| 🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️ | 
| ➿➿➿➿➿➿➿➿➿ | 
|        🇮🇳 गाथा
  बलिदानाची 🇮🇳 | 
|                  ▬ ❚❂❚❂❚ ▬                  संकलन : सुनिल
  हटवार ब्रम्हपुरी,           | 
|              चंद्रपूर 9403183828                                                     
   | 
| ➿➿➿➿➿➿➿➿➿ | 
| ⚜️✏️🎓🇮🇳👳♀️🇮🇳🎓✏️⚜️ | 
|                भारतरत्न          | 
|     डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन | 
|      जन्म : ५ सप्टेंबर १८८८ | 
| (तिरुत्तनी, तमिळनाडू तील एक
  छोटे गाव,
  दक्षिण भारत) | 
|     मृत्यू : १७
  एप्रिल १९७५                                  २ रे
  भारतीय राष्ट्रपती | 
| कार्यकाळ : १३
  मे १९६२
  –  | 
|                  १३ मे
  १९६७ | 
| मागील : राजेंद्रप्रसाद | 
| पुढील : झाकीर
  हुसेन | 
|        भारतीय उपराष्ट्रपती | 
| कार्यकाळ : १९५२
  – १९६२ | 
|     | 
| राजकीय पक्ष
  : भारतीय राष्ट्रीय  | 
|                        काँग्रेस | 
| पत्नी : सिवाकामुअम्मा | 
| अपत्ये : पाच
  मुली व एक पुत्र,
   | 
|              सर्वपल्ली गोपाल | 
| व्यवसाय : राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ,  | 
|                 प्राध्यापक | 
| धर्म : वेदान्त (हिंदू) | 
|  | 
| सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ
  होते. डॉ.
  सर्वेपल्ली राधाकृष्णन  हे भारताचे भारताचे पहिले
  उपराष्ट्रपती आणि
  दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ  त्यांचा जन्म
  दक्षिण भारतात तिरुत्तनी या
  ठिकाणी झाला.
  हे गाव
  चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी
  अंतरावर आहे.
  राधाकृष्णन यांचा
  ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला
  जातो. | 
|  | 
| पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्वादाचा तात्त्विक परिचय करून
  देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना
  ओळखले जाते.
  भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून ते
  ऑक्सफर्डमध्ये नावाजले गेले. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे. | 
|  | 
| राधाकृष्णन यांच्या जीवनात तीन
  प्रमुख प्रश्न होते. पहिला
  प्रश्न असा
  की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण
  अध्यात्मप्रवण असा
  नवा माणूस
  कसा निर्माण करता येईल?
  या दृष्टीने शिक्षणाचा काही
  उपयोग होऊ
  शकेल का?
  दुसरा प्रश्न असा होता
  की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व
  जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे
  समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव
  जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून
  द्यावे? तिसरा
  प्रश्न असा
  होता की;
  मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग
  किती?' कुणाशीही ते याच
  तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत, असे
  नरहर कुरुंदकर लिहितात. | 
|  | 
| 🎖 पुरस्कार       | 
|  | 
| १९५४ : 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित. | 
|  | 
| भारताचे माजी
  राष्ट्रपती डॉ.
  सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा
  5 सप्टेंबर रोजी
  जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘शिक्षक’ हा भावी
  पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते.
  आपल्या गुरू,
  शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस….
   | 
|  | 
| डॉ. राधाकृष्ण यांचे
  शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून
  भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. ती
  परंपरा अजूनही सुरू आहे
  व भविष्यातही सुरूच
  राहिल. 1962 मध्ये
  डॉ. राधाकृष्णन् यांनी
  राष्ट्रपती पदाची
  शपथ घेतली
  तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा
  शिक्षकांचा गौरव
  दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट
  केली होती.
  देशातील शिक्षकांचा गौरव हाच
  आपला गौरव
  असल्याचे त्यांनी सांगितले होते. | 
|  | 
| भारताचे दुसरे
  राष्ट्रपती डॉ.
  सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.
  कारण डॉ.
  राधाकृष्णन यांनी
  1909 ते 1948 वर्षं
  पर्यंत म्हणजे 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . | 
|  | 
| त्यांचा जन्म
  5 सप्टेंबर 1888 साली
  आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूत्तनी या गावी
  झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले
  व पुढील
  शिक्षण तिरुपती या गावी
  झाले. त्यांचे शिक्षण लुथरम
  मिशन हायस्कूल मध्ये झाले.
