१६ ऑगस्ट - दिनविशेष & स्मृतिदिन.

 

आजचे दिनविशेष

 

१६ ऑगस्ट - दिनविशेष

 

१६ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१९१३: स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले.

 

१९४६  कोलकात्यात वांशिक दंगल उसळुन ७२ तासात सुमारे ४,००० जण ठार झाले.

 

१९४६: सिकंदराबाद मध्ये सर्व हैदराबाद ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली.

 

१९५४: स्पोर्ट्स इलस्ट्रॅटेड मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.

 

१९६०: सायप्रसला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

 

१९६२: आठ वर्षांनंतर उर्वरित फ्रेंच भारत प्रदेश भारताला देण्यात आले.

 

१९९४: बांगलादेशातील वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांना स्वीडीश पेन क्लबतर्फे कुर्ट टुचोलस्की साहित्य पुरस्कार जाहीर.

 

२०१०: जपानला मागे टाकुन चीन ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली.

 

१६ ऑगस्ट रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१८७९: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट १९५५)

 

१९०४: हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९४८)

 

१९१३: इस्त्रायलचे ६ वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते मेनाकेम बेगीन यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १९९२)

 

१९४८: भारतीय-डच रॉक संगीतकार बेरी हे यांचा जन्म.

 

१९५०: ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांचा जन्म.

 

१९५२: गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म.

 

१९५४: पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म.

 

१९५७: भारतीय वकील व राजकारणी आर. आर. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)

 

१९५८: अमेरिकन गायिका, गीतलेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, नर्तिका आणि उद्योजिका मॅडोना यांचा जन्म.

 

१९६८: भारतीय राजकारणी आणि दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म.

 

१९७०: नेपाळी-भारतीय अभिनेत्री मनीषा कोईराला यांचा जन्म.

 

१९७०: अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म.

 

१६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१७०५: स्विस गणितज्ञ जेकब बर्नोली यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १६५४)

 

१८८६: स्वामी विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय यांनी समाधी घेतली. (जन्म: १८ फेब्रुवारी १८३६ कार्मापुकुर, हुगळी, पश्चिम बंगाल)

 

१८८८: कोका-कोला चे निर्माते जॉन पंबरटन यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३१)

 

१९६१: भारतीय भाषाशास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८७०)

 

१९७७: अमेरिकन गायक, गिटारवादक, अभिनेता आणि किंग ऑफ द रॉक अँड रोल एल्व्हिस प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: ८ जानेवारी १९३५)

 

१९९७: अनेक देशांत भारतीय संस्कृती व अध्यात्म यांचा प्रसार करणारे पं. वसंतशास्त्री विष्णुशास्त्री उर्फ आबाजी पणशीकर यांचे निधन.

 

१९९७: कव्वालीला जागतिक परिमाण मिळवून देणारे पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचे निधन. (जन्म: १३ ऑक्टोबर १९४८)

 

२०००: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९५२ नवी दिल्ली)

 

२००३: युगांडाचा हुकुमशहा इदी अमीन यांचे निधन.

 

२०१०: कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२६)

 

२०१८: भारताचे १० वे पंतप्रधान व कवी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन (जन्म:२५ डिसेंबर १९२४)

आज १६ ऑगस्ट

आज दिग्दर्शक #डेव्हिड_धवन यांचा वाढदिवस.

जन्म. १६ ऑगस्ट १९५५ आगरतळा येथे.

डेव्हिड धवन यांचे खरे नाव राजींदर धवन. डेव्हिड धवन यांचे बालपण कानपुर मध्ये गेलं. राजींदरचे वडील तिथे बँकेत मॅनेजर होते. डेव्हिड धवन यांच्या शेजारीच एक ख्रिश्चन कुटुंब राहायचे. ते लहान राजींदरला डेव्हिड म्हणून हाक मारायचे, हळूहळू सगळ्या वस्ती सहीत राजींदरचे घरचेसुद्धा त्याला डेव्हिड म्हणूनच बोलवायला लागले आणि इथून पुढे त्यांचे नाव होऊन गेलं… ‘डेव्हिड धवन’… बारावी पर्यंतच शिक्षण झाल्यानंतर डेव्हिड धवन यांनी त्यांचे बंधू अनिल धवन प्रमाणेच फिल्म अँड टेलेव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)ची वाट धरली. अनिल धवन यांनी अॅक्टींगच्या कोर्समध्ये डिप्लोमा केला होता आणि डेव्हिड धवन ही अॅक्टीगच्याच कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायला गेले होते, परंतु तिथे सुरेश ओबेरॉय आणि सतीश शहा सारख्या दमदार कलाकारांना बघून डेव्हिड यांनी ही वाट आपली नव्हे असे म्हणून एडिटिंगच्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतलं. डिप्लोमा संपवून डेव्हिड यांनी मुंबई गाठली जिथे अनिल धवन सिनेमांमध्ये काम करत होते. एडिटिंगमध्ये मास्टर असलेल्या डेव्हिड यांच्याकडे एक-एक सिनेमे यायला लागले आणि असं करता करता त्यांनी ६०च्यावर सिनेमे एडिट केले. एडिटिंगचा प्रचंड अनुभव असलेले डेव्हिड आता स्वतःचा सिनेमा बनवायला तयार होते. डेव्हिड धवन मनमोहन देसाईं यांना दैवत मानायचे. त्यांच्या मोठ्या स्टारकास्ट असलेल्या भव्य दिव्य चित्रपटावर डेव्हिडचं मनापासून प्रेम होतं. डेव्हिडचं मानणं होतं की, देसाईं यांच्या चित्रपटात कॉमेडी, फॅमिली ड्रामा, अॅक्शन, गाणी आणि रोमान्स हा सगळा मसाला अगदी ठासून असायचा आणि त्यांच्या सारखा सिनेमा बाकी कुठलाही डायरेक्टर देऊ शकत नाही. म्हणून मनमोहन देसाई यांची प्रेरणा घेऊन डेव्हिड यांनी १९८९ मध्ये संजय दत्त आणि गोविंदाला घेऊन ताकतवरहा चित्रपट बनवला. ताकतवरहा चित्रपट यशस्वी झाला आणि या चित्रपटा सोबतच डेव्हिड यांना मिळाला त्यांचा जिगरी यार म्हणजेच गोविंदा.

गोविंदा सोबत डेव्हिड यांनी तब्बल १७ सिनेमे केले. पुढे डेव्हिड यांनी स्वर्ग, आग का गोला, शोला और शबनम, बोल राधा बोल सारखे यशस्वी चित्रपट दिले. हे चित्रपट मनमोहन देसाईंच्या फॉर्म्युल्यावर आधारलेले होते. परंतु काळ बदलत होता आणि हिंदी सिनेमांचा प्रेक्षकही. ही गोष्ट चाणाक्ष डेव्हिड यांच्या नजरेतुन सुटली नव्हती. मनमोहन देसाई टाईप चित्रपट बजेटने मोठे असायचे आणि लंबे सुद्धा. साधारणतः पावणे तीन ते तीन तासांचे. प्रेक्षकांचा अटेन्शन स्पॅन कमी होत चाललाय आणि आता तीन तासांच्या चित्रपटाना प्रेक्षक कंटाळायला लागले होते हे डेव्हिड यांनी टिपले होते आणि बदलत्या काळानुसार आपल्या सिनेम्यातही बदल करण्याचं त्यांनी ठरवलं. आतापर्यंत केलेल्या आठ चित्रपटात जे छोटे-मोठे कॉमेडी दृश्य आले होते, त्यांनी पडद्यावर धमाल उडवली होती. पण खरा टर्निंग पॉईंट आला तो १९९३ मध्ये जेव्हा डेव्हिड यांनी आता मनमोहन देसाई स्टाईल सोडून ह्रषिकेश मुखर्जी स्टाईल स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ह्रषिकेश मुखर्जी हे कॉमेडी सिनेमे बनवायचे, तेही मोठमोठ्या सुपरस्टार्सना घेऊन पण अत्यल्प बजेटमध्ये. हे सुपरस्टार्स कमी फी घ्यायचे मुखर्जींसोबत काम करता यावे यासाठी.

आता डेव्हिड यांनीही कॉमेडी सिनेमे करायचं ठरवलं आणि प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणारे सिनेमे बनवायचं ठरवलं. त्यांनी अनिस बझमीकडून एक स्क्रिप्ट तयार करून घेतली आणि डबल रोल्सचा धमाका असलेला गोविंदा, चंकि पांडे, कादर खानची मुख्य भूमिका असलेला आँखेपडद्यावर आला. प्रेक्षकांनी आँखेचित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आणि आपला फॉर्म्युला सफल झाल्याचं डेव्हिड यांना जाणवलं. यानंतर डेव्हिड यांनी कधीच मागे वळून नाही पाहिलं. अंदाज, लोफर आणि याराना वगळता यापुढे डेव्हिड यांनी नेहमी कॉमेडी सिनेमेच बनवले. आपल्या ४३ चित्रपटाच्या कारकीर्दीत डेव्हिड यांनी गोविंदा, अनिल कपूर, संजय दत्त, सलमान खान यांसोबतच बहुतेक सिनेमे केले.

१९९६ला अनिल कपूर अभिनित लोफरसगळ्याच बाजुंनी एक जबरदस्त चित्रपट आहे.

