29 जुलै दिनविशेष ॥स्मृतिदिन.

 

! 29 जुलै  दिनविशेष ॥

 

             🔥 गुरुवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 1957 - इंटरनॅशनल ॲटाॅमिक एनर्जी एजन्सी ची स्थापना झाली

👉 1987 - भारत- श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आला

👉 1997 - हरनाम घोष कोलकाता, स्मृतीचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चिञे या मराठी साहित्यीकास प्रथमच मिळाला

 

         🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹��🌹🌹🌹

 

जन्म

 

👉 1981 - स्पॅनिश f1 रेस कार ड्रायव्हर फर्नाडो अलोन्सो

👉 1959 - हिंदी चिञपट अभिनेता संजय दत्त

👉 1953 - भजन गायक अनुपम जलोटा

 

 🎇 मृत्यू

 

👉 2006 - मराठी साहित्यातील विव्दान डाॅ. निर्मलकुमार फडकुले

👉 2003 - हिन्दी चिञपट अभिनेता जाॅनी वाॅकर

👉 2003 - गायक व संगीतकार सुधीर फडके

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

आज २९ जुलै

आज जेष्ठ गीतकार #राजामेहंदीअलीखान यांचा स्मृतिदिन.

जन्म. १९२८

राजा मेहंदी अली खान हे चार वर्षाचं असतानाच त्यांचे वडील निवर्तले होते. हा जमीनदारचा मुलगा शायर बनण्यासाठी आपली जमीन जायदाद सोडून मुंबईला आला. १९४७ मध्ये फिल्मिस्तान कंपनीचे भागीदार एस. मुखर्जी यांनी राजा मेहंदी अली खान यांना ब्रेक दिला. "दो भाई" या चित्रपटासाठी राजा मेहंदी अली खान यांना लिहिण्यास दिली, त्यामधील दोन गीतांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. मेरा सुंदर सपना बीत गयाआणि याद करोगे एक दिन हमको याद करोगेहीच ती दोन मधुर गीते. एस. डी. बर्मन यांनी ती गीते संगीतबद्ध केली होती. १९४८ च्या शहीदचित्रपटातील त्यांची गीते गुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केली होती. आणि १९५१ मध्ये ते आणि मदनमोहन एकत्र आले. मदहोशहा तो चित्रपट होता. मेरी याद में तुम न आँसू बहानाही तलत मेहमूदने गायलेली त्यांची अर्थपूर्ण रचना आजही आवर्जून ऐकली जाते. त्यानंतर १९६२ मध्ये पुन्हा एकदा मदनमोहन (अनपढ) आणि ओ. पी. नय्यर (एक मुसाफिर एक हसीना) यांच्या संगीताने सजलेली त्यांची काव्ये रसिकांना भावली होती. खेमचंद प्रकाश, श्यामसुंदर, सी. रामचंद्र, चित्रगुप्त, रवी, रोशन अशा अनेक इतर संगीतकारांनी त्यांची गीते संगीतबद्ध केली होती. परंतु संगीतकार मदनमोहनबरोबर त्यांची जोडी जास्त वेळ जमली. राजा मेहंदी अली खान हे मदनमोहन यांचे लाडके गीतकार होते. संगीतकार मदनमोहन आणि गीतकार राजा मेहंदी अली खाँ या जोडीचे १२ चित्रपट पडद्यावर झळकले होते. परंतु या गीतकाराची त्या वेळच्या प्रसिद्धीमाध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून या गीतकाराने सुंदर गाणी लिहिण्याचे काम चालूच ठेवले. फक्त ३८ वर्षे जगलेल्या राजा मेहंदी अली खान यांनी खूप कमी गाणी लिहिली, पण जी लिहिली ती अजरामर होतील अशीच लिहिली... यातली काही गाणी - अगर मुझ से मुहब्बत हैं, आप की नजरोने समझा प्यार के काबिल मुझे, मेरा सुंदर सपना बीत गया, तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा, तेरे बीन सावन कैसे बिता, आप युंही अगर हमसे मिलते रहे, नयना बरसे रिमझिम, आखरी गीत मोहब्बत का, आप के पहलू में आकर रो दिये, तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से, जो हमने दास्तान अपनी सुनाई आप क्यों रोये, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, नैनो मे बदरा छाए... अजूनही लोकांच्या तोंडावर असतात. राजा मेहंदी अली खान यांची रोमँटिक गीतं हॉन्टेड कॅटेगरीमधली वाटावीत इतकी गूढतेकडे झुकणारी होती. ताहिरा हे राजा मेहंदी अली खान यांच्या पत्नीचं नाव. हे दोघंही उच्चशिक्षित घरातले होते. फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये न जाता ते भारतातच राहिले. त्यांच्या मृत्युनंतर १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिताआणि जब याद किसी की आती हैया चित्रपटातील अनुक्रमे मैं देखू जिस ओर सखी रेआणि तेरे बिन सावन कैसा बीताया गीतांना रसिकांनी उत्कृष्ट दाद दिली. राजा मेहंदी अली खान यांचे २९ जुलै १९६६ रोजी निधन झाले.

https://www.youtube.com/watch?v=w1LPJWxhE6s

https://www.youtube.com/watch?v=ZHFuHyTYQ0g

https://www.youtube.com/watch?v=kwSHbWcXbms

राजा मेहंदी अली खान यांची गाणी.

https://www.youtube.com/watch?v=rSU2q_bWrrs

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज युवा तबला वादक #सावनी_तळवलकर चा वाढदिवस.

जन्म.२९ जुलै १९८७

तालयोगी पं. सुरेश तळवलकर आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका पद्मा तळवलकर यांची ही कन्या घराण्याचा वारसा तबल्यासारखा वाद्याच्या माध्यमातून पुढे चालवित आहे. हे माध्यम समर्थपणे हाताळणाऱ्या मुलींची संख्या तशी तुलनेने मोजकीच आहे पण सावनीने जाणीवपूर्वक हे माध्यम निवडले असून तिच्या घरच्यांनीही तिला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तबल्यावर थाप मारणारी आणि तालाचे उपजतच ज्ञान असणारी सावनी आता एक स्वतंत्र तबला वादक म्हणून नावारूपाला येत आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच पुरस्काराची मोहोर उमटल्यामुळे प्रोत्साहन तर आपसुकच मिळणार आहे, पण त्याचबरोबर या महाराष्ट्रकन्येचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे. वडिलांना अनेक कार्यक्रमांमधून तबल्याची साथ करणाऱ्या सावनीची आता मोठ्या रंगमंचावर स्वतंत्रपणे पाऊले पडू लागली आहे. वडील आणि गुरू पं. सुरेश तळवलकरांच्या या शिष्येने त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालाचे अनेक प्रकार आत्मसात केले आहेत. स्वर तालयात्रा’, ‘शिव तालयात्रायांसारख्या पं. तळवलकरांनी आखलेल्या उपक्रमांमधूनही सावनीने आपली कला अनेकांसमोर मांडली आहे. आजोबा दत्तात्रय तळवलकर यांच्या अमृतमहोत्सवी समारंभात सावनीने पहिल्यांदा आपल्या तबलावादनाची झलक उपस्थितांना दाखवली होती तेव्हा तिचं वय होतं अवघं पाच वर्ष. पण ती छोटी झलक भविष्यातील तिच्या उज्ज्वल कारकीर्दीची साक्ष देणारी ठरली.

२००६ मध्ये पं. पंढरीनाथ नागेशकर गुरूजी आणि ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशेळकर यांच्यासमोर सावनी तळवलकरला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. २००७ मध्ये शारदा संगीत विद्यालयात तिचा तबलावादनाचा सोलो कार्यक्रम यशस्वी झाला. भाई गायतोंडे यांच्या अमृतमहोत्सवी समारंभातही सावनीने पुन्हा एकदा अनेक ‌दिग्गज कलाकारांसमोर आपली कला सादर केली आणि अनेकांच्या शाबासकीची थाप तिच्या पाठीवर पडली. त्यानंतर पूर्णावाद महोत्सव, गंधर्व महाविद्यालयाचा संगीत महोत्सव अशा एकामागून एक कार्यक्रमातून सावनी आपल्या कलेची छाप पाडत गेली. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, पेण, अहमदनगर, पंढरपूर इत्यादी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केल्यानंतर बंगळुरू, दिल्ली आणि त्यानंतर थेट थायलंड, अमेरिकेपर्यंत वेगवेगळ्या रंगमंचावर सावनीने आपली कला सादर केली. आपल्या वादन कलेसाठी सावनी तळवलकरला संगीत नाटक अकादमीचे उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार-तिला मिळाला आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज बॉलीवुडचा अभिनेता #संजयदत्त यांचा वाढदिवस.

जन्म.२९ जुलै १९५९ मुंबई येथे.

संजय दत्तने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. सुरूवातीलाच वडिलांच्या बॅनरखालचा सिनेमा रेशमा और शेरा या सिनेमातून संजयने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. बॉलिवूडचा मुन्नाभाई अशी ओळख असलेलेल्या संजय दत्तच्या फिल्मी कारकिर्दीची सुरवात १९८१ साली आलेल्या 'रॉकी' चित्रपटापासून  झाली.

सुनील दत्त आणि नर्गिस यांचा मुलगा संजय दत्त यांनी बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले. मात्र वादग्रस्त प्रकरणांमध्येही संजय दत्त यांचे नाव पुढे आले.

संजयचे आई वडील सिनेमांशी जोडलेले असल्यामुळे संजय दत्तच्या रक्तामध्येच अभिनय होता. घरात फिल्मी वातावऱण असल्याने संजय अनेकदा आपल्या आईवडिलांसोबत सिनेमाचे शूटिंग पाहायला जात असे. याचमुळे संजयची अभिनयातील आवड वाढली आणि त्याने सिनेमात जाण्याचे ठरवले. त्याचा पहिला सिनेमा रॉकी हा सिनेमा सुपरहिट ठरला. १९८१ मध्ये संजय यांची आई नर्गिस यांचे निधन झाले. आईच्या निधनामुळे संजय दत्त पूर्णपणे कोसळले. याचदरम्यान संजय दत्त यांना चुकीची संगत लाभली आणि मिळालेल्या यशाने हुरळून जात ते ड्रग्सच्या अधीन गेले.

सुनील दत्त यांनी संजयची नशा सोडवण्यासाठी त्याला उपचारासाठी अमेरिकेत पाठवले होते. दीर्घकाळाच्या उपचारानंतर संजयने ड्रग्स घेणे सोडले आणि पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. संजयला आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या रिचाशी त्याचे सूत जुळले आणि दोघांनी १९८७मध्ये ग्नकेले. संजयची मुलगी त्रिशाला हिच्या जन्मानंतर रिचाला हिला ब्रेन कॅन्सर झाला आणि नऊ वर्षानंतर रिचाचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर संजय पुन्हा एकटा पडला आणि त्याचे फिल्मी करिअर धोक्यात आले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज #शिवशाहीर #बाबासाहेब_पुरंदरे यांचा वाढदिवस.

जन्म. २९ जुलै १९२२

तिथीने नागपंचमीच्या दिवशी बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस असतो.

शिवचरित्र केवळ अभ्यासणारे नव्हे, तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर ! म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे.

इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच!

आज १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला.  राजा शिवछत्रपतीया ग्रंथाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाटय़ असून याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा या महानाटय़ात समावेश असतो.

जाणता राजा या महानाट्याचे अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत. इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते माणूसमध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेबांनी सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले.महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहेहे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले. बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज हिंदी चित्रपट सृष्टीतील हास्याचा बादशहा #जॉनी_वॉकर यांचा स्मृतिदिन.

जन्म. ११ नोव्हेंबर १९२०

हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. सदाबहार व्यक्तिमत्व असणाऱ्या या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे. जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं. जॉनी वॉकर यांनी सुरुवातीच्या काळात बेस्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर मजामस्ती करुन त्यांचे मनोरंजन करत होते. हे पाहून बलराज साहनी प्रभावित झाले होते. बलराज साहनी यांनी त्यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करुन दिली. १९५० साली आलेल्या आखरी पैगामद्वारे ते' रसिकांच्या पुढे आले.त्याच वर्षी नवकेतनचा बाजीझळकला.आणि जॉनी वॉकरयांनी मागे वळून पाहिले नाही.  बाजीमधील त्यांच्या दारुड्याच्या अभिनयामुळे खूष होऊन गुरुदत्त यांनी त्यांना "जॉनी वॉकर" हे जगप्रसिद्ध व्हिस्कीच्या ब्रँडचे नाव दिले आणि बद्रुद्दीन जमालुद्दीन काझीचा 'जॉनी वॉकर' झाला. बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या मधुमतीत जॉनी वॉकर यांनी दारूड्याची भूमिका एवढी अप्रतिम केली की समीक्षकांनी त्यांना त्या वर्षाचा सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार बहाल केला गेला.जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधी दारूला स्पर्श ही केला नाही पण दारूड्याचे बेअरींग एवढे झकास सांभाळले की बिमलदा म्हणाले 'हा माणूस दारूला स्पर्श देखील करीत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.देव आनंद यांच्या सोबत 'सीआयडी'त तर त्यांनी कमाल केली होती.. 'ऐ दिल है मुश्कील जीना यहां जरा हठ के जरा बच के ये है बॉंम्बे मेरी जानहे गाणं तर त्या वर्षीच बिनाका टॉपचं गाणं ठरलं! वॉकर यांची विनोदातील लोकप्रियता एवढी होती की जॉनी वॉकरनावाचा एक सिनेमा पन्नासच्या दशकात आला होता यात त्याने मुख्य भूमिका केली होती. श्रीमंत मेहुणा पाहिजे या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. जवळपास प्रत्येक सिनेमात वॉकर यांच्यावर  गाणं चित्रित केलेले असायचं. आपल्या ३५ वर्ष्याच्या करीयर मध्ये जॉनी वॉकर यांनी ३२५ चित्रपटात काम केले.  मिस्टर कार्टून एम.ए., खोटा पैसा, मिस्टर जॉन, नया पैसा, रिक्षावाला आदी चित्रपटात जॉनी वॉकर यांनी नायक म्हणून काम केले होते. जॉनी  वॉकर यांनी काळाची पावले ओळखून सत्तरच्या दशकात निवृत्ती पत्करली पण हृषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहावरून 'आनंद'  गुलज़ार यांच्या आग्रहावरून 'चाची ४२०' या चित्रपटात काम केले होते. जॉनी वॉकर यांचे २९ जुलै २००३ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे जॉनी वॉकर यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज गायीका #राधा_मंगेशकर चा वाढदिवस.

जन्म. २९ जुलै १९८१

भारतीयांच्या अनेक वर्षे घर करुन असलेले मंगेशकर घराणे, लता दिदी, आशाताई, उषा त्यांचे बंधू ह्दयनाथ. या चारही भावंडांची तुलना होणेच शक्य नाही. त्यांच्याच पुढच्या पिढीत हा संगीताचा वारसा अगदी समर्थपणे पेलत आहे राधा मंगेशकर. ज्या प्रकारे लता दिदींनी पार्श्वसंगीतात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. राधाचा ओढा मात्र अधिकाधिक आहे तो रंगमंचीय सादरीकरणावर.

तिला लोकांसमोर, त्यांच्या समक्ष गायला आवडतं. त्याला कारणही तसचं आहे. वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा ती रसिकांसमोर आली. त्यानंतर ती सातत्याने रसिकांसमोर गात आहे. आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून तिने रसिकांना आपल्या दैवी सुरांनी मंत्रमुग्ध केलं आहे. रसिकांना सतत काहीना काही वेगळं द्यावं. त्यांनाही नवनव्या संगीतपरंपरांची ओळख व्हावी, गोडी निर्माण व्हावी असा तिचा प्रयत्न असतो. सध्या तिने दोन कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. हे कार्यक्रम भारतात चांगलेच लोकप्रिय झालेले आहेत. आपल्या या कार्यक्रमांचा, त्याच्यासाठी ती घेत असलेल्या कष्टांचा तिला अभिमान आहे. तो अभिमान तिच्या बोलण्यातूनही जाणवत असतो. आपल्या कार्यक्रमांवरचे तिचे प्रेम त्यासाठी ती करत असलेले प्रयत्न, त्यातून लोकांना मिळणार असलेल्या आनंदाविषयी ती सजग आहे. या कार्यक्रमांविषयी बोलत असतांना तिचा उत्साहही जाणवत असतो. आता तर सोशल मिडीयाच्या नव्या तंत्राच्या आधारेही ती लोकांसमोर पोहोचत आहे.

राधाच ते दोन कार्यक्रम म्हणजे मीरा सूर कबीर व रविंद्र संगीत. या दोन्ही कार्यक्रमामध्ये वैविध्य असलं तरी या संगीतांची तरलता, त्याची संवेदनशीलता तिला भावते. जो आनंद एक गायिका म्हणून आपल्याला येतो तो रसिकांनाही यावा अशी तिची प्रामाणिक ईच्छा असते. मीरा सूर कबीर या कार्यक्रमात तिने संत मीराबाई, सूरदास व कबीर यांच्या रचना लोकांसमोर आणल्या आहेत. मानवी जीवनाविषयीची त्यांची मतं, स्वत:च्या कल्याणासाठी लोकांनी काय करायला हवे याचा संदेश देत देत त्यांनी आपल्यासमोर त्या काळातली विलक्षण प्रभावी अशी काव्यरचनाही सादर केल्या आहेत. त्यांच्या या काव्याला स्वरांचं कोंदण देऊन राधाने हा आनंद द्विगुणित केला आहे. राधाच्या दुस-या कार्यक्रमातून तिने रविंद्र संगीताची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

रविंद्र संगीत म्हणजे रविंद्रनाथ टागोर यांनी रुढ केलेलं संगीत. हे संगीत म्हणजे पश्चिम बंगालचा मानबिंदु आहे. महाराष्ट्रात मात्र रविंद्रनाथांविषयीची माहिती ही मर्यादित स्वरुपाची आहे. त्यात त्यांच्या संगीताची माहिती फारच कमी, मात्र मराठी माणसांच्या मनात रविंद्रनाथांविषयी आदराचंच स्थान आहे. त्यामुळे हा खास कार्यक्रम तयार केल्याचं ती सांगते. या कार्यक्रमाला केवळ मराठी माणसचं नव्हे तर बंगाली लोकही अगदी आवर्जून येत असतात. त्यांची प्रतिक्रियाही राधाला चांगली मिळते. त्यांना हा कार्यक्रम खास मराठी माणसांसाठी आणल्याचा अभिमान आहे. या दोन गाण्यांबरोबरच राधा आता अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होण्याचा प्रयत्न करत आहे.

 यूटयुबवर तिची चार गाणी रसिकांना फारच आवडत आहेत. ही गाणी जुनी असली तरी ती खास वेगळया शैलीत मांडण्यात आली आहेत. त्यात गाजलेली गाणी केवळ एकाच वाद्याच्या सहाय्याने सादर करण्याचा तिचा प्रयोगही चांगलाच गाजत आहे. या यूटयुबवर तिने पियानोच्या साथीने लग जा गले..माझ्या डोळयांच्या भूमीत..ही गाणी टाकली आहेत तर गिटारच्या साथीने मोगरा फुलला..हे गीत व  संतमीराबाईंचे एक भजन रसिकांसमोर आणलं आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज प्रख्यात शास्त्रीय गायिका व पंडित #कुमार गंधर्व यांच्या पत्नी #वसुंधराकोमकली यांचा स्मृतिदिन.

जन्म. २३ मे १९३१ जमशेदपूर येथे.

