📜 २४ ऑक्टोबर इ.स.१६५७=छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकले.

 

छञपती श्री शिवाजी महाराज ":

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

 


📜 २४ ऑक्टोबर ..१६५७

(अश्विन वद्य द्वादशी शके १५७९ संवत्सर हेमलंबी वार शनिवार)

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी जिंकले.

            ..१६५७ मध्ये बादशहा शहाजहान दिल्लीला गंभीर आजारी असल्याची बातमी कानावर पडताच दक्षिणेत असलेला औरंगजेब अस्वस्थ झाला. उत्तरेत परतण्याच्या मनस्थितीत असतानाच त्याने आपला जुन्नरचा सुभेदार महंमद युसुफ याला कल्याणचा ताबा घेण्यासाठी पाठवले. तिथला अदिलशाही सरदार हबशखान आणि त्याची लढाई होऊन त्यात हबशखान मारला गेला. शिवाजी महाराजही हबशखानच्या मदतीला गेले होते मात्र अपुऱ्या सैन्याबळामुळे ते माघारी फिरले. मात्र त्यांनी परतल्यावर लगेच पेशवा शामराजपंतांचे बंधू दादोजी रांझेकर याना सोबतीला दादाजी सखोजी कृष्ण लोहकरे हे दोन बंधू मावळच्या देशामुखांचा सैन्य देऊन त्यांना कल्याणवर पाठवले. त्यांनी कल्याण भिवंडीवर हल्ला करून स्वराज्यात सामील करून घेतली. मुघल सरदार महंमद युसुफ पराभूत होऊन जुन्नरकडे निघून गेला. या हल्ल्यात सखोजी कृष्ण लोहकरे मारले गेले.कल्याणची हवालदारी महाराजांनी दादाजी कृष्ण लोहकरे याना दिले.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

 

📜 २४ ऑक्टोंबर ..१६८२

छत्रपती संभाजी महाराजांचे अप्रतिम राजकारण! मुघल सैन्य कल्याण-भिवंडीला वेढा देऊन बसले होते. मुघलांनी याच वेळी अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन युद्ध सज्जता केली होती. अशा वेळी मुघल, सिद्दी आणि इंग्रज एक झाले तर मराठी सत्तेला भयंकर धोका निर्माण झाला असता. अशा परिस्थितीत इंग्रजांशी मैत्री संपादून इंग्रजांना मुघलांची मदत करण्यापासून रोखणे हाच पर्याय शिल्लक होता आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी दूरदृष्टीने इंग्रजांशी मैत्री संपादण्यासाठी आपल्या तर्फे बोलणी करण्यासाठी न्यायाधीश प्रल्हाद निराजींना पाठविण्याचे ठरवले! यावेळी प्रल्हाद निराजींना छत्रपती संभाजी महाराजांनी काही सुचना देऊन पाठविले होते. मुंबईच्या संरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजांना मनुष्यबळ आर्थिक बळ देण्याचीही तयारी दाखवून जर इंग्रजांचे काही नुकसान झाले असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी नुकसान भरपाईचीही तयारी दर्शवली होती. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजांकडून काही दुर्मिळ वस्तू, लहान आणि मोठी पिस्तुले, मोठे बिलोरी, आरसे या गोष्टी हव्या होत्या त्याची यादीही छत्रपती संभाजी महाराजांनी प्रल्हाद पंतांमार्फत इंग्रजांना सादर केली. इंग्रजांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्व मागण्या, अटी ऐकून यांवर निर्णय घेण्यासाठी सुरतेस माणूस पाठविला तिकडचे ऊत्तर येईपर्यंत प्रल्हाद पंतांना १५ दिवस आपल्या जवळ ठेऊन घेतले.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