 १९९७ ला डेव्हिडने सलमानला घेऊन सुपरहिट सिनेमा जुडवा बनवला होता.आता गोविंदा उपलब्ध नसल्याने डेव्हिड पुन्हा सलमानकडे वळला आणि २००४ नंतर त्याने सर्वाधिक सिनेमे सलमान सोबतच केले. पुढे गोविंदाने चित्रपटात कमबॅक केला आणि डेव्हिड यांच्या सोबत पार्टनरआणि डु नॉट डिस्टर्ब हे दोन चित्रपटही केले. ज्यापैकी पार्टनरने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली, पण डु नॉट डिस्टर्ब मात्र आपटला गेला. कोणत्या कारणाने हे नक्की नाही सांगता येणार, पण यानंतर गोविंदा-डेव्हिड धवन यांची मैत्री तुटली. २०१२ मध्ये डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवनने स्टुडन्ट ऑफ दि इअरमधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. एके दिवशी एकता कपूरने डेव्हिड यांची भेट घेतली आणि त्यांना तेलुगू चित्रपट कांडिरीगादाखवला. हा चित्रपट वरुणला घेऊन रिमेक करू या अशी इच्छा व्यक्त केली. हा सिनेमा पुढे मै तेरा हिरोबनून पडद्यावर झळकला. हॉलिवूडचे / साऊथचे सिनेमे कॉपी/रिमेक हे डेव्हिड सुरुवातीपासून करत आलेले आहेत. साजन चले सासुरालहा अल्लारी मोगुडूनावाच्या तेलुगू सिनेमाचा कॉपी होता. बिवी नंबर-१हा साथी लीलावतीनावाच्या तामिळ चित्रपटाची कॉपी, ‘कुली नंबर १हा चिण्णा मपिल्लायीआणि कुली नंबर १नावाच्या तामिळ चित्रपटाची कॉपी, ‘राजा बाबू’ ‘रसु कुट्टीनावाच्या तामिळ चित्रपटाची कॉपी, ‘हिरो नंबर १राजेश खन्ना यांच्या बावर्चीचीकॉपी तर चष्मे बद्दूरफारुख शेख यांच्या चष्मे बद्दूरचा रिमेक होते. या सोबतच डेव्हिडने हॉलिवूडच्या सिनेमांतून प्रेरित होऊन ही सिनेमे बनवलेत. दिवाना मस्तानाहा ‘What About Bob’ नावाच्या चित्रपटावर प्रेरित होता. चोर मचाये शोरची कथा मार्टिन लॉरेंसच्या ब्ल्यू स्ट्रीकआणि गोलमालवरून प्रेरित आहे. पार्टनर विल स्मिथच्या ‘hitch’ वरून हम किसींसे कम नही’, ‘analyse this’ ‘बडे मिया छोटे मिया’, ‘बॅड बॉईजतर मुझसे शदी करोगीहा ‘anger management’ वरून घेतलेला आहे. मैने प्यार क्यू कियाहा कॅक्टस फ्लॉवरवरून प्रेरित आहे, तर २०११ मध्ये बनलेला जस्ट गो विद इटडेव्हिडच्याच मैने प्यार क्यू कियावरून प्रेरित आहे. डु नॉट डिस्टर्बहा दि वॅलेनावाच्या फ्रेंच सिनेम्याचा कॉपी आहे. क्यूकी मै झूट नही बोलताची कथा जिम कॅरीच्या लायर लायरशी मिळती जुळती आहे.

जॅकी चॅन यांनी ट्वीन ड्रॅगन्सनावाचा एक सिनेमा केला होता ज्याचा रिमेक होता नागार्जुनचा हॅलो ब्रदरआणि पुढे डेव्हिड धवन यांनी त्याचा रिमेक करून जुडवाबनवला. डेव्हिड यांनी जरी या चित्रपटावरून प्रेरणा घेतली असली आणि बऱ्याच केसेसमध्ये पूर्ण कथा जरी उचलली असली तरी ते कथेचा फक्त गाभा घेतात आणि तिला पूर्णपणे डेव्हिड धवन ट्रीटमेंट देतात. शॉट टू शॉट कॉपी ते कधीच करत नाही. त्यांच्या पात्रात आणि डायलॉग्समध्ये कमालीचे बदल करतात आणि त्या कथा भारतीय प्रेक्षकांसाठी फिट बनवतात. विल स्मिथचा ‘hitch’ डेव्हिड धवनच्या पार्टनर समोर अगदीच फिका वाटतो. हॉलिवूडच्या कॉमेडी जेव्हा जशाच्या तशा कॉपी केल्या जातात तेव्हा जावेद जाफरीच्या डॅडी कुलसारखे सिनेमे बनतात. डॅडी कुल हा ब्रिटिश फिल्म डेथ ऍट अ फ्युनरलचा कॉपी आहे.पण याचा भारतात रिमेक करताना त्यात हवे ते बदल न केल्याने, त्याची भारतीय संस्कृतीशी, इथल्या लोकांशी घालमेल न घातल्याने हा सिनेमा अत्यंत परका वाटतो आणि प्रेक्षक त्याच्याशी कधीच समरस होऊ शकत नाही. पण हेच अवघड काम सिनेमे बनवताना डेव्हिड धवन लिलया करत आले आहेत. त्यांचा सिनेमा, त्यातल्या व्यक्तिरेखा या नेहमी आपल्यातल्या वाटतात. आपण दुसऱ्या देशातली कथा पाहतोय असं कधीच जाणवत नाही आणि शिवाय धवन कधीच ओरिजिनल असल्याचा आव आणत नाहीत. कित्येक मुलाखतीत ते सिनेमे कॉपी केल्याची प्रांजळ कबुली देताना दिसतात.

चित्रपटसृष्टीत इतकी वर्षे काढून, इतक यश पाहिलेलं असूनही डेव्हिड धवननी त्यांच्यातला साधेपणा आजपर्यंत जपलाय.

पवन गंगावणे

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज अभिनेते, दिग्दर्शक #मनोहर_शिंदे यांचा स्मृतिदिन.

शासकीय नोकरी सांभाळून हौशी कलावंत ते व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट व मालिका असा अभिनय प्रवास केलेले शिंदे हे उत्तम अभिनेते होतेच शिवाय त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसह कामगार आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी अनेक नाटके दिग्दर्शित केली होती. कामगार रंगभूमीवर त्यांच्या ' माझं काय चुकलं ' या नाटकाला कामगार रंगभूमीच्या स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक मिळाली आहेत.

मुंबई दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या अधिकारी बंधू यांची निर्मिती आणि अनिल कालेलकर यांचे लेखन असलेल्या बंदिनी, परमवीर, हॅलो इन्स्पेक्टर, रणांगण आदी अनेक मराठी मालिकांसह काही चित्रपटातही मनोहर शिंदे यांनी भूमिका साकारल्या. मनोहर शिंदे यांचे १६ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज बॉलीवुड अभिनेत्री व ब्राझीलियन मॉडेल #नतालिया_कौर चा वाढदिवस.

जन्म. १६ ऑगस्ट १९९० मार्टिन्स येथे.

नतालिया कौरने २०१२ मध्ये किंग फिशर मॉडेल हंट स्पर्धा जिंकली आणि त्या वर्षीच्या किंग फिशर स्विमसूट कॅलेंडरमध्ये ती दिसली. तिने २०१२ मध्येच राम गोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट 'डिपार्टमेंट' द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नतालियाने प्रसिद्ध भारतीय टीव्ही शो 'खतरों के खिलाडी 6' मध्येही भाग घेतला. 'गन्स ऑफ बनारस' या चित्रपटात पण ती दिसली होती.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज जुन्या काळातील संगीतकार #मुकुल_रॉय यांचा जन्मदिन.

जन्म.१६ ऑगस्ट १९२६

मुकुल रॉय हे ज्येष्ठ गायिका गीता दत्त यांचे बंधू होत. मुकुल रॉय आपल्या बहिणी प्रमाणे यशस्वी झाले नाहीत उपलब्ध माहिती नुसार शेवटी ते नाशिक मध्ये राहत असत.

मुकुल रॉय यांनी भेद १९५०, डिटेक्टिव्ह १९५८ आणि सैलाब १९५६ या तीन चित्रपटांना संगीत दिले. ते नाशिक मध्ये त्याच्या फ्लॅट मध्ये एकटेच रहात होते शेजारच्या गल्लीत त्यांची एक विवाहित बहिण रहात होती. मुकुल रॉय यांचे ८ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या संकलक #रेणू_सलुजा यांचा स्मृतीदिन.

जन्म.५ जुलै १९५२

रेणू सलूजाया बिनधास्त अन् क्रिएटीव्ह संकलक. संकलक (एडिटर) म्हणून गाजलेल्या रेणू सलुजा या आपल्या अल्प जीवनकाळात खूप काम करून गेल्या. रेणू सलुजा या बहुतेक पहिली महिला संकलक असाव्या ज्यांनी या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. अभिनेत्री राधा सलुजा यांची धाकटी बहिण रेणू सलुजा होत.

