतील सर्वोत्कृष्ट दिसणारी पत्रकार होती. जॅकलिनला तिच्या लूकमुळे मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्या होत्या. मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्यानंतर जॅकलिनने या क्षेत्रातही आपला हात आजमावला आणि ती ग्लॅमरच्या जगात आली. २००६ मध्ये तिने मिस श्रीलंका स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकून ती मिस श्रीलंका बनली. २००६ साली आलेल्या अलादीन चित्रपटातून जॅकलिनला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. यानंतर ती मर्डर २, किक, हाऊसफुल २, रेस यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक नामांकित चित्रपटांमध्ये दिसली, पण मर्डर २ या चित्रपटापद्वारे जॅकलिनला प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली. जॅकलिन शेवटच्या वेळी ड्राईव्ह या चित्रपटात दिसली होती, ज्यात तिचा नायक सुशांत सिंग राजपूत होता. जॅकलिन सोशल मीडियावर खूप अॅतक्टिव्ह असते आणि ती दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.चित्रपटांव्यतिरिक्त जॅकलिन तिच्या अफ़ेअर्समुळे खुप चर्चेत होती. जॅकलिन बहरीनचा राजकुमार हसन बिन राशिद अल खलिफाला डेट करत होती परंतु जेव्हा दिग्दर्शक साजिदसोबत जॅकलिनच्या अफेअरच्या अफवा समोर येवू लागल्या तेव्हा त्यांचे नाते तुटले. नंतर साजिद आणि जॅकलिनचेही ब्रेकअप झाले आणि सध्या ती अविवाहित आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज सुप्रसिध्द निवेदक व एकपात्री कलाकार बण्डा  जोशी यांचा वाढदिवस.

बण्डा जोशी यांचा लेख.

पुरुष तिथे मिशा,कप तिथे बशा आणि जोश्या तिथे हंशा!!!       

व्वा गाणं छान म्हटलंस ! गॅदरिंगमध्ये तुझी निवड निश्चित समज, पण... "पण काय सर?"

"तुझे मराठी- हिंदी निबंध तू उत्तम लिहितोस! तुझ्या भाषा चांगल्या आहेत, मग तू गॅदरिंगच्या कार्यक्रमाचं निवेदन का करत नाहीस?" "पण सर...

"हे बघ, गाणं म्हटलं तर एकदा टाळ्या मिळतील. निवेदन केलंस तर प्रत्येक गाण्यानंतर स्टेजवर यायला मिळेल आणि दरवेळी टाळ्या मिळवण्याची संधी मिळेल. विचार कर !" आणि मी निवेदक म्हणून महाविद्यालयात यशस्वी झालो.

याचं श्रेय, त्यावेळचे माझे प्राध्यापक पुरुषोत्तम शेठ यांना जातं. या सूत्रसंचालनासाठी, मान्यवर कवी- लेखकांची अवतरणं, कविता,

शेरोशायरी, विनोद यांचा संग्रह केला, त्यामुळे सूत्रसंचालनामध्ये अधिकाधिक रंगत येत गेली. साहजिकच रेडिओवर निवेदक म्हणून जाण्याची इच्छा निर्माण झाली. दरम्यान,

