⛳आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष⛳📜 १० ऑगस्ट इ.स.१६६० सिद्दी जौहरचे परत आक्रमण!


 

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

 

📜 १० ऑगस्ट इ.स.१६६०

(श्रावण पोर्णिमा, शके १५८२,संवत्सर शार्वरी, वार शुक्रवार)

 

सिद्दी जौहरचे परत आक्रमण!

            "छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 १० ऑगस्ट इ.स.१६६६

(श्रावण वद्य ५, पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)

 

महाराजांनी आजारपणाचे सोंग घेतले!

          "छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 १० आगस्ट इ.स.१६८०

(श्रावण वद्य ११, एकादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

 

इंग्रजांच्या वखारीत दंगल!

         सिद्दीच्या लोकांची दंडेली सुरूच होती. एका प्रकरणात सिद्दी यांना एका इंग्रज सराफाकडून १८ हजार अशरफ्या घ्यावयाच्या होत्या, त्यासाठी इंग्रजांच्या बरोबरच्या वादात वखारीत दंगल झाली. अखेर इंग्रजांनी तोफा डागल्या तेव्हा सिद्दीचे लोक पळून गेले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 १० ऑगस्ट इ.स. १७५५

इस.१७५३ ते १७५५ श्रीमंत रघुनाथराव उर्फ राघोबादादांची दुसरी स्वारी उत्तरेत झाली.त्यांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी राजपुतांना, कुंभेरी इथे जबरी खंडण्या वसूल करून चांगलीच दहशत निर्माण केली होती.जून ते डिसेंम्बर १७५४ दरम्यान राघोबादादा दिल्लीची व्यवस्था पाहण्यात दिल्ली मुक्कामी होते.३ मार्च रोजी सर्व व्यवस्था करून राघोबादादा परतीच्या प्रवासाला निघाले.पुष्कर, ग्वाल्हेर असा प्रवास करत राघोबादादासाहेब १० ऑगस्ट इस. १७५५ रोजी पुण्यात दाखल झाले.याच दरम्यान मराठ्यांचा उत्तरेतील आणखी एक बलाढ्य बुरुज कोसळला. जयप्पा शिंदे यांचा नागोर येथे खून झाला. एकंदरीत या स्वारीत मराठयांचे उत्तरेत बरेच वर्चस्व वाढले होते. येथील भौगोलिक, सामाजिक, आणि राजनैतिक, परिस्थिती चा अंदाज त्यांना आला.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇��🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

🚩

#आजचेऐतिहासिकदिनविशेष

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩

#१०आॅगस्ट१६६०

"छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता.

त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१०आॅगस्ट१६६६

"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले.

त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१०आॕगस्ट१७४९

चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे.

यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१०ऑगस्ट१७५५

थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१०आॅगस्ट१७६०

सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

No comments:

Post a Comment