रेणू सलुजा या पंजाबी परीवारातील. मोठी बहीण राधा सलूजा आगोदर पासून चित्रपट क्षेत्रात होतीच.  मग रेणूनेही पुण्याच्या  फिल्म अॅड टेलीव्हिजन मध्ये प्रवेश घेतला मात्र त्यांना दिग्दर्शन विभागात प्रवेश नाही मिळाला त्या ऐवजी संकलन विभागत प्रवेश मिळाला. १९७६ मध्ये त्या पास आऊट झाल्या. त्या काळी

संकलन हे क्षेत्र पुरूषी वर्चस्वाखाली होते. म्हणजे अनुभवासाठी एखाद्या पुरूष संकलकाकडे उमेदवारी करणे ओघाने आलेच. त्या मुळे रेणू यांच्या साठी हा पुढचा प्रवास मात्र खूपच खडतर ठरला. पण रेणू यांच्या साठी एक आनंदाची बाब म्हणजे तिच्या सोबत शिकलेले विधू विनोद चोप्राच्या Murder at Monkey Hill या डिप्लोमा फिल्मचे काम मिळाले. यात त्या प्रमुख सहदिग्दर्शक ही राहिल्या होत्या. त्यांच्या या चित्रपटाला प्रायोगिक चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. रेणू यांचा  संघर्ष १९८० पर्यंत चालु होता.१९८० साली एफटीआयचा त्यांचे वर्गमित्र सईद मिर्झा यांचा अल्बर्ट पिंटोको गुस्सा क्यूँ आता हैआणि विधू विनोद चोप्रा यांचा सजा-ए-मौतहे दोन चित्रपट आले. पहिला चित्रपट अल्बर्ट पिंटोको….हा समातंर चित्रपट चळवळीतला महत्वाचा चित्रपट. मालक आणि कामगार यांच्या संघर्षाचे वास्तव चित्रण असलेला.पहिल्या आठ मिनिटातच अल्बर्ट हा गुस्सेवालाआहे हे स्थापित करण्यासाठी शूट केले अनेक प्रसंग रेणू यांनी अनेकदा नक्कीच बघितले असतील. दुसरा चित्रपट सजा-ए-मौत”. दोन्ही चित्रपट रेणू यांनी सुंदर संकलीत केले. त्यांचा अजून एक वर्ग मित्र कुंदन शहा जे की अल्बर्ट पिंटोको….मध्ये सहदिग्दर्शक होते. ते १९८३ मध्ये स्वतंत्र निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात उतरले. त्यांचा पहिला चित्रपट होता  जाने भी दो यारो’. प्रहसनात्मक अंगाने जाणारा हा चित्रपट तेव्हा खूप गाजला. याचेही संकलन रेणू यांचे होते. हे तिनही चित्रपट त्यांच्या वर्ग मित्रांचे होते. त्यामुळे आपण स्वतंत्रपणे संकलन करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना आला. समातंर सिनेमातील एक दिग्गज म्हणजे गोविंद निहलानी. श्याम बेनेगलचे यांचे अकूंर, निशांत, मंथन, भूमिका सारखे चित्रपट गोविंद निहलानी आपल्या कॅमेऱ्याने अधिक जिवंत केले. मग ते स्वत:च दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले. अर्धसत्य’ (१९८३) हा त्यांचा तिसरा चित्रपट. श्री.दा.पानावलकर यांच्या सूर्यया कथेवर आधारीत असलेल्या या चित्रपटात लेखक आणि अभिनेत्यांची तगडी टीम होती. या चित्रपटाने सदाशिव अमरापूरकर या अभिनेत्यासाठी चित्रपटसृष्टीचे सर्व दरवाजे खुले केले. हा चित्रपट रेणू यांच्यासाठी माईल स्टोन ठरला. या चित्रपटाने रेणू सलूजा यांची एक उत्तम संकलक म्हणून ओळख निर्माण झाली. रेणू यांनी ही कामगिरी फक्त ७ वर्षात करून दाखविली. विधू विनोद चोप्राचा परींदाहा रेणू सलूजाचा मेन स्ट्रीम मधला पहिला चित्रपट. मुंबईतील अंडरवर्ल्ड दोन गँग मधील संघर्ष यात दाखविण्यात आला होता. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. दोन राष्ट्रीय आणि ५ फिल्म फेअर पुरस्कार मिळाले. यात रेणू सलूजा यांच्या वाट्याला पण एक आला.त्यांच्या कामाची दखल घेतली गेली. त्या मुख्य प्रवाहात आल्या. या नंतर १९९२ मध्ये सुधीर मिश्रा यांचा धारावीहा चित्रपट आला. या चित्रपटाचे काम त्यांना मिळाले. सुधीर मिश्रा हे देखील त्यांचे क्लासमेट. रेणू यांनी या चित्रपटाचे सुरेख सकंलन केले व त्यांना संकलनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

या नंतर मात्र रेणू यांनी मागे वळून बघितले नाही. कभी हाँ कभी ना, सरदार, १९४२: लव्ह स्टोरी, तर्पण, बॅन्डिट क्वीन, परदेस, करीब,गॉड मदर, रॉक फोर्ड, हे राम, असे एकापेक्षा एक सरस अशा ३६ चित्रपटाचे संकलन त्यांनी केले. रेणू यांनी उत्कृष्ट संकलनासाठी चार राष्ट्रीय पुरस्कार पटकावले(परींदा, धारावी, सरदार, गॉड मदर) तर दोन (परींदा, १९४२: लव्ह स्टोरी) फिल्म्फेअर पुरस्कार पटकावले. बॉलिवूड कॉलिंग आणि कलकत्ता मेल हे त्यांनी संकलीत केलेले दोन चित्रपट तिच्या निधना नंतर प्रदर्शीत झाले. शेखर कपूर यांचा बॅन्डिट क्वीनहा चित्रपट देखील संकलनासाठी आव्हानात्मक होता. विधू विनोद चोप्रा आणि सुधीर मिश्रा दोघेही त्यांचे एफटीआयचे वर्गमित्र. अगोदर विधू विनोद चोप्रा यांच्याशी तिने लग्न केले पण नंतर ते दोघे वेगळे झाले. मग सुधीर मिश्रा बरोबर लग्न केले. सुधीर मिश्रा यांच्या सर्वच चित्रपटात त्या सहदिग्दर्शक आणि संकलक होत्या. २००५ मध्ये प्रदर्शीत झालेला त्यांचा हजार ख्वाहिशे ऐसीया चित्रपटातील मुख्य नायिका गीता हे रेणू वरून स्फुर्ती घेऊन् रचलेले पात्र आहे. या चित्रपटाला देखील संकलनाचा पुरस्कार मिळाला होता.रेणू सलुजा यांचे १६ ऑगस्ट २००० रोजी निधन झाले. 

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ दासू भगत

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते #पीटर_फोंडा यांचा स्मृतिदिन.

जन्म.२३ फेब्रुवारी १९४०

'ईजी राइडर', 'घोस्ट राइडर' आणि 'वाइल्ड हॉग्स' यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांचा मन जिंकणारा पीटर फोंडा यांनी ईजी राइडरया चित्रपटाचे लेखन व निर्मिती केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. या चित्रपटासाठी त्यांना बरेच पुरस्कारही मिळाले होते. पीटर फोंडा यांचे पहिले लग्न सुसान ब्रुअर यांच्यासोबत झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं आहेत. त्यानंतर पीटर फोंडाने पोर्टिया क्रॉकेट सोबत दुसरं लग्न केलं. मात्र हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि अखेर २०११ साली ते विभक्त झाले.पीटर फोंडा यांचे १६ ऑगस्ट २०१९ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज मराठी संगीत रंगभूमीचा वारसा निष्ठेने जपणाऱ्या स्वरसम्राज्ञी तथा अभिनेत्री #कीर्ती_शिलेदार यांचा वाढदिवस

जन्म. १६ ऑगस्ट १९५२

कीर्ती शिलेदार ह्या जयराम व जयमाला शिलेदार यांच्या कन्या.आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले. संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली. संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी स्वर ताल शब्द संगतीया नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात. कीर्ती शिलेदार यांनी स्वर ताल शब्द संगतीया नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. कीर्ती शिलेदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

कीर्ती शिलेदार यांची गाजलेली नाटके

अभोगी’, ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्र’, ‘द्रौपदी’, ‘भेटता प्रिया’, ‘मंदोदरी’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘रामराज्यवियोग’, ‘रूपमती’, ‘विद्याहरण’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘श्रीरंग प्रेमभंग’, ‘संशयकल्लोळ’.

सौभद्र’, ‘स्वयंवर’, ‘स्वरसम्राज्ञीया नाटकांमध्ये शिलेदार यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या आहेत.

कीर्ती शिलेदार यांची ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि त्या नाटकांची नावे.

अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी), एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर), एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी), कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी), दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला), नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर), नाही मी बोलत (संगीत एकच प्याला), नृपकन्या तव जाया (संगीत स्वयंवर), पांडवा सम्राट पदाला (संगीत द्रौपदी),पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र), पाही सदा मी (संगीत मानापमान), बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी), भक्तांचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग), मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर),येतील कधी यदुवीर, रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी), लाजविले वैर्यांीना (संगीत द्रौपदी), सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग), हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज अभिनेत्री #मनीषा_कोईराला यांचा वाढदिवस

जन्म. १६ ऑगस्ट १९७० काठमांडू येथे.

मनीषा कोईराला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बॉम्बे’, ‘दिल सेसारख्या चित्रपटांतून ठसा उमटवला. 