करिअर प्लॅनिंग' विषयाच्या शिबिरात डॉ. प्र.चिं. शेजवलकरांनी, "जे काम करायला आपल्याला आवडेल या पदासाठी आवश्यक आणि अनुषंगिक गुणवत्ता मिळवण्याचे नियोजन आधीपासून केले तर यश नक्की मिळते हा गुरुमंत्र दिला रेडिओवर निवेदक होण्यासाठी संगीत साहित्य व नाट्य यापैकी एका विषयात तुमची उच्च पात्रता हवी ही अपेक्षा लक्षात घेऊन मी तयारीला लागलो नामवंतांचे कवितासंग्रह वृत्त छंद अभ्यास केला आणि कवितालेखन सुरु केले मग राज्यस्तरीय काव्य स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली. शास्त्रीय संगीत शिकता आलं नाही तरी स्वरताल याची जाण होती त्यामुळे संगीत स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवली मी बक्षिसांचे शतक ठोकलं आणि पुणे आकाशवाणी केंद्रावर निवेदक पदासाठी अर्ज केला, प्रचंड स्पर्धा असतानाही गुणवत्तेमुळे माझी निवड झाली त्यावेळी व्यंकटेश माडगूळकर, ज्योत्स्ना देवधर, पुरुषोत्तम जोशी असे दिग्गज मंडळी आकाशवाणीत होती त्यांनी जाणीवपूर्वक मार्गदर्शन केले. सुप्रभात सारखा कार्यक्रम खूप लोकप्रिय ठरला. हसवा हसवी, आरसा श्रुतिकामाला आदी सर्व प्रकारचे कार्यक्रम लिहिता आले, सादर करता आले सलग एकवीस वर्ष हा निर्मितीचा आनंद मिळाला. नोकरी ही नोकरी न वाटता छंदातला मनसोक्त आनंद मला लाभला. मी कॉलेजमध्ये असताना, माझे प्राध्यापक पुरुषोत्तम शेठ यांची पत्नी कर्करोगाने आजारी होती. सरांच्या घरी जायचो तेव्हा भाभींना वेदनांची जाणीव होऊ नये म्हणून त्यांना गाणी म्हणून दाखवायचो, विनोद सांगायचो, कविता ऐकवायचो, त्यामुळे त्यांना विरंगुळा मिळायचा,त्या हसायच्या. शेवटचा श्वास असेतो मी त्यांना हसत ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर म्हणाले मृत्यूशय्येवर त्या माणसाला तु हसत ठेवलं ही फार मोठी गोष्ट आहे, हे व्रत सोडू नकोस. तेव्हा लोकांना हसवण्यासाठी त्यांनी दुःख विसरण्यासाठी विनोदाच्या माध्यमातून आपण काही करावे अशी कल्पना मनात आली मग मी विनोदी काव्य लेखनाकडे वळलो. रेडिओवर गाणी लावताना गाण्याची चाल काना- मनात रूंजी घालत राहिली, त्या चालीवर विडंबन गीत मी लिहीली. छोट्या ग्रुपमधील लोकांना ती आवडायची. मग कवी संमेलनामध्ये कविता वाचन सुरू झालं. ॲड. प्रमोद आडकर यांनी खळखळाटहा कवितासंग्रह काढला तो ही लोकप्रिय झाला. पुण्यात एका स्पर्धेच्या वेळी स्पर्धा संपल्यावर परीक्षकांना निकाल तयार करायला लागणाऱ्या मधल्या वेळात संयोजकांनी मला लोकांचं मनोरंजन करायला मंचावर बोलवलं मी अर्धा तास रसिकांना खळखळून हसवलं तेव्हा एका पुणेकर रसिकाने मला सुचवलं साहित्य, संगीत, नाट्य, विनोद यांची तुम्हाला एवढी जाण आहे तर या सगळ्याचा मिळून तुम्ही एकपात्री प्रयोग का नाही करत?

मला कल्पना पटली आणि मी हास्य पंचमीया विनोदी एकपात्री प्रयोगाचे लेखन केले, तयारी केली आणि पुण्याच्या रंगत संगत प्रतिष्ठानने हास्य पंचमीचा पहिला प्रयोग केला. तो खूप यशस्वी झाला नंतर त्याचे प्रयोग राज्यभर व्हायला लागले, त्यामुळे रेडीओची नोकरी आणि कार्यक्रमाच्या तारखा हे गणित जुळेना म्हणून नोकरीतून मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ एकपात्री कार्यक्रम व हास्य कवितांचे प्रयोग करु लागलो. हास्य पंचमीचे जवळजवळ पाच हजार प्रयोग होत आले. यानिमित्ताने अर्थप्राप्ती पेक्षा रसिकांना व्याप ताप विसरून आनंदाने हसताना पहाण्यात जास्त आनंद व समाधान मिळालं त्यासाठीच केला होता अठरा आज असं वाटतं पु ल देशपांडे, मधुकर टिल्लू अशा दिग्गजांचा हसवण्याचा व्रत आणि वारसा चालवण्यात धन्यता वाटते आणि एका रसिकाने जुळवलेल्या समीकरणावर मी वाटचाल करतो.

