❀ ६ सप्टेंबर ❀ आजचे दिनविशेष & स्मृतिदिन

 

सप्टेंबर

भारत पाकिस्तान दुसरे युद्ध सुरू

************

 

सप्टेंबर १९६५

 

भारत पाकिस्तान युद्ध हे १९६५ साली झालेले दुसरे युद्ध होते. या युद्धाची सुरवात सप्टेंबर १९६५ रोजी झाली नि अखेर २३ सप्टेंबर १९६५ ला झाली. म्हणजे हे युद्ध एकूण २२ दिवस लढले गेले.

 

काश्मीर हे पाकिस्तानात विलीन व्हावे ही सुप्त इच्छा १९४७-४८च्या युद्धानंतर सुद्धा पाकिस्तानने जोपासली होती आणि काश्मीर पादाक्रांत करण्याची संधीच पाकिस्तानचे नेते शोधीत होते. १९६५च्या लढाईला खालील गोष्टी कारणीभूत ठरल्या.

 

अयुबखानाच्या योजनेचे दोन टप्पे होते. पहिल्या टप्प्यात मे १९६५ मध्ये अर्ध्या कच्छवर हक्काचा दावा लावून हल्ला करायचा आणि त्यायोगे भारताचा प्रतिसाद अजमावयाचा, त्याच बरोबर अमेरिकी शस्त्रास्त्रांची चाचणी घ्यायचा त्यांचा मनोदय होता. दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट नंतर १९४७च्या धर्तीवर घुसखोरीकरवी काश्मीरवर कब्जा करण्याचा त्यांचा निर्धार होता.

 

लढाई - पहिला टप्पा

 

कच्छ कारगिल मधील कारवाईमार्च १९६५ नंतर कच्छ सीमेवरील पाकिस्तानी रेंजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. त्याबरोबर ‘बलुचिस्तानचा कसाईम्हणून ओळखला जाणारा जनरल टिक्काखान याच्या नेतृत्वाखाली एक डिव्हिजन सीमेवर पोहचली. प्रथम भारतीय सीमा दलाची सरदार पोस्ट चौकी आणि त्यानंतर २४ एप्रिल १९६५ रोजी विगोकोट बिअरबेट चौक्यांवर पाकिस्तानी सेनेने हल्ले चढवले. जनरल डन्न यांच्या हाताखाली भारतीय लष्कराची एक डिव्हिजन सीमाभागात हलवण्यात आली आणि त्यांनी आपली मोर्चेबंदी सुरू केली. पाकिस्तानने घेतलेल्या चौक्यांवर हल्ले चढवून त्या परत घेण्यात आल्या, परंतु फार मोठ्या प्रमाणात लढाईला तोंड लागले नाही.

 

१६ मे १९६५ रोजी कारगिल क्षेत्रात पाकिस्तान सैन्याने मर्यादित हल्ले चढवले. भारतीय सैन्याच्या १२१ इन्फन्ट्री ब्रिगेडने ते थोपवलेच, पण त्याशिवाय पॉइंट १३६२५ हा पाकिस्तानचा महत्त्वाचा मोर्चा जिंकला. इतरही झटापटी झाल्या. त्यात पाकिस्तानी सैन्याची जबर जीवितहानी झाली. युद्धबंदी नंतर भारतीय सैन्याने घेतलेली दोन ठाणी परत करावी लागली.

 

लालबहादूर शास्त्री यांनी २८ एप्रिलला लोकसभेत आपल्या आवेशयुक्त भाषणात पाकिस्तानला इशारा दिला की, भारताच्या सार्वभौमत्वावर पाकिस्तानने कोठेही आघात केला, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी यथायोग्य रणनीतीचा अवलंब करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही. थोडक्यात, काश्मीर धरून १३०० किमी.च्या आंतरराष्ट्रीय सीमेवर कोठेही हल्ला चढवण्यास भारतीय सैन्य समर्थ असल्याची ती चेतावणी होती. हेशास्त्री डॉक्टरीनम्हणून ओळखले जाते. त्यानंतर मात्र पाकिस्तान नरम पडले. २९ जून १९६५ रोजी दोघांनी ब्रिटिश पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांच्या मध्यस्थीचा युद्धसमाप्तीचा तीन कलमी ठराव स्वीकारला. ती तीन कलमे अशी - जुलै पासून युद्धबंदी, दोन्ही सेनांची जानेवारीच्या स्थितीपर्यंत माघार आणि आंतरराष्ट्रीय लवादाची नेमणूक.

 

लढाई - दुसरा टप्पा :

 

काश्मीर आणि पंजाब यांमधील लढाया : पूर्वयोजने नुसार अयुबखानाने घुसखोरीकरवी काश्मीरवर कब्जा करण्याची कारवाई ऑगस्ट पासून सुरू केली. मध्ययुगीन काळात भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम सेनापतींची नावे दिलेल्या आठ टोळ्यांनी वेगवेगळ्या मार्गाने काश्मीर खोऱ्यात प्रवेश करून श्रीनगरचा ताबा घ्यायचा, हे यामागील प्रमुख उद्दिष्ट होते. यासाठी एकूण तीस हजार भाडोत्री मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानी सैनिकांना गोळा करण्यात आले होते. या घुसखोरीचेऑपरेशन जिब्राल्टरअसे नामकरण करण्यात आले होते.

 

घुसखोरीची बातमी लागल्यावर भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर दिले. १२ ऑगस्ट पर्यंत पाकिस्तानची ही कारवाई कोणतेही उद्दिष्ट साध्य करता पूर्णतया फसली होती. पाकिस्तानच्या फसलेल्या घुसखोरी विरुद्ध प्रत्याघात करण्यासाठी भारतीय सैन्याच्या ६८ माउंटन ब्रिगेडने उरी-पूंच्छ रस्त्यावरील हाजीपीर खिंड जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली. २४ ऑगस्टला कारवाई प्रारंभ करून ३० ऑगस्ट पर्यंत अटीतटीच्या लढाई नंतर हाजीपीरवर कब्जा करण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले.