मनीषा यांनी १९८९ साली फेरी भेटौला या नेपाळी चित्रपटातून पदार्पण केले. १९९१ सालच्या सुभाष घई-दिग्दर्शित सौदागर या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. १९४२ अ लव्ह स्टोरी, बाँबे, खामोशी: द म्यूझिकल व दिल से हे तिने भूमिका साकारलेले चित्रपट यशस्वी ठरले. मनीषा कोइराला भरतनाट्यम् व मणिपुरी अभिजात नृत्यशैल्यांमध्ये पारंगत आहे. २०१२ साली मनीषाने पती सम्राट दहल यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर रामगोपाल वर्माच्या भूत रिटर्नस चित्रपटातून पुनरागम केले होते. मनिषा कोईरालाला डिसेंबर २०१२ मध्ये गर्भशायाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर ती शस्त्रक्रिया करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेली होती. त्यातून तावून-सुलाखून बाहेर पडलेली आजची मनीषा कोईराला मात्र वेगळी आहे. पहिल्यापेक्षाही तिचा आत्मविश्वास अजून वाढला असून सध्या तिचे चित्रपट आणि भूमिका यामुळे ती चर्चेत आहे. आजारपणात एक क्षण होता जेव्हा आपण सगळंच गमावून बसणार ही भीती विळखा घालून बसली होती. त्या भीतीनेच आयुष्य आहे तसं पाहायला, त्याचं कौतुक करायला शिकवलं, असं मनीषा कोईराला म्हणते. मनीषा कोईरालाने नीलम कुमार यांच्यासोबत एक पुस्तक लिहिले आहे. मनीषा कोईरालाने तिचा संघर्ष व खासगी गोष्टी 'हील्ड'  या पुस्तकात लिहिले आहेत. मनीषा कोईरालाने कॅन्सरमधून बरे होणे आणि आपले आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करण्याचा प्रवास तिने यात मांडला आहे. कॅन्सरमधून बरे झाल्यावर सहा वर्षांनी तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. मनीषा कोईराला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=VapiKvEA9gg

https://www.youtube.com/watch?v=gtl11jH8b1U

https://www.youtube.com/watch?v=tSQa0VG4lZE

आज १६ ऑगस्ट

आज मराठी दिग्दर्शक #गिरीश_घाणेकर यांचा जन्मदिन.

जन्म.१६ ऑगस्ट १९४३

गोविंद घाणेकर हे गिरीश यांचे वडील. गोविंद घाणेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील कल्पक, मेहनती, प्रतिभावान व परोपकारी व्यक्ती. आपल्या वडिलांच्या स्वभावातला हा सारा वारसा गिरीश घाणेकर यांना लाभला. मुंबई विद्यापीठातून १९६६ साली संख्याशास्त्र विषय घेऊन ते पदवीधर झाले. नंतर त्यांनी भारतीय विद्याभवनातून १९६७ साली विपणनशास्त्राची पदविका आणि १९६८ साली जाहिरातशास्त्राची पदविका मिळवल्या. ते १९६९ साली वडिलांच्या - गोविंद घाणेकरांच्या ट्रायोफिल्म्समध्ये रुजू झाले. त्यांनी १९७३ ते १९७४ अशी दोन वर्षे आर.सी.ए टेलिव्हिजन (रेडियो कार्पोरेशन ऑफ अमेरिका) मध्ये कामाचा अनुभव घेतला. निशांत’ (१९७५) व मंथन’ (१९७६) या चित्रपटांचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हाताखाली साहाय्यकाचे काम करून गिरीश घाणेकर यांनी दिग्दर्शनाचे धडे घेतले होते. १९८२ साली गिरीश यांनी जीज फिल्म शॉपया नावाची स्वत:ची चित्रसंस्था काढली. या संस्थेने व इतर कंपन्यांनी काढलेले बरेच चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. गोष्ट धमाल नाम्याची’,‘हेच माझे माहेर’,‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’,‘रंगतसंगत’,‘राजाने वाजवला बाजा’,‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’,‘हसण्यासाठी जन्म आपुला’,‘वाजवा रे वाजवानवसाचं पोरअसे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. स्वत:ची चित्रसंस्था सुरू करण्याआधीच्या कैवारीया चित्रपटाचे ते सूत्रधार होते, तर मातोश्री सुनंदाबाई घाणेकर या निर्मात्या होत्या. गोष्ट धमाल नाम्याचीया पहिल्याच चित्रपटापासून संकलक अशोक पटवर्धन व संगीतकार अशोक पत्की यांच्याशी त्यांचे विशेष सूर जमले. कमीतकमी वेळात प्रेक्षकांना बरेच काही सांगणे हे जाहिरातपटाचे तत्त्व त्यांनी चित्रपटात वापरले. त्यामुळे त्यांचे सर्व चित्रपट कमालीचे बांधेसूद असून त्यात पाल्हाळ नसे. त्यातील कथानक जरासुद्धा रेंगाळत नसे. उत्तम निर्मितिमूल्य, अभिरुचीसंपन्न कथानक, निर्मळ नर्मविनोद आणि ओघवती मांडणी यामुळे त्यांच्या चित्रपटांना गती असे. त्यांचा मूळ पिंड कलावंताचा. वडिलांबरोबर काम करत त्यांनी आपले कलागुण अधिक विकसित केले व बापसे बेटा सवाई ठरला. हेच माझे माहेर’, ‘प्रेम करू या खुल्लमखुल्लाया त्यांच्या चित्रपटांना फाळके पुरस्कार, तर रंगतसंगत’, ‘वाजवा रे वाजवानवसाचं पोरया तिन्ही चित्रपटांना विनायक पुरस्कार मिळाले होते. नवसाचं पोरहा गिरीश घाणेकर यांचा शेवटचा चित्रपट ठरला. गिरीश घाणेकर यांना जॉय व ध्रुव असे दोन पुत्र आहेत. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात गाजलेल्या "गोट्या" या मराठी मालिकेत जॉय याने प्रमुख पात्र रंगवले होते, तर ध्रुव घाणेकर चित्रपट क्षेत्रात संगीतकार म्हणून काम करतो. गिरीश घाणेकर यांचे २३ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ मधू पोतदार

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज #नुसरतफतेहअली_खान यांचा स्मृतिदिन.

जन्म. १३ ऑक्टोबर १९४८ पाकिस्तानमधील पंजाबच्या लायलपूर येथे.

नुसरत फतेह अली खान यांचा जन्म पंजाबी मुसलमान कुटुंबात झाला. कव्वाली, गझल, शास्त्रीय, पारंपारिक गायक म्हणून नुसरत फतेह अली खान यांनी जागतिक स्तरावर नाव मिळवले. नुसरत यांच्या आवाजाची जादू भारतावरही चालली. त्यांनी गायलेली आफरीन आफरीन’, ‘मेरा पिया घर आया’, ‘पिया रे-पिया रे’, ‘सानू एक पल चैन ना आए’, ‘तेरे बिनअशी अनेक गाणी आजही तितकीचं प्रसिद्ध आहेत. शिकागो येथे १९९३ साली झालेल्या रॉक कॉन्सर्टमध्ये नुसरत यांनी गाण्यास सुरुवात केली आणि अमेरिकेतील नागरिकही त्यांच्या आवाजावर फिदा झाले. मात्र, नुसरत फतेह अली खान यांना केवळ ४९ वर्षांचेच आयुष्य लाभले. नुसरत फतेह अली खान यांचे १६ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज ज्येष्ठ कवी #नारायणगंगारामसुर्वे यांचा स्मृतिदिन.

जन्म. १५ ऑक्टोबर १९२६

आम्ही नसतो तर हे सूर्यचंद्र , तारे बिच्चारे फिक्के फिक्के असते

बापहो! तुमच्या व्यथांना शब्दांत अमर कोणी केले असते

जन्ममरणाच्या प्रवासात आम्हाशिवाय सोबतीस कोण असते, चला बरे झाले;

आम्हालाच कवितेत खराब व्हायचे होते...जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, ... अशा अनेक कवितांनी मराठी रसिकांच्या मनावर राज्य गाजवणारे कवी म्हणजे नारायण सुर्वे.

१९२६-२७ मध्ये मुंबईतील चिंचपोकळीत एका कापड गिरणीसमोर रस्त्यावरचा हा अनाथ जीव गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला. गिरणी कामगारच असलेल्या काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वत:च्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्य्र, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यातून त्यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले. घरात अठराविश्वआ दारिद्य्र असतानाही या नारायणाला चार अक्षरे लिहिता-वाचता यावीत म्हणून दादर, अप्पर माहीम मराठी महापालिका शाळेत घातले. नारायण सुर्वे १९३६ मध्ये चौथी इयत्ता उत्तीर्ण झाले आणि गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मुंबई सोडून ते कोकणात गावी निघून गेले. गावी जाताना त्यांनी नारायणाच्या हातावर दहा रुपये ठेवले आणि समोर मुंबईचा विशाल सागर.