पुरुष तिथे मिशा,कप तिथे बशा आणि जोश्या तिथे हंशा!!!       

बण्डा जोशी.

संकलन. #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज प्रसिद्ध बंदिशकार, संगीतज्ज्ञ, गायक व गानगुरू #विनायकरामचंद्रआठवले यांचा स्मृतिदिन.

जन्म. २० डिसेंबर १९१८ भोर येथे.

विनायक आठवले यांचे बालपण अहमदाबादमध्ये गेले. त्यांचे वडील रामचंद्र हे अहमदाबादमधील लालभाई दलपतभाई कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते आणि ते कीर्तनही करीत असत. त्यांनी विनायकबुवांना वयाच्या पाचव्या वर्षापासून संगीताचे शिक्षण देण्यास सुरुवात केली; आणि त्यांच्या कीर्तनाला ते संवादिनीवर साथ करण्याकरिता विनायकबुवांना नेऊ लागले. त्यामुळे गायक होण्याची उमेद विनायकबुवांच्या मनात रुजली. १९३९ मध्ये गुजरात कॉलेजमधून त्यांनी बी.एस्सी.ची पदवी घेतली. त्यानंतर अहमदाबादमधेच नोकरीची सुरुवात केली; पण त्या नोकरीत त्यांचे मन रमेना. त्यांनी गायक होण्याच्या ध्यास घेतला होता. १९३९ मध्ये पुण्याला विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे संगीताची तालीम घेण्यास सुरुवात केली. नंतर १९४२च्या छोडो भारत आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. त्यादरम्यान त्यांच्या संगीतशिक्षणात खंड पडला. पुढे बडोदा येथे संगीत विद्यालयात अध्यापन करीत असताना आठवले यांना उस्ताद फैय्याजखाँ यांचा सहवास लाभला. त्यातून ठुमरीचे मर्म त्यांनी जाणून घेतले. पं. भास्करबुवा बखले यांच्या शिष्या यल्लुबाई यांच्याकडे त्यांनी ठुमरीचे शिक्षण घेतले. नंतर अहमदाबाद आकाशवाणी केंद्राचे प्रशासक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला (१९४४). पुढे कोलकात्याच्या संगीत विद्यालयात प्राचार्य म्हणून ते कार्यरत झाले (१९४५). यानंतर अहमदाबाद, जयपूर, दिल्ली आणि मुंबई या आकाशवाणी केंद्रांवर विविध पदांवर त्यांनी काम केले (१९४६७०). १९५३ मध्ये त्यांनी संगीत प्रवीणही परीक्षा दिली. पं. विनायकबुवा पटवर्धन, पं. वझेबुवा, उस्ताद विलायत हुसैनखाँ या तीन गुरूंच्या मार्गदर्शनानंतर त्यांची जडणघडण एक उत्तम गवई म्हणून होत गेली. १९७० साली एस.एन.डी.टी. विद्यापीठात प्रपाठक या पदावर आठवले यांची नेमणूक झाली. त्यांनी विद्यापीठात अनेक सांगीतिक उपक्रम राबवले. संगीत सौभद्र  या नाटकातील संगीत व त्याचे स्वरूप या विषयावर त्यांनी सप्रयोग व्याख्यान दिले. त्याद्वारे सौभद्रातील गुजराती संगीत, कर्नाटक संगीत, लावणी संगीत, कीर्तन संगीत इत्यादी संगीत प्रकाराचे नमुने सादर केले. संगीततज्ज्ञ के. जी. गिंडे आणि संगीत समीक्षक अशोक रानडे  यांच्या साहाय्याने एस.एन.डी.टी चा पहिला संगीत अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. तो ज्ञानमूलक आणि प्रात्यक्षिकमूलक असावा अशी त्यांची विचारसरणी होती. विद्यापीठात एम.ए.चा अभ्यासक्रम हा ज्ञानमूलक, तर पीएच.डी.