#आजचे ऐतिहासिक दिनविशेष#५सप्टेंबर१६५९

 

#आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#५सप्टेंबर१६५९

#शिवरायांच्याथोरल्यापत्नी आणि

#संभाजीराजेंच्या_मातोश्री

#अखंडलक्ष्मीअलंकृत

#सकलसौभाग्य_संपन्न

#महाराणी_सईबाईसाहेब यांचे गुंजन मावळातील किल्ले #राजगडवर अल्पशा आजाराने अकाली निधन झाले.

अवघ्या वर्षांचे बालशंभूराजे पोरके झाले.

याचवेळी शिवराय अफझलखानाचा सामना करण्यासाठी जावळीच्या खोऱ्यातील किल्ले प्रतापगडवर वास्तव्यास होते.

शंभुबाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होती.

पुढे शंभू राजांना त्यांच्या आज्जी शिवरायांच्या मातोश्री " जिजाउंनी " घडवले.

शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई राणीसाहेब अंथरुणाला खिळल्या.

देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देशोदेशीचे वैद्य सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच होती,

तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या खानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता.

अशा परिस्थितीतच हवा पालट म्हणून

दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले.

सर्वतोपरी प्रयत्न करूनही अखेर विधी-लिखित टळले नाही आणि भाद्रपद वद्य आमावस्येच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे भाद्रपद वद्य चतुर्दशीला दि. सप्टेंबर १६५९ रोजी

#सरत्यापावसालाशिवाजीराजांचाभावगडढासळला !

एक मनाजोगा जमलेला मनसुबा वाहून गेला !

भरल्या मळवटाने सईबाई छत्रपती महाराजांना आणि अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या लहानग्या शंभूराजांना सोडून नापरतीच्या मोहिमेला निघून गेल्या ते परत कधी येण्यासाठी 🙏

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩

#५सप्टेंबर१६६१

शिवरायांनी केदारजी खोपडे यांस कौलनामा दिला.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩

#५सप्टेंबर१६६५

संभाजीराजेंच्या मनसबदारीचे फर्मान जारी.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩

" छञपती श्री शिवाजी महाराज ":

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

 

📜 सप्टेंबर ..१६५९

( भाद्रपद वद्य चतुर्दशी, शके १५८१, संवत्सर विकारी, सोमवार )

"महाराणी सईबाई राणीसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

 "राव वणंगपाळ बारा वजीराचा काळ". अशी म्हण ज्यांच्या शौर्यामुळे पडली, त्या शूर वणंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजी राजे नाईक निंबाळकर यांच्या पोटी सईबाईंचा जन्म झाला होता.

             फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक घराणे होय. त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने, राजकीय सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्वाचे मानले गेले.

         एका हिंदवी सम्राटाची पत्नी एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार ज्यांची सई (आठवण) काढेल त्या म्हणजे सईबाई राणीसाहेब.

         छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणीसाहेब म्हणजे राजांचे पहिले प्रेम. शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणी कडे मार्गदर्शनाकडे जाते, तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते. सईबाईराणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी, गृहिणी, सचिव प्रिया होत्या. सईबाईराणीसाहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली. स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांचे बरोबर झाले होते. लग्नात राजे १० वर्षाचे तर सईबाईा राणीसाहेब वर्षाच्या होत्या.

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

         स्वराज्य उभे करण्यासाठी झुंजणाऱ्या, प्रखर राष्ट्रीय लढा देणाऱ्या छत्रपती शिवाजीराजांना आपल्या पत्नीच्या पाठिंब्या शिवाय लढता येणे शक्य नव्हते. सईबाई राणीसाहेब या अत्यंत शांत, सोशिक सामर्थ्यवान होत्या. त्यांचे बालपण फलटणमध्ये नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यात गेल्यामुळे माहेरच्या संस्कारामुळे त्या आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात जिजाऊसाहेबांचे, राजांचे मन सांभाळण्यात समर्थ बनल्या होत्या. आपल्या माहेरच्या चांगल्या संस्कारामुळे त्यांनी छत्रपती शिवाजीराजांच्या राजकीय, सामाजिक कौटुंबिक जीवनाकडे अत्यंत विशाल दृष्टीने स्वराज्य विषयीच्या कर्तुत्वाने नवे क्षितिज आपल्या नजरेपुढे उभे केले होते. स्वराज्याविषयी कर्तव्य पार पाडण्याचे काम जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर सईबाई राणीसाहेबांनी तितक्याच समर्थपणे पार पाडले होते.

         हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी निधड्या छातीने लढणाऱ्या आपल्या पतीच्या सुखातच सईबाई राणीसाहेब आपले सुख मानत होत्या".जर छत्रपती शिवाजीमहाराज श्रीराम  असतील तर सईबाई राणीसाहेब सीता असतील ,जर छत्रपती शिवाजी महाराज विष्णूं असतील, तर सईबाई राणीसाहेब लक्ष्मी असतील, जर छत्रपती शिवाजी महाराज शंकर असतील तर सईबाई राणीसाहेब पार्वती असतील, इतके घट्ट प्रेम होते दोघांचे. राणीसाहेबांच्या आठवणीसाठी शिवरायांना एखादे भव्यदिव्य स्वप्न कधीच पहावे लागत नव्हते. चैत्रातील पालवलेली चिंच जरी पाहिली किंवा भर उन्हाळ्यात आकाशातून कापुस पिंजत जाणारा मेघ जरी एकाकी पाहिला तरी शिवाजीराजांना सईबाई राणीसाहेबांची आठवण येत होती आठवणीने राजांचा जीव व्याकुळ होत होता.

          राजे मोहिमेवर असताना ज्या ज्या ठिकाणी ते सुंदर काही पाहायचे तिथे तिथे राजांना उत्कटतेने सईबाई राणीसाहेब यांची आठवण येत होती. राजांच्या या प्रेमामुळेच राणीसाहेबांचे जीवन अनेकविध रंगांनी शोभणाऱ्या इंद्रधनुष्यासारख्या किंवा नवरसयुक्त काव्यासारखे भासत होते. राजे जेव्हा जेव्हा मोहीम फत्ते करून परतत असत त्यावेळी एखाद्या सामान्य माणसासारखेच राजांनासुद्धा आपल्या घरची ओढ लागत होती. कारण सईबाईराणीसाहेबांना आपल्या विजयाची गाथा ऐकवून त्यांना चकित करण्यासाठी राजे उत्सुक असत. गेल्या सतरा - अठरा वर्षाचा राजांचा  हा अनुभव होता .स्वभावाने गोड आणि लाखात एक या राणीसाहेब होत्या. प्रथमदर्शनीच राजांना त्या खूप आवडल्या होत्या त्याचे कारण म्हणजे राणीसाहेबांचा मधुर, प्रेमळ स्वभाव. राजांनाच काय सार्या राणीवशालाच त्यांची भुरळ पडली होती. राजे तर आपले सर्वस्वच हरवून  बसले होते .शिलेदारीचे व्रत पत्करलेले राजे स्वराज्य संस्थापक म्हणून मानाने मिरवत होते .दौलतीच्या विस्तारासाठी  मुलूखगिरी करून ,मोहिमा राबवत होते. मोहिमा जिंकून, यश मिळवत असताना सारे बंध, सारे पाश तोडून टाकल्यासारखे राजे फक्त आणि फक्त स्वराज्यासाठीच झटत होते, तळहातावर प्राण घेऊन काफर यवनावर तुटून पडत होते. राजकारणातील चढ-उतार गुंते सोडवताना कधीकधी स्वतःलाही विसरत होते .स्वराज्यासाठी आपल्या मुलखापासून दूर दूर जात होते; पण तरीसुद्धा सईबाई राणीसाहेबांना ते कधीच विसरू शकत नव्हते.