 

हाजीपीर वरील पराभवामुळे संतापून गेलेल्या अयुबखानाने युद्धबंदी रेषा आणि आंतरराष्ट्रीय रेषा या दोन्हींना संलग्न असलेल्या छांब-जौरीया क्षेत्रावर चढाई करून जम्मू आणि काश्मीर विभागांना जोडणाऱ्या अखनूर पुला पर्यंत धडक मारून तो पूल काबीज करण्याची आणि त्याकरवी दोन भागांमधील संपर्क तोडण्याची महत्त्वाकांक्षी कारवाई हाती घेण्याचे आदेश दिले. या कारवाईलाऑपरेशन ग्रँड स्लॅमअसे नाव देण्यात आले होते.

 

सप्टेंबरला सुरू झालेल्या या मोहिमेला प्रारंभी यश लाभले आणि छांब-जौरीया क्षेत्रातून भारतीय सैन्याच्या तुकड्यांना माघार घ्यावी लागली; परंतु - सप्टेंबर पर्यंत भारतीय लष्कराने हे आक्रमण थोपवून धरले. पाकिस्तानने युद्धबंदी रेषा ओलांडल्यावर लागलीच भारतीय वायुसेनेने युद्धक्षेत्रात प्रवेश केला आणि भारताच्या नॅट विमानांनी त्यांच्यापेक्षा सरस असलेल्या आधुनिक सेबर विमानांची अक्षरशः चाळण केली. अखनूर पुलापासून अजूनही शत्रू बराच दूर होता. त्यानंतर पाकिस्तान सैन्याच्या तुकड्यांना माघारी नेऊन इतरत्र तैनात करण्यात आले. सीमेवरील छांब मात्र पाकिस्तानी सैन्याच्या हातात राहिले.

 

भारताचा प्रत्याघात :

 

पाकिस्तानच्या कारवाईला मुहतोड जवाब देण्यासाठी भारतीय लष्कराने पंजाब मध्ये तीन अक्षांवर पाकिस्तानवर चढाई करण्याचा निर्णय घेतला. पहिला, अमृतसर ते लाहोर मार्गावर इछोगिल कालवा ओलांडून लाहोर पर्यंत पोहचायचे. दुसरा, जम्मू सियालकोट मार्गावर आगेकूच करून सियालकोट आणि लाहोर दरम्यान पाचर मारायची आणि तिसरा, राजस्थान सीमा पार करून पाकिस्तानात हल्ले चढवायचे.

 

अमृतसर अक्षावर बर्की आणि डोग्राई यांमध्ये घनघोर लढाया झाल्या. खेमकरणच्या लढाईत कर्नल (नंतर जनरल) अरुणकुमार वैद्य यांना महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले. सियालकोट क्षेत्रातील लढाईत कर्नल .बी. तारापोर यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेअसल उत्तरची लढाई दुसऱ्या महायुद्धा नंतरची रणगाड्या मधील सर्वश्रेष्ठ लढाई म्हणून ती गणली जाते. त्यात हवालदार अब्दुल हमीदला परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

 

उपसंहार :

 

भारत आणि पाकिस्तानने हे युद्ध वाढवू नये म्हणून राष्ट्रसंघाचे अध्यक्ष थांट यांनी स्वतः दोन्ही देशांना भेट दिली. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दबाव आल्यामुळे २३ सप्टेंबर रोजी दोन्ही देशांच्या संमतीने युद्धबंदी जाहीर करण्यात आली. सोव्हिएट रशियाचे प्रमुख कोसिजिन यांच्या मध्यस्थीने १० जानेवारी १९६६ रोजी अयुबखान आणि शास्त्री यांच्यात ताश्कंद येथे करार झाला. त्यानुसार दोन्ही देशांनी आपापल्या सेना युद्धबंदी रेषेमागे घ्याव्यात यावर संगनमत झाले.

 

या युद्धात कोणाचा विजय आणि कोणाचा पराभव झाला, हे सांगणे कठीण आहे. भारताने ७८० चौ.किमी. तर, पाकिस्तानने १२८ चौ.किमी. प्रदेश जिंकला होता. भारताने शत्रूचे ४७१ रणगाडे तर, पाकिस्तानने भारताचे १२८ रणगाडे निकामी केले होते. भारताने शत्रूची १२८ विमाने तर, पाकिस्तानने भारताची ३५ विमाने पडली होती. या बोलक्या आकडेवारीवरून भारताची सरशी झाली असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही. अयुबखानाने हे युद्ध चालू केले, परंतु त्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात ते आणि पाकिस्तानी सैन्यदले पूर्णपणे अयशस्वी ठरले, हे मात्र निर्विवाद.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

सप्टेंबर

वैज्ञानिक सर एडवर्ड व्हिक्टर ॅपलटन जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १८९२ (यॉर्कशर)

 स्मृती - २१ एप्रिल १९६५ (एडिंबरो)

 

सर एडवर्ड व्हिक्टर ॅपलटन हे इंग्लिश भौतिकीविज्ञ. १९४७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म यॉर्कशर मधील ब्रॅडफर्ड येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथील सेंट जॉन्स कॉलेज मध्ये झाले, परंतु पहिल्या महायुद्धात सैन्यांत दाखल होण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. युद्धकालात सिग्नल ऑफिसर म्हणून काम करीत असताना त्यांना रेडिओसंबंधी आवड निर्माण झाली युद्धानंतर केंब्रिजला परतल्यावर त्यांनी या विषयाचा अभ्यास सुरू केला. १९२० मध्ये कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत ते प्रयोगिक भौतिकीचे साहाय्यक निर्देशक आणि नंतर १९२२ मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक होते. १९२४-३६ पर्यंत लंडन विद्यापीठात त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात ते भौतिकीच्या प्राध्यापकपदावर होते.

 

वातावरणातील केन्ली हेव्हीसाइड थराचे अस्तित्व त्यांनी प्रायोगिक रीत्या दाखवून दिले त्याची उंचीही मोजली. या थराच्याही वरती जमिनीपासून २३० किमी. उंचीवर पृथ्वीभोवती रेडिओ लघुतरंग परावर्तित करणारा आणखी एक थर ॅपलटन यांना आडळून आला. या थराला 'ॅपलटन थरअसे नाव आता मिळालेले आहे. अशाच प्रकारच्या अनेक थरांनी आयनांबर तयार झालेले आहे, असे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखवले.