चा अभ्यासक्रम प्रबंधाच्या स्वरूपात असावा; त्याचप्रमाणे गांधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या अभ्यासक्रमात संगीत अलंकारपर्यंत ज्ञानशास्त्रावर तर संगीत प्रवीणचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकावर भर देणारा असावा, असे पायंडे त्यांनी पाडले. गायकांनी मैफल कशी रंगवावी याचा त्यांनी परिपाठच दिला. बैठक, राग, रागाची निवड व सुरुवात कशी करावी, रागवाचक संगती कशी असावी याविषयी त्यांचे विचार निश्चित होते. एस.एन.डी.टी. विद्यपीठातून निवृत्त झाल्यानंतर (१९७९) आठवले यांची नियुक्ती कला अकादमी, गोवा येथे संगीत विभागाचे संचालक म्हणून झाली (१९८०). तेथील पाच वर्षांच्या काळात त्यांनी अनेक शिबिरे आणि नवनवीन उपक्रम राबवले. याचकाळात संगीतातील घराणी, ठुमरी, राग-संकल्पना, बंदिश, संगीताचे रसग्रहण इत्यादीविषयक जाहीर व्याख्याने दिली. वाशी (नवी मुंबई) येथील गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्वतंत्र इमारत उभी करण्यात त्यांचा सहभाग मोठा होता. तेथे ते आचार्यही होते (१९८४-८८). १९८८ मध्ये त्यांनी तेथे संगीत वर्ग सुरू केले. त्याचवर्षी त्यांनी वरिष्ठ विद्यार्थ्यांसाठी रागचर्चा शिबिराचे आयोजन केले. त्यात के. जी. गिंडे, आनंदराव लिमये, कमलताई तांबे आदी संगीतकारांनी सहभाग घेतला. पुढे गायनाबरोबरच तबला, संवादिनी, व्हायोलिन इ. वादनाचे आणि कथ्थक, भरतनाट्यम् आदी नृत्याचे व सुगम संगीताचे वर्ग त्यांनी सुरू केले. गुरुकुल शिक्षण पद्धती सुरू केली. गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या संगीत कला विहार  या मासिकाचे संपादकपदही त्यांनी भूषविले. गांधर्व विद्यालयातील त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान मंडळाने त्यांना महामहोपाध्याय  ही उपाधी देऊन केला. आठवले यांनी निरनिराळ्या संकल्पनांवर कार्यक्रम सादर केले. सामवेद से सत्संग, वसंतपंचम, गौरीमंजिरी, बंदिशीतील सौंदर्य, गीत मल्हार, सप्तकल्याण, राग नवरंग, कंसायान, तोडी के प्रकार, कानडा के प्रकार, ऋतुसंहार हे कार्यक्रम आणि २००४ साली मुंबई आकाशवाणीवरील रंगछटा घराण्यांच्या  ही मालिका हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे होत. नादपियाया टोपणनावाने त्यांनी अनेक बंदिशी रचल्या. या १२८ बंदिशींचे नोटेशन आणि ललितकला, ललित बिलास, भिन्नभैरव, चंद्रभैरव, कौसीबाहार, पटकाफी  आणि मधुकल्याण आदी रचलेले राग यांचा समावेश त्यांच्या नादवैभव  या ग्रंथात आहे. त्यांनी लिहिलेल्या तरंगनाद  या मराठी  पुस्तकाचा हिंदी (नादचिंतन ) व इंग्रजी (तरंगनाद ) या भाषांत अनुवाद झाला आहे. याशिवाय त्यांनी रागवैभव  या ग्रंथाची निर्मितीही केली. त्यांनी मराठी विश्वकोश  या प्रकल्पातील खंडांमध्येही संगीतविषयक लेखन केलेले आहे. आठवले यांच्या शिष्यवर्गात  निशा पारसनीस, जे. व्ही. भातखंडे, संध्या काथवटे, स्वरदा साठे, विदुला भागवत, वैजयंती जोशी, रसिका फडके, सुधीर पोटे यांचा समावेश होतो.