वसुंधरा कोमकली यांना त्यांचे जवळचे ताईया नावाने ओळखत असत. वसुंधरा कोमकली या माहेरच्या वसुंधरा श्रीखंडे होत. ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका म्हणून वसुंधरा कोमकली यांची ओळख होती. जमशेदपुर मध्ये एक मध्यमवर्गीय कुटुंबात वसुंधरा यांचा जन्म झाला. त्यांचे पिता विश्वनाथ श्रीखंडे जमशेदपुर येथे टाटा स्टील्समध्ये काम करत आहेत. त्यांच्या वडिलांची टाटा स्टील्सच्या कोलकाता प्लांट मध्ये बदली झाल्याने संपूर्ण कुटुंब कोलकाता येथे राहण्यास आले. वसुंधरा कोमकली यांच्या मातोश्री रमाबाई श्रीखंडे कलकत्त्यातील मराठी समाजात क्रियाशील होत्या. त्यांना तीन मोठे भाऊ मनोहर, सुधाकर, विद्याधर आणि एक बहिण होते. त्यांचा मोठा भाऊ मनोहर यांना नाटक आणि संगीताची हौस होती व इतर भावंडांनाही संगीताचे प्रशिक्षण होते. त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी त्या कलकत्त्याच्या ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्स या मानाच्या संगीतसभेत कुमारगटात गायल्या व त्यात पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला. त्यानंतर त्या रेडियोवर गाऊ लागल्या. कलकत्ता आकाशवाणीच्या संगीत सभेत एकदा कुमार गंधर्वांचे गाणे झाल्यावर ते श्रीखंड्यांच्या घरी आले असता त्यांना गाणे शिकविण्यासाठीची विनंती केली गेली. कुमार गंधर्व त्यावेळी मुंबईतील ऑपेरा हाऊसला राहत असत व तेथे देवधर स्कूल ऑफ इंडियन म्य़ुझिकशी संलग्न होते. त्यांनी वसुंधरा श्रीखंडेंना गाणे शिकण्यासाठी मुंबईला येण्यास सांगितले. १९४२ च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव भारतावर व विशेषतः कलकत्त्यावर पडण्यास सुरू झाला. त्यावेळी महाराष्ट्रात परतलेल्या अनेक मराठी कुटुंबांबरोबर श्रीखंडे कुटुंबही १९४५-४६च्या आसपास मुंबईत आले. देवधरांच्या संगीत स्कूलमध्ये दाखल झाल्यावर समजले की कुमार गंधर्व सतत संगीताच्या दौऱ्यांपायी तेथे अभावानेच असत व त्यामुळे ते संगीतही सतत शिकवू शकणार नाहीत. बी.आर. देवधर यांनी वसुंधरा श्रीखंडेना गाणे शिकवायला सुरुवात केली. काही वेळा कुमार गंधर्वही शिकवायचे. वसुंधरा श्रीखंडे यांचे संगीत शिक्षण सुरू असतानाच, त्यांनी शिवाजी पार्कला एक संगीतक्लास सुरू केला, शिवाय एका शाळेत संगीत शिक्षिका म्हणूनही काम करू लागल्या. १९५१-५२ मध्ये चिंतामणराव कोल्हटकर मुंबई मराठी साहित्य संघासाठी पु.ल. देशपांडे यांचे भाग्यवान हे नाटक करत होते. त्यासाठी त्यांना एका गायिका-अभिनेत्रीची गरज होती आणि त्या भूमिकेसाठी त्यांनी वसुंधरा श्रीखंडे यांना संधी दिली. या नाटकानंतर कोल्हटकरांनी बसविलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्यस्त खड्ग या नाटकात त्यांना मुख्य भूमिका दिली. कुमार गंधर्व यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांचे १९६१ मध्ये बाळंतपणात निधन झाले. त्यानंतर कुमारजींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. कुमार गंधर्व यांच्याशीच विवाह झाल्यावर त्या देवास येथे स्थायिक झाल्या. कुमारजींच्या व्यक्तिगत जीवनात त्या अर्धागिनी तर होतीच पण त्यांच्या सांगीतिक जीवनामध्येही त्या अविभाज्य अंग होत्या. गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले बालगंधर्व’, ‘तांबे गीतरजनी’ ‘गीतहेमंत’, ‘ठुमरी, टप्पा, तराणाअसे स्वतंत्र निर्मिती असलेले हे कुमार गंधर्व यांचे कार्यक्रम वसुंधरा कोमकली यांच्या शिवाय पूर्ण होऊच शकले नसते. भारत सरकारने वसुंधरा कोमकली यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. वसुंधरा कोमकली या नाटय़ अकादमी पुरस्कार आणि इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांच्याही मानकरी ठरल्या होत्या. त्यांच्या कन्या कलापिनी कोमकली या देखील प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहेत. वसुंधरा कोमकली यांचे २९ जुलै २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे वसुंधरा कोमकली यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज संगीत हाच ध्यास बाळगणारे शब्दसुरांचे जादूगार #सुधीर_फडके उर्फ बाबुजी यांचा स्मृतिदिन.

जन्म. २५ जुलै १९१९

संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या ग. दि. मां.च्या गीतरामायणचे गायक व संगीतकार म्हणून या क्षेत्रात ते संगीत शिरोमणीम्हणून प्रसिद्धीस आले. तो त्यांना लाभलेला परमेश्वरी प्रसाद होता. त्या प्रसादामागे ग. दि. मां.च्या प्रतिभेचा वरदहस्त होता. या कार्यक्रमात अन्य गीतांचा सामावेश त्यांनी कधीच केला नाही. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे हे गीतरामायण १९५५ साली रेडियोवर सुरू झाले. बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते. दरम्यान, त्यांनी सुमारे ५६ गाणी असलेल्या गीतरामायणाचे १,८०० प्रयोग देश व विदेशात केले. त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे गीत रामायण. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर (All India Radio) वर्षभर प्रसारित होत होते. गीत रामायणाने रसिक श्रोत्यांवर, अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही वेड लावले. का नाही लावणार? एकतर ही रामायणातील गीते आपल्या बोली भाषेतली, नवरसांनी ओतप्रेत भरलेली, मधुर चालींची, कमालीची भावोत्कट. भारतीय जीवन मूल्यांची महती सांगणारी, मनुष्य जीवनातले आदर्श कसे असावेत याचा धडा देणारी, चांगले व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रेरणा देणारी गीते. शिवाय बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या स्वर्गीय संगीत, सुरेल चाली आणि दैवी आवाजामुळे ही रामायणातली गाणी साक्षात रामकथेतील प्रसंग, पात्रे आणि घटनाक्रम यांचे मूर्तिमंत चित्र डोळ्यासमोर उभे करतात. कवीच्या शब्दातील भावना जशाच्या तशा रसिकांपर्यंत पोहोचवण्याच काम त्यांनी केलं आहे. त्यांनी गोवा मुक्ती संग्रमातही भाग घेतला होता. आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक - प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे. पुस्तकाचे नाव - स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य   सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडिया हेरिटेज फाउंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.

सुमारे ५० वर्षे संगीतसृष्टी गाजवणारे बाबूजी माणूस म्हणून श्रेष्ठच होते ते त्यांच्या अभिजात संगीतप्रेमामुळेच! सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले. सुधीर फडके यांना आदरांजली.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

सुधीर फडके यांचे संगीत दिलेले चित्रपट.

गोकूळरुक्मिणी स्वयंवर, *आगे बढो, *सीता स्वयंवर *जीवाचा सखा *वंदेमातरम्  *अपराधी *जय भीम *माया बाजार *रामप्रतिज्ञा *संत जनाबाई *श्रीकृष्ण दर्शन *जौहर मायबाप *पुढचे पाऊल (1950) *मालती माधवमुरलीवाला जशास तसे *लाखाची गोष्ट *नरवीर तानाजी *सौभाग्य *वाहिनीच्या बांगड्यापहली तारीखइन-मीन-साडे-तीनऊन पाऊस गंगेत घोडा न्हालाशेवग्याच्या शेंगा सजनी *आंधळा मागतो एक डोळादेवधरमाझे घर माझी माणसं *गणगौरीजगाच्या पाठीवर भाभी की चूडियाँ *गुरू किल्लीआम्ही जातो आमच्या गावा दरार *आराम हराम आहे *आपलेच दात आपलेच ओठ *माहेरची माणसंधाकटी सून*शूर शिवाजी.

https://www.youtube.com/watch?v=ji4TYrPqJ9o

https://www.youtube.com/watch?v=TGf1-WZEJJg

आज २९ जुलै

आज भजन आणि गझल गायक #अनुप_जलोटा यांचा वाढदिवस.

जन्म. २९ जुलै १९५३ नैनीताल येथे.

अनुप जलोटा यांचे वडिल पुरूषोत्तम जलोटा पंजाबच्या प्रख्यात शाम चौरासी घराण्याशी संबंधीत होते. जलोटा यांनी वयाच्या सातव्या व्या वर्षी गायनाला सुरूवात केली. अनुप जलोटा यांच शिक्षण लखनऊच्या भातखंडे म्युझिक इंस्टीट्यूटमध्ये झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुप जलोटा यांनी मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी भरपूर संघर्ष केला. अनुप जलोटा यांनी आकाशवाणी वर कोरस गायक म्हणून करियरला सुरवात केली. मुंबईत आल्यावर त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांना म्युझिक कंपन्यांकडून गाण्यांची ऑफर मिळाली. त्यावेळी एखादीच अशी म्युझिक कंपनी असले ज्यासोबत त्यांनी काम केलं नाही. 'ऐसी लागी लगन', 'मैं नहीं माखन खायो', 'रंग दे चुनरिया', 'जग में सुंदर दो नाम' आणि 'चदरिया झीनी रे झीनी' सारखी भजनं अतिशय लोकप्रिय झाली. भजनांना मंदिराच्या दारापासून मंचापर्यंत आणण्याचं काम अनुप जलोटा यांनी केलं. ते अनेक वाद्ये वाजवतात. तबला वादक झाकिर हुसैन आणि संगीतकार गुलाम अली यांच्यासोबत परदेशात देखील अनुप जलोटा यांनी कार्यक्रम केले. अनुप जलोटा यांनी पहिलं लग्न आपली गुजराती शिष्या सोनाली शेठसोबत केलं. या जोडीने गायन क्षेत्रात 'अनूप - सोलानी' नावाने खूप नाव कमावलं. अनुप जलोटा यांचा दुसरा विवाह कुटुंबियांच्या सहमतीने बीना भाटीयाशी केलं. मात्र त्यांच लवकरच घटस्फोट झाला. तिसरं लग्न अनुप जलोटा यांनी १९९४ साली मेधा गुजराल सोबत केले. मेधा माजी पंतप्रधान आय के गुजराल यांची भाची आणि दिग्दर्शक शेखर कपूरची पहिली पत्नी होती. मेधा गुजराल यांचे २५  नोव्हेंबर २०१४  मध्ये न्यूयॉर्कमध्ये हार्ट अटॅक आणि किडनी ट्रान्सप्लान्ट दरम्यान निधन झालं. अनुप जलोटा-मेधा गुजराल यांना एक मुलगा आहे. त्याने नाव आर्यमन आहे. दोन वर्षापूर्वी ते बिग बॉस मध्ये दिसले होते. अनुप जलोटा यांनी सितारा ग्रुप नावाची फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केली. याच्या अंतर्गत त्यांनी हिंदी आणि भोजपुरी सिनेमे तयार केले. यामध्ये बनी चौधरी त्यांची पार्टनर होती. भारत सरकारने अनूप जलोटा यांना २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अनुप जलोटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

अनुप जलोटा यांनी गायलेली काही भजने

https://www.youtube.com/watch?v=R9s2n3a3V9M

ग्वाल्हेर घराण्याच्या नामवंत गायिका वसुंधरा कोमकली यांची कन्या आणि शिष्या असे दुहेरी नाते असलेल्या आजच्या आघाडीच्या गायिका #कलापिनी_कोमकली यांनी आपल्या आई वसुंधरा कोमकली यांच्या बद्दल लोकसत्ता मध्ये व्यक्त केलेल्या भावना..

आई आणि गुरू ही दोन्ही नाती माझ्यासाठी वसुंधरा कोमकली या व्यक्तिमत्त्वामध्ये सामावली गेली होती. जसे एका आईसाठी तिचे बाळ हे सर्वेसर्वा असते, तशीच त्या बाळासाठीही आई हीच सर्वेसर्वा असते. माझे वडील पं. कुमार गंधर्व हे आकाशाएवढे मोठे असले, तरी त्यांना आणि आम्हा मुलांना बांधून ठेवणारी वसुंधरा ही भूमी असते. माझ्यासारखे पोर आकाशात जेव्हा चिमणी होऊन उडण्याचा प्रयत्न करते किंवा घार होऊन विहंग करण्याची मनीषा बाळगते, त्या आकाशाची वैचारिकदृष्टय़ा लांबी-रुंदी जाणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा शेवटी भूमीवरच येऊन विसावते. वसुंधरा कोमकली ही माझी आई सदैव माझ्यासाठी वसुंधरा या नावाप्रमाणेच भूमी राहिली आहे. त्यामुळे तिचे महत्त्व शब्दातीत आहे. जशी ती माझी जन्मदात्री आई तशी माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये मार्गदर्शन करणारी गुरूही. त्यामुळेच तिच्याशी माझे नाते हे महत्त्वाचे आणि वेगळी उंची गाठलेले होते.

संगीत क्षेत्रात मी जी काही आहे किंवा माझी ओळख आहे ती केवळ आईमुळेच आहे. माझे स्वत:चे उभे राहणे हे केवळ वसुंधरा कोमकली यांच्यामुळेच आहे. अगदी व्यक्तिगत पातळीवर सांगायचे, तर कुमारजी गेल्यानंतर वसुंधराताई ज्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळेच मी उभी राहू शकले आणि कलाकार म्हणून घडू शकले हे वास्तव आहे. वसुंधराताईने कोलकाता येथे पतियाळा घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले. ती मुंबईला प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेण्यासाठी आली. तेथे तिचा पं. कुमार गंधर्व यांच्याशी परिचय झाला. देवधरसरांच्या तालमीमुळे ती उत्तम गायिका झाली. पण, बाबांच्या संगीताने ती भारावली गेली. कुमारजींशी विवाह झाल्यानंतर १९६२ मध्ये देवास येथे घरी पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर कुमारजींशी सर्वस्वी एकरूप झाली. नव्हे स्वत:ला विसरून ती कुमारजींशी समरस झाली. आधीचे संगीत शिक्षण बाजूला ठेवत तिच्या गायकीमध्ये बाबांच्या शैलीचा रंग चढला. कुमारजींचा सांगीतिक विचार आणि त्यांची शिकवण तिने आत्मसात केली. ते आपल्या गायकीतून मांडण्याचे तिचे कसब वाखाणण्याजोगे होते. पं. कुमार गंधर्व या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले आणि नंतर त्यांची धर्मपत्नी झाली असली, तरी वसुंधरा ही त्यांची शिष्याच राहिली. सदैव शिकत राहण्याचा हा गुण तिने जीवनाच्या अखेपर्यंत जपला. ही तिची विद्यार्थी असण्याची दशा आहे त्याचे मला सर्वात कौतुक वाटते आणि आश्चर्यही वाटते. आताच्या काळामध्ये थोडे काही येत असेल, तर कलाकार स्वत:ला मोठे समजू लागतात. त्या पाश्र्वभूमीवर आईच्या विद्यार्थी असण्याची नवलाई मलादेखील जोपासावी असे वाटते.

गुरू म्हणून कुमारजी अतिशय कडक होते. त्यांच्याकडून शिकत असतानाही त्यांच्या गायकीप्रमाणेच अवघड वाटायचे आणि तसे ते अवघड असायचेही. पण, आईची शिकवण्याची पद्धत ही थोडी निराळी होती. एखादी तान शिकविताना ती अशा पद्धतीने घोटून घ्यायची की ती समजायला सुगम वाटायची. अर्थात ती तशी सुगम नाही हे नंतर मला गात असताना कळायचे. पण, तालीम घेताना आई ही तान सुगम आहे, असा भास निर्माण करायची. अर्थात आईने शिकविलेले मी किती आत्मसात करू शकले हे मला सांगता येणार नाही. पण, तिची गायन शिकविण्याची हातोटी कदापिही विसरता येणार नाही.

आई म्हणून वसुंधराताईने किती धीर दिला असे सांगायचे म्हटले, तरी नेमकेपणाने सांगता येणार नाही. एक परिपूर्ण गायक कलाकार म्हणून तिची इच्छाशक्ती दांडगी होती. मी आणि भुवनेश असे आम्हाला घडवून घेण्यासाठी ही इच्छाशक्ती तिला केवळ उपयोगी पडली असे नाही तर तिने ही इच्छाशक्ती आमच्यामध्येही संप्रेषित केली. प्रसंग आनंदाचा असो, दु:खाचा किंवा कसोटी पाहणारा, कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे कसे सामोरे जायचे हे तिने शिकविले. गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले बालगंधर्व’, ‘तांबे गीतरजनी’ ‘गीतहेमंत’, ‘ठुमरी, टप्पा, तराणाअसे स्वतंत्र निर्मिती असलेले हे कुमारजींचे कार्यक्रम वसुंधराताईंशिवाय होऊच शकले नसते. कुमारजींच्या व्यक्तिगत जीवनात ती अर्धागिनी तर होतीच पण त्यांच्या सांगीतिक जीवनामध्येही ती अविभाज्य अंग झाली. एरवी संगीतामध्ये जुगलबंदी असते. पण, कुमारजी यांच्यासमवेत तिच्या संयुक्त गायनाला तोडच नव्हती. दोन प्रतिभावान कलाकारांमध्ये असे सुरेल आणि अप्रतिम सामंजस्य आढळणं अवघड आहे. हे सामंजस्य कुमारजी असेपर्यंत होतेच. पण, नंतर हा गुण तिने आमच्यामध्येही संक्रमित केला.

कुमारजी काय किंवा वसुंधराताई काय, ही पिढीच अशी घडलेली होती की ती सहजासहजी शिष्याची पाठ थोपटणारी नव्हती. तिने कधी तोंडदेखले कौतुक केल्याचे मला आठवत नाही. पण, कधी नाउमेदही केले नाही. एखाद्या मैफलीचे ध्वनिमुद्रण मी ऐकविल्यानंतर स्वर चांगला लागला, आवाज उत्तम आहे, रागमांडणी व्यवस्थित झाली याविषयी ती आई म्हणून थोडेसे कौतुक करायची. पण, त्याच क्षणी तिच्यामधील गुरू जागा व्हायचा. गायनामध्ये काय घडले नाही किंवा कसा स्वर लावला असता तर आणखी उत्तम झाले असले हे कधीही नमूद करायला तिने कमी केले नाही. मी कितीही चांगला प्रयत्न केला, तरी गुरू म्हणून तिची शाबासकी मिळवू शकले नाही. जेवढे म्हणून पिरगळता येतील तेवढे कान पिरगळावेत अशीच बहुधा त्या पिढीची धारणा असावी. जेणेकरून शिष्याच्या हातून काही चांगले घडू शकेल. वसुंधराताईंच्या या शिकवणीमुळेच मी गायिका म्हणून घडू शकले. स्वरांच्या आभाळात उडण्यासाठी सज्ज झाले आहे. पण, विहंग करून झाल्यानंतर स्थिरावण्यासाठीची आणि मनापासून सामावून घेणारी माझी भूमी म्हणजे माझी आई वसुंधरा कोमकली आपल्यामध्ये नाही हे सत्य स्वीकारणे जेवढे अवघड, तेवढेच ते पचविणेही अवघड.

संकलन #संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज महाराष्ट्रातील नामवंत कवी, गीतकार #रा_ना-पवार यांचा जन्मदिन.

जन्म. २९ जुलै १९२१ सोलापूर येथे.

रा. ना. पवार हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. रामचंद्र नारायण पवार ते त्यांचे पूर्ण नाव होय.