 

त्यांना रॉयल सोसायटीचे १९२६ मध्ये सदस्यत्व १९४१ मध्ये 'नाइट' हा किताब मिळाला. ॅपलटन यांना मिळालेल्या अनेक सन्मानांत अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ एंजिनियर्सचे मॉरिस लीपमान पारितोषिक (१९३९), इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे फॅराडे मेडल (१९४६) आणि १९४७ मध्ये वातावरणासंबंधीच्या भौतिकीतील संशोधन कार्याबद्दल मिळालेले नोबेल पारितोषिक यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

 

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटनच्या शास्त्रीय औद्योगिक संशोधन खात्याचे कायम चिटणीस युद्धानंतर अणुशक्तीचा आणि कार्यक्षण शास्त्रज्ञांचा उपयोग कसा करून घ्यावा याकरिता ब्रिटिश सरकारने नेमलेल्या समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते दूरचित्रवाणी समितीचे सभासद आणि नॅशनल कमिटी ऑफ रेडिओ टेलिग्राफचे चिटणीस होते. ते एडिंबरो येथे मृत्यू पावले.

 

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

सप्टेंबर

शास्रज्ञ जॉन डाल्टन जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १७६६ (इंग्लंड)

स्मृती - २७ जुलै १८८४

 

जॉन डाल्टन हे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होते. 'आधुनिक अणु सिद्धांता' मांडण्यासाठी जॉन डाल्टनची ओळख आहे.

 

डाल्टनचा जन्म क़्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या कुम्बरलॅन्ड प्रदेशातील कॉकरमाऊथ च्या जवळ असलेल्या इगल्सफील्ड या गावी सप्टेंबर १७६६ रोजी झाला. त्याचे वडील विणकर होते. डाल्टनचे शिक्षण गावाजवळच असलेल्या पर्डशाव-हॉल खाजगी शाळेत झाले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी डाल्टन मॅंचेस्टरच्यानव महाविद्यालय” (न्यू कॉलेज) येथे निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित विषय शिक्षक पदावर रुजू झाला. येथे तो त्याच्या वयाच्या चौतिसाव्या वर्षापर्यंत काम केले. निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित याच विषयात, खाजगी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे असे डाल्टननी ठरविले आणि प्रारंभ केले.

 

अर्थार्जनासाठी निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित या विषयात काम करीत असला तरी त्याच्या आवडीचा विषय म्हणजे हवामानशास्त्र. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांना भेटी देऊन तेथील हवामानासंबंधी माहिती एकत्र करण्याचा त्याला छंद होता. हवेतील वायू घटक पृथ्थकरण करण्याच्या निमित्ताने, डाल्टनला रसायन शास्त्राची गोडी लागली.

 

त्या काळात, हायड्रोजन वायु हा सर्वात हलका असल्याचे ज्ञात होते. याच माहितीचा आधार घेऊन डाल्टननी इतर वायू (इथिलीन, मिथेन, ऑक्सिजन, अमोनिया, इत्यादी), अभ्यासाकरिता निवडले. मिथेन या वायुच्या अभ्यासादरम्यान डाल्टनला अणु कल्पना सुचली असल्याचे बऱ्याच माहिती स्रोतामध्ये आढळते.

 

प्रयोगातील आपल्या सर्व निरीक्षण नोंदींच्या आधारे डाल्टननी प्रथमतः हवेतील सर्व वायूंचे रासायनिक वर्गीकरण केले. 'हवेतील वायूंचे रासायनिक वर्गीकरण' या शीर्षकांतर्गत डाल्टननी ३० ऑक्टोबर १८०१ रोजी, एक पुस्तक प्रकाशित केले.

 

डाल्टनच्या मते, पदार्थाचा लहानात लहान (ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही) घटक म्हणजे अणु. एकाच मूलद्रव्याचे सर्व अणु सारखेच असतात. दोन मूलद्रव्यांचे अणु संयोगाने तयार होणारा पदार्थ भिन्न गुणधर्म दाखवितो.

 

सर्व रासायनिक पदार्थांची अणु रचना स्पष्ट करण्याकरिता, डाल्टननी पुढे, अणु सिद्धांत मांडला. 'अणुचे विभाजन करता येत नाही' हे एकच तत्व, आधुनिक विज्ञानाला अमान्य आहे. डाल्टनच्या अणु-वादातील इतर सर्व तत्व, सर्वामान्य आहेत.

 

जॉन डाल्टन, सृष्टीचे 'रासायनिक आणि भौतिक' मूळ रचना प्रस्तावित करणारा एक नवाविज्ञान यात्री”.

 

२७ जुलै १८४४ रोजी जॉन डाल्टनचे निधन झाले.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

सप्टेंबर

संशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९२१

स्मृती - सप्टेंबर २०१२

 

बारकोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म सप्टेंबर १९२१ रोजी झाला.

 

In 1948 Bernard Silver, a graduate student at Drexel Institute of Technology in Philadelphia, Pennsylvania, US overheard the president of the local food chain, Food Fair, asking one of the deans to research a system to automatically read product information during checkout. Silver told his friend Norman Joseph Woodland about the request, and they started working on a variety of systems. Their first working system used ultraviolet ink, but the ink faded too easily and was expensive.

 

Convinced that the system was workable with further development, Woodland left Drexel, moved into his father's apartment in Florida, and continued working on the system.

 

His next inspiration came from Morse code, and he formed his first barcode from sand on the beach. "I just extended the dots and dashes downwards and made narrow lines and wide lines out of them." To read them, he adapted technology from optical soundtracks in movies, using a 500-watt incandescent light bulb shining through the paper onto an RCA935 photomultiplier tube (from a movie projector) on the far side. He later decided that the system would work better if it were printed as a circle instead of a line, allowing it to be scanned in any direction.

 

On 20 October 1949, Woodland and Silver filed a patent application for "Classifying Apparatus and Method", in which they described both the linear and bull's eye printing patterns, as well as the mechanical and electronic systems needed to read the code.

 

The patent was issued on 7 October 1952 as US Patent 2,612,994. In 1951, Woodland moved to IBM and continually tried to interest IBM in developing the system. The company eventually commissioned a report on the idea, which concluded that it was both feasible and interesting, but that processing the resulting information would require equipment that was some time off in the future.

 

IBM offered to buy the patent, but the offer was not accepted. Philco purchased the patent in 1962 and then sold it to RCA sometime later.