विनायक रामचंद्र आठवले यांचे ११ ऑगस्ट २०११ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट.

आज हॉलिवूड अभिनेत्री #नॉर्मा_शिअरर यांचा स्मृतिदिन.

जन्म. ११ ऑगस्ट १९०२ रोजी माँट्रिअल येथे.

नॉर्मा शिअरर ही आपल्या सौंदर्याने आणि चतुरस्र अभिनयाने गाजलेली अभिनेत्री. हॉलिवूडमध्ये १९३० आणि ४०चं दशक तिने गाजवलं होतं. हॉलिवूडच्या प्रख्यात एमजीएम स्टुडिओचा प्रसिद्ध निर्माता अर्विंग थॅलबर्ग याच्याशी लग्न केल्यावर तिला आदराने फर्स्ट लेडी ऑफ दी स्क्रीनअसं संबोधलं जाई. ही हू गेट्स स्लॅप्ड, दी ट्रायल ऑफ मेरी द्युगन, ए फ्री सोल, दी बॅरेट्स ऑफ विम्पोल स्ट्रीट, रोमिओ अँड ज्युलिएट, मेरी आंत्वानेत, दी विमेन हे तिचे गाजलेले चित्रपट. तिला सहा वेळा ऑस्कर नामांकन मिळालं होतं. दी डायव्होर्सीसिनेमातल्या भूमिकेसाठी एकमेव ऑस्कर मिळालं होतं. नॉर्मा शिअररचे १२ जून १९८३ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता #सुनील_शेट्टी यांचा वाढदिवस.

जन्म. ११ ऑगस्ट १९६१

सुनिल शेट्टीचे पूर्ण नाव सुनिल लामा शेट्टी असे आहे. परंतु, हिंदी चित्रपटसृष्टीने त्याला अण्णा हे टोपण नाव दिले आहे. सुनिल शेट्टी यांनी १९९२ मध्ये करिअरची सुरवात केली. त्याच्या अदाकारीला प्रेक्षकांची चांगलीच वाहवा मिळाली आहे. काही चित्रपटांमधील त्याची अदाकारी कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारी आहे. सुनिल शेट्टीची ओळख अॅक्शन हिरो अशी होती. मोहरा, धडकन, खेल, रक्त, भागम भाग, थॅंक्यू, कयामत, बॉर्डर इत्यादी चित्रपटांमधील त्याची भूमिका स्मरणात राहणाऱ्या आहेत. २००१ मध्ये त्यांना धडकन या चित्रपटातील अभिनयासाठी बेस्ट व्हिलनच्या फिल्म फेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. धडकन या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी सुनील ला २००१ या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.  अक्षय कुमार सोबत त्याने अनेक चित्रपट केले व बहुदा सर्वच चित्रपट यशस्वी ठरले. अक्षय कुमार व सुनील शेट्टी या जोडीला भरपूर लोकप्रियता मिळाली. हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकाराप्रमाणेच त्याने निर्माता म्हणूनही काम केले आहे. सुनील शेट्टी यांनी 'पहलवान' या चित्रपटाद्वारे चार वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आहे. पण या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटानंतर आता त्यांनी हॉलिवूडमध्ये काम केले आहे. या चित्रपटाचे नाव आहे कॉल सेंटर. या चित्रपटात सुनील एका शीख पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. अॅक्टिंग करता करता सुनील शेट्टी हॉटेल व्यवसायात पण आहे. सुनील शेट्टी यांच्या पत्नीचे नाव मान शेट्टीआहे मान ही एक व्यवसायिक महिला असून समाजसेविकाही आहे. खाजगी आणि व्यावसायिक एकाच वेळी  अेक जबाबदा-या ती सांभळते. उत्तम डिझायनर आहे आणि तिच्या बहिणीसह मान एन्ड ईशानावाचा स्वत: चे कपड्यांचा ब्रँडची ती मालकीण आहे, सुनिल शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी ही पण अभिनेत्री असून तिने हिरोसिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुनील शेट्टी हे सध्या राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीचा (नाडा) ब्रॅन्ड अॅसम्बेसडर म्हणून काम करत आहेत. सुनील शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट.

