📚परीपाठ🌹 |
श्री. देशमुख. एस. बी, |
🌻सचिव🌻 |
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ |
📱-9011181718📱 |
|
❂ दिनांक:~ 14
ऑगस्ट 2021 ❂ |
🎴 वार
~ शनिवार 🎴 |
|
🏮 आजचे
पंचाग 🏮 |
━═•●◆❃★❂★❃◆●•═━ |
|
श्रावण. शनि १४ |
तिथी : शु. षष्ठी |
नक्षत्र : चित्रा, |
योग :- शुभ |
करण : गरज |
सूर्योदय : 06:18, सूर्यास्त
: 19:09, ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🖋 सुविचार
🖋 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
|
💡"कौतुक"
हा फार छोटा शब्द आहे. |
पण
ते करायला "मन" मात्र खुप मोठे लागतं. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
⚜म्हणी व अर्थ ⚜ |
|
✊शेंडी तुटो की पारंबी तुटो. |
|
🔱अर्थ:- |
पक्का निश्चय करणे. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
📆 दिनविशेष
📆 |
|
🇩🇿पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन |
|
🌞या वर्षातील🌞 २२६
वा (लीप वर्षातील २२७ वा) दिवस आहे. |
|
🌹 महत्त्वाच्या
घटना 🌹 |
|
👉१९४७ : भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा
ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर
जनरल म्हणून नेमणूक केली. |
👉१९४७ : पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन)
स्वातंत्र्य मिळाले. |
👉१८६२ : मुंबई, कलकत्ता उच्च
न्यायालयाची स्थापना |
|
🌹जन्मदिवस / जयंती🌹 |
|
👉१९५७ : जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ ’जॉनी
लीवर’ – विनोदी अभिनेता |
👉१९२५ : जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार
व पत्रकार. कथा, कादंबरी... ते ’ठणठणपाळ’ या
टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. |
👉१९०७ : गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका.
महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. |
|
🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹 |
|
👉२०१२ : विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री |
👉२०११ : शम्मी कपूर – हिन्दी
चित्रपट अभिनेता व निर्माता |
👉१९८४ : कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२
च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती
पुरस्कार [मरणोत्तर] ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🥇सामान्य ज्ञान 🥇 |
┅━═▣◆★✧★◆▣═━┅ |
👉कडधान्यांच्या पिकामूळे जमिनिला कशाचा पुरवठा
होतो? |
🥇नत्राचा |
|
👉मुंबई येथे शारदा सदन ही संस्था कोणी सुरु
केली? |
🥇पंडिता रमाबाई |
|
👉भारुड रचना ही कोणत्या संताने केली? |
🥇संत एकनाथ |
|
👉सशस्त्र क्रांतिकारक म्हणून कोणास ओळखले जाते? |
🥇भगतसिंग व राजगुरु |
|
👉गोवा या राज्याची राजधानी कोनती आहे? |
🥇पणजी ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🕸 बोधकथा
🕸 |
|
🤲50
वर्षाची तप:श्चर्या |
|
एक फकीर 50
वर्षे एकाच जागेवर बसून रोज 5 वेळेला नमाज अदा करत असे. एक दिवस आकाशवाणी
झाली आणि अल्लाचा आवाज फकीराच्या कानी पडला,'' हे
फकीरबंदे, तू 50 वर्षापासून नमाज अदा करत आहेस पण तुझी एकही
नमाज अजूनपर्यंत कबूल झालेली नाही.''
फकीराच्या शेजारी बसणा-या इतर
सर्वांनी ही आकाशवाणी ऐकली व ते सर्वजणच दु:खी झाले. 50
वर्षाची तप:श्चयर्या निष्फळ ठरली आणि फकीराची यावर प्रतिक्रिया असेल याचा विचार
करत असतानाच एक आश्चर्यचकित घटना तेथे घडू लागली. ज्या फकीराबाबत ही आकाशवाणी
घडली होती तो फकीर आनंदाने नाचू लागला होता. तो अल्लाहचे आभार मानत होता आणि
अल्ला, अल्ला्, या खुदा तेरा
शुक्रिया करत आनंदाने नाचत होता. हे पाहून इतर सर्वांना वाटले या आकाशवाणीचा या
फकीराच्या मनावर खूपच परिणाम झाला आहे.