 

नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचे सप्टेंबर २०१२ रोजी निधन झाले.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया/इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

अभिनेता रवी पटवर्धन जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९३७

स्मृती - डिसेंबर १९२० (ठाणे)

 

जेष्ठ मराठी हिंदी नाट्य चित्रपट अभिनेता रवी पटवर्धन यांचा जन्म सप्टेंबर १९३७ रोजी झाला.

 

ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटाच्या जमान्यात रवी पटवर्धन यांनी अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९६४  मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत गो.. पारखी यांचेकथा कोणाची व्यथा कुणालाहे नाटक सादर झाले. त्यात रवी पटवर्धन होते. रिझर्व्ह बॅंकेच्या स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्याची त्यांनी लेखक पारखी यांच्याकडे प्रवानगी मागितली, त्यांनी ती दिली आणि हा प्रयोग झाला.

 

यशवंत पगार यांच्याश्रीरंगसाधनाया नाट्यसंस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणार होते. त्यांनी नाटकाचा पहिला प्रयोगही जाहीर केला होता, पण काही कारणाने त्यांचे नाटक बसले नव्हते. दरम्यान नुकताच या नाटकाचा प्रयोग केला असल्यानेतुम्ही आमच्या नाट्यसंस्थेतर्फे प्रयोग सादर कराल काअशी विचारणा पगार यांनी केल्यावर बॅंकेचाच कलाकार संच घेऊन पटवर्धनांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर केले. रवी पटवर्धन या नाटकातमुकुंद प्रधानही मुख्य भूमिका करत होते.

पुढे यशवंत पगार यांच्याप्रपंच करावा नेटकाया व्यावसायिक नाटकातही रवी पटवर्धन यांनी काम केले.

 

१९७० मध्येनाट्यनिकेतनच्या वसंत सबनीस यांनी लिहिलेल्या आणि मो.. रांगणेकर यांनी दिग्दर्शित केलेल्याहृदयस्वामिनीनाटकात पटवर्धनांनी काम केले, त्यावेळी नाटकात त्यांच्या सोबत शांता जोग होत्या. इंडियन नॅशनल थिएटरने वि.वा. शिरवाडकर यांनी लिहिलेलेबेकेटहे नाटक रंगभूमीवर आणले. सतीश दुभाषी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकात रवी पटवर्धनांनाबेकेटची भूमिका मिळाली. दुभाषी त्यातहेंन्रीदकरायचे. या नाटकानंतर वि.वा. शिरवाडकर यांच्याशी स्नेहसंबंध जुळले. पुढे त्यांच्या; कौंतेय आनंद, वीज म्हणाली धरतीला; या नाटकांतून भूमिका करायला मिळाल्या.

 

पुढे रवी पटवर्धनांनी विजया मेहता यांनी बसविलेल्यामुद्राराक्षसया नाटकात अमात्य राक्षस, जोशी अभ्यंकर खून खटल्यावर आधारितजबरदस्तया नाटकातपोलीस अधिकारीया भूमिका केल्या. विषवृक्षाची छाया, मला काही सांगायचंय, तुघलक, अपराध मीच केला; आदी नाटके केली.

 

१९६५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्याभाऊबंदकीनाटकात रवी पटवर्धांना काम मिळाले. त्यांना या नाटकामुळे नानासाहेब फाटक, केशवराव दाते, मामा पेंडसे, मा.दत्ताराम, दाजी भाटवडेकर, दुर्गा खोटे या दिग्गजा बरोबर काम करायला मिळाले.

 

'अरण्यक' हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरी बरोबर केले आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत आहेत. वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी श्याम मानव यांच्याकडून स्वसंमोहन शास्त्र शिकून घेतले. या विषयावरच्या साहित्यावर खूप अभ्यास केला त्या शास्त्राचा वापर करून स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली. शिवाय आत्मविश्वास हरवलेल्या व्यक्ती आणि व्याधिग्रस्तांवरही रवी पटवर्धन यांनी या उपचार पद्धतीचा वापर केला त्याचा त्यांना खूप फायदा करून दिला.

 

रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. उंबरठा, बिन कामाचा नवरा, शेजारी शेजारी, अशा असाव्या सुना, तक्षक, तेजाब, नरसिंह, प्रतिघात, राजू बन गया जेंटलमेन, चमत्कार, युगपुरुष असे अनेक हिंदी मराठी चित्रपट त्यांनी साकारले.

 

रवी पटवर्धनांनी अग्गंबाई सासूबाई, आमची माती आमची माणसं, तेरा पन्नें (हिंदी मालिका), महाश्वेता, लाल गुलाबाची भेट अशा दूरचित्रवाणी कार्यक्रम मालिकात भूमिका केल्या आहेत. दूरदर्शनवरच्याआमची माती आमची माणसंया कार्यक्रमातगप्पागोष्टीनावाचा एक २२ मिनिटांचा उपकार्यक्रम असे. ‘गप्पागोष्टींबमध्ये रवी पटवर्धनवस्ताद पाटीलअसत. त्यांची ही भूमिका ज्यांनी पाहिली त्यांच्या ती अजूनही स्मरणात असेल. शिवाजी फुलसुंदर हे त्या कार्यक्रमाचे निर्माते होते. मनोरंजना बरोबरच शेतकऱ्यांचे प्रबोधन होईल, असा हागप्पागोष्टीनामक कार्यक्रम होता.

 

पटवर्धनांचा रेडिओसाठी प्रायोजित कार्यक्रम करणारा एक चमू होता. त्यातले मानसिंग पवार हे माया गुजर, राजा मयेकर, वसंत खरे, जयंत ओक, पांडुरंग कुलकर्णी आणि रवी पटवर्धनांना घेऊन गप्पागोष्टी सादर करीत. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला कीबीबीसीया जगविख्यात वृत्तवाहिनी कडूनही त्याची दखल घेतली गेली. १०० भाग प्रसारित झाल्यानंतर तो कार्यक्रम थांबविला. हा कार्यक्रमवन शॉट वन टेकव्हायचा. चित्रीकरणापूर्वी थोडा वेळ तालीम करुन थेट सादरीकरण व्हायचे.

 

वयाच्या ८० व्या वर्षी भगवत गीतेचे ७०० श्लोक पाठ करून त्यांनी शृंगेरी मठाच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला होता. नुकताच रवी पटवर्धन यांना झी नाट्य गौरव २०२० चा जीवन गौरव पुरस्कार जाहीर  झाला आहे.

 

रवी पटवर्धन यांचे डिसेंबर १९२० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

कलाकार कमलाबाई कामत जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९०१ (मुंबई)

स्मृती - १८ मे १९९७

 

स्त्री भूमिका पुरुषांनीच करण्याच्या काळात अशा भूमिका करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री कमलाबाई कामत उर्फ कमलाबाई गोखले यांचा जन्म सप्टेंबर १९०१ रोजी झाला.

 

कमलाबाई गोखले यांचे वडील उत्तम किर्तनकार तर आई दुर्गाबाई कामत आवडीने सतार वाजवत. त्यामुळे कानावर सतत सुरेल स्वर आणि मंजुळ स्वर ऐकतच कमलाबाई लहानाच्या मोठ्या होत होत्या. पण घराची हलाखीची अवस्था असल्याने अवघ्या पाचव्या वर्षापासून कमलाबाईंनी मेळा तसंच जत्रांमधून कामं करायला सुरुवात केली. आणि याच मेळ्याच्या माध्यमातून त्यांच्यावर संवाद, संगीत आणि अभिनयाचे धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली. याचा पुरेपुर उपयोग पुढे कमलाबाईंना मुकपट तसेच संगीत नाटकांसाठी झाला.

 

भारतीय सिनेसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती २० व्या शतकाच्या आरंभी. त्याकाळी आपल्या समाजात समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणाऱ्या कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती. पण, त्याकाळी एक उणीव मात्र या नाटकांमध्ये कायमची जाणवायची ती म्हणजे स्त्री पात्रांची. अर्थात स्त्री भुमिकाही त्याकाळी पुरुष साकारत असत.

 

याच काळात म्हणजे १९१३ साली चित्रपट युग सुरु झाले ते राजा हरिश्चंद्र पासून. त्या बोलपटाच्या यशानंतर दादासाहेब फाळकेंचा मोहिनी भस्मासुर या मुकपटाचा प्रयोग सुरु झाला होता. आपल्या आगामी बोलपटांमध्ये स्त्री पात्र ही स्त्री कलाकारांनी साकारावीत या मतांचे दादासाहेब फाळके होते. त्याचवेळी कोणीतरी कमला कामत नावाच्या लहान मुलीचं नाव दादासाहेब फाळकेंना सुचवलं.

 

फाळकेंच्या मोहिनी भस्मासुर या मुकपटात मोहिनीच्या व्यक्तिरेखेसाठी कमलाबाईंची निवड झाली आणि त्यांच्या रुपानं, रुपेरी पडद्याला एक स्त्री अभिनेत्रीचा, स्त्री कलाकाराचा चेहरा मिळाला. विशेष म्हणजे मोहिनी भस्मासुर या चित्रपटात कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांची सुद्धा पार्वतीच्या छोट्या भूमिकेसाठी निवड झाली. सर्व स्तरातून या भूमिकेचं स्वागत झालं आणि पुढे कमलाबाईंच्या अभिनयाची कमान ही चढतीच राहिली. पुढे अनेक मुकपटांमधून त्यांनी परिपूर्ण भूमिका साकारुन स्त्री कलाकारांना एकाअर्थी या क्षेत्रात येण्यासाठी हे उदाहरण आपल्या रुपानं ठेवलं असं ही म्हणता येईल.

 

चित्रपटांपेक्षाही तो काळ नाटकांचाच होता. पण अशावेळी संगीत नाटकांतील महत्वपूर्ण अशी किर्लोस्कर कंपनी बंद पडल्यानं, रघुनाथराव गोखले यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीची स्थापना केली आणि गद्य नाटके रंगभूमीवर सादर होऊ लागली. या नाटकांमधून कमलाबाईंनी भूमिका साकारल्या पण अशातच रघुनाथरावांचे निधन झाले आणि रामभाऊ गोखले यांच्याकडे चित्ताकर्षकची सूत्रे आली. त्यांनी पुन्हा संगीत आणि पौराणिक नाटकांची निर्मिती सुरु केली. पुंडलिक तसेच मृच्छकटिक ही नाटकं चित्ताकर्षक तर्फे सादर होऊ लागली होती. या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रमुख भुमिका केल्या. त्यामुळे नाट्यसंगीतालाही सुरेल बाज लाभला. त्यावेळेला कमलाबाई यांच्या खाजगी जीवनात मोठे परिवर्तन झाले.

 

चित्ताकर्षकचे मालक राजाभाऊ गोखले यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध होऊन कमलाबाई गोखले झाल्या. पती-पत्नी दोघेही एकाच क्षेत्रातले असल्यानं त्यांचं बिर्हा्डही सतत फिरत राहिलं. पण दुर्दैवाने चित्ताकर्षक मंडळी नुकसानित आल्यानं कंपनीला टाळं लागलं. अनेक प्रश्न भेडसावत होते. पण कमलाबाईंनी हार मानली नाही.

 

त्यांनी मनोहर स्त्री संगीत मंडळी नावाची संस्था स्थापन केली. या काळात फक्त स्त्रियांची नाट्यकंपनी असणं हे कला आणि मनोरंजन सृष्टीसाठी सूचक असं पाऊल होतं आणि या नाट्यकंपनीचं वैशिष्ट्य हेच की स्त्री आणि पुरुषांची पात्र स्त्रियाच सादर करत. या सुमारास नाट्यकलाप्रसाद या नाट्यकंपनीनं अस्पृश्यता निवारण हा सामाजिक प्रश्न रंगभूमीवर आणला, ज्या विषयाचा उच्चार करणंही धाडसाचं होतं, ते :शापच्या माध्यमातनं जनतेसमोर आले. कमलाबाईंनी काळाची गरज ओळखुन या नाटकात समर्थपणे भुमिका साकारली.

 

पेशव्यांचा पेशवा या ऐतिहासिक नाटकातली त्यांची आनंदीबाईची भूमिका, सौभद्र मधील सुभद्रा अर्जुन, मानापमान मधील धैर्यधर (पुरुषपात्र) या व्यक्तिरेखा तर गाजल्याच पण विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, प्रबोधनकार ठाकरे यांसारख्या नामवंत लेखकांच्या नाटकांमधून कमलाबाईंनी प्रत्येक व्यक्तिरेखेला जिवंतपणा प्राप्त करुन दिला.

 

तब्बल २०० पेक्षा ही अधिक नाटकं, मुकपट त्यासोबतच कारकिर्दीत ३५ पेक्षाही अधिक चित्रपटांतून नायिका तसेच स्त्रीप्रधान भूमिकांमुळे कमलाबाई गोखले कायमच लक्षात राहतात. त्यांच्या कार्याची दखल घेत आणि चाळीस वर्ष या क्षेत्रासाठी योगदान दिल्याबद्दल, त्यांचा वयाच्या ७० व्या वर्षी दिलीपकुमार यांच्या हस्ते सत्कार झाला.

 

रिना मोहन या बंगाली दिग्दर्शिकेने हिंदीमध्ये त्यांच्यावर टेलिफिल्मही बनवली. चंद्रकांत गोखले, लालजी गोखले सूर्यकांत गोखले ही त्यांची तीन मुले. लालजी गोखले आणि सूर्यकांत गोखले हे दोघे तबलावादक होते चंद्रकांत गोखले यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या कलेचा वारसा अभिनयातून आपल्यासमोर आणला आणि विक्रम गोखले यांच्या रुपात आज कमलाबाईंची तिसरी पिढी या क्षेत्रात समर्थपणे कारकिर्द घडवतेय.

 

कमलाबाई गोखले यांचे १८ मे १९९७ रोजी निधन झाले.

 

कमलाबाई रघुनाथ गोखले यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

निर्माता यश जोहर जन्मदिन

************

 

जन्म - सप्टेंबर १९२९

स्मृती - २६ जुन २००४

 

प्रसिद्ध चित्रपट निर्माता यश जोहर यांचा जन्म सप्टेंबर १९२९ रोजी झाला.

 

कल हो ना हो, कुछ कुछ होता है; यश जोहर या   ब्लॉकबस्टर चित्रपटाचे निर्माते म्हणून प्रसिध्द होते. त्याचे चित्रपट हे भव्य सेट्स आणि विदेशी ठिकाणी शुटींग केलेले ही त्याची खासियत होती.

 

१९७७ साली यश जोहर यांनी त्यांच्या स्वत:च्या नावाने धर्म प्रॉडक्शन ही कंपनी सुरू केली. १९८० ते १९९० मध्ये त्यांनी अग्निपथ, सारखे चित्रपट दिले.

 

यश जोहर यांचे २६ जुन २००४  रोजी निधन झाले.

 

यश जोहर यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : विकी पिडीया

 

************

************

सप्टेंबर

लेखिका मीना देशपांडे स्मृतिदिन

************

 

स्मृती - सप्टेंबर २०२० (अमेरिका)

 

प्रख्यात मराठी लेखिका मीना देशपांडे या आचार्य अत्रे यांच्या कन्या होत.

 

मीनाताईंवर लहानपणापासून साहित्याचे समाजकारणाचे सखोल संस्कार झाले. यात आचार्य अत्रे यांचा जसा मोठा वाटा होता, तसाच त्यांच्या आई शिक्षणतज्ज्ञ सुधाताई अत्रे लेखिका बहीण शिरीष पै यांचाही होता. मीनाताई त्यामुळेच आईचा कृतज्ञतेने आजही उल्लेख करत असत. लेखक म्हणून त्यांची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जाणीव सतत विकसित होत राहिली.

 

आचार्य अत्र्यांच्या आठवणी सांगणारेअश्रूंचे नाते’, आचार्य अत्रे - प्रतिभा आणि प्रतिमा, पपा - एक महाकाव्य अशी साहित्यसंपदा त्यांनी लिहिली. याशिवाय ये तारुण्या ये, हुतात्मा, महासंग्राम असे कथा कादंबऱ्यांचे लेखनही त्यांनी केले. त्यांचे पती सुधाकर देशपांडे हे बांद्रे-मुंबई येथील नॅशनल कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक तसेच उपप्राचार्य होते.

 

मीना सुधाकर देशपांडे यांची साहित्य संपदा :

* आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा (संपादित, अत्र्यांच्या लेखनाविषयी अनेक लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)

* अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र (खंड --)

* पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)

* मॅरिलीन मन्रोक (अनुवादित कादंबरी)

* मी असा झालो (आचार्य अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी ह्या पाच-खंडी आत्मचरित्रातून आणि त्यांच्याच मी कसा झालो या पुस्तकांतून निवडलेल्या उताऱ्यांचे संपादित चित्रमय संकलन, सहसंपादिका शिरीष पै)

* ये तारुण्या ये (कथासंग्रह)

* हुतात्मा (कादंबरी)

 

मीना देशपांडे यांचे सप्टेंबर २०२० रोजी अमेरिकेत वयाच्या ८६ व्या वर्षी दु:खद निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

सप्टेंबर

सरोदवादक अल्लाउद्दीन खाँ स्मृतिदिन

************

 

जन्म - ऑक्टोबर १८६२ (बांगलादेश)

स्मृती - सप्टेंबर १९७२ (मैहर)

 

उस्ताद अलाउद्दीन खान हे एक भारतीय संगीतज्ञ अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक होते. ते सरोदवादनातील श्रेष्ठतम वादक मानले जातात. पंडित रविशंकर निखिल बॅनर्जी हे त्यांचेच शिष्य होत.

 

उस्ताद अलाउद्दीन खाँ एक बहुप्रसिद्ध सरोद वादक थे साथ ही अन्य वाद्य यंत्रों को बजाने में भी पारंगत थे। वह एक अतुलनीय संगीतकार और बीसवीं सदी के सबसे महान संगीत शिक्षकों में से एक माने जाते हैं। सन् 1935 में पंडित उदय शंकर के बैले समूह के साथ खाँ साहब ने यूरोप का दौरा किया और इसके बाद काफी लंबे समय तक उत्तराखंड के अल्मोड़ा मे स्थित 'उदय शंकर इण्डिया कल्चर सेंटर' से भी जुड़े रहे। अपने जीनन काल में उन्होंने कई रागों की रचना की

************

🌹 सप्टेंबर 🌹

गायिका सुषमा श्रेष्ठ यांचा वाढदिवस

************

 

जन्म - सप्टेंबर १९६० (मुंबई)

 

गायिका सुषमा श्रेष्ठ उर्फ पूर्णिमा श्रेष्ठ यांचा आज वाढदिवस.

 

आजच्या पार्श्व गायिका पूर्णिमा म्हणजेच सुषमा श्रेष्ठ होत. सुषमा श्रेष्ठ या संगीतकार भोला श्रेष्ठ  यांच्या कन्या होत. सुषमा श्रेष्ठ यांनी बाल गायिका म्हणून गायलेलीतेरा मुझसे है पहले का नाता कोईक्या हुआ तेरा वादाखूपच गाजली होती.

 

'अंकुश' या चित्रपटातील 'इतनी शक्ती हमे देना दाता' हे घनश्याम वासवानी यांनी लिहलेली प्रार्थना आजही काही शाळांत म्हटली जाते.

 

पूर्णिमा यांनी गोवींदा, करीष्मा यांच्या चित्रपटातुन 'तुझे मिर्ची लगी तो मैं क्या करु' कींवा 'मैं सायकल पें रहा था तु टमटम में जा रही थी' अशी गाणी म्हणुन बॉलीवूड गाजवले होते.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

🌹 सप्टेंबर 🌹

अभिनेता राकेश रोशन यांचा वाढदिवस

************

 

जन्म - सप्टेबर १९४९ (मुंबई)

 

बॉलिवूडचे अभिनेता दिग्दर्शक निर्माता राकेश रोशन यांचा आज वाढदिवस.

 

राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून १९७० मध्ये 'घर घर की कहानी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला.

 

खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमा मध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'खुदगर्ज' या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली.

 

काला बाजार, किशन कन्हैया, करण अर्जुन, कहो ना प्यार है, कोई मिल गया, क्रिश; या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन त्यांनी केले.

 

हृतिकला त्यांनी 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. 

 

राकेश रोशन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬

 

      🤔 कुतूहल 🤔

 

🎯 गणित शिक्षकाचे मनोगत

 

सप्टेंबर हा शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस! शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना आदरभावना असतेच पण गणिताचा शिक्षक बहुतेकदा अप्रिय या सदरात मोडणारा, कारण गणित विषय डोक्यावरून जातो असे अनेक मुलांना वाटते. एकदा ही भावना पक्की झाली की मग ती दूर करणे महाकठीण! त्यामुळे विद्यार्थी गणितप्रेमी कसे होतील ही गणिताच्या शिक्षकापुढील नेहमीची समस्या! विशेषत: शालेय शिक्षकाच्या, कारण तिथे गणित अनिवार्य आहे. ‘नेमके आणि अचूकहा गणिताचा मूलमंत्र आहे, जो तसे पाहिल्यास प्रत्येक क्षेत्रात आवश्यक असतो. पण हे लहान मुलांच्या मनावर कसे बिंबवणार? इथेच शिक्षकाच्या कल्पकतेचा कस लागतो. पाढे शिकवताना, ते कसे तयार होतात? त्यांच्यात काही विशेष आकृतिबंध दिसतात का? पाढय़ांमुळे आकडेमोड कशी सोपी होते? याची गमतीदार उदाहरणे वर्गात दिली तर लहान मुले छान रमतात. मोठय़ा वर्गातली मुले सरावासाठी रोज पाढे म्हणायला, लिहायला कंटाळतात. मग काहीतरी मार्ग काढला तर? रोजच्या दिनांकाचा एकच पाढा सर्वानी म्हणायचा आणि लिहायचा. आणि ३१ तारखेला सुट्टी! एवढे तरी मुले आनंदाने करतात. बालवयातील संस्कार इतका दृढ असतो की भारतीय प्रौद्योगिकी संस्थानात (आयआयटी) शिकणारी दोन मराठी मुले, एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आकडेमोड करताना मनात पाढेच म्हणत असत.

 

गणित कठीण वाटण्याचे एक कारण म्हणजे त्यातील पारिभाषिक शब्दांचा, कृतींचा अर्थ माहीत नसणे. भाषामाध्यम कोणतेही असो, परिभाषेत खूप गुणधर्म दडलेले असतात. उदाहरणार्थ, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, बहुपदी या शब्दांमध्ये जो अर्थ व्यक्त होतो तोच इंग्रजीत मोनोमिअल, बायनॉमिअल, ट्रायनॉमिअल, पॉलिनॉमिअल यांमधून होतो. समीकरण- इक्वेशन या शब्दांतच दोन बाजू समान- इक्वल हा अर्थ आहे. मग एकाच वेळी सत्य असतात ती एकसामयिक (सायमल्टेनिअस) समीकरणे. इथेसामयिकहा शब्द आहे, ‘सामाईकनव्हे. समय म्हणजे वेळ, आणि एकसामयिक म्हणजे एकाच वेळेची, एकत्र सोडवण्याची! सामाईक म्हणजे साधारण/ सर्वाचा/ सर्वासाठी, कॉमन! म्हणून संख्यांच्या सामाईक विभाजकांमधील सर्वात मोठा तो महत्तम सामाईक विभाजक आणि सामाईक विभाज्यांमधील सर्वात लहान तो लघुतम सामाईक विभाज्य. येथे महत् = मोठे आणि लघु = लहान. म्हणून महत्तम आणि लघुतम (लघुत्तम नव्हे!) असे शब्द. मानवी भाषा आणि गणित यांची एकमेकांत गुंफण आहे. शब्दमैत्री झाली की गणित आवडू लागेल! भरपूर आकृत्याही गणिती संबोध स्पष्ट करण्यास मदत करतात.

गणिताचा पाया भक्कम असलेल्या व्यक्ती कारकीर्दीच्या क्षेत्रात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शाळेतच गणिताशी मैत्री कशी जुळावी आणि ती टिकावी याबद्दलचे विचारमंथन आगामी लेखांतून वाचू.

 

डॉ. मेधा लिमये

 

office@mavipamumbai.org

➖➖➖➖➖➖➖

कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा  ! ! !

 📡 जय विज्ञान🔬

संकलक - दिपक तरवडे

 

दै_लोकसत्ता

दिनांक- सप्टेंबर २०२१

➖➖➖➖➖➖➖

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर Request टाइप करुन (फक्त whatsapp किंवा Telegram वरच) पाठवा.

Norman Joseph Woodland

 

Inventors of the barcode

 

Born   - September 6, 1921

           

Norman Joseph Woodland (also known as N. Joseph Woodland and N. J. Woodland; September 6, 1921 – December 9, 2012) was best known as one of the inventors of the barcode, for which he received US Patent 2,612,994 in October 1952.