आज विचित्र वीणावाद्यावर हुकुमत असणारे वादक, गायक व शास्त्रीय संगीतकार #लालमणी_मिश्र यांचा जन्मदिन.

जन्म. ११ ऑगस्ट १९२४ 

लालमणी मिश्र हे शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं एक आदरणीय नाव होते. ध्रुवपद गायकी बरोबरच ते तबलावादन आणि सतारवादन उत्तम करत असत. त्यांची विचित्र वीणाया वाद्यावर हुकुमत होती आणि त्यातून २२ श्रुती ते ऐकवत असत. कोलकात्याच्या एका रेकॉर्डिंग कंपनीत असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करत असताना त्यांनी संगीतात अनेक प्रयोग केले. चाळीसच्या दशकात त्यांनी लहान मुलांवर संगीताचे संस्कार करण्यासाठी अनेक ठिकाणी बाल संगीत विद्यालयं सुरू केली होती. तसंच भारतीय संगीत परिषदेची स्थापना केली होती. पंडित उदय शंकर यांच्या बॅले ट्रुप्सबरोबर इंग्लंड, बेल्जियम, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स यांसारख्या देशांचे दौरे करत असताना त्यांनी त्यांच्या अनेक नृत्यप्रकारांसाठी अनोख्या चाली बांधल्या होत्या. पुढे त्यांनी पंडित ओमकारनाथ ठाकूर यांच्या आग्रहावरून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये महत्त्वाची धुरा सांभाळताना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत यशस्वीपणे सर्वदूर पोहोचवलं. फिलाडेल्फियाच्या पेन युनिव्हर्सिटीचे ते अनेक वर्षं व्हिजिटिंग लेक्चरर होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. त्यांनी तालवादनातही काही प्रयोग केले आणि त्यांच्याच प्रयोगावरून पुढे तो प्रकार कूट की तानकिंवा मिश्र-बानीम्हणून ओळखला जातो. लालमणी मिश्र यांचे १७ जुलै १९७९ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज ज्येष्ठ अभिनेते #पी_जयराज यांचा स्मृतिदिन.

जन्म. २८ सप्टेंबर १९०९

पी. जयराज यांनी हिंदी, मराठी, गुजराथी चित्रपटात कामे केली बोलपटाच्या काळात त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमधील चित्रपटात कामे केली. मा.पी. जयराज यांनी १७० हून अधिक चित्रपट मध्ये कामे केली. व्ही.शांताराम, पृथ्वीराज कपूर, मोतीलाल यांच्या बरोबर पी. जयराज यांनी कामे केली. त्यांनी मोहर, माला, प्रतिमा, राजघर,सागर अशा चित्रपटांचे दिग्दर्शन पण केले. १९८० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पी.जयराज यांचे निधन ११ ऑगस्ट २००० रोजी झाले. पी.जयराज यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज प्रतिष्ठीत संगीतकार, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विद्वान आणि शिक्षक पं.#रामाश्रेय_झा यांचा जन्मदिन.

जन्म. ११ ऑगस्ट १९२८ 

पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे. मा.जितेंद्र अभिषेकी यांनी मा. पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, ते अलाहाबाद विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि १९८० पर्यंत संगीत विभाग प्रमुख झाले होते. त्याचे सुप्रसिद्ध शिष्य गणांमध्ये कमला बोस, शुभा मुदगल, गीता बॅनर्जी अशी नावे आहेत. २००५ मध्ये पं.रामाश्रेय झा यांना  संगीत नाटक अकादमी, पुरस्कार मिळाला होता मा.पं रामाश्रेय झा यांचे १ जानेवारी २००९ रोजी निधन झाले. पं रामाश्रेय झा यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज भाडिपामुळे (भारतीय डिजिटल पार्टी) प्रकाशझोतात आलेल्या अभिनेते,लेखक #सारंग_साठ्ये यांचा वाढदिवस.

जन्म.११ ऑगस्ट १९८२ पुणे येथे.