हे सर्व तो परिणामात करत आहे असे त्यांना वाटले. कोणीतरी त्यार फकीराला विचारले,''बाबा, तुम्हाला
खरे तर दु:ख व्हायला हवे होते. कारण तुमची 50
वर्षाची तप:श्च र्या आताच खुदाने नाकारली आहे. तरी पण तुम्हील इतके आनंदात कसे'' फकीर
आनंदात उत्तरला,'' अरे गेली ती 50
वर्षाची तप:श्चर्या पण खुदाला हे तर माहित आहे की मी 50
वर्षे झाले त्याचे स्म:रण करतो आहे. त्याला माझे या निमित्ताने का होईना स्मरण
झाले हे काय कमी आहे. खुदाने माझी आठवण ठेवली हेच मला खूप आहे.'' |
|
✅तात्पर्य :- कोणतीही सेवा ही निष्फळ होत नाही, यथायोग्य
वेळेस त्याचे फळ हे मिळतेच. सेवा करताना मनात तर मेवा मिळविण्याचा भाव असेल तर
सेवेला किंमत राहत नाही. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🌐 आजच्या
बातम्या 🌐 |
|
➡️अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर |
पासूनच ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु |
➡️India vs England 2nd Test : भारतीय संघाचा डाव ३६४ धावांवर गुंडाळला.
दुसऱ्या दिवशी रिषभ पंत 37, रवींद्र जाडेजाचे 40
धावांचे योगदान. इंग्लंडकडून जेम्स अँडरसनचे सर्वाधिक पाच बळी. |
➡️तमिळनाडू विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन.
पहिल्यांदाच ई-बजेट सादर. पेट्रोल कर तीन रुपये कमी केला. सरकारी महिला
कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा 12 महिने. बचतगटांना 20,000
कोटी रुपये क्रेडिट देणार |
➡️देशात गेल्या 24
तासांत 40 हजार कोरोनाबाधितांची नोंद, सक्रिय
रुग्णसंख्येत भारत 11व्या स्थानी.. राज्यात गुरुवारी 5,609
नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद.. |
➡आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात
तेजी कायम. सेन्सेक्स 593.31 अंकांनी वाढून सर्वोत्तम 55,437.29 अंकांवर बंद, निफ्टीतही
164.70 अंकांनी वाढून 16,529.10 अंकावर. |
➡️हवाई प्रवास आजपासून महागला, सरकारने
देशांतर्गत उड्डाणांचे भाडे 13 टक्क्यांनी वाढवले .. लॉकडाऊननंतर 25
मे 2020 रोजी हवाई सेवा सुरू करण्यात आली होती. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |
🙏🌹कार्यवाह - नाशिक जिल्हा T.D.F.🌹🙏 |
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸 |
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
शिक्षक विचार मंच पुणे |
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯ विद्यार्थी ,शिक्षक, पालक
,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत
वर्ग ,शाळा कांही प्रमाणात बंद आहेत पण शिक्षण सुरू
आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन
करावे ही विनंती .
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🌄 परिपाठ
🌄. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📚 संकल्पना/संकलन📚.
श्री .घोडके संजय सर. 📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
|
आज
दिनांक: १४/०८/२०२१.
वार:शनिवार , महिना :श्रावण,शुक्लपक्ष.६. नक्षत्र :चित्रा.
योग:शुभ,करण:गरज.
