╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा
विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही
विनंती .
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🌄 परिपाठ
🌄. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📚 संकल्पना/संकलन:📚.
श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ आज दिनांक: ११/०८/२०२१. वार:बुधवार , महिना :श्रावण,शुक्लपक्ष,तृतीया.
नक्षत्र :पूर्वा.
योग:शिव,करण:वणिज.
सूर्योदय:०६.१९,सूर्यास्त:०७.०९. ■■■■■■■■■■■■■ |
सुविचार:प्रेम सर्वावर करा पण श्रद्धा फक्त
परमेश्वरावर ठेवा.. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
प्रतिज्ञा |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📜 भारताचे
संविधान 📚.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो,. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
|
तुम्ही हो साथी, तुम्ही
सहारे, कोई न अपना, सिवा
तुम्हारे... |
तुम्ही हो साथी, तुम्ही
सहारे, कोई न अपना, सिवा
तुम्हारे... |
तुम्ही हो नैया, तुम्ही
खिवैया, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो... |
|
जो खिल सके न, वो
फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल
हम हैं... |
जो खिल सके न, वो
फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल
हम हैं... |
दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही
हो बंधु, सखा तुम्ही हो... |
तुम्ही हो माता, पिता
तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा
तुम्ही हो..
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
👩💻 बोधकथा 👨💻. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ 🛑 सचोटी🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
एका साधूला पितळेच्या धातूचे सोन्यात
रूपांतर करण्याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्यासाठीच करत
होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्याच्याकडे आला. त्याला मुलीच्या लग्नासाठी
पैशांची आवश्यकता होती. साधूने त्याची अडचण ओळखून त्याला एका पितळेच्या
भांड्याचे रूपांतर सोन्यात करून दिले. ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्याच्याकडे
सोन्याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला.राजाने त्याची चौकशी
केली केली तेव्हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्या मनात लोभाची भावना
उत्पन्न झाली. त्याने साधूला ती विद्या शिकविण्याचे फर्मान काढले. साधूने
राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15
दिवसांची मुदत दिली अन्यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली. राजा त्याच्याकडून
काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून
राजाने वेश पालटला व तो साधूच्या येथे राहून त्याची सेवा करू लागला. साधूने
राजाच्या सेवेवर प्रसन्न होऊन त्याला पितळापासून सोने तयार करण्याची विद्या
शिकविली. राजा महालात परतला. पंधराव्या दिवशी साधूला बोलावून त्याला विद्या
शिकविण्याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्हा राजा गर्वाने म्हणाला,’’ साधू
तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ
राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’
साधू म्हणाला,’’महाराज
तुम्ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन
नाही. ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’
तात्पर्य :ज्ञान सचोटीने प्राप्त
होते, धमकावून नव्हे. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼 अनगिन जीवन धारा मिलकर |
इस धरती पर आई। |
गंगा यमुना के जल -सी है |
भेद-अभेद समाई॥ध्रु०॥ |
|
यह धरती है अतीव पावन |
गंगा में कण-कण गंगा बन। |
खोकर सारा ही अपनापन |
ऋध्दि-सिध्दि-निधि सब पाई॥१॥अनगिन |
|
आगे बढ़ना धर्म हमारा |
लेकर वैभव पूर्ण पसारा |
किन्तु अटल यह रहे किनारा |
शिव सेवा हित धाई॥२॥ |
|
जन मन रंजन पल पल करना |
तन-मन का सब आतप हरना। |
शाखा उप-शाखा में बहना |
धरती प्यास बुझाई॥३॥ |
|
सागर की लहरें तूफानी |
शीश हिमालय का अभिमानी। |
गगन हिलाते आँधी-पानी |
सबको साथ मिलाई॥४॥
________ |
|
🎰 दिनविशेष🎰.