युवापिढीतील सध्या सर्वात जास्त लोकप्रिय असलेलं आणि जगात भारी शब्दाला प्रसिद्धी देणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे सारंग साठ्ये. सारंग स्वतः एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक आहेत. सारंग साठ्ये यांचे शालेय शिक्षण पुण्यातील महाराष्ट्र मंडळ व जोग शाळा येथे झाले.महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या बी.एम सी सी महाविद्यालयात झाले. सारंग साठ्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पुरूषोत्तम करंडकात भाग घेतला  महाविद्यालतात असताना नाटकाची आवड निर्माण झाली असतानाच त्यांच्या आयुष्यात सुमित्रा भावे, सुनील सुखटणकर, विजय तेंडुलकर असतील अशी काही मान्यवर मंडळी आली.आसक्त कलामंच पुणेया प्रायोगिक नाट्य संस्थेत त्यांनी नाटकाची सुरुवात केली. पुढे सारंग साठ्ये यांनी सुमित्रा भावे यांच्या कडे असीस्टंट म्हणून चार पाच चित्रपटासाठी काम केले. सारंग साठ्ये यांचा अभिनेता म्हणून 'नितळ' हा पहिला चित्रपट होता. पुढे त्यांनी सारंग यांनी पुष्कर श्रोती दिग्दर्शित उबूंटु मध्ये व नटसम्राट या गाजलेल्या चित्रपटात अभिनय केला. तसेच सारंग यांनी कारवाँ व हायजॅक या हिंदी विनोदी चित्रपटात अभिनय केला आहे. पंधरा वर्षाहून अधिक काळ नाटय व चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या सारंग साठ्ये यांनी सुरुवातीला गुलबदन टॉकीजया नावाचा चॅनल सुरु केला होता. पुढे त्यांनी पॉला आणि अनुषा यांच्या सोबत भाडिपा (भारतीय डिजिटल पार्टी) हा एक मराठी यू ट्यूब चॅनल सुरु केला. त्यांनी केलेला 'पुणेरी जगात भारी' या स्टँडअप शोला तुफान व्ह्यूज मिळाले. भाडिपाच्या व्हिडिओज ने मराठी युवा पिढीला परत मराठी कडे आकर्षित केलं. याने अनेक मराठी विनोदवीरांना यामुळे हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. सारंग यांनी भाडिपाच्या माध्यमातुन अनेक उत्तम कलाकृती आणि उपक्रम सादर केले आहे. भाडीपाचे तीन मोठे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टस येत आहेत. त्यातला एक कॉमेडी, एक डार्क कॉमेडी आणि एक डिटेक्टिव शो असणार आहे. यासोबत 'भातुपा' 'विषय खोल' हे पण चॅनल्स सुरु केले. भाडिपा अतर्गत मराठी भाषेत जगात भारी कंटेंट बनवतात. भाडिपा नवीन, ओरिजिनल, ग्लोबल स्टोरीज आणि लाईव्ह कार्यक्रम करतात.भाडिपाचे अनेक शोज देशात व विदेशात झाले आहेत.अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेता, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी हे त्यांच्या कॉलेज मध्ये ज्युनिअर होते. त्या दोघांना घेऊन सारंग यांनी 'कास्टिंग काउच' हा वेब शो सुरु केला. 'कास्टिंग काऊच' या वेबशोने गेल्या वर्षभरात इंटरनेटवर खूपच धुमाकूळ घातला होता. कास्टिंग काउचचे स्पृहा जोशी,राधिका आपटे,अमृता खानविलकर,महेश मांजरेकर, अजय-अतुल, श्रिया पिळगावकर, रिमा लागू यांच्या बरोबरचे एपिसोड्स खूप गाजले होते.  २०१९ मध्ये सारंग साठ्ये आणि अनुषा नंदा कुमार दिग्दर्शित पांडूही वेबसिरीज प्रदर्शित झाली होती.तसेच त्यांनी चिकटगुंडे,वन्स अ यिअर,झूम या वेब सिरीज ही केल्या. आता सारंग यांची १३ ऑगस्ट २०२१ पासून 'शांतीत क्रांती' ही नवीन वेब सिरीज सोनी लिव्ह वर सुरु होत आहे. सारंग साठ्ये यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

https://www.youtube.com/c/BharatiyaDigitalParty/about

https://bhadipa.com

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज ११ ऑगस्ट

आज मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार  #भालचंद्र_पेंढारकर यांचा स्मृतिदिन.