 

कारण राणीसाहेब राजांची स्फूर्ती होत्या, स्वामिनी होत्या, देवता होत्या. सईबाईसाहेबांचे प्रेमळ वागणे  लोभस ,सुंदर रूप यांच्या आठवणीने राजे नव्या त्वेषाने, नव्या जोमाने दुष्मनावर तुटून पडत होते. राजांना वाटे की, सईबाईं यांच्या लक्ष्मीच्या पावलां मुळेच तर आम्हाला कायम यश मिळत आले आहे .यशश्री आमच्या गळ्यात कायमच हार घालत आहे.भविष्यात हिंदवी स्वराज्याला भरभक्कम आधार देण्यासाठी माझी खंबीर साथ म्हणजे सईबाईसाहेबच होत्या. म्हणूनच राजांचे आणि दौलतीचे ,स्वराज्याचे सारे लक्ष या राणीसाहेबांकडेच होते.

             सईबाईराणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षाचे शंभुराजे आईविना पोरके झाले. छत्रपतींच्या संसाराची कथा जीवाला चटका लावणारी ठरली. राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षाचे शंभूराजे पोरके झाले. वयाच्या २६ व्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेल्या. पण जातांना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण  केला. या छाव्याने पुढे रूद्रावतार धारण करून ओरंगजेबाला नाकी नऊ आणले.

          सप्टेंबर १६५९ साली आपल्या लाडक्या शंभूराजांना छत्रपती शिवाजीमहाराजांना सोडून सईबाईराणीसाहेब निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृती दिन.

    सईबाई राणीसाहेब म्हणजे "एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दिप उजळले.....

    एक हवेची सुखद झुळूक जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले......."

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 सप्टेंबर ..१६६१

( भाद्रपद वद्य सप्तमी, शके १५८३, संवत्सर प्लव, गुरुवार )

 

केदार खोपडे ह्याला कौल दिला :-

         ऐन युद्धाच्या प्रसंगी अफझलला जाऊन मिळाल्याने आणि खंडोजी खोपडे सारखी गद्दारी केल्याने केदार खोपडेला महाराजांनी कौल देऊन पत्र पाठवले.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 स्पटेंबर ..१६८१

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम सण १६५७ मध्ये जुन्नरवर छापा घालून औरंगजेब पर्यायाने मुघलांच्या विरोधात संघर्ष सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी औरंगजेबाने शाहिस्तेखान, मिर्झाराजें, शहजादा मुअज्जम, बहादूरखान यासारखे नामांकित सेनानी दक्षिणेत पाठवले. पण राजांनी या सर्वांवर मात करून १६७४ मध्ये स्वतःला राज्याभिषेक करून स्वतंत्र राज्याची स्थापना केली. महाराजांच्या मृत्यूनंतर दक्षिण जिंकण्याची औरंगजेबाची इच्छा पुन्हा जागृत झाली, त्यातच शंभुराजेंनी बादशहाचा पुत्र शहजादा अकबराला आश्रय दिला. स्वतः राज्यपद मिळवताना केलेला संघर्ष औरंगजेबाच्या डोळ्यासमोर होता.अकबरही त्या मार्गाने जात असलेला पाहून ही युती तोडण्यासाठी आणि मराठ्यांचे राज्य जिंकण्यासाठी औरंगजेबाने स्वतः मोहिमेवर जाण्याचे ठरवले. त्यापूर्वी उत्तरेत राजपुतांशी तह केला आणि ३१ जुलै ला शहजादा मुअज्जम याची दक्षिण स्वारीवर नेमणूक केली. स्वतः औरंगजेबाच्या बरोबर शहजादा मुअज्जम, कामबक्ष, नातू मुईजुद्दीन शिवाय शहाबुद्दीनखान, बक्षी रहुल्लाखान, हसन अलीखान हे सरदार होते. प्रचंड तयारीने औरंगजेब अजमेरहून निघाला ती तारीख होती सप्टेंबर १६८१

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 सप्टेंबर ..१६८२

अकबरास छत्रपती शंभूराजे भेटले कवी कलशानांनी महाराजांच्या मनात एक विश्वास उत्पन्न करून दिला होता. मात्र अकबर सैन्य जमा करत आहे ही बातमी औरंगजेबाला होती की, ३०,००० तीस हजार सैन्यानिशी अकबर छत्रपती शंभूराजे औरंगजेबावर चालून जाण्याची तयारी करत आहे.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 स्पटेंबर ..१६८७