त्यांच्या मनात कुणाविषयी किल्मिष नसे. कितीतरी दुःख भोगले त्यांनी. त्याला काही पारावारच नव्हता. प्रारंभी गिरणकामगार असलेले रामचंद्र नारायण पवार. त्यांनी भावकविता लिहिली. त्यांच्या कवितेत कधीच अभिनिवेश नव्हता. साधी भावना आणि थेट भिडणारी कविता ते लिहीत असत.  त्यांना शिक्षक होण्याची आवड होती. परंतु ते त्यांना जमले नाही. मात्र आपली ही हौस एका चित्रपटाने पूर्ण केली. एका जुन्या मराठी चित्रपटात मास्तरांची भूमिका मिळाली होती. सोलापूरचेच कवी संजीव यांची गीते त्या चित्रपटात होती. चित्रपट होता, भाऊबीज. रा. ना. पवार हे नेहमी सदाचारी माणसांशी मैत्री असावी अशा विचारांचे होते. त्यांची कविता देखील अशी सदाचारी होती. कविता कशी असावी आणि कशी नसावी या विषयी त्यांची एक कविता आहे. वेदना म्हणजे काय हे रा.ना. पवार यांच्याकडूनच समजून घ्यावे. कारण त्यांच्या पोटावर कोठे शस्त्रक्रिया झाली नाही असे नव्हते. जवळ जवळ शरीरभर असे शस्त्राचे वार सोसणारा हा सोसिक कवी. मानसिक वेदना आणि अठराविश्वेअ दारिद्र्य भोगणारा हा कवी. आपल्या कवितेचा एक चाहता परदेशातून दरवर्षी एकदा भारतात येतो आणि माझ्या आवाजात त्याला कविता ऐकायची असते. तेव्हा तो जमेल तेव्हा रा.ना. पवार यांना मुंबईला बोलावून घेत असे. त्यांच्या तोंडून कविता ऐकत त्या रेकॉर्डदेखील करून नेत असे. या कविता आपल्याला जगण्याचे बळ देत असे, असे तो चाहता रा.ना. पवार यांना म्हणायचा.

सुमन कल्याणपूर आणि माणिक वर्मा यांनी रा.ना. पवार यांची गीते गायिली आहेत. आजही ती अजरामर आहेत. त्या गाण्यातील भाव जसाच्या तसा रसिकांपर्यंत पोहोचावा, अशी रा.ना. पवार काकांची अपेक्षा या दोन्ही गायिकांनी पूर्ण केली. १९५५ मध्ये एच.एम.व्ही. कंपनीने ही रेकॉर्ड तयार केली. दशरथ पुजारी यांचे संगीत असलेले आणि माणिक वर्मा यांनी गायलेली ही रचना म्हणजे क्षणभर उघडी नयन देवा ॥

देवाला आळवणारी एक अंध मुलगी पंढरपूरला दर्शनाला आली आणि तिने हात जोडून त्या परमपावन पांडुरंगाचे मनोभावे दर्शन घेतले. हे दृश्य रा.ना. पवार पाहत होते. हे दृश्य पाहून त्यांना आत्यंतिक वेदना झाली. जणु ती मुलगी आपल्याला एकवारच दृष्टी दे आणि तुझे मनोहर रूप डोळे भरून पाहू दे, अशी विनवणी जणु ती करते, असा भाव या गीतातून रा.ना. पवार यांनी व्यक्त केला होता. जे न देखे रवी ते देखे कवी हे वचन रा.ना. पवार यांच्या या गीतातून प्रकट झाले आहे.

प्रत्येकाला देव कसा दिसत नाही. तो तसा दिसतो हे कुणी सांगत नाही. तो कुणालाही दिसलेला नसतो. परंतु सर्व संतांनी त्याला हृदयात पाहायला सांगितले. तो कसा असतो हे रा.ना. पवार आपल्या,

नका विचारू देव कसा देव असे हो भाव जसा

या गीतातून सांगतात. ज्याचा जसा भाव तसा देव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देखील असेच सांगतात. मनी नाही भाव अन् देवा म्हणे पाव। देव बाजाराचा भाजीपाला नाही हो ॥ मनी भाव असेल तर तो देव दिसेल. ज्या रूपात त्याला पाहण्याची इच्छा कराल. त्याला तो तसा दिसेल. देवा बोला हो माझ्याशी रा.ना. पवार भोळ्या भावभक्तीने त्या परमेश्व राला सांगतात. माझ्याशी बोला. जगात अत्याचार वाढला आहे. त्याचा विनाश करा. त्यासाठी हे देवा मी तुमच्या दारात आलो आहो. माझ्याशी बोला. काही तरी बोला. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो । विसरून गेलो देहभान हे कशासाठी तर देवाने आपल्याशी बोलावे, काही तरी बोलावे, यासाठीच तर देवा माझ्याशी बोला.

सावळ्या विठ्ठला। तुझ्या दारी आले विसरूनी गेले । देहभान ॥

हा अभंग सुमन कल्याणपूर यांनी गायला. आकाशवाणी मुंबई आणि पुणे केंद्राने ही दोन्ही गीते अजरामर केली आहेत.

सोलापुरातील नामवंत कवी  माधव पवार रा.ना.पवार यांचे चिरंजीव होत.

रा ना पवार यांचे ५ नोहेंबर १९९२ रोजी निधन झाले. अत्यंत गरिबीमुळे त्यांनी आपला कवितासंग्रह काढला नाही. त्यांच्या हयातीत तो निघाला नाही. कोणाही नामवंत प्रकाशकाने कधी त्यासंबंधी विचारणा केली नाही. पैसे देऊन संग्रह काढणे त्यांना पसंत नव्हते आणि शक्यही नव्हते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मित्रांनी हा संग्रह काढला. त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने अनुदान दिले.

सोलापूर येथे कवी रा.ना.पवार प्रतिष्ठान असून त्यांचे अध्यक्ष माधव पवार आहेत.

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

संकलन.#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज बॉलिवूड अभिनेत्री #रश्मी_आगडेकर चा वाढदिवस.

जन्म.२९ जुलै

रश्मी आगडेकर एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि तिच्या शैलीमध्ये पडद्यावर ती व्यक्तिरेखेत सुंदर भूमिका साकारत आहे, ह्या व्यतिरिक्त रश्मी एक प्रशिक्षित शास्त्रीय नर्तक देखील आहे. तिने आपल्या अभिनयाद्वारे स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

रश्मि अगडेकरने अभिनय क्षेत्रात येण्या आधी मॉडेल म्हणून सुजुकी, कैडबरी डेयरी मिल्क , गोआई बीबो च्या जाहिराती केल्या होत्या.रश्मी आगडेकर यांनी ऑल्ट बालाजी च्या 'देव डीडी' या वेब सीरिजमधून डिजिटल माध्यमात पदार्पण केले होते 'देव डीडी २'मधील लेस्बियन भूमिका साकारून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या नंतर तिने TVFची वेब सीरीज आई ऍम मेचर मध्ये अभिनय केला. तिने द इनसाइडर्स , दोस्ती का नया मैदान , गर्लफ्रेंड, रसभरी अशा वेब सीरीज मध्ये काम केले आहे.  तिने 'अंधाधुन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढे रश्मीने कित्येक वेब सिरीजमध्ये आपला ठसा उमटवला आहे, 'रसभरी'च्या शिवाय 'इम्मुच्युअर' सिरीजमध्ये सुद्धा काम केले आहे. अभिनेत्री रश्मी सोशल मीडियावर खूप सक्रीय असून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज गायक आणि संगीतकार #एसडीबातीश यांचा स्मृतिदिन.

जन्म. १४ डिसेंबर १९१४

शिवदयाल डी बातीश हे एस. डी. बातीश यांचे पूर्ण नाव होते. होते. त्यांची गैरफिल्मी गीते त्या काळात बरीच गाजली. मात्र हिंदी चित्रपटांतील त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली नाही.

एस डी बातीश स्वत: उत्तम संगीतकार, लेखक, गायक तर होतेच परंतु विचित्र वीणा आणि दिलरूबा या वाद्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं. १९३६ पासून ते ऑल इंडिया रेडिओ वर गाऊ लागले. एस. डी. बातीश यांचा आवाज वेगळा होता. रागदारीवर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली होती. जेणेकरून नव्या पिढीला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा परिचय व्हावा, एस.डी. बातीश यांनी अनेक संगीतकारांकडे वादक म्हणून जसं काम केलं तसंच त्यांना गायकीअवगत असल्याने अनेक संगीतकारांनी त्यांना गाण्याची संधी दिली. गंमतीची गोष्ट म्हणजे त्यांनी भागमभागया चित्रपटात किशोर कुमार यांच्यासाठीत्यांनी पार्श्वतगायन केलं होते. भगवानदादा आणि किशोरकुमार यांचं एक ट्रेनच्या डब्यातलं गाणं आहे त्याचे बोल होते आंखोको मिला यारसे पीने का मजा ले’, संगीतकार ओपी नैय्यर यांनी त्यांना संधी दिली यातच त्यांचे कौशल्य काय असावे याची कल्पना येतै. कैसे कहूँहा १९६४ सालचा चित्रपट. त्यात मनमोहनकृष्ण, विश्व जीत व नंदा यांच्यासाठी एक गीत सचिनदेव बर्मन यांनी स्वरबद्ध केलं होतं. त्या गीताचे बोल होते मनमोहन मनमें हो तुम्हीयातील मनमोहनकृष्ण यांच्या ओळी गायल्या होत्या. एस. डी. बातीश यांनी. अशाच प्रसिद्ध गाण्यांपैकी एक गाणं देख तेरे भगवानकी हालत क्या हो गयी इन्सानहे रेल्वे प्लॅटफॉर्म या चित्रपटातील गीत, यातही त्यांनी मनमोहनकृष्ण यांच्यासाठी पार्श्वोगायक म्हणून आपली कारकिर्द घडवता आली नाही. 'बेताब', 'बहुबेटी', 'तुफान' , 'हारजीत' अशा काही चित्रपटांना त्यांनी संगीत दिले पण ते चित्रपट चालले नाहीत. कंटाळून ते १९७० साली अमेरिकेला निघून गेले व तेथेच स्थायिक झाले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया मध्ये भारतीय संगीत शिकविले. त्यांनी संगीतावर अनेक पुस्तकेही लिहिली. एस. डी. बातीश यांचे २९ जुलै २००६ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/ रत्नाकर पिळणकर

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=5CzTw5wvNMk

आज २९ जुलै

आज स्वीडिश अभिनेत्री अभिनेत्री #एली_अवराम चा वाढदिवस.

 जन्म २९ जुलै, १९९० स्वीडनमधील एलिजबेट आव्रमिडो येथे.

एली अवराम आपल्या लुक आणि हॉटनेससाठी फेमस आहे. एक हॉट आणि बोल्ड अॅचक्ट्रेस म्हणून एली ओळखली जाते. २०१३ मध्ये आलेल्या मिकी वायरस या चित्रपटातून एलीनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय एली किस किस से प्यार करूं, नाम शबाना, बाजार, जबाडिया जोडी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. एलीनं सिनेमा आणि अल्बमच्याआधी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत तिनं पहिली अॅड केली आहे. एली बिग बॉसमध्येही दिसली आहे. पुढे ती मलंग या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिच्या लुकचं चाहत्यांनी खूपच कौतुक केलं.

एली आपल्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्यासोबच्या अफेअरमुळेही ती चर्चेत राहिली आहे. हार्दिकच्या कौंटुबिक कार्यक्रमात एली नेहमीच हजर असायची. परंतु दोघांनी नंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. याशिवाय तिचं नाव बॉलिवूड स्टार सलमान खान आणि मनीष पॉलसोबतही जोडलं गेलं आहे.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज कॉन्ट्रोवर्शियल गर्ल' या नावाने ओळखली जाणारी #अर्शी_खानचा वाढदिवस.

जन्म.२९ जुलै १९८६ अफगानिस्तानात.

बिग बॉस 14’च्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतला टक्कर देणारी अर्शी खान  सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. अर्शीची आई नादरा सुलतान, वडील अरमान खान होत. अर्शी खान पाच भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. भोपाळमधील मेयो कॉलेजमध्ये तिने फीजियोथेरेपीचे शिक्षण घेतले आहे.

तिने २०१४ मध्ये मिस ग्लोरी अर्थ सौंदर्य स्पर्धा जिंकली. २०१४ मध्ये ती कु. बिकिनी ऑनलाइन स्पर्धेची अंतिम स्पर्धकही ठरली होती. "द लास्ट सम्राट" नावाच्या भारतातील पहिल्या बॉलीवूड 4 डी ऐतिहासिक अक्शन फिल्ममध्ये मुख्य भूमिका तिने केली आहे. साकारण्यासाठी त्यांची निवड झाली. ती मल्ली मिष्टू या तमिळ चित्रपटातही दिसली आहे. अर्शी टीव्हीवरील बर्याीच शोमध्ये दिसली आहे. तिला हिंदी व्यतिरिक्त उर्दू भाषेतही खूप प्रेम आहे.

अर्शी खान 'बिग बॉस'च्या ११ व्या सीझनमध्ये दिसली होती. या सिझननंतर पुन्हा एकदा या सिझनमध्ये अर्शीला बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली होती. बिग बॉसमुळे अर्शी खानला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला होता. बिग बॉस शो नंतर प्रकाशझोतात आलेल्या अर्शी खानला मोठे प्रोजेक्ट मिळत नसले तरीही अनेक फॅशन ब्रँडसाठी रॅम्पवॉक आणि फोटोशूटच्या ऑफर तिला मिळत होत्या. इश्क में मरजावां, मेरी हानिकारक बीवी व बिट्टी बिजनेस वाली या मालिकेत ती दिसली होती.

बिग बॉस मुळेच अर्शिला एक वेगळी ओळख मिळाली. अर्शी खान सोशल मीडियावर प्रचंड अॅगक्टिव्ह आहे. अर्शीने इन्स्टाग्राम 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अर्शी खान मात्र केवळ 90 लोकांना फॉलो करते़.अर्शी आपल्या चाहत्यांसाठी रोज नवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज भयपटांचा बादशहा अशी ओळख असलेले #तुलसी_रामसे यांचा जन्मदिन.

जन्म.२९ जुलै १९४४

गोविंद यादव यांच्यासोबत तुलसी रामसे अनेक वर्षे काम करत होते. तुलसी आपल्या कुटुंबातील ७ भावांपैकी एक होते. सर्व रामसे ब्रदर्स मिळून चित्रपटांचं काम पाहात असत. म्हणूनच त्यांच्या चित्रपटांना 'रामसे ब्रदर्स'चे सिनेमे म्हणून ओळखलं जायचं.त्यांच्या सिनेमात अॅक्शन, रोमान्स, गाणी आणि सेक्स असा सगळा मसाला असे. त्यामुळेच पिटातल्या प्रेक्षकांना त्यांचे चित्रपट आवडत. हॉरर सिनेमांचा ट्रेंड रामसे बंधूंनी रुजवला.

हॉरर सिनेमा म्हणजे रामसे ब्रदर्स, अशी त्यांची एकेकाळी ओळख निर्माण झाली होती. रामसे ब्रदर्सचे चित्रपट प्रेक्षकांना आवडले आणि ते सुपरहिटही झाले. वितरक आपल्या फायद्यासाठी रामसे ब्रदर्सकडून चित्रपट घेत असत, असं म्हटलं जातं. पुराना मंदिर, तहखाना, वीराना, बंद दरावाजा हे त्यांचे भयपट खूप गाजले. झी हॉरर शो ही मालिकाही तुलसी रामसेंनी दिग्दर्शित केली होती.

तुलसी रामसे यांचे निधन १४ डिसेंबर २०१८ रोजी झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कॅमेरामन #बाळ_बापट यांचा स्मृतिदिन.

जन्म. १७ ऑगस्ट १९२३ मध्ये यवतमाळ येथे.

मॅट्रिक झाल्यावर श्रीकृष्ण उर्फ बाळ बापट पुण्याला आले आणि विविध छायाचित्रकारांकडे त्यानी छायाचित्रणाचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर फोटोग्राफी, चलचित्र छायालेखन, चित्रपट तंत्र या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. पुण्यातील नवयुग स्टुडिओमध्ये त्यांनी गरिबांचे राज्य’, ‘शादीसे पहले’, ‘साजन का घरया चित्रपटांचे कॅमेरामन म्हणून काम केले. त्याशिवाय अखेर जमले’, ’चिमणी पाखरे’,’ चाळ माझ्या पायांत’, ’मी तुळस तुझा अंगणीइत्यादी सुमारे ३२ चित्रपटांचे छायाचित्रण बाळ बापट यांनी केले. राजा परांजपे यांच्या लाखाची गोष्ट’, ‘ऊन पाऊस’, ‘पेडगावचे शहाणे’, ‘जगाच्या पाठीवर’, ‘आधी कळस मग पाया’, या लोकप्रिय चित्रपटांचे कॅमेरामन म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.

 बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते. बाळ बापट राजा ठाकूर यांच्या बरोबर वेळ मिळेल तेव्हा पुण्यातील कॅम्प एरियात असण्याऱ्या वेस्टएन्ड’, ‘एम्पायर’, ‘कॅपिटलअशा चित्रपटगृहांमध्ये जाऊन इंग्रजी चित्रपट बघत. त्यातील कथेचे नावीन्य, तंत्राची ताकद त्यांना आवडे. फ्रँक काप्रा, बिसी वायलर, हिचकॉक या दिग्गज दिग्दर्शकांबद्दल ते वारंवार बोलत असत. राजा परांजपेंखेरीज राजा ठाकूर, दत्ता धर्माधिकारी यांसारख्या दिग्दर्शकांकडे बाळ बापट यांनी काम केले. भारत सरकारच्या फिल्म डिव्हिजनमध्येही बाळ बापट यांनी काही काळ नोकरी केली होती. नंतर भारतीय लष्कराचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना त्यांननी १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धात रणभूमीवर जाऊन भारतीय सैन्याबरोबर छायाचित्रण केले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या दौऱ्यांबरोबर ते अनेकदा जात असत. पुण्यातील कबीर बाग मठ या संस्थेचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. अभिनेते सूर्यकांत यांच्या आग्रहावरून त्यांनी त्यांच्या चित्रपट आयुष्याचा लेखाजोखा मांडणारे माझी चित्रफीतहे पुस्तक लिहिले. ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट हे त्यांचे चिरंजीव होत. बाळ बापट यांचे २९ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज ब्रिटीश-भारतीय रैपर व हिप-हॉप गायिका #तरणकौरढिल्लन उर्फ #हार्ड_कौर चा वाढदिवस.

जन्म.२९ जुलै १९७९ कानपुर येथे.

हार्ड कौरचे खरे नाव तरण कौर ढिल्लन आहे. हार्ड कौर एक ब्रिटीश-भारतीय रैपर व हिप-हॉप गायिका आहे. ती हिंदी चित्रपटातही अभिनेत्री व पार्श्व गायिका म्हणून सक्रीय आहे. हार्ड कौरला पहीली भारतीय महिला रैपर म्हणले जाते.