सूर्योदय:०६.१९,सूर्यास्त:०७.०७. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ सुविचार:काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश
ओढवून घेतात. ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
प्रतिज्ञा |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ 📜 भारताचे
संविधान 📚.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🙏 प्रार्थना 🙏.
|
|
🙏 असे
मी अनादी🙏 |
असे मी अनादी मला अंत नाही |
मला मृत्यूची या मुळी खंत नाही |
पडू दे इथे हि तनू मृण्मयी रे |
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे १ |
|
आम्ही प्राशिले मत्त त्या सागराला |
आम्ही प्राशिले कालकूटा गराला |
असे वीर्य ते माझिया संचयी रे |
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे २ |
|
जिथे न्याय-निती सवे सत्य आहे |
जयाची पताका तिथे नित्य आहे |
उभा देव तेथे सदा निश्चयी रे |
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे ३ |
|
पुन्हा यज्ञी या ध्यावया आहुती मी |
पुन्हा जन्म घेईन रे भारती मी |
असे येथली वीरता अक्षयी रे |
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे ४ |
|
इथे वाहता धार हि शोणिताची |
पहा जागली अस्मिता भारताची |
उभी सिद्ध सेना पहा ति जयी रे |
चिरंजीव मी वीर मृत्युंजयी रे ५
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
👩💻 बोधकथा
👨💻. |
🛑 माझा
महाराष्ट्र🛑
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
" ह्या राष्ट्राची माती पवित्र आहे! ह्याच
मातीतून शिवाजी, संभाजी जन्माला आले! ह्याच मातीत स्वराज्याचे
बीज परले गेले! इथेच ते फळाला आले! इथेच अनेक अनामी वीर स्वराज्यासाठी लढले आणी
कैक धारातीर्थी पडले! इथली माती त्यामुळेच लाल असेल का? |
जेव्हा मुजोर औरंग्या ३ लाख सैन्य घेउन टीचभर
स्वराज्यावर चाल करून आला तेव्हा संभाजी नावाच्या एका 'पोराने' पहिली
नऊ वर्षे आणी नंतर इथल्याच संताजी-धनाजी ह्यानी मोगली बकासुरास इथेच गाडले!
पुढल्या काही वर्षातच त्याच मोगलांच्या दिल्लिचं तख्त काबिज़ करून ह्या
महाराष्ट्राचा भगवा अगदी अटकेपार फडकला! ही ताकत आहे इथल्या मंनगटातली! |
जितका रंजक इथला इतिहास तितकाच इथला निसर्ग
वैविध्यपूर्ण! |
इथला कोकण किनारा, इथला
समुद्र, इथले सह्याद्री पर्वत, इथली
घनदाट अरण्ये... |
इथली वन्यजीवसृष्टी देखील विविधतेने नटलेली
आहे! इथली फळ ही जगप्रसिद्ध आहेत! सर्व दुनियेला वेड लावणारा फळांचा राजा हापूस
आंबा देखील महाराष्ट्राचाच! |
हा
राकट, कणखर महाराष्ट्र कलाकारांचा देश देखील आहे!
ह्या मातीला कलादेवतेच वरदान आहे! सतार इथेच जन्माला आली! वारली कला, बिद्रि
कला, सावंतवाडीची लाकडी खेळणी, कोल्हापुरी
चपला हे सारे प्रसिद्ध तर आहेतच पण महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग हा अगदी
पूर्वापार चालत आलेला आहे! पैठणी,
नारायणी पेठ ह्या साड्या म्हणजे इथली
शान आहेत! |
इथली झणझणीत लावणी, खडे
पोवाडे, कोळी गीत, भारुड
हे सर्वांना भुरळ घालतात! इथली रंगभूमी, इथली नाट्यगीत
सारी जगावेगळी! |
भारतातील पहिला चित्रपट देखील ह्याच भूमीत
तयार झाला! |
अशी आहे महाराष्ट्राची कला परंपरा! |
मराठी साहित्य म्हणजे रत्न-हिरे ह्यानी खचून
भरलेली खाण आहे. |
पु.ल. देशपांडे, कुसुमाग्रज, आचार्य
अत्रे, रणजीत देसाई, शिवाजी
सावंत, कवी ग्रेस, बालकवी
ही ह्या खाणीमधली काही रत्ने! |
विनोदी, ऐतिहासिक, विडंबनात्मक
.... जी जी श्रेणी तुम्ही शोधाल त्या त्या श्रेणीत तुम्हाला मराठी पुस्तक सापडतील! |
७०० पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेली ही
आमची मायबोली ह्या प्रचंड साहित्य परिवाराने आणखीच खुलते! |
महाराष्ट्रीय जेवण म्हणजे तर स्वर्गाहून
सुंदर! |
इथली पुरणपोळी, थालीपीठ, चकली
,चिवडा, श्रीखंड
सगळ्यांना तौक आहे पण इथल्या प्रत्येक शहराला आपली एक पाक संस्कृतीलाभलेली आहे. |
मुंबईचा वडा पाव, नागपूरच्या
सावजी समुदायाचे तिखट जेवण, वडे-भात, कोल्हापुरचा
तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ, सातारी कन्दी
पेढे, पुणेरी मिसळ, कोंकणी
आणी मालवणी जेवण....अहाहा! पाणी सुटल तोंडाला! हे तर फक्त मोजके नमुने आहेत! |
तात्पर्य:तर असा आहे आपला महाराष्ट्र! कणखर
आणि राकट तरी सर्वांस माया लावणारा आणि जपणारा!" |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼 |
|
💫 सारे जहाँ से अच्छा |
हिंदुस्तान हमारा. |
|
" सारे
जहाँ से अच्छा |
हिंदुस्तान हमारा |
हम बुलबुलें हैं उसकी |
वो गुलसिताँ हमारा। |
परबत वो सबसे ऊँचा |
हमसाया आसमाँ का |
वो संतरी हमारा |
वो पासबाँ हमारा। |
|
गोदी में खेलती हैं |
जिसकी हज़ारों नदियाँ |
गुलशन है जिनके दम से |
रश्क-ए-जिनाँ हमारा। |
|
मज़हब नहीं सिखाता |
आपस में बैर रखना |
हिंदी हैं हम वतन है |
हिंदुस्तान हमारा। |
|
- मुहम्मद
इक़बाल "
|
|
🎰 दिनविशेष🎰. |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
दिनविशेष : १४ ऑगस्ट : पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन |
महत्त्वाच्या घटना: |
◆१९५८ : ’एअर इंडिया’ची
दिल्ली - मॉस्को विमानसेवा सुरू झाली. |
◆१९४७ : भारताच्या घटनासमितीने सत्ता स्वीकारण्याचा
ठराव मंजूर केला आणि लॉर्ड माऊंटबॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर
जनरल म्हणून नेमणूक केली. |
◆१९४७ : पाकिस्तानला (युनायटेड किंग्डमपासुन)
स्वातंत्र्य मिळाले. |
◆१९४३ : नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर
यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली. |
◆१८६२ : मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना |
◆१८६२ : कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस: |
●१९६८ : प्रवीण
आम्रे – क्रिकेटपटू |
●१९६२ : रमीझ
राजा – पाकिस्तानी क्रिकेटपटू व समालोचक |
●१९२५ : जयवंत
दळवी – साहित्यिक, नाटककार
व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी
लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ’ठणठणपाळ’ या
टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. |
●१९११ : वेदतिरी
महाऋषी – भारतीय तत्त्वज्ञानी |
●१९०७ : गोदावरी
परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक
कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद
मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या
भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व
आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे
त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन: |
■२०१२ : विलासराव देशमुख – महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री |
■२०११ : शम्मी कपूर – हिन्दी
चित्रपट अभिनेता व निर्माता |
■१९८४ : कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२
च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती
पुरस्कार [मरणोत्तर] |
■१९५८ : जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या
समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा
फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक |
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~. १)भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
२) 'जागतिक
शिक्षकदिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
३)गीतारहस्य कोणी लिहिले?
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक
घडामोडी |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
■ अकरावी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर -आज
पासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन चालू . |
■ सेतू अभ्यास १५ पासून बंद होणार. |
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
संकल्पना /संकलन :.
घोडके संजय सर. मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे. ======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment