#आजचे ऐतिहासिक दिनविशेष =शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका

#आजचे  ऐतिहासिक  दिनविशेष

#आग्र्याहून_सुटका 🔥

रक्ताचा एक थेंबही न सांडता मुघल सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभूमीत केलेला दारुण व अब्रूचे धिंडवडे काढणारा पराभव म्हणजेच शिवराय आणि शंभूराजे यांची आग्र्यातून सुखरूप सुटका

तो दिवस म्हणजेच १७ ऑगस्ट १६६६

जुलै १६६६ पर्यंत काही मराठा सैनिक व अधिकारी आग्र्याबाहेर पडले होते. राजांना मारण्याची अशी सुवर्णसंधी औरंगजेबही वाया घालवणार नव्हता. त्याने १८ ऑगस्ट १६६६ रोजी शिवरायांना फिदाईखानाकडे द्यायचे ठरवले होते.

औरंगजेबाने शिवाजीराजांच्या भोवती चौकी-पहारे कडक केले. राजांनी आग्र्यातून निसटण्याचा निर्णय घेतला व १७ ऑगस्टला त्यांनी कैदेचा पिंजरा फोडला.

शिद्दी फौलादखानाच्या सैनिकांचा पहारा होता, मुंगीलाही प्रवेश करणे कठीण अशा चौकी-पहा-यातून महाराज निसटले,

पण कसे?

पेटा-यांचा पहिला उल्लेख येतो राजस्थानी पत्रांत:-

हे पत्र परकालदासचे आहे आणि मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना हा यावेळी औरंगाबादेस होता,

तो तारीखे दिल्कुशा या आपल्या आत्मचरित्रात

लिहितो👇

"देवाचा प्रसाद म्हणून राजे दर गुरूवारी मिठाईचे मोठमोठे पेटारे बाहेर वाटण्यासाठी म्हणून पाठवू लागला व मिठाई वाटण्याच्या वेळी राजांच्या निवासस्थानाच्या दरवाजाबाहेर खूप गर्दी जमू लागली.

फौलादखानाच्या माणसांबरोबर शिवाजीराजांनी अशी काही वागणूक ठेवली की ते लोक त्याच्या भजनी लागले आणि मग एक दिवशी राजांनी एका माणसाला आपल्या पलंगावर झोपविले त्यांनी मिठाईचे दोन पेटारे रिकामे केले आणि त्यात बसून तो आणि त्याचा मुलगा हे बाहेर पडले"

त्यांनी तडक मथुरेची वाट धरली.

परंतु ती माहिती तर्काधारित आहे

आलमगिरनामा हा औरंगजेबाच्या कारकीर्दीच्या पहिल्या दहा वर्षांचा अधिकृत इतिहास, त्याचा लेखक महंमद काजम हा औरंगजेबाचा अधिकारी होता आणि हा ग्रंथ त्याने औरंगजेबाच्या देखरेखीखाली लिहिला.

या ग्रंथात महाराज पेटा-यात बसून पळाले असा उल्लेख नाही

सेतुमाधवराव सांगतात तेथे निष्कर्ष आहे वेशांतराचा.

पेटा-यांची ये-जा होती ते पाहणा-यांच्या गर्दीत महाराज वेशांतर करून मिसळले आणि निसटले.

शंभूराजेना पेटा-यात बसविले असणे शक्य आहे शिवराय स्वतःला अगतिक आणि कुचंबलेल्या अवस्थेत पेटा-यात कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावाने आणि सावधगिरीवरून

शक्य वाटत नाही.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

[1:21 pm, 17/08/2021] R. M. Doifode 53 Jio: #१७ऑगस्ट१६६६

#१७ऑगस्ट१६६०

आदिलशहाने शिवाजीराजे व सिद्दी जौहरचा

(गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩

#१७ऑगस्ट१६६६

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

************

१७ ऑगस्ट

शिवाजी महाराज यांची आग्र्याहून सुटका

************

घटना - १७ ऑगस्ट १६६६

हीच ती तारीख १७ ऑगस्ट ची ! ही ३५४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नव्हे, तर सबंध हिंदुस्थानच्या इतिहासातील ही एक रोमहर्षक आणि तितकीच महत्त्वाची घटना आहे. अशी घटना की जिने हिंदुस्थानच्या इतिहासालाच वळण लावले.

मोगल पातशहाच्या राजधानीतून, त्याच्या कैदेतून आजवर कोणी सहीसलामत निसटू शकले नव्हते. प्रत्यक्ष औरंगजेबाच्या बापाचे शाहजहानलाही ते जमले नव्हते. पण शिवाजी महाराजांनी ते करून दाखविले. आणि असे केले, की पुढे आयुष्यभर औरंगजेब बादशहा त्या एका घटनेबद्दल स्वतःला कोसत राहिला. पश्चात्ताप करीत राहिला. आणि ती तारीख होती १७ ऑगस्ट १६६६ ची.

पण या घटनेस प्रारंभ होतो तो १२ जून १६६५ रोजी. त्या दिवशी मोगल सेनापती मिर्झा राजे जयसिंग आणि महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला. पुढे मिर्झा राजांनी महाराजांना आग्र्यास पाठविले. ते गोळकोंड्याच्या कुतुबशहाला जाऊन मिळतील असे भय मिर्झा राजांना वाटत होते. महाराजांची औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण मिर्झा राजांनी आग्रह धरला. त्यांना जावे लागले.