मग भाकरीचा चतकोर चंद्र मिळविण्यासाठी ते एका सिंधी कुटुंबात घरगडी, हॉटेलात कपबशा विसळणारा पोऱ्या, कुणाचे कुत्रे-कुणाचे मूल सांभाळणारा हरकाम् या, दूध टाकणारा पोरगा, अशी कामे करीत वाढले. गोदरेजच्या एका कारखान्यात त्यांनी पत्रे उचलले, टाटा ऑइल मिलमध्ये हमाली केली. काही काळ गिरणीत धागाही धरला. बॉबीन भरली. मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे "सुर्वे मास्तर' झाले. "कधी दोन घेत, कधी दोन देत' आयुष्याची वाटचाल सुरू असतानाच जिंदगीच्या धगीवर शब्द शेकून घेत त्यांनी मराठी काव्यप्रांतात एक नवा सूर घुमवला. त्यांची पहिली कविता १९५८ मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली.

१९६२ मध्ये "ऐसा गा मी ब्रह्म' प्रकाशित झाला. त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले. गाजत रा हिले. "माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. श्री. सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून ईश्वईरवाद, प्रारब्ध, उच्च-नीचता किंवा जातीचा कधीही पुरस्कार केलेला नाही. त्यांनी मराठी कवितेत कामगारांचे, हातावर पोट असणाऱ्यांचे जग शब्दबद्ध करून आणि त्यांच्या संघर्षातून कृतिशील आशावादाकडे झेपावणाऱ्या आकांक्षांचे चित्रण, पुरोगामी विचारांच्या मुशीतून निघालेल्या शब्दकळेद्वारे केले आणि मराठी कवितेला सामाजिक बांधिलकीचा विशाल आशय प्राप्त करून दिला आहे.

सुर्वे वाढले त्या चाळीतील सारेच जण साम्यवादी पक्षात होते. डावी चळवळ जोरात होती. ती चळवळ हा त्यांचा मोठा आधार बनली. सुर्व्यांच्या वैचारिक प्र वासाची ही सुरवात होती. "माझ्या पहिल्या संपात मार्क्सआ मला असा भेटला,' असे सांगणाऱ्या सुर्व्यांची साम्यवादी, डाव्या विचारप्रणालीशी बांधिलकी आहे. कम्युनिस्ट चळवळीत ते "रेडगार्ड' बनले. या चळवळीतील एक कॉम्रेड तळेकर यांच्या भाचीवर त्यांचे प्रेम बसले. आई-बापाविना वाढलेल्या कृष्णा साळुंके हिच् याशी त्यांनी विवाह केला. आयुष्यातील कष्ट संपले नव्हते. खारजवळ एका झोपडपट्टीत त्यांनी संसार थाटला होता. मोठा मुलगा अवघा बावीस दिवसांचा असतानाच हे झोपडे तोडले गेले. आठ दिवस फुटपाथवरच संसार होता. या अनुभवातून आलेल्या कवितेला दैनंदिन जीवनातील कठोर वास्तवाशी, दैनंदिन संघर्षाशी जोडण्याचे क्रांतिकार्य श्री. सुर्वे यांनी केले आहे. जीवनात जे वास्तव अनुभवले, त्यांचे भांडवल करायचे नाही, अशी त्यांची वृत्ती होती. त्यामुळे ते अनेकांना आपले वाटतात. पदपथापासून विद्यापीठापर्यंत आणि कामगारांपासून ते बुद्धिनिष्ठ समीक्षकांपर्यंत त्यांच्या कवितांना रसिकमान्यता मिळाली. संत कबीरालाही त्याच्या आईनं नदीकाठी सोडलं. कबीर दोहे करायला लागला आणि मी कविता करायला...त्यालाही त्याची जात सांगता आली नाही अन् मलाही...असं सुर्वे म्हणत.

ज्यांना सुर्वे दिसू आले नाहीत, अशांसाठी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी एकदा सांगितले, "अरे, केशवसुत कशाला शोधताय? तुमचा केशवसुत परळ मध्येच राहतोय.' नारायण सुर्वे यांचा पद्‌मश्री, सोव्हिएत रशियाचं नेहरू ऍवॉर्ड, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, नरसिंह मेहता पुरस्कार, कराड साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, असे अनेक पुरस्कार देऊन गौरव झाला. नारायण सुर्वे यांचे १६ ऑगस्ट २०१० रोजी निधन झाले. नारायण सुर्वे यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज बॉलिवूडचा नवाब अभिनेता #सैफअलीखान यांचा वाढदिवस.

जन्म. १६ ऑगस्ट १९७०

क्रिकेटपटू मन्सूर अली खान पटौदी व बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांचा मुलगा असलेल्या सैफचे वडिल मन्सूर अली खान पतौडी भोपाळच्या शाही खानदानचे राजकुमार होते. ते भोपाळचे शेवटचे नवाब हामीदुल्ल खान यांचे पणतु होते. नवाब हमीदुल्ल खान यांनी आपली सगळी संपत्ती आपल्या मुलीच्या म्हणजेच मन्सूर अली खान पतौडी यांच्या आईच्या नावावर केली होती. त्यामुळे आईनंतर त्याचे सगळी मालकी हक्क मन्सूर अली खान पतौडी यांच्याकडे आले आणि त्यानंतर सैफ अली खानकडे. सैफ हा पतौडी साम्राज्याचा १० वा नवाब आहे. त्यामुळे त्याचा थाट ही नवाबीच आहे. सैफने १९९२ सालच्या परंपरा ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. सैफच्या जीवनात बरेच चढउतार आले आहेत. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंगसोबत झाले होते आणि ते यशस्वी झाले नव्हते. सैफ अली खानने एका  मुलाखतीत अमृता सिंगसोबतच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. त्याने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ब्रेकअप जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. मीदेखील हे अनुभवलं आहे आणि विचार करतो की कदाचित यापेक्षा वेगळं काहीतरी व्हावे. असं होऊ शकत नाही की या सर्व गोष्टींचा त्रास मलाही झाला. खूप साऱ्या गोष्टी असतात ज्यांना सांभाळणं कठीण जातं. मी हा विचार करून स्वतःला समजवतो की त्यावेळी मी फक्त २० वर्षांचा होतो आणि जवान होतो. अभिनेत्री सारा अली खान आणि इब्राहिम हे अमृता सिंग व सैफ अली खान यांची मुले होत. अमृता सिंग हिच्याशी २०१४  मध्ये घटस्फोट घेतल्यावर अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी २०१२ मध्ये लग्न केले होते. तान्हाजी - द अनसंग वॉरियरया चित्रपटात सैफ अली खान या महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांचे अभिनयाचे कौतुक झाले होते. आजही सैफ खान भारतामधील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो. त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कार व एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१० साली सैफचा भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता जो वादादित ठरला होता.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज अभिनेत्री, पॉप गायिका #मडोना चा वाढदिवस.

जन्म. १६ ऑगस्ट १९५८

मडोना यांचे पूर्ण नाव मडोना लुईस व्हेरोनिका चिकोअ्ने. मडोना मोठेपणी ती प्रचंड प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना,  अभिनेत्री, मॉडेल, उद्योजिका, लेखिका, फॅशन डिझायनर वगैरे होईल असं कुणाला वाटलं नसेल. हां, ती हुशार मात्र होतीच. ग्रेड कधी तिनं सोडली नाही. गाण्याच्या-नृत्याचा छंद लागला तेव्हाही शिक्षण अर्धवट न सोडता तिनं डिग्री मिळवली. आणि तीही इतकी उत्तमरीत्या, की युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगननं तिला पदव्युत्तर शिक्षणासाठी स्कॉलरशिपही देऊ केलेली. पण ती त्या अभ्यासू मुलीसोबत अजून एका बंडखोर, चमत्कारिक, तऱ्हेवाईक मुलीला सोबत घेऊन वावरत असे. मग कधी ती वर्गामध्ये दोन तासांच्या दरम्यान नृत्य करत असे आणि ते करताना आपला स्कर्ट बिनदिक्कत वर उचलीत असे. कधी ती सूचक हावभाव करीत पदन्यास करी तर कधी अपशब्दांची लाखोली वाहात असे, पण तिचं देखणेपण इतकं सर्वव्यापी होतं की जणू तिला सारे गुन्हे माफ असत.

आजही मडोना तशीच आहे. हुशार, अभ्यासू, धोरणी, चलाख पण बेधडक, बेफाट आणि पुष्कळदा आचरटही. आजही तिच्या देखण्या सौंदर्याची जादू ओसरलेली नाही. आजही ती अपशब्दांचा मारा करत असते. डेव्हिड लेटरमननं तिची मुलाखत घेतली होती. त्याचं प्रसारण झालं तेव्हा सेन्सॉरच्या धाकानं केवळ बीप-बीप एवढंच ऐकू येत होतं, इतके वेळा मडोनानं फक् हा शब्द उच्चारला होता. आजही ती चांगलंच गाते-नाचते. तिची आई तिच्या बालपणीच कर्करोगानं वारली; तिचा बाप कडक इटालियन बाप होता. तिला पुष्कळ पुरुष भेटले-समजले, तिची स्वत:ची दोन मुलं आहेत, पण तिचं सारं वैयक्तिक आयुष्य तिच्या गाण्यापासनं जणू ठरवून बुद्ध्याच अंतरावर राहतं. तिची गाणी ही मूलत: एंटरटेनिंगअसतात. तिचा आवाज मला खूप आवडतो असं नाही, तिच्या कविता बऱ्या असतात, ती मायकेल जॅक्सनइतकी नर्तनात कुशल नाही. पण या साऱ्याचा मिळून जो एकसंध डीस्कोर्सहोतो, तो मात्र मला आवडतो. तिचे म्युझिक व्हिडीओ, तिचा परिवेश, तिचं हसणं, तिचा व्यासपीठावरचा वावर हे सारंच त्या मडोना डीस्कोर्समध्ये सामावलेलं असतं. खरं तर, या जागतिकीकरणाच्या काळात कुठलंच गाणं हे निखळ गाणं राहिलेलं नाही. गाण्याच्या आसपास पुष्कळ गोष्टी असतात आणि त्या साऱ्याचा मिळून एक अनुभव रसिकाला मिळतो. अगदी शास्त्रीय संगीतातही बोटातल्या अंगठय़ा, भरजरी साडय़ा, चकाकणारे तंबोरे, वादकांची बैठक आणि गायकासोबतचं साहचर्य हे सारं मिळून जो डीस्कोर्स उत्पन्न होतो, त्याला आपण रसिक सामोरं जातो.