📜 २४ ऑक्टोबर ..१६८४

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक देवस्थाने,मठ,सत्पुरुष यांना वार्षिक नेमणुका करून दिल्या होत्या.आपल्या पित्याप्रमाणेच संभाजीराजेंनीही राज्याच्या मुलकी न्यायालयीन विषयाप्रमाणेच धार्मिक कारभाराकडे जातीने लक्ष दिले होते. त्यांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ इत्यादी देवस्थानाची व्यवस्था नीट चालावी म्हणून त्यांची पूर्वीची वृत्ती इनामे चालू ठेवली होती. शिवाजी महाराजांनी महादेवभट विष्णूभट शेंडये हे पुरणवेत्ते आहेत असे जाणून त्यांना श्री गणपतीपुळ्यास देवासमोर नेहमी पुराण सांगावयासाठी वृत्ती आणि घर बांधण्यासाठी शाकभाजी करण्यासाठी वतनी जमीन दिली होती.  पुढच्या काळात संभाजीराजेंनीही महादेवभटांचा मुलगाही योग्य वैदिक ब्राम्हण आहे असे पाहून त्याला स्वराज्याचे दानाध्यक्ष मोरेश्वर पंडितराव यांच्याकडून कोठी मापे दहा मण धान्य दिले होते.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 २४ ऑक्टोबर ..१७०९

छत्रपती शाहू महाराज मोगलांच्या कारावासातून सुटून ..१७०७, महाराष्ट्रात आले. तेव्हा बहुतेक सर्व मराठा सरदार छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षास जाऊन मिळाले. पण छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात कान्होजी आंग्रे नव्हते. ते महाराणी ताराबाईसाहेब यांच्याशी एकनिष्ठ राहीले. त्यांच्या प्रमाणेच वाडीकर सावंत आणि सोंधेचा राजा हे दोघेही महाराणी ताराबाईसाहेब यांच्या पक्षात होते. त्या दोघांनी महाराणी ताराबाईसाहेब यांचे लांगुलचालन करून आपला स्वार्थ साधला होता. खेम सावंत याने . . १७०८, साली महाराणी ताराबाईसाहेब यांना निष्ठा व्यक्त करून कुडाळ, बांदे, डीचोली, पेडणे, मणेरी आणि साखली हे महाल वतन म्हणून महाराणी ताराबाईसाहेब यांच्या कडून मिळवले. छत्रपती शाहू महाराजांचा जोर होताच पुढे सोंधेच्या राजाची महाराणी ताराबाईसाहेब यांच्या वरील निष्ठा ढळून छत्रपती शाहू महाराजांशी त्याने सख्य केले. त्या बदली छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना अंबेज आणि पंचमहाल हे दोन महाल सालीना २५, पंचवीस हजार रुपये खंडणी देण्याच्या कराराने दिले.

 

कान्होजी आंग्रे यांनी आपले आरमार भर भक्कम अरबी समुद्रात पोर्तुगीजांचा मुलाहिजा बाळगता स्वतंत्रपणे वागण्यास प्रारंभ केल्याने पोर्तुगीजांचा आणि त्यांचा संघर्ष निर्माण होणे स्वाभाविक होते. त्याचा परिणती अखेर पोर्तुगीज आंग्रे युद्धात झाली.या युद्धाचा अहवाल गोव्याहून पोर्तुगालच्या राजाकडे जात होता आंग्रे यांना पिटाळल्याखेरिज त्यांच्याशी तहाचा करार करू नये परंतु सातासमुद्रापलीकडे राहणाऱ्या पोर्तुगालच्या राजाला आंग्रे यांच्या सामर्थ्य याची कल्पना नव्हती.