जयपूरच्या दफ्तरखान्यातील राजस्थानी हिंदीच्या डिंगल या बोलीभाषेत लिहिलेल्या पत्रसंग्रहानुसार, राजे ११ मे १६६६ रोजी आग्र्या जवळील मलूकचंद सराई येथे पोचले. १२ मे रोजी ते आग्र्यात आले. त्याच दिवशी त्यांची आणि औरंगजेबाची पहिली आणि अखेरची भेट झाली.

यानंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता. १४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले.

महाराजांना त्यांच्या तळावरच कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले. त्यानंतर बादशहाने महाराजांना निरोप पाठविला की, तुम्ही आपल्याजवळील किल्ले मला देऊन टाका. मी तुमची मनसब बहाल करतो.

महाराजांनी त्याला नकार दिला. तशातच रामसिंगाचे राजपूत सैनिक त्याच्या राज्यातून आग्र्यास येत असल्याची खबर बादशहाला लागली. त्याला यात कटाचा संशय आला आणि त्याने शिद्दी फौलाद आणि तोफखान्याला हुकूम दिला, सेवा को जाई पकडी मारो. शिवाजीला धरून मारा.

पण रामसिंगाने सैन्याबद्दल खुलासा केला. शिवाय बेगम जहानआरा हिने महाराजांना ठार मारू नका असे निक्षून सांगितले. मिर्झा राजे जयसिंग यांचा कौल घेऊन शिवाजी येथे आला आहे. त्याला मारलेत तर आपल्या वचनावर कोण विश्वास ठेवील, असा तिचा सवाल होता.

नंतर हळूहळू महाराजांनी आपल्या सोबत आणलेल्या लोकांना स्वराज्यात पाठविण्यास सुरूवात केली. रामसिंगलाही आपली जामिनकी मागे घेण्यास सांगितले.

१४ ऑगस्टला औरंगजेबाने महाराजांच्या भोवती चौकी पहारे कडक केले. त्याना विठ्ठलदासांच्या हवेलीत नेऊन ठेवण्याचा हुकूम केला. ते याबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी रामसिंगच्या तळावर गेले, तर रामसिंगने त्यांना भेट नाकारली. थोडा वेळ वाट पाहून महाराज परत गेले.

तब सेवौ जाणौ अब बुरा हौ, तब भाग्यो.

तेव्हाच त्यांनी ओळखले, की आता अनर्थ होणार. त्यांनी आग्र्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतला आणि १७ ऑगस्टला त्यांनी पिंजरा फोडला.

मुंगीलाही प्रवेश करणे कठीण जावे अशा या चौकी पहाऱ्यातून महाराज निसटले. पण कसे?

सर्वसामान्य मान्यता अशी की, ते मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निसटले. या पेटाऱ्यांच्या कहाणीचा पहिला उल्लेख येतो तो राजस्थानी पत्रांत. हे पत्र परकालदासचे आहे आणि ते ३ सप्टेंबर १६६६ चे आहे. तो लिहितो,

"दिवस चार घटका वर आला असता बातमी आली की, शिवाजी पळाला. चौक्या पहाऱ्यांवर एक हजार माणसे होती. तो नक्की कोणत्या क्षणी पळाला आणि कोणत्या चौकीतून पार झाला. त्यावेळी कुणाचा पहारा होता, हे कोणीही सांगू शकले नाही."

तेंठा याछे मनसुबो कर और या लहरी छे भागवा की, यो वेंकी पट्यरां कीं आमगरफ्त भी सो पट्यारा मे बैठ निकल्यो.

मग शेवटी विचार विनिमय करून असा निष्कर्ष निघाला की, पेटाऱ्यांची ये-जा होती. त्यामुळे तो पेटाऱ्यांत बसून निघाला असावा.

मोगल अकबार या उल्लेखास दुजोरा देत नाही. सेतुमाधवराव सांगतात की, तेथे निष्कर्ष आहे वेशांतराचा.

पेटाऱ्यांची ये-जा होती. ते पाहणाऱ्यांच्या गर्दीत महाराज वेशांतर करून मिसळले आणि निसटले. संभाजीराजांना पेटाऱ्यात बसविले असणे शक्य आहे. पण महाराज स्वतःला अगतिक आणि कुचंबलेल्या अवस्थेत पेटारईसत कोंडून घेतील हे त्यांच्या स्वभावावरून आणि सावधगिरीवरून शक्य वाटत नाही, असे सेतुमाधवराव म्हणतात.

मग ही पेटाऱ्यात बसल्याची कथा कशी आली?

सेतुमाधवराव म्हणातात,

पेटाऱ्यात लपून गेले त्यामुळे आम्हांला दिसले नाहीत, असे सांगून आपली सुटका करून घेण्याची ही मोगल अधिकाऱ्यांची युक्ती नसेल कशावरून?

खुद्द औरंगजेबाचा या गोष्टीवर मुळीच विश्वास नव्हता. वेष बदलून खांद्यावर कावड ठेवून महाराज मिठाईच्या पेटाऱ्या बरोबर निघून गेले. महाराज काय तोंडात जादूची गोळी धरून गेले की पक्षी बनून गेले की वारा बनून गेले? काय चमत्कार करून गेले याचा पहारेकऱ्यांना पत्ताही लागला नाही.

त्याचा शंभर टक्के खात्रीलायक पत्ता तसा अजूनही लागलेला नाही.

अर्थात महाराज कसे याहून सुटले याला मोल आहे !

सचिन पानसरे, घाटघर (जुन्नर)

संदर्भ : श्री छत्रपती नि त्यांची प्रभावळ

सेतुमाधवराव पगडी, परचुरे प्रकाशन मन्दिर

१ मे २०११, पृ. १४ ते ३५

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

संदर्भ : फेसबुक

************

No comments:

Post a Comment