औरंगजेबाने गोवळकोंडा राज्य जिंकल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखालील कर्नाटकातील भाग जिंकण्यासाठी त्याने मुघल सैन्य रवाना केले. त्यांनी तुमकुर, चिकनहळ्ळी, चंद्रगिरी, पेनुगोंडा ही शहरे त्यांनी जिंकली. त्यानंतर मुघल सरदार कासीमखानाने एकोजीराजेंच्या ताब्यातील बंगलोरही जिंकले. शंभुराजे यावेळी महाराष्ट्रात होते. बेंगलोर जिंकल्यावर कासीमखानाने मराठ्यांचे दोद्दबाळापूर ही जिंकले. मुघलांच्या या आक्रमणामुळे मराठ्यांना थोडी माघार घ्यावी लागली. यासंबंधीची एक नोंद अशी आहे,"मुघल सैन्याने बेंगलोर, सेवा गुंडा ही शहरे काबीज केल्यामुळे मराठ्यांना तेथून माघार घ्यावी लागली. हरजीराजे जिंजीजवळ मैलावर असलेल्या मात्येनूर आणि संताजी तिरुवन्नमलाई येथे परतले. मात्र मुघलांचा प्रतिकार करण्यासाठी केशव त्रिमल जगदेव गडाच्या परिसरात थांबला. "कॉनिमोर फॅक्टरीतून सेंट जॉर्जला पाठवलेल्या या पत्राची तारीख होती सप्टेंबर १६८७.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 सप्टेंबर ..१७९५

एप्रिल १७९३ मध्ये नाना फडणीस महादजी शिंदे यांचा समेट झाला.  जून १७९३ ला बावांच्या सैन्याने होळकर सैन्याचा सपशेल पराभव लाखेरी येथे केल्यावर पुणे दरबारने बावांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्यानंतर महादजीबावांस ताप ज्वर येऊ लागला. आठ दिवस सारखा ज्वर येतो हे कळल्यावर खुद्द पेशवे एक वेळ समाचारास गेले होते. यापुढे महादजीबाबा जवळ जवळ आठ महिने थोडे थोडे आजारीच होते असे म्हणावे लागते. फेब्रुवारी १७९४ महादजीबावांची भयंकर शीतज्वराची भावना झाली. पांच सात रोज यातच गेले, नंतर कफ झाला. वैद्य आणून औषधे चालू केली पण लागू होईना, चढ होत चालला. बोलणे राहिले. बुधवार त्रयोदशीस सायंकाळी नाना समाचारास आले. बोलणे झाले नाही. तसेच श्रीमंतांकडे जाऊन वर्तमान सांगितले, पेशवे महाराजांजवळ येऊन उभे राहिले. चिंता वाटली. सुवर्णतुला करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सुवर्णतुला केली. बोलले नाहीत. दुखणे वाढत जाऊन काल जाहला. (१२ फेब्रुवारी १७९४) मृत्युसमयी महादजींचे वय ६७ वर्षाचे होते. ते वानवडीस निवर्तले. त्या ठिकाणी दौलतराव शिंदे यांनी त्यांची छत्री बांधली. तिच्या खर्चास पेशवे यांनी सप्टेंबर १७९५ रोजी चाहूर जमीन छत्रीचे लगत देवविली. ही छत्री पुढे माधवराव शिंद्यांनी वाढवून टोलेजंग केली. पुण्याच्या ऐतिहासिक स्मारकात त्याची गणना होते. महादजीबावांनी आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून नऊ लग्ने केली पण त्यांना पुत्र लाभ झाला नाही. मृत्यूपूर्वी काही महिने अगोदर त्यानी आपल्या चुलत भावाचा १४ वर्षाचा मुलगा दौलतराव यास दत्तक घेतले. दौलतरावाचा जन्म १७८० चा असून त्याच वर्षी त्याचा समकालीन रणजीतसिंग जन्मला. दौलतरावांचे दत्तविधान यथाविधी झाले नव्हते असे दिसते. बावा मरण पावल्यावर तेरावे दिवशी त्याचे दत्तविधान करून पेशव्यांनी त्यास शिंद्यांचे दौलतीवर स्थापन केले. (१० मे १७९४).

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 सप्टेंबर ..१८१५

. . १८१५ च्या आषाढ महिन्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाजीराव पेशवे पंढरपूरला गेले. त्यांनी गंगाधरशास्त्री पटवर्धनांनाही आग्रह केल्यामुळे त्रिंबकजी डेंगळे आणि शास्त्रीबुवा पंढरपूरला गेले. यावेळेस पंढरपुरात प्रचंड गर्दी होती. दि. १० जुलै १८१५ या दिवशी रात्रीच्या वेळेस मंदिरात कीर्तन ऐकून पुन्हा मुक्कामावर जात असतानाच मंदिराजवळच्या एका बोळात काही अज्ञात मारेकरी घालून शास्त्रीबुवांचा खून करण्यात आला. शास्रीबुवांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी ही इंग्रजांची, पर्यायाने एलफिन्स्टनची असल्यानेच त्याने ताबडतोब पेशव्यांकडे चौकशी अन् तपास करण्याची मागणी केली आणि पेशव्यांचा तपास पूर्ण व्हायच्या आतच 'शास्त्रीबुवांच्या खुनाच्या वेळी त्रिंबकजी तिथे होता' असा आरोप करून एलफिन्स्टनने त्रिंबकजी डेंगळ्यांच्याच अटकेची मागणी केली. एलफिन्स्टनच्या या सर्व चाली त्रिंबकजी आणि बाजीराव (दुसरे) पेशव्यांनी पुरेपूर ओळखल्या होत्या. परंतु एलफिन्स्टन अगदी हट्टालाच पेटला आणि त्रिंबकजीच्या अटकेच्या कारणावरून इंग्रजी पलटण पुण्यात घुसवणार हे पाहताच त्रिंबकजी डेंगळे स्वतःहून एलफिन्स्टनच्या अधीन झाले. आधी दि. सप्टेंबर १८१५ या दिवशी बाजीराव पेशव्यांनीच त्रिंबकजींना सातारा प्रांतातील वसंतगड किल्ल्यावर कैदेत ठेवले (दिखावा केला!) परंतु तैनाती फौजेचा अधिकारी कॅ. फोर्ड आणि एलफिन्स्टन या दोघांनीही 'त्रिंबकजीला आमच्या स्वाधीन करा' असा हट्टच धरल्याने दि. १९ सप्टेंबर १८१५ या दिवशी त्रिंबकजीला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आले. इंग्रजांनी त्यांना कडेकोट बंदोबस्तात ठाण्याच्या किल्ल्यात तुरुंगात ठेवले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

 

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

 

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

आज पुण्यश्लोक महाराणी सरकार सईबाई शिवाजी महाराज भोसले यांची पुण्यतिथी 🙏️😇

ज्यांनी छाव्याला जन्म दिला "युवराज छत्रपती संभाजीराजे"

अशा मातोश्री सईबाई सरकार यांना पुण्यतिथी निमीत्त विनम्र प्रणिपात आदरांजली 🙏🙂

एक प्रसंग वाचनात आला होता तोच देतोय

#शिवरायांच्याहृदयातीलतोचंद्र"#सई" ️🙂

 

#सईबाई राजेंच्या अर्धांगिनी,आयुष्याचा एक अविभाज्य भाग म्हणण्यापेक्षा आयुष्यचं!! सईबाईं मध्ये त्यांनी कधी मैत्रीण पाहिली, कधी प्रेयसी,कधी पत्नी,कधी आई, तर कधी मार्गदर्शक सुद्धा राजेंच्या सहवासात सईबाई रमत होत्या, शिकत होत्या, शेवटी राजांचा सहवास म्हणजे अहोभाग्यचं!!!