कानपुर मध्ये तिची आई एक छोटे पार्लर चलवत असे. कौर लहान असतानाच तिच्या वडिलाचे निधन झाले.१९९१ मध्ये तिच्या आईने एका ब्रिटीश नागरिकाबरोबर लग्न केले व त्या दोघी इंग्लड ला गेल्या.कौरचे शिक्षण तिथेच झाले.हळू हळू तिला हिप-हॉप संगीताची आवड निर्माण झाली व यातच करियर करण्याचे तिने ठरवले. कौर ने  २००७ मध्ये श्रीराम राघवन यांचा चित्रपट 'जॉनी गद्दार' साठी कौर ने 'पैसा फेंक' गाणे गायले.जेकी खूप हिट झाले.या नंतर तिने अनेक गाणी गायली.कौरचा पहीला सोलो एल्बम सुपरवुमन २००७ मध्ये आला. २००८ मध्ये कौर ने यूके म्यूजिक अवार्ड मध्ये बेस्ट फीमेल चा अवार्ड जिंकले होते. एक ग्लासी,पार्टी अभी बाकी है ही हार्ड कौरची गाणी तुफान गाजलीत.  हार्ड कौरने जॉनी गद्दारसिनेमात मूव युवर बॉडी', ‘बचना ए हसीनोंमध्ये लकी बॉयही गाणी गायली आहेत. २०११ साली रिलीज झालेल्या पटियाला हाऊसया सिनेमातही ती दिसली होती.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज हिंदी चित्रपट सृष्टीतील हास्याचा बादशहा #जॉनी_वॉकर यांचा स्मृतिदिन.

जन्म. ११ नोव्हेंबर १९२०

हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्याु या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे. जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं. जॉनी वॉकर यांनी सुरुवातीच्या काळात बेस्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर मजामस्ती करुन त्यांचे मनोरंजन करत होते. हे पाहून बलराज साहनी प्रभावित झाले होते. बलराज साहनी यांनी त्यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करुन दिली. १९५० साली आलेल्या आखरी पैगामद्वारे ते' रसिकांच्या पुढे आले.त्याच वर्षी नवकेतनचा बाजीझळकला.आणि जॉनी वॉकरयांनी मागे वळून पाहिले नाही.  बाजीमधील त्यांच्या दारुड्याच्या अभिनयामुळे खूष होऊन गुरुदत्त यांनी त्यांना "जॉनी वॉकर" हे जगप्रसिद्ध व्हिस्कीच्या ब्रँडचे नाव दिले आणि बद्रुद्दीन जमालुद्दीन काझीचा 'जॉनी वॉकर' झाला. बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या मधुमतीत जॉनी वॉकर यांनी दारूड्याची भूमिका एवढी अप्रतिम केली की समीक्षकांनी त्यांना त्या वर्षाचा सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार बहाल केला गेला.जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधी दारूला स्पर्श ही केला नाही पण दारूड्याचे बेअरींग एवढे झकास सांभाळले की बिमलदा म्हणाले 'हा माणूस दारूला स्पर्श देखील करीत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.देव आनंद यांच्या सोबत 'सीआयडी'त तर त्यांनी कमाल केली होती.. 'ऐ दिल है मुश्कील जीना यहां जरा हठ के जरा बच के ये है बॉंम्बे मेरी जानहे गाणं तर त्या वर्षीच बिनाका टॉपचं गाणं ठरलं! वॉकर यांची विनोदातील लोकप्रियता एवढी होती की जॉनी वॉकरनावाचा एक सिनेमा पन्नासच्या दशकात आला होता यात त्याने मुख्य भूमिका केली होती. श्रीमंत मेहुणा पाहिजे या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. जवळपास प्रत्येक सिनेमात वॉकर यांच्यावर  गाणं चित्रित केलेले असायचं. आपल्या ३५ वर्ष्याच्या करीयर मध्ये जॉनी वॉकर यांनी ३२५ चित्रपटात काम केले.  मिस्टर कार्टून एम.ए., खोटा पैसा, मिस्टर जॉन, नया पैसा, रिक्षावाला आदी चित्रपटात जॉनी वॉकर यांनी नायक म्हणून काम केले होते. जॉनी  वॉकर यांनी काळाची पावले ओळखून सत्तरच्या दशकात निवृत्ती पत्करली पण हृषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहावरून 'आनंद'  व गुलजार यांच्या आग्रहावरून 'चाची ४२०' या चित्रपटात काम केले होते. जॉनी वॉकर यांचे २९ जुलै २००३ रोजी निधन झाले.

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

आज २९ जुलै

आज भारतातील ख्यातनाम गायक #संजीव_चिमलगी यांचा वाढदिवस.

जन्म.२९ जुलै १९७२

संजीव चिम्मलगी यांचे बालपण नवी मुंबईत गेले.त्यांचे शिक्षण इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या किंग जॉर्जची शाखा न्यू बॉम्बे हायस्कूल मध्ये झाले. 'वडील सिमेन्स कंपनीत नोकरीला असल्याने ते नवी मुंबईत वास्तव्यालाहोते. संजीव यांचे  आजोबा चिम्मलगी मास्तर तबला वाजवायचे. आजोबा भीमसेनजींचे मास्तर होते. त्यांनी अनेक दिग्गज गायकांना साथ केली होती. पं. भीमसेन जोशींचे पट्ट शिष्य माधव गुडी आणि आजोबांचे घनिष्ट संबंध होते. संजीव चिम्मलगी यांच्या वडिलांनाही गाण्याची आवड होती. वाशीमध्ये सांस्कृतिक, सांगीतिक वातावरण बनावे यासाठी संजीव चिम्मलगी यांच्या वडिलांनी अविरत परिश्रम केले. त्या ध्येयापोटी ७५ साली वाशीत एक ग्रुप तयार झाला. ऑर्केस्ट्रा स्वरूपाचा हा ग्रुप छोटे-मोठे कार्यक्रम करायचा. दरम्यानच्या काळात सी.आर. व्यास वाशीत राहायला आले. त्यांनी सहकार्य केलं आणि १९७७ पासून ९३ पर्यंत संजीव यांचे वडील संगीतासाठी अविरत धडपडत... कार्यक्रम करत राहिले... त्यातून 'न्यू बॉम्बे म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कलची स्थापना झाली. त्याचे कर्ता करविता चिम्मलगी होते. किंबहुना म्युझिक अॅण्ड ड्रामा सर्कल म्हणजे चिम्मलगी, इतकं अतुट समीकरण होते. यातूनच संजीव चिम्मलगी यांचा गानप्रवासही सुरू झाला. त्यांच्या वडिलांनी वाशीत गाणं रुजवलं. संजीव लहान असल्यापासून त्यांचे वडीलआवर्जून मैफलींना घेऊन जायचे. त्या मुळे शाळेत असल्यापासून गाण्याची आवड निर्माण झाली. ते शाळेतही एकदा समूहगीतासाठी ऑडिशन घेतली आणि त्यात त्यांची निवड झाली. मग... 'छान गाता येतं... आवाज चांगला आहे...' हे घरच्यांना समजलं. गाणं शिकायला पाठवा, असा आग्रह त्यांच्या आईने केला आणि वयाच्या १२ व्या वर्षी वडिलांनी कृष्णा लाहिरी यांच्याकडे शिकायला पाठवलं. त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की त्यांच्याकडे गाण्याचे कार्यक्रम होत असत. संजीव हे कृष्णा लाहिरी यांच्याकडे रागदारी शिकत असल्याने त्यांना त्या कार्यक्रमात गायला मिळालं... सगळ्यांना गाणं आवडलं... कौतुक झालं....प्रोत्साहन मिळालं... आणि यातूनचा संजीव चिम्मलगी यांचे स्टेजवर गाणं सुरू झालं. त्यानंतर संजीवजी काही दिवस प्रभाकर गुणे यांच्याकडे गाणं शिकले. दरम्यान, ते १५ वर्षांचे असताना माधव गुडी घरी आले होते. त्यांना संजीवजींनी गाणं म्हणून दाखवलं....ते गाणं ऐकून बाबांना म्हणाले, 'मुरली... याला धारवाडला पाठव... गाणं शिकवतो'! मग खरंच सुरुवात झाली आणि दोन सुट्ट्यांमध्ये धारवाडच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि त्यांचे गाणं आकार घेऊ लागलं... पण दोन सुट्याच्यामध्ये भरपूर गॅप असल्याने गाण्यात सलगता राहत नसे. सातत्य गरजेचं

होतं. मग वयाच्या १९ व्या वर्षी आधीच परिचयाच्या असलेल्या सी.आर.व्यास गुरुजींकडे गाणं शिकायचं ठरलं. त्यांनी संजीव यांचे गाणं ऐकलेलं होतं. 'किराणा घराण्याचे यांच्यावर चांगले संस्कार आहेत' हे त्यांनी जाणलं होतं. त्यांनी सरळ गंडाबंधनच केले आणि संजीव यांचे गाण्याच्या पुढचं शिक्षण सुरू झालं. दरम्यान, चेंबूरच्या विवेकानंद कॉलेजमधून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला होता. काही काळ नोकरीही केली; पण पूर्ण वेळ गाणंच करायचं, असा विचार पक्का झाला आणि मग गुरुजींच्या मागे १३ वर्षे ते सावलीसारखे फिरले. गुरुजींचा पूर्ण सहवास मिळाला. सकाळी उठून तंबोरा लावायचा आणि अव्याहत गाण्याचाच विचार... गायनाचे धडे.... आणि गुरुजींसोबत आणि स्वतंत्र गाण्याचे कार्यक्रम हेच त्यांचं विश्व झालं... संजीव चिम्मलगी हे ऑल इंडिया रेडिओचे '' ग्रेडचे कलाकार आहेत. त्यांना सरकारी शिष्यवृत्तीही मिळाली आहे. संजीवजीं नी अनेक परदेश दौरे केले आहेत. युरोप, स्पेन, यू.एस.ए. अशा ठिकाणी एक एक महिन्यासाठी गाण्याच्या कार्यक्रमांबरोबरच त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीता संबंधी अभ्यास वर्ग ही घेतले आहेत. परदेशातल्या संगीतासाठीच्या अॅवॉर्डसाठी त्यांना ग्रॅमी नॉमिनेशन मिळाले होतं. त्यांच्या आठवणीतला ४ दिग्गज गुरू-शिष्यांचा नेहरू सेंटरमधला कार्यक्रम हा त्यांना विशेष आठवतो. पं. जयराज, प. बिरजू महाराज, पं. उस्ताद अल्ला-रखा आणि स्वतः गुरुजी सी. आर. व्यास आपल्या शिष्यांसह होते. एका मुलाखतीत म्हणतात 'एवढ्या मातब्बर मंडळींसोबत गुरुजींचा शिष्य म्हणून मी होतो! त्या कार्यक्रमात माझं खूप कौतुक झालंच; पण एका नव्या कारकिर्दीला सुरुवात झाली!'

संजीव चिम्मलगी हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आहेत. 'युवोन्मेश' हा 'इंद्रधनु' ठाणे यांच्यातर्फे मिळालेला पुरस्कार, झी गौरव नॉमिनेशन... बेस्ट मेल प्लेबॅक सिंगिंग मराठी फिल्म' 'आई शपथ' महाराष्ट्र शासन पुरस्कार, षण्मुखानंद संगीत संभेतर्फे 'संगीत शिरोमणी अॅवॉर्ड' इ. अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच त्यांच्या अनेक 'थीम कन्सर्ट' झाल्या आहेत. मराठी चित्रपट नॉट ओन्ली मि. राऊत, आईशपथ यासाठीचे त्यांचे पार्श्वगायन उल्लेखनीय आहेच; पण तेलुगू फिल्मसाठीही ते गायलेत. 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमात गायलेल्या संजीवजींचा 'भक्तीप्रेम लहरी' हा अल्बम प्रसिद्ध आहे. एकाच गायकाने १४७ गाणी साडीसाठी गाण्याचा अनोख्या प्रयोगाचा आणि विक्रमांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. गाणं शिकणं ही न संपणारी प्रक्रिया आहे. सतत नवीन ऐकत शिकत राहावं, यासाठी आग्रही असणाऱ्या संजीवजींनी टी. आर. बालामणी यांच्याकडे सात-आठ वर्षे कर्नाटकी संगीताचे शिक्षण घेतले. एस. बालचंद्रन, सत्यशील देशपांडे यांच्याकडेही गायनाचे धडे गिरवणारे संजीव चिम्मलगी सध्या राजेंद्र मणेरीकर यांच्याकडे 'आवाज साधना' शिकत आहेत.

सध्या संजीव चिम्मलगी शास्त्रीय संगीत शिकवत आहेत. परंपरेनं शिकून शिष्यपरिवार बनावा, या स्वरूपाच्या क्लासमध्ये २५ विद्यार्थी आहेत. संजीव चिम्मलगी म्हणतात, 'नवी मुंबई विशेषतः वाशी हे माझं घर आहे. मी आणि नवी मुंबई एकत्रच मोठे झालो. ही माझी कर्मभूमी आहे. मला संगीत साधना करण्यासाठी आणि करताना 'जे' काही मिळालं ते इथूनच! मी अस्सल नवी मुंबईकर आहे. 'भविष्यात मला शिकवायचं आहे.'

भारतीय संगीतातली बैठक परंपरा पुररुज्जीवित करावी. छान कलाकारांसोबतच्या बैठकीत गाणं खुलतं, याचा आनंद घेता यावा, या हेतूनं ७ वर्षांपासून 'मंथन'च्या रूपाने अनेक प्रसिद्ध गायक, वादकांच्या मैफिलींचे आयोजन करत आहेत. नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनमध्ये हे कार्यक्रम होतात. त्याचबरोबर ४ वर्षांपासून 'समर्पण' नावाचा कार्यक्रमही ते करतात. शास्त्रीय संगातीच्या या कार्यक्रमात गुरुजींप्रति... समाजाप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी... त्यांचं आपण काही देणं लागतो, या भावनेने स्वतःची सेवा देणं ही त्यामागची भावना आहे. कलाकारांनीच आग्रहाने काही नव्या गोष्टींची सुरुवात करून समाजाची अभिरुची वाढावी... ऐकणारे कान तृप्त करावेत,

यासाठी प्रयत्नशील राहायला हवं, ही त्यांची यामागची प्रामाणिक भावना आहे.

'पुण्याच्या सवाई गंधर्वमध्ये आपली गानसेवा सादर करणारे संजीव चिम्मलगी अनेक दिग्गज कलाकारांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. संगीत महाभारती या जुहूच्या संस्थेत पं. नयन घोष यांच्या कार्यक्रमाला आले असता, 'खूप दिवसांनी सुज्ञ गाणं ऐकलं... आध्यात्मिक गानबैठक ही स्टेज कलाकाराच्या आयुष्यात पन्नाशीत येते...पण ती आज तुमच्या गाण्यात आहे. तुमचं गायन प्रगल्भ वाटलं,' अशी त्यांनी दिलेली दाद त्यांना मोलाची वाटते.'पार्थ फाईंडर्स' या कॉफी टेबलबुकच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी वेगवेगळ्या गायकांनी रचलेल्या बंदीशी गायल्या...

त्यालाही खूपच दाद मिळाली होती. संजीव चिम्मलगी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव चिम्मलगी यांची वेब साईट. http://chimmalgi.com

#संजीव_वेलणकर पुणे.

९४२२३०१७३३

संदर्भ.इंटरनेट/मीरा कुलकर्णी

ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=bzDS-IVTjnw

https://www.youtube.com/watch?v=HKFZz4jpAsA

नमस्ते, साहित्य उत्सव, ...

 

परिसर, ह्या लेख मालिकेत आजचा लेख, 

 

जंगलकन्या!, ...

 

साभार, अनंत सोनवणे,

वाचा साहित्य उत्सववर, ...

 

 

वाघ या रुबाबदार प्राण्याचं दर्शन जितकं  रोमांचित करणारं, तितकं च भीतीने धडकी भरवणारंही. ताडोबा जंगलात येथील वाघांच्या संरक्षणासाठी अनेक जणी काम करत आहेत. वाघांना नुसतं पाहाणं नाही तर प्रत्यक्ष वाघांबरोबर काम करणं हे एकाच वेळी आव्हानात्मक आणि समाधान देणारं आहे. आरएफओ मनीषा जाधव, जीवशास्त्रज्ञ प्राजक्ता हुशंगाबादकर, वनरक्षक शीतल कुडमेथे आणि त्यांच्यासारख्या इतर काही जणींच्या प्रत्यक्ष कामाशिवाय ताडोबा परिसरात गाईडचं काम करणाऱ्या १३ स्थानिक स्त्रियाही जंगल आणि पर्यटकांमधला दुवा ठरत आहेत. निबिड जंगलात वेळीअवेळी कर्तव्य बजावताना या स्त्रियांचं जीवन समृद्ध करणाऱ्या थरारक अनुभवांवरचा हा लेख २९ जुलैच्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्ताने...

 

 

१ मे २०२१. अवघा महाराष्ट्र सुट्टीचा आस्वाद घेत होता आणि ताडोबाच्या जंगलात १० जणांचं एक पथक पानगळ तुडवत झपाझप चाललं होतं. सकाळचे ११ वाजलेले. पण वैदर्भीय ऊन अंग जाळून काढत होतं. भोवताली किर्र शांतता आणि तिला भेदणारा वाळल्या पानांच्या गालिच्यावर उमटणारा करकरीत पायरवपथकात ८ पुरुष, २ स्त्रिया. काही जणांच्या हातात काठ्या. सर्वांच्या नजरा सावध. कान टवकारलेले. त्यांच्या मागून मी. पायांवर, चेहऱ्यावर उमटणारे बांबूचे ओरखडे टाळण्याचा केविलवाणा प्रयत्न करत. मुख्य वाटेपासून आम्ही जेमतेम १५० मीटर आत घुसलेलो. पण तेवढ्यातच माझं दिशांचं भान पुरतं हरपलेलं. कुठून त्या रानात घुसलो आणि कुठे चाललोय, काही सुधरेना.

 

‘‘सर, युनिटच्या सोबत चाला. मागे राहू नका.’’ रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) मनीषा जाधव यांच्या आवाजानं भानावर आलो.

 

 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सबरोबर (एसटीपीएफ) मी गस्तीवर निघालो होतो. एसटीपीएफच्या या युनिटचं नेतृत्व करत होत्या आरएफओ मनीषा. मूळच्या नाशिकच्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन वनसेवेत आलेल्या. आधी राष्ट्रीय फुटबॉल संघात खेळलेल्या. हवाईदलात जायचं स्वप्न बाळगणाऱ्या. वनविभागाच्या खडतर ट्रेनिंगनंतर पहिलीच पोस्टिंग ताडोबात!

 

अर्ध्या तासापूर्वी खातोडा गेटजवळ मी आणि आरएफओ मनीषा बोलत बसलो होतो. त्यांच्या युनिटचे सदस्य खबर घेऊन आले, ‘लारानं शिकार केलीय!लारा म्हणजे ताडोबातली एक तरुण, देखणी लेकुरवाळी वाघीण. शिकार केल्यावर लारा निघाली होती ती थेट आम्ही बसलो होतो त्याच दिशेनं. गेटजवळ असलेल्या पाणवठ्याकडे. युनिटनं खबर दिली आणि आरएफओ मनीषा गाडीतून कॅमेरा काढून गेटकडे वळल्या. मी त्यांच्यासोबत. मागे अवघं युनिट श्वास रोखून बसलेलं. अवघी काही सेकंदांची अस्वस्थ प्रतीक्षा आणि गेटच्या उजव्या बाजूच्या झाडीतून ती बाहेर आली!  उन्हात तिचा पट्टेदार देह झळाळला. आमच्यापासून फक्त १०० फूट अंतरावर. रस्त्यालगतच्या गवतातून शांतपणे चालत ती डांबरी रस्त्यावर आली. आमच्या दिशेनं एक दृष्टिक्षेप टाकला आणि रस्ता ओलांडून पाणवठ्याकडे गेली. इतक्यात पुन्हा उजव्या बाजूला हालचाल झाली. झाडीतून एक पिल्लू रस्त्यावर आलं. अवघं पाचेक महिन्यांचं. मग एकामागोमाग एक आणखी तीन पिल्लं! चौघंही दुडूदुडू धावत आईच्या मागून पाणवठ्यावर गेली.