मडोना तर उघडउघड पॉपगाण्यातली. तिचा आणि तिच्या गाण्याचा परिसर भव्य असावा, चकाकता असावा यात शंका नाही. पण तिच्या गाण्याचं एक वैशिष्टय़ असं की या साऱ्यापलीकडेही तिची कविता तगून राहते. पुष्कळदा त्यात सामाजिक आशयही असतो. पापा डोंट प्रीचहे तिचं गाणं त्याचं द्योतक आहे. कुमारी माता बापाला म्हणते आहे की बाबा, मला रागवू नका. माझ्या पोटातलं बाळ मी वाढवणार आहे.’ (Oh, I’m gonna keep my baby.)  बॉबकटमधली मुळीच न नटलेली मडोना हे गाणं गाऊ लागली तेव्हा अमेरिकेमध्ये चांगलीच खळबळ माजली. कॅथॉलिक पंथाला मुळातच गर्भपात अमान्य असल्यानं त्यानं या गाण्याला पाठिंबा दिला (पुढे बदलत गेलेल्या मडोनावर पोपनं व्हॅटिकन सिटीत बंदी घालण्याइतपत गाडी गेली तो भाग वेगळा.) पण पुष्कळांना ते अनैतिकतेची पाठराखण करणारं गाणं वाटलं. केवढा तरी गदारोळ उठला. टिप्पर गोरसारख्या चळवळीतल्या स्त्रीनं कधी नव्हे तो मडोनाला पाठिंबा दिला. आता मागे वळून बघताना मडोनाला ते आठवून हसू येत असेल नाही? नैतिकतेच्या व्याख्या किती पालटत गेल्या आहेत. आताच्या २०१३ च्या ब्लाँड अॅनम्बिशन टूरमध्ये मडोना एकेक वस्त्र काढून फेकते तरी कुणाला काही वाटत नाही. तिची बंडखोरी तिनं स्टेज शोवर जास्त उघडपणे दाखवली. कधी ती सूचक हावभाव गाताना करे, कधी तिचा पदन्यास उत्तानतेकडे झुके, पुष्कळदा स्कर्टखालून अंतर्वस्त्र काढून प्रेक्षकांमध्ये फेकून देई आणि ते झेलायला प्रेक्षक अधीर असत. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष जेकस् चिराग त्या शौकीन मंडळींमध्ये असत आणि एकदा ते तसेच अंतर्वस्त्र मांडीवर घेऊन बसून राहिलेले होते अशी गॉसिपसर्वत्र फिरत होती. (बाकी हे फ्रेंच रसिकतेला साजेसंच आहे!)

या तिच्या वर्तनाची अमेरिकेला एव्हाना सवय झाली होती पण ब्लॉड अॅसम्बिशन टूरमध्ये तिनं कळस गाठला कारण रोलिंग स्टोनसारख्या विख्यात संगीत मासिकानंही त्या टूरला ‘Sexually provocative extravaganza’ असं संबोधलं. त्या टूरमध्ये लाइक अ व्हर्जीनया गाण्यावर नाचताना तिनं स्टेजवरच्या पलंगावर दोन पुरुषांसोबत प्रणयनर्तन केलं आणि हस्तमैथुनसदृश हालचाली अथवा अभिनय केला. तिची बॅड गर्लइमेज नव्यानं बळावली. खूपदा तिला यापूर्वीही उथळ, वेश्या, गणिका असं संबोधलं गेलं होतं, त्याची उजळणी पुन्हा झाली. पुष्कळ स्त्रीवादी संघटनांनी तिला विमुक्त स्त्रीम्हणून गौरवलं. बेट्टी फ्रिडन ही स्त्रीवादी लेखिका म्हणाली होती, ‘‘एम.टी.व्ही.वर वावरणाऱ्या बाकी बायांपेक्षा मडोना केवढी धाडसी वाटते, केवढी जिवंत वाटते. तिच्या आयुष्यावर आणि तिच्या लैंगिकतेवर तिचाच ताबा आहे.’’ पण मडोनाचं ते मुळातलं लाइक ए प्रेयरगाणं केवढं वेगळं आहे, केवढय़ा सशक्त जाणिवांचा उद्गार त्या गाण्यामधून होतो! चर्चमध्ये एक काळा संत दाखवला आहे. त्याच्या पावलांचं चुंबन घेणारी गोरी मडोना, हे अमेरिकेतल्या असंख्य कृष्णवर्णीयांना भावलेलं चित्र होतं. गोऱ्या बाईनं काळ्या पुरुषाजवळ होता होईतो जायचं नाही या संकेताला जणू त्या गाण्यानं तडाखा दिला होता.

“Life is a mystery, Everyone must stand alone

I Hear you call my name, and it feels like home”

(जगणं एक कोडं असतं, एकटंच उभं राहायचं असतं

सध्या, तू घालतोस साद, तेव्हा शांत शांत वाटतं)

असं म्हणणारी मडोना ही मायकेल जॅक्सन या तिच्या समकालीन पुरुष गायकापेक्षा पुष्कळच वरच्या स्तरावर आहे हे उघडच आहे. आणि म्हणूनच अमेरिकेतलं एक जनमत हे तिच्या बॅड गर्लइमेजपेक्षा विरुद्ध आहे. पुष्कळांना ती कणखर, झुंजार, पन्नाशीतही दोन मुलांना घेऊन जगण्याशी लढणारी स्त्री वाटते. वृद्धांनाही ती आवडते कारण तिला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही. ती मद्याला स्पर्श करीत नाही, तेव्हा ड्रग्ज वगैरे गोष्टी लांबच राहिल्या. पॉप संगीतामधले अनेक गायक-गायिका व्यसनांमध्ये अडकून अंती मेलेलेही आहेत. या पाश्र्वभूमीवर मडोना ही लोकांना आवडत असावी यात शंका नाही. आणि (त्यामुळेही) ती पन्नाशीतही तिशीतल्या तरुणीइतकी फिटआणि सुंदर असावी हेही लोकांना आवडतं. मडोनाची जगण्याकडे बघण्याची नजर तिच्या व्यासपीठावरच्या वावराइतकी उथळ नक्कीच नाही. हिंदू संस्कृतीचं तिला आकर्षण आहे, थोडा अभ्यासही आहे. ज्यू धर्मातल्या कबालाया उपपंथामधल्या प्रार्थना आणि आराधनाही ती करीत असते आणि म्हणून अनेकांना मडोना हे कोडं सुटत नाही. नैतिकतेच्या पारंपरिक पट्टय़ांना तिनं सहज वाकवलेलं आहे आणि या युगातल्या तरुणाईला तर इतका समग्र विचार करण्याची गरजही बहुतांश वेळेला वाटत नाही. समोर गाणारी गायिका त्या क्षणाला कसं गाते-नाचते आहे हेच त्यांच्या लेखी महत्त्वाचं असतं. पण कलाकार मात्र इतका घट्टपणे वर्तमानाला धरू शकत नाही. त्याचं उभं पुढचं-मागचं आयुष्य त्याच्या अभिव्यक्तीपाशी उभं असतंच. शेक्सपियरनं शायलॉकच्या संदर्भात ज्यू जमातीविषयी म्हटलंय, ‘‘For Suffarance is the badge of all our tribe’’ कलाकारांना गायक-गायिकांना तो सोसण्याचा बिल्ला डकवावा लागतोच. मडोनानं तिचा तो बॅज्किती चतुराईनं लपवून लोकाभिरुचीला सांभाळलं आहे! आणि तरी बेसावध क्षणी तीदिसतेच. पापा डोंट प्रीचम्हणताना तिच्या इटालियन बापाचं अस्तित्व त्या स्वरांवर तरंगताना मला तरी दिसतं. जेव्हा मडोनाचं पन्नास वर्षांनंतर मूल्यमापन केलं जाईल तेव्हा हे सारं विरेल, पण एक नोंद मात्र राहील- जेव्हा पॉपचं प्रांगण एल्व्हीस, फ्रॅक सिनात्रपासून बीटल्स ते मायकेल जॅक्सन हे पुरुष गाजवत होते, तेव्हा त्या पुरुषी चौकटीत मडोनानं एका स्त्रीचा आवाज फार घट्टपणे ठोकून बसवला. तो आवाज फार ताकदीचा नव्हता, दूरदर्शीही नव्हता. पण त्या आवाजानं मरीया कॅरे, बियॉन्से, स्पाइस गर्ल्स अशा अनेक गायिकांची पायवाट मोकळी केली. माझ्या मते हे मडोनाच्या आयुष्याचं श्रेयस आहे आणि त्या आयुष्याचं प्रेयस तर तिला पुरतंच मिळालेलं आहे, नाही? जॉर्ज कलॉड गिलबर्ट या संगीत अभ्यासकानं मडोनाला ‘Great prostitute of mytn, the whore of Babylon’ असं म्हटलं आहे, ते योग्य वाटतं. साधीसुधी वेश्या, गायिका नव्हे तर मंदिरातली (बॅबिलॉनच्या) अतिपवित्र पुजारी वेश्या! ती वेश्या पोस्ट-मॉडर्न जगण्याला साजेशी आहे आणि चौकटीत जगणाऱ्या आपल्यासारख्यांना त्या पवित्र अभिसारिकेचं संगीत-दर्शन हे केवढं जाग आणणारं, समृद्ध करणारं आहे!