Barcode

In 1948, Bernard Silver, a fellow Drexel Institute of Technology grad student with Woodland, overheard a supermarket executive asking the dean of students to figure out how to capture product information automatically at checkout. The dean turned down the request, but Silver went on to mention the problem to Woodland. After working on some preliminary ideas, Woodland was persuaded that they could create a viable product.

 

संकलक - दिपक तरवडे

 

https://m.facebook.com/vidnyandinvishesh

 

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

 

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर Request टाइप करुन (फक्त whatsapp किंवा Telegram वरच) पाठवा.

📕 त्से त्से माशी म्हणजे काय ? 📕

 

तुम्ही म्हणाल काय बुवा हे नाव! त्से त्से माशी ही घरात नेहमी दिसणाऱ्या माशीसारखीच एक प्रकारची माशी आहे. त्से त्से माशी घरातील माशी ह्यांच्यात बरेच साम्य आहे. त्से त्से माशी अर्धा इंच लांब असते तिचा रंग पिवळसर किंवा गडद तपकिरी असतो. कात्रीच्या पात्यांसारखे पंख असलेल्या या माशीची सोंड खूप तीक्ष्ण मजबूत असते. या सोंडेनेच ही माशी चावते त्वचेला छिद्र पाडून रक्त प्राशन करते. आपल्या सुदैवाने ही खतरनाक माशी आफ्रिका खंडात आढळते. आपल्याकडे ती दिसून येत नाही. त्से त्से माशी सुमारे १०० दिवस जगते. ती अंडी घालता सरळ अळ्यांनाच जन्म देते. त्से त्से माशा माणसांना, पक्ष्यांना किंवा प्राण्यांनाही चावतात. या माशा प्रामुख्याने दिवसाच चावे घेतात. या माशांमुळे 'स्लिपींग सिकनेस' ह्या रोगाचा प्रसार होतो. 'ट्रिपॅनोसोमा ब्रूसी' नावाचे या रोगाचे जंतू त्से से माशीमुळे निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. अशा व्यक्तीला सुरुवातीला ताप येतो. तापासोबत शरीरातील लसिकाग्रंथी मोठ्या होतात, सूजतात. कालांतराने मेंदूवर परिणाम होतो. हा रोग झालेली व्यक्ती अशक्त होत जाते वर्ष-दीड वर्षात मरण पावते. ह्या गंभीर रोगाचे त्यामुळेच दूरगामी, सामाजिक आर्थिक परिणाम होतात. " चेहेऱ्यावरची माशीदेखील उडत नाही!" असे आपण गमतीने म्हणतो. पण जर देश आफ्रिकेतला असेल आणि माशी 'त्से त्से' असेल तर मात्र खैर नाही. कारण अशी माशी आपल्या प्राणावरच बेतू शकते. त्से त्से माशा राहतात ती झाडेझुडपे नष्ट करून डी.डी. टी., डायएल्ड्रीनसारख्या कीटकनाशकांचा वापर करून या माशीचा बीमोड करता येतो.

 

डाॅ. अंजली दिक्षित डाॅ. जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन

 

संकलक - दिपक तरवडे

 

https://m.facebook.com/vidnyandinvishesh

 

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

 

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर Request टाइप करुन (फक्त whatsapp किंवा Telegram वरच) पाठवा.

‌E-book UPSC SSC Railway & Other Exam:

🎯 विज्ञान के महत्वपूर्ण प्रश्न 🎯

 

प्रश्न-1) प्रकाश वैघुत प्रभाव क्या है?

उत्तर- तात्कालिक प्रक्रिया!

 

प्रश्न-2) एक्स किरणों का प्रयोग किसलिए किया जा सकता है?

उत्तर-बहुमूल्य पत्थरों और हीरों में खराबी का पता लगाने के लिए!

 

प्रश्न-3) विघुत उत्पन्न करने के लिए कौन-सी धातु का उपयोग होता है?

उत्तर-यूरेनियम धातु!

 

प्रश्न-4) तारे अपनी ऊर्जा किस प्रकार से प्राप्त करते है?

उत्तर-नाभिकीय संयोजन प्रकार से!

 

प्रश्न-5) उच्चतापीय अतिचालक धातु कौन-सी है?

उत्तर-सिरेमिक ऑक्साइड!

 

प्रश्न-6) एकीकृत परिपथ में प्रयुक्त अर्द्धचालक चिप किससे बनी होती है?

उत्तर-सिलिकाॅन से!

 

प्रश्न-7) ऑटोहान ने अणु बम की खोज किस सिद्धांत के आधार पर की थी?

उत्तर-यूरेनियम विखण्डन सिद्धांत के आधार पर!

 

प्रश्न-8) लेजर एक युक्ति है,किसके द्वारा उत्पन्न किया जाता

साहित्य उत्सववर वाचूया आजचे दिनविशेष

 

सप्टेंबर - दिनविशेष

 

सप्टेंबर रोजी झालेल्या घटना वाचूया साहित्य उत्सववर

 

१५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.

 

१८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.

 

१९३९: दुसरे महायुद्धदक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

 

१९५२: कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.

 

१९६५: पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली.

 

१९६६: दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.

 

१९६८: स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.

 

१९९३: ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.

 

१९९७: अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खाँ यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.

 

सप्टेंबर रोजी झालेले जन्म वाचूया साहित्य उत्सववर

 

१७६६: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४)

 

१८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी १९५०)

 

१८९२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म.

 

१९०१: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १८ मे १९९७)

 

१९२१: बार-कोड चे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म. (मृत्यू: सप्टेंबर २०१२)

 

१९२३: युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म.

 

१९२९: हिंदी चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००४)

 

१९५७: पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस यांचा जन्म.

 

१९६८: पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर यांचा जन्म.

 

१९७१: भारतीय क्रिकेट खेळाडू देवांग गांधी यांचा जन्म.

 

सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू वाचूया साहित्य उत्सववर

 

१९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन.

 

१९६३: कन्नड कवी श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३)

 

१९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे निधन.

 

१९९०: इंग्लिश क्रिकेटपटू सर लिओनार्ड तथा लेन हटन यांचे निधन. (जन्म: २३ जून १९१६)

 

२००७: इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन.

No comments:

Post a Comment