आज चेऐतिहासिक दिनविशेष=२७जुलै१६६६

 

आज चेऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#२७जुलै१६६६

"छत्रपती शिवराय" आग्रा येथे नजरकैदेत असताना "महासिंह शेखावत" सोबत इतर राजपूत राजांनी व सरदारांनी महाराजांची भेट घेतली.

तेव्हा महासिंह शेखावत, बल्लुशाह, तेजसिंग व रणसिंग यांनसोबत महाराजांच्या पराक्रमाची चर्चा झाली.

छत्रपती शिवाजीराजांबद्दल गौरवोद्गार निघाले

या घटनेची नेमकी तारीख उपलब्ध नाही मात्र ती २४ ते २७ जुलै १६६६ दरम्यानची आहे. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतुन कसे सुटावे याचा विचार करत होते.

महासिंग म्हणाला 'शिवाजीराजे खरोखरच खुप शहाणे व समंजस आहेत. जे बोलतात ते उचितच. त्यावर कोणी अधिक काही बोलण्याची आवश्यकताच पडत नाही.

मुळ राजस्थानी पत्रातील काही वाक्ये खालीलप्रमाणे :-

'सेवोजी स्याणो बहोत, जु बात कहे सू ठीकही कहो, जू फेर कहू का कबहा की हाजत नही।

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#२७जुलै१६७३

शिवाजीराजांनी अजिंक्यतारा व सज्जनगड जिंकून मराठ्यांनी सातारा प्रांत स्वराज्यात दाखल करून घेतला.

श्रावण वद्य ९, शके १५९५,

दि २७ जुलै १६७३ रोजी सातारा शहरावर भगवा झेंडा फडकला.

तस बघायला गेल तर १६५९-६० मधेच अफजलखान वधानंतर शिवाजीराजांनी सातारा परिसरातील काही ठिकाण ताब्यात आणली होती मात्र यावेळी प्रत्यक्ष साताराच जिंकले.

पुढे मराठ्यांची राजधानी झालेला अजिंक्यतारा हा किल्ला व सज्जनगडही महाराजांनी बहुधा याच वेळी जिंकला असावा, ही २७ जुलैची घटना घडली त्याच्या महिनादोन महिना आधी सुरत, मुंबई व इंग्लंडमधील कंपनीच्या इंग्रजांमधे पत्रव्यवहार झाला त्यात शिवाजीराजांचा उल्लेख आला आहे. सुरतेचे इंग्रज म्हणतात,

'एकीकडुन बहलोलखान व दुसरीकडुन मुघलांचे सैन्य अशा पेचात शिवाजीराजे असल्याने ते प्रतिकार करण्यास असमर्थ आहेत व म्हणून आपण त्यांशी सौजन्याने वागण्याचे कारण नाही!'

सुरतेच्या इंग्रजांचा हा भ्रम मुंबईच्या इंग्रजांनी तोडत ईस्ट इंडिया कंपनीला लिहिले, 'वस्तुस्थिती सुरतचे आपले लोक समजतात तशी नसुन शिवाजी दोघांनाही तोंड देण्यास समर्थ आहे!'

आदिलशहाकडुन सातारा जिंकून शिवाजीराजांनी मुंबईच्या इंग्रजांचे बोल 'खरे करून दाखवले'.

सातार्याला प्राप्त झालेली संपत्ती मराठ्यांनी रायगडावर आणली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

आजचे _ऐतिहासिक _शिवदिनविशेष🚩

▬▬▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬▬▬

जय शंभुराजे परिवार महाराष्ट्र राज्य

***********

🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩

२७ जुलै इ.स.१६६६

"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना  "महासिंह शेखावत" याने सोबतच्या इतर राजपुत सरदारांना  महाराजांच्या पराक्रमाविषयी  माहीती सांगुन कौतुक केले.

🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩https://instagram.com/jay_shambhuraje_parivar?igshid=1kag5cvqelxq9

🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩

२७ जुलै इ.स.१६७३

भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवाजी महाराजांनी"  "सातारा प्रांत" जिंकला. अजिंक्यताऱ्याबरोबरच सज्जनगड पण बहुधा स्वराज्यात त्याचवेळी दाखल झाला असावा.

🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩🦁🚩

जय जगदंब जय जिजाऊ

  जय शिवराय जय शंभूराजे

           जय गडकोट

       !! हर हर महादेव !!

──────────────────────

  !! वारसा मराठा साम्राज्याचा !!

          !! वसा गडकोट संवर्धनाचा !!

──────────────────────*

संघटनेची सर्व कामे पाहण्यासाठी व संघटनेसोबत जोडुन राहण्यासाठी खालील लिंक वापरा.

 आपल्या परिवाराचे फेसबुक पेज👇🏻

 

https://www.facebook.com/annasaheblatepatil123/

 

आपल्या परिवाराचे यूट्यूब चॅनल

https://youtube.com/channel/UC3DVdErmuULsnN7-Ki9YInQ

 

आपल्या परिवाराचे टेलिग्राम चॅनल

https://t.me/pqpjsxig

 

आपल्या परिवाराचे फेसबुक पेज👇🏻

 

https://www.facebook.com/annasaheblatepatil123/

 

आपल्या परिवाराचा फेसबुक ग्रुप👇🏻

https://www.facebook.com/groups/448674915945253/

 

परिवाराच्या व्हाट्सअप्प च्या ग्रुप ला ऍड होण्यासाठी.

 WhatsApp click now :-👇

No comments:

Post a Comment