________ |
♀ क्रांतिकारक खुदिराम बोस बलिदान दिन |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ ठळक घटना, घडामोडी |
■२००८ - अभिनव बिंद्राने १० मी. हवाई रायफल
मध्ये भारताचे सर्वप्रथम वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे २८ वर्षांनंतरचे
पहिले सुवर्णपदक आहे. जयंती / जन्मदिवस |
●१९५४
- यशपाल शर्मा – क्रिकेटपटू |
●१९४३
- जनरल परवेझ मुशर्रफ – पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष |
●१९२८
- विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे –
लेखक व पत्रकार |
●१९२८
- रामाश्रेय झा – संगीतकार, वादक
व शास्त्रीय संगीतातील विद्वान |
●१९११
- प्रेम भाटिया – पत्रकार, संपादक, राजकीय
विश्लेषक आणि मुत्सद्दी |
●१८९७
- एनिड ब्लायटन – बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश
लेखिका। मृत्यू/
पुण्यतिथी/स्मृतिदिन ◆२००३-अर्मोड बोरेल-स्विस गणिततज्ञ . ◆२०००- रामनाथ पारकर - क्रिकेटपटू . ◆१९०८-खुदिराम बोस- क्रांतिकारक. ◆१९७०- इरावती कर्वे -शिक्षणतज्ञ |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)छत्रपती संभाजीराजे यांचे समाधी
स्थळ कुठे आहे?
२)भारतीय महिला पहिल्या राष्ट्पती
कोण?
३) अयोध्या शहर कोणत्या नदीकिनारी आहे?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
|
ठळक घडामोडी/ बातम्या |
■ ११वी प्रवेश परीक्षा CETरद्द.-मुबंई
उच्च न्यायालयाचा निर्णय |
■ 5वी ते 12वी वर्ग १७
आगस्ट पासून सुरु करणे बाबत शासन निर्णय व वर्ग सुरु करणेबाबत च्या मार्गदर्शक
सूचना जाहीर. |
■ पुणे-झेडपीचे विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित
गोदामात १७ लाख पुस्तके पडून. |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर.
मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे. ======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
📚परीपाठ🌹 |
श्री. देशमुख. एस. बी, |
🌻सचिव🌻 |
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ |
📱-9011181718📱 |
|
❂ दिनांक:~ 11
ऑगस्ट 2021 ❂ |
🎴 वार
~ बुधवार 🎴 |
|
🏮 आजचे
पंचाग 🏮 |
━═•●◆❃★❂★❃◆●•═━ |
|
श्रावण. बुध ११ |
तिथी : शु. तृतीया |
नक्षत्र : पूर्वा, |
योग :- शिव |
करण : वणिज |
सूर्योदय : 06:16, सूर्यास्त
: 19:11, ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🖋 सुविचार
🖋 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
|
💡शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर |
अशक्य असं काहीच |
राहत नाही. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
⚜म्हणी व अर्थ ⚜ |
|
⛰️दुरुन डोंगर साजरे |
|
🔱अर्थ:- |
कोणतीही गोष्ट लांबुन चांगली दिसते, परंतु
जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
📆 दिनविशेष
📆 |
|
🌞या वर्षातील🌞 २२३
वा (लीप वर्षातील २२४ वा) दिवस आहे. |
|
🌹 महत्त्वाच्या
घटना 🌹 |
|
👉१९४३: सी. डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ
इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले. |
👉१९७९: गुजरात मोर्वी येथे धरण फुटून हजारो
लोक मृत्यूमुखी पडले. |
👉१९९४: अफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ
नेत्या व डॉ. नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉ. फातिमा मीर यांना
विश्वगुर्जरी पुरस्कार जाहीर. |
👉१९९९: बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय
जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने
विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला. |
👉१९९९: शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण
झाले. |
|
🌹जन्मदिवस / जयंती🌹 |
|
👉१९११: पत्रकार, संपादक, राजकीय
विश्लेषक प्रेम भाटिया यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९९५) |
👉१९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि.
स. वाळिंबे यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००) |
👉१९४३: पाकिस्तानचे १० वे राष्ट्राध्यक्ष जनरल
परवेझ मुशर्रफ यांचा जन्म. |
👉१९५४: क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचा जन्म. |
|
🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹 |
|
👉१९०८: क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन.