 

कॅमेरा बंद करून मनीषा वेगानं गाडीच्या दिशेनं निघाल्या. टीमला त्यांनी पटकन निघण्याची सूचना केली. मी गाडीत बसताच त्या म्हणाल्या, ‘‘हीच योग्य वेळ आहे त्या वाघिणीने के लेल्या शिकारीकडे जाण्याची.’’ वाघांच्या संरक्षणाची जबाबदारी एसटीपीएफ चमूच्या खांद्यांवर असते. त्यासाठी ऊन, वारा, पाऊस, वन्यप्राण्यांपासूनचा धोका, यांची पर्वा न करता दैनंदिन गस्त तर घालायची असतेच, शिवाय वाघानं शिकार केली की त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहाणीसुद्धा करायची असते. विशेषत: गावाजवळ झालेल्या शिकारीची अधिक काळजीपूर्वक पाहाणी करावी लागते. कारण भक्ष्यावर विष टाकून वाघाचीच शिकार केली जाण्याची शक्यता असते. वाघानं एखाद्या पाळीव गुराची शिकार केली असेल, तर त्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून देखरेख ठेवली जाते. आताही लारा आणि पिल्लं पाणवठ्यावर गेल्याची संधी साधून आम्ही भक्ष्याची तपासणी करायला निघालो होतो.

 

एसटीपीएफचे जवान वाघाचा मागोवा घेण्यात पटाईत. वाटेतल्या खाणाखुणांची उकल करत त्यांनी आम्हाला बांबूच्या एका बेटाजवळ आणलं. बेटाच्या बुडाशी लारानं तिचं भक्ष्य दडवलं होतं. तो एक छोटा गवा होता, अजून पुरता वयात न आलेला. डोळे सताड उघडे. पाय ताणलेले. मागचा काही भाग खाल्लेला. विशेष म्हणजे मृतदेहावर पालापाचोळा पसरून तो लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मनीषा म्हणाल्या, ‘‘वाघ हा अत्यंत हुशार प्राणी आहे. मांसाचा वास बाहेर जाऊ नये आणि परिसरातले स्पर्धक वाघ, बिबटे, इतर मांसभक्षी प्राण्यांना सुगावा लागू नये, म्हणून लारानं ही काळजी घेतलीय.’’ या काळजीचाच एक भाग म्हणून शिकार केल्यानंतर वाघ शिकारीपासून फार काळ दूर जात नाही. त्यामुळे एसटीपीएफला काम झटपट पूर्ण करावं लागतं. आताही युनिटनं पटापट निरीक्षणं नोंदवली आणि आम्ही तिथून निघालो. संध्याकाळी मी गेटवरच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. तेव्हा समजलं, सकाळी आमच्या समोर पाणवठ्यावर आलेली लारा अवघ्या १० मिनिटांत पिलांना घेऊन शिकारीच्या ठिकाणी परतली होती!

 

गस्तीदरम्यान आम्ही काही पाणवठ्यांनाही भेट दिली. मनीषा म्हणाल्या, ‘‘वाघाची शिकार करण्यासाठी कोणी पाण्यात विष तर मिसळलेलं नाही ना, हे आम्ही लिटमस पेपरच्या सहाय्यानं तपासतो. तसंच पाणवठ्याच्या वाटेवर शिकाऱ्यांनी सापळा लावलेला नाही ना, हेसुद्धा पाहातो.’’ याशिवाय पाणवठ्यात पुरेसं पाणी आहे का?, सोलर पंप सुरूआहे का?, तिथले कॅमेरा ट्रॅप जागेवर व व्यवस्थित सुरूआहेत का?, हेदेखील पाहिलं जातं. कधी एखाद्या विशिष्ट वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं असतं. कधी वन्यजीव-मानव संघर्षाच्या प्रसंगी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जायचं असतं, तर कधी जंगलात घुसखोरी करणाऱ्यांना रोखायचं असतं. अशा प्रत्येक वेळी एसटीपीएफ आघाडीवर असते. अशा तणावग्रस्त प्रसंगात युनिटच्या सदस्यांना मारहाण होणं, गाडीवर हल्ला होणं, असंही घडतं कधी. या परिस्थितीलाही मनीषा धीरानं सामोऱ्या गेल्यात.

 

त्या सांगतात, ‘‘प्रशिक्षणादरम्यान मी देशातल्या १३ व्याघ्र प्रकल्पांना भेट दिली होती, पण एकही वाघ दिसला नव्हता! ताडोबात पोस्टिंग मिळाल्यावर देवाचे आभार मानले. इथं वाघ रोज फक्त दिसणारच नव्हता, तर त्याच्याबरोबर काम करायची संधी होती.’’ अर्थात हे काम सोपं नव्हतं. एका बाहेरून आलेल्या, अननुभवी तरुण स्त्रीसाठी तर आणखीनच कठीण. सर्वांत पहिलं आव्हान होतं युनिटचा विश्वास संपादन करण्याचं. मनीषा स्वत: फील्डवर उतरल्या. प्रत्येक ऑपरेशनमध्ये आघाडीवर राहून नेतृत्व केलं. युनिटबरोबर पॅट्रोलिंग केलं, छातीइतक्या पाण्यातून फिरायला लागलं, घनदाट जंगलात संरक्षण कुटींवर स्टाफसोबत राहिल्या. हळूहळू युनिटबरोबर सूर जुळले. त्याचवेळी वाघाबरोबरही नातं जोडलं गेलं. मनीषा म्हणतात, ‘‘वाघाला मी रोज पाहाते. पण मन भरत नाही. किती देखणा, रुबाबदार प्राणी. खराखुरा जंटलमन! तरी किती बिचारा! कोणीच त्याला पूर्णपणे समजावून घेऊ शकत नाही.’’ वाघाचा विषय निघाला की मनीषा कधी आक्रमक होऊन बोलतात तर  क्वचित हळव्या होऊनसुद्धा. ‘‘एकदा छोटी तारा नावाची वाघीण माझ्यापासून शे-दीडशे फूट अंतरावर बसली होती. तिच्या छातीजवळ जखम झाली होती. तिला ती जखम चाटून साफ करता येत नव्हती. आम्ही दोघी एकमेकींकडे बघत बसलो होतो. नि:शब्द संवाद! तिची नजर आद्र. माझ्या नजरेत अगतिकता. मी तिला काहीच मदत करू शकत नव्हते. दोघीही चक्क तीन तास तशाच बसून. शेवटी निघताना मनात म्हटलं, ‘काळजी करू नकोस. होशील तू बरी.कालांतरानं पुन्हा दिसली, तेव्हा तिची जखम बरी झाली होती.’’

 

हळूहळू इथल्या वाघांशी माझं नातं इतकं घट्ट झालं, की कामाच्या आणि वेळेच्या चौकटी गळून पडल्या. मनीषा सांगतात, ‘‘एकदा एका बछड्याला कॉलरलावायची होती. मी त्या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. त्याला डार्टनं बेशुद्ध करण्यात आलं. रक्तदाब, तापमान, लांबी, उंची, सुळ्यांची लांबी मोजणं, असं सारं सुरू होतं. अचानक त्या बछड्याचा भाऊ आक्रमक होत धावून यायला लागला. म्हणून या बछड्याला थोडं दूर न्यावं असं ठरलं. त्याला स्ट्रेचरवर घेऊन आम्ही उचलायला लागलो. त्याचा एक पाय स्ट्रेचरवरून बाहेर आला. मी तो उचलून स्ट्रेचरवर ठेवायला गेले, तर तो एक पायच मला किती जड लागला! जेमतेम दीड वर्षांचा तो बछडा. पण वजन १७६ किलो. त्याची जीभ बाहेर आली होती. म्हणून ती जबड्यात सारण्यासाठी मी जीभेला हात लावला. ओह! तो खरखरीत स्पर्श. कधीही न विसरता येणारा अनुभव!’’ अशा अनेकानेक अनुभवांनी जीवनसमृद्ध होत असतानाच कामाच्या तणावानं कधी खचायला नाही का होत? यावर मनीषा हसून उत्तर देतात, ‘‘मला वाघ आवडतो. त्याच्यासोबत काम करणं आवडतं. इथं मला माझ्या आवडीचं काम करायला मिळतं आणि वर पगारही मिळतो. आणखी काय हवं!’’

 

मनीषासारखीच कामात झोकून देणारी आणखी एक तरुणी मला ताडोबात भेटली. प्राजक्ता हुशंगाबादकर. मनीषांचं काम वाघांच्या संरक्षणाचं, तर प्राजक्ता यांचं टायगर मॉनिटरिंगचं. प्राजक्ता ताडोबाच्या जीवशास्त्रज्ञ. मूळच्या अमरावतीच्या. गेली दहा वर्षं वाघांबरोबर काम करत आहेत. उत्तरांचलपासून महाराष्ट्रापर्यंत विविध भोगौलिक प्रदेशांत त्यांनी काम केलंय. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातसुद्धा. प्रत्येक ठिकाणचं जंगल वेगळं, माणसं वेगळी, अडचणीही वेगळ्या. उत्तरांचलला दोन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर त्यांनी काम केलंय. पहाडी परिसर. तापमान दोन-तीन अंशापर्यंत उतरणारं. हाडं गोठवणारं, तर मध्य भारतात ४५-४७ अंशांपर्यंत जाणारं तापमान. कातडी भाजून काढणारं. पण ही पठ्ठी कुठेही डगमगली नाही!  मुलगी म्हणून कुणी वेगळं वागवावं, कामात सवलत द्यावी, अशी अपेक्षा बाळगली नाही.

 

जीवशास्त्रज्ञ म्हणून प्राजक्तांचं मुख्य काम असतं कॅमेरा ट्रॅपिंगचं. व्याघ्रगणनेसाठी पंजांचे ठसे, पाणवठ्यावरची गणना या पद्धतींची जागा आता कॅमेरा ट्रॅपिंगनं घेतलीय. हे काम बरंचसं तांत्रिक आणि खूप मेहनतीचं. टायगर मॉनिटरिंगसाठी विशिष्ट प्रकारचे कॅमेरे वापरले जातात. हे कॅमेरे छोट्यातली छोटी हालचाल अचूक टिपतात. रात्रीसुद्धा. जंगलात ज्या रस्त्यावर वाघाचा वावर असतो त्याच्या दोन्ही बाजूंना एक-एक कॅमेरा लावला जातो. रस्त्याच्या मध्यापासून तीन ते पाच मीटर अंतरावर. जमिनीपासून दीड ते दोन फूट उंचीवर. दोन्ही कॅमेरे अगदी समोरासमोर लावत नाहीत. तसं केलं तर एकमेकांच्या फ्लॅशनं ते एकमेकांचे फोटो खराब करतात. म्हणून किंचित तिरपा कोन साधतात. पण एकाच वाटेवर दोन कॅमेरे का? प्राजक्ता याचं उत्तर देतात, ‘‘आम्हाला वाघाचे दोन्ही बाजूंनी फोटो हवे असतात. प्रत्येक माणसाच्या तळहातावरच्या रेषा वेगळ्या असतात. तसाच प्रत्येक वाघाच्या शरीरावरच्या पट्ट्यांचा पॅटर्नवेगळा असतो. तो विशिष्ट पॅटर्नच त्या वाघाची ओळख ठरवतो.’’ संपूर्ण जंगलात असे शेकडो कॅमेरे लावले जातात. त्यातल्या मेमरी कार्डवर महिनाभर दिवसरात्र प्राण्यांच्या हालचाली टिपल्या जातात. असे अक्षरश: लाखो फोटो गोळा होतात. संगणकावर त्यांचं वर्गीकरण होतं. मग विशिष्ट सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं फोटोंमधल्या वाघांची ओळख पटवली जाते. जमा झालेल्या डेटाचं सांख्यिकी विश्लेषण केलं जातं. या विश्लेषणाच्या आधारावर जंगलात किती वाघ आहेत, याचा आकडा निश्चित होतो.

 

विश्लेषण आणि अहवालाचं काम तासन्तास ऑफिसमध्ये बसून करावं लागतं, तर कॅमेरे लावणं, त्यांची देखरेख, यासाठी प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं. कॅमेरा ट्रॅपिंगसाठी प्राजक्ता यांच्याबरोबर मी अनेकदा जंगलात गेलोय. प्रत्येक वेळी त्यांचा कामाचा (पान ४ वर) (पान १ वरून)   झपाटा पाहून अवाक् झालोय. सकाळी सहा-सात वाजता जंगलात गेलो, की संध्याकाळी अंधार पडल्यावरच आम्ही घरी परतायचो. त्या दिवसाचं ठरवलेलं काम पूर्ण होईपर्यंत जंगलातून बाहेर पडायचं नाही, असा प्राजक्तांचा नियम. दिवसभर त्या जेवणारसुद्धा नाहीत! हातात जीपीएसयंत्र घेऊन प्रत्येक कॅमेरा योग्य ठिकाणी लागलाय ना,  कॅ मेऱ्याचा अँगल बरोबर आहे ना, बॅटरी पुरेशी चाज्र्ड आहे ना, मेमरी कार्ड चालतंय नाप्रत्येक गोष्ट स्वत: बारकाईनं तपासणार. एखादी त्रुटी आढळली तर संबंधिताची हजेरी घेणार. त्या म्हणतात, ‘‘मला माझं काम आवडतं आणि ते मी मनापासून करते. इतरांनीही तसं करावं, एवढीच माझी अपेक्षा असते. कारण हे टीमवर्कआहे.’’ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं कामही त्या मनापासून करतात.

 

एके ठिकाणी आम्ही कॅमेरे तपासण्यासाठी गेलो होतो. वनरक्षक म्हणाले, ‘‘या जंगलात गाडीवाट नाही. तुम्ही कसे जाणार?’’ त्यावर प्राजक्ता म्हणाल्या, ‘‘बाइक जाते ना? मग बाइकवर जाऊ.’’ तीन मोटारसायकल मागवण्यात आल्या. त्यावर आम्ही सहा जण गेलो आणि काम पूर्ण करून आलो. छान खडखडीतप्रवास झाला! काही ठिकाणी दुचाकी जाण्यासारखीही परिस्थिती नसायची. तिथे चालत जायचं. कधी चार-चार किलोमीटर चालायचं. वाट अर्थातच खडबडीत, काट्याकुट्याची. वर रणरणतं ऊन. पण प्राजक्तांचा उत्साह कायम. सगळ्यात पुढे. चौफेर सावध नजर. कुठे धोका वाटला, तर ‘‘अनंतदा, तू गाडीतच थांब,’’ असं फर्मान सोडणार. वाटेत आजूबाजूची झाडंझुडपं, पक्षी, कीटक यांची माहिती देणार. एखाद्या ठिकाणी विष्ठा दिसली, तर ती कोणाची असेल, यावर चर्चा करणार. इतकी वर्षं जंगलात काम करून त्यांची नजर तयार झालेली. छोटीशीही हालचाल नजरेतून सुटत नाही. कधी तेंदू फळांवर ताव मारणारं अस्वल दाखवतील, कधी पानांत दडलेलं घुबड, तर कधी दगडाखालचा विंचू. बेडूक आणि पाली विशेष प्रिय!

 

वाघाशी लपाछपी तर रोजचीच.  त्या एक आठवण सांगतात,‘‘एकदा आम्ही एका पाणवठ्यावर कॅमेरा ट्रॅप तपासत होतो. मेमरी कार्ड काढलं आणि कार्ड रीडरमध्ये टाकत होते. इतक्यात माझा सहकारी रोशनदाला कसलासा आवाज आला. तो म्हणाला,‘ लगेच गाडीत बसा.आम्ही गाडीत बसलो आणि त्या पाणवठ्याभोवती चक्कर मारली. अवघी दोन मिनिटं लागली आम्हाला मूळ जागेवर परत यायला. पाहाते, तर मी जिथं बसले होते, बरोबर त्याच ठिकाणी वाघीण येऊन बसली होती! म्हणजे एवढा वेळ ती मला बघत होती. अगदी जवळून!’’

 

ताडोबात मला भेटली आणखी एक अशीच डेअरडेव्हिलतरुणी. वनरक्षक शीतल कुडमेथे. चंद्रपूरचीच गोंड आदिवासी. लहान चणीची, चुणचुणीत. धावण्याचं वेड होतं. वनरक्षकाच्या परीक्षेत तीन किलोमीटर धावायचं होतं. स्पर्धा मानून सहभागी झाली आणि दुसरी आली. पहिल्या निवड यादीत नाव लागलं. तेसुद्धा खुल्या प्रवर्गात. पहिलीच पोस्टिंग ताडोबा रेंजमध्ये. वाघांच्या या घनगर्द अधिवासात कसं काम करायचं? सुरुवातीचे दिवस अक्षरश: रडून, भेदरून घालवले. त्याच शीतल आता जंगलाच्या कानाकोपऱ्यात बिनधास्त फिरतात. त्यांच्या मोटारसायकलची फायरिंग ऐकली की त्यांचे सहकारी कौतुकानं म्हणतात, ‘‘आली आमची लेडी सिंघम!’’

 

जंगलात दररोज गस्त घालणं हे वनरक्षक म्हणून शीतल यांचं मुख्य काम. वन्यप्राणी, वनस्पती यांची सुरक्षितता ही प्रमुख जबाबदारी. गस्तीदरम्यान वाघाशी सामना होण्याचा प्रसंग वारंवार येतो. एकदा शीतल आणि त्यांचा मदतनीस दुचाकीवरून निघाले होते. एका वळणावर रस्त्याच्या कडेला बसलेला वाघ त्यांना दिसला नाही. त्यांना येताना बघून वाघ दचकला. उठून त्यांच्या दिशेनं धावायला लागला. मदतनीसानं घाबरून पटकन ब्रेक दाबला आणि दुचाकी घसरली. दोघंही खाली पडली. तसा वाघ जागीच थबकला आणि पुन्हा मागे गेला. ही दोघं सावकाश उठली. दुचाकी उचलून माघारी जायला वळली. तसा वाघ पुन्हा यांच्या दिशेनं यायला लागला. दोघं लगेच जवळच्या मचाणावर चढली. वाघ काही वेळ त्यांच्याकडे बघत राहिला. नंतर निवांत चालत निघून गेला. तेव्हा कुठे दोघांच्या जिवात जीव आला.

 

पर्यटक गाड्यांची तपासणी करणं, गाड्या वाघाच्या अनावश्यक जवळ जाणार नाहीत याची काळजी घेणं, हासुद्धा शीतल यांच्या कामाचा भाग. या कामादरम्यान आलेला एक अनुभव त्या सांगतात, ‘‘छोटा मटका वाघ तलावात बसला होता. त्याला बघत पर्यटकांच्या जिप्सी गाड्या रस्त्यावर उभ्या होत्या. मी गाड्यांची तपासणी करत होते. अचानक मटका उठला आणि माझ्या दिशेनं यायला लागला. मी पटकन जवळच्या जिप्सीमध्ये चढले. तो गाडीजवळ आला. माझ्याकडे बघत उभा राहिला. वाघाच्या नजरेला थेट नजर भिडण्याचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग. नखशिखान्त शहारले! तो माझ्यापासून अवघ्या दीड-दोन फुटांवर उभा. मनात आणलं तर कधीही पंजा मारू शकत होता. पुढच्या गाड्यांनी जागा करून दिली. त्यामुळे ड्रायव्हरनं जिप्सी थोडी पुढे घेतली. तसा तोसुद्धा मागे गेला. पण तोवर मी त्याच्या नजरेआड झाले होते. मग तो गाडीखाली मला शोधू लागला. दिसले नाही. मग पुन्हा जाऊन पाण्यात बसला. माझी अवस्था अशी होती, की स्वत:च्या गाडीकडे चालत जाण्याची हिंमत झाली नाही. संध्याकाळी घरी गेल्यावर कुणाशी काहीच बोलले नाही. मूकपणे जेवले आणि झोपले.’’

 

आता मात्र शीतल यांचं वाघांवर प्रेम जडलंय. जंगल आवडायला लागलंय. डोळ्यांमध्ये नवी स्वप्नं उमलू लागलीत. आता त्यांना वनविभागाच्या परीक्षा देऊन अधिकारी बनायचंय आणि जंगलासाठी, वाघासाठी जोमात काम करायचंय.