 

राजेंना सईबाईं सोबत बुद्धिबळाचा डाव खेळायला आवडत असे पण सईबाई कंटाळून अर्ध्यातच डाव सोडून जाई...आणि वर राजेंना म्हणत असत,"मग, मी तर राणी ना...जाणारच मला वाटेल तेव्हा सोडून....!!!" राजे 😊

 

बजाजी निंबाळकरांना आपलेसे करुन राजेंनी सईबाईंना एक अनमोल भेटचं दिली होती, तेव्हा सईबाई  राजांना म्हणाल्या, "एवढं मोठ देणं मला कोणी दिलं नव्हतं. हे सारं माझ्यासाठी म्हणूनच करता ना?? राजे म्हणाले, "सई, तुझ्यासाठी करीत नाही; तुझ्यामुळे करायला बळ येतं"

पुढे सईबाईंना बोलवेना... राजांनी त्यांना एकदम मिठीत घेतले आणि त्यांच्या पाठीवर थोपटून त्यांना म्हणाले, आम्हाला तुम्हा बायकांचं काही कळत नाही, दुःखातही रडता, आनंदातही रडता, अजबचं आहे ...राजांच्या त्या आविर्भावासमोर त्यांना हसू आवरले नाही ,राजे मात्र त्यांचं रूप मनात साठवून घेण्यात गुंतले होते....

 

कल्याणच्या सुभेदाराच्या सुने बद्दल सईबाईंनी राजेंना विचारलं, "सुभेदाराची सून खूप सुंदर होती का??" राजे म्हणाले, "हो पण ती तुमच्या इतकी सुंदर नव्हती" "चला थट्टा करू नका," सईबाई म्हणाल्या... राजे म्हणाले, "आम्ही खरेच सांगतो, ते सौंदर्य पाहिलं, पण फार कमी भासलं.मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई, सौंदर्य मनाच्या स्नेहातुन प्रकट होतं. जिव्हाळ्याने ते ज्ञात होतं,त्या रूपाला तोड नसते."....राजांच्या भावनाविवश नजरेला नजर देण्याची ताकद सईबाईंना राहिली नाही त्यांनी आपलं मस्तक राजांच्या खांद्यावर टेकले आणि राजांच्या करपाशात सई केव्हा विसावल्या हे त्यांचे त्यांनाही कळले नाही...

 

सईबाई ज्वराने जास्तच अशक्त दिसत होत्या, तरी त्यांच्या डोळ्यात हसरेपणा तोच होता, तेच तेज होते, हसतमुख सईबाईंना पाहून राजांना बरे वाटे...सईबाईंच्या डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी राजे नेहमी काळजी घेत आणि सईबाई सुद्धा राजेंची काळजी ओळखून त्यांना सहज आत्मविश्वास देऊन जायच्या...

 

सईबाई म्हणाल्या," अर्धवट डावारून उठून जाणं हा तर स्वभावच माझा.अगदी खरं ठरलं. पहा ना- संसारातून उठून निघाले, सारचं अर्धवट राहिले... "सई!असं बोलू नकोस"राजे व्यथित होऊन म्हणाले, "तू मांडलेले सारे डाव आम्ही पूर्ण करू" सईबाईंनी राजांकडे पाहताच आपला प्राण सोडला आणि सईबाई राजेंना सोडून कायमच्या निघून गेल्या...

 

सईबाईंची आठवण आली की, राजे आकाशात पहात असत,"अगणित नक्षत्रांनी आकाश नटले होते, राजांच्या मनात विचार आला, "आकाशात करोडे नक्षत्र असून देखील ते "#एका_चंद्राची" बरोबरी करू शकत नाही" आणि दुःखावेग   आवरून, गालावरून ओघळणारे अश्रूं चे भान नसलेले राजे उद्गारले, "सई, तू जाऊन शंभू पोरका झाला नाही! आम्ही पोरके झालो!सई, आम्ही!!!

पुन्हा एकदा महाराणी सईबाई सरकार यांना प्रणिपात या आईचे उपकार कधीच फिटणार नाही   🙏🚩🚩


No comments:

Post a Comment