जन्म. २५ नोव्हेंबर १९२१ हैद्राबाद (दक्षिण) येथे.

मा.भालचंद्र पेंढारकर यांचे संगीतातील गुरू मा.रामकृष्णबुवा वझे. मा. भालचंद्र पेंढारकर यांनी नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२ साली सत्तेचे गुलाम या नाटकात भूमिका करून केले.

नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका मा. भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या. भालचंद्र पेंढारकर यांनी ललितकलादर्शनाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावोही नाटके विशेष गाजली. दुरितांचे तिमिर जावोमधील पेंढारकर यांनी साकारलेली दिगूही व्यक्तिरेखा अजरामर झाली. याच नाटकातील आई तुझी आठवण येतेहे गाणेही खूप गाजले. मा.पेंढारकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिलेल्या वेळेतच नाटय़प्रयोग सुरू करणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३०० नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी करून ठेवले आहे. मा.भालचंद्र पेंढारकर यांनी संपूर्ण आयुष्य ललित कलादर्श या संस्थेसाठी वाहिले. या संस्थेची शतकोत्तर यशस्वी वाटचाल सुरू आहे ती केवळ पेंढारकर यांच्यामुळेच. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले. ५०च्या शतकात मरगळ आलेल्या मराठी संगीत नाटकांना पुनरुज्जीवित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्वामिनी’, ‘दुरितांचे तिमीर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘जयजय गौरीशंकर’, ‘आनंदी गोपाळ’, ‘बावनखणीअशी एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती त्यांनी रंगभूमीवर आणली. पंडितराज जगन्नाथया नाटकाने तर हजारो प्रयोगांचा विक्रम घडविला. नाटक नुसते आणले नाहीत तर ती गाजवून दाखवली. मा.भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते. मुंबई साहित्य संघात त्यांची स्वतःची रेकॉर्डिंग रूम होती. त्यात त्यांनी असंख्य नाटके रेकॉर्ड करून ठेवलेली आहेत. त्यांत प्रायोगिक नाटके, संघात झालेल्या प्रत्येक नवीन प्रयोगाचे ध्वनिमुद्रण त्यांनी केले होते. त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. १ जानेवारी १९०८ रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या या संस्थेचा भालचंद्र पेंढारकरांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला. संस्थेची वैभवशाली परंपरा जोपासली. मा.भालचंद्र पेंढारकर यांचे निधन ११ ऑगस्ट २०१५ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.भालचंद्र पेंढारकर यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

मा.भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली काही गीते

https://www.youtube.com/watch?v=PQwQQzUI4hw

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

११ ऑगस्ट - दिनविशेष

 

११ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

ख्रिस्त पूर्व ३११४: मेसोअमेरिकन लॉन्ग कॅलेंडर सुरु झाले.

 

१८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.

 

१९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.

 

१९५२: हुसेन बिन तलाल जॉर्डनचे राजे बनले.

 

१९६०: चाड देशाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

 

१९६१: दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.

 

१९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

 

१९८७: युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह च्या अध्यक्षपदी अ‍ॅलन ग्रीनस्पॅन यांची निवड झाली.

 

१९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर.

 

१९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.

 

१९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.

 

२०१३: डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.

 

११ ऑगस्ट रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१८९७: बालसाहित्यीक इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९६८)

 

१९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९९५)

 

१९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)

 

१९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी २००९)

 

१९४३: पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचा जन्म.

 

१९४४: फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ यांचा जन्म.

 

१९५०: ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक यांचा जन्म.

 

१९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म.

 

११ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८९)

 

१९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०५)

 

१९९९: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १९४६)

 

२०००:  दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १९०९)

 

२००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२३)

 

२०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फट

No comments:

Post a Comment