आपल्या समुहा तर्फे मडोनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट / डॉ. आशुतोष जावडेकर

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज जेष्ठ अभिनेत्री #मनोरमा यांचा जन्मदिन.

जन्म.१६ ऑगस्ट १९२६

खलनायिका अग्रणी ललिताबाई पवार, सुंदर शशिकला, रापचिक बिंदू, तडतडती अरुणा इराणी या मांदियाळीत आपलं गलेलठ्ठ शरीर डुगुडुगू हलवत, चेहऱ्याचे विक्षेप करत, जबडा आक्रसून घेत खाष्टपणा करणारी ही बाई आली की प्रेक्षकांमध्ये हास्यध्वनी उमटत असे. बावळटपणा, इरसाल निर्लज्जपणा, लोभ याचं उत्तम अर्क चित्र या उत्कृष्ट अभिनेत्रीनं अमर करून ठेवलं आहे. "मैं केहेती (कहती नव्हे) हूँ" म्हणत मनोरमा सरसावली की आता हिची नायक अथवा नायिका जिरवणार म्हणून आम्हाला गुदगुल्या व्हायच्या. अशा या अभिनेत्री मनोरमा यांचे खरे नाव Erin Isaac Daniel. आयरिश आई, भारतीय ख्रिश्चन वडील असलेल्या  मनोरमा यांचा जन्म लाहोरला झाला. मनोरमा यांनी बेबी आयरीस म्हणून लाहोरच्या चित्रसृष्टीत ओळखले जात असे. १९४१ साली त्यांनी बाल कलाकार म्हणून खझांचीया चित्रपटाद्वारे  चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. मनोरमा  या प्रशिक्षित नर्तकी व गायक होत्या. त्यांनी पंजाबी सुपरहिट चित्रपट'लछि' मध्ये मुख्य नायीका म्हणून काम केले होते. १९४८ साली आलेल्या घर की इज्जत या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमारची बहीण म्हणून काम केले, त्यांनी १९६१ मध्ये देवआनंद व वहिदा रहेमान यांच्या बरोबर 'रूप की रानी चोरोंका राजा या चित्रपटात चरित्र अभिनेत्रीची भूमिका केली होती. मनोरमा यांनी किशोर कुमार यांच्या बरोबर १९६२ साली आलेल्या हाफ टिकीटया चित्रपटात काम केले. मनोरमा यांनी टीव्ही सिरियल्स (शाहरुखची दस्तक, कुटुंब मधली हितेन तेजवानीची आजी) केल्या. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीपा मेहता यांच्या 'वॉटर' या चित्रपटात त्यांनी काम केले होते. 'वॉटर' हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 'वॉटर' मधील कामाने हॉलिवूडच्या टिकाकारांनाही प्रभावित केलं होतं. मनोरमा यांनी १०० हून अधिक चित्रपटात कामे केली होती. मनोरमा यांनी निर्माते, चरित्र अभिनेते राजन हक्सर यांच्या बरोबर लग्न केले होते. राजन हक्सर हे आधी रात के बाद (१९६५), प्यार का सपना (१९६९) व रेशम की डोरी (१९७४) या चित्रपटांसाठी ओळखले जातात.रीटा हक्सर ही त्यांची मुलगी. रीटा हक्सर यांनी ७० च्या दशकात काही चित्रपटात कामे केली.  मनोरमा यांचे १५ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले.

मनोरमा यांचे काही चित्रपट. सीता और गीता, एक फूल दो माली, दो कलियां, कारवाँ

https://www.youtube.com/watch?v=Xjv7CWMLYqg

https://www.youtube.com/watch?v=9lrTzCH6cf0

https://www.youtube.com/watch?v=Xjv7CWMLYqg&t=97s

https://www.youtube.com/watch?v=HfssMBm0QGA

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ :- इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज हिंदी पार्श्वगायिका #हेमलता यांचा वाढदिवस.

जन्म. १६ ऑगस्ट १९५२

हेमलता हे नाव ऐकले की  ७० व ८० च्या दशकातील गाणी आठवतात. ७० च्या दशकात रवींद्र जैन सारखे स्वतंत्र वृत्तीचे संगीतकार आणि राजश्री पिक्चर्स सारखे नवीन कलाकारांना घेऊन काम करणारी संस्था यामुळे अनेक लोकांना कामाची संधी मिळाली आणि नवीन चेहरे आणि आवाज ऐकू आले. त्यातल्याच एक हेमलता. त्याचे लग्नाआधीचे नाव विवाह लता भट होते. त्यांनी अभिनेता योगेश बाली यांच्याशी विवाह केला होता. त्यांनी  संगीताचे आणि गझल चे शिक्षण उस्ताद रईस खान यांच्याकडे घेतले होते. वय १४ व्या वर्षी हेमलता यांना खय्याम याच्या कडून गाण्याची संधी मिळाली. चित्रपट, मैफिल, टेलिव्हिजन आणि संगीत त्याच्या गायन भिन्न प्रकारांमध्ये अल्बम गीते त्यांनी गायली. ३८ प्रादेशिक भाषांमध्ये सुमारे ५००० गाणी त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत गायली आहेत. हेमलता यांना १९७७ ते १९८१ च्या दरम्यान पाच सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. उषा खन्नाचा एक आप तो ऐसे ना थे (तू इस तरह से मेरी जिंदगी मे) चा अपवाद वगळता त्यांनी जवळपास सगळी गाणी फक्त रवींद्र जैन कडेच गायली असावीत. त्यांची गाणी रवींद्र जैन च्या संगीतामुळे खूपच गाजली उदा.जब दीप जले आना, अखियोंके झरोको से, कई दिन से मुझे इत्यादी. हेमलता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज १६ ऑगस्ट

आज अमेरिकेतील लोकप्रिय गायक #एल्व्हिस_प्रिस्टले यांचा स्मृतिदिन.

जन्म. ८ जानेवारी १९३५

गिटारवादक, अभिनेता आणि 'किंग ऑफ द रॉक अँड रोल' अशी ओळख नंतर ओळख झालेला एल्व्हिस प्रिस्टले ने एका ठिकाणी गायक म्हणून 'ऑडिशन' दिली पण त्यात तो नापास झाला. परीक्षकाने त्याला तुझ्यासाठी ट्रक ड्रायव्हरचीच जागा योग्य आहे असा अनाहूत सल्लाही दिला. यानंतर काही महिन्यातच हा मुलगा आणखी एका ऑडिशनसाठी गेला. यावेळी ही त्याची भट्टी काही जमत नव्हती. दिवसभर प्रयत्न करून थकलेला हा मुलगा शेवटी शेवटी पार कंटाळला पण इतर वादकांनी ब्रेक घेतला असताना आपल्या गिटारवर एकटाच गाऊ लागला. 'आर्थर कृडूप'चं ते मूळ गाणं हा मुलगा पार वेगळ्या ढंगात आणि जलद लयीत गाऊ लागला नि म्युझिक रूम मध्ये जणू विजेचा झटका बसल्यासारखं होऊन एक उत्फुल्ल वातावरण निर्माण झालं. इतर वादकांनी क्षणात याला साथ द्यायला स

आज १६ ऑगस्ट

आज हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक #महेश_मांजरेकर यांचा वाढदिवस.

जन्म १६ ऑगस्ट १९५७ मुंबई येथे.

महेश मांजरेकर यांनी आपल्या करीयर सुरुवात १९८४ साली 'अफलातून' ह्या मराठी नाटकामधून केली. दिग्दर्शक म्हणुन त्यांनी १९९५ साली आईया मराठी चित्रपटापासून सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. १९९९ साली त्यांनी वास्तवचित्रपटाचे दिग्दर्शक केले. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वोत्तम चित्रपट ठरला. पण त्यानंतर दिग्दर्शक केलेले निदान आणि जिस देश मे गंगा रहता है हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढे यशस्वी ठरले नाहीत. त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट अस्तित्व, कुरुक्षेत्र, एहसास, हत्यार, विरुद्ध असे आहेत. २००१ साली एहसास या चित्रपटापासुन त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. २००२ साली कांटेचित्रपटातील त्यांची भुमिका गाजली. पुढे त्यांनी प्राण जाये पर शान न जाये, रन, मुसाफिर, पदमश्री लालू प्रसाद यादव, जवानी-दिवानी, दस कहानिंया, स्लमडॉग मिलेनियम, वाँटेड, दबंगसारख्या अश्या चित्रपटात विविध भुमिका सकारुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखविली. त्यांनी लेखन व भुमिका केलेला मी शिवाजी राजे भोसले बोलतोयहा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ''शिक्षणाच्या आईचा घो'', ''लालबाग परळ'', ''फक्त लढ म्हणा'', ''काकस्पर्श'' आणि ''कोकणस्थ'' या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. महेश मांजरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ. इंटरनेट

ही व माझ्या इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

************

१६ ऑगस्ट

नेते आर. आर. पाटील जन्मदिन

************

 

जन्म - १६ ऑगस्ट १९५७ (सांगली)

स्मृती - १६ फेब्रुवारी २०१५ (मुंबई)

 

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. पाटील यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी अंजनी, तासगाव तालुका, सांगली जिल्हा येथे झाला.