  नंतर उच्च
  माध्यमिक शिक्षण मद्रास येथील
  ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय
  घेऊन ते
  प्रथम क्रमांकाने पास झाले
  व एम्.ए. साठी
  नितीशास्त्र विषय
  घेतला. | 
|  | 
| मद्रास येथे
  प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले.
  1939 मध्ये आंध्र
  विद्यालयाने त्यांना डी. लिट.
  ही पदवी
  दिली. | 
|  | 
| 1931साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर
  ही मानाची पदवी बहाल
  केली. त्यांच्या वाढत्या गुणांम… | 
| ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄ | 
|                  🔸शिक्षक दिन.🔸 | 
|  | 
| --------------------------------------------- | 
| 🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी. | 
| --------------------------------------------- | 
|  | 
| भारतरत्न, माजी
  राष्ट्रपती आणि
  शिक्षक डॉ.
  सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती
  दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी
  शिक्षक दिन
  म्हणून साजरी
  केली जाते.
  शिक्षणाबद्दल डॉ.
  राधाकृष्णन यांना
  अतिशय जिव्हाळा होता. शिक्षण क्षेत्रात अधिकाधिक विकास घडून
  यावा यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील होते. | 
|  | 
| चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा
  संस्कृतीचा, सत्याचा व ज्ञानाचा सन्मान आहे.
  समाजाचा विकास
  सत्तेने होत
  नाही, यंत्राने होत नाही
  तर तो
  आदर्श शिक्षकांमुळे होत
  असतो. शिक्षकांचे महत्त्व असाधरण आहे हे
  जाणल्याशिवाय आपली
  तांत्रिक व यांत्रिक प्रगती होणार नाही. | 
|  | 
| ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते,
  तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात.
  असे देश
  सर्वांगीण प्रगती करू शकतात.
  समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि
  दिलासा आहे.
  त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे. | 
|  | 
| एक कुलगुरू हा
  गुरुकुलाचा आद्य
  आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे
  वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि
  एक शिक्षक म्हणून डॉ.
  सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते.
  एक शिक्षक शिष्याला ज्ञान
  देताना परिपूर्ण असावा असे
  त्यांचे मत
  होते. डॉ.
  सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक
  विषयांचा अभ्यास केला होता. | 
|  | 
| संस्कृत भाषेचा अभ्यास करून
  त्यांनी प्रस्थानत्रयी आणि
  समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट,
  ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन
  इत्यादी साहित्यिकांच्या लेखन
  शैलीचा त्यांनी अभ्यास केला.
  तसेच गटे,
  डानटे, होमर
  यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक
  परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ.
  सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव
  केला. | 
|  | 
| डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः
  एक उत्तम
  शिक्षक असल्यामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम
  आणि त्यासाठी केलेले ४०
  वर्षांचे कार्य
  यांचा सन्मान करण्यासाठी भारत
  सरकारने ५ सप्टेंबर हा
  त्यांचा जन्मदिवस 'शिक्षकदिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. | 
| स्रोत: विकिपीडिया. | 
| ❄❄❄❄❄🏵️❄❄❄❄❄ | 
- Home
- gr. dt 06-02-2004 to10-11-2003
- जी.आर. दि.10-11-2003 to20-08-2003
- जी.आर. दि.27-05-2003 to 29-01-2003
- gr date.दि.20-08-2003 to27-05-2003
- जी.आर. दि.28-01-2003 to 27-01-2002
- जी.आर. दि.23-01-2002 to 30-08-2001
- जी.आर. दि.13/08/2001 to 12-02-2001
- जी.आर. दिनांक to 10-08-2000
- जी.आर. दिनांक 06-06-2000 to 30-03-2000
- जी.आर. दिनांक 30-03-2000 to05-02-2000
- .जी.आर. दिनांक 12-01-2000 to 30-06-1999
- जी.आर. दिनांक03-02-1999 to10-08-1996
- जी.आर. दिनांक13-08-1996 to18-01-1995
- जी.आर. दिनांक14-11-1994 to05-01-1993
- जी.आर. दिनांक14-11-1992 to 02-09-1989
- जी.आर. दि.12-05-1989 to14-11-1979
- जी.आर. दिनांक 14-11-1979 to 13-01-1965
🇮🇳 गाथा बलिदानाची 🇮🇳 भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
Subscribe to:
Comments (Atom)
 

 
No comments:
Post a Comment