(जन्म: ३ डिसेंबर १८८९) |
👉१९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या
मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे
यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०५) |
👉२०००:
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अभिनेते पी. जयराज यांचे निधन. (जन्म:
२८ सप्टेंबर १९०९) |
👉२००३: स्विस गणितज्ञ अर्मांड बोरेल यांचे
निधन. (जन्म: २१ मे १९२३) |
👉२०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर
फटहॅली यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९२०) ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🥇सामान्य ज्ञान 🥇 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
👉गरबा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे? |
🥇गुजरात |
|
👉भारताची स्वरसम्राज्ञी म्हणून कोणत्या
गायीकेला ओळखले जाते? |
🥇लतादिदी मंगेशकर |
|
👉बेळगांव हे मराठी भाषिक असलेले गांव कोणत्या
राज्यात आहे? |
🥇कर्नाटक |
|
👉जगातील विस्ताराने अतिलहान देश कोनता? |
🥇वेटिकन सिटी |
|
👉भारताने अवकाशात सोडलेला पहिला उपग्रह कोनता? |
🥇आर्यभट्ट ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🕸 बोधकथा
🕸 |
|
🧙♂️व्यापारी व
उंट🐪 |
|
एक
व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावा गावातून तो विकत असे. अशाच एका गावात
त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम
करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत
झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने
बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते., आता
काय करावे...? पंचाईत झाली... उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते... व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी
सापडतीय का ते पाहून लागला., ती काही दिसेना... |
|
त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे., पहिल्या
उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध. |
महाराज, पण दोरी
नाहीये ना... |
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"., |
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला
दोरी बांधली... आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला... |
|
सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला.
झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली., तो उंट उभा राहिला. |
|
दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या
दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले... पण तो दुसरा उंट काही उठेना., व्यापारी
पुन्हा परेशान... |
|
तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, अरे, तो
उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस...? |
पण महाराज., मी
दोरी बांधलीच कुठे होती...? नुसते नाटक केले होते ना... |
|
पुजारी म्हणाला, नाटक तुझ्यासाठी होते., पण
त्याला तर ते खरेच वाटले होते ना...
म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव., मग पहा... |
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे
नाटक केले., आणि काय आश्चर्य...? तो
दुसरा उंट तटकन उठला की..., व्यापारी चकित झाला...! |
|
पुजारी म्हणाला जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य
रूढीमध्ये अडकलॊ आहोत. |
|
"ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच
नाही तर आपण दुसऱ्या आनंदाचा गावी जाणार कसे? |
|
✅तात्पर्य_:- |
आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही... |
निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या"
सोडवून पाहूया.., आपण नक्की आनंदी होऊ. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🌐 आजच्या
बातम्या 🌐 |
|
➡️अकरावी प्रवेशासाठीची सीईटी मुंबई उच्च
न्यायालयाकडून रद्द, अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच
करण्याचे कोर्टाचे आदेश, 28 मे चा जीआर रद्द |
➡️ हॉटेल, रेस्टॉरंट्सला
दिलासा मिळण्याची शक्यता, धार्मिक स्थळं उघडण्याची अद्याप चिन्हं नाही, मुख्यमंत्री
आणि टास्क फोर्सच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा सुरू |
➡️आरक्षणाबाबत राज्यांना अधिकार देण्याच्या 127
व्या घटनादुरुस्तीचं संसदेत चर्चा,
विधेयकावर लोकसभेत मतदान सुरू 50 टक्क्यांची मर्यादा शिथील केल्याशिवाय
घटनादुरुस्तीचा हेतू सफल होणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांचं प्रतिपादन |
➡️पुणे मेट्रो मार्गातील अडथळे हायकोर्टाकडून
दूर, राज्यातील बेकायदेशीर बांधकामांना दिलेला
दिलासा महिन्याअखेर संपणार |
➡️आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचं निधन, वयाच्या
81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मान्यवरांकडून
शोक व्यक्त ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏 |
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸 |
No comments:
Post a Comment