📜 १२ ऑगस्ट इ.स‌.१६६६=आग्रा येथे नजरकैदेत असताना महाराजांचा आजार बळावला!

📜 १२ ऑगस्ट इ.स‌.१६६६

(श्रावण वद्य ७, सप्तमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार रविवार)

आग्रा येथे नजरकैदेत असताना महाराजांचा आजार बळावला!

          महाराजांचा आजार बळावला होता. तशातच महाराजांनी काही दिवसांपूर्वीच आपली माणसेही स्वदेशात पाठविली होती, त्यामुळे औरंगजेब बादशहा महाराजांना मारण्याविषयी निश्चिंत होता. विठ्ठलदासाच्या हवेलीत अगदी ३/४ दिवसांत महाराजांना हलविण्याची तयारी करण्याच्या सूचनाही त्याने फुलादखानाला दिल्या. इकडे महाराजांच्या प्रकृतीत काहीही फरक पडत नव्हता. आजुबाजूची माणसे चिंताक्रांत होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १२ ऑगस्ट इ.स.१६८३

अंजदिव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते.

औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजाना संभाजीराजेंच्या विरोधात चिथावणी दिली होती. संभाजीराजेंनी आपण डिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला वेढा देण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज विजरईलाही संभाजीराजेंना जिवंत पकडण्याची इच्छा झाली. गोव्याजवळील भतग्रामातील नारवे येथे पंचगंगा नदीवर गोकुळाष्टमी ला यात्रा भरत असे. नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नारवे संभाजीराजेंच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या यात्रेदरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत. संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी विजरईला मिळाली. त्यानुसार अचानक छापा घालून त्यांना पकडण्याचा विचार विजरईचा होता. पण बहुधा संभाजीराजेंनी हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w

.

.

.

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

👍🏻 facebook page

https://www.facebook.com/shivhindvi

Instagram 📷

https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp

https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩

"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

आजचेऐतिहासिकदिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१२ऑगस्ट१६५७

शिवरायांनी तत्कालिन बारा मावळ आणि भोर तालुक्यातील खेडेबारे हा मुलुख जिंकला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#१२ऑगस्ट१६८३

अंजदिव बेटाच्या मालकीवरून पोर्तुगीज आणि मराठे संबंध बिघडत गेले होते.

औरंगजेबानेही अकबर प्रकरणावरून पोर्तुगीजाना संभाजीराजेंच्या विरोधात चिथावणी दिली होती. संभाजीराजेंनी आपण डिचोलीला जाणार असल्याचे सांगून आपले सैन्य चेऊलला वेढा देण्यासाठी पाठवले होते. त्यामुळे पोर्तुगीज मराठे युद्धाला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पोर्तुगीज विजरईलाही संभाजीराजेंना जिवंत पकडण्याची इच्छा झाली. गोव्याजवळील भतग्रामातील नारवे येथे पंचगंगा नदीवर गोकुळाष्टमी ला यात्रा भरत असे. नदीच्या उत्तर किनाऱ्यावरील नारवे संभाजीराजेंच्या ताब्यात तर दक्षिण किनाऱ्यावरील दिवाडी बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. या यात्रेदरम्यान हजारो लोक नदीत स्नान करण्यासाठी येत असत. संभाजीराजे सुद्धा या नदीत स्नान करण्यासाठी येणार आहेत अशी बातमी विजरईला मिळाली. त्यानुसार अचानक छापा घालून त्यांना पकडण्याचा विचार विजरईचा होता. पण बहुधा संभाजीराजेंनी हा बेत रद्द केला त्यामुळे पोर्तुगीजांचा हा बेत फसला गेला.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩

#१२ऑगस्ट१७६५

प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजानी मीर जाफरला बंगलचा नवाब बनवले होते, नंतर त्याच्या जागी मीर कासीमची नेमणूक केली गेली.

पण इंग्रज आणि कासीमचे संबंध बिघडले गेल्याने त्यांच्यात लढाई झाली, त्यात मीर कासीमने १५० इंग्रजाची कत्तल केली.

नंतरच्या काळात बक्सर येथे झालेल्या लढाईत मुघल बादशाह, शुजाउद्दोला आणि मीर कासीम यांच्या फौजांचा पराभव झाला आणि इंग्रजाची बंगाल आणि बिहारवर पकड मजबूत झाली. कोरा येथे झालेल्या लढाईत इंग्रजानी मल्हारराव होळकर यांचाही पराभव केला. याच सुमारास रॉबर्ट क्लाइव्ह यांची कंपनी सरकारच्या गव्हर्नर पदी निवड झाली, त्याने आपले कसब पणाला लावून हतबल झालेल्या मुघल बादशहा आणि शुजाउद्दोला याची बनारस येथे भेट घेतली आणि त्यांच्याकडून बंगाल आणि बिहार प्रांताचे दिवाणी हक्क मिळवले. त्याबदल्यात इंग्रजानी बादशहाला दरवर्षी २६ लाख रुपये तनखा देण्याचे ठरले. बादशहा आणि शुजाउद्दोला यांनी आपण इंग्रजाशी कधीही युद्ध करणार नाही असेही लिहून दिले. बादशहकडून इंग्रजानी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले ती तारीख होती १२ ऑगस्ट १७६५.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

1 comment:

  1. खूप छान माहिती आहे 🇮🇳जय शिवराय🇮🇳

    ReplyDelete