 

आर आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व. आर आर पाटील यांना लोक प्रेमाने आबा म्हणत. तीच होती त्यांची खरी ओळख. उत्तम वक्ते आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणारा नेता, अशी आबा यांची जनमानसात ओळख होती. आर.आर. पाटलांनी "कमवा आणि शिका" हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतलं. शाळकरी वयातच प्राचार्य पी.बी. पाटील यांचं मार्गदर्शन आबांना मिळालं. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झाले. पुढे एलएलबीही झाले. गरिब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरु तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतांनाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरु केली.

 

वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा पाटील यांना होती. आर.आर. हे पहिल्यांदा १९७९ साली सावळज मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. १९७९ ते १९९० पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते. मग १९९० ते २०१४ या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले. तासगाव मतदार संघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा १९९० साली पहिल्यांदा विधान सभेवर निवडून आले.

 

आर.आर. हे १९९५ साली काँग्रेसच्या तिकिटावर दुस-यांदा आमदार झाले. तेव्हा भाजप-सेनेचं युती सरकार सत्तेत होतं. राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणादून सोडली आणि सत्ताधारी भाजप-सेनेला कोंडीत पकडलं. अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती. नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तो १९९९च्या सुमारास. याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर.आर. यांची ओळख निर्माण झाली.

 

आबांनी २००४, २००९ आणि २०१४ ची आमदारकीची निवडणुक अटीतटीनं लढत जिंकली. सुरवातीला तासगाव आणि नंतर कवठेमहांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आमदारकी बरोबरच त्यांची मंत्रीपदाची कारकिर्दही गाजली.

 

आर.आर.पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली. पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीनं सांभाळलं. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं. पण आबांची स्वच्छ प्रतिमा कायम राहिली.

 

गृहमंत्री असतांना डान्सबार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले. डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोधही झाला पण आबा ठाम राहिले. गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेलं महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनवं होतं. गाडगेबाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले पाटील सत्तेच्या राजकारणात राहुनही साधेच राहिले. साधेपणा हेच त्याचं वैशिष्ठ होतं. याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत. सत्ता येते आणि जाते पण सोबत राहतात ती जोडलेली माणसं हे आर.आर. यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली. कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला. आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला. पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागिरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही. आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात. तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत.

 

आबा गृहमंत्री असतांना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते. जिल्हा परिषद सदस्य, सहा वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले.

 

आर. आर. पाटील यांचे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१६ ऑगस्ट

नेते अटल बिहारी वाजपेयी स्मृतिदिन

************

 

जन्म - २५ डिसेंबर १९२४ (ग्वालीयर)

स्मृती - १६ ऑगस्ट २०१८ (दिल्ली)

 

कवी मनाचा प्रखर राष्ट्रवादी अशीच प्रतिमा असलेले नेते अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला.

 

अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूर मधून राज्यशास्त्रात एम.ए. ची पदवी मिळविल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या चले जावचळवळीपासून सुरु झाली.

 

स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनसंघया पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली.

 

आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेच सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक नि वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता समझोता करण्याचा प्रयत्न केला. कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील.

 

वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील नंतर च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानंतर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. 

 

वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली. अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले.

 

वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१६ ऑगस्ट

गणितज्ञ जेकब बर्नोली स्मृतिदिन

************

 

जन्म - २७ डिसेंबर १६५४

स्मृति - १६ ऑगस्ट १७०५

 

जेकब बेर्नोली (ऊर्फ जेम्स किंवा जाकस) हा बर्नोली घराण्यातील आठ प्रख्यात गणितज्ञांपैकी एक होता.

 

संख्याशास्त्रातील काही मुलभुत संकल्पनांचा पाया ज्यात रचला गेला तो 'आर्स कंजेक्टांडी' हा जेकब बर्नोली या संख्याशास्त्रज्ञाने लिहिलेला शोधनिबंध प्रसिद्ध होऊन यंदा ३०० हुन जास्त वर्ष झाली. ते कॅल्क्युलसच्या असंख्य योगदानासाठी परिचित आहे.

 

त्यांनी गणित आणि खगोलशास्त्र देखील अभ्यासले. त्यांनी संपूर्ण युरोपचा प्रवास केला आणि त्या काळातल्या गणितातील नवीनतम शोध आणि त्या काळातील प्रमुख आकडेवारीनुसार विज्ञान विषयी जाणून घेतलं. यात जोहान्स हूडे , रॉबर्ट बॉयल आणि रॉबर्ट हूके यांच्या कामांचा समावेश होता.

 

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

१६ ऑगस्ट

रामकृष्ण परमहंस स्मृतिदिन

************

 

जन्म - १८ फेब्रुवारी १८३६

मृत्यू - १६ ऑगस्ट १८८६

 

रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगाल मध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते.

 

आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.

 

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग परिसरातील कामारपुकुर ग्रामी १८३६ साली एका दरिद्री धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवारात रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. वडील क्षुदिराम चट्टोपाध्याय व आई चंद्रमणीदेवी यांचे ते चौथे अपत्य होय.

 

त्यांचा विवाह कामारपुकुर गावापासून तीन मैल वायव्येस असलेल्या जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी असलेल्या पाच वर्षांच्या शारदेसोबत १८५९ साली झाला. तेव्हा रामकृष्णांचे वय तेवीस वर्षे होते. वयाचे असे मोठेपण तत्कालीन समाजात अप्रचलित नव्हते. शारदामणीशी विवाह झालेला असला तरी लौकिक अर्थाने रामकृष्णांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही.

 

विवाहानंतर पुन्हा त्यांनी मंदिराचे कामकाज पाहायला सुरुवात केली. ब्राह्मणांमधील खोटा जात्यभिमान दूर करण्यासाठी ते कनिष्ठ वर्गीयांच्या हातून अन्नग्रहण करू लागले. मंदिरात सेवेकरी म्हणून अंत्यज (अस्पृश्य) लोकांची नेमणूक केली.

 

कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले. रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदान्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. रामकृष्णांनी इतर धर्मांबाबतही, विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात असे म्हटले.

 

सर्व धर्मीयांसाठी त्यांचा जतो मत, ततो पथ” (जितकी मते, तितके पंथ) हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे.

 

रामकृष्णांंचे सर्वश्रुत शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंंद. त्यांंच्यासह राखाल, भवनाथ, भूपती, नित्यगोपाल, दुर्गाचरण हेही त्यांंचे साधक होते. रामकृष्ण मिशन ही स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली संस्था रामकृष्णांच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य करते.

 

परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत, “माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक" हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म."

 

"तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते."

 

************

************

१६ ऑगस्ट

नेते अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १६ ऑगस्ट  १९६८ (सिवनी)

 

आम आदमी पार्टीचे संस्थापक, पक्षाध्यक्ष व दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज वाढदिवस.

 

अरविंद केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूर येथून अभियांत्रिकी शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी जमशेदपूर येथे टाटा स्टीलमध्ये नोकरी केली. ह्या नोकरीमध्येच असताना त्यांनी टाटा स्टीलमधील सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी बदली मागितली; परंतु त्यांची अभियांत्रिकी पदवी असल्याकारणाने त्यांना सदर विभागामध्ये बदली नाकारण्यात आली. म्हणून त्यांनी टाटा स्टीलची नोकरी १९९२ मध्ये सोडली आणि ते कोलकाता येथील मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी, ईशान्य भारतातील रामकृष्ण मिशन आणि नेहरू युवा केंद्र येथे काम करू लागले. त्यानंतर त्यांनी भारतीय  प्रशासकीय सेवेमध्ये आयकर विभागामध्ये सहआयुक्त या पदावर काम केले.

 

प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी माहितीच्या अधिकार कायद्याच्या मसुद्यावर अरविंद केजरीवाल यांनी काम केले. माहिती अधिकाराचा कायदा व जनलोकपाल संमत व्हावा यासाठी त्यांनी अण्णा हजारे ह्यांच्यासोबत महत्त्वाचे काम केले.

 

प्रशासनामध्ये पारदर्शकता आणून जनतेत भ्रष्टाचारा विरुद्ध जागृती निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. २००६ साली लक्षवेधी नेतृत्वासाठी त्यांना रेमन मॅगसेसे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. रेमन मॅगसेसे पुरस्काराचा निधी दान करून, अरविंद केजरीवाल यांनी पब्लिक कॉज रिसर्च फाउंडेशन ह्या सामाजिक संस्थेची २०१२ मध्ये स्थापना केली.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

No comments:

Post a Comment