 

ताडोबातल्या माया, माधुरी, सोनम वगैरे वाघिणी सर्वच व्याघ्रप्रेमींना ठाऊक आहेत. पण मनीषा, प्राजक्ता आणि शीतलसारख्या त्यांच्यासाठी काम करणाऱ्या वाघिणींचं कर्तृत्वही सर्वांसमोर यावं, यासाठीच हा लेखप्रपंच. या तिघींसारख्या आणखीही अनेक स्त्री अधिकारी, वनरक्षक वाघांच्या संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न करतायत. इथल्या १३ स्थानिक स्त्रिया गाईड म्हणून जंगल आणि पर्यटकांमधला दुवा बनतायत. फक्त एक दिवस जंगलात राहिलात, तर लक्षात येईल यांचं काम किती कठीण आहे ते. त्यांचं कौतुक व्हायला हवं. या सर्वच जंगलकन्यांच्या कामाला सलाम!

 

वाघाला मी रोज पाहाते. पण मन भरत नाही. किती देखणा, रुबाबदार प्राणी. तरी किती बिचारा! कोणीच त्याला पूर्णपणे समजावून घेऊ शकत नाही. ताडोबाविषयी, वाघाबद्दल कोणी काही नकारात्मक बोललं तर मला सहन होत नाही.मनीषा जाधव

 

निसर्गाबद्दलच्या असीम प्रेमामुळे मी वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात आले. वाघाचा अभ्यास करणं, त्याचा मागोवा घेणं रोमांचक तर आहेच, पण त्यात एक अवीट तृप्तीही आहे. म्हणून हे काम मी मनापासून करते. प्राजक्ता हुशंगाबादकर

 

माझी आता वाघाविषयीची भीती गेली. त्याच्यावर प्रेमच जडलंय. रोज दिसला तरी त्याला पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. मात्र वाघाच्या नजरेला थेट नजर भिडण्याचा क्षण नखशिखांत शहारून टाकणारा असतो. शीतल कुडमेथे

 

(लेखक इंडियन इकोलॉजिक फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आहेत.)

 

sonawane.anant@gmail.com

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

२९ जुलै - दिनविशेष

 

२९ जुलै रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१८५२: पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्रीशिक्षणाचे भारतीय उद्‌गाते म्हणून जोतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला.

 

१८७६: फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.

 

१९२०: जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.

 

१९२१: अॅडॉल्फ हिटलर नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टीचे नेते बनले.

 

१९४६: टाटा एअरलाइन्सचे एअर इंडिया असे नामकरण झाले.

 

१९४८: १२ वर्षांच्या काळखंडानंतर लंडन येथे १४व्या ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या.

 

१९५७: इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सीची स्थापना झाली.

 

१९८५: मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

१९८७: भारत-श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आल्या.

 

१९९७: हरनाम घोष कोलकाता, स्मृतिचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे या मराठी साहित्यिकास प्रथमच मिळाला.

 

२९ जुलै रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१८८३: इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांचा जन्म. (मृत्यू: २८ एप्रिल १९४५)

 

१८९८: नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ इसिदोरआयझॅक राबी यांचा जन्म.

 

१९०४: जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा जन्म. भातीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (मृत्यू: २९ नोव्हेंबर १९९३)

 

१९२२: लेखक आणि शिवशाहीर ब. मो. पुरंदरे यांचा जन्म.

 

१९२५: व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्म.

 

१९३७: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ डॅनियेल मॅकफॅडेन यांचा जन्म.

 

१९५३: भजन गायक अनुप जलोटा यांचा जन्म.

 

१९५९: हिंदी चित्रपट अभिनेता संजय दत्त यांचा जन्म.

 

१९८१: स्पॅनिश f१ रेस कार ड्रायव्हर फर्नांडो अलोन्सो यांचा जन्म.

 

 

२९ जुलै रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

२३८: रोमन सम्राट बाल्बिनस यांचे निधन.

 

११०८: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन. (जन्म: २३ मे १०५२)

 

१८९१: पं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन.

 

११०८ : फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.

 

१७८१: जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचे निधन. (जन्म: १४ सप्टेंबर १७१३)

 

१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंटव्हॅन गॉग यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८५३)

 

१८९१: बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८२०)

 

१९००: इटलीचा राजा उंबेर्तो पहिला यांचे निधन.

 

१९८७: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार बिभूतीभूशन मुखोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८९४)

 

१९९४: नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ डोरोथीक्रोफूट हॉजकिन यांचे निधन.

 

१९९६: स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९०९)

 

२००२: गायक व संगीतकार सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १९१९)

 

२००३: हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ  जॉनी वॉकर यांचे निधन. (जन्म: ११ नोव्हेंबर १९२६)

 

२००६: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२८)

 

२००९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१९)

 

२०१३: भारतीय क्रिकेटरपटू मुनीर हुसेन यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२९)

ACTIVE AND ADVANCED EDUCATION ALl TYPES:

************

२९ जुलै - ईश्वरचंद्र विद्यासागर स्मृतिदिन

************

 

जन्म - २६ सप्टेंबर १८२०

स्मृती - २९ जुलै १८९१

 

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि विधवा विवाहाच्या विरोधात आवाज उठवला.

 

१८३९ मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. १८४१ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी ते फोर्ट विलियम कॉलेज मध्ये संस्कृत विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले.

 

स्थानिक भाषा आणि मुलींच्या शिक्षणासाठी ईश्वरचंद्र यांनी शाळांची एक साखळी उघडली आणि कोलकात्यात मेट्रोपॉलिटन कॉलेजची स्थापना केली.

 

त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे विधवा पुर्नविवाहाचा कायदा १८५६ मध्ये संमत झाला.

 

विनम्र अभिवादन !

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

 

************

२९ जुलै - जे.आर.डी. टाटा जन्मदिन

************

 

जन्म - २९ जुलै १९०४ (फ्रान्स)

स्मृती - २९ नोव्हेंबर १९९३

 

जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.

 

टाटांचा जन्म २९ जुलै १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.

 

इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.

 

वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेअरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला.

 

टाटांच्या पुढाकाराने १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.

 

टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१ साली मुंबईत सुरू केले.

 

टाटांना त्यांच्या हयातीत अनेक पुरस्कार मिळाली. भारतीय केंद्रशासनातर्फे त्यांना १९५७ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर १९९२ साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले.

 

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

 

************

२९ जुलै - इटलीचा हुकूमशहा बेनितो मुसोलिनी जन्मदिन

************

 

जन्म - २९ जुलै १८८३ (इटली)

स्मृती - २८ एप्रिल १९४५ (इटली)

 

इटलीचा हुकूमशहा (१९२२४३) व फॅसिझम या तत्त्वप्रणालीचा प्रवर्तक. त्याचा जन्म सामान्य लोहाराच्या कुटुंबात दोव्हिया (प्रेदॉप्या) येथे झाला. त्याचे वडील आलेस्सांद्रो हे समाजवादी असून लोहारकाम करीत, तर आई रॉझा ही प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. फॉर्लीम्‌ पॉपॉली येथील शाळेतून मुसोलिनीने अध्यापनाची पदविका मिळविली. शिक्षक म्हणून काही दिवस काम केल्यानंतर तो स्वित्झर्लंडला पळून गेला परंतु खोट्या पारपत्रामुळे त्याला इटलीला परतावे लागले.

 

या काळात त्याने कार्ल मार्क्स, सोरेल, प्येअर प्रूदाँ, लुई ब्लांकी, प्यॉटर क्रपॉटक्यिन इ. विचारवंतांचे साहित्य वाचले आणि तो कट्टर समाजवादी कामगारनेता बनला, राजकीय प्रचारासाठी त्याने ट्रेन्टमधील ला लोता दी क्लास या प्रांतिक वृत्तपत्राचे संपादकत्व स्वीकारले. यानंतर त्याची समाजवादी पक्षाचा संचालक म्हणून निवड झाली आणि तो लवकरच अवंती या मिलान मधील वर्तमानपत्राचा संपादक झाला. त्याच्या परखड, सडेतोड लेखनामुळे अवंतीचा खप चौपटीने वाढला.

 

पहिल्या महायुद्धात इटलीने तटस्थ राहावे, ही आधीची भूमिका सोडून त्याने देशाच्या महायुद्धप्रवेशाचे समर्थन केले. परिणामतः समाजवादी पक्ष व अवंती यांमधून त्याची हकालपट्टी झाली. त्यानंतर त्याने आपल्या विचारांच्या प्रसारार्थ पोपोलो द इतालिया हे स्वतंत्र वृत्तपत्र काढले. या सुमारास त्याने वडिलांच्या नायना ग्विदी या विधवा प्रेयसीच्या राशेली या कनिष्ठ मुलीबरोबर लग्न केले, परंतु तत्पूर्वीच तो तिच्याबरोबर १९०९ पासून राहत असे. त्यांना पाच मुले झाली.

 

राशेली या पत्नीशिवाय लेदा राफानेल्ली, मार्गेरेता सार्फाती, इदा दॉल्सर, आंजेला कर्ती, क्लॅरेता पेतॅशी इ. स्त्रियांबरोबरची त्याची प्रेमप्रकरणे गाजली. क्लेरेता ही अखेरपर्यंत त्याच्याबरोबर होती.

 

मुसोलिनीने मिलान येथे २३ मार्च १९१९ रोजी फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. त्यानंतर १९२१ मध्ये तो संसदेवर निवडून आला. आंदोलनाचा मार्ग अवलंबून फॅसिस्टांनी बोलोन्या आणि मिलान या शहरांचा ताबा घेतला. प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या हिंसक कृत्यांना आळा घालण्यास असमर्थ ठरत होती. अशा वेळी नेपल्स येथे फॅसिस्टांचे अधिवेशन भरले. त्यात लूईजी फाक्ता सरकारच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. फॅसिस्टांना कारखानदारांसह उच्च मध्यमवर्गीयांचा पाठिंबा मिळाला. तेव्हा त्यांनी रोमवर मोर्चा काढला.

 

राजाने लष्करी कायदा पुकारण्याऐवजी फाक्ताचा राजीनामा घेऊन मुसोलिनीला नवीन मंत्रिमंडळ बनविण्याची आज्ञा केली. त्याने फॅसिस्ट व राष्ट्रीय पक्षाचे संयुक्त सरकार बनवले. राजाने व संसदेने मुसोलिनीला पंतप्रधान करून सर्वाधिकार दिले. सुरुवातीस त्याने घटनात्मक चौकटीतून शांतता प्रस्थापित करून अंतर्गत कारभारात फॅसिस्ट अधिकारी नेमले व राजाकडून आपल्या लष्करी संघटनेला मान्यता मिळवली. हळूहळू मुसोलिनीने नवा मतदानविषयक कायदा संमत करून, संसदेत आपल्या पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित केले.

 

फॅसिस्ट दहशतवादाला समाजवादी सदस्य गीया जाकोमो मात्तेऑत्ती याने फॅसिस्टी एक्स्पोझड नावाच्या ग्रंथातून गुन्ह्यांची यादी सादर करून कडवा विरोध केला, तेव्हा त्याचा खून करण्यात आला. काही दिवस मुसोलिनीच्या लोकप्रियतेला धोका निर्माण झाला. तेव्हा मुसोलिनीने वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादून विरोधकांच्या सभांवर बंदी घातली.

 

उदारमतवादी आणि कम्युनिस्ट यांनी यावेळी उग्र निदर्शने केली; पण ती कठोरपणे मोडण्यात आली. अखेर मुसोलिनीने संसदेकडून ३१ जानेवारी १९२६ रोजी एका अधिकृत कायद्याने राज्य करण्याचा संपूर्ण अधिकार मिळविला आणि तत्काळ त्याने संप आणि टाळेबंदी अवैध ठरवून फॅसिस्ट युवक संघटना स्थापल्या. त्याच्या डोळ्यासमोर आर्थिक पुनर्रचनेवर आधारित इटलीचे श्रेणीसत्ताक राज्य स्थापण करण्याचे ध्येय होते.

 

लोकशाही विरोधी भूमिकेमुळे त्याच्यावर तीन-चार प्राणघातक पण अयशस्वी हल्ले झाले. त्याने एका कायद्याने कामगारांचे कामाचे तास वाढवून नगरपालिका, प्रांत आणि पुढे सार्वत्रिक निवडणुका रद्द केल्या आणि पोलीस व लष्करी यंत्रणेत स्थायी सेवेवर फॅसिस्ट स्वयंसेवक नेमले. १९२८ मध्ये फॅसिस्ट ग्रँड कौन्सिल (पक्षाचे वरिष्ठ मंडळ) हीच शासनाची सूत्रधार होती आणि मुसोलिनी हा सर्वसत्ताधारी होता.

 

परराष्ट्रीय धोरणात मुसोलिनीच्या डोळ्यापुढे इटलीचे साम्राज्य-रोमन एंपायर-ही कल्पना असल्यामुळे साम्राज्यविस्तारास त्याने सुरुवात केली. इथिओपियावर स्वारी केली आणि ते इटालियन साम्राज्यात समाविष्ट केले.  १९३९ मध्ये त्याने ॲबिसिनिया पादाक्रांत केला. प्रारंभी त्याला हिटलरविषयी आस्था नव्हती; परंतु राष्ट्रसंघाने इटलीचे सभासदत्व रद्द केले आणि त्याच वेळी मुसोलिनीने स्पॅनिश यादवी युद्धात बंडखोरांचा नेता फ्रँको याला सहकार्

 

य दिले. तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स या देशांशी त्याचे वैर निर्माण झाले. परिणामतः त्याला जर्मनीवर अवलंबून राहणे क्रमप्राप्त झाले.

 

साहजिकच तो जागतिक परिस्थितीला अनुसरून हिटलरच्या पूर्ण कच्छपी गेला आणि हिटलरच्या ज्यू द्वेष व अन्य धोरणास त्याने संपूर्ण पाठिंबा दिला. इटलीची लष्करी तयारी नसतांनाही त्याने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतली. अमेरिकेच्या युद्धप्रवेशानंतर इटलीच्या सैन्याची पीछेहाट होऊ लागली. महायुद्ध आणि साम्राज्यवादी धोरण यांमुळे जनसामान्यावरील कराचा बोजा वाढला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची गळचेपी झाली. तेंव्हा संत्रस्त जनतेने मुसोलिनीच्या राजीनाम्याची मागणी केली. फॅसिस्ट पक्षात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले.

 

आवाक्याबाहेरच्या अंतर्गत परिस्थितीचा विचार करून मुसोलिनीने राजीनामा दिला. त्याला व त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली; परंतु जर्मन सैनिकांनी त्यांची सुटका केली. जर्मनव्याप्त उत्तर इटलीत काही दिवस फॅसिस्ट पक्षाद्वारे त्याने राज्य केले; परंतु जर्मनीचा पराभव होताच तो निष्प्रभ झाला आणि २८ एप्रिल १९४५ रोजी त्याने स्वित्झर्लंडमध्ये पळून जाण्याची योजना आखली; पण विरोधकांनी त्याला पकडले आणि दाँग्गा (कोमो) येथे क्लेरेता या प्रेयसीसह त्याला गोळ्या घालून ठार मारले.

 

यूरोपीय राजकीय संस्कृतीच्या संदर्भात फॅसिझमचा पराभव झाला. प्राचीन रोमन साम्राज्याचे स्वप्न आणि त्याची उग्र राष्ट्रवाद व सैनिकी सामर्थ्य ही साधने विसाव्या शतकातील यूरोपीय संस्कृतीशी विसंगत ठरणारी होती; कारण या शतकात ब्रिटीशादिकांची साम्राज्येच खिळखिळी होत आली होती. प्रादेशिक विस्तारवाद राष्ट्रराज्याच्या उदयामुळे अशक्यप्राय आणि अन्याय्य ठरत होती. खुद्द इटली लष्करी दृष्ट्या पुरेसा सामर्थ्यवानही नव्हता.

 

इतिहासाचा रोख व दिशा यांच्या अज्ञानाच्या त्या निदर्शक होत्या. हुकूमशाही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीचे शेवटचे एक नमुनेदार स्वरूप मुसोलिनीच्या चरित्रातून दिसून येतो. तथापि त्यातही समाजवादाकडून अवचतिपणे हुकूमशाही महत्त्वाकांक्षेकडे झालेले त्याचे परिवर्तन हे त्याच्या चरित्रातील एक कायमचे रहस्य ठरेल. मात्र मुसोलीनीप्रणित फॅसिसिझमच्या प्रवृत्तीला लोकशाही मूल्यांनीच शह देता येईल, हेही जागतिक इतिहासात त्याच्याच चरित्राने सुचवून ठेवले आहे. त्याचे विविध वृत्तपत्रांतून कामगार चळवळ व समाजवादांचे समर्थन करणारे तसेच समाजवाद विरोधी व राष्ट्रीयत्वाचे प्रतिपादन करणारे - फॅसिस्ट प्रवृत्तीचा प्रसार करणारे प्रखर व जहाल लेख प्रसिद्ध झाले. त्याने आत्मचरित्र (१९२८) लिहिले. त्याची पत्रे पुढे प्रसिद्ध झाली.

 

~ सु. र. देशपांडे ~

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

************

 

************

२९ जुलै -  शास्त्रज्ञ चार्ल्स विल्यम बीबे जन्मदिन

************

 

जन्म - २९ जुलै १८७७ (न्यूयॉर्क,US)

स्मृती - ४ जून १९६२

 

चार्ल्स विल्यम बीबे एक अमेरिकन निसर्गवादी, पक्षीशास्त्रज्ञ, सागरी जीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, अन्वेषक आणि लेखक होते. न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटीसाठी त्यांनी घेतलेल्या असंख्य मोहीमा बद्दल, बाथफिअर मधील त्यांचे खोल डुबकी आणि शैक्षणिक आणि लोकप्रिय प्रेक्षकांसाठी विपुल वैज्ञानिक लिखाण यासाठी त्यांना आठवते.

 

न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन मध्ये जन्मलेल्या आणि न्यू जर्सीच्या पूर्व ऑरेंज मध्ये वाढलेल्या बीबीने तत्कालीन नव्याने उघडल्या गेलेल्या न्यूयॉर्क झूलॉजिकल पार्क मध्ये काम करण्यासाठी पदवी मिळवण्यापूर्वी महाविद्यालय सोडले, जिथे त्याला प्राणीसंग्रहालयाच्या पक्ष्यांची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली. 

 

त्यांनी प्राणीसंग्रहालयातील आपल्या निवासस्थानाची रचना करण्याच्या कौशल्याने प्रथमच प्राणीसंग्रहालयाच्या कामात त्वरेने स्वत:ला वेगळे केले आणि लवकरच जगातील प्राणीक्षेत्राचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी जगभरातील वाढत्या लांबीच्या संशोधन मोहिमेमुळे लोकप्रिय आणि शैक्षणिक प्रेक्षकांसाठी मोठ्या प्रमाणात लेखनाचा आधार तयार झाला, ज्यात अ मोनोग्राफ ऑफ फेजंट्स नावाच्या त्यांच्या फेयोर मोहिमेचा आणि १९१८ ते १९२२ या काळात ते चार खंडांत प्रकाशित झाले. त्याला टुफ्ट्स आणि कोलगेट विद्यापीठातून मानद डॉक्टरेट मिळाली.

 

संकलक - दिपक तरवडे

 https://m.facebook.com/vidnyandinvishesh

 

************

 

************

        २९ जुलै - नासाची स्थापना

************

 

स्थापना - २९ जुलै १९५८

 

नासा (नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. १९५८ साली या संस्थेची स्थापना झाली.