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 २४ ऑक्टोबर ..१७७५

बहादूरशहा जफरदिल्लीचा शेवटचा बादशहा

(मृत्यू: नोव्हेंबर १८६२)

 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 

📜 २४ ऑक्टोबर ..१७८४

मराठ्यांचे वाढते वर्चस्व पाहून इंग्रजांच्या घशात पुन्हा एकदा जळजळ उठली. आता कोणत्याही प्रकारे हिंदुस्थान कब्जा करायचा तर दिल्लीचा पातशहा 'आपला' असला पाहिजे याची पूर्ण खात्री वॉरेन हेस्टिंग्जला पटली. अन् म्हणूनच भविष्याचा विचार करून त्याने दिल्लीचा शहाजादा 'जबानबक्श' याला आपल्या बाजूला वळवण्याचे प्रयत्न सुरू केले. बादशहाला ही बातमी समजली तेव्हा त्याची झोपच उडाली. बापाचा खून करून गादी बळकवण्याची थोर परंपराच जणू मोगलाईत होती. अशावेळेस आपल्याही मागे कोणीतरी मातब्बर असावा, जो इंग्रजांस शह देऊ शकेल असे बादशहाला वाटू लागले. असा मातब्बर कोण होता? होता ना... मराठ्यांचा सेनापती, महादजी शिंदे!! बादशहाने ताबडतोब निरोप पाठवून महादजींची भेट मागितली. मोगलांचा शक्य तितका वापर दौलतीकरता करता यावा या हेतूने महादजीही आग्र्याकडे मार्गस्थ झाले. दि. २४ ऑक्टोबर १७८४ रोजी फत्तेहपूर सिक्रीनजीकच बादशहाचा विश्वासू अफरासिआबखान आणि महादजींच्या भेटी झाल्या. हे पाहून अफरासिआबचा कट्टर शत्रू अन् शाहजादा जबानबक्शचा हस्तक महंमदबेग हमदानी याने नोव्हेंबरलाच अफरासिआबचा दग्याने खून पाडला. महादजींना हे समजताच त्यांनी हमदानीवर सैन्य पाठवून त्याला कुंभेरीपार पाठवून दिले. शेवटी दि. १३ नोव्हेंबर १७८४ रोजी भरतपूरजवळच महादजी शिंदे आणि बादशहाची भेट झाली. महादजींनी बादशहाला स्पष्टच सांगितले की, 'आपणास संपूर्ण अधिकार असल्याशिवाय आपल्याकडून बादशाहीचा बंदोबस्त होणे नाही.' आणि म्हणूनच महादजींनी श्रीमंत पेशव्यांच्या नावाने बादशहाजवळ 'वकील--मुतालिक' ही सनद मागितली.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

 

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

 

शिवकालीन दिनविशेष इतिहासावरील दर्जेदार माहिती

 

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

 

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

🌻छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा 🌻:

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास🚩:

#आजचेशिवदिनविशेष

****

२४ ऑक्टोबर ..१६५७

शिवाजी महाराजांनी उत्तर कोकणात मुसंडी मारत कल्याण - भिवंडी - शहापुर हा मूघली-विजापुर भाग काबीज केला.

 

औरंगजेब दख्खनेवरुन दिल्लीला परतलेला आणि विजापुरच्या आदिलशहाचा मृत्यू ह्या १६५७ च्या सुरवातीच्या दख्खनेमधल्या राजकीय परिस्थितीचा फायदा उचलत शिवरायांनी उत्तर कोकण काबीज केले. १६५६ च्या जानेवारी मध्येच जावळी ते रायरी हा भाग ताब्यात घेत विजापुरचा उत्तर कोकणाशी थेट संपर्क त्यांनी जवळ-जवळ तोडला होताच.

 

२४ऑक्टोंबर ..१६५७ साली कल्याण भिवंडीच्या लढाईत शिवरायांचा विजय होऊण, मराठा आरमार बंधणीला सुरवात  झाली. सागरावर  प्रभुत्व निर्माण करावयाचे आसेल  तर बलशाली आरमार (Nevy) ऊभारले  पाहीजे ही बाब शिवरायांच्या लक्षात आली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ ऑक्टोबर ..१६६२

फोंडा हा सभोवती खंदक, जाड-जुड मजबूत तटबंदीचा अभेद्य किल्ला होता. किल्ल्याजवळच दुर्भाट हे मराठ्यांचे महत्वाचे बंदर होते. २४ ऑक्टोबर ला पोर्तुगीज व्हाइसरॉय तिथे येवून पोहोचला. स्थानिक मराठी अधिकारी दुलबा नाईक याला फोडण्यात यश आले आणि दुर्दैवाने दुर्भाट अलगद फिरंग्यांच्या हाती आले. संतापलेले ३०० पायदळ आणि मराठे घोडेस्वार फिरंग्यांवर चालून गेले. पण कॅप्टन दिओगोफोजीरा याच्या तिखट प्रतिकारामुळे मराठ्यांना परत फिरावे लागले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२४ ऑक्टोबर ..१६६६

आग्राच्या सुटकेनंतर, शिवाजी सुटला आता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे १९ ऑगस्ट रोजी फर्मान सोडले होते. नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते. २४ ऑक्टोबर रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी पालकर यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

 

#शिवविचार_प्रतिष्ठान

छत्रपती संभाजी महाराजांविषयी अद्यापि समज-गैरसमज

वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले प्रभृतींच्या चरित्र ग्रंथांनी महाराष्ट्राला 'नव्या छत्रपती संभाजी महाराजांचे चे दर्शन घडविले खरे; पण जनसामान्यांत अद्यापिही छत्रपती संभाजी महाराजांविषयी, विशेषत: त्यांच्या युवराज कालखंडाविषयी, समज-गैरसमजच अधिक अस्तित्वात आहेत. सर्वसामान्य लोकांची गोष्ट बाजूला ठेवू; पण अद्यापि विद्वान मंडळीही या

समज-गैरसमजाच्या जंजाळातून बाहेर पडू शकलेली नाहीत याचे एक उत्तम उदाहरण आम्ही पुढे देत आहोत. काही वर्षांपूर्वी डॉ. जी. एस. सूर्यवंशी या समाजशास्त्रीय अभ्यासकाचा 'धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मता' या गंभीर विषयावर एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नि:पक्षपाती

न्यायदानाची कथा अशी सांगितली गेली आहे - “गोदावरी नामक एका ब्राह्मणाच्या विधवा मुलीवर मोहित होऊन युवराजांनी

तिला पळवून नेऊन लिंगाणा किल्ल्यावर लपवून ठेवले. महाराजांना हे कळताच

त्यांनी तिची सुटका केली. या गुन्ह्याबद्दल महाराजांनी युवराज संभाजी राजांना तोफेच्या तोंडी

देण्याची शिक्षा फर्मावली. अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी करून आजचा हा युवराज

उद्याचा आमचा राजा आहे, असे सांगून शिक्षा रद्द करून घेतली; पण ती माहेरी अगर सासरी जाईना. तिच्यावर भ्रष्ट होण्याचा प्रसंग आल्यामुळे ती सती गेली.

युवराजांनी तिची चिता पेटवली अशी लोककथा सांगितली जाते. ती जिथे सती गेली त्याच ठिकाणी महाराजांनी तिची रायगडावर जी समाधी बांधली; ती अद्यापिही तेथे आहे. शिवराज्यात गरिबापासून श्रीमंतापर्यंत, रावापासून रंकापर्यंत सर्वांनाच सारखा न्याय शिक्षा दिली जात असे. नि:पक्षपाती न्याय, न्यायाबाबत समानता हे तत्त्व वरील उदाहरणावरून दिसून येते.

छत्रपती शिवाजी महाराजांची न्यायप्रियता सिद्ध करण्यासाठी लेखकास संभाजीराजाची

ही कथा उपयोगी पडली! तेवढा त्या कथेचा उपयोग झाला! कथेची छाननी करण्याचे नंतरच ती स्वीकारण्याचे प्रयोजन लेखकास वाटले नाही!

युवराज संभाजीराजांच्या चारित्र्याविषयी अशा प्रकारचे जे प्रवाद इतिहासात नमूद केले गेले की, ज्यामुळे त्यांची प्रतिमा 'स्त्रीलंपट दुराचारी' अशी बनविली गेली. त्या प्रवादांचे मूळ असलेल्या ऐतिहासिक साधनांची छाननी जशी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही. अशी चारित्र्यहनन करणारी साधने केवळ पूर्वग्रहदूषित आहेत, म्हणून डावलून चालणार नाहीत. त्या साधनांचा बारकाईने शोध घेऊन त्यांचा खरे-खोटेपणा तपासायला हवा. संभाजीराजांस 'दुराचारी' ठरविणारे अनेक इतिहासकार होऊन गेले. त्यामध्ये संभाजीराजांवर कठोर टीकास्त्र सोडणारे मराठ्याच्या इतिहासाचे महान भाष्यकार त्र्यं. शं. शेजवलकर हे प्रमुख होत. संभाजीराजास स्त्रीलंपट' ठरविणारीही अनेक साधने उपलब्ध आहेत. बहुमत त्यांचेच आहे; पण केवळ बहुमताच्या जोरावर काहीही चिकित्सा करता ही साधने जशीच्या

 

तशी स्वीकारून संभाजीराजांच्या चारित्र्याचे मूल्यमापन करणे, हे अन्यायकारक आहे. एखाद्या मोहिमेच्या यशापयशाबद्दल साधन-चिकित्सेत थोडीफार ढिलाई झाली तरी चालेल; पण जेव्हा एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीच्या चारित्र्याचा

प्रश्न येतो तिथे त्या साधनांची कसून चिकित्सा होणे गरजेचे असते; कारण पराक्रमाच्या दंतकथांपेक्षा चारित्र्याच्या दंतकथा बहुप्रसव असतात. कल्पनेचे पंख घेऊन त्या मानेल तशा भराऱ्या मारीत असतात! या भराऱ्या दुरून पाहणाऱ्यासही

मनोरंजक वाटतात!

 

बेभान झाले मराठे भुरळ घातली तक्ताने ..

 

महाराष्ट्राच्या नद्या वाहिल्या, काठ भरुन आमच्या रक्ताने ..

छातीत भडकल्या ज्वाला, गनिमांच्या रक्ताने न्हाला ..

जाऊनी गगनाशी भिडला, होरपळुन काढले सुर्याला ..

औरंग्या सारखा पहाड लोटला छातीनं, लाथ मारुन पाणीच काढले मराठ्यांच्या जातीनं ..

 

आभाळापुढं आधिकार गाजविला सह्याद्री पुढे हिमालय झुकविला ..

भाले करुन गवताच्या पातीला मारुन थाप मांडीला ..

भिरभिरती डोळे गनिम पाहुन हात पिळविती मिशीला ..

आमच्या करारी नजरेला टक्कर नाही जगात मराठ्यांच्या जातीला ..

आमच्या मातीत येऊन नडला तो आम्ही याच मातीत गाडला ..

ज्यानं हात लावले मंदिराच्या कळसाला फाडुन फेकले कोथाळ्याला ..

रन माजविला लाल महल बाटविला खान कसा पळतांना तोडला ..

अशी कित्येकदा भाल्याची टेभें करुन आग लावली आभाळाला ..

 

माय समजतो मातीला वाघच म्हणतात या जातीला ..

स्वताःच रक्त पाजलं आम्हीच तलवारीला

बायकाचं कुंकू पुसून रक्तानं भिजवलं याच मातीला ..

कैकांचा माज उतरवुन सह्याद्रीला हिंदवी साज चढविला ..

एकच वार आणि तोही आरपार...!!

 

!!जयोस्तू मराठा!!

 

🔥🚩 हर हर महादेव, जय श्रीराम 🚩

🚩 जय भवानी, जय शिवाजी.🚩🔥

No comments:

Post a Comment