 

कोणे एके काळी, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जागतिक स्तरावर फक्त दोनच महासत्ता अस्तित्वात होत्या. त्या दोन महासत्ता म्हणजे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका. त्या दोघांनाही दुसऱ्यापेक्षा जास्त बलशाली व आधुनिक देश बनवण्याची इच्छा होती. साहजिकच त्यांच्यात अतिशय आक्रमक अशी स्पर्धा सुरू झाली ज्याचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रात सुरू झाला, खासकरून संरक्षण व अवकाश संशोधनाच्या विभागात.

 

ऑक्टोबर १९५७ मध्ये सोव्हियत संघाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी स्पुटनिक उपग्रह अंतराळात लाँच केला तेव्हा तो आपल्या या अभियानाबरोबरच अंतराळ स्पर्धेत अमेरिकेपेक्षा बराच पुढे निघून गेला. अर्थात शीतयुद्ध अजूनही सुरूच होते आणि कोणत्याही प्रकारे सोव्हियत संघाचं हे पुढे जाणं कमी करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरू होते.

 

अमेरिकेने आधीच एक उपग्रह तयार केला होता. अर्थात त्याची निर्मिती नासाच्या कार्यक्रमांतर्गत झालेली नव्हती. पण, अंतराळ स्पर्धेत सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी अमेरिका सुनियोजित अंतराळ संस्था बनवण्याच्या मार्गावर आहे, हे त्यावेळी स्पष्ट दिसत होतं.

 

सोव्हियत संघाच्या अंतराळ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसनआवर आणि सिनेटर लिण्डन बी जॉन्सन यांनी नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) स्थापनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याला वेग दिला. अर्थात असं असूनही नासाला अस्तित्वात येण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागला आणि २९ जुलै १९५८ मध्ये ती अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत नासाने अनेक यशस्वी अंतराळ योजना राबवल्या आहेत.

 

नासा ही अमेरिकेची अवकाश संशोधन करणारी जगविख्यात संस्था. ही संस्था अमेरिकेची असली तरी या संस्थेसाठी भारतासहित जगभरातील शास्त्रज्ञ काम करीत असतात. १९५८ साली या संस्थेची स्थापना झाली. नासाने आपलं पहिलं अंतराळ यान एक्सप्लोअरर-१ हे १९५८ मध्ये लाँच केलं. या अंतराळ संशोधन संस्थेने आतापर्यंत अनेक यशस्वी योजना राबवल्या असून चंद्रावर पहिलं मानवी पाऊल ठेवण्याचं श्रेय त्याच देशाला जातं.

 

विराट विश्‍वाची आभाळमायानेमकी कशी आहे त्याचा प्रत्यक्षधांडोळा घेणारा एक शक्तिशाली डोळा१९९० मध्ये नासाया अमेरिकेचा अवकाशविज्ञान संस्थेने अवकाशात पाठवला आणि त्याने देदीप्यमान कामगिरी करून विश्‍वातील ग्रह, तारे, दीर्घिका, तेजोमेघ या सर्वांची लाखो तेजस्वी छायाचित्रं पृथ्वीकडे पाठवली.

 

आता मंगळावर जीवन आहे की नाही यासाठी या संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात नासा ही जगात अग्रस्थानी आहे.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

 

************

      २९ जुलै - जागतिक व्याघ्र दिन

************

 

जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस "जागतिक व्याघ्र दिन" म्हणून घोषित करण्यात आला.

 

या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.

 

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे एक लाख वाघ होते. सध्या सुमारे ३०६२ ते ३९४८ इतकी असल्याचा अंदाज आहे. यापैकी सुमारे २००० वाघ भारतीय उपखंडात आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व भारतासाठी विशेष आहे. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.

 

सरकारी पातळीवरून जागतिक व्याघ्रदिनाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जातात. तसेच व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था सुद्धा या निमित्ताने जनजागृतीसाठी कार्यक्रम करतात.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ - विकिपीडिया

 

************

ACTIVE AND ADVANCED EDUCATION ALl TYPES:

************

२९ जुलै - अभिनेता जॉनी वॉकर स्मृतिदिन

************

 

जन्म - ११ नोव्हेंबर १९२०

स्मृती - २९ जुलै २००३

 

हिंदी चित्रपट सृष्टीतील हास्याचा बादशहा जॉनी वॉकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२० रोजी झाला.

 

हिंदी चित्रपट सृष्टीत हास्य अभिनेता म्हणून स्थान मिळविणारा पहिला अभिनेता म्हणून बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ़ जॉनी वॉकर यांचे नाव व व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. सदाबहार व्यक्तिमत्व असणार्या या कलाकाराने विनोदी अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत अढळ पद संपादन केले आहे.

 

जॉनी वॉकर यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थितीत गेलं. जॉनी वॉकर यांनी सुरुवातीच्या काळात बेस्ट मध्ये बस कंडक्टर म्हणून काम केले होते. बसमध्ये प्रवाशांबरोबर मजामस्ती करुन त्यांचे मनोरंजन करत होते. हे पाहून बलराज साहनी प्रभावित झाले होते. बलराज साहनी यांनी त्यांची भेट गुरु दत्त यांच्याशी करुन दिली.

 

१९५० साली आलेल्या आखरी पैगाम' द्वारे ते रसिकांच्या पुढे आले. त्याच वर्षी नवकेतनचा बाजीझळकला आणि जॉनी वॉकर यांनी मागे वळून पाहिले नाही.  बाजीमधील त्यांच्या दारुड्याच्या अभिनयामुळे खूष होऊन गुरुदत्त यांनी त्यांना 'जॉनी वॉकर' हे जगप्रसिद्ध व्हिस्कीच्या ब्रँडचे नाव दिले आणि बद्रुद्दीन जमालुद्दीन काझीचा 'जॉनी वॉकर' झाला.

 

बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाच्या मधुमतीत जॉनी वॉकर यांनी दारूड्याची भूमिका एवढी अप्रतिम केली की समीक्षकांनी त्यांना त्या वर्षाचा सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार बहाल केला गेला. जॉनी वॉकर यांनी आयुष्यात कधी दारूला स्पर्श ही केला नाही पण दारूड्याचे बेअरींग एवढे झकास सांभाळले की बिमलदा म्हणाले 'हा माणूस दारूला स्पर्श देखील करीत नाही या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही.

 

देव आनंद यांच्या सोबत 'सीआयडी'त तर त्यांनी कमाल केली होती. 'ऐ दिल है मुश्कील जीना यहां जरा हठ के जरा बच के ये है बॉंम्बे मेरी जानहे गाणं तर त्या वर्षीचं बिनाका टॉपचं गाणं ठरलं. वॉकर यांची विनोदातील लोकप्रियता एवढी होती की जॉनी वॉकरनावाचा एक सिनेमा पन्नासच्या दशकात आला होता यात त्याने मुख्य भूमिका केली होती. श्रीमंत मेहुणा पाहिजे या मराठी सिनेमात देखील त्यांनी भूमिका केली होती. जवळपास प्रत्येक सिनेमात वॉकर यांच्यावर  गाणं चित्रित केलेले असायचं.

 

आपल्या ३५ वर्ष्याच्या करीयर मध्ये जॉनी वॉकर यांनी ३२५ चित्रपटात काम केले.  मिस्टर कार्टून एम.ए., खोटा पैसा, मिस्टर जॉन, नया पैसा, रिक्षावाला आदी चित्रपटात जॉनी वॉकर यांनी नायक म्हणून काम केले होते. जॉनी  वॉकर यांनी काळाची पावले ओळखून सत्तरच्या दशकात निवृत्ती पत्करली पण हृषिकेश मुखर्जी यांच्या आग्रहावरून 'आनंद'  गुलज़ार यांच्या आग्रहावरून 'चाची ४२०' या चित्रपटात काम केले होते.

 

जॉनी वॉकर यांचे २९ जुलै २००३ रोजी निधन झाले.

 

जॉनी वॉकर यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२९ जुलै - गझल गायक अनुप जलोटा यांचा वाढदिवस

************

 

जन्म - २९ जुलै १९५३ (नैनीताल)

 

भजन आणि गझल गायक अनुप जलोटा यांचा आज वाढदिवस.

 

अनुप जलोटा यांचे वडिल पुरूषोत्तम जलोटा पंजाबच्या प्रख्यात शाम चौरासी घराण्याशी संबंधीत होते. जलोटा यांनी वयाच्या सातव्या व्या वर्षी गायनाला सुरूवात केली. अनुप जलोटा यांचे शिक्षण लखनऊच्या भातखंडे म्युझिक इंस्टीट्यूट मध्ये झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुप जलोटा यांनी मुंबई मध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी भरपूर संघर्ष केला.

 

अनुप जलोटा यांनी आकाशवाणी वर कोरस गायक म्हणून करियरला सुरवात केली. मुंबईत आल्यावर त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांना म्युझिक कंपन्यांकडून गाण्यांची ऑफर मिळाली. त्यावेळी एखादीच अशी म्युझिक कंपनी असेल ज्यासोबत त्यांनी काम केलं नाही.

 

ऐसी लागी लगन, मैं नहीं माखन खायो, रंग दे चुनरिया, जग में सुंदर दो नाम, चदरिया झीनी रे झीनी; सारखी भजनं अतिशय लोकप्रिय झाली. भजनांना मंदिराच्या दारापासून मंचापर्यंत आणण्याचं काम अनुप जलोटा यांनी केलं. ते अनेक वाद्ये वाजवतात. तबला वादक झाकिर हुसैन आणि संगीतकार गुलाम अली यांच्या सोबत परदेशात देखील अनुप जलोटा यांनी कार्यक्रम केले.

 

अनुप जलोटा यांनी पहिलं लग्न आपली गुजराती शिष्या सोनाली शेठ सोबत केलं. या जोडीने गायन क्षेत्रात 'अनूप-सोलानी' नावाने खूप नाव कमावलं. अनुप जलोटा यांचा दुसरा विवाह कुटुंबियांच्या सहमतीने बीना भाटीयाशी केलं. मात्र त्यांचं लवकरच घटस्फोट झाला. तिसरं लग्न अनुप जलोटा यांनी १९९४ साली मेधा गुजराल सोबत केले. मेधा माजी पंतप्रधान आय के गुजराल यांची भाची आणि दिग्दर्शक शेखर कपूरची पहिली पत्नी होती.

 

मेधा गुजराल यांचे २५ नोव्हेंबर २०१४ मध्ये न्यूयॉर्क मध्ये हार्ट अटॅक आणि किडनी ट्रान्सप्लान्ट दरम्यान निधन झालं. अनुप जलोटा-मेधा गुजराल यांना एक मुलगा आहे. त्याने नाव आर्यमन आहे.

 

दोन वर्षापूर्वी ते बिग बॉस मध्ये दिसले होते. अनुप जलोटा यांनी सितारा ग्रुप नावाची फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केली. याच्या अंतर्गत त्यांनी हिंदी आणि भोजपुरी सिनेमे तयार केले. यामध्ये बनी चौधरी त्यांची पार्टनर होती.

 

भारत सरकारने अनूप जलोटा यांना २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

 

अनुप जलोटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२९ जुलै - अभिनेता संजय दत्त चा वाढदिवस

************

 

जन्म : २९ जुलै १९५९ (मुंबई)

 

अभिनेता संजय दत्त जी को जन्मदिन की हार्दिक बधाई !

 

संजय दत्त एक भारतीय अभिनेता और फिल्म निर्माता है, जिन्हे हिंदी सिनेमा मे उनके काम के लिए जाना जाता है। दत्त प्रसिद्ध फिल्म कलाकार एवं राजनीतिज्ञ सुनील दत्त अभिनेत्री नर्गिस के पुत्र हैं। उन्होंने हिंदी फिल्मो मे सन १९८१ मे काम करना आरम्भ किया। उसके बाद उन्होंने कई प्रसिद्ध हिन्दी फ़िल्मों मे अभिनय किया। उन्होंने फ़िल्मों में प्रेमी, हास्य जैसे अभिनय भी किये और अपराधी, ठग और पुलीस अधिकारी का अभिनय भी किया जिस्के लिए अपने प्रशंसकों और फिल्म समालोचकों से अभूतपूर्व प्रशंसा प्राप्त की।

 

दत्त को अप्रैल १९९३ में आतंकवादियों की सहायता करना, नौ मिमी पिस्टल को अवैध तरिके से अपने घर पर रखने और एके-छप्पन रायफल रखने के आरोप में आतंकवादी तथा विघटनकारी क्रियाकलाप (निवारण) अधिनियम (टाडा) के तहत गिरफ्तार किया गया। १८ माह जेल की सजा काटने के बाद, उन्हें अप्रैल १९९५ में जमानत मिल गई। जुलाई २००७ में उन्हें छः वर्ष सश्रम कारावास की सजा सुनाई गई। भारत के सर्वोच्य न्यायालय ने २१ मार्च २०१३ के अपने एक निर्णय में उन्हें १९९३ के मुम्बई बम विस्फोट मामले में पाँच वर्ष की सश्रम कारावास की सजा सुनाई।

 

दत्त का जन्म २९ जुलाई १९५९ को बॉलीवुड सितारों सुनील दत्त और नर्गिस के घर हुआ। उनकी दो बहनें हैं- प्रिया दत्त और नम्रता दत्त। उनकी शिक्षा कसौली के पास लॉरेंस स्कूल, सनावर में हुई। उनकी माँ का मई १९८१ में, उनकी पदार्पण फ़िल्म के प्रथम प्रदर्शन से तीन दिन पहले निधन हो गया। उन्हें फ़िल्मों में उनके विभिन्न अभिनयों सहित उनके विवादित कार्यों मादक पदार्थों के सेवन आदि के लिए जाना जाता है। उन्हें १९८२ में अवैध मादक पदार्थ रखने के आरोप में ५ माह की कारावास की सजा हुई थी। हवालात से निकलने के बाद उन्होंने २ वर्ष संयुक्त राज्य अमेरिका में व्यतीत किये। उनका अमेरिका में अधिकतर समय टेक्सास रेहाब क्लिनिक (टेक्सास पुनर्वसन क्लिनिक) में गुजरा। उसके बाद उन्होंने पुनः भारत आकर अपने कैरियर की ओर ध्यान दिया।

 

दत्त ने १९८७ में ऋचा शर्मा के साथ विवाह किया। शर्मा की ब्रेन ट्यूमर (मस्तिष्क की गाँठ) के कारण १९९६ में मृत्यु हो गई। इस दम्पति के घर में १९८८ में एक लड़की ने जन्म लिया जिसका नाम त्रिशाला है और वो दत्त की पत्नी की मृत्यु और उनकी हिरासत के बाद अपने नाना-नानी के साथ संयुक्त राज्य अमेरिका में रहती है। दत्त का दूसरा विवाह मॉडल रिया पिल्लई के साथ १९९८ में हुआ। २००५ में उनका तलाक हो गया। दत्त ने दो वर्ष डेटिंग करने के बाद २००८ में गोवा में एक निजी दावत में मान्यता (जन्म का नाम: दिलनवाज़ शेख) के साथ विवाह किया। २१ अक्टूबर २०१० वो दो जुड़वा बच्चों के पिता बने जिनमें लड़के का नाम शहरान और लड़की का नाम इक़रा रखा।

 

फ़िल्मी जीवन :

 

एक बाल कलाकार के रूप में उन्होंने अपने पिता द्वारा निर्मित फ़िल्म रेशमा और शेरा में १९७२ में पदार्पण किया; इस फ़िल्म में वो एक कवाली गायक के रूप में दिखाई दिये। दत्त ने १९८१ में रॉकी से बॉलीवुड मे पदार्पण किया। वो १९८२ की सर्वाधिक कमाई वाली फ़िल्म विधाता से फ़िल्मी-सितारे बने। १९८५ में उनकी फ़िल्म जान की बाज़ी प्रदर्शित हुई। इसके अलावा दत्त ने कई सफल फ़िल्मों जैसे मैं आवारा हूँ, जीवा, मेरा हक, ईमानदार, इनाम दस हज़ारजीते हैं शान से, मर्दों वाली बात, इलाका, हम भी इंसान हैं, कानून अपना अपना, और ताकतवर में अभिनय किया।

 

वर्ष १९८६ की फ़िल्म नाम से उन्होंने समालोचकों से भी प्रशंसा प्राप्त की और विकी कपूर के रूप में अपनी संवेदनशील अग्रणी भूमिका के लिए प्रशंसा अर्जित की। उन्होंने महेश भट्ट की फ़िल्म कब्ज़ा और जे पी दत्ता की फ़िल्म हथियार के लिए भी समालोचकों से प्रशंसा प्राप्त की।

 

१९९९ का वर्ष उनके लिये वापसी का दौर रहा। उसी वर्ष उनकी फ़िल्म वास्तव के लिये उन्हें पहला फ़िल्म फेयर पुरस्कार मिला। उनकी सबसे सफल फ़िल्म लगे रहो मुन्ना भाई २००६ के उत्तरार्द्ध में प्रदर्शित हुई। इस फ़िल्म के लिए उन्हें उनके मुन्ना भाई के अभिनय के लिए विभिन्न पुरस्कारों सहित भारत के तत्कालीन प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंह से भी पुरस्कार मिला।

 

विवाद :

 

मुम्बई में १९९३ में श्रृंखलाबद्ध बम विस्फोट हुए। संजय दत्त बॉलीवुड के उन कुछ लोगों में से एक थे, जिनपर अप्रैल १९९३ के बम विस्फोटों में शामील होने का आरोप लगा। उन्हें टाडा नियमों के अनुसार गिरफ्तार किया गया। दत्त को भारतीय उच्च न्यायालय से अक्टूबर १९९५ में जमानत मिल गई लेकिन दिसम्बर १९९५ में उन्हें पुनः गिरफ्तार कर लिया गया। अप्रैल १९९७ में उन्हें पुनः जमानत में मुक्त कर दिया गया।

 

यह मामला २००६ में न्यायालय में आया और दत्त को रियाज़ सिद्दिक़ी, जो मुम्

 

बई बम विस्फोटों के दोषी पाये गये, के साथ अबु सलेम से अपने घर पर हथियारों को रखने का दोषी पाया गया। यह दावा किया गया कि हथियार आतंकवादियों से जुड़े हथियारों की एक बड़ी खेप का हिस्सा थे। २००६-२००७ के दौरान दत्त को सात माह ऑर्थर रोड जेल और अपराधों के लिए तीन अवसरों पर पुणे जेल में जाना पड़ा।

 

१६मई २०१३ को उन्होंने मुंबई पुलिस को आत्मसमर्पण कर दिया। संजय दत्त को यरवदा केंद्रीय कारागार में रखा गया। उन्हें २१ दिसंबर २०१३ में पैरोल मिल गई। पैरोल को मार्च २०१४तक तीन बार बढ़ाया गया, जिस पर बंबई उच्च न्यायालय ने चिंता जताई और महाराष्ट्र सरकार से पैरोल के कानून में संशोधन करने का प्रस्ताव दिया। वह पेरोल समाप्त होने के बाद यरवदा जेल लौट आये। २४ दिसंबर को यरवदा सेंट्रल जेल अधिकारियों द्वारा दी गई दो हफ्ते की फरलो (थोड़े दिन की छुट्टी) पर संजय बाहर रहे। उन्होंने कहा, "मेरा १८ किलोग्राम कम हो गया है। अब अगर मैं और अधिक वजन गिरा, तो शायद गायब ही हो जाऊंगा।" २५ फरवरी २०१६ को संजय दत्त को उनके अच्छे व्यवहार कि चलते जेल की अवधि पूरी होने से पूर्व रिहा कर दिया गया।

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

 

************

२९ जुलै - गायीका राधा मंगेशकर चा वाढदिवस

************

 

जन्म - २९ जुलै १९८१ (मुंबई)

 

गायीका राधा मंगेशकरचा आज वाढदिवस.

 

भारतीयांच्या अनेक वर्षे घर करुन असलेले मंगेशकर घराणे, लता दिदी, आशाताई, उषाताई त्यांचे बंधू हृदयनाथ. या चारही भावंडांची तुलना होणेच शक्य नाही. त्यांच्याच पुढच्या पिढीत हा संगीताचा वारसा अगदी समर्थपणे पेलत आहे राधा मंगेशकर ज्या प्रकारे लता दिदींनी पार्श्वसंगीतात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे.

 

राधाचा ओढा मात्र अधिकाधिक आहे तो रंगमंचीय सादरीकरणावर. तिला लोकांसमोर, त्यांच्या समक्ष गायला आवडतं. त्याला कारणही तसचं आहे. वयाच्या नवव्या वर्षी पहिल्यांदा ती रसिकांसमोर आली. त्यानंतर ती सातत्याने रसिकांसमोर गात आहे. आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून तिने रसिकांना आपल्या दैवी सुरांनी मंत्रमुग्ध केलं आहे.

 

रसिकांना सतत काहीना काही वेगळं द्यावं. त्यांनाही नवनव्या संगीतपरंपरांची ओळख व्हावी, गोडी निर्माण व्हावी असा तिचा प्रयत्न असतो. सध्या तिने दोन कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. हे कार्यक्रम भारतात चांगलेच लोकप्रिय झालेले आहेत. आपल्या या कार्यक्रमांचा, त्याच्यासाठी ती घेत असलेल्या कष्टांचा तिला अभिमान आहे. तो अभिमान तिच्या बोलण्यातूनही जाणवत असतो.

 

आपल्या कार्यक्रमांवरचे तिचे प्रेम त्यासाठी ती करत असलेले प्रयत्न, त्यातून लोकांना मिळणार असलेल्या आनंदाविषयी ती सजग आहे. या कार्यक्रमांविषयी बोलत असतांना तिचा उत्साहही जाणवत असतो. आता तर सोशल मिडीयाच्या नव्या तंत्राच्या आधारेही ती लोकांसमोर पोहोचत आहे.

 

राधाच ते दोन कार्यक्रम म्हणजे मीरा सूर कबीर व रविंद्र संगीत. या दोन्ही कार्यक्रमा मध्ये वैविध्य असलं तरी या संगीतांची तरलता, त्याची संवेदनशीलता तिला भावते. जो आनंद एक गायिका म्हणून आपल्याला येतो तो रसिकांनाही यावा अशी तिची प्रामाणिक ईच्छा असते. मीरा सूर कबीर या कार्यक्रमात तिने संत मीराबाई, सूरदास व कबीर यांच्या रचना लोकांसमोर आणल्या आहेत.

 

मानवी जीवनाविषयीची त्यांची मतं, स्वत:च्या कल्याणासाठी लोकांनी काय करायला हवे याचा संदेश देत देत त्यांनी आपल्यासमोर त्या काळातली विलक्षण प्रभावी अशी काव्यरचनाही सादर केल्या आहेत. त्यांच्या या काव्याला स्वरांचं कोंदण देऊन राधाने हा आनंद द्विगुणित केला आहे. राधाच्या दुसऱ्या कार्यक्रमातून तिने रविंद्र संगीताची ओळख करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

रविंद्र संगीत म्हणजे रविंद्रनाथ टागोर यांनी रुढ केलेलं संगीत. हे संगीत म्हणजे पश्चिम बंगालचा मानबिंदु आहे. महाराष्ट्रात मात्र रविंद्रनाथा विषयीची माहिती ही मर्यादित स्वरुपाची आहे. त्यात त्यांच्या संगीताची माहिती फारच कमी, मात्र मराठी माणसांच्या मनात रविंद्रनाथा विषयी आदराचंच स्थान आहे. त्यामुळे हा खास कार्यक्रम तयार केल्याचं ती सांगते. या कार्यक्रमाला केवळ मराठी माणसचं नव्हे तर बंगाली लोकही अगदी आवर्जून येत असतात. त्यांची प्रतिक्रियाही राधाला चांगली मिळते. त्यांना हा कार्यक्रम खास मराठी माणसांसाठी आणल्याचा अभिमान आहे. या दोन गाण्यांबरोबरच राधा आता अधिकाधिक टेक्नोसॅव्ही होण्याचा प्रयत्न करत आहे.

 

यूटयुबवर तिची चार गाणी रसिकांना फारच आवडत आहेत. ही गाणी जुनी असली तरी ती खास वेगळया शैलीत मांडण्यात आली आहेत. त्यात गाजलेली गाणी केवळ एकाच वाद्याच्या सहाय्याने सादर करण्याचा तिचा प्रयोगही चांगलाच गाजत आहे. यूटयुबवर तिने पियानोच्या साथीने 'लग जा गले' आणि 'माझ्या डोळयांच्या भूमीत' ही गाणी टाकली आहेत तर गिटारच्या साथीने 'मोगरा फुलला' हे गीत व  संतमीराबाईंचे एक भजन रसिकांसमोर आणलं आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

 

************

 

 

     यशवंत - एक प्रेरणास्रोत  

 

 

( सहावे पर्व : भाग - १४७/१५०)

 

💫  मरियप्पन थंगवेलू  💫

 

जन्म देऊन सोडून गेलेला बाप, अन् वयाच्या पाचव्या वर्षी आलेलं अपंगत्व यावर मात करून, यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या आणि वयाच्या तेविसाव्या वर्षीच भारताच्या चौथ्या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या एका तरुण खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास आजच्या भागात जाणून घेणार आहोत. चला तर मग !

 

२८ जुलै १९९५ रोजी तामिळनाडूतील सालेम या जिल्ह्याच्या ठिकाणापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या पेरिअवाडागमपत्ती या गावात एका गरीब कुटुंबात मरियप्पनचा जन्म झाला.

 

आई, बहीण आणि चार भावंडं असा त्याचा परिवार. वडिल घरदार, बायकापोरं वाऱ्यावर सोडून गेलेले. ना शेत, ना दार. अशा खडतर परिस्थितीत आईने वीटभट्टीवर काम करून मुलांचा सांभाळ केला.

 

इतक्या हलाखीच्या परिस्थितीत देखील संकटं पाठ सोडायला तयार नव्हती. मरियप्पन ५ वर्षांचा असतानाचा एक प्रसंग. तो रस्त्याने जात असताना, नशेत असलेल्या एका बस चालकाने त्याच्या अंगावर बस घातली.

 

या अपघातात त्याला आपला पाय गमवावा लागला. तो कायमचा अधू झाला. आईने त्याला वाचविण्यासाठी, परिस्थिती नसताना कर्ज काढून बराच खर्च केला. तब्बल सतरा वर्षे तिने नुकसान भरपाई मिळविण्यासाठी न्यायालयात लढा दिला.

 

अपघातातून सावरून मरियप्पन शाळेत जाऊ लागला. वर्गात हुशार असलेला मरियप्पन, मैदानातही तितक्याच चपळ होता. तो हॉलीबॉल उत्तम प्रकारे खेळायचा. त्याच्या उंचपुऱ्या शरीरयष्टीकडे पाहून, पीटी च्या शिक्षकांनी त्याला उंच उडीत सहभाग घेण्याविषयी सल्ला दिला. त्याने तो सल्ला मानला. त्याने उंच उडीचा अधिकाधिक सराव केला.

 

वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने आपल्या पहिल्यावहिल्या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला वगळता अन्य स्पर्धक शारीरिकदृष्ट्या सक्षम होते. तरीही त्याने आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. या यशाने त्याचा आत्मविश्वास वाढला. तो जोमाने तयारी करू लागला. त्याची निवड राष्ट्रीय पॅराअथलेटिक्स साठी झाली. याही स्पर्धेत त्याने उत्तम कामगिरी केली.

 

येथेच त्याच्यावर एका गुणी प्रशिक्षकांची नजर पडली. त्याला उत्तम मार्गदर्शन मिळाले. मिळालेले मार्गदर्शन आणि आपल्या मेहनतीच्या जोरावरवयाच्या २१ व्या वर्षी २०१६ साली रिओ येथे भरलेल्या पॅरालिंपिक मध्ये उंच उडीत सुवर्णपदक पटकावून स्वतःचा आणि देशाचा मान उंचावला. अशी सुवर्ण कामगिरी करणारा तो खेळाडू म्हणजेच "मरियप्पन थंगवेलू" होय. 

 

मरियप्पन चा प्रवास वाचून झाला. आता स्वतःला काही प्रश्न विचारा. मी अपंग आहे कामाझे आई वडील मला सोडून गेले आहेत का? माझ्या घरची परिस्थिती हालाकीची आहे का

 

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे जर "होय" असतील तर आपल्या आवडीच्या क्षेत्रात मरियप्पन सारखी देदीप्यमान कामगिरी करणे. बिलकूल अशक्य नाही. आणि जर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे "नाही" असतील तर आपण सुज्ञ असल्याने मला जादा काही लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही.

 

जी माणसं कारणं सांगतात, ती कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत आणि यशस्वी झालेली माणसं कधीच कारणं सांगत नाहीत.

 

अपघाताने आलेले अपंगत्व, बापाचा नसलेला आधार आणि आत्यंतिक दारिद्र्य या सर्वावर आपल्या कष्टाच्या, जिद्दीच्या बळावर मात करून मरियप्पन ने यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्याला वयाच्या तेविसाव्या वर्षीच 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार देऊन गौरविले आहे. म्हणूनच तो एक यशवंत आहे.

 

सध्या आपण 'यशवंत - एक प्रेरणास्रोत' च्या सहाव्या पर्वाच्या अंतिम टप्प्यात येवून पोहोचलो आहोत. याची कदाचित आपणांस जाणीव असेलच. या निमित्ताने आपणांस एक विनंती आहे की, गेली तीन आठवडे आपण या लेखनमालेचे अत्यंत मन:पुर्वक वाचन करताहात. याची आपल्या असंख्य प्रतिक्रिया मधून वेळोवेळी प्रचिती येत आहे.

 

आपल्याला हा संपूर्ण प्रवास कसा वाटला? याबद्दल आपली दीर्घ प्रतिक्रिया लिहून पाठवावी. जेणेकरून त्या ब्लॉगवर प्रसारित करता येतील. तसेच आपण ही लेखमाला ज्या ग्रुपवर फॉरवर्ड करत आहात किंवा इतर कोणत्या ग्रुपवरून वाचायला मिळत असेल. त्याचा एक screenshot अवश्य पाठवावा. जेणे करून त्याचा उल्लेख अंतिम भागातही करता येईल. शक्य झाल्यास ब्लॉगला भेट द्या आणि फॉलो करा.

 

इथेच थांबतो. उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.

 

श्री. संदीप पाटील, दुधगाव

9096320023

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

 

************

२९ जुलै - शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस

************

 

जन्म - २९ जुलै १९२२ (पुणे)

 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस.

 

बाबासाहेब पुरंदरे हे शिवचरित्र केवळ अभ्यासणारे न्हवते तर ते जिव्हाळ्याने अनुभवणारे आणि जणू शिवकाळातच राहून शिवचरित्र अक्षरश: जगणारे शिवशाहीर ! म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे.

 

इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरा पर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजेअसे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.

 

सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.

 

पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. राजा शिवछत्रपतीया ग्रंथाच्या १८ आवृत्त्या प्रकाशित झाल्या असून, काही कादंबऱ्या तसेच किल्ल्यांचे वर्णन करणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

 

फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल १९८४ रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरील सर्वात मोठे असे महानाट्य असून याशिवाय हत्ती, घोडे, उंट, बैलगाडय़ांचा या महानाट्यात समावेश असतो. जाणता राजा या महानाट्याचे अमेरिका, लंडनसह भारतात महाराष्ट्र, गुजरात, कनार्टक, मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगढ, गोवा या राज्यांतील अनेक शहरात प्रयोग झाले आहेत.

 

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री.ग. माजगावकर यांच्याबरोबर ते माणूसमध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली.

 

बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही.

 

शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच. स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेबांनी सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते. आचार्य अत्रे, गो.नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला. या सर्वांच्या माध्यमातून, सहकार्यातून त्यांनी शिवचरित्र प्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले.

 

महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहेहे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

 

बाबासाहेब पुरंदरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२९ जुलै - अरुणा आसफ अली स्मृतिदिन

************

 

जन्म - १६ जुलै १९०९

स्मृती - २९ जुलै १९९६

 

अरुणा आसफ अली या भारतीय स्वातंत्र्य सेनानी होत्या.

 

१९३०, १९३२ आणि १९४१ च्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी शिक्षा भोगली. भारत छोडो आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

 

स्वातंत्र्यानंतर १९५८ साली दिल्लीच्या प्रथम महापौर झाल्या.

 

लेनिन पुरस्कार, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, आंतरराष्ट्रीय सामंजस्याबदल'नेहरू पुरस्कार, तसेच मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित.

 

विनम्र अभिवादन !

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

ACTIVE AND ADVANCED EDUCATION ALl TYPES:

************

२९ जुलै - गायक सुधीर फडके स्मृतिदिन

************

 

जन्म - २५ जुलै १९१९ (कोल्हापूर)

स्मृती - २९ जुलै २००२ (मुंबई)

 

बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्णसत्य आहे. आजही त्यांचे घर वाडा-फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यावर तेथेच स्थानिक झाले. बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले.

 

त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले. कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात दोन वर्षे दौरा करून त्यांनी मैफलींमध्ये सादरीकरण केले. यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलविण्यासाठी केला. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक व संगीतकार म्हणून ओळख झाली.

 

एचएमव्ही सोबत १९४१ मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली. जगाच्या पाठीवरया चित्रपटातील गीते त्या काळात खूपच गाजल्याने सुधीर फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली. स्वत: गायक, गीतकार असल्याने पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून १९४६ मध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी २९ मे १९४९ ला त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वत:च्या लग्नात मंगलाष्टके म्हटल्याचे सांगितले जाते. कवी न.ना. देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून सुधीरअसे नामकरण केले.

 

सुधीर फडके यांनी सुमारे ११० चित्रपटांना तर सुमारे २० हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीते, भक्तिगीते आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले आहे. बाल गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे अशा अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसविले आहे.

 

गायक-संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले होते. हिंदी चित्रपटातील भाभी की चूडिया या चित्रपटाचे 'ज्योती कलश छलके' हे पहाट गाणं आजही रसिकमनाचा ठाव घेते.

 

'पहली तारीखया चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेले 'खुश है जमाना आज पहली तारीख है' हे गीत रेडियो सिलोनवरून आजही पहिल्या तारखेला वाजत आहे. संगीतकार खय्यामही त्यांच्या संगीताच्या मधुरतेने प्रभावित झाले होते. पण महाराष्ट्राच्या घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते 'गदिमां'च्या गीत रामायणामुळे. या रामायणातील ५६ गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत-रामायणाचे देश-विदेशात १८०० हून अधिक कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्या काळी ठरला होता.

 

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले होते. स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा वीर सावरकरचित्रपट बनविण्यासाठी त्यांनी कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून निधी गोळा केला होता.

 

त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात स्वामी हरिदास सन्मान, सूरसिंगार सांसद पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारांचा समावेश आहे. अमेरिकेतील इंडिया हेरीटेज फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. हा माझा मार्ग एकलाया सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक १९६३ मध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉ.राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले. तर १९९१ साली राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय मा. दिनानाथ संगीत पुरस्कारव राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारसह्याद्री स्वररत्न पुरस्कारत्यांना लाभले.

 

सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.

 

मा.सुधीर फडके यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

************

 

************

२९ जुलै - गीतकार राजा मेहंदी अली खान स्मृतिदिन

************

 

जन्म - १९२८ (झेलम,पाकिस्तान)

स्मृती - २९ जुलै १९६६

 

राजा मेहंदी अली खान हे चार वर्षाचं असतानाच त्यांचे वडील निवर्तले होते. हा जमीनदारचा मुलगा शायर बनण्यासाठी आपली जमीन जायदाद सोडून मुंबईला आला. १९४७ मध्ये फिल्मिस्तान कंपनीचे भागीदार एस. मुखर्जी यांनी राजा मेहंदी अली खान यांना ब्रेक दिला. 'दो भाई' या चित्रपटासाठी राजा मेहंदी अली खान यांना गाणी लिहिण्यास दिली, त्यामधील दोन गीतांनी त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

 

मेरा सुंदर सपना बीत गयाआणि याद करोगे एक दिन हमको याद करोगेहीच ती दोन मधुर गीते. एस.डी. बर्मन यांनी ती गीते संगीतबद्ध केली होती. १९४८ च्या शहीदचित्रपटातील त्यांची गीते गुलाम हैदर यांनी संगीतबद्ध केली होती. आणि १९५१ मध्ये ते आणि मदनमोहन एकत्र आले. मदहोशहा तो चित्रपट होता. मेरी याद में तुम न आँसू बहानाही तलत मेहमूदने गायलेली त्यांची अर्थपूर्ण रचना आजही आवर्जून ऐकली जाते.

 

त्यानंतर १९६२ मध्ये पुन्हा एकदा मदनमोहन (अनपढ) आणि ओ.पी. नय्यर (एक मुसाफिर एक हसीना) यांच्या संगीताने सजलेली त्यांची काव्ये रसिकांना भावली होती. खेमचंद प्रकाश, श्यामसुंदर, सी. रामचंद्र, चित्रगुप्त, रवी, रोशन अशा अनेक इतर संगीतकारांनी त्यांची गीते संगीतबद्ध केली होती. परंतु संगीतकार मदनमोहन बरोबर त्यांची जोडी जास्त वेळ जमली.

 

राजा मेहंदी अली खान हे मदनमोहन यांचे लाडके गीतकार होते. संगीतकार मदनमोहन आणि गीतकार राजा मेहंदी अली खाँ या जोडीचे १२ चित्रपट पडद्यावर झळकले होते. परंतु या गीतकाराची त्या वेळच्या प्रसिद्धी माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. आणि त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून या गीतकाराने सुंदर गाणी लिहिण्याचे काम चालूच ठेवले. फक्त ३८ वर्षे जगलेल्या राजा मेहंदी अली खान यांनी खूप कमी गाणी लिहिली, पण जी लिहिली ती अजरामर होतील अशीच लिहिली.

 

यातली काही गाणी- अगर मुझ से मुहब्बत हैं, आप की नजरोने समझा, मेरा सुंदर सपना बीत गया, तू जहाँ जहाँ चलेगा, तेरे बीन सावन कैसे बिता, आप युंही अगर हमसे मिलते रहे, नयना बरसे रिमझिम, आखरी गीत मोहब्बत का, आप के पहलू में आकर रो दिये, तुम बिन जीवन कैसे बिता पुछो मेरे दिल से, जो हमने दास्तान अपनी सुनाई, झुमका गिरा रे, नैनो मे बदरा छाए; अजूनही लोकांच्या तोंडावर असतात.

 

राजा मेहंदी अली खान यांची रोमँटिक गीतं हॉन्टेड कॅटेगरी मधली वाटावीत इतकी गूढतेकडे झुकणारी होती. ताहिरा हे राजा मेहंदी अली खान यांच्या पत्नीचं नाव. हे दोघंही उच्चशिक्षित घरातले होते. फाळणी नंतर पाकिस्तानमध्ये न जाता ते भारतातच राहिले. त्यांच्या मृत्युनंतर १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिताआणि जब याद किसी की आती हैया चित्रपटातील अनुक्रमे मैं देखू जिस ओर सखी रेआणि तेरे बिन सावन कैसा बीताया गीतांना रसिकांनी उत्कृष्ट दाद दिली.

 

राजा मेहंदी अली खान यांचे २९ जुलै १९६६ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

 

संदर्भ : इंटरनेट

 

No comments:

Post a Comment